Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 111
المشتركون
+3324 ساعات
+117 أيام
-230 أيام
أرشيف المشاركات
4 113
CMO Maharashtra Tweets:
जनजातीय क्षेत्राच्या विकासासाठी ₹25,000 कोटींची तरतूद!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'जनजातीय संकुल विकास परियोजना, महाराष्ट्र' कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवली.
संसदीय संकुल विकास परियोजनेअंतर्गत तयार होणाऱ्या कार्ययोजना राबविण्यास राज्य सरकार तत्पर असून या योजनेच्या माध्यमातून जनजातीय क्षेत्राच्या विकासासाठी ₹25,000 कोटींची तरतूद केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
जनजातीय क्षेत्राच्या विकासासाठी परियोजनेच्या माध्यमातून गावातच रोजगारनिर्मिती करून स्थलांतर रोखण्यासह जनजातीय क्षेत्रातील नागरिकांचे जीवनमान उंचावून सामाजिक परिवर्तन घडविता येईल. आदिवासी क्षेत्राचा विकास, नागरिकांचे जीवनमान उंचावणे, रोजगारनिर्मिती आणि स्थलांतर रोखणे ही परियोजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनजातीय क्षेत्रासाठी असलेल्या योजनांचे समायोजन करून एकाच गावाऐवजी गावांचा समूह तयार करीत एकात्मिक पद्धतीने विकास करणे आवश्यक आहे. नागरिकांच्या जीवनात उन्नती घडविणाऱ्या उपक्रमांचा त्यात समावेश असणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
या परियोजनेची संकल्पना 5 ते 6 वर्षांपूर्वी मांडण्यात आली होती आणि आता तिची अंमलबजावणी होत आहे. नंदुरबार जिल्ह्यात परियोजनेचे चांगले परिणाम झाल्याचे अहवालातून दिसत असून शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवनमानातही बदल घडत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र शासनाने जनजातीय क्षेत्रासाठी तयार केलेल्या दोन योजनांमुळे या क्षेत्राच्या विकासाला गती मिळत आहे. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्यास अपेक्षित परिणाम साधता येतील. योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासह त्यांच्या अंमलबजावणीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
यावेळी मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार योगेश सागर, संसदीय संकुल विकास परियोजनेचे राष्ट्रीय संघटक व्ही. सतीश, 'योजक सेंटर फॉर रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट'चे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. गजानन डांगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #TribalDevelopment
01 أكتوبر, 11:03
4 113
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी, दिवेआगार येथे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या विनर्स अॅकडमी, आळंदीच्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद आणि पीडादायक आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या सर्व कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
हे सर्व विद्यार्थी आळंदी येथील असून, त्यांचे पार्थिव आळंदी येथे नेण्यासाठी स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत.
#Maharashtra
01 أكتوبر, 10:32
4 113
*Program begins*
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस
LIVE | #InvestMaharashtra | 'इन्व्हेस्ट महाराष्ट्र'चा शुभारंभ | मुंबई
https://www.youtube.com/live/xofEStauHeo?si=Fq-Ep2YvXoJaG6sg
01 أكتوبر, 10:28
4 113
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis presided over the signing and exchange of an MoU between the Directorate of Vocational Education and Training (DVET), Maharashtra and Laghu Udyog Bharati (LUB) in Mumbai!
Purpose of the MoU:
✅Introducing add-on need-based modular training courses to increase employability of trainees
✅Updating course curriculum
✅Improving physical infrastructure facilities
✅Adopting new training technology
✅Developing Instructional Course Material & Teaching Aids
✅Providing free software licenses
✅Conduct Instructors’ & Staff Development Training Programme
✅Arrange Mentors and guest lecturers from Industry.
✅Arrange Seminars, workshops, and on-the-job training (OJT) for Trainees and Faculty.
✅Campus Development
✅Campus Interview / Placement
🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य (DVET) आणि लघु उद्योग भारती (LUB) यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.
सामंजस्य कराराची उद्दिष्टे :
✅ प्रशिक्षणार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासाठी गरजेवर आधारित अतिरिक्त मॉड्युलर प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करणे.
✅ प्रशिक्षण अभ्यासक्रम अद्ययावत करणे.
✅ भौतिक पायाभूत सुविधा सुधारणे.
✅ नवीन प्रशिक्षण तंत्रज्ञानाचा अवलंब करणे.
