LetsUpp Marathi
الذهاب إلى القناة على Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
إظهار المزيد6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
6 624
💰 देशात सत्तर हजार कोटी रुपये बेवारस
LetsUp | Update
🧐 विविध क्षेत्रात गुंतवणूक केलेली तब्बल सत्तर हजार कोटी रक्कम रुपये बेवारस पडून
💁♂ भारतीय बँकांमध्ये, पोस्टात, शेअर्समध्ये, इन्शुरन्समध्ये कोट्यावधी रुपये बेवारस पडले आहे. या रकमेचे मालक एक तर जिवंत नाहीत किंवा ही गुंतवणूक करून विसरून गेले आहेत. या मुळेच अशा मालकांची रक्कम बेवारस पडून असते.
👀 कोठे किती रक्कम?
▪ इन्व्हेस्टमेंट या कंपनी: पीयरलेस जनरल फायनान्स अॅण्ड इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये 1504 कोटींची गुंतवणूक केलेली आहे.
▪ शेअर्समध्ये 25 हजार कोटी: शेअर्समध्ये गुंतवलेले 25 हजार कोटी बेवारस पडले असून, यातील चार हजार कोटींचे शेअर्स आयईपीएफला हस्तांतरित करण्यात आले आहे.
▪ बँकेत 20 हजार कोटी: जून 2018 च्या आकडेवारीनुसार बँकांमध्ये एकूण वीस हजार कोटी रुपये बेवारस आहे. ज्या बँक खात्यांवर 10 वर्षे कोणीही दावा केला नाही, ती रक्कम बँकांच्या मालकीची होतात.
▪ पोस्टात 9,395 कोटी: पोस्ट ऑफिसमधील खात्यांमध्ये एकूण नऊ हजार 395 कोटी रुपये असून, ही खाती मॅच्युअर झाली असून कोणीही त्यावर दावा केलेला नाही.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
6 624
✈ एअर इंडियाचे सर्व्हर डाऊन, प्रवाशांचे हाल
LetsUp | Update
🎯 तांत्रिक कारणामुळे देशभरात एअर इंडियाची विमानसेवा ठप्प
💁♂ कंपनीचं सीता सर्व्हर आज (दि.27) रोजी पहाटे 3.30 वाजेपासून बंद पडल्यानं एअर इंडियाच्या विमानांची उड्डाणे थांबली आहेत. यामुळे देशभरातील सर्वच विमानतळांवर प्रवासी खोळंबले आहे.
📍 2 हजार प्रवासी अडकले: एका प्रवाश्याने ट्विट करत सांगितले कि, मुंबई विमानतळावर किमान 2 हजार प्रवासी अडकले आहेत.
❗ विमानतळावर अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने, प्रवाशांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण
🗣 सर्व्हर डाऊन झाल्याने हि समस्या उद्भवली आहे. आमचे अभियंते यावर काम करत असून, लवकरच सर्व्हर सुरळीत सुरु होईल, अशी माहिती कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिली.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
6 624
LetsUp News Updates
● श्रीलंकेत पुन्हा स्फोट आणि गोळीबार, संपूर्ण देशात कर्फ्यू
● नरेंद्र मोदींकडे आहे 38,750 रूपये कॅश; एकूण संपत्ती 2.51 कोटी, 5 वर्षात 50 टक्क्यांनी वाढ
● उत्तरप्रदेशातील साखर कारखाने विकीप्रकरणी सीबीआय तपास सुरू
● श्रीलंकेत ‘आयएस’चे 130 संशयित असल्याची माहिती श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी दिली
● भारतीय रिझर्व्ह बँक 20 रुपयांची नवी नोट चलनात आणणार, जुनी नोट चलनात राहणार
● महाराष्ट्रात तापमानात वाढ; बहुतांश ठिकाणी पारा 40 अंश पार
● 60 हजारांहून अधिक पोलीस सज्ज; चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी
----------------------
Advertisment On LetsUp
Contact : 7875190190
----------------------
● IPL: मुंबईचा चेन्नईवर 46 धावांनी दणदणीत विजय
● गार्मीनचा विवोस्मार्ट 4 अॅक्टीव्हिटी ट्रॅकर भारतात सादर
● इरफान खान सोबत 'अंग्रेजी मीडियम' सिनेमा मध्ये झळकणार अभिनेत्री करीना कपूर
● अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील तमाशा कलावंतांना मारहाण प्रकरणी 13जणांविरोधात गुन्हा दाखल
● अहमदनगर : रस्ता काम रखडल्याच्या विषयावरून महापालिकेचे शहर अभियंतावर आंदोलकाने फेकला बूट
● अहमदनगर : केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांची आज राहात्यात सभा
● अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघ लोकसभा निवडणुकीतील जाहीर प्रचार आज थंडवणार
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
6 624
