ar
Feedback
𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

𝐈𝐧_𝐏𝐫𝐨𝐜𝐞𝐬𝐬𝟒𝟏𝟐 [ शोध स्वतः चा.. 😊 ]

الذهاب إلى القناة على Telegram

आयुष्यात एकटं पडलेल्या लोकांसाठी, नवीन काहीतरी करून दाखवणाऱ्या जिद्दी लोकांसाठी त्यांचं हक्काचं व्यासपीठ.... ✍ तुमचे विचार एखाद्या व्यक्तीला प्रेरीत करुन एक चांगला व्यक्ती बनवु शकतात.. ☺️🙏🏻 ☑Channel by- @AmolMoreAm 🌱Join @In_Process412G

إظهار المزيد
3 825
المشتركون
+524 ساعات
+47 أيام
+1730 أيام
أرشيف المشاركات
KHAN SIR KA OFFICIAL ❌❌❌❌ CHANNEL SE जुड़े

Cross promotion।।।@Policesir ✅✅ 2011 के अनुसार भारत की सबसे बड़ी जनजाति कौनसी है

तुला असतील पसंत माझं तुला सांभाळणं तुला मनवनं तुझ्या शांत असण्यामागचं कारण शोधणं पण सखे त्यालाही मर्यादा असतात मला ही वाटतं तू ही मला सांभाळून घ्यावं माझ्या इच्छा आकांक्षा समजून घ्यावं माझ्या हसण्यामागचं दुःख ओळखावं सखे मला ही वाटतं कुणीतरी मला समजून घ्यावं ✍️आशु

तुझं मला हसताना पाहणं आणि माझंच बोलणं ऐकण मला चिडवण माझ्या रागाला सांभाळणं मी रुसल्या वर तुझं ते मनवण माझं शांत असण्याच कारण शोधण पसंत आहे मला सख्या रे तुझी प्रत्येक अदा... पसंत आहे मला...!! Puja

भूतकाळ कसाही असु द्या भविष्यकाळ आपल्या हातात आहे,आपण फक्त लढायचं आणि घडायचं..! @rutuja_writes1203
भूतकाळ कसाही असु द्या भविष्यकाळ आपल्या हातात आहे,आपण फक्त लढायचं आणि घडायचं..! @rutuja_writes1203

Cross promotion।।।@Policesir ✅✅ 2011 के अनुसार भारत की सबसे बड़ी जनजाति कौनसी है

खरंच असं प्रेम हल्ली बघायला मिळत नाही परंतु तुम्हाल खरंच वाटत असेल की प्रेम नाही या जगात तर नक्कीच अशा लोकांना भेटा. ते सांगतील तुम्हाला प्रेम म्हणजे काय? तुमचाच लाडका लेखक आशु छाया प्रमोद (रावण)

