cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

ABP Maza | abp माझा

🚩 Channel was restricted by Telegram

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدلم يتم تحديد اللغةالفئة غير محددة
مشاركات الإعلانات
372
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Sonia Gandhi : सोनिया गांधींचा मोदी सरकारवर घाणाघात, "देशातल्या परिस्थितीवर पंतप्रधान गप्प का?" https://marathi.abplive.com/videos/news/india-sonia-gandhi-pm-modi-1059162  "देशातल्या परिस्थितीवर पंतप्रधान गप्प का?", सोनिया गांधींचा मोदी सरकारवर घाणाघात. देशावर अल्पसंख्यांक यांना टार्गेट केलं जातंय. 
إظهار الكل...
NIA : डी कंपनीशी संबंधाच्या संशयावरुन ताब्यात असलेल्यांना कोठडी, दोन्ही आरोपींना 20 मे पर्यंत कोठडी https://marathi.abplive.com/videos/news/india-nia-d-company-in-jail-1059144 डी कंपनीशी संबंधाच्या संशयावरुन ताब्यात असलेल्यांना कोठडी, दोन्ही आरोपींना 20 मे पर्यंत कोठडी. "आरोपींचे काही संशयास्पद आर्थिक व्यवहाराचे पुरावे हाती लागले आहेत" असं NIA यांनी सांगितलं.
إظهار الكل...
Inflation in India: देशात महागाईची आठ वर्षांतली विक्रमी वाढ ABP Majha https://marathi.abplive.com/videos/news/india-record-rise-in-inflation-in-the-country-in-eight-years-1059141 देशात महागाईचा भडका उडालाय आणि गेल्या आठ वर्षातला उच्चांक गाठलाय. एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर ७.७९ टक्के इतका पोहोचला. त्यातच अन्न-धान्य आणि खाद्य महागाईचा दर ८.३८ टक्क्यांपर्यंत गेल्यानं याची झळ सर्वसामान्यांनाही बसतेय. मार्चमध्ये किरकोळ महागाईचा दर ६.१५ टक्के इतका होता. तो महिनाभरात दीड टक्क्यांपेक्षा अधिक वाढला. वर्षभराचा विचार करता खाद्य महागाईचा हाच दर गेल्या एप्रिलमध्ये केवळ १.९६ टक्के इतका होता. गेले चार महिने महागाईची ही विक्रमी वाढ रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या कमाल मर्यादेपेक्षाही अधिक आहे. आरबीआयनं ६ टक्के मर्यादा निश्चित केली आहे.
إظهار الكل...
Kashmiri Pandit Death : काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्यांचा मारा https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kashmiri-pandit-death-1059140 काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या. काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्यांचा मारा. 
إظهار الكل...
Nawab Malik: मलिकांना खासगी रुग्णालयात उपचारास मुभा ABP Majha https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-malik-is-allowed-to-be-treated-in-a-private-hospital-1059164 नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा. मलिकांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्यात परवानगी. नवाब मलिकांवर कुर्ल्यातील क्रिटी केअर रूग्णालयात उपचार होणार. उपचारांसह पोलीस बंदोबस्ताचा खर्च नवाब मलिकांनाच करावा लागणार
إظهار الكل...
Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येमध्ये काहीशी वाढ, आज 263 रुग्णांची भर तर 240 रुग्ण बरे https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-corona-update-263-new-cases-and-2-deaths-today-13-may-1059161 मुंबई: गुरुवारच्या तुलनेत आज राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून येतंय. राज्यात आज 263 नव्या रुग्णांची भर पडली आहे तर 240 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यातील दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी राज्यात 231 रुग्णांची नोंद झाली होती तर 208 रुग्ण बरे होऊन घरी परतले होते.  राज्यात आज दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 77,31,029 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.11 टक्के इतके झाले आहे.  राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येची संख्या ही 1455 इतकी आहे. सर्वाधिक म्हणजे 898 सक्रिय रुग्ण हे मुंबईत ॉ असून त्या खालोखाल पुण्याचा क्रमांक लागतोय. पुण्यामध्ये सध्या 266 इतके सक्रिय रुग्ण आहेत. तसेच राज्यात आतापर्यंत 8,05,09,470 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहेत.  देशातील स्थितीदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 2841 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत ही वाढ 0.49 टक्क्यांनी जास्त आहे. तर गेल्या 24 तासात देशात कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 2 हजार 827 नवे रुग्ण आढळले होते तर 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रुग्णसंख्येत किंचीत वाढ झाली आहे. दरम्यान, देशातील कोरोना बाधितांची आत्तापर्यंतची एकूण संख्या ही 4 कोटी 31 लाख 16 हजार 254 झाली आहे. गेल्या तर आतापर्यंत देशात कोविडमुळे एकूण 5 लाख 24 हजार 190 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजारांवर आली आहे. एकूण संसर्गाच्या 0.04 टक्के सक्रिय प्रकरणे झाली आहेत. सध्या देशातील रिकव्हरी रेट 98.74 टक्के नोंदवला गेला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 3 हजार 295 रुग्ण बरे झाले आहेत. देशभरात आतापर्यंत एकूण 4 कोटी, 25 लाख, 73 हजार, 460 लोकांनी कोरोनावर यशस्वी  मात केली आहे.  
إظهار الكل...
Sambhajiraje Chhatrapati: औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होणं चुकीचं- छत्रपती संभाजीराजे ABP Majha https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-it-is-wrong-to-bow-down-in-front-of-aurangzeb-s-grave-chhatrapati-sambhaji-raje-1059159 संभाजीराजेंनी देखील अकबरुद्दीन ओवेसींवर टीकास्त्र सोडलंय. औरंगजेबाच्या कबरीसमोर नतमस्तक होणं चुकीचं- छत्रपती संभाजीराजे
إظهار الكل...
Kashmiri Pandit Death : काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्यांचा मारा https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kashmiri-pandit-death-1059140 काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या. काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्यांचा मारा. 
إظهار الكل...
Election : मागास प्रवर्गाच्या राजकीय आरक्षणासाठी समर्पित आयोगाची निर्मिती, नागरिकांची मतं जाणून घेण्यासाठी 21 ते 28 मे दरम्यान राज्याचा दौरा https://marathi.abplive.com/news/maharashtra/election-obc-reservation-fornation-of-commission-for-dedication-of-backward-classes-visit-between-21st-to-28th-may-1059139 मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे राज्य सरकारने निर्माण केलेल्या समर्पित आयोगाचा दौरा जाहीर करण्यात आला आहे. 21 मे ते 28 मे या दरम्यान हा आयोग राज्यातील पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोकण, अमरावती आणि नागपूर विभागीय कार्यालयामध्ये नागरिकांची मतं जाणून घेणार आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे राज्य सरकारने या आयोगाची निर्मिती केली आहे.  महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे.  समर्पित आयोग हा शनिवारी 21 मे रोजी सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय पुणे (https://marathi.abplive.com/news/pune) येथे भेट देतील. रविवार 22 मे रोजी सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद येथे जाणार आहेत. तर त्याच दिवशी सायंकाळी 5.30 ते सायंकाळी 7.30 पर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे भेट देतील. बुधवार 25 मे रोजी दुपारी 2.30 ते दुपारी 4.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, कोकण भवन येथे भेट देतील. शनिवारी, 28 मे रोजी सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती तर  याच दिवशी सायंकाळी 4.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे भेट देतील. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी नागरिकांना आपली मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत, यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहन या समर्पित आयोगाचे सदस्य सचिव पंकज कुमार (भा.प्र.से.) यांनी केले आहे. महाराष्ट्र (https://marathi.abplive.com/news/maharashtra)ातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला एका समर्पित आयोगाची निर्मिती करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे राज्य सरकारने समर्पित आयोग गठीत केला आहे.   
إظهار الكل...
Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2022 | शुक्रवार https://marathi.abplive.com/news/maharashtra/https-marathi-abplive-com-news-maharashtra-maharashtra-marathi-news-top-10-latest-news-today-abp-majha-latest-headlines-13-may-2022-friday-1059137 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 मे 2022 | शुक्रवार 1. खुशखबर... मान्सून वेळेआधीच धडकणार, 27 मे रोजी केरळमध्ये आगमन अपेक्षित, अनुकूल वातावरण असल्यास केरळनंतर सात दिवसात महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता https://bit.ly/3Pl7xqY  मान्सून कधी दाखल होणार? स्कायमेटनं सांगितली 'ही' तारीख https://bit.ly/3LcK6wE  2. NEET-PG परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका; म्हटले, "हे तर विद्यार्थी हिताच्या विरोधात" https://bit.ly/3FJ5LvF  3. महाराष्ट्र (https://marathi.abplive.com/news/maharashtra)ातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका नेमक्या कधी? सुप्रीम कोर्टात 17 मे रोजी फैसला https://bit.ly/3yHNJbk  4. पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. 'याला' औरंगजेबाकडे नाही पाठवला तर.. नितेश राणेंचा इशारा https://bit.ly/3wcyuWy  औरंगजेबाच्या कबरीपुढे माथा टेकणाऱ्यांनो, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल, संजय राऊतांचा ओवेसींवर हल्लाबोल https://bit.ly/3l7fz97  5. पुणे (https://marathi.abplive.com/news/pune) रेल्वे स्टेशनवरील संशयास्पद वस्तू स्फोटक नाही, पोलिसांच्या तपासातील प्राथमिक निष्कर्ष.. रेल्वे स्टेशनवरील वाहतूक सुरळीत https://bit.ly/3wq4d5t  6. चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला तिहेरी जन्मठेप, यवतमाळच्या दारव्हा सत्र न्यायालयाने 42 दिवसांत दिला निकाल.. https://bit.ly/3LbYy8f  7. जालन्यातील चांदईमध्ये राडा; पोलिसांवर दगडफेक, 250 जणांवर गुन्हे, 18 जणांना अटक.. चांदई गावात संचारबंदी https://bit.ly/3ywOLHi  8. भिवंडीत 11.66 कोटींचा जमीन घोटाळा; नायब तहसीलदार फरार, 17 आरोपींना अटक, भाजप नेत्याचाही सहभाग https://bit.ly/3PjZc6P  9. गेल्या 24 तासात देशात 2 हजार 841 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 9 जणांचा मृत्यू https://bit.ly/3yB0fcJ  राज्यातील कोरोना रुग्णसंख्या स्थिर, आज 231 नव्या रुग्णांची भर https://bit.ly/3sC7RIb  10. RCB vs PBKS: आज बंगळुरु विरुद्ध पंजाबमध्ये सामना; कोणत्या 11 खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष https://bit.ly/3MdmIAG  आजचा सामना बंगळुरु विरुद्ध पंजाब, सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर https://bit.ly/39MrM0r  ABP माझा डिजिटल स्पेशल ABP Majha चा नवा शो - नेत्यांची कारकीर्द संपूर्ण शोची प्लेलिस्ट: https://bit.ly/3N8h7fa  ABP माझा स्पेशल  ट्विटर डील अडकली, Elon Musk यांनी केली मोठी घोषणा https://bit.ly/3Lg75ai  आमदार रमेश लटके यांच्यावर अंत्यसंस्कार; मुख्यमंत्र्यांकडून कुटुंबियांचं सांत्वन, अनेक शिवसेना नेत्यांची उपस्थितीhttps://bit.ly/3MdCsDP  6G नेटवर्क येतंय, 5G पेक्षा 50 पट जास्त असेल इंटरनेट स्पीड; जाणून घ्या काय होणार फायदेhttps://bit.ly/3l8WdAw  Rich People in India : NFHS च्या डेटानुसार चंदीगडमध्ये भारतातील सर्वाधिक श्रीमंतांची संख्या; तुमचं राज्य कुठे ते जाणून घ्याhttps://bit.ly/3LaA3IH  NASA : चंद्रावरुन आणलेल्या मातीत लावलं रोप, पुढे 'जे' घडलं ते पाहून नासाचे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित https://bit.ly/3l3O3JI  युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv    इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv  कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 
إظهار الكل...
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.