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी
▪ आयएनएस विक्रमादित्य या विमानवाहू नौकेला भीषण आग, आग विझताना लेफ्टनंट कमांडरचा मृत्यू
▪ PM Narendra Modi: सुप्रीम कोर्टाने फेटाळली निर्मात्यांची याचिका; 19 मे नंतर होणार प्रदर्शित
▪ प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी भाजपामध्ये केला प्रवेश
▪ नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनच्या न्यायालयाने फेटाळला, 24 मे पर्यंत पोलीस कोठडीत वाढ
▪ बलात्कार प्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साई दोषी, 30 एप्रिलला शिक्षेचा फैसला
▪ ब्रिटनमधील वेल्समधील पोर्ट तालबोट येथील टाटा स्टीलवर्क्स प्लांटमध्ये तीन स्फोट, 2 जण जखमी
___________
💹 Sensex : 39,067.33 | 🔼 +336.47 (0.87%)
💹 NIFTY: 11,754.65 | 🔼 +112.85 (0.97%)
🌟 Gold Rate : ₹32,905.00 for 10 gm
___________
▪ जम्मू-काश्मिर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग, चीनची कबुली
▪ शाओमीने भारतात लॉन्च केला स्मार्ट एलईडी बल्ब, मोबाइलने करता येईल नियंत्रित
▪ इंग्लडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप 2019 नंतर इयान गूल्ड अंपायरिंगला अलविदा करणार
▪ ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; पहिल्या दिवशी कमावले 1186 कोटी
___________________________
*काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सभा लाईव्ह पाहण्यासाठी क्लिक करा* 👉🏻 ltsup.in/RahulgandhiLive
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
6 624
💁♂🧐 विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात
LetsUp | Education
🎯 भारतामधील महत्वाच्या गोष्टी व घडामोडी यांची सुरुवात कधी व कोठे झाली, याबाबतची माहिती जाणून घेऊ.
▪ पहिले वर्तमान पत्र - द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिके, 29 जाने. 1781)
▪ पहिली टपाल कचेरी - कोलकत्ता (1727)
▪पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन- मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853)
▪ पहिले संग्रहालय - इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)
▪ पहिले क्षेपणास्त्र - पृथ्वी (1988)
▪ पहिले राष्ट्रीय उद्याण- जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)
▪ पहिले रेल्वेस्थानक - बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)
▪ पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे दिल्ली
▪ पहिले व्यापारी विमानोड्डापण- कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)
▪ पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)
▪ पहिले पंचतारांकित हॉटेल- ताजमहाल, मुंबई (1903)
▪ पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)
▪ पहिला बोलपट- आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)
▪ पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा
▪ पहिले जलविद्युत केंद्र - दार्जिलिंग (1898)
▪ पहिला तेलशुद्धीकरण कारखाना - दिग्बोई (1901, आसाम)
▪ पहिला आधुनिक पोलाद कारखाना - कुल्टी, प.बंगाल
▪ पहिले दूरदर्शन केंद् - दिल्ली (1959)
▪ पहिली अनुभट्टी - अप्सरा, तारापूर (1956)
▪ पहिले विद्यापीठ - कोलकत्ता (1957)
▪ पहिला स्कायबस प्रकल्प - मडगाव, गोवा
▪ पहिले रासायनिक बंदर दाहेज - गुजरात
▪ भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा - विजयंता
▪ पहिले टेलिफोन एक्सचेंज - कोलकत्ता (1881)
▪ भारताचे पहिले लढाऊ विमान - नॅट
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
6 624
💁♂ फेसबुक युझर्सची संख्या 8 टक्क्यांनी वाढली
Letsup । Update
⚡ जगभरात 2.38 अब्जाहून अधिकजण वापरतात फेसबुक.
🎯 माहितीनुसार, सोशल नेटवर्किंगचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असून, फेसबुकच्या युजर्स संख्या 8 टक्क्यांनी वाढली आहे.
📍 आकडेवारी:
▪ मार्च 2019 मध्ये 1.56 अब्ज 'डेली अॅक्टीव्ह युजर्स' होते.
