ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

前往频道在 Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

显示更多
6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटाबंदीच्या निर्णयावेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 31 मार्च 2017 पर्यंत जुन्या नोटा बँकेत जमा का करता येणार नाहीत : सर्वोच्च न्यायालय 👉 नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित बाबरी मशीद पतनाप्रकरणी सर्वोच्च न्यायालय 22 मार्चला अंतिम निकाल सुनावणार 👉 नवी दिल्ली - मुंबईवरील 26/11 चे हल्ले पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने केले, पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुरानी यांचा गौप्यस्फोट 👉 तामिळनाडू सरकारच्या विनंतीनंतर एम्सने जयललितांच्या प्रकृतीचा अहवाल आरोग्य मंत्री जे राधाकृष्ण यांच्याकडे सोपवला 👉 बिहार - गया येथे रेल्वे पोलिसांनी रांची-वाराणासी एक्सप्रेसमधून 7 पिस्तूल, 15 दारुच्या बाटल्या आणि 1500 देशी दारुच्या पिशव्या जप्त केल्या 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 नायजेरिया - येथे झालेल्या पोलीस चकमकीत तब्बल 200 जणांच्या हत्येचा आरोप असलेल्या एका क्रूरकर्म्याचा खात्मा, या कुख्यात गुंडाचे नाव हेन्री चिबूझे ----------------------------------------------------------- ’ …म्हणून कोहलीने आदर गमावला’ जाणून घेण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/254W1C ----------------------------------------------------------- (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - उत्तरप्रदेशात जरत्रिशंकू स्थिती निर्माण झाली, तर बसपच्या मायावतींनी भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा द्यावा : रामदास आठवले 👉 ठाणे - ठाणे महापालिकेच्या 18 व्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदी रमाकांत मढवी यांची बिनविरोध निवड 👉 नाशिक - महापौरपदासाठी रंजना भानसी तर उपमहापौरपदासाठी प्रथमेश गीते यांची तर गटनेतेपदासाठी संभाजी मोरुस्कर यांच्या नावाची पक्षाकडे शिफारस केल्याची आमदार बाळासाहेब सानप यांची माहिती 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशऩाच्या पहिल्याच दिवशी कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक, राज्यापलांच्या अभिभाषणा दरम्यान जोरदार घोषणाबाजी, शेतक-यांच्या आत्महत्यांवरही सरकारला घेरण्याचा प्रयत्न 👉 मुंबई - बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबतचे विधेयक या अधिवेशनात येण्याची शक्यता : पालकमंत्री गिरीश बापट 👉 नागपूर - गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यावर मालमत्ता लपवल्याचा आरोप करणारी याचिका हायकोर्टाने केली रद्द 👉 सांगली - म्हैसाळ गर्भपात प्रकरण, संशयित फरार डॉ. बाबासाहेब खिद्रापुरेच्या रूग्णालयावर छापा, आरोग्य विभागाचे पथक आणि पोलिसांकडून तपासणी सुरू 👉 नाशिक - इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाचे वरिष्ठ प्राध्यापक ई. वायुनंदन यांची मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड 👉 अहमदनगर - गेल्या काही दिवसांपासून वाढते गुन्हे आणि भक्तांच्या असुरक्षिततेमुळे शिर्डी गाव रात्री 11 ते 5 या वेळेत बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 29048.19, निफ्टी : 8963.45, सोने भाव : 29,094 (प्रतितोळा), चांदी : 42,654 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 एप्रिलपर्यंत शाओमीचा Mi 6 येणार बाजारात, या फोनमध्ये 5.5 इंचांचा फुल एचडी डिस्प्ले, 2.5 डी कर्व्ह ग्लास, 19 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि स्लो मोशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगचे फिचर्स, स्नॅपड्रॅगॉनचा 835 ऑक्टा कोर प्रोसेसर, 4000 एमएएचची बॅटरी, 32 जीबी, 64 जीबी आणि 128 जीबी अशा तीन प्रकरात हा फोन उपलब्ध असणार, या फोनची किंमत 20 ते 25 हजारांच्या आसपास असल्याची शक्यता 🎯 खेळ घडामोडी : 👉 बंगळुरू दुसरी कसोटी, चेतेश्वर पुजारा (नाबाद 79) अजिंक्य रहाणे (नाबाद40) यांच्यात पाचव्या विकेटसाठी अभेद्य 93 धावांची भागीदारी, भारताकडे 126 धावांची आघाडी 👉 मुंबई - आयपीएल 10 मध्ये स्टीव्ह स्मिथ नेतृत्त्व करत असलेल्या रायझिंग पुणे सुपरजायंट्समध्ये शार्दुल ठाकूरची वर्णी, शार्दूल ठाकूरला किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून पुणे सुपरजायंट्सनी घेतलं विकत 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 कन्नड सैराट ‘मनसू मल्लीगे’चा ऑफिशियल ट्रेलर रिलीज, मराठी सैराटपेक्षा कन्नड सैराट मनसू मल्लीगेचा प्रोमो जरा हटके आहे 👉 मुंबई - 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून घरोघरी पोहचलेला राणा अर्थात अभिनेता हार्दीक जोशी आता 'जर्नी प्रेमाची' या चित्रपटात खलनायक साकारणार (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 उन्हाळ्यात काय खावं आणि काय खावू नये? Let's Up Health Katta यंदा होळीच्या अगोदरच उन्हाचा तडाखा बसू लागला आहे. उकाड्याने लोक हैराण होतात. अनेकांना उन्हाचा त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये, अशी आपली स्थिती होते. त्यामुळे आपल्या शरिरासाठी नेमकं काय चांगल आणि काय वाईट हे समजून घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे. उन्हाळ्यात त्रास टाळण्यासाठी कोणत्या वस्तू, पदार्थ, फळे खावीत याबाबत आयुर्वेदात सांगितले आहे. त्याबद्दल जाणून घेऊयात... 👉 थंड पदार्थ : सफरचंद, चिकू, कांदा, पालक, कोबी, गाजर, बीट, बडीशेप, वेलची, डाळींब, मूग डाळ आणि दूध, दही, तूप, ताक, तांदूळ 👉 उष्ण पदार्थ : संत्री, लिंबू, बटाटा, टॉमेटो, कारले, मिरची, मका, मेथी, वांगे, भेंडी, पपई, अननस, ऊस, मीठ, चणाडाळ, गुळ, तिळ, शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड, खजूर, हळद, कॉफी. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) उन्हात नेमकं काय खावे? 👉 फळे : उन्हाळ्यात द्राक्षे, खरबूज, टरबूज, आंबा ही फळे येतात. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या रसदार फळांचे सेवन गरजेचे ठरते. 👉 भाज्या : भाज्यांमध्ये पांढरे कांदे, पालेभाज्या, टोमॅटो, काकडी, भाज्यांचा ज्यूस, आवळा, कोबी, मशरूम, भेंडी, पडवळ, बीट, रताळी, गाजर, तांदुळजा, सुरण इत्यादी प्रकार असावेत. जेवणात वेगवेगळ्या प्रकारचे रायते, फळांचे शेक्‍स, सूप्स, नाचणीचे आंबिल, दही-भात असे प्रकार घ्यावेत. 👉 मसाले : मसाले निवडताना शक्‍यतो धने आणि जिरे वापरावे. इतर उष्ण प्रकारचे मसाले वापरू नयेत. हर्बल टी किंवा ग्रीन टी शरीरासाठी चांगला असतो. 👉 दही-ताक : ताजे दही किंवा ताक उन्हाळ्यात अवश्‍य घ्यावे. पचन चांगले होते, शरीराला थंडावा मिळतो. पुदिना, ताक मसाला घालून चविष्ट असे पाचक बनविता येते. उन्हात जाण्यापूर्वी ताक पिऊन बाहेर पडावे. घरच्या दह्याचा चक्का करून त्याचे पौष्टिक मयोनिज करावे आणि ते भाज्या व फळांसोबत खावे. त्याशिवाय चमचाभर तुळशीचे बी किंवा सब्जा पाण्यात भिजत घालून थंड दुधातून घ्यावे. मुलांना देताना थोडा गुलकंद, वेलची किंवा इसेन्स घालून द्यावे. उन्हाळ्यात काय करावे? 👉 घरी बनविलेले ताज्या फळांचे ज्यूस, आइस्क्रीम्स, कुल्फी खावी. ताजा उसाचा रस मात्र बर्फ न घालता घ्यावा. 👉 हलके, पौष्टिक, कमी स्निग्धांश असलेले अन्न खावे. दिवसातून चार वेळा थोडे थोडे अन्न खावे. 👉 मिठाचा वापर योग्य प्रमाणात करावा. 👉 सकाळचा नाश्‍ता नियमित घ्यावा व रात्री लवकर जेवावे. 👉 जेवण टाळू नये. शक्‍यतो उपास टाळावा. 👉 जेवणाआधी पाणी पिऊ नये. उन्हाळ्यात काय टाळावे? 👉 कॅफीनेटेड, कार्बोनेटेड, अल्कोहोलिक पेय कमी प्यावे. या पदार्थांमध्ये प्रिझर्वेटिव्हज, कृत्रिम रंग व भरपूर साखर असते. त्यामुळे भूक मरते. काही वेळा डायल्युटेड फॉस्फरिक ऍसिडही आढळते, ज्याचा पचन संस्थेवर दुष्पपरिणाम होतो; तसेच किडनी स्टोन, दातांवर प्लाक तयार होणे असे आजार जडू शकतात. दातांच्या घनतेवरही परिणाम होऊ शकतो. 👉 बाहेर मिळणारे गाडीवरचे गोळे, कुल्फी, पेप्सीकोला खाऊ नये. 👉 गार पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाऊ नयेत. 👉 समोसा, कचोरी, फरसाण, बुंदी, चिप्स, भजी असे तळलेले पदार्थ खाऊ नयेत. 👉 थंड ज्यूसेस किंवा सरबते घेतल्यावर आल्हाददायक वाटते खरे; पण ते सरबत बनविण्याची पद्धत, त्याची पौष्टिकता यांनाही तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे सरबत घेण्यापूर्वी या काही गोष्टींचा विचार करा. शक्‍यतो घरच्या घरीच सरबते तयार करून ठेवा. ज्यूस काढल्यानंतर तो तसाच ठेवला, तर काढण्याच्या व ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये अ जीवनसत्त्वाचा ऱ्हास होतो; तसेच जीवनसत्त्व के टी हेसुद्धा कमी होते. त्यामुळे 👉 फळे, भाज्या स्वच्छ धुवून खाव्या. ज्यूसर किंवा मिक्‍सरसुद्धा धुवावा. 👉 ज्यूस हवेच्या कमीतकमी संपर्कात ठेवावे. तयार ज्यूस लगेचच प्यावे. ज्यूस घोट घोट घेतला, म्हणजे त्यात लाळ मिसळून रसातील साखर पचण्यास मदत होते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 _*मुलांच्या कलागुणांना वाव द्या!*_ _*Let's Up Parenting Katta*_ आपला मुलगा सर्वगुण संपन्न असावा, असे कुणाला वाटणार नाही. दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आहे. आणि या स्पर्धेची जाणिव आता सर्वच पालकांना सतावू लागली आहे. म्हणून अनेक प्रयत्न करून शहरातील नावाजलेल्या शाळेत आपल्या मुलाला प्रवेश घेऊन दिला, म्हणजे झाले असे नाही. तर, मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी, विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असते. अभ्यासासोबतच त्याच्या अंगभूत गुणांना वाव देण्याचाही हाच कालावधी असतो. कारण याच काळात लहान मुलांमध्ये अंगभूत गुणांची वाढ होत असते. म्हणून अभ्यासासोबत त्याच्यातील कलागुणांना किंवा त्याच्यातील कौशल्यानांही वाढवलं पाहिजे. त्यामुळेच एक पालक म्हणून तुम्ही काय करू शकता त्याविषयी खास... 👉 _*मुलांच्या विश्वात सहभागी व्हा*_ : तुम्हाला तुमच्या मुलाला जाणून घ्यावे लागेल त्यासाठी त्याचे व त्याच्या अभ्यासाचे निरीक्षण करा. शैक्षणिक कौशल्यांमध्ये त्याची प्रगती चांगली असेल तर त्यांचे कौतुक करा किंवा त्याच्यातील कलागुणांचेही कौतुक करायला विसरू नका. हे सर्व जाणून घेताना त्यांचेही भावविश्व आहे, हे विसरु नका आणि त्यांच्या विश्वात रममाण व्हा. तुमचे अनुभवही त्याच्याशी शेअर करू शकता. 👉 _*श्रमाचे महत्त्व पटवून द्या*_ : लहानपणापासून मुलांवर श्रम संस्काराची जोपासणा करा. श्रम किती महत्वाचे आहेत व श्रमाने आपली बौद्धिक आणि शारीरिक वृद्धी होत असते हे त्याला पटवून द्या. कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यासही त्याला वेळ दिला पाहिजे. मुलाला चांगल्यात चांगली कामगिरी करता यावी यासाठी त्याच्या पातळीनुसार आव्हानेही द्या. यातून घडलेल्या व्यक्तिमत्त्वातून भविष्यातील आव्हानांना तो सहज सामोरे जाऊ शकतो. म्हणूनच त्याला श्रमाचे महत्त्व पटवून द्या. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 _*वेळेचा सदुपयोग*_ : गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही, म्हणून मुलांना सुरुवातीपासूनच वेळेचा सदुपयोग करायला शिकवा. त्याच्यातील गुणांना शोधून त्यागुणांना विकसित करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी चांगल्या शिक्षकाचा शोध घ्या. वेगवेगळ्या स्पर्धा पाहायला तसेच स्पर्धेत सहभाग घ्यायला त्याला प्रोत्साहन द्या. यामुळे त्याला स्पर्धेविषयी आवड निर्माण होईल व त्याची कष्ट करण्याची व यशस्वी होण्याची धडपड सुरु होईल. 👉 _*प्रोत्साहन द्या*_ : मुलांना ज्या क्षेत्रात आवड आहे, त्याबाबत त्यांना प्रेरणा देऊन त्यातील त्यांची प्रेरणेची पातळी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी जमवू द्या. मुलाच्या आवडीच्या क्षेत्रातील पुस्तके, नियतकालिके, व्हिडिओ त्याच्यासाठी खरेदी करू शकता. 👉 _*मुलांना पुरेसा स्पेस द्या*_ : सतत अभ्यास कर, अभ्यास कर या भडिमारामुळे मुलांच्या कलागुणांचा व कौशल्यांचा विकास होत नाही म्हणून मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांच्यावर सतत एकाच गोष्टींचा भडिमार करु नका. मुलाला त्याची कौशल्ये विकसित करण्यासाठी पुरेशी मोकळीक द्या. मुलाला त्याच्या कामात प्रायव्हसी द्या, त्याला त्याचा स्पेस द्या. यामुळे तो बौद्धिक व शारीरिक सक्षम होईल. पण स्पेस देताना त्याच्याकडे लक्षही राहूद्या. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 महागाई भत्ता 2 ते 4 टक्के वाढणार... Let's Up Current Affair केंद्रीय कर्मचार्‍यांना वाढत्या महागाईशी सामना करण्यासाठी डीए दिला जातो. मात्र, प्रस्तावित महागाई भत्तातील वाढीबाबत श्रमिक संघटना नाखुश आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून लवकरच महागाई भत्त्यात (डीए) 2 ते 4 टक्के वाढ करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. केंद्रीय कर्मचारी संघाचे अध्यक्ष केकेएन कुट्टी म्हणाले, केंद्र सरकारने 2 टक्के महागाई भत्ता वाढविण्यास सहमती दर्शविली होती आणि ही वाढ जानेवारी 2017 पासून लागू करणार होते. प्रस्तावित वाढ ही कमी असून कंझ्युमर प्राईस इंडेक्‍स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्सकडून (सीपीआय-डब्ल्यू) महागाईचे योग्य मुल्यमापन होत नाही, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, वस्तुंच्या वाढत्या किंमतीबाबत कामगार मंत्रालय आणि कृषि मंत्रालय यांच्यात मतभेद आहेत. दरम्यान, केंद्र सरकराने मागील वर्षी दिपावलीनंतर 50 लाख कर्मचारी आणि 58 लाख पेन्शनधारकांना 2 टक्के महागाई भत्ता वाढवून दिला होता. याचा लाभ 1 जुलै 2016 पासून कर्मचार्‍यांना मिळत आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 ग्रीन कार्ड लॉटरी बंद होणार… ग्रीन कार्ड हा अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याचा हा परवाना मानला जातो. दर वर्षी 50,000 वेगवेगळ्या देशातील नागरिकांना हे कार्ड दिले जाते. मात्र आता ग्रीन कार्ड लॉटरी बंद होणार आहे. रिपब्लिकन संसद सदस्यांनी ही लॉटरी बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अर्कान्सासचे सिनेटर टॉम कॉटन आणि जॉर्जियाचे सिनेटर डेव्हिड पर्ड्यू यांनी एक विधेयक सादर केले आहे. त्यात गेल्या 22 वर्षांपासून चालू असलेला हा कार्यक्रम बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. अमेरिकेत येणाऱ्या शरणार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या संख्येवर निर्बंध घालण्याचा नियमही या विधेयकात आहे. ‘सेफ फॉर अमेरिका अॅक्ट’ असे या विधेयकाचे नाव आहे. “या विधेयकामुळे अमेरिकी कर्मचाऱ्यांचे वेतनमान सुधारण्यास मदत होईल,” असे या सिनेटरांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 जिओच्या पोस्टपेड ग्राहकांना फटका! Let's Up Techno Katta 5 सप्टेंबर 2016 ला जिओने धुमधडाक्यात प्रिपेड आणि पोस्टपेड सेवा सुरू केली. जिओशी जे पोस्टपेड ग्राहक जुळले आहेत त्यांना त्यांचा प्लान मिळाला आहे. पण यातील अधिकाधिक पोस्टपेड ग्राहकांना याची माहितीच नाही की त्यांचा तो प्लान किती रुपयांचा आहे. दरम्यान आता प्राईम मेंबरशीप नंतर त्यांच्या या प्लानला देखील बदलण्यात आले आहे. ज्या ग्राहकांचा 149 रुपयांचा प्लान होता, त्या सर्व ग्राहकांना आता प्राईम मेंबरशीप घ्यावी लागणार आहे. प्राईम मेंबरशीप प्लान हा 303 रुपयांमध्ये आहे. त्यामुळे त्यांचा आधीचा प्लान हा 303 रुपयांमध्ये बदलणार आहे. तसेच पोस्टपेड ग्राहकांसाठी आता 303 रुपये, 499 रुपये आणि 999 असे प्लान देण्यात आले आहे. आता अचानक 149 रुपयांचा प्लान 303 मध्ये बदलणार असल्याने जिओ ग्राहकांना आता 303 रुपये महिन्याला भरावे लागणार आहे. जी रक्कम आधीपेक्षा दुप्पट असल्याने जिओच्या पोस्टपेड ग्राहकांना आता मोठा फटका बसणार आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 फ्लिपकार्टची मोठी घोषणा... अ‍ॅमेझॉनशी स्पर्धा करण्यासाठी फ्लिपकार्टने यावर्षी 20 ते 30 टक्के अधिक कर्मचार्‍यांची भर्ती करण्याची मोठी घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले की, जास्तीत जास्त कर्मचार्‍यांना नोकरी उपलब्ध करून दिल्याने कंपनीची प्रगती होणार असून नफ्यात वाढ होणार आहे. कंपनीचे सीओओ म्हणाले, 2017 मध्ये कंपनीकडून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असून बंपर भर्ती करण्यात येणार आहे. यासाठी कंपनीतील सर्व विभागात नवीन कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मागील वर्षी कंपनीत 1500 लोकांना नोकरीवर रुजू करून घेण्यात आले होते. याशिवाय लॉजिस्टिकमध्ये 10 हजार लोकांना रोजगार मिळवून दिला होता. त्यामुळे विविध सण, उत्सवात कंपनीच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेकडे (ईपीएफओ) नोंदणी करण्यासाठी तसेच राज्य कामगार विमा योजनेसाठी कंपन्यांना आता एकच अर्ज भरावा लागणार 👉 नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना मेलमधून धमकी दिल्याप्रकरणी आरोपी वैभव बद्दलवार याला पोलिसांनी केली अटक 👉 तिरुवनंतपुरम - केरळच्या कोझीकोडे येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन कार्यकर्त्यांच्या घरावर हल्ला, सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप 👉 बिहार - बरहारा पोलिस स्थानकाला स्थानिकांनी लावली आग, एका गावकऱ्याच्या मृत्यूबद्दल सहकार्य न केल्याच्या असंतोषातून घडला प्रकार 👉 उत्तर प्रदेश - बलात्काराचे आरोप असणाऱ्या गायत्री प्रजापती यांचे मंत्री पद कायम ठेवल्याबद्दल राज्यपाल राम नाईक यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडे मागितले स्पष्टीकरण 👉 अहमदाबाद - गुजरातजवळ अरबी समुद्रात पाकिस्तानी नौदलाने 80 भारतीय माच्छीमार आणि 15 बोटी ताब्यात घेतल्या (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 उत्तर कोरियाकडून करण्यात आलेले बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे परीक्षण आणि मलेशियात हुकूमशहा किम जोंग उनच्या सावत्र भावाची झालेली हत्या या पार्श्वभूमीवर अमेरिकेने उत्तर कोरियावर लष्करी कारवाई करण्याची योजना आखली 🎯 राजकीय घडामोडी : 👉 वाराणसीमधील मोदींचे रोड शो म्हणजे निवडणूक नियमांचे उल्लंघन आहे, निवडणूक आयोगाने यासंदर्भात योग्य कारवाई करायला हवी - बसपा 👉 कम्युनिस्ट पक्ष क्राइम पक्ष झाला आहे, त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला आहे म्हणून जगात त्यांचा दबदबा कमी होत आहे - मुख्तार अब्बास नकवी, भाजप नेते 👉 मुंबई - राज्यातल्या युती सरकारला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचं आश्वासन खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली 👉 मुंबई महापौर निवडणुकीबाबत जे नाट्य घडलं त्यातून भाजप अणि शिवसेनेचा खरा चेहरा लोकांसमोर आला - राधाकृष्ण विखे-पाटील 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात तर राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्चला सादर होणार, या अधिवेशनात 23 विधेयकं मांडली जाणार 👉 मुंबई - अॅसिड हल्ल्यातील जखमींना राज्य सरकारमार्फत देण्यात येणारी मदत तीन लाखांवरून पाच लाख करण्यात आली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 👉 सांगली - जिल्ह्यातील म्हैसाळ गावातील भारती हॉस्पिटल शेजारी खोदकाम करताना 19 मृत अर्भकं सापडल्याचा प्रकार उघड 👉 जळगाव - चोपडा येथे हिरा कॉटन जिनींगला भीषण आग, सुमारे चार ते पाच हजार क्विंटल कापूस जळून खाक झाल्याची माहिती 👉 उस्मानाबाद - भुम तालुक्यातील ईट येथील वेदपाठक ज्वेलरी दुकान फोडून अडीच लाखांचे दागिने लंपास, पोलिसांकडून तपास सुरू 🎯 खेळ घडामोडी : 👉 बंगळुरु - मॅट रेनशॉ आणि शॉन मार्श यांच्या झुंजार अर्धशतकांनी ऑस्ट्रेलियाची बंगळुरू कसोटीवर पकड, दुसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाच्या 6 बाद 237 धावा 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 नवी दिल्ली - सुपरस्टार रजनीकांतचा जावई व अभिनेता धनुषवर गायिका सुचित्रा कार्तिक हिने केले लैंगिक शोषणाचे खळबळजनक आरोप (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 2510 जागांसाठी भरती Let's Up Job Updates पोस्ट : कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (Junior Telecom Officer) - जागा : 5210 - पात्रता : E/BTech. OR Telecom/Electronics/Radio/Computer/Electrical/Information Technology/Instrumentation Engg. or M.Sc (Electronics)/M.Sc(Computer Science) are required to appear GATE exam 2017 वय : दि. 31 जानेवारी 2017 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट) फी : 500 रुपये (SC/ST : 300 रुपये, OBC : 500 रुपये) ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 06 एप्रिल 2017 अधिक माहितीसाठी : https://goo.gl/0IGBP1 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/HzaSfB (अर्ज भरण्यास 6 मार्च पासून सुरुवात) (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती पोस्ट : वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (डॉट्स प्लस साईट) - जागा : 04 पोस्ट : वैद्यकीय अधिकारी (जिल्हा क्षयरोग केंद्र) - जागा : 17 पोस्ट : वैद्यकीय अधिकारी (वैद्यकीय महाविद्यालय) - जागा : 01 पोस्ट : वैद्यकीय अधिकारी (DRTB OPD) - जागा : 01 पोस्ट : सांखिकी सहाय्यक - जागा : 02 पोस्ट : वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक - जागा : 02 पोस्ट : वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ - जागा : 03 पोस्ट : प्रयोगशाळा तंत्रज्ञ - जागा : 04 पोस्ट : क्षयरोग आरोग्य प्रचारक - जागा : 07 पोस्ट : समुपदेशक - जागा : 04 पोस्ट : लेखापाल - जागा : 08 पोस्ट : जिल्हा PPM समन्वयक - जागा : 20 पोस्ट : संगणक चालक - जागा : 02 अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : मुबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था,म 1 ला मजला, बावलावाडी वृ.म.पा.इमारत, डॉ बा.आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई - 400012 अर्ज करण्याची मुदत : दि. 06 मार्च 2017 अधिक माहितीसाठी : https://goo.gl/4WBPFK (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 ऑनलाइन सुरक्षा कशी कराल Let's Up Useful info गेल्या काही वर्षांमध्ये देशातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या कित्येक पटीने वाढली आहे. इंटरनेट, स्मार्टफोन व संगणक सेवेची सहज उपलब्धता हे यामागील करणे आहेत. सोबतच विविध शहरामध्ये मोफत वाय-फाय सुविधांचा भडीमार वाढत चालला आहे. जरी इंटरनेट सुविधांची सहज उपलब्धता असली तरी अलीकडे ‘डिजिटल वॉलेट’, ‘इंटरनेट बँकिंग’ यांच्या वापराचे प्रमाण वाढल्याने ऑनलाईन सुरक्षा हा कळीचा मुद्दा आहे. यामुळे तुमची खाजगी माहिती सार्वजनिक होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे इंटरनेट वापरताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच हि खास उपयुक्त माहिती तुमच्यासाठी... 👉 टू स्टेप व्हेरिफिकेशन : ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’ म्हणजे इंटरनेट खात्याच्या पासवर्ड शिवाय एक ‘व्हेरिफिकेशन कोड’ असतो त्याला OTP असेही म्हणतात. हा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवण्यात येतो. हा कोड प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन येत असतो व तुमच्या स्मार्टफोनवर येणारा क्रमांक कोणालाही समजू शकत नाही. शक्य असेल त्या वेळी तुमच्या विविध खात्यांच्या द्विस्तरीय पडताळणी अर्थात ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’ करून घ्या. 👉 अज्ञात राहून इंटरनेट ब्राऊजिंग करा : गुगल सर्च करत असाल तर शक्यतो ‘अनानिमोस’ अर्थात अज्ञात राहून इंटरनेट ब्राऊजिंग करा. कारण तुमचे ‘जीमेल’ खाते सुरू असताना, ‘गुगल सर्च’ वा अन्य कोणत्याही संकेतस्थळावर गेल्यास तुमच्या ई-मेलसोबत तुमची वैयक्तिक माहिती त्या ठिकाणी जमा होते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 पासवर्ड संरक्षण : घर उघडण्यासाठी जशी चावीची गरज असते तसेच इंटरनेटवर जाण्यासाठी (इंटरनेट वरील कोणतेही अकाऊंट) ‘पासवर्ड’ हि तुमची चावी असते. त्यामुळे तुमचा पासवर्ड हा इतरांच्या हाती पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. पासवर्ड लक्षात ठेवणे सोपे जावे यासाठी अनेक जण आपल्या सर्व प्रकारच्या इंटरनेट खात्यांना एकच पासवर्ड वापरतात. परंतु तो पासवर्ड इतरांना माहीत पडला तर तुमच्या अन्य खात्यांवरील माहितीही चोरली जाऊ शकते. त्यामुळे शक्यतो पासवर्ड स्वतंत्र ठेवावेत. 👉 ‘अदृश्य’ राहा! : ब्राऊजिंग करताना तुमची ओळख सार्वजनिक होऊ नये, यासाठी ब्राऊजर्सवर विविध सुविधा असते. गुगल क्रोममध्ये ‘इनकॉग्निटो’, फायरफॉक्समध्ये ‘प्रायव्हेट ब्राऊजिंग मोड’ किंवा मायक्रोसॉफ्टच्या ब्राऊजरवर ‘इनप्रायव्हेट’ या नावांनी ही सुविधा उपलब्ध आहे. या सुविधा तुमच्या संगणकात शिरकाव करू पाहणाऱ्या ‘हेर’ कूकीजना रोखते. 👉 ‘क्लीन अप’ करा : इंटरनेट वापरानंतर किंवा नवीन संकेतस्थळ हाताळल्यानंतर संगणक/ स्मार्टफोनवरील ‘कूकीज’, ‘कॅश’, ‘टेम्पररी फाईल्स’ हटवून टाका. कारण इंटरनेटवरील विविध संकेतस्थळांना भेट दिल्यानंतर त्या संकेतस्थळावरील काही फाईल्स आपल्या संगणकावर किंवा स्मार्टफोनवर जमा होत असतात. यातील काही ‘कूकीज’ तुमच्या माहितीचा माग काढत असतात. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - आता आधार कार्ड सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासाठी बंधनकारक करण्यात येणार, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जारी केले परिपत्रक 👉 नवी दिल्ली - दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत 375 रुपयांची वाढ (सोने प्रतितोळा 30,100), तर दुसरीकडे चांदीच्या दरातही 400 रुपयांची वाढ (चांदी प्रतितोळा 43,100) 👉 नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी किमान वेतनात तब्बल 37 टक्क्यांनी केली वाढ, राज्याच्या इतिहासात करण्यात आलेली सर्वात मोठी वाढ 👉 कोलकाता - हावडा रेल्वे स्थानकामध्ये तपासणी दरम्यान पोलिसांनी 18 पिस्तुल जप्त केले 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 अमेरिका - दक्षिण कॅरेलॉनामध्ये भारतीय वंशाच्या उद्योजकाची (हरनिश पटेल) गोळ्या झाडून हत्या, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट, ही हत्या वर्णभेदातून झाली नसावी, असे पोलीस प्रमुख बॅरी फेली यांनी केले स्पष्ट (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 राजकीय घडामोडी : 👉 पहिल्या पाच टप्प्यातच भाजपाने उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक जिंकलीय, आता संपूर्ण बहुमतासाठी फक्त तुम्हाला आम्हाला बोनस द्यायचा आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 👉 मुंबई - विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज शिवसेनेकडून महापौर पदासाठी तर हेमांगी वरळीकर यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला 👉 मुंबई - भाजपाने मुंबईच्या महापौरपदासह स्थायी समिती आणि अऩ्य कुठल्याही समित्याची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 👉 मुंबई - महापौरपदाच्या निवडणुकीमधील राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात, काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत अद्याप निर्णय नाही, 7 मार्चला राष्ट्रवादीकडून भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता 👉 अकोला - भाजपाकडून महापौर पदासाठी विजय अग्रवाल, उपमहापौर पदासाठी वैशाली विलास शेळके यांचा उमेदवारी अर्ज दाखल 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - ओला, उबेर टॅक्सीसाठी ‘महाराष्ट्र टॅक्सी नियम 2017’ लागू, किमान आणि कमाल भाडं सरकार ठरवणार, अॅप आधारीत टॅक्सी सेवांसाठी स्वतंत्र परवाना देणार 👉 मुंबई - मनपाकडून सेल्फी पॉईंटला दिलेली परवानगी रद्द, स्थानिकांचा विरोध असल्याने मनपाने तिन्ही पक्षांना दिलेली परवानगी रद्द केली 👉 मुंबई - दुर्मिळ शिल्पांच्या तस्करीप्रकरणी उदित जैन या व्यक्तीला महसूल गुप्तचर संचालनालयाकडून अटक, याआधीही उदितला चेन्नईमधून करण्यात आली होती अटक 👉 कोल्हापूर - डॉ. कृष्णा किरवले हत्या प्रकरण, दलित नेते-कार्यकर्त्यांचे सी.पी.आर.मध्ये ठिय्या आंदोलन, आरोपीला अटक केल्याशिवाय किरवलेंचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, पोलीस प्रशासनाविराधात निदर्शने सुरू 👉 औरंगाबाद - एम.जी.एम.मधील स्वीमिंग पुलमध्ये पोहताना एकाचा मृत्यू, मृत व्यक्ती मुकुंदवाडीतील रहिवासी 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 मेझू या कंपनीची ‘सुपर एमचार्ज’ प्रणाली सादर, अवघ्या 30 मिनिटांत 3,000 मिलीअँपिअर क्षमतेची पूर्ण बॅटरी चार्ज करणे शक्य होणार 🎯 खेळ घडामोडी : 👉 बेंगळुरू कसोटी, पहिल्या दिवसाचा खेळ संपला, भारताच्या पहिल्या डावात सर्वबाद 189 धावा, तर ऑस्ट्रेलिया बिनबाद 40 धावा 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप पुन्हा एकदा कॅप्टन जॅक स्पॅरोच्या व्यक्तिरेखेत दिसणार असून नुकताच ‘पायरेट्स ऑफ द कॅरिबियन 5’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 तरुणांसाठी खास टिप्स… Let's Up Tips & Tricks फॅशन म्हटलं कि, डोळ्यासमोर मुली उभ्या राहतात. पण फॅशन हि फक्त मुलींनीच करायची असते का? मात्र मुलांसाठी फॅशन टिप्स सहज मिळत नाहीत तर मुलींसाठी फॅशन टिप्स सहज मिळतात. त्यामुळे फॅशनच्या दुनियेत मुले मागे आहेत, असेही म्हटले जाते. म्हणूनचं मुलांसाठी काही खास फॅशन टिप्स... 👉 ब्रॅंडपेक्षा सूत महत्वाचं : चांगल्या कपड्यासाठी चांगले व महागातले ब्रँड वापरावेत असे काही नाही. चांगल्या सुताचे कपडे एखाद्या साध्या ब्रॅण्डमधेही मिळू शकतात. त्यामुळे वेगवेगळे ब्रॅण्डस ट्राय करून पहावेत. 👉 लुक सिंपल ठेवा : तुमचा लुक नेहमी सिंपल ठेवा. अ‍ॅक्‍सेसरीज घालायच्या असतील तर त्या ड्रेसपेक्षा कमी अ‍ॅक्ट्रक्टिव्ह असू द्या त्यामुळे तुमचा लूक मिसमॅच होण्याची शक्यता कमी असते. 👉 फिटींगचा फंडा : सैल किंवा घट्ट कपडे तुमचा लुक खराब करतात. त्यामुळे कपडे नेहमी तुमच्या साईजेच घाला यामुळे तुमचा फायदाच होतो. तुम्ही जास्त जाडही वाटणार नाहीत व जास्त हाडकुळेही वाटणार नाहीत. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 प्रयोग करू नका : काही काळात तुमची हेअर-स्टाईल बदलू शकता. त्यासोबतच तुमच्या हेअरस्टाईलला साजेसे कपडे घाला. तरच त्याला अर्थ राहील. प्रयोग म्हणून तुमच्या लूकमध्ये नेहमी बदल करू नका. 👉 ओकेजन : कुठेही जाण्यागोदर कपडे विचार करून निवडा. जात असलेलं ठिकाण, तिथे येणारी माणसं, त्यांची स्टाईल, विचार या सगळ्याचा विचार करून व महत्व लक्षात घेऊन तुमचे कपडे निवडा. 👉 लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका : अशाच वस्तू खरेदी करा ज्या तुम्ही वेगवेगळ्या कपड्यांसोबत वापरू शकता. स्कार्फ, ब्रेसलेट हे तुमच्या लुकला अधिक आकर्षित बनवतं. त्यामुळे एकच अ‍ॅक्‍सेसरी अशी खरेदी करा ती तुम्हाला प्रत्येक ड्रेसवर वेग-वेगळा लूक देईल. 👉 बूट : तुमच्या पेहरावात सर्वात महत्वाचा भाग हा बूट किंवा चप्पल असतो. त्यामुळे तुमच्याकडे नेहमी चांगल्या चप्पल आणि बूटांचे कलेक्‍शन ठेवा. तसेच कधीकधी कोल्हापुरी चप्पलही तुम्हाला ट्रेण्डी लूक देऊन जाईल. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 बेनामी व्यवहार करताय? सावधान... Let's Up Current Affair भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी बेनामी व्यवहार करणा-याला 7 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तसेच आयकर अधिनियमाखाली दंड या शिक्षांसाठी पात्र ठरतील, अशी माहिती आयकर विभागाकडून देण्यात आली आहे. आयकर विभागाने देशातील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन बेनामी व्यवहारात सामील असलेल्यांना बेनामी व्यवहार करून नका, बेनामी संपत्ती व्यवहार-1988 अधिनियम 1 नोव्हेंबर 2016 पासून देशभरात अंमलात आणण्यात आला आहे, असा इशारा दिला आहे. आयकर विभागाणे प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीमध्ये काळा पैसा हा मानवतेच्या विरोधातील गुन्हा आहे. तेव्हा प्रत्येक सजग नागरिकाने काळा पैसा नष्ट करण्यासाठी सरकारला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. आयकर विभागाने बेनामी कायद्यातील काही व्याख्या देखील या ठिकाणी स्पष्ट केल्या आहेत. यात बेनामीदार म्हणजे ज्याच्या नावे बेनामी संपत्ती आहे ती व्यक्ती, बेनिफिशरी म्हणजे ज्याने संपत्तीसाठी पैसे मोजले आहेत ती आणि बेनामी व्यवहाराचा डाव रचला आहे ती व्यक्ती. अशा व्यक्ती बेनामी कायद्याखाली दंडास पात्र ठरतील. त्यांच्या व्यवहारांवर कायदेशीर कारवाई होऊ शकेल आणि गुन्हा सिद्ध झाल्यास 7 वर्षांची सक्तमजुरी आणि बेनामी संपत्तीच्या 25 टक्क्यांपर्यंत दंड अशा शिक्षांस ते पात्र ठरतील, असा इशारा देखील यात दिला आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) बेनामी कायद्यांतर्गत चुकीची माहिती देणार्‍या व्यक्ती देखील गुन्हा सिद्ध झाल्यास 5 वर्षांच्या शिक्षेस पात्र ठरतील. तसेच ते बेनामी संपत्तीच्या किमतीच्या 10 टक्के दंडास देखील पात्र ठरतील. या कायद्यात सरकार बेनामी संपत्ती जप्त देखील करू शकणार आहे. बेनामी कायदा मागील वर्षी नोव्हेंबरपासून अंमलात आला, तेव्हापासून फेब्रुवारी 2017 पर्यंत देशभरात 230 प्रकरणांची नोंदणी या कायद्यांतर्गत झाली आहे. तसेच देशभरात 55 कोटींची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तसेच 140 बेनामी संपत्तीधारकांना जप्तीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या असून त्यांचे एकूण मूल्य 200 कोटी रुपये आहे. जप्त झालेल्या बेनामी संपत्तींमध्ये बँकांतील ठेवी, शेत आणि इतर प्रकारच्या जमिनी, निवासी गाळे (फ्लॅट्स), दागदागिने आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. 👉 कॅशलेस व्यवहार घटले...! डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी एकीकडे सरकार विविध उपाययोजना सुरु असूनही डिसेंबरच्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये डिजिटल व्यवहारांमध्ये 21.3 टक्यांनी घट झाली आहे. देशात नोटाबंदीनंतर चलन तुटवडा निर्माण झाला होता. मात्र आता ही समस्या मोठ्या प्रमाणात सुटली असल्यामुळे डिजिटल व्यवहारांचे प्रमाण कमी झाल्याचे बोलले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार डिजिटल व्यवहार घटल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये 95.7 कोटी डिजिटल व्यवहार झाले होते. जानेवारीमध्ये हे प्रमाण घसरुन 87 कोटींवर आले. तर फेब्रुवारीमध्ये डिजिटल व्यवहारांचे प्रमाण 64. 8 कोटींवर घसरले. जो पर्यंत नोटा उपलब्ध नव्हत्या तोपर्यंत लोकांनी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिले, मात्र नोटा उपलब्ध होताच लोक पुन्हा पारंपारिक रोख व्यवहाराकडे झुकले आहे. शिवाय कॅशलेस व्यवहारासाठी शुल्क आकारण्यात येत आहे त्यामुळे ही अनेक लोक पारंपरिक व्यवहाराला पसंती देत आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 ‘हृदयांतर’ मध्ये हृतिक रोशन! Let's Up Entertainment Katta अभिनेता सलमान खान नंतर आता हृतिक रोशन मराठी सिनेमात भूमिका करणार आहे. बॉलिवूडमधील फॅशन डिझायनर विक्रम फडणीस दिग्दर्शित करत असलेल्या पहिल्यावहील्या ‘हृदयांतर’ या मराठी सिनेमात हृतिक रोशन भूमिका साकारणार आहे. हा सिनेमात कौटुंबिक नाते संबंधावर आधारित असून या सिनेमाचे शूटींग सध्या सुरू आहे. डिसेंबर महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. एका दाम्पत्याची त्यांच्या वैवाहिक जीवनातली वादळांशी असलेली झुंज दाखवणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाची कथा अत्यंत चांगली आणि आव्हानात्मक असल्याने ती कुणीही नाकारणे शक्यच नव्हते. हृतिकला या चित्रपटाची कथा ऐकवली. त्याने लगेच या सिनेमात काम करण्यास तात्काळ होकार दिला, असंही विक्रम फडणीस यांनी सांगितलं. हृदयांतर सिनेमाची कथा हृदयस्पर्शी असून या सिनेमा सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या सिनेमात मनिष पॉलदेखील पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात तो मनिष पॉल हीच व्यक्तिरेखा साकारणार आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 लवकरच दिशानीची बॉलीवूडमध्ये एंट्री दिग्गज अभिनेता मिथून चक्रवर्ती यांची कन्या दिशानी लवकरच बॉलीवूडमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. सध्या दिशानी न्यूयॉर्कमध्ये फिल्म अॅकॅडमीत शिकते आहे. ती सोशल मिडीयावरही बरीच अॅक्टीव्ह आहे. शिक्षण पूर्ण होताच ती बॉलीवूडमध्ये प्रवेश करेल असा अंदाज व्यक्त होत आहे. दिशानीची गणना मोस्ट स्टायलीश स्टार डॉटर्समध्ये केली जाते. तिचे वडील मिथून यांनी केवळ अभिनयातच नव्हे तर बिझनेसमन म्हणूनही चांगले नाव कमावले आहे शिवाय ते राज्यसभेचे सदस्य आहेत. 1982 मध्ये त्यांनी अभिनेत्री योगिता बालीशी विवाह केला. त्यांना तीन मुलगे व दिशानी ही एक मुलगी आहे. 👉 ...म्हणून त्रिशलाला बॉलिवूडपासून दूर ठेवायचं : संजय दत्त बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला त्याच्या मुलीला म्हणजेच त्रिशला हिला बॉलिवुडमध्ये बघायचे नाहीये. संजयला वाटते की, त्याने तिचे करिअर फॉरेंसिक सायन्समध्ये करावे. यासोबतच आणखीही काही अशी कारणे आहेत ज्यामुळे संजय दत्त आपल्या मुलीला बॉलिवूडपासून ठेवण्याचा विचार करतो. संजय दत्त हा सध्या आग्रामध्ये उमंग कुमार दिग्दर्शित करत असलेल्या ‘भूमी’ सिनेमाचं शूट करत आहे. हा सिनेमात वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. मिडियासोबत बोलताना संजयने त्रिशलाला बॉलिवूडपासून दूर ठेवण्याच्या कारणाचा खुलासा केला. संजय म्हणाला की, मी तिला चांगल्या कॉलेजमध्ये पाठवण्यासाठी खूप वेळ आणि ऊर्जा घालवली आहे आणि तिनेही खूप चांगला अभ्यास केला. तिने फॉरेंसिक सायन्समध्ये स्पेशलायझेशन केले आहे आणि मला असे वाटते की, ही खूप चांगली गोष्ट आहे’. संजयला वाटतं की, अभिनयात करिअर त्रिशलासाठी सोपं नसणार. कारण तिला हिंदी भाषेवर खूप मेहनत घ्यावी लागेल. संजय म्हणतो की, जर तिला इंडस्ट्रीत यायचंय आहे तर तिला हिंदी भाषा शिकावी लागेल. कारण अमेरिकन इंग्रजी इथे चालणार नाही. अभिनेता-अभिनेत्री होणं इतकं सोपं नाहीये. बघायला हे सोपं वाटतं पण प्रत्यक्षात तसं नाहीये. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - गुरमेहर हिने आपल्या वडिलांच्या हौतात्म्याचा अवमान केला, गुरनाम सिंह यांना पाकिस्तानने सुरू केलेल्या युद्धात हौतात्म्य आले होते, हुतात्मा गुरनाम सिंह यांच्या बहिणीचे वक्तव्य 👉 नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्याविरोधातील आरोप भारत सरकारने फेटाळले 👉 नवी दिल्ली - राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिल्ली सरकारला पाठवली नोटीस, दिल्लीस्थित डेनिमच्या कारखान्यात बाँडवर काम करत असलेली 26 मुलं आढळली 👉 नवी दिल्ली - उपलब्ध कागदपत्रांनुसार टी.टी.व्ही. दिनकरन हे अण्णा द्रमुकचे पदाधिकारी नव्हते, त्यामुळे पक्षाच्या महासचिवपदी व्ही.के. शशिकला यांची झालेली नियुक्ती ग्राह्य मानता येणार नाही - निवडणूक आयोग (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 वॉशिंग्टन - अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या विकासात भारतीय आयटी कंपन्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असल्याचे प्रतिपादन भारतीय उद्योग क्षेत्रातील आघाडीची संघटना नॅसकॉमने म्हटले 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शी भूमिकेला पाठिंबा म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाची बैठक खुली करा अशी मागणी केली 👉 मुंबई - महापालिकेचा महापौर मराठी माणूस असेल, मनसेसमोर सर्व पर्याय खुले, कोणीही आम्हाला गृहित धरू नये - नितीन सरदेसाई 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 पुणे - टिळक स्मारकमध्ये राज्य नाट्य स्पर्धेत 'अग्निदिव्य' नाटक सुरू असताना सागर चौघुले या कलाकाराचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू 👉 सोलापूर - ओव्हरटेकसाठी अडथळा आणल्याचं कारण देत कौटुंबिक न्यायालयाचे न्यायमूर्ती रकमे यांना मारहाण, उपचारासाठी न्यायमूर्ती रूग्णालयात 👉 नागपूर - भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी आयएएस अधिकाऱ्यांच्या साक्षीला झोटिंग समितीचा नकार, एकनाथ खडसेंची मागणी समितीनं फेटाळली 👉 लातूर - रेणापूर तालुक्यातील दिवेगाव येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार, राम डुकरे या आरोपीवर किनगाव पोलिसात गुन्हा दाखल 🎯 खेळ घडामोडी : 👉 बंगळुरु - पुण्याच्या पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी विराट सेना सज्ज, ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 बॉलीवूडचा प्रसिध्‍द अभिनेता ह्रतिक रोशन लवकरच मराठी चित्रपटात दिसणार, फॅशन डिझायनर विक्रम फडणीसच्‍या एका मराठी चित्रपटात करतोय ह्रतिक काम (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 2510 जागांसाठी भरती Let's Up Job Updates पोस्ट : कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (Junior Telecom Officer) - जागा : 5210 - पात्रता : E/BTech. OR Telecom/Electronics/Radio/Computer/Electrical/Information Technology/Instrumentation Engg. or M.Sc (Electronics)/M.Sc(Computer Science) are required to appear GATE exam 2017 वय : दि. 31 जानेवारी 2017 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट) फी : 500 रुपये (SC/ST : 300 रुपये, OBC : 500 रुपये) ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 06 एप्रिल 2017 अधिक माहितीसाठी : https://goo.gl/0IGBP1 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/HzaSfB (अर्ज भरण्यास 6 मार्च पासून सुरुवात) (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांची भरती पोस्ट : वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (डॉट्स प्लस साईट) - जागा : 04 पोस्ट : वैद्यकीय अधिकारी (जिल्हा क्षयरोग केंद्र) - जागा : 17 पोस्ट : वैद्यकीय अधिकारी (वैद्यकीय महाविद्यालय) - जागा : 01 पोस्ट : वैद्यकीय अधिकारी (DRTB OPD) - जागा : 01 पोस्ट : सांखिकी सहाय्यक - जागा : 02 पोस्ट : वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक - जागा : 02 पोस्ट : वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ - जागा : 03 पोस्ट : प्रयोगशाळा तंत्रज्ञ - जागा : 04 पोस्ट : क्षयरोग आरोग्य प्रचारक - जागा : 07 पोस्ट : समुपदेशक - जागा : 04 पोस्ट : लेखापाल - जागा : 08 पोस्ट : जिल्हा PPM समन्वयक - जागा : 20 पोस्ट : संगणक चालक - जागा : 02 अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता : मुबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था,म 1 ला मजला, बावलावाडी वृ.म.पा.इमारत, डॉ बा.आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई - 400012 अर्ज करण्याची मुदत : दि. 06 मार्च 2017 अधिक माहितीसाठी : https://goo.gl/4WBPFK (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 'अ‍ॅटिट्युड'चे रूपांतर अहंकारात नको! Let's Up Think Katta सध्या तरुणाईमध्ये 'अ‍ॅटिट्युड' या शब्दाचे भयानक वेड आहे. प्रत्येकाला आपला अ‍ॅटिट्युड बनवणं आवडते. पण त्याची नेमकी दिशा माहिती नसल्यामुळे बऱ्याचदा त्या अ‍ॅटिट्युडचे अहंकारात रुपांतर होते. एका इंग्रजी म्हणीनुसार आपल्याला जगापेक्षा वेगळी ओळख हवी असेल, तर आधी आपले वागणे व विचार करण्याची पद्धत जगापेक्षा वेगळी असायला हवी. यालाच इंग्रजीत 'अ‍ॅटिट्युड' असे म्हणतात. त्यामुळे आपलं महत्व कमी न होऊ देता अ‍ॅटिट्युड बनवण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. 👉 वागण्यात खरेपणा आणा : जगात मित्र ही एकमेव अशी जागा असते जिथे आपण आपल्याला वाटणाऱ्या गोष्टी उघडपणे सांगत असतो. त्यामुळेच आपल्या वागण्यात खरेपणा असणे खूप महत्त्वाचे असते. नाटकी किंवा खोटे वागणे आपण कितीही खरे करून दाखवण्याचा प्रयत्न केला, तरी जाणवल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे आपल्या वागण्यात खरेपणा असावा. 👉 चेहऱ्यावर आत्मविश्वास : चेहऱ्यावर नेहमी आत्मविश्‍वास व परिपक्व भाव ठेवावा. हे दोन्ही एकत्र असेल, तर पाहणारा माणूस पहिल्याच कटाक्षातच प्रभावित होतो. तुमची चालण्या-बोलण्याच्या पद्धतीत परिपक्वता असायला हवी. कुठलीही कृती करताना किंवा बोलतानाही “हे परिपक्व व्यक्तीचे वागणे आहे का?’ असा प्रश्‍न स्वतःला विचारावा. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 तुमचे अस्तित्त्व जाणवायला हवे : तुमच्या अनुउपस्थितीत तुमच्या मित्र मंडळींना तुमची उणीव जाणवत नसेल तर गरज आहे तुमची वागणूक बदलायची गरज आहे. त्यासाठी आपले वागणे अत्यंत आत्मविश्‍वासू असावे व त्याचा सराव करावा आणि कुठेही नाटकी किंवा खोटे न वाटेल अशा पद्धतीने वागावे. यामुळे तुमचे अस्तित्व जाणवुन देण्यासाठी हा बदल आवश्यक आहे. याबाबत तुम्ही विचार करायला हवा. 👉 चर्चेत भाग घेणे : मित्रांमध्ये होणाऱ्या चर्चेत भाग घ्या. बोलत असलेला विषय समजून घेऊन तुमचे वयक्तिक मत तुम्ही नोंदवू शकता. जवळच्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील एखाद्या समस्येला सल्ला द्या. आपण त्याच्या समस्येचा विचार करून त्याला सल्ला देतो आहोत, ही गोष्ट त्याला नक्की आवडेल. म्हणून व्यक्त व्हा. 👉 सतत हसणे व विनोद करणे टाळावे : तुम्हाला जर सतत वाईट जोक करायची सवय असेल तर ती आजच बदला या सवयीमुळे तुमचे मित्र याला वैतागून जातात. तसेच तुमच्या मित्र परिवारात तुम्हाला कोणी गांभीर्याने घेणार नाही म्हणजे तुम्ही सतत विनोद करणे आणि सतत हसत राहणे यामुळे तुमच्या वागण्यातील व बोलण्यातील गांभीर्य घालवून बसता. विनोद करा पण विनोदाला एक दर्जा असु द्या. त्यामुळेच या गोष्टीचा परिणाम तुमच्या अ‍ॅटिट्युड वर होत असतो. सो या सवयीचा विचार करा. 👉 तुमचे कपडे : आपले कपडे हे आपल्या आवडीनिवडीचे व आपल्या स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचे प्रतिक आहे. आपण कसे कपडे घालतो यावरून आपण स्वतःबद्दल कसा विचार करतो याचा अंदाज आपल्या आसपासचे लोक काढत असतात. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - एअरसेल-मॅक्सिस प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयातली परवानगी 1 एप्रिलपर्यंत स्थगित 👉 नवी दिल्ली - विजय मल्ल्यांनी कर्ज बुडवल्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय 9 मार्चला करणार सुनावणी 👉 छत्तीसगड - बिजापूरमधील मिरतूर परिसरात माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 2 जवान जखमी 👉 आंध्रप्रदेशात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये 40 जण जखमी, 30 शालेय विद्यार्थ्यांचा समावेश 👉 कोलकाता पोलिसांनी बनावट नोटांचे सर्वात मोठे रॅकेट उद्धवस्त केले, नव्या नोटांमध्ये 57 लाख रुपये केले जप्त 👉 छत्तीसगडचे मुख्य सचिव बी. एल. अग्रवाल आणि त्यांच्या नातेवाईकाला पटियाला हाऊस विशेष न्यायालयाने लाचखोरीप्रकरणी सुनावली न्यायालयीन कोठडी 👉 तामिळनाडूला 'नीट' मधून वगळण्याची मुख्यमंत्री इ. पळनीस्वामी यांची केंद्रीय मनुष्यबळ मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मागणी 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 बांगलादेशने परदेशी नागरिकांची हत्या करण्यासाठी भडकवणा-या इस्लामिक दहशतवाद्याला केली अटक 👉 नोक-यांचे आऊटसोर्सिंग करण्याविरोधातील विधेयक अमेरिकन काँग्रेसमध्ये झाले सादर (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - गीता गवळींना भाजपाकडून स्थायी समिती सदस्यपद देण्याचं आश्वासन, संपुर्ण मागण्या मान्य केल्यानेच भाजपाला पाठिंबा : गीता गवळी 👉 मुंबई - सेल्फी पॉईंटवरुन शिवसेना, मनसे आक्रमक, शिवसेना-मनसेचे वॉर्ड ऑफिसात ठिय्या आंदोलन, सेल्फी पॉईंटसाठी परवानगी देण्याची मागणी 👉 मुंबई - महापौरपदासाठी काँग्रेस उमेदवार देणार, विठ्ठल लोकरे काँग्रेसचे वॉर्ड 141 मधील नगरसेवक 👉 कोल्हापूर - मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप एकत्र येतील याची मला 200 टक्के खात्री आहे : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - बारावीचा मराठीचा व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याचे प्रकरण, मराठीचा पेपर पुन्हा होणार नाही, बोर्डाचा निर्णय, पेपर न फुटल्याचा बोर्डाचा दावा 👉 नाशिक - येथील आर्टीलरी सेंटरमध्ये गळफास घेऊन जवानाची (रॉय मॅथ्यू) आत्महत्या, अधिकाऱ्यांकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप काही जवानांनी केला होता, या जवानांमध्ये मॅथ्यूचाही होता समावेश 🎯 व्यापार घडामोडी : 👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28832.45, निफ्टी : 8897.55, सोने भाव : 29,050 (प्रतितोळा), चांदी : 43,338 (प्रतिकिलो) 🎯 तंत्रज्ञान घडामोडी : 👉 व्होडाफोनचा जबरदस्त प्लॅन लॉन्च, प्रत्येक महिन्याला 346 रुपयांच्या रिचार्जमध्ये दररोज 1 GB या प्रमाणे महिन्याला 28 जीबी 3G/4G डेटा मिळणार, मात्र, हा प्लॅन व्होडाफोनच्या प्रीपेड ग्राहकांसाठी आहे 🎯 खेळ घडामोडी : 👉 मुंबई - हेतू कमतरतेमुळे आम्ही पहिला कसोटी सामना हारलो हे मान्य करावं लागेल, आमचा परत पराभव होईल असं समजायची गरज नाही : विराट कोहली 👉 तिरुवनंतपुरम - स्पॉट फिक्सिंग प्रकरणी घालण्यात आलेली आजीवन बंदी हटवण्यासाठी एस. श्रीसंतने याचिका दाखल केल्यानंतर केरळच्या उच्च न्यायालयाने बीसीसीआयला बजावली नोटीस, 5 मार्चला होणार पुढील सुनावणी 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - प्रियांका चोप्राशी आपले चांगले संबंध असून तिच्याशी कसलेही शत्रुत्व नाही : दीपिका पदुकोण (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 रिलायन्स जिओ ; विविध प्लॅन Let's Up Techno Katta रिलायन्स जिओची ‘हॅपी न्यू इयर’ ऑफर 31 मार्च रोजी संपुष्ठात येत असून त्यानंतरच्या काळात जिओच्या ग्राहकांना नवे दरपत्रक लागू होणार आहे. त्यासाठीचे प्लॅन कंपनीने जाहीर केले असून 19 रुपयांपासून 9 हजार 999 रुपयांपर्यंत हे प्लॅन्स असणार आहेत.‘हॅपी न्यू इयर’ ऑफर अंतर्गत मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळविण्यासाठी ग्राहकांना 99 रुपये भरून प्राईम मेंबरशिप घ्यावी लागणार आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) जिओचे नवे दर खालीलप्रमाणे - 👉 19 रुपये प्लॅन : मोफत कॉलिंग, एसएमएस आणि जिओ ऍप्स सुविधा - प्राईम मेंबर्ससाठी 200 एमबी; तर नॉन प्राईम मेंबर्ससाठी 100 एमबी 4 जी डेटा - व्हॅलिडिटी 1 दिवस 👉 49 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी 600 एमबी; तर नॉन प्राईम मेंबर्ससाठी 300 एमबी 4 जी डेटा - व्हॅलिडिटी 3 दिवस 👉 96 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा - 7 जीबी 4 जी डेटा, प्रतिदिन 1 जीबी डेटा, नॉन प्राईम मेंबर्ससाठी याच सर्व सुविधा केवळ प्रतिदिन 0.6 जीबीची मर्यादा - व्हॅलिडिटी 7 दिवस 👉 149 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी 2 जीबी 4 जी डेटा 100 एसएमएस - नॉन प्राईम मेंबर्ससाठी 1 जीबी डेटा - व्हॅलिडिटी 28 दिवस 303 रुपये प्लॅन*_ : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा - 28 जीबी 4 जी - प्रतिदिन 1 जीबी - नॉन प्राईम मेंबर्ससाठी 2.5 जीबी डेटा - प्रतिदिन मर्यादा नाही - व्हॅलिडिटी 28 दिवस 👉 499 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा - 56 जीबी 4 जी - प्रतिदिन 2 जीबी - नॉन प्राईम मेंबर्ससाठी 5 जीबी डेटा - व्हॅलिडिटी 28 दिवस 👉 99 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा - 60 जीबी 4 जी - व्हॅलिडिटी 60 दिवस नॉन प्राईम मेंबर्ससाठी 12.5 जीबी डेटा - व्हॅलिडिटी 30 दिवस 👉 1999 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा - 125 जीबी 4 जी - व्हॅलिडिटी 90 दिवस - नॉन प्राईम मेंबर्ससाठी 30 जीबी डेटा - व्हॅलिडिटी 30 दिवस 👉 4999 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा - 350 जीबी 4 जी - व्हॅलिडिटी 180 दिवस - नॉन प्राईम मेंबर्ससाठी 100 जीबी डेटा - व्हॅलिडिटी 30 दिवस 👉 9999 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा - 750 जीबी 4 जी - व्हॅलिडिटी 360 दिवस - नॉन प्राईम मेंबर्ससाठी 220 जीबी डेटा - व्हॅलिडिटी 30 दिवस पोस्ट पेड प्लॅन्स खालीलप्रमाणे : 👉 303 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा - 28 जीबी 4 जी - प्रतिदिन 1 जीबी मर्यादा - नॉन प्राईम मेंबर्ससाठी 2.5 जीबी डेटा 👉 499 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा - 56 जीबी 4 जी - प्रतिदिन 2 जीबी मर्यादा - नॉन प्राईम मेंबर्ससाठी 5 जीबी डेटा 👉 999 रुपये प्लॅन : प्राईम मेंबर्ससाठी अमर्यादित डेटा - 60 जीबी 4 जी - नॉन प्राईम मेंबर्ससाठी 12.5 जीबी डेटा (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 ऑनलाईन रेल्वे आरक्षण ; 'आधार' अनिवार्य Let's Up Current Affair तिकिटांचे मोठ्या प्रमाणात बुकिंग आणि दलाली टाळण्यासाठी रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी लवकरच आधार क्रमांक बंधनकारक होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. 1 एप्रिलपासून विना आधार कार्ड ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात सुट मिळणार नाही. मात्र, 31 मार्चपर्यंत त्यांना तिकीट दरात सवलत देण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच 2017-18चा नवीन आराखडा सादर केला. त्यानुसार रेल्वेकडून देशभरात 6 हजार पॉइंट ऑफ सेल मशिन आणि एक हजार अ‍ॅटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन बसिवण्यात येणार आहे. आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून तिकीट काढण्यासाठी नोंदणी करताना एकदाच आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. तसेच कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहान देण्यासाठी टिकटिंग हे अ‍ॅप लॉन्च करणार आहे. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 👉 ई-फार्मसीला मिळणार कायदेशीर मंजुरी केंद्र सरकारने ई-फार्मसीचे नियमन करण्याची योजना तयार केली असून आगामी 6 महिन्यात ई-फार्मसीचे नियम तयार केले जातील आणि याला कायदेशीर मंजुरी देखील मिळणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनुसार ई-फार्मसीच्या नियमनासाठी एक केंद्रीय संस्था तयार केली जाणार असून याद्वारे कोणताही गैरवापर रोखला जाणार आहे. ई-फार्मसीच्या वर्तमान रचनेत बदल केले जाणार असून काही औषधांचा गैरवापर रोखण्यासाठी त्यांच्या विक्रीवर बंदी घातली जाऊ शकते. अनेक ई-कॉमर्स कंपन्या सध्या जाहिरातींद्वारे औषधांची विक्री करत आहेत. परंतु याला कायदेशीर परवानगी नाही. ई-फार्मसीद्वारे औषधांच्या गैरवापराची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. ज्यानंतर सरकारने याचे नियमन करण्याची योजना बनविली होती. सरकारद्वारे बनविण्यात आलेल्या दिशानिर्देशांच्या कक्षेत ऑनलाईन औषध विक्री करणा-या सर्व कंपन्या येतील. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

👉 आता करा ऑनलाईन इंटर्नशिप... Let's Up Edu Katta पूर्वी इंटर्नशिप करायची म्हणजे विद्यार्थ्यांने पुरेपूर धावपळ करावी लागायची. पण आता इंटर्नशिप हे प्रकरण आधीपेक्षा सोपे झाले आहे. एरव्ही आपण गूगलवर सारखे काही ना सर्च करत असतोच. हल्ली गूगलवर ऑनलाईन इंटर्नशिप वेबसाईटस् असे सर्च केले की, शेकड्याने आपल्याला उत्तरे मिळतात. या वेबसाईटस् वर जायचे, एक अकाऊंट उघडायचे, आपले एरिया ऑफ इंटरेस्ट निवडायचे आणि आपल्याला कोणत्या शहरात इंटर्नशिप करायची आहे, ही सर्व माहिती त्या अकाऊंटवर अपलोड केली की, आपले काम सुरू होते. इतक्‍या साध्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. यामुळे आपल्याला माहित नसलेल्या अनेक कंपनीजची माहिती आपल्याला मिळू शकते. (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) काही इंटर्नशिप या केवळ अनुभवासाठीच असतात तर काही आपल्याला थोडेफार पैसे कमवायला देखील मदत करतात. काही इंटर्नशिप तर आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पैसे देखील मिळवून मदत देतात. या इंटर्नशिपचे स्वरूप हे कामाच्या क्षेत्रावर, अवलंबून असते. आपल्याला केवळ उन्हाळ्याच्या सुट्टीत किंवा आपल्या परीक्षा नसताना, मोकळा वेल असताना इंटर्नशिप करावयाची असेल, तरीदेखील त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या वेबसाईटस् द्वारे नेहमी प्रकाशात असणाऱ्या क्षेत्रात तर इंटर्नशिप करता येतेच पण त्याचबरोबर आपल्याला रस असतो, पण त्या क्षेत्रात फार काही करण्याची संधी मिळत नाही; अशा क्षेत्रात इंटर्नशिप करता येईल अशी देखील अनेक ठिकाणे आपल्याला सापडू शकतात. ऑनलाईन इंटर्नशिप करता येईल, त्याबददल माहिती मिळेल, अशा काही वेबसाईटस् खाली देत आहोत… 👉 Linkedin : यामध्ये तुम्ही इंटर्नशिप तर शोधू शकताच, पण त्याचबरोबर तुमचे प्रोफेशनल संबंध देखील वाढवू शकता. 👉 Internship.com : आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना या वेबसाईटद्‌वारे इंटर्नशिपच्या संधी मिळाल्या आहेत. 👉 Internshala.com : आपल्या आवडीचे काम करता करता पैसे कमण्याचे अनेक पर्याय बाकी वेबसाईट प्रमाणेच ही वेबसाईट देखील उपलब्ध करून देते. 👉 Letsintern.com : अनेक शहरात आणि अनेक क्षेत्रात इंटर्नशिप करण्याची आपली इच्छा या वेबसाईटमुळे पूर्ण होते. 👉 Internup.com : मोठमोठ्या कंपनीजची द्वारे ही वेबसाईट तुम्हाला उघडी करून देईल. या आणि यांसारख्या अनेक वेबसाईट आजकाल मोठ्या संधींची दारे आपल्यासाठी खुली करेल. साध्यासोप्या पद्धतीने, मोकळ्या वेळात, घरबसल्या या वेबसाईटसवर जाऊन, काही सोप्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून तुम्हीही या वेबसाईटस द्वारे इंटर्नशिप करू शकता… (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)

Let's Up News Updates 🎯 राष्ट्रीय घडामोडी : 👉 नवी दिल्ली - अशांतता माजवण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी वाद-विवाद आणि चर्चा करावी, विद्यापीठाच्या आवारातील भांडणतंटे पाहून दु:ख होते - राष्ट्रपती प्रणब मुखर्जी 👉 नवी दिल्ली - दिल्ली विमानतळावर एका मलेशियन प्रवाशाकडून 2.4 किलो सोने जप्त, जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 67 लाख रुपये 👉 नवी दिल्ली - तिकिट बुकिंगमध्ये होणारी फसवणूक रोखता यावी यासाठी आधार कार्डवर आधारित ऑनलाईन बुकिंग प्रणाली येणार 👉 कोलकाता - कोलकात्यातील मार्केट एरिया परिसरातून 56 लाख 74 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त, पाच जणांना अटक 👉 तिरुवनंतपुरम - केरळमधील कलच्चीमध्ये आरएसएसच्या कार्यालयावर बॉम्ब फेकला, आरएसएसचे दोन स्वयंसेवक जखमी (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर) 🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी : 👉 सीरियामध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली केलेल्या ड्रोन हल्ल्यात अल कायदाचा म्होरक्या अबू खायर एल मसरी याचा मृत्यू 🎯 राजकीय घडामोडी : 👉 मुंबई - महापौरपदासाठी कॉंग्रेस उमेदवार देणार, मुंबई कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांची माहिती 👉 बीड - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावे अंबाजोगाई न्यायालयाचे अटक वॉरंट, सतत गैरहजर राहिल्यामुळे बजावलं अटक वॉरंट 👉 मुंबई - पालिकेने भाजपला दिलेल्या सेल्फी पॉईंटच्या परवानगीला मनसेनेचा आक्षेप, मनसेचे सेल्फी पॉईंट अद्याप जागेवर असताना नव्याने परवानगी कशी दिली जाते? संदीप देशपांडेंचा सवाल 🎯 प्रादेशिक घडामोडी : 👉 मुंबई - भिवंडी सभागृह नेते मनोज म्हात्रे हत्येप्रकरणी आणखी चौघांना अटक, क्राईम ब्रँच आणि नारपोली पोलिसांची संयुक्त कारवाई 👉 औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पोलीस आयुक्तलयाच्या नवीन इमारत आणि 532 पोलीस क्वार्टर बांधकामाचे भूमीपूजन 👉 नाशिक - निफाड तालुक्यातील चेहडी खुर्द येथे बिबटयाच्या हल्ल्यात दोन वासरे ठार, परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण 👉 परळी - दि.वैद्यनाथ अर्बन को.ऑप.बँकेच्या अपहार प्रकरणी संचालक मंडळासह 26 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश 🎯 खेळ घडामोडी : 👉 बंगळुरू - गेल्या दोन वर्षांपासून भारतीय फलंदाजीच्या मधल्या फळीतील कणा असलेल्या अजिंक्य रहाणेला अंतिम संघातून वगळण्याचा प्रश्‍नच येत नाही - अनिल कुंबळे 🎯 मनोरंजन घडामोडी : 👉 मुंबई - पॉप स्टार जस्टीन बीबर मे मध्ये भारतात आपला कार्यक्रम सादर करणार असून त्याच्यासमवेत सनी लियॉनीही थिरकणार असल्याची माहिती (जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)