MPSC Exam Oriented
الذهاب إلى القناة على Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
إظهار المزيد7 515
المشتركون
-224 ساعات
-137 أيام
-9130 أيام
أرشيف المشاركات
7 512
⭕️बांग्लादेश मुक्ती संग्राम - 16 डिसेंबर 1971
1965 भारत -पाकिस्तान युद्ध झालं त्यावेळी जनरल आयुब खान हा लष्करशहा पाकिस्तानचे नेतृत्व करत होता. 1969 मध्ये त्याचा शिष्य याह्याखान याने आयुब खानला बाजूला सारले आणि स्वतः लष्करशहा झाला.
सत्तेवर येताच त्याने निवडणुका घेण्याचे वृत्तपत्रांना मुक्त ठेवण्याचे आश्वासन दिले.
तत्कालीन पाकिस्तानचे पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याचा बांगलादेश असे भाग होते. पंजाबी लोकांचे पाकिस्तान वर राजकीयदृष्ट्या वर्चस्व होते ते पूर्व पाकिस्तानातील बंगाली लोकांना शारीरिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या कमी समजत असत.
जशी उर्दू ही अधिकृत राज्यभाषा जाहीर करण्यात आली त्यामुळे बंगाली मुस्लिम संतापले. उर्दू विरोधात बंगाली विद्यार्थी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले मात्र अनेक विद्यार्थ्यांना गोळीबाराला बळी पडावे लागले.
1970 च्या डिसेंबर मध्ये याह्याखानने मुक्त वातावरणात निवडणूक घेण्याचे जाहीर केले. निवडणुकीत कमाल झाली पूर्व पाकिस्तानातील आवामी लीग या पक्षांना 162 पैकी 160 जागा जिंकल्या. आणि तो पक्ष पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान यांची मिळून नॅशनल असेंब्ली बनते त्यामध्ये सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला.
त्या अवामी लीगचे नेते होते शेख मुजीबुर उर रेहमान.
पश्चिम पाकिस्तानात "पाकिस्तान पीपल्स पार्टी" ने 81 जागा जिंकल्या होत्या त्या पक्षाचा नेता होता झुल्फिकार अली भुत्तो. याह्या खानाने भूतों सोबत युती केली आणि
25 मार्च 1971 रोजी याहया खानने पूर्व पाकिस्तानात लष्करी कारवाई करण्याचा आदेश दिला.
आंदोलन करणारे बंगाली विद्यार्थी, शिक्षक, राष्ट्रवादी बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडू लागले. निर्दय लेफ्टनंट जनरल टिक्का खान बांगलादेशचा खाटीक याला म्हणायला माध्यमांनी सुरुवात केली. शेख मुजीब उर यांना अटक करून पश्चिम पाकिस्तानात नेण्यात आले.
तत्कालीन पूर्व पाकिस्तान मधील मेजर झिया उर रहमान यांनी पूर्व पाकिस्तान स्वतंत्र बांगलादेश झाल्याचे जाहीर केले. तिथून पुढे पश्चिम पाकिस्तान मधील लष्कराने पूर्व पाकिस्तान मधील लोकांच्या निर्दयी कत्तली केल्या जवळपास तीस लाख लोक यामध्ये मारले गेले तर एक कोटी निर्वासित भारतामध्ये आले. या निर्वासितांना रोज दोन कोटी 80 लाख रुपये भारताला खर्च करावे लागत होते. भारतासाठी हा प्रश्न गंभीर बनला होता.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला आवाहन केलं होतं पण त्याला फारसा अनुकूल प्रतिसाद मिळाला नाही. बांगलादेशचा प्रश्न तसाच अनुत्तरित राहिला. अमेरिकेने उघड उघड पाकिस्तानची बाजू घेतली. चीनचे पाकिस्तानला समर्थन होते. त्यावेळी इंदिरा गांधींनी 9 ऑगस्ट 1971 रोजी भारत आणि रशिया च्या मैत्री करारावर स्वाक्षऱ्या केल्या. हा करार वीस वर्षासाठी होता आणि कोणावरही लष्करी हल्ला झाल्यास दोघांनी एकमेकांना मदत करण्याबाबतची तरतूद या करारामध्ये होती.
युद्धा शिवाय हा प्रश्न सुटणार नाही हे इंदिरा गांधी ना कधीच कळून चुकले होते पण पावसाळ्यात बांगलादेशमधील नद्यांना महापूर येतो त्यामुळे पावसाळा संपेपर्यंत वाट बघण्याचे ठरले.
याह्याखानने 3 डिसेंबर 1971 रोजी भारताच्या आठ तळांवर विमान हल्ले केले आणि भारत -पाकिस्तान युद्ध सुरू झाले. भारताने अगोदरच मुक्ती बाहिनी या नावाने बांगलादेशी तरुणांची संघटना प्रशिक्षित केली होती. याच बरोबर भारतीय सेनेने बांगलादेश ची सीमा ओलांडली.
