ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

الذهاب إلى القناة على Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

إظهار المزيد
6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
😡 *अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना* *LetsUp | International* ⚡ अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. 💁‍♂️ जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान ही घटना घडली. 🏛️ वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. 🔎 युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. 📍 जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर फक्त अमेरिकेतच नव्हे तर जगभरात निदर्शनांच्या माध्यमातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🌾 *शेतकऱ्यांसाठी खुशखबर; आता देशभरात कुठेही माल विकता येणार* *LetsUp | Update* 😍 शेतकऱ्यांना आपला माल आता देशभरात कुठेही विकता येणार आहे. 💁‍♂️ शेतकरी आणि ग्राहक यांच्यात असलेला दलालही व्यवहारातून बाद करण्यात आला असून शेतकऱ्यांना ई-ट्रेडिंगच्या माध्यमातून खरेदी विक्री करण्याची मुभा मिळणार आहे. 👍 शेतकरी आणि व्यापारी अगोदरच करार करून शेतमालाचा किमान भाव ठरवतील आणि पीक आल्यानंतर भाव जास्त मिळाल्यास व्यापाऱ्याचा फायद्यातून शेतकऱ्याला ही त्याचा हिस्सा मिळेल. 📍 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी विशेष बैठक झाली. या बैठकीत शेतीविषयक महत्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. 🗣️ त्याच बरोबर साठ वर्षांपूर्वीच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यातही बदल करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🗞️ *LetsUp News Update* ▪ भारतातील कोरोना बाधितांची संख्या 2 लाख 7 हजार 615 वर पोहचली; मागील 24 तासांत 8 हजार 909 नव्या रुग्णांची भर ▪ भारत सरकारकडून व्हिसा, प्रवास निर्बंधामध्ये शिथिलता; परदेशातील व्यावसायिक, आरोग्यसेवा कर्मचारी, तंत्रज्ञ व इतर तज्ञांना देशात प्रवासाची परवानगी ▪ फटाकेयुक्त अननस खायला दिल्याने हत्तीणीचा मृत्यू, दोषींची माहिती देणाऱ्यांना 50 हजारांचं बक्षिस ---------------------- *Advertisment On LetsUp* *Contact* : 7798655655 ---------------------- ▪ अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना; युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांकडून तपास सुरु. ▪ राज्यात तब्बल 2 हजार 500 हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून राज्यातील विविध रुग्णालयांत 1 हजार 526 पोलिसांवर उपचार सुरु ▪ राज्यात रुग्णवाढीचा दर 7 वरून 4.15 टक्क्यांवर, आतापर्यंत 32 हजार 329 रुग्ण झाले कोरोनामुक्त ▪ निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यातून महाराष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले आभार ▪ रतीय संघाची माजी कर्णधार व अव्वल हॉकीपटू राणी रामपाल हिची देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वात मानाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस ▪ Mitron App नंतर आता Remove China App ही Google Play Store वर करतंय हकालपट्टीचा सामना ▪ लॉकडाऊन परिणाम; अभिनेता कार्तिक आर्यन-कियाराचा "भूलभुलैया 2' सिनेमा झाला पोस्टपॉंड 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

😱 *​तीन दिवसांत 651 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू* *LetsUp | Corona Live* ⚡ देशातील कोरोनग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 2 लाखाचा टप्पा पार केला आहे. 🏠 गेल्या एका दिवसात 4 हजार 776 नागरिकांना विविध रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. 💁‍♂️ तर, गेल्या तीन दिवसांमध्ये देशभरातील 651 जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. 🧐 सध्या देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख 7 हजार 615 झाली आहे. यातील 1 लाख 303 नागरिकांनी कोरोनावर मात मिळवली आहे. 