ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

الذهاب إلى القناة على Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

إظهار المزيد
6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
🌐 जाणून घ्या विकिपीडिया बद्दल महत्वाची माहिती LetsUp | Education 💁‍♂ 18 वर्षापूवी सुरु झालेली 'विकिपीडिया' या वेबसाईटने आज इंटरनेटच्या जगात वेगळ स्थान निर्माण केले आहे. जर तुम्ही नेहमी इंटरनेटवर राहून विकिपीडियाचा वापर करत असाल तर तुम्हाला खालील गोष्टी माहित असणे आवश्यक आहेत. 1) 2001 मध्ये जिमी वेल्स आणि लैरी सेंगर यांनी विकिपीडियाला सुरुवात केली होती. 2) हे कोणाला हि माहिती नाही आहे कि विकिपीडियाचा पहिला लेख कोणता होता. विकिपीडियाचे संस्थापक ज़िमी वेल्स यांनी पुष्टि केली आहे कि त्यांच्या वेबसाइटचा पहिला लेख त्यांच्या वेबसाइटवरच कुठे तरी गहाळ झाला आहे. 3) विकीपीडिया मधील विकी या शब्दचा अर्थ 'जलद' असा होतो. हा शब्द "हवाई(hawaii)" भाषेमधून घेतला आहे. 4) इंग्रजी विकिपीडियातील वेबसाइट वर सर्वात जास्त म्हणजे 50 लाख लेख अस्तित्वात आहेत. 5) विकिपीडियावर रोज 7 हजार नवीन लेख प्रकाशित केले जातात. 6) विकिपीडिया भारतामध्ये सातव्या क्रमांकावर आहे ही वेबसाइट भारतामध्ये ट्विटरपेक्षा अधिक वापरली जाते. 7) विकिपीडियाचा पहिला लोगो 17 वर्षीय पॉल स्टैनिसर(paul stansifer) याने बनवला होता. 8) "सेक्स" विकिपीडिया वर सर्वात प्रसिद्ध लेख आहे, जो सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे. 9) 5 करोड पेक्षा जास्त वापरकर्ते दर महिन्याला विकिपीडियाचा वापर करतात. आणि प्रत्येक महिन्याला 2 अऱब एवढे वापरकर्ते वाढत आहेत. 10) विकिपीडियावर 50% पेक्षा जास्त लोक गुगल(google) द्वारा येतात. 11) विकिपीडियावर पैसा कमवण्यासाठी कोणत्याही प्रकारची जाहिरात दाखवली जात नाही. विकिपीडिया “no loss no profit” वर चालू आहे. 12) प्रत्येक महिन्यात 5 करोड पेक्षा जास्त युजर्स विकिपीडियाचा वापर करतात आणि प्रत्येक महिन्यात 2 अरब पेक्षा जास्त वेळा या वरील लेख वाचले जातात. 13) जर विकिपीडियावर एखादा लेख इंग्रजीमध्ये वाचताना कठीण वाटत असेल तर "simple english" या ऑप्शन वर क्लिक करा. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🎯 मैं जी भर जिया, मैं मन से मरूँ, लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूँ? LetsUp । Special ⚡ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज पहिला स्मृतीदिन 💁‍♂ माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट 2018 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. त्यांचे आज प्रथम पुण्यस्मरण. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आयुष्यातील काही ठळक घडामोडींचा घेतलेला आढावा... 📍 पोखरण टेस्ट : 1974 नंतर भारताने मे 1998 मध्ये पोखरणमध्ये यशस्वी अणुचाचणी घेतली. भारत अण्विक शक्ती असलेला देश आहे हे दाखवून देण्यासाठी ही अणुचाचणी करण्यात आली. त्यांच्या या निर्णयाचा अनेक स्तरातून विरोध झाला. मात्र, या चाचणीनंतर भारत एक शक्तीशाली देश म्हणून जगाच्या समोर उदयास आला. 🔢 '13' नंबरचं स्पेशल कनेक्शन : वाजपेयींनी 13 मे 1996 रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र बहुमत सिद्ध करता न आल्याने 13 दिवसांमध्ये त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी त्यांचे सरकार 13 महिन्यांमध्ये कोसळले. वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी 13 पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता. 13 ऑक्टोबर 1999 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घ्यायची असे त्यांनी ठरवले होते. 💫 काही विशेष : ▪ 2014 मध्ये देशातील सर्वोच्च सन्मान असलेल्या भारतरत्नने गौरवण्यात आले. ▪ 6 ते 14 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचे वाजपेयींच्या कार्यकाळात सुरू केले. ▪ माजी पंतप्रधान राजीव गांधी हे भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक मानले जातात. परंतु या क्रांतीचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम वाजपेयी यांनी आपल्या कार्यकाळात केले. ▪ भारत-पाकिस्तान या देशांमधील संबंध सुधारण्यासाठी वाजपेयींनी अनेक मोलाचे प्रयत्न केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात दिल्ली-लाहोर ही बससेवा सुरू केली व पहिल्या बसमधून ते स्वत: लाहोरला गेले होते. ▪ 1942 मध्ये त्यांनी छोडो भारत आंदोलनात 23 दिवस कारावास भोगला होता. 👏 भारत रत्न, कुशल राजनीतिज्ञ, कुशल वक्ता व माजी प्रधानमंत्री श्री. अटल बिहारी वाजपेयी यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन! न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🥳 आज पारसी नववर्षारंभ LetsUp । Special 👉 जगभरात आज पारसी नववर्षाला सुरुवात होत आहे. 🎊 पारसी नववर्ष : दरवर्षी ऑगस्ट महिन्यात पारसी नववर्षदिन साजरा करण्यात येतो. पासरी समुदायासाठी 360 दिवसांचे वर्ष असते, तर उर्वरीत 5 दिवस हे गाथा म्हणण्यासाठी असतात. पारसी नववर्षाला 'नवरोज' असेही म्हणतात. महाराष्ट्रात 'पतेती' म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. 📆 इस्रायल कॅलेंडर प्रमाणे वर्षाच्या ह्या पहिल्या दिवसाला 'नवरोज' म्हटले जाते. नवरोजचा अर्थ जणू सृष्टी नवीन हिरवा शेला अंगावर पांघरुन स्वागताला उभी आहे. या दिवशी पारशी लोक अग्यारीत जाउन प्रार्थना करतात आणि पारशी भोजन घेतात. 🍱 पारशी जेवण : पारशी जेवण हे गुजराती आणि इराणी खाद्यसंस्कृतींवर आधारित आहे. यात मुख्यत्वे भात आणि दालचा (घट्ट वरण) सामावेश आहे. पारशी लोक मोठ्या प्रमाणात मांसाहार करतात. पात्रानू मच्छी, धनसाक, चिकन फर्चा, सली कोंबडी हे काही पारशी मांसाहारी पदार्थ आहेत. अंडी आणि स्क्रँबल्ड एग, पारसी आकूरी, पोरो सारखे अंड्याचे पदार्थ हे पारशी नाश्त्यात असतात. 💁‍♂ राष्ट्रपिता महात्मा गांधी काय म्हणाले? : हा समाज भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त 0.007% आहे. पण, त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. स्वातंत्र सैनिकांपासून ते उद्योजकांपर्यंत पारश्यांनी आपले वर्चस्व सिध्द केले आहे. 📢 ‘चांगले विचार, आचार आणि सतकर्म ‘ हा ह्या पवित्र दिवसाचा संदेश आहे. 👏 पारसी नववर्ष नवरोझच्या शुभेच्छा !!! न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

LetsUp News Updates ● पाकिस्तानकडून जम्मू कश्मीरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन, प्रत्युत्तर कारवाईत पाकिस्तानचे 3 सैनिक ठार ● 29 ऑक्टोबरपासून सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा ● आर्थिक मंदीत सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकार उद्योगांना प्रोत्साहन पॅकेज देण्याच्या विचारात ● ओएनजीसी कंपनी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनवाढीसाठी देशात 83 हजार कोटींची गुंतवणूक करणार ● राज्यात लवकरच ‘एक व्यक्ती, एक घर’ धोरण योजना लागू होणार, उच्च न्यायालयाच्या आदेशाची राज्य शासनाकडून अंमलबजावणी केली जाणार ● आर्थिक संकटात सापडलेली एमटीएनएल, बीएसएनएल उपक्रमातील कर्मचाऱ्यांसाठी अखेर स्वेच्छानिवृत्ती योजना जारी ● अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीचे प्रवेश आजपासून निश्चित होणार ● वैद्यकीय प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार; आरोग्य विद्यापीठाने दिली मान्यता ● टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी आज होणार मुलाखत! सल्लागार समितीकडे लक्ष ● हिंदी चित्रपटांमुळे 'ये रे ये रे पैसा 2' ला थिएटर्स मिळणे मुश्कील; प्रसाद ओकने सोशल मिडीयावर व्यक्त केला राग न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

😍 सप्टेंबरमध्ये लाँच होणार वनप्लसचा स्मार्ट टीव्ही LetsUp | Tech ⚡ चिनी मोबाईल कंपनी वनप्लस ने केली अधिकृत घोषणा 📢 वनप्सल लवकरच स्मार्ट टीव्हीही लाँच करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच कंपनीनं या टीव्हीची घोषणा केली असून टीव्हीचं नावही जाहीर केलं आहे. 'वनप्लस टीव्ही' असं नाव आहे. 🔹 कंपनीने नुकताच टीव्हीचा अधिकृत लोगोही लाँच केला आहे. 📆 या दिवशी होणार लॉंच? : सूत्रांनुसार, 26 सप्टेंबरला हा टी.व्ही लाँच होईल असे सांगण्यात येत आहे. वनप्लसचा हा टीव्ही अँड्रोइड असून अनेक वेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. 💫 वेरियंट : वनप्लस टीव्ही 43, 55, 65 आणि 75 इंच वेरियंटमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या टीव्हीचा हाय-एंड वेरियंट 4kHDR डिस्प्लेला सपोर्ट करणार. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🚀 चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावले LetsUp | Update ⚡ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं सोडलेल्या 'चांद्रयान-2' च्या प्रवासाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण 🌍 भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री 2 वाजून 21 मिनिटांनी 'चांद्रयान-२'नं पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून थेट चंद्राच्या दिशेनं सरळ प्रवास सुरू केला आहे. पृथ्वीची कक्षा सोडण्यापूर्वी 'इस्रो'नं 'ट्रान्स लूनार इंजेक्शन' हा किचकट प्रयोग यशस्वीरित्या पार पाडला. 🗣 काय म्हणाले इस्रोचे अध्यक्ष? : 'चांद्रयान-2' हे चंद्राच्या वाटेवर सहा दिवस असेल आणि सुमारे 4.1 लाख किलोमीटरचा प्रवास करून 20 ऑगस्टला अंतिम कक्षेत पोहोचेल. 📍 चांद्रयान 2 चा प्रवास ▪ चांद्रयान 2 चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला. ▪ चंद्र हा पृथ्वीपासून 3.84 लाख किलोमीटर अंतरावर आहे. ▪ 20 ऑगस्टला चांद्रयान 2 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. ▪ 3 सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. ▪ 7 सप्टेंबरला लँडर चंद्रावर उतरेल न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

👨🏻‍🎨 विंग कमांडर अभिनंदन यांना 'वीरचक्र' जाहीर LetsUp | Update ⚡ स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी 'वीर चक्र' पुरस्काराने गौरवण्यात येणार 🇮🇳 स्वातंत्र्यदिनी मिळणार 'वीर चक्र' : पाकिस्तानी हवाई दलाचे एफ-16 हे लढाऊ विमान पाडणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र पदक जाहीर झाले आहे. 📆 15 ऑगस्ट रोजी अभिनंदन यांना वीरचक्र पदक प्रदान केले जाणार आहे. 🏵 वीरचक्र : 'वीरचक्र' हे भारतीय सैन्यदलातील जवानांना देण्यात येणारं तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पदक आहे. अतुलनीय धाडस आणि शौर्यासाठी हे पदक दिलं जातं. 👉 3 महत्वाचे शौर्य पदक : 🥇 परम वीर चक्र' 🥈 'महा वीर चक्र' 🥉 'वीर चक्र' न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🏏 भारत-वेस्ट इंडिजमध्ये आज निर्णायक लढत LetsUp | Sports ⚡ मालिका विजयासाठी भारतीय संघ उतरणार मैदानात 🏆 मालिका विजयाचं लक्ष : भारतानं वेस्ट इंडीज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आज अखेरचा सामना होणार आहे. 🌧 पहिला सामना पावसामुळं रद्द करण्यात आला होता. त्यामुळं आता शेवटच्या सामन्यात विजय मिळवून भारताचे मालिका विजयाचं लक्ष्य असेल. 🧐 वेस्ट इंडीजसाठी एकदिवसीय मालिका वाचवण्यासाठी हा सामना जिंकणं गरजेचं आहे. तसेच तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलचा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो. त्यामुळं वेस्ट इंडीजचा संघ गेलला विजयी निरोप देण्यासाठी मैदानात उतरेल. 🧢 याच सामन्यात शानदार शतक करणारा कर्णधार विराट कोहलीकडून आजही दमदार खेळी अपेक्षित आहे. 📍 स्थळ -पोर्ट ऑफ स्पेन, ⏰ वेळ - सायंकाळी 7 वाजता 📺 येथे पाहू शकता सामना : Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

👮‍♂ राज्यातील 11 पोलिसांना 'केंद्रीय गृहमंत्री पदक' LetsUp । Update ⚡ उत्कृष्ट तपास व शोधकार्यासाठी देण्यात येणार पुरस्कार 👍 उत्कृष्ट कामगिरी : केंद्रीय गृहमंत्री पदकाने देशातील 96 तपास अधिकाऱ्यांचा गौरव झाला असून त्यात महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 💁‍♂ गुन्हे तपासातील कौशल्याचा सन्मान व्हावा व तपासाचा दर्जा उंचावण्यासाठी गेल्या वर्षीपासून या पदकांची सुरुवात करण्यात आली आहे. ▪ सीबीआय - 15 अधिकारी ▪ महाराष्ट्र पोलीस - 11 अधिकारी ▪ उत्तर प्रदेश - 10 अधिकारी ▪ केरळ पोलीस - 9 अधिकारी ▪ मध्य प्रदेश - 8 अधिकारी ▪ दिल्ली व कर्नाटक पोलीस - 6 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात 13 महिला पोलीस अधिकाऱ्यांनीही बाजी मारली आहे. 🥇 महाराष्ट्रातील पदकविजेते अधिकारी 1) अविनाश लक्ष्मीकांत आघाव (पोलीस निरीक्षक) 2) श्रद्धा अशोक वायदंडे (सहायक पोलीस निरीक्षक) 3) सुरेश नानाभाऊ रोकडे (पोलीस निरीक्षक) 4) प्रदीप विजय भानुशाली (पोलीस निरीक्षक) 5) प्रशांत श्रीराम अमृतकर (पोलीस उपअधीक्षक) 6) हेमंत सुभाष पाटील (पोलीस निरीक्षक) 7) प्रियांका महेश शेळके (सहायक पोलीस निरीक्षक) 8) सागर जगन्नाथ शिवलकर (पोलीस निरीक्षक) 9) संजय देवराम निकुंबे (पोलीस निरीक्षक) 10) सुधाकर दत्तू देशमुख (पोलीस निरीक्षक) 11) सचिन सदाशिव माने (सहायक पोलीस निरीक्षक) न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

LetsUp News Updates ● केंद्राच्या मंजुरीनंतर जम्मू काश्मीरमध्ये मतदारसंघ पुनर्रचना होणार, निवडणूक आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला निर्णय ● अभिनेता रितेश देशमुखनंतर महानायक अमिताभ बच्चन करणार महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत ● 'हिंदू पाकिस्तान' शब्दामुळे शशी थरूर अडचणीत; कोर्टाने जारी केले अटक वॉरंट ● दिल्लीतील रिक्षा चालकांसाठी केजरीवाल सरकारचा मोठा निर्णय, रिक्षा फिटनेस फी माफ करण्याचा घेतला निर्णय ● विमानतळावरील धरणे आंदोलनामुळे हॉंगकॉंगमधील विमानसेवा पूर्णतः ठप्प ● मुख्यमंत्री वेळ देत नसल्याने अखेर नारायण राणेंच्या 'नो होल्ड्स बार्ड' या पुस्तकाचे शरद पवार व नितीन गडकरींच्या हस्ते होणार प्रकाशन ● पूरपरिस्थितीमुळे स्वातंत्र्य दिनासह रक्षाबंधनावर दूधटंचाईचे सावट; बासुंदी, श्रीखंड, मिठाईची टंचाई ● व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर, आता फिंगरप्रिंटच्या सहाय्याने मेसेज अनलॉक होणार ● भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत रवी शास्त्रींसह सहा दिग्गज मैदानात ● लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मध्ये पुन्हा एकदा होणार दयाबेनची एन्ट्री न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🏏 भारताचा वेस्ट इंडिजवर 59 धावांनी विजय LetsUp | Sports ⚡ डकवर्थ-लुईस नियमाप्रमाणे टीम इंडियाचा 59 धावांनी विजय 💁‍♂ भारत - वेस्टइंडिजमध्ये तीन एकदिवसीय सामन्यांमधील दुसऱ्या सामन्यांमध्ये भारताचा विजय 🎾 भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेत वेस्ट इंडिजला विजयासाठी 280 धावांचे आव्हान दिले होते. 👉 मात्र विंडीजच्या फलंदाजीदरम्यान सामन्यात पावसाने व्यत्यय आल्यामुळे,वेस्ट इंडिजला विजयासाठी 46 षटकात 270 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. मात्र विंडीजचा संघ 210 धावांपर्यंत मजल मारु शकला. 🧢 कोहलीचे शतक : भारताचा कर्णधार विराट कोहलीने चांगली कामगिरी बजावत 14 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 120 धावा केल्या. 💫 या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

LetsUp News Updates ● केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली ● गुजरातमधील कच्छ येथे पुरात अडकलेल्या 125 जणांना भारतीय हवाई दलाने सुरक्षित स्थळी हलवले ● देशातील सर्व सरकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचे कामकाज सकाळी 9 वाजता सुरू होणार, अर्थ मंत्रालयाने दिला निर्णय ● काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळ येथील पूरग्रस्तांची भेट घेत घेतला परिस्थितीचा आढावा ● पाकिस्तानकडून समझौता एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्यामुळे समझौता लिंक एक्स्प्रेसही रद्द; उत्तर रेल्वेची माहिती ● 370 कलम रद्द केल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान चिडले, इम्रान खान यांची आरएसएसवर जाहीर टीका ● मुसळधार पावसाचा फटका रेल्वे विभागाला, मुंबई-पुणे रेल्वे सेवा 15 ऑगस्टनंतरच पूर्ववत होणार, साचलेले पाणी, दरडींमुळे मोठे नुकसान ● राज्यात सुरू असणाऱ्या अतिवृष्टी तसेच पुराचा जिल्हा परिषदेच्या दोन हजार 177 शाळांना फटका; शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांची माहिती ● रॉजर्स कप टेनिस स्पर्धेमध्ये मेरी बुज्कोव्हाला मात देत सेरेना विल्यम्सचा अंतिम फेरीत प्रवेश ● 'कुली नंबर 1' चित्रपटात कादर खान यांची भूमिका साकारणार अभिनेते परेश रावल न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💥 महाराष्ट्रासह 4 राज्यात पावसाचा हाहाकार; 125 जणांचा मृत्यू LetsUp | Update ⚡ गेल्या काही दिवसांपासून विविध राज्यात मुसळधार पावसाचा हाहाकार 👀 या राज्यांमध्ये पावसाचा कहर : महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पावसाचा कहर दिसून येत आहे. या राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 📍 125 नागरिकांचा मृत्यू : ▪ केरळ : 57 ▪ महाराष्ट्र : 27 ▪ गुजरात : 22 ▪ कर्नाटक : 24 💰 10 हजारांची मदत : सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे सुरक्षितस्थळी हलविलेल्या प्रत्येक कुटुंबास दहा हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे. 🗣 काय म्हणाले मंत्री? : शासनाने 154 कोटींचा निधीही वर्ग केला असून, पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर तो जमा होणार आहे, अशी माहिती मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे. 🎯 व्हॉट्सअॅपवर लेट्सअप बातम्या आणि माहिती देई झटपट, लेट्सअप फ्री सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/HpcBFG

🎊 Amazon FREEDOM sale : बस कुछ ही घंटे बाकी! 😍 Amazon FREEDOM sale अंतर्गत अनेक वस्तुओं की खरीददारी पर पाएं आकर्षक छूट 📆 सेल 8 से 11 अगस्त 2019 तक ... 📱 Mobile Accessories : 40% तक डिस्काउंट 🔌 Electronics Devices : 35% तक डिस्काउंट 📲 6000 रुपयों तक एक्सचेंज ऑफर 🔊 Headphones & Speakers : 60% से अधिक डिस्काउंट 📺 Tv & Appliances : 60% तक डिस्काउंट 🏠 Home & Kitchen उपकरण : 75% तक डिस्काउंट 👗 amazon Fashion : 80% तक डिस्काउंट 🛒 Daily Essentials : 70% तक डिस्काउंट 👍 No Cost EMI, Cashback & More 💳 अगर आप SBI Credit Card User हैं, तो 10% इंस्टेंट डिस्काउंट उपलब्ध 💰 Amazon Pay से पे (भुगतान) करने पर 5000रु. तक का अतिरिक्त कॅशबॅक ✈ डोमेस्टिक फ्लाईट बुकिंग पाइये 2000 /- में 🛒 जल्दी करें! शॉपिंग की स्वर्णसंधि का लाभ उठाएं 👍 ऑफर्स का लाभ लेने के लिए यहां क्लिक करें : 👉 https://amzn.to/31rj2TV

🍪 टेस्टी टिफिन : साबुदाणा इडली LetsUp | Recipe 🍽 साहित्य : अर्धी वाटी साबुदाणा, 1 वाटी इडलीचा रवा, पाव वाटी गोड दही, साखर, मीठ. 💁‍♂ कृती ▪ साबुदाणा, इडली रवा आणि दही एकत्र करा. ▪ त्यात किंचिंत साखर आणि मीठ घालून रात्रभर भिजवून ठेवा. ▪ दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे मिश्रण ढवळून त्याच्या इडल्या करा. ▪ हवे असल्यास अधिक पाणी घालून घ्या. ▪ नेहमीच्या इडलीला कंटाळला असाल तर हा वेगळा प्रयोग नक्की करून पाहा. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

📢 पॉलिसी बाजार टर्म इन्शुरन्स 👍 Policy Bazaar सर्व प्रकारच्या मृत्यू, रोग आणि अपंगत्वापासून संरक्षण देतो 👌 टर्म लाइफ इन्‍शुरन्‍स निश्चित प्रीमियम दरावर निश्चित कालावधीसाठी कव्हरेज प्रदान करते. 🧐 पॉलिसी बाजार विविध विमा पॉलिसींच्या तुलनेत आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता हे निवडण्यास मदत करतो 🎯 मुदत विमा असो किंवा आरोग्य विमा, गुंतवणूकीची योजना, दुचाकी / कार विमा किंवा ट्रॅव्हल इन्शुरन्स असो, पॉलिसी बाजार प्रत्येक बाबतीत उत्कृष्ट ऑफर देते. 💰 कर लाभ : टर्म लाइफ इन्शुरन्ससाठी भरलेला प्रीमियम कलम 80 (C) अंतर्गत 1,50,000 पर्यंत करमुक्त आहे. 💵 केवळ 490/- रु, प्रति महिन्यात मिळवा 1 करोड रुपयांचा विमा कव्हरेज, यामध्ये मृत्यू, आजारपण, अपंगत्व यासाठी कव्हरेज दिले जाते. 💰 पॉलिसीच्या मुदतीमध्ये विमा कव्हरेज घेतलेल्या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारास एकरकमी रक्कम मिळते. 💫 टर्म इन्शुरन्सच्या मुख्य अटी 📌 Total Payout of each plan 📌 Premium amount paid for desired Total Payout 📌 Policy term offered 📌 High claim settlement ratio 📌 Riders offered with the plan 📍 सर्वोत्तम प्लॅन निवडण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा : 👉 https://urlzs.com/3y7Pq (Advt)