नऊ डिसेंबरला अमेरिकेने आपले सातवे आरमार पाकिस्तानच्या मदतीला पाठवण्याचे ठरवले. त्यामुळे रशियाचे आरमार भारताच्या मदतीसाठी निघाले. भारताला लवकरात लवकर यश मिळवण्यासाठी आवश्यकता होती कारण जास्त दिवस युद्ध चालले तर आंतराष्ट्रीय हस्तक्षेप झाला असता.
भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या सैन्याचा सपशेल पराभव केला. पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल नियाजी यांनी भारताच्या लेफ्टनंट जनरल जगजित सिंह अरोरा यांच्यासमोर 16 डिसेंबर 1971 रोजी शरणागती पत्करली. 92 हजार पेक्षा जास्त सैनिकांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आलं आणि भारताने युद्धबंदी जाहीर केली.
अमेरिकेला आपलं सातवे आरमार माघारी बोलवावं लागलं. हा विजय होता भारताच्या मुत्सद्देगिरीचा, भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचा. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांची यामध्ये महत्त्वाची भूमिका होती.
1972 मध्ये इंदिरा गांधी आणि झुल्फिकार अली भुत्तो यांच्यात सिमला करार झाला. यानुसार बांगलादेशला राजनैतिक मान्यता देण्यात आली. आज या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाली. जे भारतीय सैनिक या युध्दात शहीद झाले त्यांना विनम्र अभिवादन.
जय हिंद जय भारत
- श्रीधर पाटील
(तहसीलदार-2017)
👉MPSC EXAM ORIENTED ACADEMY
7 512
⭕️ या एका Page वरून Mains ला As it is 2 question विचारले गेले.
👉Notes कश्या असाव्यात याची Idea येण्यासाठी.
Thanks To Suraj Pawar Sir🙏🙏
7 512
✍️EXAM ORIENTED ACADEMY✍️
✍️OUR FOCUS:-
👉Syllabus Decoding
👉PYQ Paper:Analysis+Approach Building
👉Exam Oriented:Content
👉Notes Making
👉REVISION.
✌️सिधी बात,नो बकवास.✌️
-------------------------------------------------------
https://t.me/MPSC_EXAMORIENTED
7 512
⭕️NCW
GS-II 1.National Womens Commission:
👉Act-1990
👉Established in:31January 1992
👉Composition:
(1+5)(1-SC, 1-ST)
👉Tenure:3/70 year
👉Appointment By:Central Govt.
7 512
⭕️वेळेअभावी राज्यसेवा पूर्व परीक्षा-2021 साठी आपण कोणतीही batch सुरु करणार नाही.
🙏🙏🙏
7 512
⭕️५ डिसेंबर २०२१ चा राज्यसेवा मुख्य २०२० पॉलिटी पेपर GS २ चे अध्ययन academy विश्लेषण:
🖊अरुणबोनगीरवारअवॉर्ड
🖊मक्सवेबर
🖊सस्थात्मकदबावगट
🖊तणमूल
🖊एमपीशर्मा
🖊वर्तनवाद
🖊एसएसखेरा
🖊पोस्टलबॅलेट
🖊अनामतरक्कम
🖊miniature district
🖊IIPA
🖊जिल्हा
🖊डीजीकर्वे
🖊५सेकण्ड
🖊वहेर्गीसकुरियन
आणि खूप काही...
7 512
⭕️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
7 512
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य 2020 Hall Ticket Website वरून Download करण्यास अडचण येत आहे..
👉 तरी खालील link वर क्लिक करून तुम्ही हॉलतिकीट डाउनलोड करू शकता. 👇👇
http://13.127.59.127/mpsconline/public/admitCardLogin
7 512
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर, भाप्रसे (निवृत्त) यांची शासनाकडून नियुक्ती करण्यात आली असून नवनियुक्त मा. अध्यक्षांनी आज दिनांक 26 नोव्हेंबर, 2021 रोजी पदभार स्वीकारला आहे.
7 512
⭕️⚠️♦️श्री किशोर राजे निंबाळकर सर विषयी थोडक्यात माहिती...
⚠️MPSC चे नवीन अध्यक्ष.
♦️26/11/2021 पासून 20/09/2023 पर्यंत..
♦️DOB : 20/09/1961
♦️शिक्षण : बी. एस्सी. ऍग्रीकल्चरचे शिक्षण राहुरी विद्यापीठातून घेतले. पदव्युत्तर शिक्षण (एम. एस्सी. ) पुणे येथे झाले.
♦️रहिवासी: शिरूर (जि. पुणे) तालुक्यातील..
👉माहिती संकलन : Sahadev N.
7 512
#RTI
⭕️♦️⚠️MARATHI DESCRIPTIVE PAPER COPY
Thanks हेतल पगारे madam. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
7 512
#RTI
⭕️♦️⚠️ ENGLISH DESCRIPTIVE PAPER COPY
All those waiting for it !
I have finally received the copy
- hetal pagare madam
⚠️ हेतल पगारे मॅडम ENGLISH DESCRIPTIVE PAPER मध्ये तब्बल 50 पैकी 41 मार्क्स घेऊन त्या paper मध्ये 2019 batch मधून टॉपर होत्या..
Thanks madam for share ur paper
👉राज्यसेवा मुख्य ला असलेल्यानी हा पेपर जरूर पाहून घ्या.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join @officer_club ✔️
