MAHARASHTRA PHARMACY ®
الذهاب إلى القناة على Telegram
👉अचूक, अधिकृत PHARMACY क्षेत्रातील सर्व अपडेट् सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार विश्वासार्ह नाव 👉विध्यार्थ्यांच्या समस्यां संदर्भात चालवलेला ग्रुप (MPSC/UPSC/DRUG INSPECTOR/ZP/RRB/DHS/ DMER/ESIC/CGHS/GPAT Contact:- @AdityaVagare @sandipwagh 🇮🇳
إظهار المزيد9 550
المشتركون
+224 ساعات
-97 أيام
+1330 أيام
أرشيف المشاركات
मित्रांनो, रसायनशास्त्रज्ञ (शास्त्रज्ञ गट-ब) पदासाठी फार्मसीचे विद्यार्थी पात्र असायला हवे होते; मात्र सध्या ते पात्र नसल्याचे दिसत आहे. ज्या विद्यार्थ्यांचे सध्या इंटरव्ह्यू नाहीत, त्यांनी या बाबतीत प्रयत्न करून पाहा. काही मदत किंवा सहकार्य लागल्यास मला नक्की कळवा, मी शक्य ती मदत करेन.
जे उमेदवार MPSC ड्रग इन्स्पेक्टर मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत, त्यांनी हे सेशन नक्की पाहा!
या सेशनमध्ये तुमच्या मॉक इंटरव्ह्यू स्लॉट बुकिंगची प्रक्रिया, स्लॉटचे नियोजन आणि मुलाखतीबाबत महत्त्वाच्या सूचना थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने सांगितल्या आहेत.
https://www.youtube.com/live/xk-ZhHv8Vgk?si=RZuA3awyIL3A0LN0
MPSC Drug Inspector Mock Interview – Slot Booking Live!
https://www.youtube.com/live/xk-ZhHv8Vgk?si=RZuA3awyIL3A0LN0
मित्रांनो,
पुढील १० मिनिटांत मी लाईव्ह येत आहे.
जे विद्यार्थी मुलाखतीची तयारी करत आहेत, त्यांनी सर्वांनी नक्की जॉईन व्हा. प्रत्येकाला वैयक्तिकरित्या फोनवर किंवा मेसेजद्वारे उत्तर देणे मला शक्य होत नाही.
या लाईव्हमध्ये आपण पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत:
• मुलाखतीचा संपूर्ण प्लॅन
• स्लॉट बुकिंग प्रक्रिया
• तुम्हाला कोणता स्लॉट योग्य ठरेल
• मॉक इंटरव्ह्यूचे वेळापत्रक
• तयारीची रणनीती आणि महत्त्वाच्या सूचना
https://www.youtube.com/live/xk-ZhHv8Vgk?si=ow3bxE1TSCHR4Vdw
📢 MPSC Drug Inspector Mock Interview Schedule
सर्व उमेदवारांनी खालील Google Form अनिवार्यपणे भरावा.
फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीनुसार तुमचे Mock Interview स्लॉट बुक करून कळविण्यात येतील.
⏳ स्लॉट मर्यादित असल्यामुळे फॉर्म लवकरात लवकर भरा.
📝 फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा:
docs.google.com�
MPSC Drug Inspector Mock Interview Plan संदर्भात आज संध्याकाळी 7:30 वाजता लाईव्ह येणार आहे.
सर्वांनी वेळेवर लाईव्हला जॉईन व्हा.
तुमच्या मनात Mock Interview, तयारी, डॉक्युमेंट्स किंवा इतर कोणतेही प्रश्न असतील, तर कृपया ते सध्या WhatsApp वर मेसेज करून ठेवा.
प्रत्येकाला वैयक्तिकरित्या कॉलवर उत्तर देणे सध्या शक्य होत नाही. त्यामुळे तुमचे सर्व प्रश्न लाईव्ह सेशनमध्ये सविस्तरपणे सोडवले जातील.
धन्यवाद! 🙏
आपण सर्व मिळून मुलाखतीची सर्वोत्तम तयारी करूया. 💯🎯
https://www.youtube.com/live/xk-ZhHv8Vgk?si=ow3bxE1TSCHR4Vdw
जाहिरात क्रमांक ११६/२०२५ औषध निरीक्षक, गट-ब आणि जा. क्र. ००८/२०२६
- मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://youtu.be/X9sofDnlbJ8
👆👆👆👆
📢 ज्यांनी तुकाराम मुंढे सरांची मुलाखत/प्रेस अजून पाहिली नसेल त्यांनी नक्की पाहून घ्या.
FDA च्या सध्याच्या कारवाया, प्रशासनाची कार्यपद्धती आणि नियामक दृष्टिकोन समजून घेण्यासाठी ही Press Conference नक्की बघा
📌 MPSC Drug Inspector Interview Guidance
आजपर्यंत झालेली सर्व मार्गदर्शन Session खालील फोल्डरमध्ये अपलोड करण्यात आली आहेत.