▪ 2.1 अब्जापेक्षाही अधिकजण फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप किंवा मेसेंजरचा वापर करतात.
▪ 2.7 अब्ज लोक दरदिवशी फेसबुक कंपनीशी निगडित सोशल नेटवर्किंगचा वापर करतात.
▪ सुमारे 50 कोटी युजर्स फेसबुक स्टोरीज हे फीचर्स वापरतात.
💫 सप्टेंबर 2018 मध्ये फेसबुक स्टोरीज फीचर्सचा वापर करणाऱ्यांची संख्या 30 कोटीपर्यंत गेली होती.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
6 624
📣 खुशखबर! केवळ 20 रुपयांत उघडा सेव्हिंग खातं
LetsUp | Update
⚡ पोस्टाची खास ऑफर, २० रुपयांमध्ये ग्राहक उघडू शकतात सेव्हिंग खाते
🎯 पोस्टात सेव्हिंग अकाऊंट उघडण्यासाठीचे शुल्क इतर बँकेच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. मात्र या खात्यात आपल्याला किमान 50 रुपये बॅलन्स ठेवावा लागतो.
🧐 सुविधा :
▪ बँकेतल्या सेव्हिंग अकाऊंट सारखीच सुविधा मिळणार
▪ ग्राहकाला ATM सेवा उपलब्ध
▪ या अकाऊंटवर 4 टक्के व्याज दिले जाणार
▪ 10 हजारांपर्यंतच्या रकमेवर कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही
▪ दोन ते तीन जण मिळून संयुक्त खातंही उघडू शकतात.
▪ खाते सुरु राहण्यासाठी तीन वर्षांतून एकदा तरी व्यवहार आवश्यक
💫 चेक नको असलेलं सेव्हिंग अकाऊंट 20 रुपयांमध्ये उघडता येणार नाही. त्यात किमान 50 रुपये ठेवावे लागणार आहे. तर चेकची सुविधा असलेलं खातं उघडण्यासाठी 500 रुपये भरावे लागणार, तसेच त्यात कमीत कमी 500 रुपये बॅलन्स आवश्यक आहे.
💁♂ खातं उघडण्यासाठी: सेव्हिंग अकाऊंट उघडण्यासाठी एक फॉर्म भरावा लागतो. हा फॉर्म पोस्ट ऑफिसशिवाय इतर साइटवरून डाऊनलोड करता येतो. अकाउंटसाठी KYC पूर्ण करणे गरजेच आहे.
📍 कागदपत्रे : मतदार कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, ऍड्रेस प्रूफमध्ये बँकेचं पासबुक, पासपोर्ट, रेशन कार्ड, विजेचं बिल, फोनचं बिल, आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तसेच पासपोर्ट साइज फोटो आणि संयुक्त खात्यात इतर खातेधारकांचे फोटो असणं गरजेचं आहे.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
6 624
🚘 मारुती डिझेल कारची विक्री थांबवणार
LetsUp । Update
⚡ मारुती सुझुकी कंपनी डिझेलवर चालणाऱ्या कारचे उत्पादन व विक्री एप्रिल २०२० पासून बंद करणार
💁♂ प्रदूषणविषयक BS-VI नियमावली लागू होत असल्याने कंपनीने घेतला निर्णय. या नियमावलीचे पालन करायचे झाल्यास डिझेल वाहनाचा उत्पादन खर्चात वाढ होऊ शकते. असे कंपनीचे अध्यक्ष आर.सी.भार्गव यांनी सांगितले.
🗓 वार्षिक अहवाल :
▪ मारूतीने मार्च 31 पर्यंत वर्षभरात 17.53 लाख डिझेल गाड्या विकल्या आहेत.
▪ डिझेल कारच्या विक्रीचा कंपनीच्या वार्षिक महसुलात 23 टक्के हिस्सा आहे
▪ मारुतीचा देशांतर्गत प्रवासी वाहन बाजारपेठेत 51 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे
💫 पेट्रोल आणि सीएनजी मॉडेल: मारुती कंपनी आता डिझेल कारऐवजी पेट्रोल आणि सीएनजी व्हेरियंटसोबत काही नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे.
