LetsUpp Marathi
الذهاب إلى القناة على Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
إظهار المزيد6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
6 624
🗑 गुगलने प्ले स्टोअरवरून काढली धोकादायक अॅप्स!
Letsup I Update
गूगलने मोबाईलसाठी धोकादायक असणारी काही अॅप्स प्ले स्टोअरवरुन काढून टाकली आहेत. विशेष म्हणजे काढून टाकलेली अॅप्स ही क्युआर कोड स्कॅनशी संबंधित आहेत.
क्यू आर कोड फ्री स्कॅन, क्यु आर कोड स्कॅनर प्रो, क्यु आर कोड स्कॅन बेस्ट, क्युआर कोड / बार कोड फ्री स्कॅन, क्युआर अॅण्ड बारकोड स्कॅनर, स्मार्ट कॉम्पास, स्मार्ट क्युआर स्कॅनर अॅण्ड जनरेटर ही अॅप्स गूगलने प्ले स्टोअरवरुन काढून टाकली आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
⚠ दर चार मिनिटांनी होतो एकाचा अपघाती मृत्यू!
Letsup I Update
देशात दर 4 मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असून रस्ते अपघातात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'अॅक्सिडेंट इंडिया 2016' या महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसने प्रकाशित केलेल्या अहवालातून हि माहिती समोर आली आहे. यासोबतच राज्यात 1 हजार 210 अपघातस्थळे असून त्यातील सर्वाधिक अपघातप्रवण स्थळे मुंबईत आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📣 मानवी शरीरातील सर्वात मोठ्या अवयवाचा शोध?
Letsup I Update
मानवी शरीरातील एका नव्या अवयवाचा शोध शास्त्रज्ञांनी लावला असून इंटरस्टिटियम हा शरीरातील सर्वात मोठा अवयव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, हा एकसंघ अवयव असून यामध्ये द्रवपदार्थाने भरलेल्या कप्प्यांचे जाळे आहेत. हे जाळे आकुंचित पावू शकते किंवा प्रसारित होऊ शकते. त्यामुळे हा अवयव शॉक अॅब्झॉर्बरप्रमाणे काम करतो.
गेल्या अनेक वर्षांपासून शरीरात 79 अवयव असतात, ही ठाम समजूत होती. मात्र आता इंटरस्टिटियम हा मानवी शरीरातील 80 वा व सर्वात मोठा अवयव ठरणार आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - जीसॅट-6 ए (GSAT-6A) या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, पुढील 10 वर्षांपर्यंत हा उपग्रह देणार सेवा
🔅 नवी दिल्ली - मानवी शरीरातील इंटरस्टिटियम हा सर्वात मोठा अवयव शोधून काढल्याचा शास्त्रज्ञांचा दावा
🔅 नवी दिल्ली - नोटाबंदीच्या काळातील 101 कोटी तुटीत दाखवण्याच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
🔅 नवी दिल्ली - सचिन तेंडुलकरने काश्मीरमधील एका शाळेला इमारत उभारण्यासाठी 40 लाख रुपयांचा निधी दिला
🔅 व्हेनेझुएला - पळून जाण्यासाठी कैद्यांनी लावलेल्या आगीत 68 जणांचा मृत्यू, व्हेनेझुएला येथील घटना
🔅 मुंबई - आम्हालाही सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पेन्शन द्या, माजी आमदारांची मुख्यमंत्र्यांसह राज्यपालांकडे मागणी
🔅 मुंबई - अंगणवाडीच्या आवारात परस बागेची निर्मिती, बालमृत्यू व कुपोषण निर्मूलनासाठी सरकारचा निर्णय
🔅 सिंधुदुर्ग - जगातील सर्वोत्कृष्ट बीचच्या यादीत भोगवे किनारा, ब्लू फ्लॅग पुरस्काराने करण्यात आला सन्मान
🔅 पुणे - एटीएसने अटक केलेल्या पाच बांगलादेशी दहशतवाद्यांना पाच एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
🔅 सिडनी - चेंडू छेडछाड प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी प्रशिक्षक पद सोडले
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
💥 अण्णा हजारे यांचे उपोषण मागे
Letsup I Update
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे सात दिवसांपासून सुरु असलेले उपोषण अखेर केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सुटले.
जनलोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक प्रक्रियेत सुधारणा अशा 11 प्रमुख मागण्यांसाठी अण्णा हजारे 23 मार्च, शहीद दिनापासून दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हाताने जल प्राशन करुन अण्णांनी उपोषण सोडले. यानंतर अण्णा म्हणाले, की सरकारने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📡 Tata Sky ची बंपर ऑफर!
Letsup I Update
टाटा स्कायने 75 रुपयांचा एक नवा प्लॅन सादर केला आहे. यासाठी युजर्संना अतिरिक्त इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता नाही. हा कंटेंट फक्त मोठ्या स्क्रीनवर नाही तर मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या गॅजेट्सवरही उपलब्ध आहे.
यात सिनेमा, टेलिव्हीजन, हॉलिवूड नाही तर जगभरातील स्टोरीज जाहिरातमुक्त पाहायला मिळतील. यात 650 तासांचा कंटेंट असेल. पहिल्यांदाच डीटीएच प्लेटफॉर्म जाहिरात मुक्त सेवा प्रदान करत आहे. हे 24 तास चालेल आणि अधिकतर शो असे असतील की भारतातील टी.व्ही. वर उपलब्ध नसतील. लवकरच मोबाईलप्रमाणे डीटीएच आणि केबल सेवा पोर्ट करण्यात येईल. यात तुम्हाला कोणतीही सेवा निवडण्याचे स्वातंत्र मिळेल.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🎯 दोन वर्षांत 72 हजार पदे भरणार : मुख्यमंत्री
Letsup I Update
राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये दोन वर्षांत 72 हजार पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यातील निम्मी पदे पहिल्या टप्प्यात, तर उर्वरित दुसऱ्या टप्प्यात भरली जाणार आहेत.
कृषी विभागात 2500, पशुसंवर्धन 1047, मत्स्यविकास 90, ग्रामविकास 11 हजार, आरोग्य 10 हजार 568, गृह 7111, सार्वजनिक बांधकाम 8337, जलसंपदा 8227, जलसंधारण 2423 आणि नगरविकास विभागात 1500 अशी एकूण 36 हजार पदे पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🎬 'या' चित्रपटाच्या टीझरचा विश्वविक्रम; नक्की पहा!
Letsup I Update
साऊथ सुपरस्टार महेश बाबूच्या आगामी ‘भारत अने नेनू’ या चित्रपटाच्या टीझरने विश्वविक्रम केला आहे. जगभरात सर्वाधिक ‘लाईक्स’ मिळवणाऱ्या चित्रपटांच्या टीझरच्या यादीत या चित्रपटाचा टीझर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
कोरटला शिवा दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथानकाची पार्श्वभूमी राजकारणाशी संबंधित आहे. यामध्ये महेश बाबूसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाविषयी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
टीझर पाहण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/1pJsyK
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
⚡ आता कुठेही स्वस्त धान्य घेता येणार
Letsup I Update
एक एप्रिलपासून राज्यात कोणत्याही शहरातील स्वस्त धान्य दुकानातून रेशनकार्ड धारकाला धान्य खरेदी करता येणार आहे.
कारण राज्याच्या पुरवठा विभागाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील सुधारणेसाठी आधार बेस्ड पब्लिक डिस्ट्रिब्युशन (एईपीडीएस) ही प्रणाली विकसित केली आहे. रेशनकार्डधाकांना आधार लिंक आवश्यक असून, ज्यांचे आधार लिंक झाले नाही, त्यांना तात्पुरत्या स्वरूपात कूपन दिले जाणार आहे. त्यावरून तो धान्य खरेदी करू शकतो.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp News Updates
● नवी दिल्ली - प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्यातील 15 शहरांतील गरिबांसाठी आणखी 10 हजार 639 घरे मंजूर
● नवी दिल्ली - देशातील औद्योगिक उत्पादन निर्देशांक 8-9 टक्के वाढेल, मागील दोन महिन्यात वेग वाढला; स्टेट बँकेचा संयुक्त निर्देशांक अहवाल जारी
● नवी दिल्ली - केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी असलेल्या एअर इंडियातून 76 टक्के हिस्सा विकण्याचा घेतला निर्णय
● नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या व्यक्तींना दंड ठोठावत 1,097 कोटी रुपये केले गोळा
● बीजिंग - चीनची पहिली प्रायोगिक अंतराळ प्रयोगशाळा 31 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान पृथ्वीवर कोसळण्याची शक्यता
● कन्नडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जयंती यांच्या निधनाची बातमी ही अफवा आहे, कुटुंबीयांनी दिले स्पष्टीकरण
● चेन्नई - इस्रो कम्युनिकेशन सॅटेलाइट जीसॅट-6 चे आज गुरुवारी सायंकाळी 4.56 वाजता श्रीहरिकोटातून प्रेक्षपण होईल
● मुंबई - येत्या दोन वर्षात राज्य सरकारकडून रिक्त पदांची (72 हजार) भरती होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली घोषणा
● नवी दिल्ली - मादाम तुसाँ म्युझियममध्ये आता भारताचा कर्णधार विराट कोहलीचा मेणाचा पुतळा बनवण्यात येणार
● मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला फोर्ब्स '30 अंडर 30 आशिया'च्या 2018 च्या यादीत स्थान मिळाले
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🖊 10 वी, 12 वीचे फुटलेले पेपर पुन्हा होणार!
Letsup I Update
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई दहावी आणि बारावीचे फुटलेले पेपर पुन्हा घेणार आहे. त्याबाबतचे वेळापत्रक लवकरच सीबीएसईच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून बोर्डाने दहावीचा गणिताचा आणि बारावीचा अर्थशास्त्राचा पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
⚡ स्मिथ-वॉर्नरवर एक वर्षाची बंदी; IPL लाही मुकणार
Letsup I Update
बॉल टॅम्परिंग प्रकरणी ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथ व उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची तर चेंडू कुरतडणारा कॅमेरून बँक्रॉफ्ट याच्यावर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानंतर बीसीसीआयनेही मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही स्मिथ-वॉर्नरला खेळता येणार नाही, असे आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📣 RBI जारी करणार 350 रुपयाचं नाणं!
Letsup I Update
गुरु गोविंद सिंह महाराज यांच्या 350 व्या प्रकाशोत्सवाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांसाठी आरबीआय 350 रुपयांचं नाणं बाजारात आणणार आहे. ही नाणं फारच कमी कालावधीसाठी जारी केली जाणार आहेत. आरबीआयकडून अशाप्रकारची नाणी खास निमित्तासाठी जारी केली जातात.
👉 350 रुपयांच्या नाण्याचं वैशिष्ट्य :
▪ चांदी, तांबे, निकेल आणि झिंक धातूमिश्रित 350 रुपयांचं हे नाणं 44 एमएमचं असेल
▪ नाण्याच्या पुढच्या भागात अशोक स्तंभ असेल आणि त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेलं असेल
▪ नाण्याच्या दोन्ही बाजूंना इंग्लिशमध्ये इंडिया आणि देवनागरीत भारत लिहिलेलं असेल. याच भागात रुपयाचं चिन्ह आणि मध्ये 350 मुद्रीत असेल
▪ नाण्याच्या मागील भागावर इंग्लिश आणि देवनागरीत श्री गुरु गोविंद सिंह यांचा 350 वा प्रकाश उत्सव लिहिलेलं असेल. यावर 1666-2016 हे देखील मुद्रीत केलेलं असेल
▪ या नाण्याचं वजन 34.65 पासून 35.35 ग्रामच्या दरम्यान असेल
▪ या नाण्यात चांदीचं प्रमाण 50 टक्के, तांबे 40 टक्के, निकेल पाच टक्के आणि झिंक पाच टक्के असेल
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🎒 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा निर्णय मागे
Letsup I Update
परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत घोषणा केली असून आपण अधिकाऱ्यांना बोलावून सूचना देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याआधी शिक्षण विभागाने मार्चमध्ये परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🚆 कल्पना सुचवा आणि मिळवा 10 लाख
LetsUp I Updates
रेल्वेच्या विकासासाठी तुम्हाला हटके आणि वेगळी कल्पना सुचवायची आहे. याद्वारे तुम्ही घरी बसून 10 लाखापर्यंत कमवू शकता. इन्कम वाढविण्यासाठी रेल्वेने प्रयत्न सुरु केले असून यासाठी 'How to Raise Money For Railways To Provide Better Services' अशी एक योजना सुरु केली असून यासाठी हि स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्याला 5 लाख रुपये आणि तिसरा क्रमांक पटकावणाऱ्या 3 लाख रुपये मिळणार आहेत. याशिवाय चौथा क्रमांक पटकावणाऱ्याला 1 लाख रुपये मिळणार आहेत.
तुम्ही सुचवलेली कल्पना हि एक हजाराहून अधिक शब्दांची असता कामा नये. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 19 मे शेवटची तारीख असून तुम्ही तुमची आयडिया इंग्रजी अथवा हिंदी भाषेत देऊ शकता. या स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर https://innovate.mygov.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करा.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡
6 624
🎒 शाळांची सुट्टी लांबणार; आता 1 मेपासून सुट्टी!
LetsUp I Updates
वार्षिक परीक्षा संपली की शाळेचे वर्ष संपते व विद्यार्थ्यांना सुट्टी लागते. मात्र आता पहिली ते नववीच्या राज्यमंडळाच्या शाळा 1 मे पर्यंत सुरू ठेवाव्यात असे आदेश विद्या प्राधिकारणाने दिले आहेत. त्यामुळे 1 मे पर्यंत विद्यार्थी व शिक्षकांना शाळेत येणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, शाळांमधील पहिली ते नववीचे वर्ग 1 मेपर्यंत सुरू राहतील. या कालावधीत उन्हाळी शिबीर आणि इतर उपक्रम राबविले जातील. त्यामुळे वर्गातील उपस्थिती विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे. दुसरीकडे या निर्णयावर चोहो बाजूने टीका होत आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡
6 624
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - तात्काळ अटक रोखण्यावर पुनर्विचार करावा, अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल केंद्र सरकारची याचिका
🔅 नवी दिल्ली - मोदींविरोधात तिसऱ्या आघाडीसाठी मोटबांधणी, ममता बॅनर्जींकडून शरद पवार, संजय राऊत यांची भेट
🔅 नवी दिल्ली - मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश, कारवाईचा अहवाल 8 मेपर्यंत सादर करण्याच्या सूचना
🔅 नवी दिल्ली - अण्णा हजारे यांनी केंद्राच्या मसुद्यात अनेक त्रुटी दाखवल्या, आंदोलन आणखी लांबण्याची शक्यता
🔅 नवी दिल्ली - येत्या 2 एप्रिलला डॉक्टरांचा देशव्यापी संप, नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला डॉक्टरांचा विरोध
🔅 मुंबई - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधकांनी दाखल केलेला अविश्वासाचा ठराव मागे घेतला
🔅 मुंबई - भाजपकडून युतीसाठी हालचाली, मुनगंटीवारांवर चर्चेची जबाबदारी, शिवसेना ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत
🔅 नवी दिल्ली - पी. व्ही. सिंधू, अनुष्का शर्मा आणि स्मृती मंधाना या तिघीही फोर्ब्सच्या यादीत झळकल्या
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
👁 अण्णांच्या आंदोलनावर भाजपची छुपी नजर?
Letsup I Update
जनलोकपालसह इतर मागण्यांवर सुरु असलेल्या उपोषणावर भाजपची छुप्या पद्धतीने नजर आहे, असा गंभीर आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या कोअर कमिटीने केला आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर पाचव्या दिवशीही अण्णांचे उपोषण सुरुच आहे.
आंदोलनात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे आऊटपुट दिल्ली भाजप कार्यालयाला दिलेले आहे. आंदोलनस्थळी असलेल्या सीसीटीव्ही रुममधील स्क्रीनवर BJP office असे लिहून येत आहे, असा आरोप कोर कमिटीचे सदस्य नवीन जयहिंद यांनी केला आहे. विशेष म्हणजे नवीन जयहिंद यांनी जो आरोप केला, ते नाव सीसीटीव्ही रुममधील कॉम्प्युटरमध्येही दिसत आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📣 अॅट्रॉसिटी निर्णय; सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार
Letsup I Update
दलित संघटना आणि विरोधी पक्षांच्या दबावानंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात अॅट्रॉसिटी कायद्याच्या निकालासंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दाखवली आहे. सरकारी अधिकारी किंवा सामान्य व्यक्तींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यास, सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेऊनच पुढील कारवाई करण्यात येईल, असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
⚡ यापुढे फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट 14 दिवसांच्या आत ऑटोडिलीट होणार!
Letsup I Update
आपल्याला फेसबुकवर सतत कोणाच्या ना कोणाच्या फ्रेंड रिक्वेस्ट येत असतात. अनेकदा अशा कित्येक फ्रेंड रिक्वेस्ट आपण अॅक्सेप्ट करत नाही. यामुळे कित्येक दिवस, कित्येक महिने किंवा वर्षभर त्या फ्रेंड रिक्वेस्ट इनबॉक्समध्ये पेंडिंग राहतात. फेसबुक या समस्येवर काम करत असून सध्या नव्या फीचरची चाचणी सुरु आहे.
या फीचरमुळे फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर ती अॅक्सेप्ट करण्यासाठी प्रत्येक युजर्सकडे 14 दिवसांचा अवधी असणार आहे. रिक्वेस्टखाली मुदत संपायला किती अवधी उरला आहे हे दिसणार आहे. 14 दिवसांत युजरकडून रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली नाही तर ती ऑटोडिलीट होणार असल्याचे टेक क्रंचने म्हटले आहे. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी देखील याला अधिकृत दुजोरा दिला आहे. त्यामुळे लवकरच हे फीचर लाईव्ह होणार आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
