LetsUpp Marathi
前往频道在 Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
显示更多6 624
订阅者
无数据24 小时
无数据7 天
无数据30 天
帖子存档
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● महाराष्ट्रात दीड कोटी नागरिकांना मिळाले कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस; संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक
● आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, लोकांची मोठी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना केंद्राने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिल्या आहेत
● सिद्धिविनायक मंदिर मंगळवारी पहाटे सव्वाचार वाजेपासून दर्शनासाठी गणेशभक्तांसाठी खुलं राहणार, न्यास समितीचा निर्णय
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क: 7798655655
----------------------
● केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी नाशिकात गुन्हा दाखल; गर्दी जमवल्याचा ठपका
● यापुढच्या निवडणूकीत बांद्यापासून पनवेलपर्यंत सर्व मतदार संघातील आमदार व खासदार भाजपचे असतील - केंद्रीय मंत्री नारायण राणे
● कृषी विधेयकावरुन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, हरियाणातील प्रकार, विरोधक संतापले
● पुढील 24 ते 36 तासात काबूल विमानतळावर होऊ शकतो आणखी एक हल्ला; अमेरिकेचा इशारा
● नौकऱ्याच नसतील तर आरक्षणाचा काय उपयोग? राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला सवाल
● राजकीय लोकांनी निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यामध्ये सर्वाधिक खटले असणारे नेते भाजपचे आहेत; राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांची टीका
● अकरावी प्रवेश आता मोबाईल अॅपवर, अॅण्ड्रॉईड फोनवर पीओईएएम अॅप्लिकेशन उपलब्ध
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/nFw597yw6ib
6 624
NEET परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी!
LetsUpp l Trending
👨⚕️NEET 2021 परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी हजारो विद्यार्थी करत होते. मात्र, राष्ट्रीय चाचणी एजन्सीने शुक्रवारी स्पष्ट केलं की NEET पुढे ढकलली जाणार नाही. परीक्षा 12 सप्टेंबरला (रविवारी) ठरल्याप्रमाणे आयोजित केली जाईल.
✍️ एनटीएचे डीजी विनीत जोशी म्हणाले, की "सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांशी नीटचा संबंध येत नाही. त्यामुळे परीक्षा 12 सप्टेंबर रोजी ठरल्यानुसार आयोजित केली जाईल."
💁♀️ NEET मध्ये प्रयत्न वाढवण्याबाबत NTA अधिकारी म्हणाले, की “NEET मध्ये अनेक प्रयत्नांबाबत निर्णय आरोग्य मंत्रालय घेईल. वैद्यकीय प्रवेशाचे प्रयत्न वाढवण्याची कोणतीही योजना नाही ”
📍 सीबीएसई बोर्ड, कंपार्टमेंट परीक्षा, इतर प्रवेश परीक्षांमध्ये संघर्ष असल्याने NEET पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांचा एक वर्ग करत आहे.
💁♂️ सीबीएसई 12 वीच्या विद्यार्थ्यांची 6 सप्टेंबर रोजी जीवशास्त्र परीक्षा, 9 सप्टेंबर रोजी भौतिकशास्त्र विषयाचे पेपर आहे. NEET परीक्षेच्या एकाच आठवड्यात दोन प्रमुख विज्ञान पेपर असणार आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/3nndm5fU4ib
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● NEET परीक्षा ठरल्या तारखेलाच होणार! NEET 2021 परीक्षा रविवारी (12 सप्टेंबर) ठरल्याप्रमाणे होणार आहे.
● शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, दहावीची परीक्षा 22 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर; बारावीची परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर पर्यंत होणार
---------------------
लेट्सअप वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : ७७९८६५५६५५
----------------------
● शालेय शुल्क कपातीच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान, राज्य सरकारनं उत्तर देण्यासाठी मागितला 2 आठवड्यांचा अवधी
● भारतातून टोमॅटो निर्यात खुलीच, राज्यानं केंद्राला प्रस्ताव पाठवावा: केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार
● आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यात येताना आरटीपीसीआर चाचणी बांधनकारक, राज्य सरकारचा निर्णय
● राज्यात शुक्रवारी 4,654 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 170 कोरोना रुग्णांचा मृत्यू
● एअरपोर्टसाठी आवश्यक असलेली जागा द्या, नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
● लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेले चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचं वृद्धापकाळाने निधन, सुरगीश्वर मठाचे ते मठाधीपती होते.
● दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावानं उभारलं जाणार महाविद्यालय; माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या नावाने महाविदयालय-सेंटर्स असणार
● टीम इंडियाने तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 215 धावांपर्यंत मजल मारली; रोहितचं अर्धशतक, पुजारा शतकाच्या उंबरठ्यावर
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/dW9SPFXS4ib
6 624
आशा स्वयंसेविकांना मोठी भेट; अखेर मानधनात झाली एवढी' वाढ
LetsUpp l Trending
💁♀️ आशा सेविकांच्या मानधनात 1500 रुपयांची वाढ करण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत अंतिम निर्णय झाल्याचं सांगितलं.
💫 तसेच आशासेविकांना आंदोलनानंतर जसं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे जुलै 2021 पासून ही वाढ लागू करण्यात येईल, असंही आश्वासन दिलं.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/xWR16c6o3ib
6 624
टॉप 10 हेडलाईन्स ; सकाळच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp | Bulletin
▪️ चिंता वाढली! राज्यात मागील 24 तासांत 5,108 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर 159 जणांचा मृत्यू
▪️ राज्यातील आशा स्वयंसेविकांना 1 हजार तर गटप्रवर्तकांना 1 हजार 200 रुपये वाढ; मानधनाबाबत राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
▪️ मराठा आरक्षण प्रश्नी खासदार संभाजीराजे छत्रपती 2 सप्टेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार; सर्वपक्षीय खासदारांच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीने उपस्थित राहण्याचं केलं आवाहन
▪️ दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी; काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली नियुक्ती
▪️ विमानतळ बॉम्बस्फोटांमुळे काबुल स्तब्ध, 4 अमेरिकन सैनिक ठार, 60 हून अधिक जखमी, तालिबानकडून घटनेचा निषेध
▪️ देशासाठी नवीन ड्रोन धोरण जाहीर, नवे ड्रोन धोरण म्हणजे देशासाठी मैलाचा दगड ठरेल, पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली भावना
▪️ पंढरपूर तालुक्यातील 21 गावांत 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन; प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी काढले आदेश
▪️ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविषयी सामनामध्ये प्रकाशित झालेल्या अग्रलेखावरून भाजपा आक्रमक; नाशिकमध्ये रश्मी ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल
▪️ इंडिगो सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 8 नवीन देशांतर्गत उड्डाणे सुरू करणार; एअरलाईन कंपनी इंडिगोची माहिती
▪️ आगामी कल्याण महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार; काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/dAxQMIYb3ib