❗ बंदच्या घोषणेनंतर कंपनीचे शेअरमध्ये 1.95 टक्के घसरण
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
6 624
💥 ब्रिटनमध्ये टाटा स्टीलच्या प्रकल्पात स्फोट
LetsUp । Update
⚡ ब्रिटनमधील पोर्ट टॅलबोट वेल्समधील टाटा स्टीलच्या प्रकल्पात झाले तीन स्फोट
💁♂ माहितीनुसार, पहाटे साडेतीनच्या सुमारास झाला स्फोट, यात 2 जण झाले जखमी
🎯 या प्लांटमध्ये 4 हजार हून अधिक कर्मचारी काम करतात. या स्फोटांमुळे स्थानिकांची घरे हादरली तसेच दूरपर्यंत आगीचे लोळ पसरले होते
💫 दरम्यान, प्लांटमध्ये लागलेली आग नियंत्रणात आली असल्याची टाटा स्टीलची माहिती
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
6 624
📣 लवकरच CRPF, BSF, NSG ताफ्यात अत्याधुनिक गाड्या
LetsUp | Update
💁♂ भारत सरकार सुरक्षा दलातील सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन गाड्यांची खरेदी करणार, यासाठी 613 कोटी 96 लाखांचे बजेट पास
📍 यामधून CRPF आणि BSF साठी माईन प्रोटेक्डेट म्हणजेच स्फोटांपासून संरक्षण करणाऱ्या गाड्या, बुलेटप्रूफ जॅकेट, रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार
🧐 राष्ट्रीय सुरक्षा दलासाठी (NSG) 16 कोटी 84 लाखांची तरतूद, या पैश्यांमधून रिमोटने चालणारी सात वाहने (आरओव्ही) विकत घेतली जाणार
👍 या गाड्यांमुळे सुरक्षादलांना नक्षलवादी तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणाऱ्या एलईडी हल्ल्यांना अधिक सक्षमपणे उत्तर देता येईल
🎯 आरओव्हीची (Remotely Operated Vehicle) वैशिष्ट्ये:
▪ या गाड्यांच्या मादतीने इमारती, बस, मेट्रो तसेच रेल्वे स्थानकांमध्ये जवानांच्या उपस्थितीशिवाय एलईडी निकामी करता येऊ शकणार
▪ या गाड्या 15 डिग्रीमध्ये शिड्या तसेच चढ उतार असणाऱ्या ठिकाणी 8 किलोपर्यंतचे वजन घेऊन जाऊ शकणार
▪ या गाड्यांवर एमएमजी गन, एमपी फाइव्ह हत्यारे आणि शॉर्टगन सारखी हत्यारे लावण्याची सोय आहे
▪ या गाड्यांवरील कॅमेरासारख्या सिस्टीमुळे गाडीच्या आजूबाजूचा परिसर रिमोटने ती चालवणाऱ्यांना थेट केबिनमध्ये दिसण्याची सोय, यात एक्स रे स्कॅनर्सचीही सोय उपलब्ध
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
6 624
🎬 Movie Review : कागर
LetsUp | Movie Review
एकीकडे हळूवार प्रेम आणि दुसरीकडे राजकारणाचा पट मांडणारा आणि वास्तवाला थेट जाऊन भिडणारा हा 'कागर' अखेर प्रदर्शित झाला. अस्सल गावरान भाषा, मातीतील गोडवा आणि गावपातळीवर रंगणारं राजकारण या चित्रपटामध्ये उत्तमरित्या रेखाटण्यात आलं आहे.
🤔 कथा : विराईनगर येथे आमदारकीसाठी एकाच राजकीय पक्षामधील दोन व्यक्तींमध्ये वैर निर्माण झालेलं असतं. या वैराचा फायदा पक्षातील तिसरीच व्यक्ती घेते. प्रभाकर देशमुख अर्थात गुरुजी (सुहास पळशीकर) हे राजकीय गुरु असतात. मात्र आपल्या लेकीने प्रियदर्शनी देशमुख अर्थात राणीने (रिंकू राजगुरू) आमदारकी लढावी असा त्यांचा मानस असतो.
यासाठी ते युवराजला (शुभंकर तावडे) त्यांचा मोहरा बनवतात. मात्र राणीवर प्रेम करणाऱ्या आणि गुरुजींवर विश्वास ठेवणाऱ्या युवराजला त्यांचा डाव समजतच नाही. परिणामी युवराज यात फसतो. मग राणीचा संघर्ष सुरु होतो. मग राणी नक्की काय करते? युवराजचं काय होतं? यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
🎭 कलाकारांचा अभिनय : चित्रपटात वेगवेगळ्या टप्प्यांवरील बदलत जाणारा रिंकूचा अभिनय बघताना लाजवाब वाटतो. शुभंकर तावडेने आपल्या पहिल्याच प्रयत्नात बाजी मारली आहे.
