ch
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

前往频道在 Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

显示更多

📈 Telegram 频道 MPSC SIMPLIFIED(official) 的分析概览

频道 MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 33 728 名订阅者,在 教育 类别中位列第 5 613,并在 印度 地区排名第 12 022

📊 受众指标与增长动态

невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 33 728 名订阅者。

根据 03 七月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -53,过去 24 小时变化为 -2,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 15.97%。内容发布后 24 小时内通常能获得 3.82% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 5 387 次浏览,首日通常累积 1 289 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

凭借高频更新(最新数据采集于 04 七月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

33 728
订阅者
-224 小时
-277
-5330
帖子存档
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महारा
+4
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. 👉 आजच आपली प्रत राखून ठेवा. 👇Online Booking Available👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

🟪भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत. वर्ष २०२१ मधील तिसरी तिमाही व चौथ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न हे करोनापूर्व पातळीच्या वर गेले असून भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत झाले आहेत, असे मत निती आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी रविवारी व्यक्त केले. त्यांनी सांगितले, की अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत होण्याकडे वाटचाल करीत असली तरी कोविड १९ साथ संपुष्टात आणण्यासाठी देशात वेगाने व निर्णायक प्रयत्न झाले पाहिजेत. लसीकरणाच्या पातळीवर चांगल्या बातम्या येत आहेत. तिसरी व चौथी तिमाही पाहिली तर वास्तव सकल राष्ट्रीय उत्पन्न हे कोविड १९ पूर्वीच्या पातळीपेक्षा वर गेले आहे. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेचे पायाभूत घटक मजबूत आहेत. दरम्यान एप्रिल-जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ झाली असून गेल्या वर्षांत ती फारच कमकुवत होती. उत्पादन व सेवा क्षेत्रात भारताने चांगली कामगिरी केली असून कोविड १९ ची दुसरी लाट जास्त घातक होती. आता भारताची गाडी रूळावर येत असून यावर्षी जास्त विकास दर गाठण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत विकास दराचा अंदाज पूर्वीच्या १०.५ टक्क्य़ांवरून ९.५ टक्के केला असून जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ८.३ टक्क्य़ांनी वाढेल असा अंदाज दिला आहे.

🟪झायकोव्ह-डी’ लशीसाठी १९०० रुपये किंमत प्रस्तावित ‘झायकोव्ह-डी’ या करोना प्रतिबंधक लशीच्या किमतीबाबत केंद्र सरकार व झायडस कॅडिला कंपनी यांची चर्चा सुरू असतानाच, तीन मात्रांच्या या लशीसाठी १९०० रुपये अशी किंमत या कंपनीने सुचवली असल्याचे कळते. तथापि, ही किंमत कमी करण्याबाबत सरकार वाटाघाटी करत असून, याबाबत अंतिम निर्णय या आठवडय़ात घेतला जाण्याची शक्यता असल्याचे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. झायडस कॅडिलाच्या पहिल्या डीएनएवर आधारित सुईविरहित करोना प्रतिबंधक लशीचा लवकरच देशव्यापी लसीकरण मोहिमेत समावेश केला जाईल, असे सरकारने गुरुवारी सांगितले होते. ‘तीन मात्रांच्या या लशीसाठी कंपनीने सर्व करांसह १९०० रुपयांची किंमत प्रस्तावित केली आहे. लशीच्या किमतीबाबत सर्व पैलूंचा फेरविचार करण्यास कंपनीला सांगण्यात आले असून, त्याबाबत अंतिम निर्णय या आठवडय़ात होईल’, असे एका सूत्राने सांगितले.

🟪'सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : पहिल्या विजयासाठी भारतीय संघ उत्सुक ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करल्यानंतर आता गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या लढतीत पहिला विजय मिळवण्याच्या निर्धाराने भारतीय संघाचे खेळाडू मैदानात उतरतील. कर्णधार सुनील छेत्रीने केलेल्या गोलमुळे भारताने सोमवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या लढतीत १-० अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर त्यांच्या एका खेळाडूला लाल कार्डही दाखवण्यात आले. तरीही बांगलादेशने भारताला १-१ असे बरोबरीत रोखले. त्यामुळे भारताच्या बचावफळीसह प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांनाही टीकेला सामोरे जावे लागले. आतापर्यंत सात वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्धची कामगिरी उत्तम आहे. त्यातच सलग दोन सामन्यांत पराभूत झाल्याने श्रीलंकेवर अधिक दडपण असेल. मालदीव नॅशनल फुटबॉल स्टेडियमवर होणाऱ्या उभय संघांतील या लढतीत छेत्रीव्यतिरिक्त गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू, मनविर सिंग, चिंग्लेनसना आणि अनिरुद्ध थापा यांच्यावर प्रामुख्याने भारताची भिस्त आहे. ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या ७७ गोलच्या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी सुनील छेत्रीला अवघ्या एका गोलची आवश्यकता आहे.

