ar
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

الذهاب إلى القناة على Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

إظهار المزيد
6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
🧐 *मुंबईच्या महापौरांना ताप* *LetsUp l Mumbai* ⚡ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. सकाळपासून त्यांना ताप असून स्वत:हून त्या तपासणीसाठी गेल्याचे सूत्रांनी सांगितले. 👨🏻‍⚕️ *वैद्यकीय तपासणी* : कोरोनाच्या काळात सातत्याने कार्यरत असलेल्या महापौर पेडणेकर यांची तब्येत दोन दिवसांपासून बिघडली आहे. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी केली होती. 🏥 *रुग्णालयात दाखल* : आज ताप व अस्वस्थ वाटत असल्याने त्या चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. तेथे त्यांची तपासणी होणार असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे. 😷 *रुग्णालयांना भेटी* : कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाऊनच्या काळात किशोरी पेडणेकर स्वत: फिल्डवर जाऊन काम करत होत्या. कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्यांनी गेल्या काही दिवसांत अनेक रुग्णालयांना भेटी दिल्या, तेथील आरोग्य सेवकांशी चर्चा केली. 📌 रुग्णालयांमध्ये कुठल्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून त्या कायम लक्ष ठेवत होत्या. शिवाय, वरळीतील स्वत:च्या वॉर्डसह मुंबईतील कोरोनाच्या अनेक हॉटस्पॉट्सनाही त्यांनी भेटी दिल्या होत्या. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

😎 *RUMMY खेळा आणि पैसे जिंका* 💰 *Rummy Circle अ‍ॅपवर* ऑनलाईन Rummy खेळा आणि जिंका रोख रक्कम 💷 *डाउनलोड करा Rummy Circle App आणि जिंका ₹2,000 बोनस* 🤪 तुम्ही जितके जास्त खेळणार तेवढी जास्त रक्कम कमावणार... 💯 100% कायदेशीर: Rummy ला 1968 मध्येच माननीय सुप्रीम कोर्टाद्वारे एक कौशल्यपूर्ण खेळ म्हणून घोषित करण्यात आले असून हा खेळ मुफ्त किंवा रोख रकमेने खेळण्यासाठी पूर्णतः कायदेशीर आहे 🤩 *अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा* : http://bit.ly/35pHUho (ADVT)

photo content

👨‍💼 'अ‍ॅमेझॉन' देणार 20 हजार लोकांना रोजगार...! *LetsUp I Trending* कोरोनामुळे भारतात आलेल्या बेरोजगारीच्या संकटात अ‍ॅमेझॉन इंडिया कंपनी मदतीचा हात देणार आहे. कंपनीकडून भारत आणि इतर देशांमध्ये ग्राहकांच्या मदतीसाठी ग्राहक सेवा विभागात अ‍ॅमेझॉन 20 हजार लोकांना तात्पुरत्या स्वरुपात रोजगार देणार आहे. कर्मचाऱ्यांच्या करण्यात येणाऱ्या नियुक्त्या ग्राहकांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी करण्यात येणार आहे. 🤓 *कंपनीचा अंदाज काय?* : ● पुढिल 6 महिन्यांत साईटवरील ग्राहकांची रहदारी वाढणार आहे, त्यासाठी आधीच तायारी करण्यात येणार आहे. ● देशभरातील हैदराबाद, पुणे, कोईम्बटूर, नोएडा, जयपूर, कोलकाता, चंदिगढ, मंगलुरु, इंदोर, भोपाळ आणि लखनऊ या शहरांमध्ये नव्या कामगारांना रोजगार देणार आहे. 💁‍♂️ *काम आणि पात्रता काय?* : ● 20 हजार पदांपैकी अनेक पदे अ‍ॅमेझॉनच्या 'वर्चुअल ग्राहक सेवा' कार्यक्रमाचा हिस्सा असणार आहे. ● यामुळे कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. ● या पदांसाठी किमान शैक्षणिक पात्रता 12 वी पास आहे. ● तसेच अर्जदाराला हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगु आणि कन्नड यांसारख्या भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या व्यक्ती ईमेल, सोशल मीडिया किंवा फोनद्वारे ग्राहकांना मदत करणार आहेत. 🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

