ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

الذهاب إلى القناة على Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

إظهار المزيد
2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
sticker.webp0.01 KB

#Sci 🔴निकटदृष्टिता/Myopia🔴 ✍जवळच्या वस्तू पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. ✍प्रतिमा डोळ्यातील पटलांच्या अलीकडेच तयार होते. 🅾कारणे:- 🔳बुबुळ लांबट होणे. 🔳भिंग वक्र होणे. 🔳भिंग व दृष्टिपटल यातील अंतर वाढणे. 🔳भिंगाचे स्नायू पुरेसे शिथिल न होणे. 🅾उपाय:- 🔳अंतर्वक्र भिंग वापरणे. 🔳ऋण शक्तीचा चस्मा वापरतात. जॉइन✍@empscpune माझी MPSC By Rajput Sir

sticker.webp0.01 KB

═══════════════ 🌎 *ज्ञान-विज्ञान* 🌎 ═══════════════ 🪐 *कृष्णविवराचा शोध कोणी लावला?*🪐 *********************************** तारे अमर नाहीत, त्यांचीही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. अर्थातच तार्‍यांची अखेर झाल्यानंतर त्यांची काय अवस्था होते, याविषयीच्या संशोधनाला चालना मिळाली. अंतरंगात धडधडत असणाऱ्या अणुमीलनाच्या भट्ट्यांपायी तारे स्वयंप्रकाशित होतात. हायड्रोजनच्या अणूंचं मीलन होऊन त्यापासून हेलियमचे अणू तयार होत असताना फार मोठ्या प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडते. तीच प्रकाशाच्या रूपानं आपल्या नजरेला पडते. पण हायड्रोजनचे इंधन अमर्यादित नसतं. ते संपल्यावर हेलियम त्याचं स्थान घेतं. ते संपल्यानंतर चढत्या भाजणीनं कार्बन, नायट्रोजन यासारख्या अधिकाधिक जड मूलतत्त्वांचा इंधन म्हणून वापर होतो. एकदा का या प्रक्रियेतून लोहाची निर्मिती झाली, की ही प्रक्रिया थंडावते. आता कोणतंच इंधन शिल्लक राहिलेलं नसतं. त्यामुळे त्या ताऱ्यांच्या अंतरंगातून ऊर्जा बाहेर पडत नाही. साहजिकच त्या ताऱ्यावर आतल्या दिशेन आकुंचन पावायला लावणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा पगडा बसतो आणि तारा आकसायला सुरुवात होते. त्याचीच परिणती त्या तार्‍यांचं अतिशय फिकुटलेला प्रकाश असणाऱ्या श्वेतबटू मध्ये रूपांतर होतं, याची प्रचिती काही प्रमाणात मिळाली होती. कारण अवकाशात अशा प्रकारच्या श्वेतबटूंच्या अस्तित्वाचा पुरावा मिळालेला होता, त्यानंतर काय होतं याविषयी मात्र निश्चित सांगता येणं शक्य होत नव्हतं. पण ज्या अर्थी हे श्वेतबटू तार्‍यांसारखेच स्थिर असल्याचे दिसतं त्यावरून, हीच ताऱ्यांची अंतिम अवस्था असावी, असा तर्क केला जात होता. मृत ताऱ्यांचं कलेवर म्हणजेच श्वेतबटू, असाच समज प्रचलित होत होता, तरीही, ते स्थिर कसे होतात? हा प्रश्न अनुतरितच होता. कारण जर अंतरंगातल्या भट्ट्या थंड पडल्या असतील तर मग गुरुत्वाकर्षणाच्या ओढीला विरोध करणारं दुसरं बल असण्याची शक्यताच मावळते. पण क्वान्टम मेकॅनिक्सच्या सूत्रांचा अवलंब करून डॉ. राल्फ फाऊलर यांनी त्याचं तर्कसंगत स्पष्टीकरण दिलं होतं; पण ते पर्याप्त नाही, अशी भूमिका एका विशीतल्या भारतीय तरुणानं घेतली. त्यानं त्यावेळी नुकत्याच प्रकाशात आलेल्या आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादाचा अवलंब करत, जर श्वेतबटू बनलेला तारा महाकाय असेल, म्हणजेच त्यांचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या दीडपटीहून जास्त असेल, तर तो श्वेतबटूही आतल्या आत कोसळतच राहील आणि त्याचे रूपांतर अपरिमित गुरुत्वाकर्षणाची ओढ असलेल्या एका सूक्ष्म अवस्थेत होईल, असं भाकीत केलं. त्या अवस्थेत गुरुत्वाकर्षणाची ओढ इतकी प्रचंड असेल, की त्यातून प्रकाशकिरणही बाहेर पडू शकणार नाहीत, असा दावा त्यानं केला होता. त्यावेळचे खगोलमहर्षी, त्या तरुणाचे गुरू आर्थर एडिन्स्टन यांनी त्या प्रबंधाची जाहीर टिंगल केली. त्या तरुणाची हेटाळणीही केली. पण कालांतरानं इतर प्रख्यात खगोलविदांनी त्या तरुणाचा सिद्धांतच बरोबर असल्याचे सप्रमाण दाखवून दिलं. त्या अवस्थेला मग इतर काहीजणांनी कृष्णविवर असं नाव दिलं. कृष्णविवरांच्या अस्तित्वाची प्रचिती देणारे असंख्य अप्रत्यक्ष पुरावे आता मिळाले आहेत. त्यामुळे कृष्णविवर केवळ कल्पनेचा खेळ नसून आपल्या विश्वातील एक सत्य घटक आहे, हे सिद्ध झालं. कृष्णविवराचं भाकीत करणारा तो तरुण होता सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, त्यांना या शोधाबद्दल १९८३ सालचा नोबेल पुरस्कार दिला गेला. ═══════════════ 📒📒📒 @ संकलन @📒📒📒 श्री. संदिप अंबादास शेंडे

sticker.webp0.01 KB

#Current #day 🔴जागतिक वसुंधरा दिन🔴 🔳तारीख:-22 एप्रिल 🔳संकल्पना:-जॉन मॅककोनेल 🔳सुरुवात:-1970 ☘थीम:- 🔳2018:-End plastic pollution 🔳2019:-Protect our species 🔳2020:-Climate action ✍2016 ला पॅरिस ऍग्रिमेंट वर सह्या करण्यात आल्या 👉दिन स्थापन होऊन 50 वर्ष पूर्ण जॉइन करा✍@empscpune माझी MPSC By Rajput Sir

sticker.webp0.01 KB

#Sci 🔴प्रत्यावर्ती विद्युतधारा🔴 ✍दिशा व परिमाण बदलत राहतात 👉घरघुती उपकरणात वापरतात ✍वारंवारता 50 Z आहे 👉बहुतांश ऊर्जा निर्मित केंद्रात निर्मीती ✍विद्युत शक्ती मध्ये कोणतीही घट न होता लांब अंतरावर पोहचवता येते जॉइन✍@empscpune माझी MPSC By Rajput Sir

sticker.webp0.01 KB

🟢अंकगणित अभ्यासाच्या दृष्टीने विविध परिणामे 1) अंतरासाठीची परिमाणे ▪ 10 मिलीमीटर = 1 सेंटीमीटर ▪ 100 सेंटीमीटर = 1 मीटर ▪ 1000 मीटर = 1 किलोमीटर 2) वस्तुमानासाठीची परिमाणे ▪ 1000 मिलिलिटर = 1 लिटर ▪ 1000 ग्रॅम = 1 किलोग्रॅम ▪ 100 किलोग्रॅम = 1 क्विंटल ▪ 10 क्विंटल = 1 टन 3) कालमापनासाठीची परिमाणे ▪ 60 सेकंद = 1 मिनिट ▪ 60 मिनिट = 1 तास ▪ 24 तास = 1 दिवस 4) इतर परिमाणे ▪ 24 कागद = 1 दस्ता ▪ 20 दस्ते = 1 रिम ▪ 12 नग = 1 डझन ▪ 12 डझन = 1 ग्रॉस ▪ 100 नग = 1 शेकडा ▪ 100 पैसे = 1 रुपया

sticker.webp0.01 KB

प्रश्न 686 - दोन वर्गीकरणमधील गुणधर्म जोडणारे दुवे ( सजीव ) यांबाबत अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous voting

प्रश्न 685 - योग्य विधान ओळखा
Anonymous voting

प्रश्न 684 - उत्क्रांती ( Evalution ) हा शब्द प्रथम कोणी वापरला?
Anonymous voting

sticker.webp0.05 KB

#Current 🔴कृषी विज्ञान काँग्रेस🔴 ⏩ठिकाण:-नवी दिल्ली ◾️आवृत्ती:-14 वि ◾️कालावधी:-फेब्रुवारी 2019 💥आयोजक:-राष्ट्रीय कृषी विज्ञान अकादमी 🌻थीम:-कृषी परिवर्तन साठी नवकल्पना जॉइन✍@empscpune माझी MPSC By Rajput Sir

sticker.webp0.01 KB

🛑विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान) १) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ? उत्तर -- पांढ-या पेशी -------------------------------------------------- २) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ? उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार -------------------------------------------------- ३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ? उत्तर -- मांडीचे हाड -------------------------------------------------- ४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ? उत्तर -- कान -------------------------------------------------- ५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ? उत्तर -- सुर्यप्रकाश -------------------------------------------------- ६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ? उत्तर -- टंगस्टन -------------------------------------------------- ७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ? उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद -------------------------------------------------- ८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ? उत्तर -- न्यूटन -------------------------------------------- ९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ? उत्तर -- सूर्य ------------------------------------------------ १०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ? उत्तर -- नायट्रोजन.. ________________________