नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य.🙏
الذهاب إلى القناة على Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल महाराष्ट्रभरातील प्राध्यापक भरती साठी शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी सुरू करत आहोत.
إظهار المزيد1 237
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
-930 أيام
أرشيف المشاركات
*नेट - सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समिती आयोजित निबंध स्पर्धा.*
*निबंधाचा विषय: -*
माननीय मंत्री चंद्रकांत पाटील यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून भरीव कामगिरी.
*स्पर्धेचे नियम:-*
1.स्पर्धक उच्चशिक्षित असावा.
2.निबंध स्वच्छ अक्षरात लिहून पीडीएफ करून ई-मेल करावा.
3. 30 जून पर्यंत आलेले निबंध ग्राह्य धरण्यात येतील.
*पारितोषिक :-*
पहिल्या उत्कृष्ट पाच निबंधांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे पारितोषिके.
*पुणे विद्यापीठाने समाजासाठी काय भरीव संशोधन केले? मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सवाल -* https://eduvarta.com/What-substantial-research-has-Pune-University-conducted-for-society
सर्व सन्माननीय संस्थाप्रेमीजन,
तुमचे रक्त खवळत नाही काय? फक्त मृत माणूसच बोलू किंवा विचार करू शकत नाहीत. मग आपण सर्वजण लौकिकार्थाने मृत झालो आहोत काय? सेवापूर्तीनंतरही आपण यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल तोंडातून ब्र ही काढायचा नाही काय? या खुज्या विश्वस्तांमुळे किमान ५० कुटुंबे गेल्या ५ वर्षांपासून चरितार्थापासून व हजारो विद्यार्थी गुणात्मक शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. यांना साधी प्राचार्यांची नियुक्ती करणेही जमत नाही. शाहुमहाराजांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या व १०० वर्षांहून अधिक दैदीप्यमान इतिहास असलेल्या या संस्थेची यांच्या भ्रष्ट कारभारामुळे सर्व महाराष्ट्रात नाचक्की झाली. गेल्या ५ वर्षात संस्थेचे जे कोट्यावधी रुपयांचे वेतन अनुदानाचे नुकसान झाले आहे ते हे विश्वस्त भरून देणार आहेत काय? हे पाप कुठे फेडणार?
यांच्या घरातील कुत्री-मांजर सोडून सर्वच संस्थेचे सभासद आहेत. इतर कोणत्याही व्यक्तीचा सभासदत्वाचा अर्जही हे स्विकारत नाहीत. हे स्वार्थी व भ्रष्ट लोक मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत काय? यांचा पापाचा घडा भरला असून यांना पदावरून दूर करण्यासाठी सर्व संस्थाप्रेमींनी आता एकवटण्याची गरज आहे.
- आपला एक निःस्वार्थी संस्थाप्रेमी
*नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य*
===== *सूचना* =====
🎯🎯🎯🎯🎯
सर्व नोंदणीकृत सदस्यांना कळविण्यात येते की, वर्ष 2025–2026 साठी करण्यात आलेल्या सदस्य नोंदणीची वैधता संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे वर्ष 2026–2027 साठी सर्व सदस्यांनी आपली सदस्य नोंदणी नव्याने करणे आवश्यक आहे.
तरी सर्व सदस्यांना विनंती करण्यात येते की, खालील तपशीलानुसार आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी:
*नोंदणी कालावधी: 1 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026*
*नोंदणी साठी क्लिक करा :* (www.nspds.in)
https://nspds.in/users-apply-form.php
*नोंदणी शुल्क:* ₹. 500/_
*पेमेंट पद्धत:* ऑनलाइन
*नोंदणी वेळेत पूर्ण न केल्यास संबंधित सदस्याची सदस्यता रद्द समजली जाईल, याची कृपया नोंद घ्यावी.*
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. 🙏
*द्वारा अधिकृत :*
*नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य*
*नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य*
===== *सूचना* =====
🎯🎯🎯🎯🎯
सर्व नोंदणीकृत सदस्यांना कळविण्यात येते की, वर्ष 2025–2026 साठी करण्यात आलेल्या सदस्य नोंदणीची वैधता संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे वर्ष 2026–2027 साठी सर्व सदस्यांनी आपली सदस्य नोंदणी नव्याने करणे आवश्यक आहे.
