𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]
الذهاب إلى القناة على Telegram
आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G
إظهار المزيد3 820
المشتركون
-324 ساعات
-27 أيام
+1730 أيام
أرشيف المشاركات
बगाड यात्रा म्हणलं कीं सर्वप्रथम लोकांच्या डोळ्यासमोर येते ती सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात एक आगळा वेगळा नावलौकिक असलेली बावधन गावं आणि यां गावची समस्त देशभर सुप्रसिद्ध असलेली आणि डोळ्याचं पारण फेडून सगळ्यांच्या आनंदीत करणारी गावचे आराध्य दैवत असलेल्या श्री काळभैरवनाथ आणि आई जोगेश्वरी यांची बगाड यात्रा.
सांस्कृतिक आणि धार्मिक प्रथेचा वारसा जपलेली अशी ही यात्रा.
नाथांचा हा रथ म्हणजे पौराणिक विज्ञान आणि सांस्कृतिक कलेचा उत्तम नमुनाच..
प्रामुख्याने सर्वात चिवट म्हणून ओळख असलेल्या बाभळीच्या लाकडापासून बनवलेला हा लाकडी रथ.. आणि आळदांडीसाठी वापर म्हणून फक्त चंदन हा वृक्ष.
दगडी चाके,कणा, बुट, वाघ,खांब,बाहुली आणि लाकडी शिड अशी यां रथाची प्रामुख्य साहित्ये..
सर्वसाधारण ३ तें ४ टन वजन असलेला हा लाकडी रथ ओढण्यासाठी असतात ती खिल्लार गोवंशाची हत्तीच्या ताकतीलाही लाजवतील अशी बलाढ्य आणि रगील नंदी...
रथ ओढण्यासाठी रथांला १२ बैलांचा वापर केला जातो.
यामध्ये उजव्या बाजूला भोसले तरफ आणि डाव्या बाजूला पिसाळ तरफ..
यां दोन्ही तर्फेची माणसं आपली बैलं जुपत असतात.
यां बैलांचा सहा जोड्या क्रमवारे बारा बैली, दहा बैली, आठ बैली, सहा बैली, चावरी आणि धुरवी येते जुपली जातात.
यां बारा बैलांमधील प्रामुख्याने धुरवी आणि चावरी इथली चार बैलांची जोडी अफाट ताकतीची,मोठ्या दमाची,कसलेली आणि मजबूत शरीरायष्टी असलेली बैलं इथं वापरली जातात.
धुरवी म्हणजे रथामधील सर्वात मंहत्वाचा हिस्सा.
बाकीच्या ५ शिवाळा आणि एक धुरवी.
रथामध्ये धुरवी सर्वात महत्वाचा भाग असतो कारण हा रथ हलण्यासाठी सर्वात जास्तीच कष्ट आणि श्रेय असते तें इथल्या जुपलेल्या बैलांचं...
धुरवी चीं बैलं ही आरुसा आणि जुपणी याच्या साहाय्याने यां जोट्याला जुपली जातात.
संपूर्ण गाड्याच ओझं खांद्यावर झेलून आपली ताकत पणाला लावून गाडा हलवत आपल बलशाली सामर्थ्य सिद्ध करत इथली बैलं स्वतःच्या मालकाच्या विश्वासावर खरं उतरत आपल काम उत्कृष्टरित्या पार पाडत असतात.
परंतु इथं अजून एक प्रश्न आपणाला पडतो तो म्हणजे अशा यां हत्तीच्या ताकतीच्या बैलांना यां धुरवी मध्ये धरतं कोण धरतं असेल..???
तर इथं यां बैलांना धरणारी मंडळी म्हणजे खणसेकरी होय.
गावातील युवक तसेच जुनीजाणती अनुभवी आणि प्रौढत्व वर्ग यां ठिकाणी उपस्थित असतो व तो इथली जबाबदारी पार पाडत असतो...
खणसा म्हणजे मर्दानी, रांगड्या चिवट,अत्यंत निर्भीड अशा भक्तांना स्वतः च्या अंतर्मनातील धगधगत्या रक्ताला आणि समर्थ्याला सिद्ध करण्याची जागा म्हणजे खणसा...🔥
काशिनाथाचे चांगभलं चां गजर होताच समस्त भक्तगण आणि नंदी याच्या रक्ताला उसळत्यां लाव्ह्याप्रमाणे सळसळून सोडणारा एक ऊर्जाप्रवाह आणि बैलांचा यां ताकतीचा (ऊर्जेचा )कुशलरित्या गाडा हलवण्याच्या कामी सावधरित्या वापर करून घेण्याचा खेळ म्हणजे खणसा..🔥
मालकांच्या चरणांचा गुलाल कपाळी लावल्यावर शरीरातील अंतर्मणातून उठणारा उन्माद प्रचंड आव्हान पेलण्याची आभाळाएवढी ताकत देऊन जातो.जणू दहा-दहा हत्तींची ताकत एकाच नंदीमध्ये अवतरली काय अशा वाटणाऱ्या नाथसाहेबांच्या बैलांना रथाच्या जोट्याला धुरवीत झुंपल्यावर त्या ताकतीच्या वाऱ्याबरोबर झुंज देत स्वतःला खणसा आणि आरुसा यां बरोबर सावध खेळ करत स्वतः मधील गरम रक्ताची रग आणि धमक आझमावने म्हणजे खणसा...🔥
बैल झुंपल्यानंतर जेव्हा त्याच्या दोन्ही शिंगामध्ये असणाऱ्या जुपनीवर आपल्या हातांची घट्ट पकड देऊन टांगता असलेला मर्दानी राकट मिश्या तसेच डोळ्यात जरब डोक्यावर थोडी तिरकी खादी टोपी, आणि जेवढी खुमखुमी गरम झालेल्या बैलाला वाजत असणाऱ्या डफड्याच्या निनादावर रथाला टचका देत ओढण्याची असते तेवढीच गरम रक्ताची खुमखुमी आणि जिवाची किंचितही पर्वा नसणाऱ्या त्या देवदेहवेड्या भक्ताच्यात
पहावयास मिळते....🔱
सृष्टीवर अवतरलेल्या यां देहाला आणि यां नाथभक्तांना कोणता ना कोणता तरी सात्विक नाद पाहिजे...🚩🙇🏻♂️
II काशिनाथाचे चांगभले II 🚩
लेखक :-शुभम कदम (फौजी )
अनिकेत कदम (फौजी )
Cross promotion 5k @Policesir
क्या आप Statics Gk पढ़ना चाहते हैं?
शिकवण आईची.....
ज्यांच्याकडे आई नाही
त्यांच्या जीवनात काही नाही !!
आईच तर सांगते जगाची चाहूल
शिकवते समाजात टाकायला पहिलं पाऊल !! आईच तर शिकवते रूढी-परंपरा, संस्कार
तीच तर देते जिवणांना आकार !!
आईच तर सांगते उन-वारा,
पाऊस-गारा, सुख-दुःख आसवांच्या धारा !!
तीच तर शिकवते खाण-पाण इञ्जत,
मर्यादा, मान, सन्मान !!
आईच शिकवते जगण्याचा अर्थ या जगाचा स्वार्थ या जीवनाचा भावार्थ !!
ज्यांना आई असूनही किंमत नाही
तो मनुष्य अर्धघडी राही !!
ज्यांच्याकडे आई नाही
त्यांच्या जीवनात काही नाही !!
भ. रा. गडदे
✍०३/०७/२०२१
मान्य करतो, मला व्यक्त होता आले नाही, परंतु स्पष्ट मांडले होते मी कवितेत भाव माझे ..... साधे सरळ अगदी सोपे होते बघ, गणितासारखे अवघड नव्हते काही प्रेम माझे... असो.
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
सर्वात जास्त जन्माला येणारी ,
आणि...
मृत्यू पावणारी गोष्ट म्हणजे "विश्वास" !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
मन के जीते जीत है, मन के हारे हार, हार गए जो बिन लढ़े, उन पर हे धिक्कार।
उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनो का अधिकार, असल अधिकार है अपना ।
अपनो के खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें।
तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं।
तू घोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, यह अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है !
छत्रपती संभाजी महाराज की जय⛳️
प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरुन त्यांची पात्रता कळते तुमची नाही...✌️✌️
Cross promotion 5k @Policesir
क्या आप Statics Gk पढ़ना चाहते हैं?
कधी कधी प्रेम बोलत नाही, ते फक्त मनात खोलवर साठून राहतं; शब्दांविना, अपेक्षांविना. कोणीतरी आपल्यासाठी आयुष्यभर तसंच उभं राहतं, न बोलता, न मागता, न तक्रार करता आणि तेव्हा कळतं, वचनं दिली जात नाहीत, ती फक्त निभावली जातात.