📍 तर, 1 लाख 1 हजार 497 कोरोनाग्रस्तांवर विविध रूग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत देशातील 5 हजार 815 नागरिकांचा बळी घेतला आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *गुजरातमध्ये केमिकल फॅक्टरीत स्फोट; पाच जणांचा मृत्यू* *LetsUp | National* ⚡ गुजरातमधल्या भरूच जिल्ह्यातील एक केमिकल फॅक्टरीत स्फोट झाला आहे. 🏭 भरूचमधल्या दाहेज औद्योगिक क्षेत्रात एका फॅक्टरीत स्फोट झाल्यानंतर तिथं भीषण आग लागली आहे. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला असून, 32 जण जखमी आहे. 💁‍♂️ या स्फोटात अनेक कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, जखमींची संख्या जवळपास 32 च्या आसपास सांगितली जात आहे. 📍 या केमिकल फॅक्टरीत स्फोट कशामुळे झाला, याची कारणं अद्याप अस्पष्ट आहेत. 🏥 दरम्यान; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 15 गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *कोरोना; आयसीएमआरची दिलासादायक माहिती...* *LetsUp | Corona Live* ✨ देशातील कोरोनाबाधितांची संख्या 2 लाखांवर पोहोचली असून केवळ 15 दिवसांतच हा आकडा एक लाखांवरून दोन लाखांवर गेला आहे. ⚡ तर तब्बल पाच हजारांहून अधिक लोकांना आपली जीव गमवावा लागला असल्याची माहिती इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिली आहे. ✨ ICMR ने देशामध्ये कोरोना व्हायरस पीक सीझन (Peak) देशात येण्यासाठी अद्याप बराच काळ आहे असे म्हटले आहे. 📍 कोरोनाच्या प्रकरणांमध्ये रोज 8000 हजार नवीन रुग्णांची नोंद होत असून भारतात कोरोनाचा पीक सीझन आल्याचे मानले जात होते. 📌 मात्र (ICMR )च्या संशोधक डॉ. निवेदिता गुप्ता यांनी भारत कोरोनाच्या पीकपासून खूप दूर असल्याचे स्पष्ट केले आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🗞️ *आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी* ▪️ भारतात कोरोना बाधितांची संख्या पोहोचली तब्बल दोन लाखांवर; तर अत्तापर्यंत 5 हजार 739 जणांचा कोरोनाने मृत्यू ▪️ निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात NDRF च्या 21 तुकड्या तैनात; तर एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविल्याची एनडीआरएफची माहिती ▪️ पुलवामात जैशच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्थान; खबरदारीचा उपाय म्हणून लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरु ▪️ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; G 7 देशांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भारताला निमंत्रण ▪️ निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरात थांबावे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा; उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आवाहन ▪️ पुढील सहा तासांत निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता कमी होणार; भारतीय हवामान विभागाची माहिती ▪️ घरातून बाहेर पडू नका, सरकारच्या सूचनांचं पालन करा; खासदार सुप्रिया सुळे यांचे जनतेला आवाहन ▪️ सॅमसंग कंपनीचा Galaxy A31 हा स्मार्टफोन भारतात 4 जूनला ऑनलाईन पद्धतीने होणार लाँच ▪️ लॉकडाऊनमुळे बंद पडलेल्या आतंरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन; ईसीबीकडून विंडीजविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर ▪️ 2020 हे वर्ष निराशाजनक; घाबरु नका, संकटाचा सामना करा; अभिनेता अक्षय कुमारचे नागरिकांना आवाहन 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *...अखेर 'निसर्ग' वादळ धडकले* *LetsUp | Update* 💫 पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ अखेर महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकले असून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर हे वादळ धडकले आहे. ⚡ या वादळामुळे मुंबईसह उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला असून पुढील सहा तास या वादळाचा प्रभाव कायम राहणार आहे. 📍 आज दुपारी रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग जवळून ताशी 100-110 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकले आहे. 📌 दरम्यान, उत्तर पूर्व अरबी समुद्र आणि दक्षिण गुजरात किनाऱ्यावर समुद्र खवळलेला असून 1 ते 2 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

⛵ *रत्नागिरीजवळ व्यापारी जहाज वादळात अडकले* *LetsUp l Update* ⚡ मुंबईच्या दिशेने येत असलेल्या निसर्ग चक्रीवादळाने रौद्ररूप धारण केले आहे. रत्नागिरीजवळ 'बसरा स्टार' हे व्यापारी जहाज वादळात अडकले असून जहाजाला सुखरूप मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यासाठी मदतकार्य हाती घेण्यात आले आहे. 💁🏻‍♂️ *जहाज समुद्रात अडकले* : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उठलेले चक्रीवादळ आता मुंबईच्या दिशेने कूच करत आहे. सध्या रत्नागिरीत हे वादळ घोंगावत असून या वादळाच्या तडाख्यात एक व्यापारी जहाज सापडले आहे. या जहाजाला मुंबई किनाऱ्यावर यायचे होते. मात्र रत्नागिरीजवळील मिरकरवाडी भागात हे जहाज जोरदार वादळात व खवळलेल्या समुद्रात अडकून पडले. 🧐 वरळीतील तटरक्षक दलाच्या समुद्री बचाव केंद्राला मदतीचा संदेश पाठवला. त्यानंतर तटरक्षक दलाने त्या परिसरातील नौकायान मंत्रालयाच्या बचाव नौकेला विनंती केली. त्या विनंतीवरून बचाव नौका तिथे पोहोचली. 'टोइंग' प्रकारची ही नौका आता या व्यापारी जहाजाला हळूहळू मुंबईत आणत आहे. 📌 'निसर्ग' वादळ दुपारपर्यंत अलिबागच्या किनाऱ्यावर पोहोचेल, त्यानंतर 1 ते 4 वाजण्याच्या दरम्यान मुंबईत धडकेल, असा अंदाज आहे. गुजरातमधील नवसारी आणि वलसाडला पोहोचेपर्यंत वादळाचा वेग ताशी 60-80 किमी असणार आहे. आज मध्यरात्रीपर्यंत 'निसर्ग'चा वेग आणखी कमी होईल आणि गुरुवारी सकाळपर्यंत वादळ बऱ्यापैकी ओसरेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

📝 *'रिझ्यूम' तयार करताय? मग तुमच्यासाठी* *Letsup I Career* नोकरी मिळवण्यासाठी तुमचा 'रिझ्युम' (सीव्ही) ताकदीचा असायला हवा. तुमची कौशल्ये व जॉबसाठी आवश्यक असलेली कौशल्ये सीव्हीमध्ये दिसायला हवी. इतर काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊया जेणेकरून आपला 'रिझ्यूम' चांगला बनेल. 💁‍♂️ *'रिझ्यूम' चांगला बनवण्यासाठी खास टिप्स* : ● तुमचा 'रिझ्यूम' हि तुमची ओळख आहे, हे लक्षात असू द्या. त्यामुळे तुमची सर्व माहिती, अनुभव, आवडी- निवडी, विशेष गुण, कौशल्य यांची माहिती अधोरेखित झाली पाहिजे. ● तुमचे शिक्षण, कोसेर्सची माहिती, त्याबद्दल व्यवस्थित माहिती असली पाहिजे. ● तुम्ही जो 'रिझ्यूम' तयार केला आहे. त्याबद्दल सखोल माहिती ठेवा. कारण मुलाखत घेणार्‍याकडून त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. ● शिक्षण तसेच आधीच्या नोकरीत मिळवलेले विशेष प्राविण्य 'रिझ्यूम'मध्ये कसे उठून दिसेल याची काळजी घ्या. ● तुमच्या आवडी-निवडी, छंद लिहिताना काळजी घ्या. ते अवास्तव असायला नको. अन्यथा यामुळे वेगळाच पेच उभा राहू शकतो. ● सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रिझ्यूम'मध्ये अनावश्यक गोष्टी लिहणे कटाक्षाने टाळाच. 📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂️ *जीवनावश्यक वस्तूंचे वाटपासाठी आंदोलन* *LetsUp | Pimpri chinchwad* नगररोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे किट प्रभाग क्र ३ मधील गांधीनगरमध्ये लवकरात लवकर वाटप करण्यात यावे, यासाठी शुक्रवारी( दि.२९) रोजी शांततेत व सुरक्षित अंतर ठेवून आंदोलन करण्यात आले. तसेच राजेश बनकर आणि अविनाश सकपाळ यांनी लवकरात लवकर गांधीनगरमध्ये धान्य वितरण करण्यात येईल असे, आश्वासन दिले. यावेळी कैलास पोडमल, जय जगताप, संदेश सावंत, चेतन मोरे, आप्पा खरात, मंजुनाथ वाल्हेकर, आशिष जाधव उपस्थित होते. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *भारत-चीन तणावावर सरकारचे मौन* *LetsUp | Update* 💫 भारत-चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाबाबत नेमके काय घडत आहे ? सरकारने जनतेला सांगितले पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. 💫 पूर्व लडाखच्या पेगाँग क्षेत्रात ५ मे रोजी भारत आणि चीनच्या सुमारे २५० सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. ✨ यावेळी दोन्ही बाजूंनी दगडफेकही झाली होती. सदरील घटनेत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाले होते. 