⭐ साप्ताहिक राशीभविष्य; 11 ते 10 ऑगस्ट 2019 LetsUp | Astrology ▪ मेष - अडचणी कमी होतील : व्यवसायातील अडचणी कमी होतील. तुमचा उत्साह व आत्मविश्वास वाढेल अशी घटना घडेल. सामाजिक क्षेत्रांत रेंगाळलेली कामे होतील. दिग्गजांचा सहवास मिळेल. नव्या उमेदीने कार्य आरंभ होईल. ▪ वृषभ - रागावर ताबा ठेवा : व्यवसायात मोठे दडपण येईल. अडचणींवर मात करून यश मिळवायचे आहे. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत मान-प्रतिष्ठा मिळेल. जवळचे लोक अडचणी वाढवतील. रागावर ताबा ठेवा. ▪ मिथुन - परदेशी जाण्याची संधी लाभेल : चंद्र-बुध प्रतियुती व्यवसायात अधिक फायदेशीर ठरेल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत प्रतिष्ठाचा उपयोग चांगल्या कामासाठी करा. नोकरीत वरिष्ठ कौतुक करतील. परदेशात जाण्याची संध्यी मिळेल. ▪ कर्क - कार्याला दिशा मिळेल : अनावश्यक खर्च वाढेल. मनावर दडपण येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमच्या कार्याला योग्य दिशा देता येईल. प्रगतीचा, लोकप्रियतेचा मार्ग मिळेल. परंतु संतापावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. ▪ सिंह - आत्मपरीक्षण करा : व्यवसायातील-नोकरीतील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत विचारवंतांचा सल्ला घ्या. कौटुंबिक तणाव कमी करण्यासाठी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. ▪ कन्या - विचारपूर्वक निर्णय घ्या : आठवडय़ाच्या सुरुवातीला नोकरी-व्यवसाय यातील महत्त्वाची कामे करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत मोठा निर्णय विचारपूर्वक घ्या. शुक्रवार, शनिवार तुमच्या विरोधात कट-कारस्थान होईल. मनाविरुद्ध वातावरणामुळे उद्विग्नता येईल. ▪ तूळ - प्रगतीकारक काळ : व्यवसाय-नोकरीत वेगाने प्रगती करता येईल. मोठे काम मिळवता येईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रांना भेट द्या. चौफेर प्रगतीची घोडदौड करा. ▪ वृश्चिक - योजनांना गती मिळेल : व्यवसायात रेंगाळलेले काम पूर्ण होईल. नोकरीत बदल करण्याची संधी मिळेल. प्रगतीच्या मार्गावर वाटचाल होईल. राजकीय-सामाजिक क्षेत्रात मान-प्रतिष्ठा वाढेल. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रात तुमचे कौतुक होईल. ▪ धनु - मनोधैर्य जपा : व्यवसाय-नोकरीतील झालेला गैरसमज दूर होईल. ताण-तणावातून मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत उत्साह वाढेल. खंबीरपणे कार्याला सुरुवात करा. नव्या योजनांची मांडणी करा. ▪ मकर - संमिश्र घटनांचा काळ : व्यवसाय-नोकरीत तुमचे बोलणे प्रभावी ठरेल. प्रवासात सावध राहा. तुमच्या मनातील सुप्त प्रेमाची, मदतीची भावना ओळखणारे लोक तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत. ▪ कुंभ - आर्थिक व्यवहारात लक्ष द्या : व्यवसायातील गुंता सोडवता येईल. नोकरीत स्थिर मनाने काम करा. कोणत्याही निर्णयाची घाई नको. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत नवे डावपेच तयार करा. आर्थिक व्यवहारात लक्ष द्या. ▪ मीन - वर्चस्व वाढेल : व्यवसाय-नोकरीत चातुर्याचा वापर करा. वाद वाढवू नका. राजकीय-सामाजिक क्षेत्रांत तुमचे वर्चस्व राहील. प्रतिस्पर्धी तणाव करू शकतात. नाटय़-चित्रपट-क्रीडा क्षेत्रांत नवीन परिचय होईल. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

👑 काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधींची निवड LetsUp । Politics ⚡ लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधींनी दिला होता अध्यक्षपदाचा राजीनामा 💁‍♀ अखेर सोनियांच्या हातीच कारभार : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. शनिवारी पक्ष कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची नियुक्ती करण्यात आली. 👀 राजकीय कामगिरी : ▪ सोनिया गांधी 1998 ते 2017 या कालखंडात 19 वर्षे काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. ▪ पुन्हा एकदा तात्पुरत्या काळासाठी त्यांनी ही जबाबदारी स्वीकारत पक्षाची कमान आपल्या हाती घेतली आहे. 🗣 काय म्हणाले राहुल गांधी? : राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी सर्वच नेत्यांनी विनंती केली. पण आपण राजीनामा मागे घेणार नाही. तुम्ही नेत्यांनीच नवा अध्यक्ष निवडावा आणि गांधी कुटुंबातील व्यक्ती काँग्रेसची अध्यक्ष असू नये, असे त्यांनी स्पष्ट केले होते. 📍 पक्षाचा नवा अध्यक्ष निवडेपर्यंत सोनिया गांधी याच पक्षाचं हंगामी अध्यक्षपद सांभाळणार आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🚌 पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात जाणाऱ्या सर्व खासगी बस रद्द LetsUp । Update ⚡ राज्यातील मुसळधार पावसामुळे खासगी बस मालकांनी घेतला निर्णय 🛣 या मार्गावरील बसेस बंद : राज्यात पश्चिम महाराष्ट्रासोबतच कोकणात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे मुंबईहून सातारा, सांगली, कोल्हापूरकडे याशिवाय कोकणात आणि गोव्याकडे जाणाऱ्या सर्व खाजगी बस रद्द करण्यात आल्या आहेत. 🗣 बस मालक संघटनाचे म्हणणे? : जोपर्यंत पूरस्थिती कमी होत नाही, रस्त्यावरील पाणी ओसरत नाही तोपर्यंत या गाड्या बंद राहतील, असं खाजगी बस मालक संघटनेकडून सांगण्यात आलं आहे. 👀 या खाजगी गाड्या रद्द ▪ मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोकण भागात जाणाऱ्या रोजच्या - 100 खाजगी बस ▪ मुंबई ते कोल्हापूर, सातारा, सांगलीकडे जाणाऱ्या - 300 गाड्या ▪ मुंबई ते बंगलोर, बेळगाव - 300 गाड्या ▪ मुंबई ते गोवा - 200 गाड्या न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💰 साई संस्थान पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत करणार LetsUp । Ahmednagar ⚡ कोल्हापूर - सांगली मधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिर्डी संस्थानचा पुढाकार 👌 पूरग्रस्तांना आर्थिक मदत : साई संस्थानकडून पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत करण्यात येणार आहे. हा मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे. 🚑 वैद्यकीय पथक : पूरग्रस्त भागात मदतीसाठी 20 जणांचे वैद्यकीय पथक जाणार आहे, अशी माहिती सुरेश हावरे यांनी दिली आहे. 📍 मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यात भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक आपत्ती समजून पूरग्रस्तांसाठी ही आर्थिक मदत देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup