LetsUpp Marathi
الذهاب إلى القناة على Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
إظهار المزيد6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
6 624
👉 स्वत:ला विचारा हे प्रश्न!
Let's Up Think Katta
प्रश्नांमुळे जगात अनेक किमया घडल्या. शास्त्रज्ञांना प्रश्न पडले नसते तर आपल्याला अनेक उपयोगी गोष्टी कळल्याच नसत्या. त्यामुळे प्रश्न पडायला हवेत आणि त्याची उत्तरंही मिळायला हवीत. काही प्रश्न आपण इतरांसमोर ठेऊ शकतो पण काही प्रश्न हे स्वत:ला विचारायचे असतात. त्यांची उत्तरं शोधताना मग आपल्याला जाणवतं की, आपण आपल्या जीवनाला परिपूर्ण करत आहोत कि नाही. त्यामुळे स्वत:ला हे प्रश्न नक्की विचारा...
👉 मी स्वत:शी प्रामाणिक आहे का? : मी स्वत:शी प्रामाणिक आहे का? हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. काय योग्य व काय अयोग्य निश्चित करून तुम्ही स्वत:शी प्रामाणिक राहता का हे तपासा. पण परिस्थितीनुसार बदल करणे आवश्यक आहे. मात्र, चुकीचे निकष लावून स्वत:ला कमकुवत करू नका.
👉 मी स्वत:वर विश्वास ठेवतो का? : स्वत:वर एवढा विश्वास ठेवा की, ध्येय साध्य करण्यासाठी दुसऱ्यांची मदत घेण्याची वेळ येऊ नये. लोकांची पर्वा न करता आपले जीवन जगत राहा. यामुळे मी स्वत:वर विश्वास ठेवतो का? हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 मला स्वतःच्या उणिवा माहिती आहेत का? : सर्वांसमोर आपली कमतरता, त्रुटी सांगणे धोकादायक आहे. परंतु, संपूर्ण आयुष्य यापासून दूर जाऊन जगणे धोकादायक आहे. म्हणून हा प्रश्न स्वतःला विचारा.
👉 मी दुसऱ्यास मदत करतो का? : मी दुसऱ्यास मदत करतो का? हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. प्रत्येक कामाचा काही तरी हेतू असतो. असे काम केले पाहिजे ज्यातून दुसऱ्याला आनंद मिळेल अथवा त्याची समस्या सुटेल.
👉 मी स्वतःच ऐकतो का? : मी माझे स्वत:चे निर्णय स्वत:च घेतो का? आणि त्यावर अंमल करतो का? हा प्रश्न विचारायला पाहिजे. स्वतःच ऐकताना एखादा निर्णय चुकला असेल तर पुन्हा प्रयत्न करा.
👉 मी नव्या कल्पना स्वीकारतो का? : मी नवनवीन कल्पनांचा स्वीकार करतो का? हा प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे. कारण परिस्थिती सातत्याने बदलत राहते. त्याला सामोरे जाण्याचे उपाय शोधले पाहिजे. नवीन विचार अवगत केले पाहिजे. स्वत:च्या विचारांवर अडून बसणारे लोक काहीही नवीन शिकू शकत नाही.
👉 मी चुका माफ करतो का? : ज्या लोकांनी तुम्हाला वेदना पोहचवल्या अथवा विश्वासाला तडा दिला अशा लोकांना तुम्ही माफ करता का? हे स्वतःला विचारा कारण हे सर्वांसोबत होते. अशा गोष्टींना आठवणीत ठेवल्याने स्वत:चा आनंद कमी होतो.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 जम्मू-काश्मीर - येथील परिस्थिती संवेदनशील असली तरी, मागच्यावर्षी इतकी खराब नाही, काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या : के.दुर्गा प्रसाद, सीआरपीएफ डीजी
👉 नवी दिल्ली - 'नीट' परीक्षा वयोमर्यादा प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी 20 मार्चपर्यंत स्थगित
👉 नवी दिल्ली - सिमीचा मास्टरमाइंड सफदर नागोरीसह अन्य 11 जणांना जन्पठेप, इंदुर जिल्हा न्यायायलाने सुनावली शिक्षा
👉 नवी दिल्ली - नर्सरी प्रवेश नियमावलीच्या स्थगितीविरोधातली दिल्ली सरकारची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली
👉 गुजरात - राजकोटहून काल अटक केलेल्या 2 आयएसच्या दहशतवाद्यांना 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
👉 बिहार - रोहतस येथील अमारा भागातून पोलिसांनी केला स्फोटकांचा मोठा साठा जप्त, एकाला अटक
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 अमेरिका - श्रीनिवास कुचिभोतलाला श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा, श्रीनिवासचा मित्र आलोक मदासनीसह कॅन्ससमधील गोळीबारातून बचावलेले अन्य या सभेत सहभागी
👉 श्रीलंका - कैद्यांना नेणाऱ्या बसवर झाला हल्ला, 7 जणांचा मृत्यू
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई - मुंबईत भाजपचाच महापौर होईल, माजी मंत्री एकनाथ खडसे यांना विश्वास
👉 मुंबई - मेहबुबा अस्पृश्य नसतील तर काँग्रेसवर टीका नको, सोयीनुसार शुद्धीकरण भाजपकडून शिकलो : खासदार संजय राऊत
👉 पुणे - शिवसेना धक्का मारून बाहेर काढल्याशिवाय सत्ता सोडणार नाही : नारायण राणे
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेला उद्या मंगळवारपासून सुरुवात, राज्यभरातून 15 लाख 5 हजार 365 विद्यार्थी ही परीक्षा देणार
👉 मुंबई - बैलगाडी शर्यतीलाही हिरवा कंदील मिळण्याचे संकेत, कामकाज सल्लागार समितीमध्ये विधेयक आणण्याचे मुख्यमंत्र्यांचे विधी व न्याय विभागाला निर्देश
👉 मुंबई - यंदा 6 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत असून राज्याचा अर्थसंकल्प 18 मार्चला सादर होणार आहे
👉 मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला महापौर बंगल्याची जागा देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी, कोणत्याही चर्चेविना हा प्रस्ताव मंजूर झाला
👉 मुंबई - मराठा आरक्षणाचा विषय महाराष्ट्र राज्य मागास प्रवर्ग आयोगाकडे सोपवावा का? हायकोर्टाची याचिकादारांना आणि सरकारला विचारणा, पुढील सुनावणी 29 मार्च रोजी होणार
👉 नागपूर - विवाह प्रमाणपत्रासाठी आधार कार्ड बंधनकारक नाही, मुख्य माहिती आयुक्तांची सरकारला सूचना
👉 उस्मानाबाद - लाचखोरी प्रकरणी माजी महसूल अधिकारी शोभा राऊत यांना 8 वर्षांची शिक्षा, उस्मानाबाद जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय
👉 सोलापूर - खांडवी (ता़ बार्शी) येथे दोन गटात बेदम मारहाण, 18 जणांविरूध्द गुन्हा दाखल, वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल़
👉 कोल्हापूर - शॉर्ट सर्किटमुळे स्कोडा गाडी जळून खाक, मात्र 3 प्रवासी सुदैवाने बचावले
👉 पुणे - पोलिसांनी पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यास स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एस.एफ.आय) संघटनेला नाकारली परवानगी
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28812.88, निफ्टी : 8896.70, सोने भाव : 29,574 (प्रतितोळा), चांदी : 43,338 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 बार्सिलोना - चीनची दिग्गज स्मार्टफोन निर्माती कंपनी ZTE ने जगातील पहिला 5जी स्मार्टफोन केला लॉन्च, ZTE गिगाबाईट असे या फोनचे नाव, 1 सेकंदात 1 जीबी डाऊनलोड होणार, हा फोन 5 जी नेटवर्कला सपोर्ट करतो आणि 2020 पर्यंत हे नेटवर्क उपलब्ध होऊ शकते
🎯 खेळ घडामोडी :
👉 नेमबाजी, इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन वर्ल्ड कपमध्ये हिना सिद्धु आणि जितु राय यांना मिश्र 10 मी. एअर पिस्तुल मध्ये सुवर्णपदक
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 कॅलिफोर्निया - ‘ईस्ट इज ईस्ट’, ‘गांधी’, ‘सिटी ऑफ जॉय’ आणि ‘वूल्फ’ अशा लोकप्रिय सिनेमात काम केलेले दिवंगत अभिनेते ओम पुरी यांना ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रद्धांजली वाहण्यात आली
👉 प्रियंका चोप्राने दुसऱ्यांदा ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात रेड कार्पेटवर लावली हजेरी, प्रियंकाने पांढऱ्या रंगाच्या स्ट्रीपलेस गाउनमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावली होती
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 मुलं पाळणाघरात ठेवताय..!