तसेच इतर सहकलाकार मिलिंद फाटक, महेश भोसले, उमेश जगताप, शशांक शिंदे यांनी देखील आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे.
🎶 संगीत कसे? : संगीत छान आहे. चित्रपटामधील काही गाणी अगोदरच हिट झाली आहे. योग्य प्रसंगानुरुप या गाण्यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट पाहताना मजा येते.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद मानेची ही ग्रामीण भागातील अत्यंत साधी आणि सरळ कथा नक्कीच पाहण्यासारखी आहे. रिंकूच्या चाहत्यांसाठी तर वेगळं सांगण्याची गरज नाही.
⭐ Ratings: 3/5
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
6 624
📈 आशिया खंड; जीडीपी वाढ, 2019
LetsUp | Statistics
▪ बांगलादेश : 7.3%
▪ भारत : 7.3%
▪ व्हिएतनाम : 6.5%
▪ फिलिपिन्स : 6.5%
▪ म्यानमार : 6.4%
▪ चीन : 6.3%
▪ इंडोनेशिया : 5.2%
▪ मलेशिया : 4.7%
▪ कझाकस्तान : 3.2%
▪ पाकिस्तान : 2.9%
▪ यूएई : 2.8%
▪ इराक : 2.8%
▪ दक्षिण कोरिया : 2.6%
▪ सौदी : 1.8%
▪ रशिया : 1.6%
▪ जपान : 1%
▪ तुर्की : -2.5%
▪ इराण : -6%
(IMF)
🧐 जीडीपी म्हणजे काय? : कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं सकल राष्ट्रीय उत्पन्न द्योतक आहे. एका विशिष्ट कालावधीत देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच जीडीपी होय.
● जीडीपीचा दर देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रतीक असते.
● जीडीपीची आकडेवारी दर तिमाहीला प्रसिद्ध होते.
● कृषी, उद्योग आणि सेवा या तीन आघाड्यांवर उत्पादन वधारले किंवा घटण्याच्या सरासरीद्वारे जीडीपीचा दर ठरवला जातो.
● जीडीपीचा दर वधारला असेल तर आर्थिक विकासाचा दर उंचावला असे म्हणता येते. जीडीपीचा दर घटला असेल तर देशाची आर्थिक स्थिती खालावली असे म्हटले जाते.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
6 624
LetsUp News Updates
● लष्करात प्रथमच महिला जवान; ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू, नोंदणीसाठी 8 जून अखेरची तारीख
● माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) दलबीर सिंह सुहाग यांची सेशेल्समध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती
● अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष जो बिडेन पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणूकीच्या शर्यतीत उतरणार
● महाराष्ट्र पोलिसांच्या गणवेशात अतिरिक्त टोपीचा समावेश, आता बेसबॉल प्रकारातील टोपी दिसणार
----------------------
Advertisment On LetsUp
Contact: 7875190190
----------------------
● राज्यात 1 हजार 381 जणांना स्वाइन फ्लूची लागण, योग्यवेळी उपचार मिळाल्याने 1 हजार 62 रुग्ण झाले बरे
● राजस्थानकडून कोलकात्याचा 3 विकेट्सनी पराभव, वरुण अॅरॉन ठरला सामनावीर
● अजिंक्य रहाणेचं काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पण, हॅम्पशायरकडून खेळणारा पहिला भारतीय ठरला
● आयसीसीकडून ओमान आणि अमेरिकेच्या क्रिकेट संघांना आंतरराष्ट्रीय वन-डे संघांचा दर्जा बहाल
● मारुती सुझुकीचा मोठा निर्णय, 1 एप्रिल 2020 पासून डिझेल कारचं उत्पादन थांबणार
● अंग्रेजी मीडियममध्ये इरफान खानसोबत अभिनेत्री करिना कपूर झळकणार
● अहमदनगर - एएमटी शहर बससेवा वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सुरू होणार, प्रारंभी 15 बस सुरू करण्यात येणार
● अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघात मतदान कर्मचारी वाहतुकीसाठी एसटी महामंडळाच्या 193 बसेसची मागणी; मतदानाच्या आदल्या दिवशी बसेस होणार रवाना
