MPSC SIMPLIFIED(official)
前往频道在 Telegram
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified
显示更多📈 Telegram 频道 MPSC SIMPLIFIED(official) 的分析概览
频道 MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 33 766 名订阅者,在 教育 类别中位列第 5 593,并在 印度 地区排名第 11 939 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 33 766 名订阅者。
根据 13 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -26,过去 24 小时变化为 19,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 12.63%。内容发布后 24 小时内通常能获得 8.01% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 4 266 次浏览,首日通常累积 2 704 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“simplified चा टेलिग्राम ग्रुप
(आपल्या मित्रांना जॉईन करा)
+ सिम्प्लिफाइड स्टडी
+newspaper सिम्प्लिफाइड
+job सिम्प्लिफाइड
+daily चालू घडामोडी टेस्ट
+अभ्यास आधारित टेस्ट
https://telegram.me/mpscsimplified”
凭借高频更新(最新数据采集于 14 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
33 766
订阅者
+1924 小时
+537 天
-2630 天
帖子存档
🟧ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कुणाला दिला जाईल. अखेर ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली
या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. निवडीनंतर मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.
ख्यातनाम गायिका आशा भोसले जी यांना २०२० सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. निवडीनंतर मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन के०.ले
🟧नॉर्वे देशात जहाजांसाठी जगातील पहिला बोगदा तयार केला जाणार
नॉर्वेच्या सरकारने जहाजांच्या निर्बाध वाहतुकीसाठी जगातील पहिला बोगदा देशात तयार करण्यास परवानगी दिली आहे.
▪️ठळक बाबी.
बोगद्याला “स्टॅड शिप टनल” असे नाव देण्यात येणार आहे.
हा बोगदा वायव्य नॉर्वेकडील स्टॅडव्हेट द्वीपकल्पात तयार केला जाईल.
बोगदा 1.7 किलोमीटर लांबीचा असेल. बोगदा 49 मीटर उंच आणि 36 मीटर रुंद असेल.
बोगद्यातून सुमारे 16,000 टनांपर्यंतची जहाजे प्रवास करू शकणार आहेत.
या प्रकल्पाला 315 दशलक्ष डॉलरचा अंदाजित खर्च येणार आहे.
हा बोगदा उत्तर समुद्र आणि नॉर्वेजियन समुद्र यांना जोडणार.
🟧पंतप्रधान मोदी ४९७ दिवसांनंतर परदेश दौऱ्यावर; उद्या प्राचीन मंदिराला देणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बांगलादेशच्या दोन दिवसीय दौऱ्यासाठी ढाक्याला रवाना झाले. जगभरामध्ये करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पंतप्रधानांनी मागील ४९७ दिवसांपासून एकही परदेश दौरा केला नव्हता. यापूर्वी मोदींनी नोव्हेंबर २०१९ मध्ये ब्राझीलचा दौरा केला होता. मागील वर्षी मोदींनी जगभरातील वेगवेगळ्या संस्थांच्या आणि महत्वाच्या कार्यक्रमांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली.
बांगलादेशने गुरुवारी जारी केलेल्या एका पत्रकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाय दोन दिवसीय दौऱ्यादरम्यान नवी दिल्ली आणि ढाका दरम्यान किमान पाच सहमती करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सुवर्ण जयंती समारंभामध्ये सहभागी होणार आहे. तसेच बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यातही ते आज सहभागी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ आणि २७ मार्चच्या आपल्या दोन दिवसीय दौऱ्यामध्ये बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशाच्या प्रतिनिधिकांच्या उपस्थितीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन यांनी सामंजस्य करारांची संख्या कमी जास्त होऊ शकते पण किमान पाच करारांवर स्वाक्षऱ्या होतील असा विश्वास व्यक्त केलाय.
🟧भारतीय महिलांचे सुवर्णयश.
राही सरनोबत, चिंकी यादव आणि मनू भाकर यांनी महिलांच्या २५ मीटर पिस्तूल प्रकारात बुधवारी निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर याच तिघींनी गुरुवारी सांघिक प्रकारात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्यांच्या या कामगिरीनंतर भारताने १० सुवर्ण, ६ रौप्य आणि ५ कांस्यपदकांसह एकूण २१ पदकांनिशी ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या पदकतालिकेत अग्रस्थान टिकवले आहे.
सुवर्णपदकासाठीच्या अंतिम लढतीत भारतीय संघाने पोलंडचा १७-७ असा धुव्वा उडवला. डॉ. कर्णी सिंग नेमबाजी केंद्रावर झालेल्या या अंतिम लढतीत पोलंडच्या जोआनो इवोना वावरझोनोवस्का, ज्युलिटा बोरेक आणि अग्निस्झा कोरेजवो यांना कामगिरी उंचावता आली नाही.
त्याआधी अंजूम मुदगिल, श्रेया सक्सेना आणि गायत्री नित्यनादम यांच्या भारतीय महिला संघाने ५० मीटर रायफल थ्री पोझिशन सांघिक प्रकारात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. भारतीय संघाला अंतिम फेरीत सर्वोत्तम कामगिरी नोंदवता आली नाही. सुवर्णपदकासाठी रंगलेल्या या सामन्यात भारताने ४३ गुण मिळवले. त्याउलट अनेता स्टॅनकिविझ, अलेक्झांड्रा झुटको आणि नतालिया कोचान्स्का यांच्या पोलंड संघाने ४७ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. इंडोनेशियाच्या संघाने कांस्यपदकावर नाव कोरले.
🟧महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते
👤 १९९६ : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
🙎♀ १९९७ : लता मंगेशकर
👤 १९९९ : विजय भटकर
👤 २००१ : सचिन तेंडुलकर
👤 २००२ : भिमसेन जोशी
👤 २००३ : अभय बंग व राणी बंग 🙎♀
👤 २००४ : बाबा आमटे
👤 २००५ : रघुनाथ माशेलकर
👤 २००६ : रतन टाटा
👤 २००७ : आर के पाटील
👤 २००८ : नाना धर्माधिकारी
👤 २००८ : मंगेश पाडगावकर
🙎♀ २००९ : सुलोचना लाटकर
👤 २०१० : जयंत नारळीकर
👤 २०११ : डॉ. अनिल काकोडकर
👤 २०१५ : बाबासाहेब पुरंदरे
👩 २०२० : आशा भोसले
👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇
www.simplifiedcart.com
https://www.myownshop.in/simplifiedbooks
🟧१२ एप्रिल: आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन
▪️आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन दरवर्षी १२ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो
▪️ठराव मंजूर
संयुक्त राष्ट्र आमसभेने ७ एप्रिल २०११ रोजी एक ठराव मंजूर करण्यात आला
▪️घोषणा
आमसभेमार्फत १२ एप्रिल हा 'आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिन' म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा करण्यात आली
▪️'संयुक्त राष्ट्रां'बाबत थोडक्यात
▪️स्थापना
२४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती
▪️सनद स्वाक्षरी
२६ जून १९४५ रोजी सनदेवर स्वाक्षरी करण्यात आली होती
▪️मुख्यालय
न्यूयॉर्क, अमेरिका येथे संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय स्थित आहे
▪️संस्था प्रकार
'आंतरशासकीय संघटना' या प्रकारात संयुक्त राष्ट्रांची गणना करण्यात येते
▪️सदस्य देश
जगभरातील १९३ देश संयुक्त राष्ट्रांचे सदस्य देश आहेतT
▪️निरीक्षक देश
जगातील २ देश संयुक्त राष्ट्रांचे निरीक्षक देश आहेत
▪️सध्याचे सचिव
अँटोनियो गुटेरेस सध्या संयुक्त राष्ट्रांचे सचिव म्हणून कार्यरत आहेत
▪️कार्यालयीन भाषा
इंग्रजी
फ्रेंच
रशियन
स्पॅनिश
अरबी
चीनी
🟧जागतिक क्षयरोग दिन: 24 मार्च.
दरवर्षी 24 मार्चला जगभरात ‘जागतिक क्षयरोग दिवस (World TB Day)’ पाळला जातो. या दिनानिमित्त क्षयरोगाचे (TB) जगभरातले ओझे तसेच प्रतिबंधात्मक व निगा राखण्याचे प्रयत्न याविषयी नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली जाते.
2021 यावर्षी हा दिवस ‘द क्लॉक इज टिकिंग’ या संकल्पनेखाली पाळण्यात आला.
