LetsUpp Marathi
الذهاب إلى القناة على Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
إظهار المزيد6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
6 624
_*ताक पिण्याचे फायदे*_
_*Let's Up Health Katta*_
हळू-हळू उन्हाळ्याची चाहूल लागताना दिसत आहे. त्यामुळे अशा दिवसांत अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पित्ताचा त्रास किंवा डिहायड्रेशन तसेच इतर समस्या टाळण्यासाठी ताक पिणे हा उत्तम पर्याय आहे. बाजारातील विकतची सॉफ्टड्रिंक्स प्यायल्याने उन्हाचा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच ताक पिणे फायदेशीर आहे...
👉 इलेक्ट्रोलाइट्स आणि पाण्याचा मुबलक साठा असल्याने ताकामुळे डीहायड्रेशनचा त्रास कमी होण्यास मदत होते.
👉 मसालेदार पदार्थांचा त्रास रोखण्यासाठी ताक फायदेशीर ठरते. तसेच पोटामधील मसाल्यामुळे होणारी जळजळ कमी करते.
👉 शरीरात वाढलेले कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी ताक फायदेशीर ठरते.
*जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर.त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/XhZsJM
👉 उन्हाळ्यात आम्लपित्त म्हणजेच अॅसिडिटीचा अधिक त्रास होतो अशा काळात ताकमध्ये काळी मिरी आणि काळं मीठ एकत्र करून प्यायल्याने अॅसिडिटी बरी होते.
👉 ताक रोज नियमित प्यायल्याने पचनसंबंधित समस्या होत नाहीत. अधिक जेवण झाल्यास ताक पिल्याने मोठा फायदा होतो.
👉 ताकामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते.
👉 ताकामध्ये व्हिटॅमिन सी, ए, ई, के आणि बी असते. जे शरिरासाठी अधिक लाभदायक असतात. यामधून मोठ्या प्रमाणात पोषकतत्व मिळतात. यामुळे कॅलरीज आणि फॅट देखील कमी होते.
( *जॉईन लेट्स अप* : https://goo.gl/XhZsJM । Lets Up Magazine विषयी आपला *अभिप्राय कळवा* feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
_*मॉयल लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती*_
_*Let's Up Job Update*_
पोस्ट : ट्रेनी Sel. Gd. माइन फोरमन/ Sel. Gd. माइन फोरमन - जागा : 05 - पात्रता : माइनिंग & माइन सर्वेइंग डिप्लोमा, 02 वर्षे अनुभव
पोस्ट : माइन फोरमन I - जागा : 04 - पात्रता : माइन फोरमेन प्रमाणपत्र, 06 वर्षे अनुभव
पोस्ट : माइन मेट I - जागा : 08 - पात्रता : माइन मेट प्रमाणपत्र, 03 वर्षे अनुभव
पोस्ट : WED-II - जागा : 09 - पात्रता : WED प्रमाणपत्र, 03 वर्षे अनुभव
पोस्ट : ब्लास्टर I - जागा : 07 - पात्रता : Blaster प्रमाणपत्र, 01वर्ष अनुभव
वय : 45 वर्षे
अर्ज पाठवण्यासाठी पत्ता : Office of General Manager (Personnel), MOIL Limited, MOIL Bhawan, 1-A, Katol Road, Nagpur-440013
अर्ज पोहोचण्याची मुदत : दि. 15 फेब्रुवारी 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/33pS3B
*जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर.त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/XhZsJM
_*होमी भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर ट्रेनिंग स्कूलमध्ये भरती*_
पोस्ट : ट्रेनी सायंटिफिक ऑफिसर्स
पात्रता : 60% गुणांसह मेकॅनिकल, केमिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रमेंटेशन, कॉम्प्युटर सायन्स, इ.मधील इंजिनिअरिंग पदवी किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो सायन्सेस, जिओलॉजी, फूड टेक्नॉलॉजी इ.मधील एम.एस्सी.
स्टायपेंड : 35000 रुपये दरमहा (ट्रेनिंग दरम्यान)
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 14 फेब्रुवारी 2017
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : http://barconlineexam.in
*जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर.त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/XhZsJM
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या माचिलमध्ये बर्फाखाली अडकलेल्या जवानांच्या बचावकार्याला यश, पाचही जवानांची जिवंतपणी सुखरुप सुटका
👉 नवी दिल्ली - भारतीय टपाल खात्याला रिझर्व्ह बँकेने पेमेंट बँक म्हणून दिला परवाना, छोट्या ठेवी स्वीकारण्याचीही या अंतर्गत परवानगी असेल
👉 नवी दिल्ली - 29 जानेवारीला होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मन की बात' ला निवडणूक आयोगाने दिली मंजुरी
👉 नवी दिल्ली - 15 हजार किंवा त्यापेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचा-यांच्या ईपीएफमध्ये जमा होणारा 8.33 टक्के पैसा भारत सरकार तीन वर्ष देणार - ईपीएफओ
👉 नवी दिल्ली - मलेशियात भारतीयांचा पासपोर्ट जप्त केल्याप्रकरणी तेथील राजदूत कार्यालयाकडून भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मागितला अहवाल
👉 पणजी - अस्थिरतेमुळे गोवा आजारी आहे. तसेच मतांची विभागणी करणारे लोकशाहीचे खिसेकापू आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 7 मुस्लिम देशांतील नागरिकांच्या अमेरिका प्रवेशावर बंदी घालणाऱ्या आदेशावर केली स्वाक्षरी
🎯 राजकीय घडामोडी :
👉 लखनऊ - भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा केला प्रसिद्ध, यात राममंदिर बांधकामापासून मुस्लिम महिलांसाठी तलाकसारख्या संवेदनशील मुद्दयांचा केला समावेश
👉 बंगळुरू - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि यूपीए सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री राहिलेले एस. एम. कृष्णा यांनी राजकारणातून निवृत्ती केली जाहीर
👉 मुंबई - भाजपाची औकात काय आणि तुमची औकात काय हे येत्या 21 तारखेला दाखवून देऊ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
👉 मुंबई - मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून काँग्रेसचे माजी विरोधीपक्ष नेते देवेंद्र आंबेरकर शिवसेनेत प्रवेश करणार
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 औरंगाबाद - महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे सभा सुरू असताना स्टेज कोसळले, यात मुंडे यांना कोणतीही दुखापत झाली नाही
👉 अहमदनगर - निघोजचे (ता. पारनेर) माजी सरपंच संदीप वराळ यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी 5 जणांना केली अटक
