Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 115
المشتركون
-124 ساعات
-67 أيام
-3930 أيام
أرشيف المشاركات
4 116
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
रामभक्तांचा विश्वविक्रम 🚩
रामभक्तांच्या अपार उत्साहात, 'राम नाम'च्या जयघोषात आणि हजारो दिव्यांच्या तेजस्वी प्रकाशात श्रद्धा व भक्तीने ओतप्रोत भरलेले क्षण...
#Maharashtra #RamNavami #रामनवमी
4 116
CMO Maharashtra Tweets:
प्रभू श्रीरामांच्या आदर्शातून समतेचा आणि एकतेचा संदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे श्रीराम नवमीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रम 'विश्वशांति के लिए विश्वविक्रमी महाआरती' या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.
या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विश्वशांतीसाठी आयोजित या महाआरती कार्यक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये होणार आहे. प्रभू श्रीराम यांनी समाजाला मर्यादांचे पालन, समतेचे मूल्य आणि सामूहिक शक्तीचे महत्त्व शिकवले. समाजातील शेवटच्या घटकातही आत्मविश्वास आणि विजिगिषु वृत्ती निर्माण करण्याचे कार्य त्यांनी केले. लहान लहान घटक एकत्र आल्यास कोणतीही मोठी असुरी शक्ती पराभूत होऊ शकते, हे त्यांच्या जीवनातून स्पष्ट होते.
जगातील विविध भागांमध्ये संघर्ष आणि युद्धाचे वातावरण असताना भारत हा ‘वसुधैव कुटुंबकम’ या मूल्यांवर आधारित देश असल्यामुळे विश्वशांतीचा संदेश देण्याचा नैतिक अधिकार भारताकडे आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावनेर येथील मुख्य रस्त्याच्या सौंदर्यीकरणाचे तसेच रघवी समाजासाठी मौनी बाबांच्या आश्रमाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच सावनेर मतदारसंघात उभारण्यात येणाऱ्या फर्टिलायझर प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर हजारो रोजगारनिर्मिती होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. आशिष देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #RamNavami
4 116
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सावनेर, नागपूर येथे 'विश्वशांति के लिए विश्वविक्रमी महाआरती' या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागातील केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत (सीआरएफ) ₹26 कोटींच्या सावनेरच्या मुख्य रस्त्याच्या सौंदर्यीकरण व रुंदीकरणाच्या कामाचे व गुजरखेड येथील मौनी बाबा आश्रम देवस्थानाच्या ₹5 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन केले.
यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. आशिष देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #RamNavami
