MPSC Value Addition by Sohel Shaikh
الذهاب إلى القناة على Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
إظهار المزيد4 658
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-137 أيام
-7730 أيام
أرشيف المشاركات
💢👉💢Pradhan Mantri Ujjwala Yojana was launched by Prime Minister Narendra Modi on the 1st of May in 2016 at Ballia in Uttar Pradesh.
To celebrate the achievements of the scheme, Ministry of Petroleum and Natural Gas has decided to celebrate 1st of May as 'Ujjwala Diwas' this year.
🔥Join : @MPSC_Value_Addition
✍️ प्रदीप दुबल..
# प्रमोद चौगुले.. #१ #६१२
आमच्या 'नवोदय'मध्ये 12वीला असताना दोन मुलांच्यात असंच बोलणं चाललेलं, "आपण ही शाळा सोडून गेल्यावर आपल्याला इथल्या लोकांनी लक्षात ठेवायला हवं यार..!"
मग यावर त्यांच्यात चर्चा झाली, की काय बरं करता येईल, की शाळेत आपलं नाव कायम टिकून राहील..??
यावर दुसरा म्हणाला, "आपण जर बारावीत पहिला क्रमांक पटकावला, तर आपलं नाव इथल्या Achievement Board वर कायमचं लिहिलं जाईल. दरवर्षी 12वीच्या टॉपरचं नाव त्या बोर्डावर लिहितात."
मग दोघांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले. दोघे हुशार तर होतेच.
प्रयत्नांची साथ मिळाली, आणि दोघेही अगदी सारख्या मार्कांनी बारावी पास झाले, आणि आमच्या शाळेत पाहिले आले. त्यांचं नाव शाळेत कायमचं कोरलं गेलं. ते दोघे म्हणजे अविनाश पाटील (Avinash Patil) आणि प्रमोद चौगुले. दोघेही नंतर इंजिनिअरिंगला गेले, आपल्याला क्षेत्रात खूप मोठे झाले. त्यातील 'प्रमोद चौगुले'चं नाव आज पूर्ण महाराष्ट्रात गाजतंय.
या प्रमोदबद्दल धैर्याच्या, चिकाटीच्या, जिद्दीच्या अनेक गोष्टी सांगता येतील. आणि अशा अनेक गोष्टी तो सदैव रचत असतो. अशीच एक जिद्दीची गोष्ट त्याने नुकतीच रचलीये. नव्हे, एक इतिहासच रचलाय.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रमोद राज्यात पहिला आलाय. गेल्या बारा वर्षात MPSC परीक्षेत कधीही कुणाला मिळाले नव्हते इतके सगळ्यात जास्त मार्क्स मिळवून त्याने राज्यात अव्वल स्थान पटकावलंय. एक खडतर प्रवास एका सुंदर, सोनेरी यशासह संपुष्टात आलाय.
त्याचा मेहुणा 'प्रसाद चौगुले' मागच्या वेळी राज्यात पहिला आलेला. प्रमोदची यशाची पात्रता त्यावेळीही होती. पण यशस्वी लोकांना पार पिळून काढत नसेल, तर ती MPSC कसली..? त्यावेळी प्रमोदचं नाव यादीतसुद्धा नव्हतं. गुणवत्ता यादीत कुठे का असेना, प्रमोदचं नाव असायलाच हवं होतं. मला त्यावेळी प्रमोदच्या पत्नीची अवस्था कशी असेल, हे जाणवतंय. आपला भाऊ राज्यात पहिला आलाय, याचा आनंद साजरा करावा, की पतीचं यादीत नाव आलं नाही, त्याचं शल्य पचवावं, हे तिला त्यावेळी नक्कीच कळत नसेल. आई-वडील कित्येक वर्षे त्याच्या यशाकडे डोळे लावून बसले होते. आपला पोरगा दहावी, बारावी, इंजिनिअरिंग, सगळीकडे चांगल्या मार्कांनी पास होतो, आणि UPSC/MPSCच्याच परीक्षेत कुठं घोडं अडतंय, हे त्यांनाही कळत नसेल. आम्हालाही कळत नव्हतं.