▪️क्षयरोग
हा रोग प्राचीन काळापासून जगातल्या अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. 24 मार्च 1882 रोजी डॉ. रॉबर्ट कॉच यांना क्षयरोगाचे कारक असलेल्या ‘TB बॅसीलस’ नामक जिवाणूचा शोध लागला.
क्षयरोग मुख्यत: हवेच्या माध्यमातून पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. क्षयरोगाच्या निर्मितीस मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. त्यांचा प्रसार रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या सूक्ष्म थेंबांमुळे होतो. क्षयरूग्णाचे निदान झालेल्या रूग्णाला डॉट्स (DOTS) प्रोव्हायडरमार्फत औषधोपचार दिला जातो.
▪️भारतामधली परिस्थिती आणि उपाययोजना
जगभरात 6-7 कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत आणि क्षयरोगामुळे दरवर्षी जवळजवळ 2.5-3 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. भारतात दर तीन मिनिटाला दोन क्षयरोगींचा मृत्यू होतो, तर दररोज 40 हजार लोकांना याचे संक्रमण होते.
भारतात जवळजवळ 92 टक्के इतक्या उच्च प्रमाणात HIV बाधित क्षयरोग रुग्ण आहेत, ज्यांना अॅंटी-रेट्रोव्हायरल थेरपी दिली जात आहे. भारतात वर्षभरात सुमारे 18 लक्ष लोकांना क्षयरोग होतो.
औषध प्रतिरोधक क्षयरोगावरील उपचाराचे परिणाम सुधारण्यासाठी “बेडाक्युलाइन” या नावाचे नवीन क्षयरोगाविरोधी औषध सशर्त प्रवेश कार्यक्रम (CAP) अंतर्गत देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रोगासंबंधी खासगी चिकित्सक शोधण्यासाठी “ई-निक्षय” व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे.
🟧पॅरा नेमबाजी विश्वचषक: मनीष नरवालला विक्रमी सुवर्णपदक
यूएईच्या अल एन येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनीष नरवालने विश्वविक्रम रचला आहे. पी 4 मिक्सड 50 मीटर पिस्टल एसएच 1 या प्रकारात मनीषने सुवर्णपदकाची कमाई करत नव्या विक्रमाला गवसणी घातली. या स्पर्धेतील हे भारताचे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी सिंगराजने 10 मीटर एअर पिस्टल एसएच 1 प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.
2019 सिडनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता मनीषने 229.1 गुण नोंदवत जुना विक्रम मोडला. त्याच्या आधी सर्बियाच्या रास्तको जोकिकने 2019मध्ये ओसीजेक येथे 228.6 गुण मिळवत विक्रम रचला होता.
भारत तिसऱ्या स्थानी - नरवालशिवाय इराणच्या सारेह जवानमार्डीने 223.4 गुण मिळवले. तर, सिंगराजने 201.7 गुणांसह कांस्यपदक जिंकले. स्पर्धेच्या सहा दिवसानंतर युक्रेनने चार सुवर्ण, चार रौप्य व एक कांस्यपदकांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर, यजमान संयुक्त अरब अमिरातीने (युएई) तीन सुवर्ण व एक रौप्यपदकासह दुसरे स्थान राखले आहे. भारत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदकांसह पदकांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.
🟧दुहेरी उत्परिवर्तनांच्या करोना विषाणूंचा भारतात आढळ
दोन उत्परिवर्तने असलेला सार्स सीओव्ही २ विषाणू (करोना) भारतातील काही नमुन्यात आढळून आला असून इतर अनेक गंभीर स्वरूपाचे विषाणूही १८ राज्यांत सापडल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या प्रकारांपैकी काही विषाणू प्रकार या आधी परदेशात सापडले होते.
