mpscCurrentinfo🔥
الذهاب إلى القناة على Telegram
426
المشتركون
+324 ساعات
+47 أيام
+430 أيام
أرشيف المشاركات
उद्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ साठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐
हिंदी पत्रकारिता दिन : 30 मे
दरवर्षी 30 मे रोजी संपूर्ण भारतात 'हिंदी पत्रकारिता दिन' साजरा केला जातो.
30 मे 1826 रोजी भारतातील पहिले हिंदी भाषेतील वृत्तपत्र 'उदंत मार्तंड' (शाब्दिक अर्थ: उगवता सूर्य) सुरू झाले. [हे वृत्तपत्र पंडित जुगल किशोर शुक्ल यांनी कोलकता (तेव्हाचे कलकत्ता) येथून सुरू केले होते.]
Note : महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. [मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते.]
केरळमध्ये राज्य सरकारने शाळकरी मुलींसाठी दरमहा जास्तीतजास्त तीन दिवसांच्या मासिक पाळीच्या सुटीची घोषणा केली आहे. [Project Menstrual Dignity अंतर्गत हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.]
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम पोलिसांना प्रतिष्ठित 'प्रेसिडेंट्स पोलीस कलर' (राष्ट्रपती पोलीस ध्वज) प्रदान केला. [हा सन्मान मिळवणारे सिक्कीम हे देशातील 15 वे आणि ईशान्येकडील तिसरे राज्य ठरले आहे.]
ग्रामविकास पुरस्कार-2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माजी ग्रामीण विकास मंत्री रणजीतबाबू देशमुख यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आर. डी. फाउंडेशनतर्फे आयोजित 'ग्रामविकास पुरस्कार 2026' चे वितरण नागपूर येथे करण्यात आले.
नागपूर जिल्ह्यातील 9 उत्कृष्ट ग्रामपंचायती आणि संस्थांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा धनाडेश व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल 2025/26 भारतातील नवीकरणीय ऊर्जा स्थापित क्षमता यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी...(राज्यनिहाय क्रमवारी)
1️⃣ राजस्थान
2️⃣ गुजरात
3️⃣ महाराष्ट्र
4️⃣ तामिळनाडू
5️⃣ कर्नाटक
(पूर्वी 5 व्या स्थानी होते महाराष्ट्र)
+1
👉बशीर बद्र यांचे निधन 💐
👉 प्रसिद्ध असे उर्दू गझलकार व शायर होते.
👇👇त्यांना मिळालेले पुरस्कार:-
👉 पद्मश्री पुरस्कार (1999)
👉 साहित्य अकादमी पुरस्कार
👉 उत्तर प्रदेश उर्दू अकादमी सन्मान (चार वेळा)
👉 बिहार उर्दू अकादमी पुरस्कार
👉 मीर अकादमी पुरस्कार
♦️सुप्रीम कोर्ट ने #TET प्राप्त करण्याची मुदत सध्याच्या ऑगस्ट २०२७ च्या मुदतीतून वाढवून एक वर्ष करून दिली आहे.... 👉 म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२७ ऐवजी, शिक्षकांकडे ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंतचा कालावधी आहे.... 👉 हा निर्णय अनेक पुनर्विचार याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर दिला गेला.
बोगस क्रीडा प्रमाणपत्रांची चौकशी करण्याची मागणी
राज्यात वितरित केलेली सुमारे तीन हजार क्रीडा प्रमाणपत्रे बोगस असल्याचा संशय
♻️ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025
प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे
लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
अंतिम तारीख - 01 जून 2026
👉 भारताचे पहिले स्वदेशी सुपर-प्रेशर बलून ‘विस्टा’ यशस्वी प्रक्षेपित.
👉 प्रक्षेपण : इंदिरा गांधी स्टेडियम, विजयवाडा (आंध्र प्रदेश).
👉 विकसित करणारी भारतीय कंपनी : रेड बलून एरोस्पेस.
👉 बलूनमध्ये ७ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांची उपकरणे बसवली.
👉 सुपर-प्रेशर बलून वातावरणीय दाबापेक्षा अधिक अंतर्गत दाब राखते.
👉 दीर्घकाळ विविध वैज्ञानिक उपकरणे वाहून नेण्यास सक्षम.
👉 ‘विस्टा’ने सुमारे २५ किमी उंची गाठली.
👉 भारतातील अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाची पहिली यशस्वी चाचणी.
👉 मोहिमेचा उद्देश : सुपर-प्रेशर बलूनची क्षमता सिद्ध करणे