मी प्रमोदला शाळेपासून ओळखतो. स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा सोबतच केलेली. कुणा-एखाद्याचा अभ्यासच नसेल, तर त्याच्या अपयशाबद्दल काही वाटत नाही. इथे प्रमोदची तयारी कशातच कमी नव्हती. पण दरवेळी त्याचा निकाल हुलकावणी द्यायचा. तरीही इतक्या वर्षात त्याच्या तोंडून नकारात्मक, निराशावादी, हताश असं एकही वाक्य मी त्याच्या तोंडून ऐकलेलं नाही. त्याने कधीच त्याच्या कोणत्याच निकालाचं दुःख करून घेतलं नाही. सदैव आयुष्याबद्दल प्रचंड आशावादी आणि सकारात्मक असणाऱ्या लोकांना मी खूप कमी पाहिलंय. प्रमोद हा त्या दुर्मिळ लोकांपैकी आहे. जसं नकारात्मक निकालाचं शल्य तो सहजपणे पचवायचा, तसंच तो यशदेखील सहजपणे हँडल करेल, अजिबात हुरळून जाणार नाही याची मला खात्री आहे.
त्याच्या यशाला खरंतर एवढी वर्षे लागायला नको होती. या यशावर त्याचा हक्क बऱ्याच वर्षांपूर्वीच होता. अजून एक दुर्दैवी गोष्ट म्हणजे यावर्षी या परीक्षेतून 'उपजिल्हाधिकारी' किंवा 'पोलीस-उपअधीक्षक' यापैकी एकही पोस्ट भरली जाणार नाहीये, राज्यात पाहिलं आलं तरी. त्यामुळे प्रमोदला कदाचित परत परीक्षा देऊन या पदांसाठी प्रयत्न करावा लागेल. (आणि त्याने तो तितक्याच जिद्दीने करावा.) परंतु आज ते सगळं मागे पडलंय. आजचं सत्य इतकंच आहे, की प्रमोद राज्यात पहिला आलाय. तेही विक्रमी मार्कांनी पास होऊन, अगदी दिमाखात.
आज त्याच्या आई-वडिलांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं असेल, त्याच्या पत्नीचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल, आणि भावाची कॉलर ताठ झाली असेल. त्याच्या पोरीला कदाचित फारसं कळणार नाही, की आपल्या पप्पांचं इतकं कौतुक का होतंय, पण आपल्या पप्पांनी खूप काहीतरी चांगलं काम केलंय, एवढं तरी तिच्या बालमनाला नक्की जाणवेल, आणि तिचा पप्पा कायमसाठी तिचा हिरो बनून जाईल.
इथून पुढं प्रमोदचं आयुष्य वेगळं असणार आहे. त्याच्याशी बोलताना लोकांचा लहेजा बदलेल, त्याच्या बोलण्याला आता आपोआपच महत्त्व प्राप्त होईल, त्याच्या कुटुंबातील सदस्यांनादेखील हे जाणवेल, की ह्या एका निकालाने त्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवलाय. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या नवीन तरुणांचा तो प्रेरणास्रोत राहणार आहे. पण मी खूप अगोदरपासून त्याच्याकडून बरंच शिकत आलोय. माझ्यासाठी तो अगोदरपासून प्रेरणेचा स्रोत होता, आणि इथून पुढे देखील राहील. त्याच्या या उत्तुंग यशाला साजरं करण्यासाठी पुण्यात नसल्याचं थोडंसं दुःख आहेच, परंतु आनंदाचं कारण त्यापेक्षा कैक पटींनी मोठं आहे.
🛑⚠️👉महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१
🔰प्रश्नपत्रिका : 30 एप्रिल 2022
🔥Join: @MPSC_Value_Addition
#Inspirational
सर्व यशस्वी उमेदवारांबरोबरच 👉 वयाच्या 34 व्या वर्षी 👈😇 जिद्द न सोडता सतत मेहनत करणाऱ्या आणि #sse राज्यसेवा परीक्षेत 612.50 रेकॉर्डब्रेक गुण मिळवणाऱ्या - 🥇श्री. प्रमोद चौगुले व वयाच्या 36 व्या वर्षी गुणवत्ता यादीत तिसऱ्या आलेल्या🥉श्रीमती. रुपाली माने यांचे खूप खूप अभिनंदन..!!!💐💐🎉🎊✌️✌️
अभिनंदन प्रमोद चौगुले सर..💐
❣️दोन्हीही topper's एकत्रित.. प्रसाद चौगुले सर & प्रमोद चौगुले सर.. 🔥🔥👍
Repost from MPSC
जा.क्र.६०/२०२१ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० करिता दिनांक १८ एप्रिल ते २९ एप्रिल,२०२२ या कालावधीत घेण्यात मुलाखतीच्या आधारे परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी (General Merit List) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
🔥🔥प्रमोद चौगुले सरांनी वयाच्या 34 व्या❤️ वर्षी राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.
आणि रुपाली माने मॅडम वयाच्या 36 व्या वर्षी मुलींमध्ये राज्यात प्रथम आल्यात.
यशाला वयाची सीमा नसते.✌️✌️
------------------------------------
खास तुम्हा सर्वांच्या विनंतीवरून... 🥳🥳
👉 उद्या संगणक व माहिती तंत्रज्ञान (Computer & IT) या विषयाची एक fastrack रिव्हिजन घेऊ.
👉 येणाऱ्या सर्व परीक्षेत तुम्हाला याचा नक्की फायदा होईल याची मला खात्री आहे. (MPSC च्या सर्व परीक्षेसाठी उपयोगी)
🔰 वेळ- आज संध्याकाळी 7 वाजता... (29 एप्रिल रोजी)
🧿 1.5 तासात संपूर्ण संगणक विषयाची रिव्हिजन करून घेण्याची जबाबदारी माझी 🥳
🔰 लिंकवर जाऊन notify me च ऑप्शन सिलेक्ट करून enroll करा..
Enroll कोड- BAROLE10
🔰 लेक्चर लिंक:- https://unacademy.com/class/computer-it-fast-revision/JK6Q8YDF
परमहंस सभा
मिशन-यांचे आक्रमण एका बाजूने सुरू असताना नवशिक्षित मंडळींनी दर्पण, प्रभाकर यांसारखी वृत्तपत्रे, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, गुजराती व मराठी ज्ञानप्रसारक सभा यांसारखे उपक्रम सुरू करून लोकशिक्षणाचे कार्य आरंभिले. त्याचबरोबर समाजातील विचारी वर्ग रूढ धर्मातील दुष्ट व वेडगळ समजुतींमुळे समाजाचे कसे नुकसान होत आहे हे ध्यानात घेत होता. विशेषतः स्त्रियांवर होणारा अन्याय व जाती-जतींमधील उच्चनीच भाव, सोवळेपणा ह्यामुळे आपल्या समाजचे कसे नुकसान होत आहे हे ध्यानात घेत होता. हे व या प्रकाचे विचार विशेषतः दादोबा पांडुरंग तर्खडकर, राम बाळकृष्ण जयकर, डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, तुकाराम तात्या पडवळ, बाळा भाऊ शिंत्रे, लक्ष्मणशास्त्री हळबे, भिकोबा लक्ष्मण चव्हाण वगैरे त्या वेळच्या कर्तबगार गृहस्थांच्या मनात घोळत असत. ह्या सुमारास पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा व राम बाळकृष्णांच्या भेटीचा योग मुंबई शहरामध्ये आला. समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी, याबद्दलची ईश्वरचंद्राची तळमळ, त्यांची विद्वत्ता व सत्यनिष्ठा यांचा राम बाळकृष्णांच्या मनावर अत्यंत इष्ट परिणाम घडला. पंडित ईश्वरचंद्र हे महर्षी देवेन्द्रनाथांच्या तत्त्वबोधिनी सभेचे सभासद होते. पंडित ईश्वरचंद्र यांचे राम बाळकृष्ण आणि इतर मंडळींसमवेत ब्राह्मसमाजाविषयी बोलणे झाले असण्याची शक्यता आहे. कलकत्त्यातील ब्राह्मसमाजाप्रमाणे मोठी नसली तरी अल्प प्रमाणावर आपण येथे चळवळ सुरू करावी असा निश्चय करून ह्या मंडळींनी राम बाळकृष्णांसमवेत १८४० च्या सुमारास ‘परमहंस मंडळी’ नावाची संस्था स्थापन केली. प्रथमतः ही मंडळी गुप्त होती. प्रकटपणे समाजाला न रूचणा-या गोष्टींसंबंधी चळवळ करण्याला हा काळ अनुकूल नाही असे समजून परमहंस मंडळीचे काम गुप्त ठेवण्यात आले. मूर्तिपूजेचा निषेध, एकेश्वरी मताचा पुरस्कार व जातिभेदाचा उच्छेद हे परमहंस मंडळीचे मुख्य उद्देश होते. जातिभेद मोडल्याची साक्ष म्हणजे पावरोटी सर्वांसमक्ष खाणे. सभेस प्रारंभ होताना व अखेरीस देवाची प्रार्थना म्हणण्याचा प्रघात असे. दादोबा पांडुरंगांनी लिहिलेला हस्तलिखित स्वरूपातील ग्रंथ सभासदांना वाचावयास देत असत. कोणताही एक धर्म ईश्वरद्त्त नाही असे त्यामध्ये विवेचन केले होते. दादोबा पांडुरंग यांनी ‘पारमहंसिक ब्राम्ह्यधर्म’ नावाचे छोटे पद्यमय प्रकरण लिहिले होते व त्यामध्ये ईश्वरभक्ती व भूतद्या, भक्ष्याभक्ष्य विचार इत्यादी बाबींसंबंधी विवेचन केले होते. परमहंस मंडळींच्या शाखा मुंबईच्या बाहेर पुणे, अहमदनगर, सातारा, बेळगाव, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी निघाल्या व एकंदर सभासदसंख्या हजारापर्यंत गेली. परंतु कोणा एका नविन सभासदाने मंडळींचे दप्तर लांबविले. सभासदांची नावे प्रसिद्ध केली व सभेच्या हेतूचा विपर्यास करून टीका केली. ही सभासदमंडळी अमुक एक दिवशी ख्रिस्ती होणार अशी भुमका उठविली. याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये सभासदांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले. सभासदांची उपस्थिती रोडावली व हळूहळू परमहंस सभेचे काम बंद झाले.