भारतातील सार्स सीओव्ही २ कन्सॉर्टियम ऑन जिनॉमिक्स (इन्साकॉग) या संस्थेने देशाच्या विविध राज्यांतील विषाणू नमुन्यांच्या जनुकीय क्रमवारीचे काम केले असून त्यात दोन उत्परिवर्तने असलेले काही विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्याच्या परिस्थितीचे निरीक्षण जनुकीय क्रमवारी व साथरोगशास्त्रीय आधारावर केले जात आहे. आरोग्य मंत्रालयाने २५ डिसेंबर रोजी ‘इन्साकॉग’ ही संस्था परदेशातून येत असलेल्या विषाणूंवर तसेच येथील देशी विषाणूतील बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन केली होती. यात दहा राष्ट्रीय प्रयोगशाळांचा समावेश असून विषाणूंच्या नमुन्यांची जनुकीय क्रमवारी अभ्यासण्याचे काम त्या प्रयोगशाळा करीत आहेत.
‘इन्साकॉग’ या संस्थेने आतापर्यंत चिंताजनक स्वरूपाचे ७७१ जनुकीय विषाणू प्रकार शोधले असून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी एकूण १०,७८७ नमुने दिले होते. यातील ७३६ नमुने ब्रिटनमधील बी १.१.७ विषाणूच्या प्रकारचे असून ३४ नमुन्यात दक्षिण आफ्रिकेतील बी १.३५१ हा विषाणू आढळून आला आहे. एका नमुन्यात ब्राझीलचा विषाणू – पी १ सापडला आहे. या चिंताजनक विषाणूंचे प्रकार १८ राज्यांत सापडले आहेत. जनुकीय क्रमवारी व विश्लेषण हे आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नमुन्यावर आधारित आहे.
🟧केंद्र सरकारच्या वित्त विधेयकाला संसदेची मंजुरी
राज्यसभेत ‘वित्त विधेयक 2021’ लोकसभेत पाठवल्यामुळे या वित्तविधेयकाला संसदेची मंजूरी मिळाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक मांडले होते.
▪️ठळक बाबी
थकित कर्ज 8 लक्ष 99 हजार कोटी रुपयापर्यंत खाली आले आहे.
नव्या नॅशनल बॅंक फॉर फायनान्स इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट याला 10 वर्ष आयकरातून सूट देण्यात आली आहे.
खासगी क्षेत्रातील विकास वित्त संस्थांना 5 वर्ष आयकरातून सूट देण्यात आली आहे. विधेयकाचा एक भाग म्हणून, सरकार ही सूट आणखी 5 वर्षांपर्यंत वाढवू शकते.
विधेयकात केलेल्या नव्या सुधारणांतर्गत संसद निवृत्तीवेतन आणि व्याज उत्पन्न प्राप्त केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कर विवरणपत्र भरण्यापासून सूट दिले जाईल.
लघु कंपन्यांसाठी पेड-अप भांडवलाची मर्यादा 50 लक्ष रुपयांवरून 2 कोटी रुपयांपर्यंत वाढवून त्यांची व्याख्या सुधारित करण्याचा प्रस्तावही ठेवला गेला आहे.
▪️वित्त विधेयकाविषयी
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणानंतर लगेचच हे विधेयक तयार केले जाते, ज्यामध्ये अर्थसंकल्पात प्रस्तावित करांचे सादरीकरण, रद्दकरण, फेरबदल किंवा नियमन करण्याबाबत तपशील असतो.
वित्त विधेयकामध्ये प्रत्येक अर्थसंकल्पामध्ये कर विषयक तरतुदींमध्ये बदल केले जातात. या तरतुदीमधील बदलही एका विधेयकाच्या स्वरूपातच संसदेसमोर मांडले जातात त्याला वित्त विधेयक असे म्हणतात.
इतर कुठल्याही कायद्याच्या विधेयकाप्रमाणे ह्या विधेयकावर चर्चा होते, मतदान केले जाते आणि वित्त विधेयक मंजूर केले जाते. त्यानंतर त्या त्या करांच्या कायद्यात (आयकर कायदा, सेवाकर कायदा इ.) बदल केले जातात.
नमस्कार मित्रांनो,
आज answer key आलीय
तुमचा कितीही स्कोर असेल आणि तुमच्याकडे कोणतेही पोस्ट नसेल तर तुम्ही सर्वजण combine परीक्षेवर लक्ष केंद्रित करा..ज्यांचा स्कोर चांगला आहे त्यांनी राज्यसेवा mains ला जास्त वेळ द्या👍
अजित थोरबोले
♦राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020
परीक्षा दिनांक 21 मार्च 2021
