cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️

🎯🥇"Nothing Is Impossible फक्त जिद्द पाहिजे..!✌️💯 अधिकाऱ्यांची यशोगाथा प्रेरणादायक विचार नकारात्मक कडून सकारात्मकडे त्यांचे सूंदर विचार🏅🎯 ....त्यांचे चारित्र आणि हो बरच काही 👇👇👇 【सुरुवात;12 जून 2020】 👇👇Join 👇👇 http://:t.me/ghebhararitu

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
28 755
المشتركون
-1824 ساعات
-747 أيام
-49730 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

जीवनात काही व्यक्ती तात्पुरता काळासाठी येतात मात्र त्यांच्या आठवणी हृदयात कायमस्वरूपी घर करून जातात त्या माणसाला स्वतंत्रपणे हसू देत नाहीत आणि मनसोक्त रडण्याचे कारण ही मिळत नाही बाकी ते म्हणतात की कुठलीच टाळी एका हाताने वाजत नसते!,,,✍ Just filling👍❤️❤️❤️💗 एकमन#लेखक   @Ommshelke
إظهار الكل...
8👍 3
#संयम... "यशाची नशा जर करायची असेल तर निराशेच्या गावाला कधी फिरकायच नसतं." परीक्षा पुढे गेलेल्या आहेत माहित नाही कधी होतील पण एवढं नक्की आहे परीक्षा कधी ना कधी तरी नक्की होतील.जेव्हा होतील त्यावेळेस आपलं सिलेक्शन लिस्ट मध्ये नक्की नाव असेल एवढा तर आपल्याला अभ्यास नक्की करायचा आहे. माझं वय 27/28/29/30/31/32..इ.झालंय आता माझं काही खर नाही.विशेषतः मुली घरचे आता ऐकणार नाही.अशा कितीतरी नकारात्मक गोष्टीला तुम्ही सामोरे जात आहात.या सर्वांमुळे तुम्ही खचले जात आहात.हे साहजिक आहे पण "खचून जाण्यापेक्षा खेचलेल बरं". या सर्व फालतू गोष्टींना पूर्णविराम देवून.सोलूशन ओरिएंटेड राहून आणखी ताकदीने अभ्यास करून जिंकण्यासाठी सज्ज व्हा. नोट-नाव ठेवणारी जनता...(स्वतःचा पोरगा काय काय दिवे लावतो हे सोडून साऱ्या गावाला माहित असते.)किती दिवस आणखी?आईबाप यांना किती दिवस बुडवणार?तुझं वय किती झालंय?लग्न कधी करणार? इ.प्रश्नांनी भंडावून सोडतात आपल्याला.निराशेत जायला ही लोक खुप असं अमूल्य योगदान आपल्या आयुष्यात देत असतात.त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपलं काम करूया. हात जोडून माझ्या भावा आणि बहिणींना विनंती कृपया करून चुकीचे पावलं उचलू नका.आत्महत्या इत्यादी गोष्टी खरचं करू नका.(नजीकच्या काळात घडलेला प्रसंग म्हणून हा लेख लिहिला) "आई वडील नेहमी आपल्या सोबत असतात त्यांची सोबत सोडू नका." "वेळ बदलते फक्त बदलत्या वेळेची वाट पाहावी लागते." तुमचा सर्वांचा achievers वाला 🙏
إظهار الكل...
👍 55 4
👍 68🥰 6😎 4🔥 2😱 1
मानवी मन खूपच बाजींद असतं ना राव ते जास्त फिरत बसतं त्याला स्थिर करायला  हक्काचं ठिकाण लागतं ते शोधण्याच्या नादात फक्त मन भिर भिर फिरत असतं आणि या गडबडीत आपला आनंद दुसर्याच्या हातात देऊन स्वतःला त्रास करून घेत बसतो!,,,✍ एकमन#लेखक   @Ommshelke
إظهار الكل...
👍 51 20💯 1
राजकीय शिक्षण.. काळाची गरज.. ✍️लेखक -:अनिल भगवान चव्हाण (ABC ) ✍️"हल्ली लोकसभा निवडणुका सुरु आहे वर्तमानपत्र टीव्ही यावर सगळीकडे एकच चर्चा आहे ती म्हणजे निवडणूक... कोण निवडून येणार..? खरं सांगायचं तर ग्रामीण भागात जर, कधी तुम्ही गेला तरं तिथल्या माणसाला लोकसभा म्हणजे काय?हे सुद्धा माहित नाही.. खासदार काय करतो?तो कुठे बसतो?याबद्दल थोडेफार सुशिक्षित लोक सोडले तर बहुतांश लोकांना माहितीच नसते.. खासदाराची नेमकी काय काम आहे..? हे सुद्धा लोकांना माहित नसतं.. अशी ही जनता निवडणूक आली की, कोणी हातावर पाचशेची नोट टेकवली की ते म्हणेल त्याला मतदान करायला तयार असते.. निवडणुकीत उभे असणारे उमेदवार मतदारांना 100/500रुपयात खरेदी करू पाहतात.. कारण इथल्या जनतेला संविधान काय आहे..? संसद काय आहे..? मतदान म्हणजे काय..? हे माहित नाही.. राजकीय शिक्षणाचा अभाव सगळीकडे दिसतो.. सुशिक्षित तरुण स्पर्धा परीक्षाची तयारी करणारे तरुण तर म्हणतात राजकारण हे आपल काम नाही.. राजकारण नको.. अश्या तरुणांना मला डॉ.. बाबासाहेब आंबेडकर यांच एक वाक्य सांगावं वाटेल.. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की "सुशिक्षित तरुणांनी जर राजकारणाकडे दुर्लक्ष केल तर तुम्हाला अशिक्षित लोकांचे गुलाम व्हावं लागेल..!" हे वाक्य आजही खर ठरताना दिसतं आहे..15/16वर्ष शिक्षण घेवून व 7/8वर्ष UPSC /MPSC ची तयारी करुन IAS /IPS झालेल्या अधिकाऱ्यांना 10वी /12वी नापास झालेल्या मंत्र्याच्या हाताखाली काम करावं लागतं.. त्यांना सलाम करावा लागतो.. राजकारणात येण्यासाठी शिक्षणाची अट नाही.. जेव्हा भारतीय संविधान तयार होत होत तेव्हा देशातील साक्षरता खूपच कमी होती.. सर्वसामान्य माणसाला लोकांच प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी म्हणून संविधानाने यासाठी शैक्षणिक पात्रता निर्धारित केली नव्हती.. हे काम नंतरचे राज्यकर्ते करतील अशी अपेक्षा संविधान निर्मात्याना होती.. पण नंतर सुद्धा आमदार, खासदार होण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता संसदेने निर्धारित केली नाही..सरकार सद्या सुद्धा ते करू शकतं. पण तस करण्याची मानसिकता दिसतं नाही.. संविधान म्हणजे काय?संसद म्हणजे काय..? हे फक्त स्पर्धा परीक्षा करणारे विध्यार्थी व थोडाफार सुशिक्षित वर्ग सोडला तर इतरांना माहित नाही... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच असं मत होत की,स्वातंत्र्य मिळाल्यावर किमान 10वर्ष निवडणुका घेवू नये.. त्या 10वर्षात जनतेला राजकीय शिक्षण द्यावं... पण तस घडलं नाही.. निवडणुका झाल्याच आणि काँग्रेस सत्तेत आली...नंतर अनेक घटना घडतं गेल्या..अलीकडे लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला.. त्यात मतदानाची टक्केवारी 60%च्या वर जावू शकली नाही..100%मतदान कां होत नाही..? का मतदार मतदान करायला येतं नाही..? कारण राजकीय शिक्षणाचा अभाव... ही निवडणूक नेमकी कोणाची? हेच लोकांना माहित नाही... लोकांना फक्त ग्रामपंचायत माहित असते.. सुशिक्षित वर्गाला तर राजकारण म्हटलं की कपाळावर आढ्या पडतात.. आपल्याला काय करायच? कोणी पण निवडून येवो आपल्याला काय देणार..? असं समजतं सुशिक्षित वर्ग मतदान करण्यासाठी बाहेर पडतं नाही.. मतदानाची सुट्टी लोक फिरायला जातात पण मतदान करत नाही.. कारण त्यांना माहीतच नाही मतदान केल्याने काय होत? महत्वाचा मुद्दा असा आहे की, राजकारणी लोकांनी तर लाजच सोडली आहे.. सकाळी एका पक्षात, तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात.. कोणी पक्ष पळवतो,तर कोणी आमदार पळवतो हे अत्यंत घाणेरड राजकारण सद्या जनतेला अजिबात पसंद नाही.. वारंवार तेच ते लोक सत्तेत येतं असतील तर मतदान करुन फायदा काय..? हा प्रश्न आहे.. याकडे सर्वांनी गांभीर्याने बघितलं पाहिजे..राजकीय नेत्यांनी निष्ठावंत राहील पाहिजे.. हे सगळी कारण बघितली तरी सुद्धा राजकीय शिक्षणाच्या आभावामुळे कमी मतदान होवून अयोग्य लोक सत्तेत येतं आहे.. आणि हे लोकशाही व्यवस्थेसाठी घातक आहे.. त्यामुळे योग्य व्यक्ती जर सत्तेत आणायचे असेल तर प्रत्येक घरी संविधान पोहोचवण आवश्यक आहे.. प्रत्येकाने संविधान वाचन आवश्यक आहे.. प्रत्येकाने राजकारण समजून घेणं आवश्यक आहे.. जर तुम्ही हे केल नाही तर देशात वारंवार ते ते लोक सत्तेत येतील आणि भ्रष्टाचाराला हातभार लागेल.. म्हणून मतदार जागरूक हवा.. सत्तेसाठी व स्वतः वरील भ्रष्टाचाराच्या आरोपातून वाचण्यासाठी एखादा नेता रातोरात पक्ष बदलत असेल आणि तरीसुद्धा जनता त्यांना निवडून देतं असेल तर इथे भ्रष्टाचार आणि अयोग्य व्यक्ती सत्तेत येण्यास जनता जबाबदार आहे...म्हणून राजकीय शिक्षण ही काळाची गरज आहे..त्यामुळे सुशिक्षित वर्गान संविधान आणि राजकारण याचा अभ्यास करुन राजकारणात आपला सहभाग वाढवला पाहिजे.. व देशाच्या विकासासाठी इमानदार, सुशिक्षित लोकप्रतिनिधीला निवडून देतं देशाचा विकास करायला हवा...!" लिखाण दि.24एप्रिल 2024 प्रतिक्रिया नक्की कळवा.. ✍️लेखक संपर्क -:8806379959
إظهار الكل...
👍 24 2
आजचा माझा लेख राजकीय शिक्षण काळाची गरज... नक्की वाचा....❤️
إظهار الكل...
👍 14
👍 74💯 4🔥 2
मी शुध्द हरपू पाहिली, चिंधड्या चिंधड्या आयुष्याचे अवशेष आपल्या आपण शुध्दीत कसे वेचणार, तुकडा तुकडा सांधून लत्करलेलं आयुष्य घ्यावं पांघरूण या निर्मनुष्य गारठ्यात, म्हणून मी वाचली पुस्तक, भळभळणाऱ्या जखमांवर बांधल्या कवितेच्या ओळी वाचली थोरामोठ्यांची चरित्रं काढली चित्र... आयुष्याच्या गारठणाऱ्या कॅनव्हासावर रक्तात बुडवून कुंचला, दारू प्यालो , भांग खाल्ली, पण साली शुध्द हरपतच नाही... नागराज मंजुळे 👏
إظهار الكل...
👍 46 6
तुमचे लिखाण आणि चॅनल विषय काही Suggestions साठी इथे पाठवा👉 @Shyam_barse आता आपल्या WhatsApp channel वर तुमचे पोस्ट टाकण्यासाठी https://wa.me/919623141040
إظهار الكل...
Share on WhatsApp

WhatsApp Messenger: More than 2 billion people in over 180 countries use WhatsApp to stay in touch with friends and family, anytime and anywhere. WhatsApp is free and offers simple, secure, reliable messaging and calling, available on phones all over the world.

1
जीवनातील प्रत्येक गोष्टीला पर्याय हा असतोचं फक्त तो शोधण्याकरता आपल्या मध्ये थोडा संयम असावा लागतो। ते म्हणतात ना वेळ प्रत्येकाची येत असते मात्र।आपल्या वाईट वेळेत साथ देण्याऱ्या माणसानंकडे आपलं लक्ष नसते😞असो!..,✍ एकमन#लेखक   @Ommshelke
إظهار الكل...
👍 51 9💯 1