ch
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

前往频道在 Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

显示更多
6 624
订阅者
无数据24 小时
无数据7
无数据30
帖子存档
photo content

महावितरणच्या कर्मचाऱ्याने पाण्यातून पोहत येत डिपी केली सुरक्षित LetsUpp | Ratnagiri ● संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्याची पातळी वाढल्यानंतर मात्र वीज प्रवाह सुरक्षेसाठी बंद करावा लागला. दिवसभर महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील होते. ● गुरुवारी सायंकाळी वाशी फिडरचा वीज प्रवाह सुरु करायचा होता. मात्र लोवले येथील महावितरणची डिपी पूर्णतः पाण्याखाली असल्याने वाशी फिडर सुरु करणे शक्य नव्हते. संगमेश्वर येथील सब स्टेशन मधून लाईनमन अक्षय घाटकर यांच्याजवळ संपर्क साधण्यात आला. ● त्यांनी लोवले येथील डिपी मध्ये असणारे फ्यूज काढण्यासाठी बुरंबी येथून चार ठिकाणी भरलेल्या सहा फूट पाण्यातून पोहत येत लोवले येथील महावितरणची डिपी सुरक्षित केली. घाटकर यांना विक्रांत भोसले आणि अंकेश गेल्ये यांचे सहकार्य लाभले. ● लोवले येथील फ्यूज काढल्यानंतर वाशी फिडरचा वीज प्रवाह सायंकाळी ५ : ३० वा . सुरु करण्यात आला. यामुळे पूरस्थिती पूर्णत : संपुष्टात आलेली नसतांनाही वाशी फिडरवर असणाऱ्या अनेक गावांचा वीज प्रवाह सुरळीत होवू शकला. ● एवढेच नव्हे तर सायंकाळी ६ वा . नंतर अक्षय घाटकर , विक्रांत भोसले आणि अंकेश गेल्ये पुराच्या पाण्यातून वाट काढत संगमेश्वर येथे मदतीसाठी रवाना झाले. ● अक्षरश : आपला जीव धोक्यात घालून लाईनमन अक्षय घाटकर आणि त्याला सहकार्य करणारे सहकारी विक्रांत भोसले, अंकेश गेल्ये यांना, त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत. To know more click here https://letsup.app.link/Uo88TFVG7hb

मुंबईत गोवंडीमध्ये घर कोसळून तिघांचा मृत्यू LetsUpp | Trending ● मुंबईत पुन्हा एकदा घर कोसळण्याची दुर्घटना घडली असून गोवंडी परिसरात घर कोसळून तीन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले आहेत.अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. ● गोवंडीतील शिवाजीनगर भागात ही घटना घडली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. ● रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका, जेसीबी, डम्पर अशा सर्व गोष्टींसह बचावपथक दाखल झालं होतं. ● मृत्यमुखी पडलेल्यांपैकी नेहा परवेझ शेख (वय 35 वर्षे) आणि मोकर झबिर शेख (वय 80 वर्षे) अशी दोघांची नावं आहेत. ● जखमींना राजावाडी आणि सायन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. To know more click here https://letsup.app.link/vtmc36rn7hb

टोकियो ऑलिम्पिकचे बिगुल आज वाजणार LetsUpp | Trending ● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नव्या नियमांसह आजपासून ऑलिम्पिक क्रीडा महोत्सवास सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकात 22 खेळाडू आणि 6 अधिकारी सहभागी होणार आहेत. ● भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना महामारीमुळे उद्घाटन सोहळ्यातील उपस्थितीला कात्री लावण्यात आली आहे. आठ खेळांतील खेळाडूंची हजेरी ● ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकात एक हॉकीपटू, 8 बॉक्सर, 4 टेबल टेनिसपटू, 2 रोविंगपटू, 1 जिमनास्ट, एक जलतरणपटू, 4 नौकायनपटू आणि तलवारबाजीतील एकमेव खेळाडू यांचा समावेश असणार आहे. ● 6 अधिकारी या खेळाडूंसोबत ध्वजसंचलनात सहभागी होणार आहेत. म्हणजेच एकूण 28 जणांचे भारतीय पथक असणार आहे. ● तिरंदाजी, ज्युडो, बॅडमिंटन, भालाफेक, टेनिस, हॉकी व नेमबाजी या खेळांतील खेळाडू उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार नाहीत. कारण या खेळातील स्पर्धा 23 व 24 जुलैला होणार असल्याने खेळाडूंना तयारी किंवा विश्रांतीची गरज आहे. ● ऑलिम्पिक उद्घाटन सोहळा जपानमध्ये स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता, तर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4ः30 वाजता सुरू होईल. To know more click here https://letsup.app.link/ZTBo8fxi7hb

'या' घडीच्या 10 महत्वाच्या बातम्या LetsUpp | Bulletin ▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन; कोकणातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा ▪️ रेंगडी गावातील पाच शेतकरी गेले वाहून; मेढा महाबळेश्वर रोडवरील रेंगडी येथील घटना; शेतातील काम करुन घरी परतताना ही घटना घडली ▪️ महाडमध्ये दरड कोसळून 30 घरे गाडली गेल्याची भीती; महाड तालुक्यातील बीरवाडी पासून14 किमी अतंरावर घडली घटना; 72 नागरिक बेपत्ता असण्याची भिती --------------------- लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५ ---------------------- ▪️ तळकोकणात 25 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट, अत्यंत आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी ▪️ रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 40 वर्षातला उच्चांकी पाऊस, जुलै महिन्यात सरासरीच्या183% पाऊस; चिपळूणची परिस्थिती बिकट ▪️ अकोला जिल्ह्यात एका दिवसात विक्रमी 202.9 मिलीमीटर पाऊस, ढगफुटीसदृष्य पावसाने संपूर्ण जिल्ह्यात पूर परिस्थिती ▪️ कृष्णा नदीची पाणीपातळी 25 फुटांवर, सांगली-कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; चांदोली धरण परिसरात मुसळधार पाऊस ▪️ कट्टरतावाद्यांचा विरोध झुगारत नाशिकमध्ये बहुचर्चित आंतरधर्मीय विवाह संपन्न, अंनिसचे पदाधिकारी मामाच्या भूमिकेत ▪️ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मूभा द्या, मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; लवकरच सुनावणी पार पडण्याची शक्यता ▪️ राज्यात गुरुवारी 7302 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 7756 रुग्ण कोरोनामुक्त, तीन जिल्ह्यात एकही रुग्ण नाही ▪️ टोकियो ऑलिम्पिकचं आज उद्घाटन, 204 देशांच्या 11,238 खेळाडूंचा सहभाग; भारताचे 18 क्रीडा प्रकारांमध्ये 127 सदस्यांची टीम To know more click here https://letsup.app.link/m1BflyO76hb