😱 *अग्निशमन दलातील 117 जवान कोरोनाबाधित!* *LetsUp | Corona Live* ⚡ कंटेन्मेंट झोनमध्ये फवारणी करणे अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवावर बेतत आहे. 🧐 आतापर्यंत 117 जवानांना कोरोनाची बाधा पोहोचली असून, अजूनपर्यंत 7 जवान आणि 1 सफाई कामगार असे आठजण मृत्युमुखी पडले आहेत. 😰 रुग्णालयातून आतापर्यंत 80 जवान बरे होऊन घरी गेले आहेत. जवानांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण वाढल्याने दलाच्या 34 अग्निशमन केंद्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 🏥 जवानांपैकी काही जण कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. 📍 सध्या मुंबईत 756 कंटेन्मेंट झोन आहेत. सर्वाधिक कंटेन्मेंट झोन पूर्व आणि पश्चिम उपनगरात वाढत आहेत. 💁‍♂️ शहरासह उपनगरात औषध फवारणी करताना अधिक जवान बाधित झाले आहेत. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरी ED चा छापा* *Letsup | National* ⚡ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाने छापा टाकला आहे. ईडीकडून बायोटेक संधेसारा घोटाळा प्रकरणी अहमद पटेल यांची चौकशी सुरु आहे. 🧐 *नेमके प्रकरण काय?* : 👉 स्टर्लिंग बायोटेक घोटाळा प्रकरणी अहमद पटेल यांच्यावर 15 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. दरम्यान याआधी ईडीकडून अहमद पटेल यांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती आहे. 💁‍♂️ ईडीने अहमद पटेल यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र अहमद पटेल यांनी कोरोनाची परिस्थिती आणि 65 वर्षांवरील वय हे कारण सांगत चौकशीला जाणं टाळलं होतं. 🔎 यानंतर आता ईडीकडून थेट त्यांच्या घरावरच छापा टाकण्यात आला आहे. यानंतर ईडीकडून अहमद पटेल यांचीही चौकशी केली जात आहे. 🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *राज ठाकरेंच्या घरात कोरोनाचा शिरकाव* *LetsUp l Update* ⚡ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'कृष्णकुंज' निवासस्थानी काम करणाऱ्या दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती हाती आली आहे. या दोघांना रुग्णालयात दाखल केले आहे. 💁‍♂️ काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या ताफ्यातील तीन सुरक्षा रक्षकांना व दोन चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. 🏥 त्यापैकी चालकांवर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असून सुरक्षा रक्षक कोरोनामुक्त झाले आहेत. 💫 त्यामुळे धोका टळला असे वाटतानाच आता मनसे अध्यक्ष राज यांच्या घरी काम करणाऱ्या दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मनसैनिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 📌 काही दिवसांपूर्वी कृष्णकुंजपासून काही अंतरावर असणाऱ्या शिवसेना भवनातही कोरोनाचा शिरकाव झाला होता. यानंतर शिवसेना भवनात सॅनिटायझेशन प्रक्रीया केली होती. शिवसेना भवन एका आठवड्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *नगरचा आडते बाजार, डाळमंडई तीन दिवस बंद* *LetsUp l Ahmednagar* ⚡ शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथील आडते बाजारातील व्यापाऱ्यांनी स्वत:हुन तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 👎 *बंद* : रविवार (दि.28) ते मंगळवार (दि.30) असे तीन दिवस मार्केटयार्ड, आडतेबाजार, डाळमंडई, तापकीरगल्ली, दाणेडबरा व परिसरातील व्यापार पेठ बंद ठेवली जाणार आहे. 📄 *पत्रकाद्वारे माहिती* : अहमदनगर आडते बाजार मर्चन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, शांतीलाल गांधी, राजेंद्र बोथरा, संतोष बोरा आदींनी पत्रकाद्वारे दिली आहे. 📌 आडतेबाजार ही जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत जिल्ह्यातून लोक येत असतात, आडतेबाजाराच्या आजुबाजूच्या परिसरातील भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवण्याचा स्वत:हून निर्णय घेतला आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *करोनिलवरुन बाबा रामदेवसह चौघांविरोधात एफआयआर* *LetsUp l Update* ⚡ योगगुरू बाबा रामदेव यांच्या ‘पतंजली आयुर्वेद’ने बनवलेले करोनिल औषध वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या औषधावरुन आता जयपूरमध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य चौघांविरोधात एफआयआर नोंदवली आहे. 💁‍♂️ करोनिल औषधाच्या सेवनामुळे रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरा होतो हा बाबा रामदेव यांचा प्रचार पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे, असा आरोप एफआयआरमध्ये केला आहे. 👮🏻 *एफआयर* : जयपूरच्या ज्योति नगर पोलीस ठाण्यात बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएसचे चेअरमन बलबीर सिंह तोमर आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात करोनिल औषधावरुन दिशाभूल करणारा प्रचार केल्याबद्दल एफआयर नोंदवण्यात आला आहे. बलराम जाखर यांनी एफआयआर नोंदवली आहे. 📌 *आचार्य बालकृष्ण म्हणाले* : पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. “आम्ही वैद्यकीय चाचणीपूर्वी करोनिल गोळ्यांना कधीही वैद्यकीय रित्या आणि कायदेशीररित्या कोरोनाचे औषध म्हटलेच नाही,” असे त्यांनी सांगितले. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *वडगाव मावळ परिसरात गायींवर अ‍ॅसिड हल्ला* *LetsUp l Pune* जिल्ह्यातील वडगाव मावळ परिसरात एका अज्ञात इसमाने चरत असलेल्या गायींवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गाई गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत भरत म्हाळसकर यांनी याबाबत वडगाव पोलीस स्टेशन तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडगाव फाटा परिसरात बुधवार (दि.24) रोजी चार गायी माळरानावर चरण्यासाठी गेल्या असताना एका विकृत वृत्तीच्या व्यक्तीने या गायींवर अ‍ॅसिड हल्ला केला. या गायी हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे विविध संघटनांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात असून, या हल्ला करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर पकडून शिक्षा करण्याची मागणी संघटनांकडून केली जात आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

