mpscCurrentinfo🔥
الذهاب إلى القناة على Telegram
426
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+47 أيام
+530 أيام
أرشيف المشاركات
दक्षिण कोरियामध्ये सियोल येथील प्रसिद्ध जोग्येसा बौद्ध मंदिरात 'गाबी' (Gabi) नावाच्या ह्युमनॉइड रोबोटला अधिकृतपणे बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली आहे. [विज्ञानाच्या इतिहासात आणि दक्षिण कोरियाच्या बौद्ध परंपरेत एखाद्या रोबोटला अशा प्रकारे 'अधिकृत भिक्षू'चा दर्जा मिळण्याची ही पहिलीच घटना मानली जात आहे.]
जागतिक परिचारिका दिन : 12 मे
जागतिक परिचारिका दिन दरवर्षी 12 मे रोजी आधुनिक नर्सिंगच्या संस्थापक फ्लोरन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
2026 ची थीम : "Our Nurses. Our Future. Empowered Nurses Save Lives" (आमच्या परिचारिका. आमचे भविष्य. सक्षम परिचारिका जीव वाचवतात).
2025 ची थीम :- "Our Nurses. Our Future. Caring for nurses strengthens economies" [आपल्या परिचारिका. आपले भविष्य. परिचारिकांची काळजी घेणे अर्थव्यवस्थांना बळकट करते.]
दिनविशेष :
आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन (IDPH) दरवर्षी 12 मे रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. [2026 ची थीम : "अन्न सुरक्षेसाठी वनस्पती जैवसुरक्षा".]
लिथुआनियाची टेनिसपटू जस्टिना मिकुलस्काइट हिने कर्नाटकातील तुमकूर येथे पार पडलेल्या ITF W35 तुमकुरू ओपन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरी विजेतेपद पटकावले आहे. [हा जस्टिना मिकुलस्काइटचा कारकिर्दीतील आठवा ITF एकेरी खिताब आहे.]
अर्जेंटिनामधून निघालेले MV Hondius हे डच क्रूझ जहाज हंटा व्हायरसच्या (Hantavirus) विळख्यात सापडले होते.
हंटा व्हायरस हा उंदरांच्या संपर्कामुळे पसरणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. [हे प्रामुख्याने उंदरांच्या लघवी, विष्ठा किंवा लाळेच्या संपर्कात आल्याने मानवाला होतो.]
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अद्ययावत अहवालानुसार, देशातील शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर कायम आहे. [देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी 38.5% आत्महत्या एकट्या महाराष्ट्रातील आहेत.]
'आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेने' (IOM) प्रसिद्ध केलेल्या 'जागतिक स्थलांतर अहवाल 2026' नुसार, भारत परदेशातून पैसे पाठवल्या जाणाऱ्या रकमेचा (Remittances) जगातील सर्वात मोठा प्राप्तकर्ता देश ठरला आहे.
आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’
पेपर क्रमांक 2 (सामान्य अध्ययन व बुद्धीमत्ता चाचणी)
♦️आज झालेला ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
♦️ लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (DCCB)
👉 Score Card उपलब्ध करून देण्यात आले आहे..
👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33109/96994/Index.html
लँड टायटलिंग ऍक्ट' - मालमत्तांना कायदेशीर संरक्षणासाठी पाऊल उचलणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य ठरणार
🔹 महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मूठ (Muth) हे गाव जनगणना २०२७ अंतर्गत संपूर्ण स्व-गणना (Self-Enumeration) प्रक्रिया पूर्ण करणारे राज्यातील पहिले गाव ठरले आहे. [Census of India]
⭕️ जिल्हा: सिंधुदुर्ग
🔹 तालुका: वेंगुर्ला
▪️ गाव: मूठ (Muth)
उद्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2025’ साठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐
परीक्षा दिनांक - 17 मे 2026
पेपर 1 (मराठी व इंग्रजी)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 9:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 10:30
• परीक्षा कालावधी - सकाळी 11 ते 12
पेपर 2 (सामान्य अध्ययन)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 1:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 2:30
• परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 4
उद्या मुख्य परीक्षेसाठी भारताचे CJI कोण आहेत विचारलं तर यांचं नाव टीक करताना लाज वाटेल....😡
“तरुण बेरोजगार आहेत म्हणून ते प्रश्न विचारतात” — हा विचारच लोकशाहीचा अपमान आहे.जर प्रश्न विचारणं, RTI टाकणं, पत्रकारिता करणं आणि सत्तेला जाब विचारणं हे फक्त “अपयशी लोकांचं काम” असेल, तर मग संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ तरी काय उरतो? इतिहास साक्षी आहे — सत्तेला प्रश्न विचारणारे लोक नेहमीच अस्वस्थ करणारे वाटले. कारण प्रश्न हे खुर्चीला नाही, तर अहंकाराला हादरा देतात. तरुणांना “झुरळ” म्हणणं ही केवळ असंवेदनशीलता नाही, तर लाखो संघर्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांचा, बेरोजगारांचा, पत्रकारांचा आणि कार्यकर्त्यांचा अपमान आहे.
नोकरी नसणे हा गुन्हा नाही. पण सत्तेच्या ताकदीवर सामान्य तरुणांची खिल्ली उडवणे — हे नक्कीच नैतिक दिवाळखोरीचं लक्षण आहे.RTI कार्यकर्ते नसते, तर कित्येक घोटाळे कधीच बाहेर आले नसते. पत्रकार नसते, तर सत्तेची भीतीच संपली नसती. सोशल मीडियावर आवाज उठवणारे तरुण नसते, तर अनेक अन्याय कायम दाबले गेले असते. लोकशाहीत सर्वात धोकादायक माणूस तो नसतो जो प्रश्न विचारतो — तर तो असतो ज्याला प्रश्न विचारणारे लोकच नको असतात.
▶️ केरळचे नवे मुख्यमंत्री : V.D. सतीशन
✋ काँग्रेस नेतृत्वाखालील UDF (United Democratic Front) आघाडीने V.D. सतीशन यांची केरळच्या नव्या मुख्यमंत्रिपदी घोषणा केली.