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 व्हॉट्सअॅपचे नवीन फिचर लाईव्ह लोकेशन्स येतेय, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या फ्रेंडलिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या मित्रांचे लोकेशन माहीत करू शकणार आहात
🎯 खेळ घडामोडी :
👉 नागपूर - येथे भारत-इंग्लंडदरम्यान दुसरा टी-20 सामना आज सायंकाळी 7 पासून रंगणार, भारतासमोर मालिका वाचविण्याचे दडपण
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - शाहरुखच्या 'रईस' ची चांगलीच धूम, 'रईस'ने फक्त 3 दिवसांत 60 कोटींची केली कमाई
👉 नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर हिने भन्साळी हल्ल्याप्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करताना, पंतप्रधानांनी बॉलिवूडसाठी भूमिका घ्यावी, असं आवाहन केले आहे
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - लवकरच एटीएममधून तुम्हाला 24 हजार रुपये काढता येण्याची शक्यता, सध्या 24 हजार रुपये एका आठवड्याला काढता येत आहेत
👉 नवी दिल्ली - दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनी राजपथावर पार पडलेल्या संचलन सोहळ्यात सहभागी झालेल्या अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथाला पहिला, त्रिपुराला दुसरा आणि महाराष्ट्राला तिसरा क्रमांक मिळाला
👉 जामनगर - भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि त्याच्या पत्नीच्या कारला अपघात, जडेजा आणि त्याच्या पत्नीला दुखापत नाही, परंतु दुचाकीवरील तरुणी जखमी
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 वॉशिंग्टन - निर्वासितांना अमेरिकेत येण्यापासून रोखणे चुकीचे : मार्क झुकेरबर्ग
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई - राज्यात होणा-या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपलं नवं गाणं ‘कोण आला रे? कोण आला..केलं लॉन्च
👉 मुंबई - मुंबईच्या प्रचारासाठी संजय निरुपम सक्षम आहेत. मला 25 जिल्ह्यात जायचं आहे. त्यामुळे मी मुंबईच्या प्रचारात सहभागी होणार नाही : काँग्रेस नेते नारायण राणे
👉 कोल्हापूर - संजय निरुपम हा मूर्ख माणूस आहे, त्याने महाराष्ट्रासाठी काय काम केले? केवळ पद आहे म्हणून त्याचे नाव आहे : शरद पवार
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 पुणे - ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांची नालंदा विद्यापीठाच्या कुलपतीपदी नियुक्ती, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुढील 3 वर्षांसाठी केली नियुक्ती
👉 पुणे - शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोघे एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणात इतिहास घडेल : मनोहर जोशी
👉 कोल्हापूर - कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील श्री महालक्ष्मी टेक्स्टाईल मिलमध्ये इलेक्ट्रिक कार्डची चोरी, या कार्डची किंमत साधारण 80 लाख रूपये
👉 पंढरपूर - जीपमधून स्फोटकांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात, 99 स्फोटके आणि 291 जिलेटिनच्या कांड्या जप्त, ओझेवाडी-रांजणी रस्त्यावर पोलिसांनी केली धडक कारवाई
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 नवी दिल्ली - लवकरच येणार लॅम्बोर्गिनी हुराकान आरडब्ल्यूडी, ही रिअर व्हिल ड्राइव्हवर काम करणारी कार येत्या 1 फेब्रुवारीला लाँच करण्याची शक्यता
🎯 खेळ घडामोडी :
👉 दुबई - भारताचा कॅप्टन विराट कोहलीची आयसीसीच्या वनडे क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण, तर धोनी 14व्या क्रमांकावरून 13व्या क्रमांकावर आला आहे
👉 सिडनी - अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने आपली थोरली बहिण व्हीनस विल्यम्सचा 6-4, 6-4 असा धुव्वा उडवला, कारकीर्दीत सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावर कोरले नाव
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कन्नड भाषेतून चित्रपट तयार होत असून सावित्रीबाईंची भूमिका प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री तारा साकारणार आहेत
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 आता फेसबुक सुरु करा चावीने!
Let's Up Techno Katta
अन्य सोशल नेटवर्कींग साईटप्रमाणेच फेसबुकवरही सुरक्षित पासवर्ड हा ऐरणीवरचा प्रश्न. बहुतांश युजर्स हे अगदी नेहमीच्या वापरातले सोपे पासवर्ड (उदा. ABCD किंवा 1234) वापरतात. यामुळे त्यांचे खाते हॅक करणे अगदी सोपे होऊन जाते. यामुळे पासवर्ड हा किचकट असलाच पाहिजे. त्यातही त्याला वारंवार बदलण्यात यावे असा सल्ला नेहमी सायबर सुरक्षा तज्ज्ञांतर्फे देण्यात येतो.
तसेच ‘टु-स्टेप-ऑथेंटीकेशन’ही सुरक्षित मानले जाते. या अंतर्गत नवे ब्राऊजर वा मशिनवरून लॉगीन करावयाचे झाल्यास संबंधीत युजरच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे पाठविण्यात आलेला कोड टाकावा लागतो. अथवा असा प्रयत्न होत असल्यास याची माहिती त्या युजरला मिळते. अर्थात या सर्व बाबी थोड्या किचकट आहेत. यातच कोडयुक्त SMS ही सहजपणे हॅक करता येतो. या पार्श्वभूमीवर फेसबुकने चावीच्या मदतीने लॉगीनची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. अर्थात ही चावी खर्याखुर्या चाव्यांप्रमाणे नसून USB च्या स्वरूपात असेल.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
युबिको कंपनीने गुगलसह अन्य कंपन्यांच्या सहकार्याने USB च्या स्वरूपातील ‘फिजीकल पासवर्ड की’ विकसित केल्या आहेत. याचा वापर केल्यास आपल्याला प्रत्यक्षात साईटवर (उदा. जीमेल, ड्रॉपबॉक्स आदी.) पासवर्ड टाकावा लागत नाही. या USB च्या चीपमध्ये पासवर्ड अत्यंत सुरक्षितपणे टाकलेला असतो. संबंधीत युएसबी कोणत्याही संगणकाला लावल्यानंतर पासवर्ड सुरक्षित पध्दतीने ‘व्हेरिफाय’ करत लॉगीन करता येते. यानंतर काम झाल्यावर संबंधीत युएसबी काढल्यानंतर संबंधीत उपकरणावर पासवर्डबाबत कोणताही पुरावा उरत नाही. यामुळे पासवर्ड चोरीचा प्रश्नही उदभवत नाही.
संगणक, लॅपटॉप वा टॅबलेटसाठी युबिकोने ‘फिडो यु-2-एफ’ (यु-2-एफ म्हणजे युनिव्हर्सल सेकंड फॅक्टर!) ही युएसबी सिक्युरिटी-की विकसित केली आहे. तर स्मार्टफोनला ही चावी ‘निअर फिल्ड कम्युनिकेशन’ म्हणजेच ‘एनएफसी’च्या मदतीने अटॅच करता येते. कुणीही ‘फिडो यु-2-एफ’ ही चावी अमेझॉनवरून खरेदी करू शकतो. आता हीच ‘फिडो यु-2-एफ’ चावी वापरून फेसबुकवर लॉगीन करता येणार आहे.
