Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 137
المشتركون
+224 ساعات
-137 أيام
-4130 أيام
أرشيف المشاركات
4 137
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : महसूल विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
4 137
CMO Maharashtra Tweets:
एल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी व्यवस्थापनावर भर
राज्यातील विविध धरणांमध्ये सुमारे 653.63 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा 101.77 टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. गतवर्षी हा साठा 551.86 टीएमसी होता. मात्र यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसाच्या अनियमतेतमुळे पुढील वर्षी टंचाईचा मुकाबला करता यावा, यासाठी पाणी जपून वापरा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
एल-निनोच्या प्रभावामुळे पाणीसाठ्यात 2014 मध्ये 12% तर 2015 मध्ये सुमारे 14% घट झाली होती. त्यामुळे दोन्ही वर्षी पाणीटंचाई निर्माण झाली होती. 15 ऑक्टोबर 2014 रोजी 872 टीएमसी तर याच दिवशी 2015 ला 625 टीएमसी पाणीसाठा होता. त्या तुलनेत 2025 मध्ये 15 ऑक्टोबरला 1330.97 टीएमसी पाणीसाठा होता. हा पाणीसाठा 21 एप्रिल 2026 रोजी 653.63 टीएमसी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे 101.77 टीएमसी पाणीसाठा अधिकचा आहे. यावर राज्यातील पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून ऑगस्ट 2026 अखेर पिण्यासाठी पाणी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने काटकसरीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी एल-निनोच्या प्रभावामुळे या वर्षी पाऊस कमी होण्याची शक्यता असल्याने पुढील वर्षी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने आतापासून पाण्याचा जपून वापर करण्याचे निर्देश दिले.
महसूल विभागनिहाय पाणीसाठा (धरण संख्या) यंदाचा उपयुक्त पाणीसाठा, गतवर्षीचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)
नागपूर : (387) 80.79, 63.40
अमरावती : (276) 73.72, 65.13
छत्रपती संभाजीनगर : (929) 129.37, 97.09
नाशिक : (539) 101.96, 89.28
पुणे : (724) 206.55, 174.04
कोकण : (173) 61.24, 62.92
एकूण : (3028) 653.63, 551.86
राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा : यंदाचा उपयुक्त पाणीसाठा, गतवर्षीचा पाणीसाठा (टिएमसीमध्ये) या क्रमाने -
कोयना : 33.62, 36.76
जायकवाडी : 42.03, 34.44
उजनी : 13.39, (0)
पेंच प्रकल्प समूह : 26.57, 26.35
इसापूर : 21.45, 17.82
भातसा : 15.70, 14.91
गोसीखुर्द : 14.31, 5.93
खडकवासला धरण समूह : 11.32, 9.82
मुळा : 9.54, 10.53
अप्पर वर्धा : 10.21, 9.53
अप्पर वैतरणा : 6.52, 5.95
भंडारदरा : 5.25, 6.04
यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 137
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालय, मुंबई येथे गर्ल्स सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, नाशिक या संस्थेच्या एन.डी.ए. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या जिया करपे आणि समृद्धी इंगळे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 137
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
देश के गौरव मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके प्रति कांग्रेस पार्टी के अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे इनके द्वारा दिए गए बयान की हम निंदा करते हैं। हमारी मांग है कि मल्लिकार्जुन खड़गे अपने शब्दों को वापस लें और माफी मांगें।
(मुंबई | 22-4-2026)
#Maharashtra #Mumbai #ShameOnCongress
4 137
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कार्याची व्यापक प्रसिद्धी आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीसाठी अभिनेते रितेश देशमुख यांची 'सदिच्छा राजदूत' म्हणून नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी अनेक मंत्री उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 137
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕟 4.27pm | 22-4-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/ai1WXATY_UY?si=vJbcT7j5eBaj3XEO
https://www.facebook.com/100044197187974/videos/892373247192987
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046906315021431124?s=20
4 137
CMO Maharashtra Tweets:
🔸Former Governor of Maharashtra Padma Bhushan Bhagat Singh Koshyari met CM Devendra Fadnavis at Varsha Bungalow in Mumbai today. CM Devendra Fadnavis extended a warm welcome to him.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथील वर्षा निवासस्थानी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पद्मभूषण भगतसिंह कोश्यारी यांनी भेट घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनसे आज मुंबई स्थित वर्षा आवास पर महाराष्ट्र के पूर्व राज्यपाल पद्मभूषण भगतसिंह कोश्यारी इन्होंने भेंट की। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने उनका स्वागत किया।
🕥 10.30am | 22-4-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. १०.३० वा. | २२-४-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