⛈️ *12 दिवस आधीच मान्सूनने देश व्यापला* *LetsUp l Update* ⚡ नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला आहे. विशेष म्हणजे 12 दिवस आधीच मान्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. 💁‍♂️ *अंदाज* : सर्वसाधरणपणे देशातील मान्सूनची अंदाजित वेळ 8 जुलै आहे, मात्र यंदा 12 दिवस आधीच म्हणजेच 26 जून रोजी त्याने देश व्यापला. यंदाच्या हंगामात 102 टक्के पाऊस पडल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 💦 शुक्रवारी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. सोलापुरातील माळशिरसमध्ये 120 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 🤔 *देश व्यापला* : निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूची वाटचाल मंदावली होती. मात्र, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वेळेआधीच मान्सूनने देश व्यापला. महाराष्ट्रात 11 जून रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात मान्सून दाखल झाला. 📌 मान्सूनची तिसऱ्यांदा रेंगाळलेली वाटचाल 23 जूनला पुन्हा सुरू झाल्यानंतर चार दिवसांतच (दि.26 जून) त्याने संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

👉 *पुण्यातील कोथरूड परिसरात महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या* *LetsUp | Pune* 📍पुण्यातील कोथरूड परिसरात एका महाविद्यालयीन तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. 🙎‍♂️ सूर्यकांत सुभाष बामणे (वय २४, रा. शिल्पा सोसायटी, एमआयटी महाविद्याालय रस्ता, कोथरूड) असे आत्महत्या केलेल्याचे तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ✍️ याबाबत अधिक माहिती अशी की, बामणे कुटुंबीय अनेक दिवसांपासून कोथरूड परिसरातील शिल्प सोसायटीत भाडे तत्वावर राहत होते. सुर्यकांतचे वडील हे सातारा येथे प्राध्यापक म्हणून कामाला असून त्याची आई शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप ॲप*: http://bit.ly/Letsupapp