या संदर्भात फेसबुकने केलेल्या घोषणेनुसार क्रोम आणि ओपेराच्या अद्ययावत ब्राऊजरवरूनच सध्या अशा पध्दतीने लॉगीन करता येणार आहे. हे ब्राऊजर असणार्या संगणकांमध्ये प्राथमिक माहितीसह ‘सिक्युरिटी कोड’ भरून ही चावी वापरता येईल. सध्या तरी फेसबुकच्या स्मार्टफोन अॅपमध्ये याचा वापर करता येणार नाही. मात्र ज्यांच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये एनएफसी कनेक्टिव्हिटीसह क्रोम अथवा ओपेराच्या अद्ययावत आवृत्त्या आहेत, त्या युजर्सला ही चावी वापरता येणार आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही चावी वॉटरप्रुफ आहे. तसेच यावरून अगदी कार गेली तरी याचे काहीही नुकसान होत नाही…
👉 लिंक्डइनने बदलले रूप...
अलीकडेच मायक्रोसॉफ्टने लिंक्डइन ही प्रोफेशनल नेटवर्क साईट खरेदी केली. यानंतर यात फार मोठे बदल होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले होते. या अनुषंगाने आता याचा युजर इंटरफेस बदलण्यात आला आहे. नवीन इंटरफेस हा अधिक सुटसुटीत आणि नेव्हिगेशनसाठी सुलभ असा आहे. नवी डिझाईन ही फेसबुकसारखी असल्याचे दिसून येत आहे. अर्थात याच्या वर डाव्या बाजूला प्रोफाईल फोटो असून मध्यभागापासून न्यूज फिड देण्यात आली आहे. याच्या वरील बाजूस कोणत्याही युजरला हवा असणारा व्यक्ती, जॉब, कंपनी आदी सुलभपणे शोधण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. याच्या वरील बाजूस होम, मॅसेजिंग, जॉब्ज, नोटिफिकेशन, मी, माय नेटवर्क आणि सर्च असे स्वतंत्र भाग देण्यात आले आहेत. यात उत्तम दर्जाची चॅटींगची सुविधाही देण्यात आली आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
स्पर्धा परीक्षांची तयारी करताय?
Let's Up Career Katta
स्पर्धा परीक्षामध्ये वारंवार होत असलेले बदल आपल्या समोर आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करायची असेल तर 'बदल' ही मानसिकता डोळ्यासमोर ठेऊनच तयारीला बसणे गरजेचे असते. त्यामुळे स्पर्धेत टिकणे शक्य तर होईलच त्याचबरोबर इतर परीक्षांचा अभ्यासक्रम आपल्याकडून हाताळला जाईल. म्हणूनच जाणून घेऊयात स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी...
👉 अभ्यासाची योग्य वेळ कोणती? : व्यक्ती व व्यक्तीच्या सवयीनुसार अभ्यास करण्याच्या वेळा ठरलेल्या असतात. आपली अभ्यास करण्याची वेळ ही आपणच शोधून काढावी त्यामुळे केलेला अभ्यास लक्षात राहण्यास मदत होते.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 वाचन कसे करावे? : स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासासाठी विविध योजना आखणे महत्वाचे ठरते. अभ्यासक्रम काय आहे, अभ्यास साहित्य कोणते वाचावे, त्यासाठी संदर्भग्रंथ काय आहेत, कोणती प्रकाशने आहेत, कोणता भाग महत्वाचा आहे, अशा गोष्टी सुरुवातीला लक्षात घेणे गरजेचे आहे. आपण जे वाचतो त्यामध्ये जो भाग महत्वाचा वाटतो त्याला अंडरलाईन कराव्यात म्हणजे उजळणी करताना आपला वेळ वाचेल.
👉 उजळणी कशी कराल : आपला मानवी मेंदू 40 मिनिटेच एकाग्र राहू शकतो. म्हणून दर 40 मिनिटाने अभ्यासात ब्रेक घ्यावा. मधल्याकाळात आपण काय वाचले हे आठवण्याचा प्रयत्न करावा. तसेच रोज रात्री दिवसभराचे चिंतन करावे. जो घटक आपण वाचला आहे. त्या घटकावर आधारित प्रश्न सोडवावीत. पुन्हा-पुन्हा अंडरलाईन केलेले मुद्दे वाचावेत.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बांदीपुराच्या गुरेज सेक्टरमध्ये झालेल्या हिमस्खलनात 15 जवानांचा मृत्यू, यात महाराष्ट्रातील अकोल्याचे संजू सुरेश खंदारे आणि आनंद गवई तसेच बीडचे विकास समुंदरे हे वीरपुत्र शहीद
👉 नवी दिल्ली - इंडिया टुडे समूह आणि कार्वे इनसाईट्स यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार आताच्या घडीला लोकसभा निवडणूक झाल्यास राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) 360 जागा मिळतील
👉 नवी दिल्ली - काँग्रेस हा पक्ष शेवटच्या घटका मोजत असून सत्ता नसल्याने या पक्षाची अवस्था पाण्याशिवाय तडफडणा-या माशासारखी झाली आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
👉 नवी दिल्ली - कर्नाटक उच्च न्यायालयाने विजय माल्ल्याविरोधात न्यायालय अवमानप्रकरणी बजावले जामिनपात्र वॉरंट
👉 नवी दिल्ली - मेघालयचे राज्यपाल व्ही. शनमुगनाथन यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्विकारला, काम मागायला आलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 वॉशिंग्टन - मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स पुढील 25 वर्षांच्या आत जगातील पहिले लक्षकोटय़धीश (खरबपती) व्यक्ती बनू शकतात
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई - भाजपने मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या ‘प्रगतीच्या वाटचाली’वर पोस्टरच्या माध्यमातून ओढले ताशेरे, वेगवेगळ्या क्षेत्रातील महापालिकेच्या कारभाराचे काढले वाभाडे
👉 मुंबई - राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत, उद्धवजी सांगतील तेव्हा राजीनामे देऊ - रामदास कदम, पर्यावरण मंत्री
👉 मुंबई - मुंबईच्या डबेवाल्यांनी शिवसेनेच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला असून डबेवाले शिवसेनेचा प्रचारही करणार आहेत
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - कार्यालयात देवतांचे फोटो लावण्यास मनाई करणारे परिपत्रक घेतले मागे, शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांची माहिती
👉 मुंबई - मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या अर्थसंकल्पाच्या बैठकीवर शिवसेना खासदारांचा बहिष्कार कायम, अर्थसंकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांना अरविंद सावंत देणार निवेदन
👉 पुणे - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 5 नगरसेवकांचे राजीनामे, शिवसेनेच्या 3 तर राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांकडे दिले राजीनामे
👉 औरंगाबाद - राहुल गायकवाड मृत्यू प्रकरण, 2 हेड कॉन्स्टेबल, 3 कॉन्स्टेबल निलंबित, पोलिसांच्या गाडीतून उडी मारताना राहुलचा मृत्यू झाला होता
👉 औरंगाबाद - सिल्लोडमध्ये उघड्यावर शौचाला बसणाऱ्या 27 जणांना पोलिसांनी केली अटक, सिल्लोड नगरपालिकेचे गुड मॉर्निंग पथक आणि पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 27882.46, निफ्टी : 8641.25, सोने भाव : 28,139 (प्रतितोळा), चांदी : 40,700 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 नवी दिल्ली - भीम अॅपचे नवे व्हर्जन आले, नवे 1.2 व्हर्जन आता हिंदी व इंग्रजीप्रमाणेच 7 प्रादेशिक भाषांतही उपलब्ध
🎯 खेळ घडामोडी :
👉 नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा, सानिया मिर्झा-इवान डोडिग या जोडीची मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक , सातव्या ग्रॅण्डस्लॅमपासून केवळ एक पाऊल दूर
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - काळवीट शिकार प्रकरण, काळवीटाचा मृत्यू नैसर्गिक कारणाने, सलमान खानचा जोधपूर कोर्टात जबाब, जोधपूर न्यायालयात पुढील सुनावणी 15 फेब्रुवारीला
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 सिंगल पॅरेंट आणि घ्यावयाची काळजी..
Let's Up Parenting Katta
हल्ली सिंगल पॅरेंटींगचं प्रमाण वाढलंय. यामुळे एकट्यानेच मुलाच्या सर्व गरजांकडे लक्ष देणं म्हणजे तारेवरची कसरतच. म्हणूनच हे सर्व करताना तुम्हाला उपयोगी ठरतील अशाच काही गोष्टींवर नजर टाकूयात. प्रत्येक सिंगल पॅरेंटने आपल्या चुका, असुरक्षितता व कोणत्याही प्रकारची दुर्भावना मुलांसमोर व्यक्त होऊ देऊ नये.
मुलांना सुरूवातीपासूनच लहान-मोठ्या जबाबदार्या द्या. अशा स्थितीत मोठ्या होणार्या मुलांच्या पालकांकडून जास्त अपेक्षा असतात. त्यामुळे कार्यालयीन जीवन किंवा भूतकाळाचा राग मुलांवर काढू नका. परिस्थितीमुळे आपल्या पालकांना वेगळे व्हावे लागले आहे. अशी समज मुलांच्या मनात निर्माण व्हायला हवी. यासाठी आई किंवा वडील यांपैकी एकाला दोषी ठरवून त्यांच्याविषयी तिरस्काराची भावना मुलांच्या मनात निर्माण होणार नाही याची काळजी पालकांनी घ्यायला हवी...
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 मुलांच्या वाईट सवयींकडे दुर्लक्ष नको!
केवळ अल्लड वय आहे म्हणून मूल असं वागतंय की, खरंच त्याच्या वागण्याविषयी विचार करण्याची गरज आहे? हा तितका सिरिअसली न घेतलेला विषय. अनेकदा मुलांचे उर्मटपणे किंवा हट्टीपणे वागणे मोठी समस्या बनते. अशावेळी मुलांच्या वागण्यात बदल आणण्याची जबाबदारी तुमची आहे. या समस्येला सामोरे जाण्यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टी नक्की करा, उपयोगी ठरतील.
कोणती समस्या मोठी आहे आणि कोणती छोटी हे आधी लक्षात घ्या. यामुळे कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचे आहे हे निश्चित होईल. जर तुमचे मूल खूप छोटे आहे तर थोडा अजून संयम ठेवा. आपलं मूल का इतकं जिद्दीपणे वागतंय हे समजून घ्या. त्याला चुकीचे वागताना पाहिल्यावर प्रेमाने योग्य काय आहे ते समजावून सांगा. जर तुमचे मूल पौगंडावस्थेत म्हणजेच टीनएजमध्ये असेल तर त्याच्या वागणुकीतील बदलांसाठी तयार राहा. त्याच्याशी मित्राप्रमाणे, समवयस्काप्रमाणे बोला. आपल्या चुका व अनुभव त्याच्याशी शेअर करा. यावरून तो बोध घेईल. वयात येणारे बदल व मुलांच्या सभोवतालचे वातावरण समजून घ्या. काहीही म्हणण्या-बोलण्यापूर्वी आपल्या मुलांचे वागणे पडताळून पहा...
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 मस्त करिअर : चहा उद्योग
Let's Up Career Katta
अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून चहा उद्योगात गुंतवणूक होत असल्याने हा एक फुलणारा व उज्वल भविष्य असणारा उद्योग आहे. यामुळेच यात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. चहा उद्योग क्षेत्रातील कामांमध्ये प्लॅन्टेशन, लिलाव, प्रक्रिया, मार्केटींग, ब्रॅण्डिंग आणि संशोधन आदींचा समावेश आहे. प्लॅन्टेशनमध्ये चहाची रोपटी वाढवणे, पोषक जमीन तयार करणे, खतांचा योग्य वापर करणे व पर्यवेक्षण यांचा समावेश होतो.
चहाची चाचणी घेणे, रोपट्यांचे व्यवस्थापन, संशोधन, चहाचे कमिशन निश्चित करणे व सल्ला देणे अशा विविध प्रकारातून या उद्योगाद्वारे रोजगार मिळतो. तुमची फॅक्टरी व्यवस्थापक असल्यास प्लॅन्टेशनशी संबंधित रोपटी लावणे, प्रक्रिया करणे व चहाचे पॅकिंग या सर्वांचे पर्यवेक्षण करावे लागेल. संशोधन हा या उद्योगातील अविभाज्य भाग आहे. वनस्पती व जैव तंत्रज्ञान तज्ज्ञांना यात संधी आहे. आसाममधील जोर्हाट येथील चहा संशोधन असोसिन्सअंतर्गत जीवशास्त्रातील पदवीधरांना संशोधनासाठी सहकार्याद्वारे रोजगार दिला जातो.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
या उद्योगात करिअर करण्यासाठी तुमच्याकडे कृषीशास्त्र अथवा जीवशास्त्र, खाद्यान्न, बागायत अथवा तत्सम क्षेत्रातील बी.एसस्सी ही पदवी असणे अत्यावश्यक आहे. यासाठी चहा उत्पादनातील प्रक्रिया, वित्त सुविधा व विक्री यांचे मार्गदर्शन देणार्या संस्थेत 12 वी नंतर प्रवेश घेता येईल.
या क्षेत्रात चांगले वेतन व प्रोत्साहन भत्त्यासह आरामदायी जीवन जगता येण्यासारखे मानधन मिळते. तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्यास मासिक 15 हजार रुपयापर्यंत मिळकत असते. तर जस-जसे अनुभव घेत पुढे जाल, तुमची मिळकत मासिक 40 ते 50 हजार रुपये सहज शक्य आहे. अशाप्रकारे उज्वल भविष्य असणार्या या क्षेत्रात तरूणांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत...
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 'मेरे मियां गये इंग्लंड' गाणं रिलीज
Let's Up Entertainment
बहुचर्चित सिनेमा 'रंगून'मधील एक धमाकेदार गाणं रिलीज करण्यात आलं आहे. 'मेरे मियां गये इंग्लंड, असे या गाण्याचे बोल असून हे गाणं कंगना राणावतवर चित्रित करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल 'गुलजार' यांनी लिहिले असून गायिका रेखा भारद्वाज यांनी हे गाणं गायलं आहे. सैफ अली खान, कंगना राणावत आणि शाहिद कपूर यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर असून यात युद्धासोबत प्रेमकहाणीही पाहायला मिळणार आहे. शाहिद कपूर एका आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत दिसत असून कंगना स्टंटवुमनची भूमिका साकारत आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 बाहुबलीचं दुसरं पोस्टर रिलीज
एस. एस. राजामौली यांनी दिग्दर्शन केलेल्या ‘बाहुबली: द कनक्ल्यूजन’चे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर आणखी एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. राजामौली यांनी स्वत: या चित्रपटाचं पोस्टर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं. हे नवे पोस्टर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियातून त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. या नव्या पोस्टरमध्ये अनुष्का शेट्टी आणि प्रभास धनुर्विद्येचा अभ्यास करताना दिसत आहेत. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या सिनेमाची कॉपी लिक होऊ नये म्हणून दिग्दर्शकाने सिनेमाचा क्लायमॅक्स चार भागात शूट केला आहे.
👉 कमाईत रईस वरचढ
‘रईस’ आणि ‘काबिल’ हे बॉलिवूडचे दोन मोठे सिनेमे प्रदर्शित झाले असून या दोन सिनेमांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळतेय. दोन्ही सिनेमे मोठे असल्याने दोघांच्याही कमाईवर मोठा प्रभाव पडणार असल्याचे बोलले जात होते. मात्र बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी काबिलपेक्षा ‘रईस’ वरचढ ठरला आहे. अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नसली तरी रईसने पहिल्या दिवशी 21 कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे म्हटले जात आहे. तर काबिलने पहिल्या दिवशी 10.43 कोटींची कमाई केल्याचे ट्विट काबिलचे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी केलं आहे. दोन्ही सिनेमांमध्ये थिएटर मिळवण्यात मोठी स्पर्धा दिसली. तरी राकेश रोशन यांनी मोठ्या प्रमाणात स्क्रिन मिळवल्या. तर अॅडव्हांस बुकींगमध्येही ‘रईस’नेच बाजी मारल्याचे रिपोर्ट आहेत.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
एका क्लिकवर मतदार यादीची सविस्तर माहिती
Let's Up Special Update
राज्यातील 10 महानगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायतसमितीच्या निवडणुका तसेच राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून, निवडणूक आयोगाने मतदारांना सर्व माहिती एका क्लिकवर देण्यासाठी ‘ट्रू व्होटर’ (True Voter) हे अॅप लाँच केले आहे. या अॅपच्या माध्यमातून मतदारांना आपला वॉर्ड, पोलिंग बूथ, मतदार यादीत नाव आहे की नाही? याची सविस्तर माहिती मिळणार आहे. राज्यातील झालेल्या नगरपालिका निवडणुकी दरम्यानही या अॅपचा वापर करण्यात आला होता.
मतदारांसाठी काय आहेत सुविधा
👉 मतदारांचा विधानसभा यादी भाग अनुक्रमांक, स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाग, मतदान केंद्र व मतदान केंद्राचा पत्ता शोधण्याची सुविधा
👉 गुगल मॅपच्या सहाय्याने मतदान केंद्रापर्यंत पोहचण्याची सुविधा
👉 प्रभागात निवडणुका लढविणा-या उमेदारांचा तपशील, मतदारांचा आवाज, मतदारांच्या अपेक्षा व प्रभागातील अडचणी उमेदवारांपर्यंत पोहचवण्याची सुविधा
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 मतदान केंद्रनिहाय मतदार यादीची सुविधा
👉 मतदानाबाबतची माहिती
👉 निवडणुकीचा निकालाविषयी माहिती मिळणार
👉 स्वत:ची माहिती फोटोसहित अद्ययावत करण्याची सुविधा
👉 गैरहजर, स्थलांतरित, मयत व बोगस मतदारांना चिन्हांकित करून कळवण्याची सुविधा
अधिका-यांसाठी काय आहेत सुविधा
👉 अधिका-यांच्या नोंदणीमध्ये अधिकारी/कर्मचारी यांचे Hierarchical Structure तयार करण्याची सुविधा
👉 सोप्या व अचूक पध्दतीने मतदार यादी तयार कण्याकरिता कंट्रोल चार्ट तयार करण्याची सुविधा
👉 आयोग, आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांचे संदेश थेट नोंदणी झालेल्या मतदारांना पाठवण्याची सुविधा
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
1. महाराष्ट्र होमिओपॅथी परिषेदेत विविध पदांच्या जागा
Let's Up Job Updates
पोस्ट : उप प्रबंधक - जागा : 01 - पात्रता : 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT
पोस्ट : मुख्य लिपिक - जागा : 01 - पात्रता : 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT
पोस्ट : लेखापाल - जागा : 01 - पात्रता : 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT & Tally
पोस्ट : शिपाई - जागा : 01 - पात्रता : 12 वी उत्तीर्ण
वय: दि. 01 जानेवारी 2017 रोजी 18 ते 43 वर्षे (पदानुसार)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. अध्यक्ष , महाराष्ट्र होमिओपॅथी परिषेदेत, 235 पेनिनसुला हाउस, 3 रा मजला, डॉ. दादाभाई नौरोजी रोड, फोर्ट, मुंबई-400001
अर्ज करण्याची मुदत : दि. 23 फेब्रुवारी 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/wkYHy1
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
2. मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये भरती
पोस्ट : ईस्टेट मॅनेजर - जागा : 42 - पात्रता : post Graduate degree/diploma in Architecture/Town and Country Planning or degree in Civil Engineering from a recognised university/institution
अर्ज पाठवायचा पत्ता : जनरल अॅडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, पोर्ट हाऊस, 2nd फ्लोर,
S.V. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई - 400 001
अर्ज करण्याची मुदत : दि. 13 फेब्रुवारी 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/Vl1Gcx
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - भारताचा 68 वा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा, राजपथावरील सोहळ्यात अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
👉 हिमाचल प्रदेश - खराब हवामान आणि अतिबर्फवृष्टीमुळे कुल्लू जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा, 27 आणि 28 जानेवारीला जिल्ह्यातल्या सर्व शाळा बंद
👉 जम्मू-काश्मीर - गुरेझ सेक्टर येथे हिमस्खलनाच्या दुर्दैवी घटनेत 10 जवान शहीद, हिमस्खलन झाल्यामुळे बर्फाच्या कड्याखाली सापडून जवानांचा मृत्यू
👉 शिल्लॉंग - मेघालयचे राज्यपाल व्ही. शनमुगनाथन यांनी दिला राजीनामा, कर्मचा-यांनी पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती भवनात पत्र पाठवून केले होते आरोप
👉 नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मविभूषण देण्याचे धाडस केल्याबाबत मोदींना भारतरत्न मिळायला हवा - अरविंद केजरीवाल
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 वॉशिंग्टन - मॅक्सिकोमधून अमेरिकेत आयात होणा-या वस्तूंवर मॅक्सिको-अमेरिका सीमेवर भिंत बांधण्यासाठी 20 टक्के कर आकारण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार - व्हाईट हाऊस प्रवक्ते
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई - राज्यभरात शिवसेना स्वबळावर वाटचाल करणार, कोणाच्या दारात जाणार नाही - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
👉 मुंबई - सत्ता हे साध्य नाही तर साधन, विकासाचे पारदर्शी कारभार हाच आमचा मूलमंत्र, जे येतील त्यांच्यासोबत जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय, परिवर्तन तर होणारच - मुख्यमंत्र्यांचे ट्विट
👉 मुंबई - शिवसेनेला युती करायची नव्हती, राज्य सरकारवर कोणताही परिणाम नाही - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - 10 महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात
👉 गोंदिया - जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील राजोली येथे प्रजासत्ताक दिनी नक्षलवाद्यांनी तिरंगी ध्वजाच्या स्तंभावर काळा झेंडा फडकविला
👉 पुणे - न्हावरे ग्रामीण रुग्णालयाची अॅम्ब्युलन्स झाडावर आदळून झालेल्या अपघतात पेशंटसह तिघांचा मृत्यू तर अॅम्ब्युलन्सचा चालक गंभीर
👉 कोल्हापूर - कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग या योजनेसह राज्यातील अन्य रेल्वे प्रकल्पांसाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीची स्थापना
🎯 खेळ घडामोडी :
👉 कानपूर - कर्णधार इऑन मॉर्गन आणि जो रूटने केलेल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडची पहिल्या ट्वेंटी-20 लढतीत भारतावर तीन गडी राखून मात
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 जोधपूर - काळवीट शिकार खटल्याप्रकरणी सलमान खान आज न्यायालयात हजर राहणार, कालच सलमान जोधपूरमध्ये पोहचला
👉 नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ‘बाहुबली: द कनक्ल्यूजन’चे दुसरे पोस्टर रिलीज, या नव्या पोस्टरमध्ये अनुष्का शेट्टी आणि प्रभास धनुर्विद्येचा अभ्यास करताना दिसत आहेत
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
_*नगरपालिका क्षेत्रांसाठी योजना*_
_*Let's Up Govt. Scheme*_
नागरी भागातील जनतेला अधिक चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी राज्य शासन नगरपलिका क्षेत्रासाठी विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान उपलब्ध करुन देत असते. त्याच नागरी क्षेत्राच्या विकासाच्या योजनेविषयी अधिक माहिती…
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या क्षेत्रातील नगरपालिकेच्या विविध योजनेअंतर्गत अनुसूचित जाती तसेच नव बौद्धांसाठी आरक्षित असलेल्या प्रभागांमध्ये तसेच अनुसूचित जातीच्या राखीव प्रभागाशिवाय इतर प्रभागातील ज्या वस्तीतील अनुसूचित जाती व नवबौद्ध यांची लोकसंख्या 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा वस्त्यांमध्ये रस्ते, पोच रस्ते, जोड रस्ते, रस्त्याचे डांबरीकरण, सिमेंटीकरण, वस्त्यांकरिता कच्चे रस्ते, नाली बांधकाम, लहान नाल्यांवर फरशी बांधणे, विहीर दुरुस्ती तसेच उघड्या विहिरीवर कठडे बांधणे, नदीच्या काठावर अथवा डोंगर उतारावर संरक्षक भिंत तसेच कठडे बांधणे, छोटे पूल, पिण्याच्या पाणीसाठी सोयी सुविधा, सार्वजनिक उपयोगासाठी मुताऱ्या व शौचालये बांधणे, रस्त्यांवरील विजेचे दिवे, बालवाडी, बगीचे, बगीच्यांमध्ये पक्क्या स्वरुपाचे बसवायचे खेळाचे साहित्य, समाजमंदीर, वाचनालय, व्यायामशाळा, दवाखाने, सांस्कृतिक केंद्र, दुकाने, स्मशानभूमीचा विकास करणे व यासारखी सार्वजनिक हिताची अन्य कामे हाती घेता येतात.
*जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर.त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/XhZsJM
_*या कामाबाबत प्रस्ताव पाठवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*_
👉 प्रस्तावित काम ज्या जमिनीवर घ्यावयाचे आहे ती जमीन महानगरपालिका/ नगरपरिषदेच्या ताब्यात असल्याचे प्रमाणपत्र
👉 प्रस्तावित कामासाठी शासनाच्या इतर कोणत्याही योजनेंतर्गत अर्थसहाय्य घेतले नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
👉 प्रस्तावित काम हे ज्या वस्तीतील अनुसूचित जाती व नवबौद्ध याची लोकसंख्या 50% किंवा त्यापेक्षा अधिक आहे अथवा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातीलच असल्याबाबतचे प्रमाणपत्र
👉 प्रस्तावित कामांची निवड निश्चित करणारा स्थानिक नागरी संस्थेच्या सर्वसाधारण सभेचा ठराव
👉 सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या तांत्रिक मान्यतेच्या आदेशाची प्रत
👉 बांधकामविषयक काम असल्यास नगररचना शाखेकडून प्रस्तावित कामांच्या रेखांकन/नकाशांना मंजुरी प्राप्त झाल्याच्या आदेशाची प्रत
या योजनेबाबतची अधिक माहिती नगरपालिकेत उपलब्ध होऊ शकेल.
( *जॉईन लेट्स अप* : https://goo.gl/XhZsJM । *जाहिरातीसाठी संपर्क* : 7875190190)
6 624
1. _*राष्ट्रपती सचिवालयात ‘माळी’ पदांच्या 66 जागा*_
_*Let's Up Job Updates*_
पोस्ट : माळी (New Delhi) - जागा : 58 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, Gardner NSQF (National Skill Qualification Framework) प्रमाणपत्र
पोस्ट : माळी (Hyderabad) - जागा : 04 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, Gardner NSQF (National Skill Qualification Framework) प्रमाणपत्र
पोस्ट : माळी (Shimla) - जागा : 04 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, Gardner NSQF (National Skill Qualification Framework) प्रमाणपत्र
वय : 18 ते 30 वर्षे (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)
फी : 650 रुपये (SC/ST/माजी सैनिक 100 रुपये)
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 30 जानेवारी 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/9cnlBm
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/YktfHY
*जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर.त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/XhZsJM
2. _*MBA/MMS राज्य सामान्य प्रवेश परीक्षा- 2017-2018*_
पात्रता : 50 % गुणांसह पदवीधर
फी : 1000 रुपये (SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC: 800 रुपये)
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 13 फेब्रुवारी 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/HFBuHm
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/1Gi8Ac
*जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर.त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/XhZsJM
6 624
Let's Up Status Katta
👉 थोडा सब्र तो कर,
जल्दही महसूस होगा तुझे...
मेरा होना क्या था...
मेरा ना होना क्या है।
👉 लडखडा रहे है...
सँभल रहे है...
तजुरबे है, हो रहे है...।
👉 हर घडी का ये बिगडना नहीं
अच्छा ऐ जान
रूठने का भी कोई वक्त मुकर्रर हो जाए...।
👉 आँखे थी जो कह गयी सबकुछ...
लफ्ज होते तो मुकर गए होते।
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 वो कौन है, जो मेरे साथ चलता है,
ये देखने को, कई बार रूक गया हुँ मैं।
👉 दुनिया में झूठे लोगों को बडे हुनर आते हैं...
सच्चे लोग तो इलजाम से ही मर जाते हैं।
👉 काश नासमझी में ही बीत जाए ये जिन्दगी
समझदारी ने तो बहुत कुछ छीन लिया...।
👉 तारीखें सारी जवां हो गई हैं,
सुना है, कैलंडर को सत्रहवां साल लग गया है।
👉 आइना फिर आज रिश्वत लेते पकडा गया,
दिल में दर्द था फिर भी चेहरा हँसता हुआ दिखाई दिया।
👉 ऐ वक्त!
बहुत तेज है रफ्तार तेरी,
थोडा आहिस्ता चल...
समझने तो दे!
ये पडाव है या है मंजिल मेरी...।
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
_*Let's Up News Updates*_
🎯 _*राष्ट्रीय घडामोडी*_ :
👉 नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन झायेद अल नहयान यांच्यात करारांची देवाणघेवाण
👉 जम्मू-काश्मीर - सोनमर्ग येथे लष्करी तळाजवळ हिमस्खलन, हिमस्खलनात पाच जवानांचा मृत्यू, चार जण बेपत्ता
👉 चेन्नई - घातक विषद्रव्याचा वापर शीतपेयांच्या उत्पादन होत असल्याच्या निषेधार्थ कोका कोला, पेप्सी या शीतपेयांच्या विक्री 1 मार्चपासून बंद करण्याचा दुकानदारांचा निर्णय
👉 नवी दिल्ली - जलिकट्टू कायद्याला आव्हान देणाऱ्या अॅनिमल वेल्फेअर बोर्डाच्या याचिकेसह अन्य सर्व संस्थांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाने घेतला निर्णय
*जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर.त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/XhZsJM
🎯 _*आंतरराष्ट्रीय घडामोडी*_ :
👉 दक्षिण कोरिया - भ्रष्टाचाराच्या आरोपावरून महाभियोगाचा सामना करणाऱ्या दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांच्या नग्न चित्रावरून हिंसाचार, संसदेबाहेरच सुरु हिंसाचार
🎯 _*राजकीय घडामोडी*_ :
👉 मुंबई - राज्य सरकारकडून मंत्रालयातील धार्मिक फोटो काढण्याबाबतचे परिपत्रक, सरकारच्या भूमिकेमुळे शिवसेना नेते नाराज
👉 उत्तर प्रदेश - सपा-काँग्रेस एकत्र लढून उत्तर प्रदेशात बहुमताचे सरकार स्थापन करणार : अखिलेश यादव, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश
🎯 _*व्यापार*_ :
मुंबई - शेअर बाजारात सेन्सेक्समध्ये 333 अंकांची वाढ होऊन 27,708 वर स्थिरावला, तर निफ्टीही 127 अंकांनी वाढून 8,603 वर बंद झाला
🎯 _*प्रादेशिक घडामोडी*_ :
👉 मुंबई - केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने देण्यात येणारे जीवन रक्षा पदके जाहीर, महाराष्ट्रातले 4 मानकरी गोविंद तुपे, तेजस सोनवणे, मनोज बऱ्हाटे आणि नीलकांत हरिकांत्र यांची निवड
👉 मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या संचलनापूर्वी देशातील विविध राज्यातील चित्ररथांची स्पर्धा भरवण्यात येते, यात महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल
👉 सोलापूर - अशोक चौक येथील श्री कोल्ड्रिंक्स या दुकानात कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यामध्ये अल्कोहोल सापडले, राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली कारवाई
👉 ठाणे - एकनाथ शिंदेंच्या रक्षकाची टोल कर्मचा-याला मारहाण, व्हीआयपी ट्रीटमेंट न दिल्याने मारहाण केल्याचा आरोप
🎯 _*खेळ घडामोडी*_ :
👉 नवी दिल्ली - विराट कोहली, साक्षी मलिक, दीपा कर्माकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर
👉 पुणे - भारताचा बिलियर्ड व स्नूकर स्टार खेळाडू पंकज आडवानीने जिंकली राष्ट्रीय बिलियर्ड व स्नूकर स्पर्थेत सातव्यांदा चॅपियनशीप
🎯 _*मनोरंजन घडामोडी*_ :
👉 पुणे - मराठी चित्रपट आणि मालिकांमधील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग अडचणीत, अॅट्रासिटी अंतर्गत पुष्करवर पुण्यात गुन्हा दाखल
👉 अमेरिका - हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना अत्यंत मानाचा ऑस्कर अर्थात अकॅडमी अवॉर्डसाठी 20 व्यांदा नामांकन, स्वतःचाच विक्रम मोडित काढला
( *जॉईन लेट्स अप* : https://goo.gl/XhZsJM । Lets Up Magazine विषयी आपला *अभिप्राय कळवा* feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 तुमचे सौंदर्य वाढवतील असे फेस पॅक
👉 Let's Up Tips & Tricks
हल्ली धावपळ वाढलीय. त्यामुळे आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायलाही पुरेसा वेळ मिळत नाही. मग तिथे त्वचेची काळजी घ्यायला कुठून वेळ मिळणार? असे असले तरी आठवड्यातून फक्त एक दिवस किंवा महिन्यात एकदाच थोडासा वेळ काढून स्वत:कडे लक्ष दिले तर तुम्हीही सुंदर दिसू शकता. म्हणूनच खालील काही टिप्सचा आवर्जून वापर करा...
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
संत्र्याचा पॅक (कोमल त्वचेसाठी) - संत्र्याची साले उन्हात वाळवून मिक्सरमधून बारीक करून त्याची पूड बनवून घ्या. तयार केलेल्या पावडरीत 4-6 गुलाबाच्या सुकविलेल्या पाकळ्या, 1 चमचा मध आणि दूध एकत्र करून घट्ट पेस्ट बनवून घ्या. तयार केलेली पेस्ट 20 मिनिटे चेहर्यावर लावा. नंतर धुऊन घ्या.
सफरचंदाचा पॅक (सामान्य त्वचेसाठी फेस पॅक) - प्रथम सफरचंद कापून मिक्सरमधून काढून घ्या. त्यात 1/2 चमचा लिंबूचा रस आणि दोन चमचे मध मिळवा. ही पेस्ट 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून द्या. आता हा पॅक तयार आहे लावण्यासाठी. तयार केलेला पॅक चेहर्यावर 30 मिनिटे लावा आणि धुऊन घ्या.
काकडीचा पॅक (तेलकट त्वचेसाठी) - काकडीचा पॅक बनविण्यासाठी काकडी, अंड्याचा पांढरा बलक, 1 चमचा लिंबूचा रस, पुदिन्याची पाने 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. नंतर 15 मिनिटे चेहर्यावर लावा आणि धुऊन घ्या.
टोमॅटोचा पॅक (डाग असणार्या चेहर्यासाठी) - मिक्सरमध्ये 1 टोमॅटो, 1 चमचा जईचे पीठ, 1 चमचा लिंबूचा रस घेऊन घट्ट होईल असे वाटून घ्या. हा पॅक 10 मिनिटे चेहर्यावर लावा आणि कोमट पाण्याने धुऊन घ्या.
पपईचा पॅक (थकलेल्या चेहर्यासाठी) - पपईच्या बिया काढून 2-3 स्लाइस घेऊन मिक्सरमध्ये 1/2 कप दह्यात वाटून घ्या. आता हा पॅक चेहर्यावर आणि मानेवर लावा. 20 मिनिटांनी धुऊन घ्या. वरील टिप्स लक्षात घेऊन आपल्या त्वचेची काळजी घेतली तर निश्चितच तुमच्याकडून दिलेला थोडा वेळही तुम्हाला अजूनच सुंदर बनवेल.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 _*गुगलच्या काही सेवा बंद होणार*_
_*Let's Up Techno Katta*_
गुगल ‘जी सुट’च्या अंतर्गत गुगल डॉक्स, गुगल ड्राईव्ह, गुगल शीटस व गुगल स्लाईडस या विविध सेवा जर तुम्ही वापरत असाल तर तुम्ही एक बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. गुगलने एका ब्लॉगपोस्टद्वारे या सेवांच्या जुन्या आवृत्त्या 3 एप्रिलपासून बंद करण्याची घोषणा केली आहे. अँड्रॉईड या प्रणालीसाठी गुगल ड्राईव्ह-2.4.311, गुगल डॉक्स-1.6.292, गुगल शीटस-1.6.292 तर गुगल स्लाईडस-1.6.292 या आवृत्त्या बंद करण्यात येणार आहे.
आयओएस प्रणालीसाठी गुगल ड्राईव्ह-4.16, गुगल डॉक्स-1.2016.12204, गुगल शीटस-1.2016.12208 तर गुगल स्लाईडस-1.2016.12203 या आवृत्त्या बंद करण्यात येणार आहे. या सेवांच्या वर नमुद केलेल्या आवृत्त्या वापरणार्या युजर्सला आपले स्मार्टफोन अॅप अपडेट करण्याच्या सुचना देण्यात येत असल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे. दरम्यान या सेवांच्या वेब आवृत्तीवर याचा कोणताही परिणाम होणार नाही.
*जॉईन करा Lets Up डिजिटल मॅगझीन आणि मिळवा न्यूज, जॉब, माहिती आणि मनोरंजन अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* https://goo.gl/XhZsJM
👉 _*आता अॅप इन्स्टॉल करण्याची गरज नाही...*_
गुगलने आता इन्स्टॉल न करतांनाही अॅप वापरण्याची सुविधा देणारे इन्स्टंट अॅप्स हे फिचर सर्वांसाठी जारी केले आहे. अगोदर काही डेव्हलपर्ससाठी हे फिचर प्रदान करण्यात आले होते. आता मात्र जगभरातील अँड्रॉईड युजर्ससाठी ही सुविधा देण्यात आली आहे. या अंतर्गत कुणालाही इन्स्टंट अॅप्ससाठी ‘साईनअप’ करावे लागते. आपण येथे क्लिक करून याची नोंदणी करू शकतात. एकदा का नोंदणी झाली की, आपण ‘इस्टंट अॅप्स’साठी पात्र ठरतात. यातील पहिल्या टप्प्यात पेरिस्कोप, विकी, बझफिड आणि विश हे अॅप इन्टॉल न करतांनाही वापरता येणार आहे. लवकरच यात अन्य अॅपचा समावेश करण्यात येणार आहे.
👉 _*'जिओ'चा तो मॅसेज फेक आहे...*_
रिलायन्स जिओने डाऊनलोडची मर्यादा वाढवली या संदर्भात एक फेक मॅसेज चांगलाच व्हायरल होतोय. या मॅसेजमध्ये एक हायपरलिंक देण्यात आली आहे. जर तुम्ही जिओ सिम वापरत असाल आणि तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केले तर तुमची डेटा लिमिट 1 जीबी वरून 10 जीबी होईल. असे या मॅसेजमध्ये म्हटलेले आहे. लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा इमेल आयडी, फोन नंबर, आणि इतर माहिती विचारली जाईल. ती भरल्यानंतर तुम्हाला Share this with your whats app group so they can also upgrade jio service असा मॅसेज येईल. पण तुम्हाला कोणताही डेटा मिळणार नाही. शिवाय तुम्ही जी माहिती या वेबसाईटवर भरता त्याचा वापर करून तुमचा डेटा चोरला जाऊ शकतो.
( *जॉईन लेट्स अप* : https://goo.gl/XhZsJM । Lets Up Magazine विषयी आपला *अभिप्राय कळवा* feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
अवश्य प्या नारळपाणी
Let's Up Health Katta
नारळपाणी हे सर्व सिझनमध्ये सहज उपलब्ध असणारे व आरोग्यदायी पेय आहे. यामधील पाणी हे 100% शुद्ध असून त्यात 94% पाणी असते. अगदी कमी कॅलरीज आणि शून्य टक्के कोलेस्ट्रॉल असल्याने हे एक नैसर्गिक आरोग्यदायी पेय आहे. आपली पाणी पिण्याची इच्छा तृप्त करण्यापासून ते अगदी असंख्य आरोग्याच्या फायद्यासाठी नारळाचे पाणी उपयुक्ते असते.
👉 नारळ पाण्यात कमी प्रमाणात फॅट असतात. यातील पोषक घटकामुळे भूक लागत नाही. त्यामुळे तुमचे जेवण नियंत्रित राहण्यास मदत होते.
👉 तुमची त्वजा उजळण्यासाठी नारळ पाणी खूप फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील डाग घालविण्यासाठी हे पाणी काम करते तसेच नारळपाणी त्वचेला हायड्रेटेड व मॉश्चराईज्ड करते.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रित राहण्यास मदत होते.
👉 काही अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, नारळपाण्यामुळे हार्ट अटॅकचे प्रमाण कमी होते. तर दुसऱ्या अभ्यासानुसार नारळपाण्यात मुबलक प्रमाणात असलेल्या पोटॅशिअममुळे हायपरटेन्शनचा त्रास कमी होतो.
👉 नियमित नारळपाणी घेतल्याने किडनी स्टोनचा धोका कमी होतो. त्यात असलेल्या पोटॅशिअम व मॅग्नेशिअममुळे लघवी साफ होण्यास मदत होते.
👉 डायरियामध्ये शरीरातील पाणी कमी होते. नारळपाण्यामुळे ती कमतरता भरून निघते त्याचबरोबर इलेक्ट्रोलाइट्स आणि मिनिरल्सची कमी देखील भागवली जाते. शरीरातील विषद्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात.
👉 उन्हाळयात सतत घाम आल्यामुळे शरीर डिहायड्रेट होते. त्यामुळे पोटाला थंडावा देणारे पदार्थ खावेसे वाटतात. अशावेळी नारळपाणी हा उत्तम पर्याय आहे. कारण यात कार्ब्स, साखर कमी प्रमाणात तर इलेक्टोलेट्स मुबलक प्रमाणात असतात.
👉 नारळपाणी हे नैसर्गिकरित्या शुद्ध असते. म्हणून प्रेग्नसीमध्ये हे पाणी पिणे सुरक्षित असते. प्रेग्नसीमध्ये होणारी अॅसिडिटी, बद्धकोष्टता, छातीतील जळजळ यावर अत्यंत फायदेशीर ठरते.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