● अहमदनगर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या शनिवारी (दि.27) श्रीरामपूरला; शिर्डीतील युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्यासाठी घेणार प्रचार सभा
● अहमदनगर - शहरात पाणीपुरवठ्याचे आव्हान; दुष्काळी स्थितीमुळे नगरकरांनी उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup CDC
6 624
🗞 आज दिवसभरातल्या संक्षिप्त घडामोडी
▪ ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला
▪ वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भव्य रोड शो, उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज
▪ सरन्यायाधीश गोगोई यांच्याविरोधातील आरोपांची होणार चौकशी
▪श्रीलंका बॉम्ब स्फोटाचे सत्र सुरूच, कोलंबोजवळील पुगोडा गावात झाला स्फोट
▪1993 च्या मुंबई सिरियल बॉम्ब स्फोटातील आरोपी अब्दुल गनी तुर्क याचा नागपूर मध्यवर्ती कारागृहात मृत्यू
_______________________
💹 Sensex : 38,730.86 | 🔻 -323.82 (0.83%)
💹 NIFTY: 11,640.80 | 🔻 -84.35 (0.72%)
🌟 Gold Rate : ₹32,900.00 for 10gm
_______________________
▪ दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामध्ये 51 नागरिकांचा मृत्यू
▪ दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका सरकार देशात बुऱख्यावर बंदी घालण्याचा विचारात
▪ चीन कंपनी शाओमीने लॉंच केली HIMO T1 इलेक्ट्रीक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 120 किमी धावणार
▪ नेमबाजी वर्ल्डकपमध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी, मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी पटकावले सुवर्णपदक
▪ तामिळमधील सुपरस्टार विजयबरोबर 'थलपती सिनेमात' शाहरुख साकारणार व्हिलनची भूमिका
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
6 624
📣 जगात हॅकिंग क्षेत्रात भारत दुसऱ्या स्थानी
LetsUp । Update
⚡ जगातील अकाऊंट हॅकिंग क्षेत्रात अमेरिका पाठोपाठ भारत देश दुसऱ्या स्थानावर
💁♂ क्लाउड डिलिव्हरी नेटवर्क अकमाई टेक्नॉलॉजीच्या 'स्टेट ऑफ इंटरनेट/सिक्युरिटी' या रिपोर्टनुसार, भारतात एका सेकंदाला 30 हॅकिंगचे प्रकार समोर येत आहे. तसेच 120 कोटींपेक्षा अधिक अकाउंट धोक्यात असल्याचे या अहवालात समोर आले आहे.
🗓 रिपोर्टनुसार, प्रत्येक हॅकिंगमध्ये कुणीतरी व्यक्ती अथवा संगणकाद्वारे अन्य अकाउंटची माहिती चोरून युझरनेम अथवा पासवर्ड जनरेट करण्यासाठी लॉग इन केले आहे.
🎯 सायबर हल्ल्यात अमेरिका आणि भारतानंतर कॅनडा तिसऱ्या नंबरवर आहे. अमेरिकेत 2018 मध्ये 125 कोटी, भारतात 120 कोटी तर कॅनडात 102 कोटी हॅकिंगचे प्रयत्न झाले आहे.
🧐 या क्षेत्रांवर सायबर हल्ला : सायबर हल्ल्यामध्ये मीडिया, मनोरंजन, रिटेल आणि गेमिंग ही क्षेत्रं आघाडीवर आहेत.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
6 624
💁♂ फिटनेस क्षेत्रात करिअर
LetsUp । Career
प्रकृतीच्या तक्रारी दूर करण्यासाठी अनेक व्यक्ती फिट राहण्याचा प्रयत्न करतात. फिटनेससाठी जिम, योगा, एरोबिक्स, मार्शल आर्ट, नृत्य, चालणे, धावणे या व्यायाम प्रकारांची मदत घेतात. या क्षेत्रात तज्ज्ञ प्रशिक्षकांची गरज असून, जर या क्षेत्रांत उत्तम प्रशिक्षण प्राप्त केले तर प्रशिक्षक म्हणून करिअर घडवता येणे शक्य आहे.
🎯 फिटनेस ट्रेनरचे प्रकार :
▪ विशेष ट्रेनर : हा एखाद्या खास विषयातील प्रशिक्षित आणि तज्ञ असतो.
▪ वैयक्तीक ट्रेनर : हा खास व्यक्तिगतरीत्या एकावेळी एकाच व्यक्तीला प्रशिक्षण देतो.