ज्यांनी अद्याप Session पाहिली नाहीत त्यांनी ती नक्की पाहावीत आणि ज्यांनी सत्रे पाहिली आहेत त्यांनी त्यानुसार स्वतःच्या नोट्स तयार करून मुलाखतीची तयारी करावी.
Session मधील कोणताही मुद्दा समजला नाही किंवा एखादा डाऊट क्लिअर झाला नसेल, तर मला WhatsApp वर मेसेज करा. तुम्हाला नक्की रिप्लाय केला जाईल.
अत्यावश्यक काम असल्यास कॉल देखील करू शकता.
आपली तयारी योग्य दिशेने आणि आत्मविश्वासाने करा. शुभेच्छा! 💐
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/115
"मी स्वतःला नागरिकांच्या अपेक्षा आणि त्यांच्या संघर्षांशी जोडून घेतलं आहे."
— Tukaram Mundhe ❣️
📢 महत्त्वाची सूचना
संध्याकाळी ६:०० वाजता आरोग्य भरती, AIIMS CRE, UPSC Drug Inspector तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असा Pharmacy Act या विषयावरील विशेष व्हिडिओ Maharashtra Pharmacy YouTube चॅनेलवर अपलोड करण्यात येणार आहे.
हा विषय फार्मसीच्या जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ नक्की पाहावा.
👉 Follow & Subscribe:
https://youtube.com/@maharashtrapharmacy?si=3w_iD6H6mY1H09B1
प्रिय मित्रांनो,
जे विद्यार्थी मला WhatsApp वर मेसेज करत आहेत किंवा कॉल करत आहेत, त्या सर्वांना नक्कीच रिप्लाय केला जाईल.
आपल्या ग्रुपमधील माझ्याशी संबंधित जवळपास 506 विद्यार्थ्यांपैकी सुमारे 400 विद्यार्थी अंतिम यादीत मुलाखतीस पात्र ठरले आहेत. त्यामुळे प्रत्येकाशी संपर्क साधण्यासाठी आणि सर्वांना योग्य मार्गदर्शन देण्यासाठी थोडा वेळ लागत आहे.
मी एकटाच सर्वांचे मेसेज, कॉल आणि मार्गदर्शन सांभाळत असल्याने कृपया थोडे समजून घ्या आणि संयम ठेवा. प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तर दिले जाईल. भले त्यासाठी मला रात्रीचे ३ वाजले तरी चालतील.
तुम्हाला नियुक्ती (Joining) मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत आहे आणि शक्य ते सर्व मार्गदर्शन करत राहीन.
धन्यवाद
आदित्य वगरे
📢 MPSC Drug Inspector मुलाखत मार्गदर्शन सत्र
आज रात्री ९:०० वाजता मुलाखतीतील महत्त्वाच्या बाबींवर विशेष मार्गदर्शन.
✔️ कसे बसावे?
✔️ कोणते कपडे घालावेत?
✔️ कसे बोलावे?
✔️ बॉडी लँग्वेज व आत्मविश्वास
✔️ प्रवेश व बाहेर पडताना घ्यावयाची काळजी
🎯 मार्गदर्शक: मा. प्रदीप शिंदे सर (MPSC राज्यसेवा – ३ वेळा निवड)
🕘 वेळ: आज रात्री ९:०० वाजता
Maharashtra Pharmacy Forum 📞 9923804473
मुलाखतीसाठी पात्र सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे. 👍
📢 सूचना
देविदास नरोटे सर सध्या प्रवासात असल्यामुळे आता होणारे सेशन रात्री 9:00 वाजता आयोजित करण्यात येत आहे.
सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे. सरांचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी असल्याने हे सेशन नक्की अटेंड करावे.
धन्यवाद. 🙏
📢 MPSC DRUG INSPECTOR INTERVIEW GUIDANCE
आतापर्यंत झालेले सर्व मार्गदर्शन सत्रे (Sessions) आता महाराष्ट्र फार्मसी ॲप मध्ये विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
🎯 खालील फोल्डरमध्ये सर्व सेशन्स पाहता येतील:
📚 ज्या विद्यार्थ्यांना लाईव्ह सेशन उपस्थित राहता आले नाही, त्यांनी महाराष्ट्र फार्मसी ॲपमधील संबंधित फोल्डरमधून सर्व रेकॉर्डेड सेशन्सचा लाभ घ्यावा.
https://maharashtrapharmacy.akamai.net.in/new-courses/115
🚀 MPSC Drug Inspector Interview Guidance
Maharashtra Pharmacy Forum – Mentor Panel
✅ पॅनलमध्ये अजून काही प्रतिष्ठित अधिकारी व मार्गदर्शकांची नावे समाविष्ट होत असून अंतिम यादी लवकरच जाहीर केली जाईल.