तरी सर्व सदस्यांना विनंती करण्यात येते की, खालील तपशीलानुसार आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी:
*नोंदणी कालावधी: 1 एप्रिल 2026 ते 30 एप्रिल 2026*
*नोंदणी साठी क्लिक करा :* (www.nspds.in)
https://share.google/HZ8be2usJkqVIesvQ
*नोंदणी शुल्क:* ₹. 500/_
*पेमेंट पद्धत:* ऑनलाइन
*नोंदणी वेळेत पूर्ण न केल्यास संबंधित सदस्याची सदस्यता रद्द समजली जाईल, याची कृपया नोंद घ्यावी.*
आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. 🙏
*द्वारा अधिकृत :*
*नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य*
"विनाअनुदानित महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक भरती" या आपल्या संघर्ष समितीच्या मागणीची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परिपूर्ती
Circular No22_2026_14022026_260215_105637.pdf8.22 KB
✊ *संघर्ष समिती जिंदाबाद* ✊
*न्यायचे स्वतंत्र व्यासपीठ*
5012 जागांच्या महाविद्यालयीन सहायक प्राध्यापक पदभरतीसाठी अखेर शासन निर्णय निर्गमित झाला… आणि हा क्षण फक्त एक प्रशासकीय कागद नाही, तर हजारो नेट-सेट, पीएच.डी धारकांच्या डोळ्यांत साठलेल्या स्वप्नांचा, संघर्षाचा आणि संयमाचा विजय आहे.
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडून मान्यता प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता. असंख्य निवेदने, बैठका, आंदोलन, उपोषणे, धावपळ… प्रत्येक टप्प्यावर आपली नेट-सेट, पीएच.डी धारक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य संघटना अढळपणे उभी राहिली.
कधी निराशा आली…
कधी आशेचा किरण दिसला…
कधी वाटलं लढा खूप मोठा आहे…
पण आमची एकजूट, विश्वास आणि “न्याय मिळवायचाच” हा निर्धार कधीच डगमगला नाही.
आज हा निर्णय म्हणजे फक्त 5012 जागा नाहीत…
हा प्रत्येक आई-वडिलांच्या त्यागाचा सन्मान आहे.
हा प्रत्येक अभ्यासिकेत जागून काढलेल्या रात्रींचा मान आहे.
हा प्रत्येक उमेदवाराच्या आत्मसन्मानाचा विजय आहे.
हा संघर्ष अजून संपलेला नाही, पण आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.
सर्व पदाधिकारी, सदस्य, आणि या लढ्यात साथ देणाऱ्या प्रत्येक हाताला मनःपूर्वक सलाम!
आपली एकजूटच आपली ताकद आहे… आणि ही ताकद कायम राहील. ✊
*संघर्ष समिती आमचा श्वास*
*नेट - सेट,पीएच.डी. धारक संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्य.*
मा. चंद्रकांत दादा आपणास देखील माहित आहे की संघर्ष समिती हातात घेतलेली कामे पूर्ण करण्यासाठी कोणत्याही संघर्षाला सामोरे जाते. आपण दिलेल्या शब्द लवकरच पूर्ण करावा. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकाला समान कामाला समान वेतन देण्यासाठी लवकर निर्णय घ्यावा. प्राध्यापक भारतीचा शासन निर्णय आपण दिलेल्या वेळेत काढावा. आपण आता पात्रता धारकाचा अंत पाहू नका.
आज शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे राज्यातील उच्च शिक्षणातील समस्या या चर्चेदरम्यान यूजीसी सचिव तथा चेअरमन प्रा. डॉ. विनीत जोशी यांना नेट, सेट, पीएचडी धारक संघर्ष समिती चे समन्वयक प्रा. सोरटे सर यांनी राज्यातील प्राध्यापक भरतीचा गंभीर प्रश्न, तसेच यूजीसीच्या सहा वेळा दिलेल्या निर्देशाकडे शासनाने केलेले दुर्लक्ष, न्यू एज्युकेशनल पॉलिसी राबविण्यात येणाऱ्या अडचणी याबाबत अवगत करून देण्यात आले. या संदर्भात पुन्हा एकदा यूजीसी कडून निर्देश देण्यात येईल असे सांगण्यात आले.🙏
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