▪ जिम ट्रेनर : हा जिममध्ये सामूहिकरीत्या तिथल्या साहित्याचा वापर कसा करावा याविषयीची माहिती देतो.
🧐 पात्रता : फिटनेस ट्रेनर प्रशिक्षणासाठी किमान बारावी पास असणे आवश्यक आहे.
📍 कामाचे स्वरुप : फिटनेस ट्रेनर हा लोकांना व्यायामाचे बारकावे, पद्धती शिकवतो. सुदृढ व सशक्त शरीरासाठी प्रशिक्षक योग्यरीत्या मार्गदर्शन करतात. व्यक्तीच्या आहाराचे नियोजन प्रकृतीनुसार बनवून देतो.
👉🏻 हे गुण आवश्यक : फिटनेस ट्रेनर म्हणून काम करताना व्यावसायिकरीत्या प्रशिक्षित असणे गरजेचे असते. या क्षेत्रात जनसंपर्क सतत होत असल्याने संवाद कौशल्यही अवगत करावे लागते.
💰 वेतन :सुरवातीला या क्षेत्रात अल्प वेतनावर काम करावे लागते. एकदा का तुमचे नाव आणि कामाचा दर्जा लोकांना भावला की चांगल्या पद्धतीने कमाई होते. तसेच स्वत: जिमच्या माध्यमातून स्वतंत्र व्यवसाय करता येतो.
🏤 इन्स्टिट्युट्स :
• इंदिरा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्यु. अँड स्पोर्टस सायन्स दिल्ली, संकेतस्थळ- www.igipess.du.ac.in
• साई एनएस साउथ सेंटर युनिव्हर्सिटी बेंगलोर, संकेतस्थळ- www.saisouth-bangalore.com
• अष्टांग योग रिसर्च इन्स्टिट्यूट चेन्नई, संकेतस्थळ - www.ashtanga.com
• तालवॉकर्स अॅकॅडमी मुंबई, संकेतस्थळ- www.talwalkars.net
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
6 624
✈ जगातील पहिले प्लॅस्टिक-फ्री पॅसेंजर विमानाचे उड्डाण
LetsUp । Update
⚡ प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरूद्ध जागरूकता वाढविण्यासाठी युएईच्या इतिहाद एअरवेजने प्लॅस्टिकच्या वापराशिवाय उड्डाण केले.
🎯 प्लास्टिकपासून वाढणारे प्रदूषण कमी करण्यासाठी इतिहाद विमान कंपनीने हा उपक्रम सुरू केला आहे. असा उपक्रम राबविणारी हि खाडी क्षेत्रातील पहिली प्रमुख विमान कंपनी आहे. जगातील पहिले प्लॅस्टिक फ्री विमान EY484 22 एप्रिल म्हणजेच जागतिक वसुंधरा दिवशी ब्रिस्बेन विमानतळावर उतरले.
💁♂ टिकाऊ वस्तूंचा वापर : एकदाच वापरात येणाऱ्या अशा 95 प्लॅस्टिक वस्तूंचा वापर एअरलाइनने टाळला आहे. याजागी टिकाऊ वस्तूंचा वापर केला आहे. इको-थ्रेड चादर, गोळीच्या आकाराची टूथपेस्ट अशा अनेक टिकाऊ गोष्टींचा वापर करण्यात आला आहे.
👉 या निर्णयामुळे एका विमानातून 50 किलो कचरा नष्ट केला जातो आहे.
📍 इतिहादने या वर्षअखेरीस आपल्या फ्लाइट सेवांमधून 100 टन प्लास्टिक काढून टाकण्याची योजना आखली आहे.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
6 624
📣 आज जागतिक मलेरिया दिवस
Letsup । Special
🎯 मलेरिया रोगाचे गांभीर्य लक्षात घेता 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस म्हणून ओळखला जातो. 'मलेरिया' हा आजार एका विषाणूच्या संक्रमणाने होत असून तो एनोफिलिस जातीचा डास चावल्याने होतो. मानवाच्या शरीरात विषाणू प्रवेश करून पोटात जातात व आपली संख्या वाढवितात. त्यानंतर तांबड्या रक्त पेशींमध्ये ते स्वतःहून मिसळतात.
🧐 मलेरियाची लक्षणं:
▪ ताप: ताप हे मलेरियाचे प्रमुख लक्षणं असून, अधिक दिवस ताप येत असेल तर वेळीच वैद्यकीय उपचार घ्यावे.