🟪2021-22 या वर्षाचे प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेचे उद्दिष्ट पूर्ण. प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेची (PMBJP) अंमलबजावणी करणाऱ्या भारतीय औषधोत्पादन आणि वैद्यकीय उपकरणे विभाग (PMBI) या संस्थेने 8,300 प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र सुरु करण्याचे 2021-22 या आर्थिक वर्षासाठी निर्धारित केलेले उद्दिष्ट सप्टेंबर 2021 या महिन्याच्या अखेरीच्या आधीच पूर्ण केले आहे. ▪️ठळक मुद्दे. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेच्या अंतर्गत जनौषधी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. योजनेच्या अंतर्गत वर्तमानात 1,451 औषधे आणि 240 शस्त्रक्रिया उपकरणे जनौषधी केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत. आणखी नवीन औषधे आणि ग्लुकोमीटर, प्रथिने भुकटी, सत्वावर आधारित पूरक अन्नपदार्थ, प्रथिने वडी, रोग प्रतिकारशक्तीसाठीची वडी इत्यादी पोषणासाठीची उत्पादने देखील या केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. योजनेच्या अंतर्गत उपलब्ध औषधांच्या किंमती ब्रँडेड औषधांच्या किंमतीपेक्षा 50 टक्के ते 90 टक्के कमी आहेत. गेल्या आर्थिक वर्षात (2020-21) योजनेने 665.83 कोटी रुपयांच्या विक्रीचे उद्दिष्ट साध्य केले आहे, ज्यामुळे देशातील नागरिकांची 4,000 कोटी रुपयांची बचत झाली.

🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महारा
+4
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. 👇Online Booking Available👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

भगीरथ_महाराष्ट्र_भूगोल.pdf7.62 MB

photo content

🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महारा
+4
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. 👇Online Booking Available👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content

स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरीता दिनांक 8 ऑक्टोबर 2021 अखेर प्राप्त झालेल्या 1917 पदांच्या मागणीपत्रांचा तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

5_6271493932606030915.pdf

✌️राज्यसेवा परीक्षेत १०० जागांची वाढ✌️
✌️राज्यसेवा परीक्षेत १०० जागांची वाढ✌️

4_5982333476991402731.pdf

🟪'सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा : पहिल्या विजयासाठी भारतीय संघ उत्सुक ‘सॅफ’ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बरोबरी पत्करल्यानंतर आता गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या लढतीत पहिला विजय मिळवण्याच्या निर्धाराने भारतीय संघाचे खेळाडू मैदानात उतरतील. कर्णधार सुनील छेत्रीने केलेल्या गोलमुळे भारताने सोमवारी बांगलादेशविरुद्ध झालेल्या लढतीत १-० अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर त्यांच्या एका खेळाडूला लाल कार्डही दाखवण्यात आले. तरीही बांगलादेशने भारताला १-१ असे बरोबरीत रोखले. त्यामुळे भारताच्या बचावफळीसह प्रशिक्षक इगॉर स्टिमॅक यांनाही टीकेला सामोरे जावे लागले. आतापर्यंत सात वेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाची श्रीलंकेविरुद्धची कामगिरी उत्तम आहे. त्यातच सलग दोन सामन्यांत पराभूत झाल्याने श्रीलंकेवर अधिक दडपण असेल. मालदीव नॅशनल फुटबॉल स्टेडियमवर होणाऱ्या उभय संघांतील या लढतीत छेत्रीव्यतिरिक्त गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू, मनविर सिंग, चिंग्लेनसना आणि अनिरुद्ध थापा यांच्यावर प्रामुख्याने भारताची भिस्त आहे. ब्राझिलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या ७७ गोलच्या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी सुनील छेत्रीला अवघ्या एका गोलची आवश्यकता आहे.

🟪2021-22 या वर्षाचे प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेचे उद्दिष्ट पूर्ण प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेची (PMBJP) अंमलबजावणी करणाऱ्या भारतीय औषधोत्पादन आणि वैद्यकीय उपकरणे विभाग (PMBI) या संस्थेने 8,300 प्रधानमंत्री भारतीय जनौषधी केंद्र सुरु करण्याचे 2021-22 या आर्थिक वर्षासाठी निर्धारित केलेले उद्दिष्ट सप्टेंबर 2021 या महिन्याच्या अखेरीच्या आधीच पूर्ण केले आहे. ▪️ठळक मुद्दे देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेच्या अंतर्गत जनौषधी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. योजनेच्या अंतर्गत वर्तमानात 1,451 औषधे आणि 240 शस्त्रक्रिया उपकरणे जनौषधी केंद्रांमध्ये उपलब्ध आहेत. आणखी नवीन औषधे आणि ग्लुकोमीटर, प्रथिने भुकटी, सत्वावर आधारित पूरक अन्नपदार्थ, प्रथिने वडी, रोग प्रतिकारशक्तीसाठीची वडी इत्यादी पोषणासाठीची उत्पादने देखील या केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. योजनेच्या अंतर्गत उपलब्ध औषधांच्या किंमती ब्रँडेड औषधांच्या किंमतीपेक्षा 50 टक्के ते 90 टक्के कमी आहेत. गेल्या आर्थिक वर्षात (2020-21) योजनेने 665.83 कोटी रुपयांच्या विक्रीचे उद्दिष्ट साध्य केले आहे, ज्यामुळे देशातील नागरिकांची 4,000 कोटी रुपयांची बचत झाली.

🍁🍁धोनीने केली IPL मधील निवृत्तीसंदर्भातील घोषणा; म्हणाला, “मी अखेरचा सामना🍁🍁 🎗चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पुढील वर्षीचा ‘आयपीएल’ हंगाम खेळून निवृत्ती पत्कारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘आयपीएल’ कारकीर्दीतील अखेरचा सामना तो चेपॉक स्टेडियमवर खेळणार आहे. 🎗“निरोपाचा सामना पाहण्याची संधी चाहत्यांना नक्की मिळेल. २०२२ च्या हंगामात चेपॉकवर क्रिकेटरसिकांच्या साक्षीने मी अखेरचा सामना खेळेन,” असे धोनीने एका ऑनलाइन कार्यक्रमात सांगितले. पुढील लिलावात चेन्नईकडून कर्णधार धोनी, रवींद्र जडेजा आणि ऋतुराज गायकवाड या तिघांना संघात कायम ठेवण्यात येणार आहे. 🎗धोनीच्या नेतृत्वाखाली ११ वेळा चेन्नई सुपर किंग्जने प्लेऑफपर्यंत मजल मारली आहे. ४० वर्षीय धोनीने आत्तापर्यंत चेन्नई संघाने खेळलेल्या सर्वच आयपीएलच्या पर्वांमध्ये संघाचं नेतृत्व केलं आहे. धोनी हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे.

🟪हवामानाच्या प्रारूपीकरणासाठी तिघांना भौतिकशास्त्राचे नोबेल जागतिक तापमानवाढीतील बदलांचा अंदाज वर्तवण्यासाठी पृथ्वीच्या हवामानाचे प्रारूपीकरण करण्याच्या कामगिरीसाठी यंदा जपान, जर्मनी व इटली या देशांच्या तीन वैज्ञानिकांना भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले आहे. स्युकुरो मनाबे (वय ९०), क्लॉस हॅझलमन (वय ८९) यांनी जागतिक तपमानवाढीच्या प्रारूपीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्याचबरोबर गिओरगिओ पारिसी (वय ७३) यांनी भौतिक प्रणालींमधील आंतरिक बदल हे आण्विक पातळीपासून ग्रहीय पातळीपर्यंत ओळखण्यासाठी संशोधन केले आहे. नोबेल समितीने म्हटले आहे की, मनाबे व हॅझलमन यांनी पृथ्वीच्या हवामानविषयक ज्ञानाचा पाया घातला व त्याचा मानवावर कसा परिणाम होत आहे, याचा अभ्यास केला. १९६० मध्ये मनाबे यांनी असे दाखवून दिले की, वातावरणात वाढणारे कार्बन डायॉक्साइडचे प्रमाण हे जागतिक तापमानवाढीस कारणीभूत आहे. त्यातून सध्याच्या हवामान व तापमान प्रारूपांचा जन्म झाला. त्यानंतर दशकभराने हॅझलमन यांनी हवामान व वातावरण यांची सांगड घालणारे प्रारूप तयार केले त्यातून हवामान प्रारूपांच्या मदतीने वातावरणीय बदलांचे स्वरूप व त्याचा अंदाज करणे शक्य झाले. मानवी कृतींचा हवामानावर होणारा परिणाम व त्याची चिन्हे काय आहेत, याचा शोध त्यांनी घेतला. पारिसी यांनी गणित, जीवशास्त्र, मेंदूशास्त्र, मशीन लर्निंग यांसारख्या गुंतागुंतीच्या प्रणालीतील आंतरसंबंध स्पष्ट करणारी गणिती व भौतिकी प्रारूपे निश्चिात केली.

🟪जागतिक अधिवास दिवस: 2 ऑक्टोबर जगात दरवर्षी ऑक्टोंबर महिन्याचा पहिला सोमवार या दिवशी जागतिक अधिवास दिवस साजरा करतात. यावर्षी, 4 ऑक्टोबर 2021 रोजी पाळण्यात आलेल्या ‘जागतिक अधिवास दिवस’ची संकल्पना "अॅसेलेरटिंग अर्बन अॅक्शन फॉर ए कार्बन-फ्री वर्ल्ड" ही होती. वाढत्या लोकसंख्येमुळे आणि उद्योगांमुळे पशुपक्ष्यांच्याच नाही तर खुद्द मानवाच्याही आवश्यक छताची आवश्यकता या मूलभूत अधिकारांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या अधिकारांची आणि मानवाला जबाबदारीची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. ▪️इतिहास पहिल्यांदा हा दिवस 1986 साली केनियाची राजधानी नैरोबीमध्ये साजरा करण्यात आला होता. 1989 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या ह्यूमन सेटलमेंट्स प्रोग्रामद्वारे अधिवास स्क्रोल ऑफ ऑनर हा पुरस्कार देण्यास सुरुवात करण्यात आली. सध्या हा जगातील सर्वात प्रतिष्ठित मानवी वस्तीचा पुरस्कार आहे. छत्राची तरतूद, मानवी वस्तीच्या विकास आणि शहरी जीवनशैलीची गुणवत्ता सुधारण्यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट योगदान देणार्‍या पुढाकारांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार देण्यात येतो. ▪️“अधिवास” या संज्ञेचा अर्थ अधिवास म्हणजे खुषीने नेहमी राहण्याचे व्यक्तीचे विशिष्ट ठिकाण होय. कायद्याच्या काटेकोर परिभाषेत सांगावयाचे झाल्यास, व्यक्तीचे स्थायी घर वा मुख्य वास्तव्य असणारे ठिकाण होय.

🟪अमेरिकी वैज्ञानिकांना वैद्यकशास्त्राचे नोबेल अमेरिकेचे वैज्ञानिक डेव्हिड ज्युलियस आणि अर्डेम पॅटापॉशियन यांना २०२१चा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा नोबेल पुरस्कार करोना लस शोधणाऱ्या वैज्ञानिकांना दिला जाईल, असे अंदाज वर्तवले गेले होते. ज्युलियस आणि पॅटापॉशियन यांनी तापमान, स्पर्श यांच्या संवेदना मेंदूत कशा निर्माण होतात याचा शोध संवेदक संकल्पनेच्या माध्यमातून घेतला आहे. त्यातून नवी वेदनाशामके तयार करण्यासाठी मदत होणार आहे, असे नोबेल पुरस्कार निवड समितीने म्हटले आहे. रॉयल स्वीडिश विज्ञान अकादमीच्या वतीने १.१५ दशलक्ष डॉलर्सचे नोबेल पुरस्कार दरवर्षी दिले जातात. उष्णता, थंडी किंवा यांत्रिक बल यांच्यातून मेंदूपर्यंत संवेदना कशा जातात आणि त्यांचे विश्लेषण कसे केले जाते यावर त्यांनी संशोधन केले. त्याचा फायदा वेदनांपासून मुक्ती देणारी औषधे तयार करण्यासाठी होणार आहे. आपली चेतासंस्था ही उष्णता, थंडी आणि यांत्रिक बलास कसा प्रतिसाद देते याचे स्पष्टीकरण त्यांनी केले आहे. गेल्या वर्षी अमेरिकेचे हार्वे अल्टर आणि चाल्र्स राइस तसेच ब्रिटनचे मायकेल हॉटन यांना हेपॅटाटिस सी विषाणूच्या शोधासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते.