cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj | Chattrapati Sambhaji Maharaj | HD WhatsApp Instagram Status Maharashtra

आयुष्यात महाराज समजून घेण्याचा प्रयत्न करा कधीच खचून जाण्याची वेळ येणार नाही ! तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय ! लाखो मराठी जनमानसात छत्रपतींचा इतिहास पोहचवण्यासाठीचा खटाटोप आम्ही करत आहोत ! आपली प्रेमळ साथ लाभेल हीच खात्री ❤️ Promo : @shivbhakt15

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
10 124
المشتركون
-224 ساعات
+227 أيام
+930 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
#सेनापती 🚩 #धनाजीराव_जाधव ⚔️ स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !!
إظهار الكل...
🙏 19👏 3
Photo unavailableShow in Telegram
*दुर्ग तुंग :* पवन मावळ प्रांतातील तुंग किल्ला हा एक घाटरक्षक दुर्ग म्हणून ओळखला जातो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणार्‍या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे. या किल्ल्यावरून लोहगड ,विसापूर ,पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो. काळानुरूप झालेल्या पडझडीत गडवाटा घसरड्या झाल्याने किल्ला चढण्यास काही ठिकाणी थोडासा अवघड होता परंतू २०२३ या वर्षात सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्गसंवर्धन संस्थेच्या माध्यमातून / दुर्गसेवकांच्या परिश्रमातून या ठिकाणी अनेक कामे झाले असून त्यात गडवाट पुन्हा पायरी मार्ग स्वरूपात बनवली गेल्याने आता हा गड सहजसोपेपणाने चढता येतो. पावसाळ्यात हरवलेल्या धुक्यात हा गड त्याचा जाग्यावर उंचीमुळे भयावह वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र तो आता भयावह राहिलेला नाही अनेक गडप्रेमी या गडाला आवर्जून भेट देताना दिसतात. गडावरून आजूबाजूचा दिसणारा नजारा मनमोहवून टाकतो. *इतिहास :* या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली नाही. मात्र १६५७ मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला. सन १६६० मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेरखानाने आपल्या स्वारीच्या वेळी ६ मे १६६५ रोजी तुंग आणि तिकोना या भागातील अनेक गावे जाळली पण हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. ११ जून १६६५ पुरंदर तहानुसार, १८ जूनला कुबादखानाने हलालखान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. पहाण्याची ठिकाणे : गडमाथा छोटा असल्यामुळे एक तासात सर्व गड पाहून होतो. तुंगवाडीतून गडावर जाणारी वाट मारुतीच्या मंदिरा जवळून जाते. पायथ्याला असणाऱ्या या मंदिरात ५ ते ६ जणांची राहण्याची सोय होते. या मंदिरापासून थोड्याच अंतरावर गडावर जाण्यासाठी पायर्‍या लागतात. पायर्‍यांच्या वाटेत थोड्याच अंतरावर हनुमान मंदिर लागते. पुढे गोमुखी रचनेचा दरवाजा आहे. येथून आत शिरल्यावर आपण गड माथ्यावर पोहोचतो. उजवीकडे गणेशाचे मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस पाण्याचा खंदक आढळतो. येथूनच बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. बालेकिल्ल्यावर तुंगीदेवीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच जमिनीत खोदलेली गुहा आहे. अशा प्रकारे एक दिवसात किल्ला पाहून लोणावळ्याला परतता येते. येथून जवळच तिकोना हादेखील सुंदर गड पाहण्यासारखा आहे एका दिवसात हे दोन गड होऊ शकतात.
https://t.me/srimantyogishivajimaharaj
إظهار الكل...