✅इन्स्ट्रक्शनल कोर्स मटेरियल आणि अध्यापन साधने विकसित करणे.
✅ विनामूल्य सॉफ्टवेअर लायसन्सेस उपलब्ध करून देणे.
✅ प्रशिक्षक व कर्मचारी विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
✅ उद्योग क्षेत्रातील मेंटॉर्स आणि गेस्ट लेक्चरर्स उपलब्ध करून देणे.
✅ प्रशिक्षणार्थी आणि फॅकल्टीसाठी सेमिनार्स, वर्कशॉप्स तसेच ऑन-द-जॉब ट्रेनिंग (OJT) आयोजित करणे.
✅ कॅम्पसचा विकास करणे.
✅ कॅम्पस इंटरव्ह्यू / प्लेसमेंट आयोजित करणे.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
01 أكتوبر, 10:27
4 113
*CMO Maharashtra Tweets:*
🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding the maintenance and repairs of schools, residential schools, Ashram schools, Anganwadi centres, Primary Health Centres / sub-centres, ITIs and technical education buildings across the state.
DCM Sunetra Ajit Pawar, other members of the cabinet and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील शाळा, निवासी शाळा, आश्रम शाळा, अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र / उपकेंद्र, आय.टी.आय. व तंत्र शिक्षण इमारतींच्या देखभाल व दुरूस्ती संदर्भात आढावा बैठक.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्रिमंडळातील इतर सदस्य व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में राज्य के विद्यालय, आवासीय विद्यालय, आश्रम विद्यालय, आंगनवाड़ी केंद्र, प्राथमिक स्वास्थ्य केंद्र/उपकेंद्र एवं आई.टी.आई. समेत तकनीकी शिक्षा भवनों के रखरखाव और मरम्मत के संदर्भ में समीक्षा बैठक।
इस अवसर पर उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्रिमंडल के अन्य सदस्य, एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕒 3.10pm | 1-10-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. ३.१० वा. | १-१०-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
01 أكتوبر, 09:12
4 113
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मुंबई येथे डॉ. हरिवंशराय बच्चन विद्यालय, अहमदपूर, जि. लातूर येथील विद्यार्थ्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,00,000 देणगीचा डिमांड ड्राफ्ट सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी चिमुकल्यांचे आभार मानले!
#Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
01 أكتوبر, 09:02
4 113
CMO Maharashtra Tweets:
बळीराजाला कर्जमुक्तीचा आधार, आपले महाराष्ट्र सरकार !🌾
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना - 2026’ च्या तिसऱ्या टप्प्यातील लाभ वितरणाला सुरुवात. 3,27,250 पात्र शेतकऱ्यांना ₹3160.43 कोटींचा लाभ वितरित.
#Maharashtra #DevendraFadnavis #Farmers
01 أكتوبر, 08:53
4 113
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
A Moment of Pride for Maharashtra and India 🇮🇳
Met Capt. Smit Machchhar’s uncle and aunt today and expressed my heartfelt appreciation for his extraordinary courage. In a moment of grave danger, Smit displayed remarkable courage, presence of mind and a deep sense of responsibility, helping save the lives of everyone on board. His bravery in the face of such a difficult situation is truly commendable.
Smit has made Maharashtra and the India proud.
महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण! 🇮🇳
कॅप्टन स्मित मच्छार यांच्या काका-काकूंची भेट घेऊन स्मित यांच्या धाडसी कामगिरीबद्दल मनःपूर्वक कौतुक केले.
जीवघेण्या संकटाच्या क्षणी स्मित यांनी दाखवलेले अदम्य धैर्य, प्रसंगावधान आणि जबाबदारीची जाणीव अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या या धाडसी प्रयत्नांमुळे विमानातील सर्वांचे प्राण वाचले.
स्मित यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.
#Maharashtra #IndiaProud #Bravery
01 أكتوبر, 08:39
4 113
CMO Maharashtra Tweets:
थकीत पीककर्जाशी संघर्ष करणाऱ्या बळीराजाला कर्जमुक्तीच्या माध्यमातून आर्थिक दिलासा देत, नव्या उमेदीने आणि आत्मविश्वासाने शेती फुलवता यावी, यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला आधार, त्यांच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026’च्या तिसऱ्या टप्प्यातील लाभ वितरणाची सविस्तर माहिती...
#Maharashtra #DevendraFadnavis #KarjMuktiYojana
01 أكتوبر, 08:37