📍 तसेच दुसऱ्या घटनेत सिक्कीम सेक्टरमध्ये ९ मे १५० सैनिकांमध्ये संघर्ष झाला, त्यानंतर सीमेवर दोन्ही देशांनी आपल्या सैनिकांच्या संख्येत वाढ केली. 📌 दरम्यान, सीमेवर झालेल्या तणावावर सरकारने मौन बाळगले असून चीनला अनेक अटकळी बांधण्याची संधी मिळाली असल्याचेही राहुल गांधी यांनी स्पष्ट केले आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *पोलीस दलावर कोरोनाचे संकट* *LetsUp | Corona Live* 💫 राज्यात गेल्या चोवीस तासांत तब्बल 116 पोलीस कोरोनाबाधित झाले आहेत. तर 3 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ✨ राज्यात आतापर्यंत 2 हजार 211 पोलीस करोनाबाधित झाले आहेत तर यात 249 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 962 पोलीस कर्मचारी कोरोना संक्रमित आहेत. 👉 आतापर्यंत एकूण 25 पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 970 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. 📌 दरम्यान, राज्यात दररोज येणाऱ्या आकडेवारीत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असलेली दिसली, तरी मृत्यूदर कमी होत आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *ब्रेकिंग! नगरमध्ये आणखी नऊ जणांना कोरोना* *Letsup | Ahmednagar* ⚡ अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी नऊ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या 112 झाली आहे. त्यामुळे उपचारार्थींची संख्या 45 झाली आहे. 👉 ही रुग्ण अकोले, संगमनेर, पारनेर, शेवगाव आणि राहाता आदी भागातील आहेत. 👉 घाटकोपर येथून अकोले तालुक्यात आलेले पिंपळगाव खांड येथे एक, ठाणे एथून पारनेर हिरवे कोरडा येथे आलेला एक, चाकण (पुणे) येथून शेवगावमधील ढोर जळगाव येथे आलेला एक आणि संगमनेर येथे दोन आणि राहाता तालुक्यातील निमगाव येथे चार, असे हे नऊ रुग्ण आढळले आहेत. 👉 बाधित रुग्णांमध्ये चार पुरूष, चार महिला आणि चार वर्षीय लहान मुलीचा समावेश आहे. निमगाव येथील व्यक्ती यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात होती. बाधित रुग्णात वडील आणि मुलगी यांचा समावेश आहे. 👉 संगमनेर येथील 40 वर्षीय महिला रुग्णाला आजाराची लक्षणे जाणवत असल्याने ग्रामीण रुग्णालय संगमनेरने पाठवले होते. 👉 दुसरा 55 वर्षीय पुरूषाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयात पाठवले होते. या दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले. 👉 घाटकोपर येथून पिंपळगाव खांड येथे आलेली महिला यापूर्वीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कात होती. त्याचप्रमाणे चाकण येथून ढोर जळगाव येथे आलेला 30 वर्षीय युवत बाधित आढळला आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

photo content

*LetsUp News Update* ▪ भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाख 58 हजार 333 वर पोहचला मागील 24 तासांत 6 हजार 566 नवे रुग्ण ▪ यंदाचा mansun 1 जूनला केरळमध्येच दाखल होणार - हवामान विभागाने वर्तविला अंदाज ▪ कोरोना विषाणूचे संकट टळावे म्हणून पुजाऱ्याने देवीला दिला नरबळी; ओडिशाच्या कटक जिल्ह्यातील नरसिंहपूर येथे घडली घटना ---------------------- *Advertisment On LetsUp* *Contact* : 7798655655 ---------------------- ▪ बांगलादेशाची राजधानी ढाकामधील गुलशन मार्केट परिसरातील एका हॉस्पिटलला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू तर काही जण जखमी ▪ महाराष्ट्रात संचारबंदी लागू करुन सैन्य तैनात करण्यात येणार असल्याची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार- गृहमंत्री अनिल देशमुख ▪ राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 598 नवीन रुग्णांची नोंद झाली असून,कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 59 हजार 546 झाली ▪ कोरोना विरोधात लढा देणाऱ्या आणखी 130 पोलिस कर्मचाऱ्यांना गेल्या 24 तासांत कोरोनाची लागण झाली; तर 2 पोलिसांचा मृत्यू ▪ फुटबॉल प्रेमींसाठी अच्छे दिन ! 17 जून पासून प्रिमीअर लिग स्पर्धेला पुन्हा सुरुवात होणार ▪ Tik Tok ला टक्कर देण्यासाठी आलं Mitron App; आतापर्यंत 50 लाख पेक्षा जास्त लोकांनी केलं डाऊनलोड ▪ 'खिलाडी' अक्षयचा 'लक्ष्मी बॉम्ब' डिजिटली रिलीज होणार, 1 अब्जहून अधिक किंमतीला विकले गेले राईट्स ! 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🐛 *टोळधाडीचं संकट नियंत्रणात आणण्यासाठी ड्रोनद्वारे फवारणी : कृषीमंत्री* *LetsUp | Update* ⚡ राज्यातील शेतकऱ्यांसमोर सध्या टोळधाडीचे संकट आहे. या संकटांशी सामना करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. 👍 आतापर्यंत टोळधाड किड्याचा नायनाट करण्यात 50 टक्के यश आले आहे. 🗣️ ज्या भागात हे संकट उभे राहील त्या भागात अग्निशमन बंब आणि ड्रोनच्या माध्यमातून कीटकनाशक फवारणी करून हे संकट दूर करण्याचा केले जाईल, असं कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. 📍 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील बाजार पेठ ठप्प झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान कृषी विभागाचे झाले आहे. 💁‍♂️ त्यामुळे लॉकडाऊनची आणखी आवश्यकता भासल्यास त्यातून कृषी क्षेत्र वगळले जाईल. अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. 👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🏇🏻 *रेडझोनमधून आलेला घोडा क्वारंटाइन!* *LetsUp l Trending* ⚡ जगभर पसरलेल्या कोरोनामुळे सर्वत्र भीती, दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे प्रत्येकजण सावधगिरी बाळगत आहे. छोटीशी चूक कोरोनाग्रास्तांचा आकडा वाढवू शकते हे लक्षात आल्याने आता सर्वतोपरी काळजी घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. 💁🏻‍♂️ माणसेच काय पण प्राणी आले तरी संबंधित गावाचे प्रशासन त्याचीही दाखल घेऊ लागले असल्याचा अनुभव जम्मू काश्मीरमध्ये नुकताच आला. 🐎 *घोड्याची तपासणी* : काश्मीरच्या राजौरीमध्ये एकजण त्याचा घोडा घेऊन आला. तो मुघल रोड, काश्मीर घाटीतून आला होता. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी थांबविले तेव्हा तो रेड झोनमधून आल्याचे उघड झाले. तत्काळ प्रशासनाला माहिती देऊन घोडे मालकाचे सँपल तपासणीसाठी घेतले, सोबतच पशुवैद्यकाला बोलावून घोड्याची तपासणी केली. 📌 *पहिलीच घटना* : घोड्याला काही आजार नसल्याचे लक्षात आल्यानंतरही खबरदारी म्हणून घोड्याला 14 दिवस होम क्वारंटाइन करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता घोडा मालकाच्या कुटुंबातील कुणीही घोड्याला 14 दिवस भेटू शकणार नाही. देशात कोरोना संकट आल्यापासून प्राण्याला 14 दिवस क्वारंटाइन करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे समजते. 📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🧐 *खासगी लॅबमधील कोरोना चाचणीचे शुल्क ठरवा* *LetsUp l Update* ⚡ खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी मोजावे लागणारे अधिकचे पैसे लवकरच कमी होण्याची चिन्ह दिसत आहेत. कोरोनाचे निदान करणाऱ्या आरटी-पीसीआर चाचणीसाठी आकारले जाणाऱ्या शुल्काबद्दल धोरण ठरवण्याचे निर्देश भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) राज्यांना दिले आहेत. परिषदेने सध्या घेतले जाणारे 4500 रुपये शुल्क रद्द केले आहे. 💁🏻‍♂️ *सचिवांना पत्र* : कोरोना चाचणीच्या शुल्काबद्दल धोरण ठरवण्याचे निर्देश आयसीएमआरने राज्यांना दिले आहेत. परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गवा यांनी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या सचिवांना पत्र पाठवले आहे. 👍 *उत्पादन* : “त्यावेळची परिस्थिती आणि बाजारातील किंमती लक्षात घेता परिषदेने 4500 रुपये शुल्काची मर्यादा 17 मार्च रोजी घातली होती. आता ही मर्यादा लागू नसणार, चाचणीसाठी लागणाऱ्या किट्सचे उत्पादन देशातही सुरू झाले आहे. 📌 राज्यांनीही चाचणी किट्स खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे पुरवठा साखळी स्थिर झाली आहे. त्यामुळे सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी लॅबमध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयातून पाठवले जाणारे नमुने, चाचणीच्या शुल्काबद्दल धोरण ठरवावे. खासगी लॅबशी चर्चा करून योग्य शुल्क ठरवावे,” असे आयसीएमआरने म्हटले आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

photo content