ar
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

إظهار المزيد
4 122
المشتركون
-124 ساعات
-87 أيام
-3530 أيام
أرشيف المشاركات
CMO Maharashtra Tweets: लोकनेते माजी मंत्री स्व. दत्ता मेघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्व. दत्ता मेघे यांच्या श्रद्धांजली सभेमध्ये उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व. दत्ता मेघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्व. दत्ता मेघे हे अत्यंत गरिबीतून पुढे येऊन स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहिलेले नेतृत्व होते. शिक्षण घेत असताना वर्तमानपत्रे टाकण्याचे काम करत त्यांनी स्वतःचा मार्ग तयार केला. युवा नेते म्हणून विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी आपली ठळक ओळख निर्माण केली आणि त्यातून त्यांचा व्यापक राजकीय प्रवास सुरू झाला. आमदार, खासदार, मंत्री अशा विविध पदांवर ते राहिले असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. स्व. दत्ता मेघे यांच्या कार्याचा अनेकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला असून त्यांच्या स्पर्शाने अनेकांचे आयुष्य बदलले, शिक्षण क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी शिक्षणाकडे सेवाभावाने पाहिले. आरोग्य, शिक्षण आणि सहकार या क्षेत्रांमध्ये गुणवत्तापूर्ण विस्तार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. स्व. दत्ता मेघे यांच्या कार्याला साजेसे स्मारक वर्धा आणि नागपूर येथे उभारण्याबाबत सर्व नेतेमंडळी आणि मेघे कुटुंबाशी चर्चा करून लवकर निर्णय घेतला जाईल. हे स्मारक पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, आमदार समीर मेघे व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'महाराष्ट्र ज्ञानसभा 2026 : विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण' या राष्ट्रीय संमेलनाच्या स्मारिकेचे आणि 'गोंडवाना मॉडेल - बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी, गडचिरोली' या पुस्तकाचे प्रकाशन केले. यावेळी शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी, VNIT नागपूरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष एम. मदनगोपाळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #महाराष्ट्रज्ञानसभा

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸Inauguration of the national conference 'Maharashtra Gyan Sabha 2026: Education for Viksit Maharashtra' at the hands of CM Devendra Fadnavis. Dr. Atul Kothari, National Secretary of Shiksha Sanskriti Utthan Nyas, M. Madan Gopal, Chairperson, Board of Governors, VNIT Nagpur, Dr. Manali Kshirsagar, Vice-Chancellor of Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Dr. Prashant Bokare, Vice Chancellor of Gondwana University, Gadchiroli, Dr. Bhimaraya Metri, Director, IIM Nagpur, and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्र ज्ञानसभा 2026 : विकसित महाराष्ट्रासाठी शिक्षण' या राष्ट्रीय संमेलनाचे उदघाटन. यावेळी शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी, VNIT नागपूरच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष एम. मदन गोपाळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से ‘महाराष्ट्र ज्ञान सभा 2026 : विकसित महाराष्ट्र के लिए शिक्षा’ इस राष्ट्रीय सम्मेलन का उदघाटन। इस अवसर पर शिक्षा संस्कृति उत्थान न्यास के राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी, VNIT नागपुर के निदेशक मंडल के अध्यक्ष एम. मदन गोपाल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय की कुलपति डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विश्वविद्यालय, गढ़चिरौली के कुलपति डॉ. प्रशांत बोकारे, आईआईएम नागपुर के निदेशक डॉ. भीमराया मेत्री एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕐12.55pm | 4-4-2026📍Nagpur | दु. १२.५५ वा. | ४-४-२०२६📍नागपूर. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur #महाराष्ट्रज्ञानसभा