"Best Guidance from Maharashtra's Most Experienced Officers & Mentors"
मी मित्र-मैत्रिणी, वाढदिवस, कार्यक्रम आणि सोशल मीडिया यांचा काही काळ त्याग करू शकतो का?
स्पर्धा परीक्षा ही फक्त अभ्यासाची लढाई नसते; ती त्यागाची, संयमाची, मानसिक ताकदीची आणि स्वतःवर विश्वास ठेवण्याची लढाई असते.
आज जे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत त्यांनी हा त्याग केलेला आहे. अनेकांनी वर्षानुवर्षे सोशल मीडियापासून दूर राहून, मित्रांपासून दूर राहून, स्वतःच्या सुखाचा त्याग करून हा दिवस मिळवला आहे.
आज महाराष्ट्र फार्मसी परिवार टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि युट्युबच्या माध्यमातून 50 हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. हे माझं यश नाही. हा तुमचा विश्वास आहे.
जर मी काही चुकीचं करत असेन, तर मला नक्की सांगा. पण जर माझ्या एका शब्दामुळे, एका पोस्टमुळे किंवा एका मार्गदर्शनामुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल होत असेल, तर मी हे काम शेवटच्या श्वासापर्यंत करत राहीन.
कारण मला पदाचा आनंद नाही... मला पैशांचा आनंद नाही... मला प्रसिद्धीचाही आनंद नाही...
पण एखादा विद्यार्थी फोन करून "सर, माझं सिलेक्शन झालं" असं म्हणतो, त्या क्षणी मिळणारं समाधान जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठं असतं.
ज्यांची मुलाखतीसाठी निवड झाली आहे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. पण अजून अंतिम लक्ष्मणरेषा पार करायची आहे. आत्मविश्वास ठेवा. आपण सर्वजण एकत्र आहोत. आयोगाचे सदस्य, राज्यात प्रथम आलेले अधिकारी, IPS अधिकारी, FDA Commissioner आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन तुम्हाला पुढेही मिळत राहील.
आणि ज्यांचे यावेळी यश आले नाही...
कृपया स्वतःला अपयशी समजू नका.
एक निकाल तुमची किंमत ठरवत नाही. एक परीक्षा तुमचं भविष्य ठरवत नाही. एक अपयश तुमची क्षमता कमी करत नाही.
पुन्हा उभे राहा. पुन्हा लढा. पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवा.
कारण मी आजपर्यंत एक गोष्ट पाहिली आहे —
जे विद्यार्थी हार मानत नाहीत, त्यांना यश एक दिवस नक्की शोधत येतं.
सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
जय महाराष्ट्र! 🚩
महाराष्ट्र फार्मसी परिवार ❤️
आदित्य वगरे
मित्रांनो,
आज दिवसभरापासून अनेक विद्यार्थ्यांचे फोन, मेसेज, अभिनंदनाचे संदेश आणि काही ठिकाणी भावनिक प्रतिक्रिया बघत आहे. बऱ्यापैकी निम्म्या विद्यार्थ्यांना मी वैयक्तिक रिप्लाय करून झालो आहे. काही विद्यार्थ्यांना प्रायव्हेट इंटरव्ह्यू ग्रुपच्या लिंक पाठवल्या आहेत. अजूनही अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज बाकी आहेत, पण प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
आज जेव्हा MPSC Drug Inspector मुलाखतीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पाहिली, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर मागील तीन-चार वर्षांचा संपूर्ण प्रवास उभा राहिला. अनेक अशी नावे त्या यादीत दिसली ज्यांच्याशी माझा अनेक वर्षांपासून संपर्क आहे. अनेक जण रात्री दोन-दोन वाजेपर्यंत अभ्यासाबद्दल चर्चा करणारे, निराश झाल्यावर फोन करणारे, निकाल लागला नाही म्हणून रडणारे, पुन्हा नव्याने उभे राहणारे विद्यार्थी आज त्या यादीत दिसत होते.
आज जवळपास 506 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत. त्यापैकी 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी वैयक्तिक ओळखतो किंवा त्यांच्याशी माझा थेट संपर्क राहिला आहे. खरं सांगायचं झालं तर आज मला एक वेगळंच समाधान मिळालं आहे. कारण आज मला शंभर टक्के खात्री झाली की महाराष्ट्र फार्मसीच्या माध्यमातून आपण जे काही मार्गदर्शन करत आलो आहोत, ते योग्य दिशेने आहे.
