mpscCurrentinfo🔥
الذهاب إلى القناة على Telegram
426
المشتركون
+324 ساعات
+47 أيام
+430 أيام
أرشيف المشاركات
♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती..
👉ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2026 (11:00 PM) परीक्षा (Tier I) : ऑगस्ट 2026 परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2026👉 Apply Link : https://ssc.gov.in/login
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - निरीक्षण अधिकारी (पुरवठा ) - सुधारित शिफारस यादीबाबत प्रसिद्धीपत्रक
📌ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी संवर्गाचे मागणीपत्र MPSC कडे जायला सुरुवात झालेली आहे....👍🏻
2000+ 🔥🔥🔥
Double Reduction Act
२०२१ च्या आधी चीन मध्ये आत्ता आपल्याइकडे ट्युशन क्लासेसचं जे प्रस्थ होतं तेच होतं. पण २०२१ साली "डबल रिडक्शन कायदा" चीन सरकारने आणला आणि सर्व खाजगी शिकवण्यांवर थेट बंदी आणली. लोकशाही नसल्याने कुणी कुठे कोर्टात जा, राईट टू नो वगैरे गोष्टी तिथे मध्ये येणार नव्हत्या. एका दिवसात अनेक शिक्षक बेकार झाले, क्लासेस नावाची तिथली इंडस्ट्री नुसती मोडकळीला आली नाही तर संपलीच! चोरून क्लासेस चालवायचे प्रयत्न झालेच पण चिनी यंत्रणेत ते फार काळ टिकले नाहीत. मग पालकांचा सगळं रोख शाळेतल्या, कॉलेजमधल्या प्राध्यापकांवर वळला. क्लासेस नाहीत आणि शाळेत शिकवणार चांगलं नाहीत ही परिस्थिती पालक थोडीच सहन करणार होते? शाळेच्या शिक्षकांना चांगलं शिकवावंच लागलं, शाळेच्या चालकांना शिक्षकांना शिकवायला वेळ मिळेल हे दुसऱ्या कामात गुंतवण्याआधी बघायला लागलं. चुकार मुलांना शाळा सोडून दुसरं कुणी शिकवणार नाही आहे हे कळल्यावर शाळेत लक्ष द्यावं लागलं.
+1
कॅन्सस मधल्या फोर्ड डीलरशिपमध्ये विकलेला ट्रक एका छोट्या रॉबिनच्या घरट्यामुळे अडकला आहे. चार निळ्या अंड्यांमधून पिल्लं बाहेर पडली असून आता ती टायरवरच्या घरट्यात वाढत आहेत.
अमेरिकेच्या स्थलांतरित पक्षी करार कायद्या (एमबीटीए) अंतर्गत हे घरटं हलवणं गुन्हा असल्याने ग्राहकाला गाडी मिळण्यासाठी पक्ष्यांनी घरटं सोडेपर्यंत थांबावं लागणार आहे.
- स्थलांतरित पक्षी करार कायदा (एमबीटीए) अंतर्गत अमेरिकेत बहुतेक स्थलांतरित पक्ष्यांचे घरटे, अंडी व पिल्लं संरक्षित आहेत.
- रॉबिन पक्षी सामान्य असला तरी त्याचं घरटं तोडणं किंवा हलवणं कायदेशीर गुन्हा ठरतो.
- पिल्लं साधारण दोन आठवड्यांत घरटं सोडतात, त्यामुळे जूनच्या सुरुवातीला ग्राहकाला गाडी मिळण्याची शक्यता आहे.
- गाडी विकली गेली आहे, पण ग्राहक संयमाने थांबण्यास तयार आहे.
डीलरशिपने या छोट्या पाहुण्यांना मजेशीर नावे दिली आहेत – Lugnut, Axle, Diesel, Turbo! 🐦
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील 385 पदांसाठी सरळसेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पंजाबचा धावपटू गुरिंदरवीर सिंग याने रांची येथील 29 व्या राष्ट्रीय वरिष्ठ ॲथलेटिक्स फेडरेशन कपमध्ये पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत [10.09 सेकंदांत] सुवर्णपदक जिंकले आहे. [तो 10.09 सेकंदांचा टप्पा ओलांडणारा पहिलाच भारतीय ठरला आहे.]
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारत-पाकिस्तान आणि भारत-बांगलादेश सीमा अधिक अभेद्य व सुरक्षित करण्यासाठी 'स्मार्ट बॉर्डर' (Smart Border) प्रकल्पाची घोषणा केली आहे.
ICC महिला टी-20 विश्वचषक 2026 ची स्पर्धा इंग्लंड आणि वेल्स येथे आयोजित केली जात आहे. [ही या स्पर्धेची 10 वी आवृत्ती असून यामध्ये एकूण 12 संघ सहभागी झाले आहेत.]
भारतीय महिला संघ कर्णधार : हरमनप्रीत कौर
दिनविशेष : 24 मे
1] शांतता आणि नि:शस्त्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दरवर्षी 24 मे रोजी पाळला जातो.
2] जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिवस दरवर्षी 24 मे रोजी जगभरात पाळला जातो.
3] राष्ट्रीय बंधू दिन दरवर्षी 24 मे रोजी साजरा केला जातो.
प्रतिष्ठित 'युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द ईयर 2025' (United Nations Military Gender Advocate of the Year Award 2025) पुरस्कारासाठी भारतीय लष्कराच्या मेजर अभिलाषा बराक यांची निवड करण्यात आली आहे.
29 मे रोजी 'आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिना'निमित्त संयुक्त राष्ट्र मुख्यालयात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
मेजर सुमन गवानी (2019) आणि मेजर राधिका सेन (2023) यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय ठरल्या आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमांमध्ये लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी 2016 मध्ये हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता.
