ch
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

前往频道在 Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

显示更多

📈 Telegram 频道 MPSC SIMPLIFIED(official) 的分析概览

频道 MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 33 708 名订阅者,在 教育 类别中位列第 5 597,并在 印度 地区排名第 11 970

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 33 708 名订阅者。

根据 06 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -81,过去 24 小时变化为 -3,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 9.92%。内容发布后 24 小时内通常能获得 3.17% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 3 344 次浏览,首日通常累积 1 068 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

凭借高频更新(最新数据采集于 07 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

33 708
订阅者
-324 小时
-477
-8130
帖子存档
🟪अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक-2021 22 जुलै 2021 रोजी लोकसभेत.‘अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक-2021’ चर्चेसाठी मांडण्यात आले. ▪️ठळक बाबी देशभरातील सर्व सरकारच्या मालकीच्या आयुध निर्मिती कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यापासून रोखण्यासाठी या विधेयकाची रचना केली गेली आहे. विधेयकात असे म्हटले गेले आहे की, निर्बाध पुरवठा, संरक्षणाबाबत सज्जता ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि म्हणूनच कर्मचार्‍यांचा संप किंवा कोणत्याही अडथळाविना कारखान्यांची कार्ये सतत चालू ठेवावे. जून 2021 महिन्यात, केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुध निर्मिती कारखाने मंडळाला औद्योगिक कंपनीचे स्वरूप देण्याच्या योजनेला मान्यता दिली. योजनेनुसार, देशातील 41 आयुध निर्मिती कारखान्यांचे विलीनीकरण करून 7 नवीन संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (DPSU) तयार केले जातील. त्यांचे 100 टक्के स्वामित्व भारत सरकारकडे असेल.

🟪मेरी कोम आणि मनप्रीतनं केलं भारतीय पथकाचं नेतृत्व. जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. करोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी तहकूब करण्यात आल्या. पण एका वर्षानंतर या स्पर्धा खेळल्या जात आहेत. आज या स्पर्धेचा उद्धाटन सोहळा अतिशय दिमाखात रंगला. टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या मार्चपास्टमध्ये भारतीय तुकडी २१ व्या क्रमांकावर उतरली. यात २२ खेळाडू आणि ६ अधिकारी सहभागी झाले. या मार्चपास्टमध्ये ग्रीकचा पहिला क्रमांक होता. सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. भारतीय पथकाच्या प्रवेशावेळी पंतप्रधान मोदींनी टाळ्या वाजवून संघाला प्रोत्साहन दिले. १२७ खेळाडूंसह २२८ सदस्यीय पथक टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यात आले आहे.

🟪UNESCAP संस्थेच्या डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुविधेबाबतच्या जागतिक सर्वेक्षणात भारताची उत्तम कामगिरी संयुक्त राष्ट्रसंघ आशिया प्रशांत आर्थिक आणि सामाजिक आयोग (UNESCAP) यांच्यावतीने करण्यात आलेल्या डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुविधेबाबतच्या जागतिक सर्वेक्षणात भारताने 90.32 टक्के गुण मिळवले आहे. याबाबतीत, 2019 साली भारताने 78.49 टक्के गुण मिळवले होते. सर्वेक्षणात एकूण 143 अर्थव्यवस्थांचे मुल्यांकन करण्यात आले. यात पाच निकषांचा समावेश आहे; ते पाच निकष पुढीलप्रमाणे आहेत - पारदर्शकता, औपचारिकता, संस्थात्मक व्यवस्था व सहकार्य, कागदविरहित व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय कागद विरहित व्यवहार. भारताने पाच निकषांमध्ये प्राप्त केलेले गुण पारदर्शकता : 2021 साली 100 टक्के (2019 साली 93.33 टक्के) औपचारिकता : 2021 साली 95.83 टक्के (2019 साली 87.5 टक्के) संस्थात्मक व्यवस्था आणि सहकार्य : 2021 साली 88.89 टक्के (2019 साली 66.67 टक्के) कागदविरहित व्यवहार : 2021 साली 96.3 टक्के (2019 साली 81.48 टक्के) आंतरराष्ट्रीय कागद विरहित व्यवहार : 2021 साली 66.67 टक्के ( 2019 साली 55.56 टक्के)

🟪कारगिल विजय दिवस, 10 गोष्टींनी जाणून घेऊ या कारगिलमधील भारताची पाकिस्तानवर विजयाबद्दलची कहाणी __________ वर्ष 1999 रोजी भारताच्या शूर वीरांनी कारगिलच्या शिखरावरून पाकिस्तानी सैन्याचा पाठलाग करत तिरंगा झेंडा फडकावला होता. या 10 गोष्टींमधून जाणून घ्या कारगिल युद्धाची वीर कथा... __________ भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 मध्ये कारगिलचे युद्ध झाले होते. 8 मे 1999 रोजी जेव्हा पाकिस्तानचे सैनिक आणि काश्मिरी अतिरेकी कारगिलच्या शिखरांवर दिसलेले असताना या युद्धाची सुरुवात झाली होती. __________ कारगिलमध्ये घुसखोरीची माहिती सर्वप्रथम ताशी नामग्याल नावाच्या एका स्थानिक मेंढपाळाने दिली, जे कारगिलातील बाल्टिक सेक्टरमध्ये आपल्या नवीन याकाचा शोध घेत होते. याकच्या शोध घेण्याच्या दरम्यान त्यांना संशयास्पद पाक सैनिक दिसून आले. __________ 3 मे रोजी प्रथमच भारतीय सैनिकांना गश्त करत असताना आढळले की काही लोकं तेथे हालचाल करीत आहे. प्रथमच द्रास, काकसार आणि मुश्कोह सेक्टर मध्ये पाकिस्तानी घुसखोरांना बघितले. __________ भारतीय सैन्याने 9 जून रोजी बाल्टिक क्षेत्राच्या 2 चौकीवर ताबा घेतला. त्यानंतर 13 जून रोजी द्रास सेक्टरमध्ये तोलोलिंगवर ताबा घेतला. आपल्या सैन्याने 29 जून रोजी दोन अन्य महत्त्वाच्या चौक्या 5060 आणि 5100 आणि वर ताबा मिळवून आपला झेंडा रोविला. __________ 1999 मध्ये कारगिल युद्धात आर्टिलरी तोफेमधून 2,50,000 गोळे आणि रॉकेट डागळे गेले. 300 पेक्षा जास्त तोफ आणि मोटार आणि रॉकेटलॉन्चर्स ने दररोज सुमारे 5,000 बॉम्बं डागण्यात आले. __________ 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैन्याने कारगिल युद्धाच्या वेळी राबविलेल्या 'ऑपरेशन विजय' ला यशस्वीरीत्या पार पाडून घुसखोरांच्या तावडीतून भारतभूमीला मुक्त केले. __________ कारगिलची उंची समुद्र तळापासून सुमारे 16,000 ते 18,000 फूट अशी आहे, अशामध्ये विमानांना उड्डाण करण्यासाठी सुमारे 20,000 फुटाच्या उंची वर उड्डाण करावी लागते. __________ 11 तासाच्या लढानंतर पुन्हा एकदा टायगर हिल्स वर भारतीय सैन्याने ताबा घेतला, मग बटालिकातील जुबेर हिल देखील ताब्यात घेतली. __________ कारगिल युद्धात मीराजसाठी निव्वळ 12 दिवसात लेजर गाईडेड बॉम्बं प्रणाली (लेजर मार्गदर्शित बॉम्बं प्रणाली) तयार करण्यात आली. भारतीय वायू सेनेत पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात मिग-27 आणि मिग-29 विमान वापरण्यात आले होते. __________ कारगिलच्या टेकड्यांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात सुमारे 2 लक्ष भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला यामध्ये सुमारे 527 सैनिक हुतात्मा झाले.

🟪देश प्रथम, नेहमीच प्रथम’चा पंतप्रधान मोदी यांचा नारा ‘देश प्रथम, नेहमीच प्रथम’ अशी नवीन घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. देश स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनाकडे वाटचाल करीत असताना प्रत्येक नागरिकाने ‘भारत जोडो’ आंदोलन उभे केले पाहिजे. महात्मा गांधींनी त्या काळात सुसंगत असे भारत छोडो आंदोलन सुरू केले होते, आता ‘भारत जोडो’आंदोलनाची वेळ आहे असे त्यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात सांगितले. देशाने एकजूट होऊन प्रगती करणे ही आजची गरज असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की बापू म्हणजे महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांना भारत छोडोचा नारा दिला होता, आता भारत जोडो आंदोलन सुरू करण्याची वेळ आली आहे. आपण आपले काम अशा पद्धतीने केले पाहिजे, की ते विविधतेने नटलेल्या आपल्या देशाच्या उपयोगी पडले पाहिजे. देश प्रथम, नेहमीच प्रथम अशी आपली भावना असली पाहिजे असे ते म्हणाले.

🟪संयुक्त राष्ट्रातील पी ५ गटात भारताने समतोल साधला- तिरूमूर्त. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या भारताने समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. पाच स्थायी सदस्यांमधील मतभेद मिटवण्यात मोठे काम केले आहे, असे भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे फिरते अध्यक्षपद १ ऑगस्टला मिळणार असून २०२१-२२ या काळात हे पद भारताकडे राहणार आहे. सुरक्षा मंडळात एकूण पंधरा अस्थायी देश आहेत. भारताला सुरक्षा मंडळात अतिशय महत्त्वाच्या काळात पद मिळाले असून जग करोनात चाचपडत असताना व त्यावरून मतभेद व वादविवाद असताना सुरक्षा मंडळ व इतर पातळीवरही भारत सामूहिक कृतीसाठी प्रयत्नशील राहणार आहे, असे भारताचे राजदूत टी.एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, भारत सदस्य देशांमधील मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करील. कारण सध्या अनेक प्रश्नांवरून सुरक्षा मंडळात वादविवाद आहेत. अनेक प्रश्नांवर भारताने ठोस भूमिका गेल्या सात महिन्यात घेतली आहे. कुठलीही जबाबदारी घेण्यात टाळाटाळ केलेली नाही. भारतासारख्या स्वतंत्र परराष्ट्र धोरण असलेल्या देशाचा संयुक्त राष्ट्रातील सुरक्षा मंडळात महत्त्वाचे पद मिळाल्याने बहुमान होत आहे पण त्याचबरोबर पाच कायम सदस्य असलेल्या देशातील मतभेद टाळण्यास मदत होणार आहे. चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन व अमेरिका हे सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्य असलेले देश आहेत. सुरक्षा मंडळातील ध्रुवीकरण टाळण्याचा प्रयत्न करून विचारांती निर्णय घेण्यास भाग पाडू असे सांगून ते म्हणाले की, म्यानमार, अफगाणिस्तान यांसारख्या देशातील परिस्थितीवर चर्चा करण्याची गरज असून तेथील परिस्थितीबाबत संवेदनशीलता दाखवली पाहिजे.

🟪काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर: भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ. भारतामधील काकतीया रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर याचा UNESCO संस्थेच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. तेलंगणा राज्यातील वारंगळ मालुगू जिल्ह्यातील पालमपेठ येथे हे मंदिर आहे. यासह ते भारतातील 39 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ ठरले आहे. रामप्पा मंदिर हे तेराव्या शतकातील तंत्रज्ञानाची कमाल दाखवणारी एक अद्भुत वास्तुकला आहे. ▪️भारतातील जागतिक वारसा स्थळे. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात. आता, भारतात एकूण 39 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 31 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

photo content
+8

photo content
+9

🟧 Simplified चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2021 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉1 जानेवारी 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या घडामोडीवर आ
🟧 Simplified चालू घडामोडी सराव प्रश्नसंच 2021 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● 👉1 जानेवारी 2020 ते 1 फेब्रुवारी 2021 दरम्यानच्या घडामोडीवर आधारित 👉 बहुपर्यायी बहुविधानात्मक प्रश्नांचा समावेश 👉 700+ परीक्षाभिमुख प्रश्नांचा समावेश ▪️महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content
+7

photo content
+9

photo content
+9

🟪भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (कॉर्पोरेट व्यक्तींसाठी नादारी तोडगा प्रक्रिया) नियमन-2016’ यामध्ये दुरुस्ती. भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (IBBI) यांनी ‘भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (कॉर्पोरेट व्यक्तींसाठी नादारी तोडगा प्रक्रिया) नियमन-2016’ यामध्ये दुरुस्ती केली आहे. त्या पुढीलप्रमाणे आहेत - कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्ज थकवलेल्या उद्योजकाने, नादारी प्रक्रियेची सुरुवात करण्यापूर्वी आपले नाव किंवा आपला नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यात बदल केला असेल तर इतर भागधारकांचा नवीन नाव अथवा नवीन नोंदणीकृत कार्यालयाशी संबंध नसल्यास, कदाचित ते कॉर्पोरेट नादारी निराकरण प्रक्रिया (CIRP) यामध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. नवीन सुधारणेनुसार, CIRP प्रक्रिया करणाऱ्या नादारी व्यावसायिकांनी ही प्रक्रिया सुरु होण्याच्या दोन वर्षाआधी संबंधित कंपनीने बदलवलेली नावे आणि पत्ते रद्द करण्याची आवश्यकता असेल. तसेच, सध्या असलेले नाव आणि नोंदणीकृत पत्ताही रद्द करून नवीन नावे तसेच पत्त्यावर झालेला सर्व पत्रव्यवहार आणि कागदोपत्री नोंदी देखील रद्द कराव्या लागतील. हंगामी तोडगा व्यावसायिक (IRP) अथवा तोडगा व्यावसायिकाने (RP) CIRP याची प्रक्रिया करताना आपल्या मदतीसाठी सहायक व्यावसायिक, ज्यात नोंदणीकृत मूल्यांकन व्यावसायिकांचाही समावेश असेल, त्यांची नेमणूक करू शकतील, अशी तरतूद आहे

🟪ब्रिस्बेनला होणार ऑलिम्पिक स्पर्धा, ३२ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला मिळालं यजमानपद. २०३२मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचे आयोजनपद मिळवण्यात ब्रिस्बेन यशस्वी झाला आहे. या यजमानपदाची जबाबदारी ब्रिस्बेनकडे जाणार, ही शक्यता आधीच व्यक्त केली जात होती. आज बुधवारी याची अधिकृत घोषणा करण्यात आली. बुधवारी मतदानानंतर ब्रिस्बेनला अधिकृतपणे यजमान म्हणून घोषित करण्यात आले. ऑस्ट्रेलियाने यापूर्वी १९५६ मध्ये मेलबर्न आणि २००० मध्ये सिडनी येथे ऑलिम्पिक खेळांचे आयोजन केले होते. त्यामुळे तब्बल ३२ वर्षानंतर ऑलिम्पिक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले, ”आमच्या सरकारला अभिमान आहे की आम्हाला ब्रिस्बेन आणि क्वीन्सलँड येथे या स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि क्वीन्सलँडची सरकारे या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सज्ज आहेत. आम्ही खेळ उत्कृष्ट पद्धतीने आयोजित करू. ऑलिम्पिक खेळांचे आयोजन कसे केले जाते हे आम्हाला माहीत आहे.”

🟪आकाश-NG’ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) 21 जुलै 2021 रोजी पृष्ठभागावरून हवेत मारा करणाऱ्या ‘आकाश-NG’ अर्थात ‘न्यू जनरेशन आकाश’ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर यशस्वी चाचणी केली. ही क्षेपणास्त्र प्रणाली DRDO संस्थेच्या हैदराबाद येथील संरक्षण, संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने (DRDL) विकसित केली आहे. या चाचणीदरम्यान, शत्रूच्या हवेतील हल्ल्याला हवेतच निष्प्रभ करण्याची गतिमानता या क्षेपणास्त्रात असल्याचे सिध्द झाले आहे. ▪️आकाश क्षेपणास्त्र. आकाश क्षेपणास्त्राला भारतीय लष्करात जमिनीवरून हवेत कमी पल्ल्याची मारक क्षमता असणारे क्षेपणास्त्र (SRSTM) म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. हे पहिले SAM आहे, ज्यामध्ये रेडियो तरंगांच्या आधारावर आपल्या लक्ष्यला भेदण्यास स्वदेशी तंत्रज्ञान युक्त प्रणालीचा वापर केला गेला आहे. हे भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र असून त्याचा मारा पल्ला 60 किलोमीटरपर्यंत आहे. ते 55 किलोग्राम स्फोटके घेऊन प्रवास करू शकते. या क्षेपणास्त्रात अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आहे. ध्वनीच्या साडेतीनपट वेगाने हे क्षेपणास्त्र प्रवास करते. ▪️DRDO विषयी... संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ही भारताच्या संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी समर्पित असलेली प्रमुख संस्था आहे. त्याची स्थापना 1958 साली करण्यात आली आणि मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही संस्था भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत आहे.

🟪मॅक्रॉन यांच्यासह १४ राष्ट्रप्रमुखांवर पाळत. इस्राायलच्या ‘एनएसओ’ संस्थेने तयार केलेल्या पेगॅसस या स्पायवेअरचा वापर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह सध्याच्या १४ राष्ट्रप्रमुखांवर पाळत ठेवण्यासाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. एनएसओ समूहाने तयार केलेले हे स्पायवेअर संबंधित व्यक्तीच्या मोबाइलमधील संभाषण, संदेश व इतर सगळी माहिती उघड करीत असते. मॅक्रॉन यांच्यासह १४ जणांचे मोबाइल फोन हॅक करण्यात आले होते. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे सरचिटणीस अ‍ॅग्नेस कॉलामार्ड यांनी सांगितले, की ही अतिशय धक्कादायक बाब असून त्यामुळे जागतिक नेत्यांना धक्का बसला आहे. पन्नास हजार फोनमधील माहिती या स्पायवेअरच्या मदतीने उघड करण्यात आली आहे. पॅरिस येथील ‘फॉरबिडन स्टोरीज’ या संस्थेने हा प्रकार उघडकीस आणला असून त्यांनी म्हटले आहे, की दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोसा, इराकचे बरहाम सलिह, मोरोक्कोचे राजे महंमद-सहावे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली, मोरोक्कोचे पंतप्रधान साद एडिन ओथमानी यांचाही यादीत समावेश आहे, असे ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. या राष्ट्रप्रमुखांनी त्यांचे मोेबाइल फोन तपासणीसाठी दिलेले नाहीत. एनएसओचे पेगॅसस हे स्पायवेअर लष्करी दर्जाचे असून जागतिक माध्यम समूहाच्या १६ सदस्यांनी हा प्रकार उघड केला होता. २०१९ मध्ये मॅक्रॉन यांच्यासह मंत्रिमंडळातील पंधरा जण या स्पायवेअरच्या हिटलिस्टवर होते, असे ‘ल माँद’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. पॅरिसच्या अभियोक्ता कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अ‍ॅमेझॉन वेब सव्र्हिसेस या कंपनीने एनएसओला यात डिजिटल ओशनच्या माध्यमातून सव्र्हरची मदत केली होती. डिजिटल ओशन या कंपनीने आरोप फेटाळले किंवा स्वीकारलेले नाहीत, असे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे.

🟪फ्रान्सवरून आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखल राफेल लढाऊ विमानांच्या सातव्या खेपेत आज आणखी तीन विमानं फ्रान्सवरून थेट भारतात दाखल झाली आहेत. जवळपास ८ हजार किलोमीटरचा प्रवास करून ही विमानं भारतात आली आहेत. या विमानांचा भारतीय वायूसेनेच्या राफेल विमानांच्या दुसऱ्या स्क्वाड्रनमध्ये समावेश केला जाणार आहे. भारतीय वायू सेनेने ही तीन विमानं भारतात दाखल झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. या विमानांच्या प्रवासा दरम्यान हवाई मार्गात यूएईने त्यांना इंधन उपलब्ध करून दिलं. याबद्दल भारतीय वायू सेनेकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. फ्रान्सच्या इस्त्रेस एअर बेसवरून उड्डाण घेऊन न थांबता तीन राफेल विमानं काही वेळापूर्वीच भारतात पोहचली. हवाई मार्गात मदत पुरवल्या बद्दल यूएई वायू सेनेला भारतीय वायू सेना धन्यवाद देते. असं ट्विट वायू सेनेकडून ट्विट करण्यात आलं आहे. राफेल विमानांची ही खेप भारतात पोहचल्यानंतर आता भारताकडे २४ राफेल विमानं झाली आहेत. राफेल जेटची नवीन स्क्वाड्रन पश्चिम बंगालच्या हासीमारा एअर बेसवर असेल. पहिली राफेल स्क्वाड्रन अंबाला वायू सेना स्टेशनवर आहे. एका स्क्वाड्रनमध्ये १८ विमानं असतात.

🟪लोकमान्य बाळ गंगाधर 🔸भारतीय असंतोषाचे जनक (व्हॅलेंटाईन चिरोल द्वारे उपमा) 🔸भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार... 🔸तेल्या तांबोळ्यांचे पुढारी... 🔸महाराष्ट्र केसरी-लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती... 🔸1 जानेवारी 1880 रोजी 'न्यू इंग्लिश स्कूल,पुणे' ची स्थापना संस्थापक-टिळक,आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर... 🔸 केसरी व मराठा वृत्तपञांची सुरुवात 2Jan1881-मराठा(इं):-संपादक-टिळक 4Jan1881-केसरी(म):-संपादक-आगरकर 🔸जुलै 1882-कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात टिळक व आगरकर 101 दिवस डोंगरीच्या तुरुंगात कैद... 🔸24 ऑक्टोबर 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना (टिळक व आगरकर)... 🔸दादाजी विरुद्ध पत्नी रखमाबाई प्रकरण... 🔸महाविद्यालयीन मित्र असणाऱ्या टिळक व आगरकर यांच्यात 'आधी सामाजिक की राजकीय सुधारणा' यावरून वितुष्ट... 🔸1893-मुस्लिमांच्या मोहर्रम सणावरून प्रेरणा घेत सार्वजनिक गणेश उत्सव सुरुवात... 🔸1895-सार्व. शिवजयंती उत्सव सुरुवात... 🔸1896-97 मधील साराबंदी मोहिम... 🔸1897-चाफेकर बंधूंनी केलेल्या प्लेग कमिशनर रँड हत्तेच्या समर्थनात केलेल्या लिखनाबद्दल दीड वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा 🔸1901-'आर्टिक होम इन वेदाज' ग्रंथ... 🔸1901 ते 1904 -ताई महाराज प्रकरण... 🔸1905-बंगालच्या फाळणीनंतर जहालवादाचा जोरदार पुरस्कार... 🔸''स्वदेशी,स्वराज्य,राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार'' या चतु:सुञीचा पुरस्कार... 🔸किंग्जफोर्ड प्रकरणानंतर केसरीत ''देशाचे दुर्दैव" या अग्रलेखा मुळे 6 वर्षे मंडाले येथे काळ्या पाण्याची शिक्षा... 🔸 1911-मंडालेच्या तुरुंगात 'गीतारहस्य' ग्रंथ पूर्ण.. 🔸28 एप्रिल 1916-टिळकप्रणित होमरूल लीगची स्थापना... 🔸1916-टिळकांच्या मध्यस्थीने मुस्लिम लीग व राष्ट्रीय सभा यांच्यात येथे होऊन लखनौ अधिवेशन संपन्न... 🔸डिसेंबर 1916- बेळगाव येथे होमरूल लीगच्या प्रचारादरम्यान "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवणारच" ही घोषणा... 🔸मार्च 1918- मुंबईतील अस्पृश्यता निवारण परिषदेत भाषण-"जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्यालाही मी देव मानणार नाही"... 🔸जानेवारी 1919- व्हॅलेंटाईन चिरोल विरोधात अब्रुनुकसानीचा खटला... 🔸1919 च्या माँटेग्यू-चेम्सफर्ड कायद्यावर 'हे स्वराज्य नव्हे व त्याचा पायाही नव्हे','उजाडले पण सूर्य कोठे आहे','दिल्ली तो बहुत दूर आहे' अशा शब्दात लोकमान्यांची टीका... 🔸1920-गांधीजी व टिळकांची सिंहगडावर भेट... 🔸फेब्रुवारी 1920 टिळकांचा काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्ष... 🔸1 ऑगस्ट 1920-टिळकांचे मुंबई येथे निधन... 👉टिळकांविषयी शब्दगौरव:- 🔸"असे महापुरुष मरत नसतात.त्यांच्या कार्याच्या रुपाने ते अमर झालेले असतात"- महात्मा गांधी... 🔸"राष्ट्रीय चळवळीचा मनू"-न.र.फाटक... 🔸"लोकमान्य" ही पदवी तसेच "टिळक हे भारतीय नेपोलियनच"-शिवराम परांजपे 🔸"टिळक म्हणजे सूर्याचे पिल्लू"-केरूनाना छत्रे (टिळकांचे शिक्षक).