▪ डोकेदुखी: मलेरियाच्या रुग्णांना तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो. थंडी-तापासोबत जर डोकेदुखीचा त्रास होत असेल तर वेळीच मलेरियाची तपासणी करून घ्या.
▪ थंडी: मलेरियाच्या रुग्णांना, वातावरण गार नसेल तरीही थंडी भरते. अशावेळेस डॉक्टर्स अनेकदा रक्ततपासणीचा सल्ला देतात.
▪ घाम येणे: जर तुम्हाला मलेरिया असेल तर रुग्णाला सतत घाम येण्याचे प्रमाण देखील अधिक असते.
▪ मळमळ व उलट्या: मलेरियामध्येही उलट्या होणे हे लक्षण प्रामुख्याने आढळून येते. तसेच अंगदुखी, खोकला ही लक्षणं आढळतात.
💁♂ उपाय :
▪ कुंड्या, बादली, टाकी यात पाणी अधिक काळ साठवून ठेवू नका.
▪ घरच्या आजूबाजूला खोल ठिकाणी पाणी जमा होऊ देऊ नका.
▪ खूप डास असलेल्या ठिकाणी नेहमी फुल कपडे घाला.
▪ घरामध्ये मच्छरदाणीचा वापर करा.
▪ रक्त तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घ्या.
▪ जर आपण औषधे पूर्ण डोस घेतले नाही तर मलेरिया पुन्हा होऊ शकतो.
📍 गेल्या वर्षी भारतातील 18 लाख नागरिकांना मलेरिया झाला होता. जगात दरवर्षी 30 ते 50 कोटी नागरिक मलेरियाने ग्रस्त असतात. जगात प्रती 30 सेकंदांना 1 बालक मलेरियाला बळी पडतो.
💫 लस उपलब्ध : आफ्रिकेतील मलावी येथे जगातील पहिली मलेरिया प्रतिबंधक लस उपलब्ध झाली आहे. या लसीला 'आरटीएस' नाव देण्यात आले.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
6 624
🎭 नटश्रेष्ठ शाहू मोडक यांची आज 101 वी जयंती
LetsUp । Special
मराठी सिनेसृष्टीतील नावाजलेले अद्वितीय व्यक्तिमत्व अर्थात अभिनेते शाहू मोडक. प्रसिद्धी पैसा यांसाठी कलाकार काम करतात परंतु काहीजण केवळ कलेसाठी जगतात त्यातील एक नाव म्हणजे शाहू मोडक होय. आज त्यांची 101 वी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा...
🎯 शाहू मोडक यांचा जन्म 1918 साली अहमदनगर येथे झाला. संत ज्ञानेश्वर, माझा मुलगा, माणूस, अशा 29 चित्रपटांत त्यांनी कृष्णाची भूमिका साकारली. त्यांची भूमिका इतकी लोकप्रिय झाली कि, लोक संत ज्ञानेश्वर म्हणून त्यांचेच फोटो घरी, देवघरात लावत असत.
🎬 पहिला बोलपट : शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट ‘श्यामसुंदर’ आणि मुख्य म्हणजे पुण्यात निर्माण झालेला हा पहिला बोलपट होता. भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात रौप्यमहोत्सवाचा पहिला मान ‘श्यामसुंदर’ला मिळाला. मुंबईच्या ‘वेस्टएन्ड’ (नाझ) या चित्रपटगृहात तो सलग 27 आठवडे पडद्यावर झळकत होता. शिवाय मराठीबरोबर त्याची हिंदी व बंगाली आवृत्तीही काढण्यात आली होती.
🎞 अजरामर कामगिरी : माणूस, औट घटकेचा राजा, श्याम सुदंर, अमरसमाधी, नरसी महेता, झाला महार पंढरीनाथ अशा अनेक चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या.
💫 शाहू मोडक यांचा ज्योतिषाचा अभ्यास चांगला होता. निर्मात्यांना चित्रपटाच्या शुभारंभासाठी व चित्रिकरणाचे महुर्तही ते काढून द्यायचे. अशा या अद्वितीय कलाकाराचे 11 मार्च 1993 रोजी निधन झाले.
👍 लेट्सअपचे ताजे व निवडक अपडेट मिळवण्यासाठी आजच जॉईन करा लेट्स अप टेलिग्राम चॅनेल : https://telegram.me/letsup