मित्रांनो, आज मला अंतिम निकालाचीही फारशी गरज वाटत नाही. कारण मुलाखतीच्या यादीत आलेली ही मुलं म्हणजेच आपल्या मेहनतीचा, आपल्या विश्वासाचा आणि आपल्या एकत्रित प्रवासाचा पुरावा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की अंतिम निकालामध्येही महाराष्ट्र फार्मसीच्या परिवारातील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी असतील.
आज मी एक गोष्ट अभिमानाने सांगू शकतो की माझ्या टेलिग्रामच्या प्रायव्हेट इंटरव्ह्यू ग्रुपमध्ये जवळपास 300 विद्यार्थी आधीच सहभागी झाले आहेत. अजून अनेक विद्यार्थी जॉईन होतील. पण एका भरतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आपल्या परिवारातून मुलाखतीपर्यंत पोहोचतात, ही गोष्ट माझ्यासाठी कोणत्याही पदापेक्षा आणि कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठी आहे.
अनेक जण मला विचारतात, "सर, तुम्ही एवढं का करता?" त्याचं उत्तर खूप साधं आहे.
कारण मी स्वतः या प्रवासातून गेलो आहे.
स्पर्धा परीक्षांमध्ये होणारी घुसमट, अपयशाची वेदना, आर्थिक अडचणी, घरच्यांच्या अपेक्षा, मित्र पुढे निघून गेल्याची भावना, अभ्यास करूनही निकाल न लागल्याचं दुःख — हे सगळं मी स्वतः अनुभवलं आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात ज्या चुका झाल्या, त्या माझ्या बांधवांच्या आयुष्यात होऊ नयेत म्हणून मी हे काम करतो.
कधीकधी लोकांना वाटतं की महाराष्ट्र फार्मसी म्हणजे फक्त एक टेलिग्राम चॅनल, एक व्हॉट्सअॅप ग्रुप किंवा एक युट्युब चॅनल आहे. पण माझ्यासाठी महाराष्ट्र फार्मसी म्हणजे हजारो विद्यार्थ्यांची स्वप्नं आहेत. कोणाच्या आई-वडिलांच्या कष्टांची कमाई आहे. कोणाच्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आहे. कोणाच्या घराचं कर्ज आहे. कोणाचं संपूर्ण आयुष्य या निकालावर अवलंबून आहे.
म्हणूनच मित्रांनो, मी जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन बघतो, तेव्हा मला फक्त एक विद्यार्थी सिलेक्ट झाला असं वाटत नाही. मला त्याचं संपूर्ण कुटुंब जिंकल्यासारखं वाटतं.
ज्या विद्यार्थ्यांचे यावेळी यश आले नाही, त्यांच्याबद्दलही मला तितकाच आदर आहे. कारण मी त्यांची मेहनत जवळून पाहिली आहे. अनेक विद्यार्थी अत्यंत हुशार होते. अनेकांनी प्रचंड अभ्यास केला होता. पण कधीकधी शेवटच्या एका महिन्यातील चुका, Revision चा अभाव, Test Series योग्य प्रकारे न देणे, Time Management मध्ये झालेली चूक किंवा अभ्यासामध्ये सातत्य न राखणे याचा परिणाम परीक्षेच्या दिवशी दिसून येतो.
याचा अर्थ असा अजिबात नाही की ही मुलं कमी पात्र आहेत. उलट माझ्या मते ही मुलं निकालाच्या बाहेर नाहीत, तर स्वतःच्या काही चुका आणि नियोजनातील त्रुटींमुळे थोडी मागे राहिली आहेत. क्षमता आजही त्यांच्यात आहे.
मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा...
यशस्वी विद्यार्थी आणि अपयशी विद्यार्थी यांच्यामध्ये बुद्धिमत्तेचा फरक नसतो; सातत्याचा आणि शिस्तीचा फरक असतो.
मी अनेक विद्यार्थ्यांना वारंवार सांगत होतो — नियमित Revision करा. Test Series द्या. Planning Follow करा. सोशल मीडिया कमी करा. वेळेचा आदर करा.
काहींनी हे मनापासून पाळलं आणि आज ते मुलाखतीपर्यंत पोहोचले. काहींनी थोडं दुर्लक्ष केलं आणि काही गुणांनी मागे राहिले.
आज जर तुम्ही खरंच स्वतःचं विश्लेषण केलं तर तुम्हाला तुमच्या यशाचं किंवा अपयशाचं खरं कारण नक्की सापडेल.
ज्या विद्यार्थ्यांचे यावेळी यश आले नाही, त्यांनी स्वतःला काही प्रश्न विचारावेत —
मी खरंच रोज सातत्याने अभ्यास करू शकतो का?
मी मोबाईल बाजूला ठेवून काही तास एकाग्रतेने बसू शकतो का?
माझी आर्थिक परिस्थिती कठीण असेल तर नोकरी करत अभ्यास करू शकतो का?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