-विठ्ठल रामजी शिंदे
(वरील लेख वि.रां.नी स्वतः लिहलेला आहे)
- उमेश कुदळे
🛑♦️👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 Hallticket उपलब्ध .
🔰 Downloading Link :- https://eformsmpsc.org.in/mpsconline/public/admitCardLogin
🔥Join : @MPSC_Value_Addition
Repost from MPSC टेस्ट सिरीज & PDF मटेरियल 2021-22
IP Sirs Success Academy
🛑STI मुख्य परीक्षा 🛑
⭕️अर्थव्यवस्था स्मार्ट टेस्ट सिरिज
📍ऑफलाईन आणि पोस्टल
टेस्ट सिरीज सुरवात
📝दिनांक - 1 मे 2022
🕖वेळ - सकाळी 10 वाजता
🔥एकूण 10 टेस्ट (प्रत्येकी 100 प्रश्नाचे)
📍ऑफलाईन फीस - 399/- रु..
(मर्यादित जागा) प्रथम येणाऱ्यास प्राधान्य )
✍️प्रवेशाची प्रक्रिया
Step 1- वरील QR CODE स्कॅन करून Phonpe/gpay अथवा इतर upi ने payment करावे.
Step 2- टेस्टला येताना payment चा स्क्रीनशॉट दाखवा आणि ऍडमिशन ची recipt घेऊन जावी.
पोस्टल फीस -799/-
(Payment स्क्रीनशॉट आणि पत्ता व्हाट्सअप नंबर -7276568803 यावर पाठवा आपल्याला 24 तासाचा आत confirmation देण्यात येईल)
📍वैशिष्ट्ये
🔷आयोगाचा पॅटर्ननुसार प्रश्नाची रचना...♦️प्रत्येक घटकनिहाय टेस्टचा समावेश...
🔷टेस्टचा वेळापत्रकामुळे आपल्या अभ्यासाला गती आणि कमी वेळेत तयारी..
♦️स्वतः IP सर आणि तज्ञाकडून प्रश्नांची रचना...
🔷कमी वेळेत सक्सेस मिळवून देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम स्मार्ट टेस्ट सिरीज
संपर्क -7276568803
✍️ऑफिसचा पत्ता -
IP Sirs success Academy,
तिसरा मजला, दहाड अकॅडेमीचा वर इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, पुणे l
Repost from Umeshhistory
https://unacademy.com/course/13-prbodhn-dhaarmik-sudhaarnnaa-clvlii-bhaag-1/YIL5IM0Q
आज पासून स्पेशल ला इतिहासाची सिरीज सुरू होत आहे ..
या सिरीज मधे आधुनिक भारत महाराष्ट्र इतिहास व्यवस्थित पूर्ण करुयात ..
कोणतेही शुल्क नाही ..
स्पेशल class असणार आहे..
विषय सोपा करुयात ..
Unlock code -umeshkudale
शक्य असेल तर इतरांना देखील सांगा 🙏
वेळ -४ वाजता
Repost from Umeshhistory
इतिहासाचा Basic to Advance असा अभ्यास करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आज पासून स्पेशल मधे लेक्चर सिरीज सुरू करत आहे..
"सिरीज संपूर्ण मोफत असणार आहे"
जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा अशी विनंती..
"अभ्यास करायला पैसे लागत नाहीत. मी सोबत आहे विषय सोपा करुयात.."
नक्की भेटू..
तुमचाच उमेश कुदळे 🙏🙏
आज ५ वाजता..
स्पेशल क्लास
unlock code -umeshkudale
https://unacademy.com/course/modern-indian-history-strategy-lecture-1/FRPFUOD6