💥 *मोदी चीनमध्ये फार लोकप्रिय झाले आहेत* *LetsUp | Update* 💫 पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये फार लोकप्रिय झाल्याचे समजत असल्याचा असा टोला काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. 💁‍♂️ *चव्हाण म्हणाले :* ▪️ चीनची घुसखोरी आम्हाला कदापिही मान्य नाही. घुसखोरी रोखणं केंद्र सरकारचं कर्तव्य आहे. ▪️ देशाच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या निर्णयात कॉंग्रेसचा सरकारला पाठिंबा असेल. नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा चीन गैरफायदा घेत असून वाटाघाटी करताना याचा प्रभाव पडणार आहे. ▪️ चीनच्या राष्ट्राध्यक्षांसोबत मोदींचे चांगले संबंध असल्याचं सर्वांना माहिती आहे. त्यांना न दुखावण्याचा त्यामागे काही विचार होता का ? ▪️ पण यामुळे वाटाघाटी करताना भारताची भूमिका दुबळी झाली आहे का ? याचं उत्तर मिळालं पाहिजे. 📌 दरम्यान, लडाखमध्ये भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केलेली नाही वा लष्करी तळही ताब्यात घेतलेले नाहीत असे वक्तव्य नरेंद्र मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत केल होतं. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

👉 *राज्यात कोल्हापूर टॉपला* *LetsUp | Update* जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्यात प्रमाण राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत अव्वल असून कोल्हापूरचा हा रिकव्हरी रेट तब्बल 90.4 टक्के आहे. दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनेला कोल्हापुरातील प्रदूषणविरहित वातावरणाचे पाठबळ मिळाले आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांनी ही माहिती जाहीर केली आहे. 👉 *रुग्ण बरे होण्याची जिल्हानिहाय टक्केवारी* कोल्हापूर - 90.4 परभणी - 87.1 हिंगोली - 84.9 वर्धा - 78.6 गडचिरोली - 78 सिंधुदुर्ग - 77.3 चंद्रपूर - 75.9 नगर - 74.6 उस्मानाबाद - 73.9 बीड - 69.9 सातारा - 69.5 यवतमाळ - 69.1 गोंदिया - 68.3 रत्नागिरी - 66.7 धुळे - 65.8 भंडारा - 65.3 बुलढाणा - 65 लातूर - 64.1 अकोला - 63.7 जालना - 63.3 अमरावती - 63 नागपूर - 62.9 नांदेड - 62.1 रायगड - 60.9 औरंगाबाद - 55.3 नाशिक - 55.2 सांगली - 54.6 पुणे - 54.3 जळगाव - 52.6 मुंबई 50.4 सोलापूर - 46.7 नंदूरबार - 43.4 ठाणे - 39.3 पालघर - 30.3 वाशिम - 23.9 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *नगरमध्ये 15 जणांना कोरोना; जिल्ह्यात 20 रुग्ण* *LetsUp l Ahmednagar* ⚡ शहरात आज 15 जणांना, तर ग्रामीण भागात पाच, असे एकूण 20 जणांना कोरोनाचा ससंर्ग झाला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सत्रातीला हा आकडा सर्वात मोठा ठरला आहे. 💁🏻‍♂️ नगर शहरातील तोफखाना भागात 07, सिद्धार्थनगरमध्ये 04, दिल्ली दरवाजा भागात 02, बालिकाश्रम रोड आणि नालेगावातील वाघ गल्ली येथील प्रत्येकी एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्याचप्रमाणे संगमनेरमधील तीन, जामखेड आणि श्रीरामपूरमधील एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 👉 यामध्ये तोफखाना येथील 80 वर्षीय आणि 59 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष 2 वर्षाचा मुलगा, 22 वर्षीय तरुणाचा तसेच 46 वर्षीय व 90 वर्षीय महिलेचा समावेश आहे. नालेगाव येथील 22 वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे. 📌 सिद्धार्थनगर येथे 8 वर्षीय मुलगी, 30 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष व 25 वर्षीय युवक कोरोना बाधित आढळला आहे. दिल्लीगेट येथील 13 वर्षीय मुलगा, 33 वर्षीय महिला, बालिकाश्रम रोडवरील 45 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. या शिवाय संगमनेर येथील 3 पुरुष, जामखेड येथील 1 पुरुष व श्रीरामपूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

*'हे' राज्य 1 कोटी लोकांना देणार रोजगार* *LetsUp | Trending* ⚡ उत्तर प्रदेश सरकार येणाऱ्या 26 जूनला एकसोबत 1 कोटी लोकांना रोजगार देण्याच्या योजनेवर काम करत आहे. 💁‍♂️ 1 कोटी लोकांना पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत रोजगार दिला जाणार आहे. नोकरी मिळवणाऱ्यांमध्ये 50 टक्के लोक मनरेगा अंतर्गत नोदणी केलेले असतील. 🧐 उत्तर प्रदेश हे पहिले असे राज्य असेल, जे एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरी उपलब्ध करणार आहे. 🏬 मनरेगा व्यतिरिक्त स्किल्ड वर्कर्स स्वरूपात उद्योग, कंपन्या आणि इतर संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. 💫 एकट्या रियलेटर कंपनी नरेडकोने सरकारला 1 लाख लोकांना नोकरी देण्याचे वचन दिले आहे. या रोजगार अभियानमध्ये उत्तर प्रदेशमधील विविध जिल्ह्यांना जोडण्यात आले आहे. 📌 मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी देखील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या योजनेची समिक्षा केली. लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी एखाद्या राज्याशी संबंधित आयोजनात सहभागी होणार आहेत. 🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ* *LetsUp | Corona Live* 💫 महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढतच असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 135796 वर गेली असून आत्तापर्यंत 67706 जणांनी कोरोनावर मात केली. ✨ कोरोनाने आत्तापर्यंत 6283 जणांचा बळी घेतला असून 61,793 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. 💁‍♂️ *महाराष्ट्रात कुठे व किती रुग्ण :* ▪️ मुंबई -66488 ▪️ ठाणे-24388 ▪️ पुणे -15881 ▪️ पालघर-3453 ▪️ औरंगाबाद-3400 ▪️ नाशिक-2762 ▪️ रायगड-2530 ▪️ जळगाव-2258 ▪️ नागपुर-1325 ▪️ अकोला-1188 ▪️ सातारा-840 ▪️ सोलापुर-741 ▪️ कोल्हापुर-741 ▪️ रत्नागिरी-501 ▪️ धुळे-500 ▪️ अमरावती-441 ▪️ जालना-365 ▪️ सांगली-293 ▪️ नांदेड-282 ▪️ अहमदनगर-280 ▪️ हिंगोली-252 ▪️ यवतमाळ-233 ▪️ लातुर-217 ▪️ उस्मानाबाद-76 ▪️ सिंधुदुर्ग-163 ▪️ बुलडाणा-160 ▪️ गोंदिया-101 ▪️ बीड-93 ▪️ परभणी-85 ▪️ नंदुरबार-83 ▪️ भंडारा-75 ▪️ वाशिम-71 ▪️ गडचिरोली-59 ▪️ चंद्रपुर-58 ▪️ वर्धा-14 ▪️ अन्य जिल्हे-114 📌 दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची सदरील जिल्हानिहाय आकडेवारी 22 जून रात्री 10 पर्यंतची आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂️ *बाजारात लवकरच येणार 'कोविड' विमा?* *Letsup | Trending* ⚡ कोरोना पासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे मार्ग अवलंबत
💁‍♂️ *बाजारात लवकरच येणार 'कोविड' विमा?* *Letsup | Trending* ⚡ कोरोना पासून बचाव करण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे मार्ग अवलंबत आहे. अशावेळी आपल्यासाठी एक अनोखी योजना येत आहे. 👉 त्याअंतर्गत जर तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आढळले, तर विमा कंपनी तुम्हाला पैसे देईल. लवकरच यासंदर्भात बाजारात नवीन विमा योजना येऊ शकेल. 🗣️ विमा नियामक आयआरडीएआयने सर्व विमा कंपन्यांना कोरोनासंबंधित फिक्स्ड बेनिफिट कोविड विमा सुरू करण्यास सांगितले आहे. 📍 सर्व कंपन्यांना 30 जून पर्यंत ही विमा योजना सुरू करण्यासाठी सांगण्यात आले आहे. या विम्यानुसार कुणीही कोरोना पॉझिटिव्ह असल्यास विमा कंपन्यांद्वारे निश्चित रक्कम दिली जाईल. 💰 *अशी असेल विम्याची रक्कम?* : ▪️ तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आयआरडीएआयने कोरोना संक्रमणासाठी बाजारात विमा योजना सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ▪️ या विम्याचे प्रीमियम निश्चित करण्याचा निर्णय कंपन्यांकडे आहे. तज्ज्ञांचे म्हणण्यानुसार ग्राहकांना 50 हजार ते 5 लाखांपर्यंत विम्याची रक्कम मिळू शकते. 📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

photo content

😍 *SBI मध्ये 445 जागांसाठी भरती* *LetsUp | Job* 💁‍♂️ *पदाचे नाव व पद संख्या खालीलप्रमाणे* : ● हेड (प्रोडक्ट, इन्वेस्टमेंट & रिसर्च) : 01 ● सेंट्रल रिसर्च टीम (पोर्टफोलिओ एनालिसिस & डेटा ॲनालिटिक्स) : 01 ● सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट) : 01 ● इन्वेस्टमेंट ऑफिसर : 09 ● प्रोडक्ट डेवलपमेंट मॅनेजर (टेक्नोलॉजी) : 01 ● रिलेशनशिप मॅनेजर : 48 ● रिलेशनशिप मॅनेजर (टीम लीड) : 03 ● वाइस प्रेसिडेंट (स्ट्रेस्ड एसेट्स मार्केटिंग) : 01 ● चीफ मॅनेजर (स्पेशल सिचुएशन टीम) 03 ● डेप्युटी मॅनेजर (स्ट्रेस्ड एसेट्स मार्केटिंग) : 03 ● डेप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) : 08 ● बँकिंग सुपरवाइजरी स्पेशलिस्ट : 01 ● मॅनेजर-ॲनीटाईम चॅनल : 01 ● एक्झिक्युटिव (FI & MM) : 241 ● सिनियर एक्झिक्युटिव (सोशल बँकिंग & CSR) : 85 ● सिनियर सिनिअर एक्झिक्युटिव : 06 ● प्रोडक्ट मॅनेजर : 06 ● मॅनेजर (डेटा ॲनालिस्ट) : 02 ● मॅनेजर (डिजिटल मार्केटिंग) : 01 ● फॅकल्टी : 03 ● SME क्रेडिट ॲनालिस्ट : 20 🎓 *शैक्षणिक पात्रता* : 👉 पदवी/ CA/ MBA/ CMA/ ACS/ PGDM/ PGDBM/ PG (मॅनेजमेंट) /BE/ B.Tech./ M.E/ M.Tech 👉 अनुभव 📍 *नोकरी ठिकाण* : संपूर्ण भारत 💸 *फी* : General/ OBC/ EWS : ₹750/- (SC/ ST/ PWD : फी नाही) 🗓️ *ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत* : दि. 13 जुलै 2020 🎯 *अधिकृत वेबसाईट पाहा* : https://sbi.co.in/ 👩‍💻 *ऑनलाईन अर्ज व जाहिरात पाहा* : https://bit.ly/3dpUKzv ✔ *नोकरीपासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्व घडामोडींसाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp