LetsUpp Marathi
前往频道在 Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
显示更多6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
6 624
*टॉप 10 हेडलाईन्स ! सकाळच्या महत्वाच्या बातम्या*
LetsUpp | Bulletin
● भारतीय रेल्वे पु्न्हा रुळावर, तब्बल २० महिन्यांनंतर सामान्य वेळापत्रकाप्रमाणे धावणार; रेल्वेचा हा निर्णय देशातून कोविडचे संकट कमी होत असल्याचं लक्षण
● राज्यातली परिस्थिती नियंत्रणात, पोलीस प्रशासनानं दक्ष राहावं : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
● महाराष्ट्रात झालेली दगडफेक, तोडफोड चिंतेचे प्रकार, राज्य सरकारनं त्वरित दखल घ्यावी : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
---------------------
*लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क :* 7798655655
----------------------
● रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासणी; नगर येथील रुग्णालयातील आग दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून तपासणी सुरू
● मुंबईत गेल्या १० वर्षात १३० मराठी शाळा विद्यार्थी संख्या कमी झाल्याने बंद कराव्या लागल्या; ६५ हजार मराठी विद्यार्थी पटसंख्या घटली
● अधिकारी, राजकारणी, श्रीमंतांनी आपली पोरं इंग्रजीत शिकवावी, मग आमच्या पोरांनी का मराठीत शिकावं? बच्चू कडूंचा सवाल
● मुंबईत पहिल्या मात्रेचे १०० टक्के लसीकरण पूर्णत्वास; मुंबईत शुक्रवारपर्यंत पहिल्या मात्रेचे ९९.९९ टक्के लसीकरण झाले
● नागपूर जिल्हा परिषदेत महिलांचे राज्य; काँग्रेसने जि.प.च्या अध्यक्षपदी रश्मी बर्वे यांची निवड केल्यानंतर प्रथमच उपाध्यक्षपदही महिला सदस्या सुमित्रा कुंभारे यांची निवड
● ११ महिला अधिकाऱ्यांना लष्करात कायम नियुक्ती; सर्वोच्च न्यायालयाच्या इशाऱ्यानंतर लष्कराचा निर्णय
● दिल्लीतील प्रदूषणकारी घटकांत सहापट वाढ; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दररोज ट्वीट करून हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी प्रसिद्ध करत आहेत
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/rzwDnIEF8kb
6 624
*दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! शिक्षण मंडळाने घेतला महत्त्वपूर्ण*
LetsUpp | Trending
● गेल्या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाल्या नव्हत्या. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क आता त्यांना परत मिळणार आहे. शिक्षण मंडळाने एक परिपत्रक काढून या संदर्भातील माहिती दिली आहे.
● महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत सन 2021 मधील इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार (कोविड -19 च्या प्रादुर्भावामुळे) रद्द करण्यात आली होती. तसेच उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार मंडळाने सन 2021 मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12वी) चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परतावा अंशत: करण्यात येत आहे.
● यासाठी माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्यांचा तपशील दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 पासून मंडळाचे 1) इयत्ता 10वी आणि 12वी साठी mahasscboard.in 2) इयत्ता 10वी साठी https://feerefund.mh-ssc.ac.in 3) इयत्ता 12वीसाठी https://feerefund.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरुन लिंकद्वारे नोंदविणे आवश्यक आहे.
● महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेची आवेदनपत्रे शुक्रवार दि. 12 नोव्हेंबरपासून स्वीकारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरावीत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
● सदर परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरावयाची आहेत.
● तर उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार दि. 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे.
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/A6lpXrRw7kb
6 624
*दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! शिक्षण मंडळाने घेतला महत्त्वपूर्ण*
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/A6lpXrRw7kb
6 624
*टॉप 10 हेडलाईन्स ! दुपारच्या महत्वाच्या बातम्या*
*LetsUpp | Bulletin*
● अरबी समुद्रात निर्माण झालेलं कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात आठवड्याच्या शेवटी मुसळधार पावसाची शक्यता; पुण्यासह 11 जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
● दोन लस घेऊन 14 दिवस उलटून गेलेल्या प्रवाशांसाठी लवकरच 'मोबाइल तिकीट अॅप' सुविधा सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार
● तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही कागदपत्रं आणि फोटो पोस्ट करताना सत्यता पडताळून पाहिलीत का? न्यायालयानेच नबाब मलिक यांना फटकारले
● एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसमोर राज ठाकरेंनी ठेवली आत्महत्या न करण्याची अट
● खासदार निधी पूर्ववत; सात राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
● राष्ट्रवादीचा काँग्रेसला अजून एक धक्का; 22 वर्ष एकहाती सत्ता राखलेली बीडच्या आंबेजोगाई नगरपालिका घेतली ताब्यात
● नागपूर ते मुंबई हा बुलेट ट्रेनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येणार; हायस्पीड बुलेट ट्रेन जिल्ह्याच्या 33 गावांच्या सिमेतून धावणार
● यवतमाळमध्ये शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या, शासकीय मेडिकल कॉलेजमधील खळबळजनक घटना
● दिलासादायक! 18 वर्षांवरील 99 टक्के मुंबईकरांनी कोरोना लशीचा पहिला डोस घेतला
● आज तामिळनाडूच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळाचा इशारा, 9 जिल्ह्यात रेड अलर्ट, आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/ztECLHkN5kb
6 624
*टॉप 10 हेडलाईन्स; दिवसभरातील 10 महत्वाच्या घडामोडी*
LetsUpp | Bulletin
● महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मान आणि पाठदुखीच्या त्रासामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणार; दोन ते तीन दिवस मानेच्या दुखण्यावर उपचार घेणार
● एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय; येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू
● प्राध्यापक आणि प्राचार्य पदांच्या भरतीबाबत गुडन्यूज; प्राध्यापकांची तब्बल २०८८ तर प्राचार्यांची ३७० पदे भरण्यात येणार - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती
● अवकाळी पावसामुळे पेरलेलं उगवच नाही. त्यामुळे आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट; उस्मानाबाद, बीड, लातूर या ठिकाणी पेरणी झालेल्या क्षेत्रावर उगवणच झाली नाही
● संपकऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हात जोडून विनंती:मागण्या पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहोत, कृपया राज्यातील गोरगरीब प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
● भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदासह त्याअंतर्गतच्या १५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १२ नोव्हेंबरला प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार; राज्य निवडणूक आयुक्तांची माहिती
● सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत खा. उदयनराजे आणि व आ. शिवेंद्रसिंहराजे यांची बिनविरोध निवड, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील निवडणूक रिंगणात; या लढतीकडे पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले
● देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं; नवाब मलिकांचा आरोप; हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष केलं
● गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा; आशिष शेलारांनी नवाब मलिकांचे सर्व आरोप फेटाळले; भाजप नेते आशिष शेलार यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला
● देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील 6500 कोटींच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश उर्जामंत्री नितीन राऊतांनी दिले
*अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा*
https://letsup.app.link/89jfNGhF4kb
6 624
*टॉप 10 हेडलाईन्स; दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या*
LetsUpp | Bulletin
● एसटी कर्मचाऱ्यांचा संप:एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर, कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळ अवमान याचिका दाखल करणार- परिवहन मंत्री अनिल परब
● एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राज्य सरकार कडक भूमिकेत; राज्यभरातील १६ विभाग, ४५ आगारामधील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
● नागपूर शहरात एक डिसेंबरपासून कोविड लसीच्या पहिल्या डोससाठी पैसे मोजावे लागणार; महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर लसीचा पहिला डोस पैसे देऊनच मिळणार
● राज्यातील विधान परिषदेच्या आठपैकी सहा जागांसाठी निवडणूक जाहीर; १० डिसेंबरला मतदान होणार असून १४ डिसेंबरला मतमोजणी
● अहमदनगर जिल्हा अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी येथील तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात चार जणांना अटक
● इंधन आणि गॅस दरवाढीचा खवय्यांना फटका; हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थाच्या किंमती २० ते ३० टक्क्यांनी वाढणार; १ जानेवारीपर्यंत ही भाववाढ अपेक्षित
● अंडरवर्ल्डशी नवाब मलिक कुटुंबियांचे संबंध, मुंबईतील ३ एकर जागा कवडीमोल भावात घेतली; सर्व पुरावे तपास संस्थांसह शरद पवारांना देखील देणार - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस
● प्रकाश आंबेडकरांचा फडणवीसांवर निशाणा: स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी फडणवीसांनी मलिकांचे प्रकरण बाहेर काढले, आंबेडकरांचा आरोप
● अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात आणखी दोन दिवस पावसाची स्थिती राहण्याची शक्यता हवामान विभागाने केला अलर्ट जारी
● केंद्रातील भाजपा सरकारविरोधात वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरुन काँग्रेस देशभरात आंदोलन करणार; १४ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार; काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांची माहिती
● न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितकडे कर्णधार पदाची जबाबदारी; न्यूझीलंड विरुद्ध ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/VCoHnJyZ2kb