अशाच एका संध्याकाळी! काल ऑफिस ला सुट्टी असल्यामुळे दिवसभर घरात राहून मला फार कंटाळा आल्यासारखा वाटला त्यामुळे जरा पाय मोकळे करावे म्हणून मी जवळच्याच एका बागेत फिरायला गेलो. सूर्य मावळतीला गेला होता आणि पक्षीही आपल्या घरट्याकडे यायला लागली होती. हे सगळं चित्र बघतांना माझं मन अगदी प्रसन्न झालं. तेवढ्यात माझी नजर बागेतल्याच एका बाकाकडे गेली जिथे जवळपास साठीतले एक गृहस्थ त्या मावळत्या सूर्याकडे टक लावून बघत होते जणू त्या मावळत्या सूर्यामध्ये ते कुणालातरी शोधत असावे म्हणून मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना हळूच हाक दिली परंतु ते त्या सूर्याकडे बघण्यात एवढे गुंग होते की त्यांना माझ्या येण्याची चाहूल सुद्धा लागलेली नसावी म्हणून मी सुद्धा त्या सूर्याकडे बघत त्यांना म्हणालो, “एवढं काय शोधताय त्या मावळतीच्या सूर्याकडे की तुम्हाला जगाचा भान च राहिलेला नाही.” तेवढ्यात ते माझ्याकडे बघत म्हणाले, “या मावळत्या सूर्याकडे बघितलं की, मला माझी बायको आठवते बाळा! म्हणून मी रोज संध्याकाळी या मावळतीच्या सूर्याकडे बघत राहतो.” माफ करा काका मला माहिती न्हवतं असं म्हणत मी परत त्यांना म्हणालो, “तुमची मुले काय करतात?” यावर ते हसतच म्हणाले, “त्यासाठी लग्न करावं लागतं बाळा!” मी आश्चर्यचकित होऊन त्यांना विचारलो, “अहो मग काका तुमची बायको!” अरे बाळा! ते माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम होती म्हणून मी तिलाच बायको मानून आजही लग्न केलं नाही” ते म्हणाले. “एवढं प्रेम होतं तर मग लग्न का नाही केलं तुम्ही?” या प्रश्नावर ते गप्प च राहिले. मी परत त्यांना विचारलो त्यावर ते सांगू लागले. “मी(काका) आणि माझी प्रेयसी निशा(काकांची मानलेली बायको) एकमेकांवर अपार प्रेम करायचो आणि लग्न शुद्ध करायचा विचार केलो होतो परंतु मला किंवा तिलाही पळून जाऊन लग्न करायचं न्हवतं तर दोन्ही परिवाराच्या सहमतीने लग्न करायचं होतं म्हणून मी तिच्या आई वडिलांकडे तिचा हात मागायला गेलो परंतु तिच्या आई वडिलांनी मला स्पष्ट शब्दात नकार दिला कारण मी सरकारी नोकरी वर होतो परंतु माझी आणि तिची कास्ट वेगळी पडली आणि आम्हाला इथेच वेगळं व्हावं लागलं. मी हा धक्का तर सहन करू शकलो परंतु निशा हा धक्का सहन करू शकली नाही आणि तिने अशाच एका संध्याकाळी घरीच गळफास घेऊन आत्महत्या केलं आणि मावळतीच्या सूर्यासोबत गेली ती कायमचीच! दुसऱ्या सकाळी सूर्य तर परत आला मात्र मी वाट बघून ही ती परत आली नाही. त्यामुळे मी आजही तिची वाट बघतो आणि मावळतीच्या सूर्यामध्ये तिला शोधत राहतो या आशेने की ती येईल कधीतरी परत!” काकांची ही स्टोरी ऐकून मी निःशब्द झालो. थोडा वेळ आम्ही दोघेही गप्पं च राहिलो आणि आमच्या दोघांत भयाण शांतता पसरली. या शांततेला खंडण पाडत मीच त्यांना पुन्हा विचारलो, “मग तुम्ही लग्न करायचं ठरवलं नाही.” यावर ते म्हणाले, “बाळा माझ्या आई वडिलांनी खूप कष्टाने मला शिकवलं आणि लहानाचं मोठं करून मला माझ्या पायावर उभं केलं त्यामुळे मी दुसऱ्या कुठल्या अनोळखी मुलीवर विश्वास ठेवून माझ्या आई वडिलांना नाही सोपवू शकत होतो कारण मला कायम भीती वाटायची की, दुसरी मुलगी माझ्यासोबत लग्न करून येईल तर माझ्या आई वडिलांचा सांभाळ करू शकणार नाही म्हणून मी कधी लग्न च केलं नाही.” ते पुढे बोलू लागले, “नंतर आई वडिल सुद्धा साथ सोडून गेले शेवटी आणि मग मी लग्न करायचं ठरवलं खरं परंतु पुन्हा मला निशा ची आठवण झाली. तिने माझ्यासाठी आत्महत्या केली होती आणि तिला विसरून दुसरं लग्न करणं मला तरी योग्य वाटलं नाही म्हणून मी कधी लग्न च केलं नाही.” हे बोलत असतांना त्यांच्या डोळ्यांमधून ओघळणारे अश्रू साक्ष देत राहिले त्यांच्या खऱ्या प्रेमाची पण खरं पाहिलं तर खऱ्या प्रेमाला साक्ष ची गरज पडत नाही हे मला कळलं होतं. “खरं तर तुमच्या प्रेमाला माझा सलाम आहे काका, परंतु हल्ली असं प्रेम बघायला मिळत नाही आणि अशी स्टोरी कुणाला सांगितली तरी देखील कुणाला विश्वास बसणार नाही” असं म्हणत मी त्यांना परत विचारलो, “काका, खरच असं प्रेम आजही असते का हो?” ते मला समजावत म्हणाले, “प्रेम आहे रे भरपूर आहे पण हल्ली त्या प्रेमाला बदनाम करून ठेवलंय केवळ काही क्षणाच्या शरीरसुखासाठी आणि म्हणूनच हल्ली प्रेमाला लफडी असं दिलं गेलं आहे.” बोलता बोलता कसा वेळ निघून गेला कळलंच नाही आणि संध्याकाळची आता रात्र व्हायला लागली होती. “चल मी निघतो आता रात्र झाली तू पण निघून जा असं म्हणत ते तिथून निघाले आणि मी ही घरी जायला निघालो. त्या काकांची ही लव्ह स्टोरी ऐकून माझे डोळे खुलले कारण मी आधी विचार करत होतो की, प्रेमाला लफडी नाव दिलं गेलं म्हणून प्रेम बदनाम झाला परंतु आम्ही च तरुणांनी काही क्षणाच्या शरीर सुखासाठी प्रेमाला बदनाम केलं आहे. खरंच धन्य आहे त्या काकांचे ते प्रेम आणि किती भाग्यवान असेल ती निशा ही की तिला असा प्रेम करणारा मिळाला.

ये ऐक ना सखे तुझ हसणं तुझ बोलणं तुझं चिडणं तुझं ते रागावणं तुझं ते रुसण तुझ ते शांत बसणं मला पसंत आहे कस काय सांगू शब्दात सखे
ये ऐक ना सखे तुझ हसणं तुझ बोलणं तुझं चिडणं तुझं ते रागावणं तुझं ते रुसण तुझ ते शांत बसणं मला पसंत आहे कस काय सांगू शब्दात सखे तुला की तुझी प्रत्येक अदा मला सखे पसंत आहे 🥰🫂😘🫂🥰 ✍🏻विनायक भिसे, बारामती Mo.7798150143