8🔥 1👏 1
*आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष 📜* 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ जून १६६०* चाकणच्या संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याला शाईस्तेखानाचा वेढा पडला. *अवघे मराठे झुंजले !!  शिर तळहातावरती घेऊन !!!* हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला. तोफा बंदुकांचा काही उपयोग होत नाही, हे पाहिल्यावर शाईस्ताखानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची आज्ञा केली. आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते. ३००-३५० लोकांनीशी फिरंगोजी नरसाळ्याने चाकण झुंजवत ठेवला होता. १४ ऑगस्ट १६६० रोजी मुघलांनी सुरुंगाला बत्ती दिली. पूर्वेच्या कोपऱ्याचा बुरुज अस्मानात उडाला. त्यावरचे मराठेही हवेत उडाले. आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले. फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली. तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली. दुसऱ्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघलांनी चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ जून १६७४* श्रीशिवराजभूषण काव्य पूर्ण. इन्द्र जिमि जंभ पर, वाडव सुअंभ पर । रावन सदंभ पर, रघुकुल राज है ॥१॥ पौन बरिबाह पर, संभु रतिनाह पर । ज्यों सहसबाह पर, राम व्दि‍जराज है ॥२॥ दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर । भूषण वितुण्ड पर, जैसे मृगराज है ॥३॥ तेजतम अंस पर, कान्ह जिमि कंस पर । त्यों म्लेच्छ बंस पर, शेर सिवराज है ॥४॥ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ जून १७००* परळीपासून बादशहाला सैन्यासह भूषणगडाकडे जावयाचे होते. भूषणगड परळीपासून रस्त्याने  ४५ मैल अंतरावर. परळीहून बादशहाने भूषणगडाकडे जाण्यासाठी भर पावसाळ्यात २१ जून १७०० ला कूच केले. ज्या जनावरांवर सामानाची ओझी लावली होती ती जनावरे पटापट मरू लागली. कृष्णा नदीला पूर होता. त्यातून सैन्य मोठ्या मुष्किलीने पैलतीरी पोहोचले. शेकडो उपासमारीने मेले, पुढे हळूहळू मार्ग आक्रमत मोगली लष्कर २५ जुलै रोजी भूषणगडास पोहोचले व गडाचा ताबा मिळवला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *२१ जून १८५८* इंग्रजांनी झांशीला २२ मार्च १८५८ रोजी वेढा दिला. तात्या टोपे झांशीच्या लक्ष्मीबाईच्या मदतीस धावून गेले; परंतु ह्यू रोझ पुढे त्याचा निभाव लागला नाही. त्यांना माघार घ्यावी लागली. पुढे ते सर्व ग्वाल्हेरला गेले. तात्या, लक्ष्मीबाई व रावसाहेब यांनी एकत्र होऊन ग्वाल्हेरवर हल्ला केला. ग्वाल्हेर काबीज केले; पण सर ह्यू रोझने ते पचू दिले नाही. या युद्धात लक्ष्मीबाई मरण पावली. तात्याने यापुढे गनिमी काव्याने इंग्रजांना हैराण करण्याचे ठरविले. त्याला पकडण्यासाठी इंग्रजांनी त्याचा एक वर्षभर पाठलाग केला. या पळापळीत २१ जून १८५८ ते ९ ऑक्टोबर १८५८ पर्यंत जावरा, अलीपूर, राजगढ, इसागढ, चंदेरी, मंग्रौली इ. ठिकाणी तात्याने लढाया जिंकल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 *जय शहाजीराजे, जय जिजाऊ* *जय शिवराय, जय शंभूराजे* *जय हिंद, जय महाराष्ट्र 🚩*
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
Enjoy our content? Advertise on this channel and reach a highly engaged audience! 👉🏻 It's easy with http://Telega.io. As the leading platform for native ads and integrations on Telegram, it provides user-friendly and efficient tools for quick and automated ad launches. ⚡️ Place your ad here in three simple steps: 1 Sign up: https://telega.io/c/srimantyogishivajimaharaj 2 Top up the balance in a convenient way 3 Create your advertising post If your ad aligns with our content, we’ll gladly publish it. Start your promotion journey now!
إظهار الكل...
केले या मातीवर जिने पराक्रम अन स्वाभिमानाचे संस्कार, स्वराज्य शौर्यपती घडवणाऱ्या त्या आदिशक्तीला त्रिवार नमस्कार !! . .
@srimantyogishivajimaharaj
إظهار الكل...
9.37 KB
👏 8 5🔥 1
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.