ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

前往频道在 Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

显示更多
6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
*तृप्ती देसाई पुन्हा एकदा शनीच्या चौथऱ्यावर* *अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा* https://letsup.app.link/PgL4Y1zWQnb

*टॉप 10 हेडलाईन्स ! संध्याकाळच्या सर्वात महत्वाच्या बातम्या* * LetsUpp | Bulletin * ● एसटी संपावर पुढील सुनावणी शुक्रवारी; कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचं राज्य सरकारचं आवाहन ● FRP दोन टप्यात देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात क्रांती संघटना व भाजप किसान मोर्चाचे संयुक्तरित्या आंदोलन; सदाभाऊ खोत यांची घोषणा ● परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; येत्या ९ मार्चपर्यंत तपासाला स्थगिती ● महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन क्षेत्र प्राधिकरणाची राणेंच्या 'नीलरत्न' बंगल्याच्या बांधकामाविषयीचा अहवाल सादर करण्याची मालवण पालिकेला सूचना ● २५ फेब्रुवारीला ओबीसी आरक्षणाचा फैसला होणार; राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर! ● नाशिककरांचे हाल, गोदावरी एक्स्प्रेस सुरू करा; संतप्त प्रवाशांची मागणी... ● शरद पवार उद्या चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी हजर होणार नाहीत ● राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार ● हिमाचल : कारखान्यातील स्फोटात सहा महिलांचा होरपळून मृत्यू; आईसोबत गेलेल्या तीन वर्षाच्या मुलीचाही दुर्दैवी अंत ● कर्नाटकात न्यायमूर्तींनी व्यासपीठावरून हटवला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो; मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आदेश *दिवसभरातील सर्व ताज्या हेडलाईन्स वाचा एका क्लिकवर...* https://letsup.app.link/bZKCaRt0Qnb

*हिंगणघाट जळीत हत्याकांडातील आरोपीला जन्मठेपच!* *LetsUpp | Trending* ● महाराष्ट्रात खळबळ माजवणाऱ्या वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी प्रा. अंकिता पिसुड्डे हिला जिवंत जाळणारा विक्की उर्फ विकेश नगराळे याला हिंगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने काल (बुधवारी) हत्या प्रकरणात दोषी ठरवले होते. ● विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपी विक्की नगराळेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. आपल्याशी लग्न न केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या विक्कीने अंकिताला एकतर्फी प्रेमातून जिवंत पेटवून दिले होते. ● या घटनेला दोन वर्षे झाली असून अंकिताच्या मृत्यूला आजच दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे तिच्या दुसऱ्या स्मृतिदिनी लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. हिॅगणघाट जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 🗣️ *उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया काय?* ● अंकिताला जाऊन बरोबर दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे तिला खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे. आज न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मरेपर्यंत जन्मठेप होते. ● आज न्यायालयाने हे देखील सांगितलं आहे की आरोपी विकेशला 3 फेब्रुवारीला अटक झाली होती. तरी हा दोन वर्षाचा काळ त्या शिक्षेत गृहित धरला जाणार नाही. त्याला आजपासून आजीवन कारावासाची शिक्षा भोगायची आहे. ● त्याचप्रमाणे 5 हजार रुपये दंडही त्याला द्यायचा आहे. निकालाची पूर्ण प्रत आम्हाला अजून मिळाली नाही. बचावपक्षाला हायकोर्टात जायचं असेल तर निकालाची प्रत वाचून आम्ही पुढील पाऊल उचलू. आम्ही फाशीची मागणी केली होती. ● मात्र हा अपवादात्मक गुन्हा नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निश्चितपणे अंकिताला न्याया मिळाला असं म्हणावं लागेल, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. *अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा* https://letsup.app.link/FYEtV185wnb

LetsUpp Marathi - Telegram 频道 @letsup 的统计与分析