Let's Up Parenting Tips
शहरीभागात आज सगळीकडेच महागाईला सामोरे जाण्यासाठी घरातील नवरा आणि बायको दोघेही नोकरी करत आहेत. त्यामुळे प्रश्न राहतो तो लहान मुलांना संभाळण्याचा? साहजिकच लहान मुलांच्या संगोपनासाठी पाळणाघराचा पर्याय निवडला जातो. परंतु पाळणाघरातही विचित्र प्रकारांमुळे पालकांच्याही मनात शंका येऊ लागल्या आहेत. त्यामुळे खास हे...
👉 आपले मूल ज्या पाळणाघरात आहे त्याठिकाणी आवश्यक त्या साधनसामुग्री उपलब्ध आहेत का? त्यांना सांभाळणाऱ्या आया-मावशी यांची मानसिक-शारीरिक क्षमता कशी आहे? अशा प्रश्नांची तपासणी करा.
👉 मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या भविष्यावर त्यांच्या सोबत घडणाऱ्या घटनांचा परिणाम होत असतो. त्यामुळे त्यांचे बालपण जपणे गरजेचे आहे.
👉 पाळणाघरातील स्वच्छता कशी आहे. तिथे आधुनिक साधनसामुग्री आहे का? प्रशिक्षित आया आहेत का? हे सर्वच तपासून पाहिले पाहिजे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 पाळणाघरामध्ये कोणत्याही पध्दतीची ठोस अशी नियमावली नसते. त्यामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिक आरोग्याच्या काळजीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते.
👉 दिवसभरासाठी तुमचे मुलं पाळणाघरांच्या हाती सोपवण्यासोबतच पालकांनी तिथे उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांची, त्यांच्या दिवसभराच्या वेळपत्रकाची माहिती करून घेणे गरजेचे आहे.
👉 व्यस्त वेळापत्रकामुळे आपण मुलांना हवा तेवढा वेळ देऊ शकत नाही. परंतु दिवसभर त्यांनी काय केले हे आपण समजून घेतले पाहिजे.
👉 मुलांवर होणारे अत्याचार, अमानुष मारहाण हे पुढे जाऊन त्यांच्या भित्रेपणा, एकटेपणाचे लक्षण ठरू शकते. त्यामुळे आपल्या मुलांना शक्य तेवढा वेळ देऊन त्यांच्यासोबत दिवसभर काय-काय घडले हे जाणून घेणे ही सर्वस्वी पालकांची जबाबदारी असते.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 नोकियाचे 3 नवीन स्मार्टफोन
Let's Up Techno Katta
बार्सिलोना येथे सुरू असलेल्या ‘मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस’मध्ये नोकियाने नोकिया 3, नोकिया 5 आणि नोकिया 6 हे तीन अँड्रॉईड प्रणालीवर चालणारे स्मार्टफोन सादर केले आहेत. गेल्या महिन्यातच चीनमध्ये लॉंच केलेला नोकिया 6 हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येईल अशी घोषणा यावेळी केली.
नोकिया 6 हे मॉडेलमध्ये 5.5 इंच आकारमानाचा आणि फुल एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर आहे. याची रॅम 4 जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज 64 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. यातील मुख्य कॅमेरा 16 ते सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. हे मॉडेल अँड्रॉईडच्या नोगट या प्रणालीवर चालणारे असून यात 3000 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आलेली आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
नोकिया 5 या मॉडेलमध्ये 5.2 इंच आकारमानाचा आणि 1280 बाय 720 पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर देण्यात आलेला आहे. याची रॅम 2 जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज 16 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. यात 13 आणि 8 मेगापिक्सल्स क्षमतांचे कॅमेरे प्रदान करण्यात आले आहेत. तर यातील बॅटरी 3000 मिलीअँपिअर क्षमतेची असेल.
नोकिया 3 हे मालिकेतील सर्वात स्वस्त मॉडेल आहे. यात 5 इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा डिस्प्ले असेल. यात मीडियाटेक 6737 प्रोसेसर आहे. याची रॅम 2 जीबी आणि अंतर्गत स्टोअरेज 16 जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने 128 जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे हे प्रत्येकी 8 मेगापिक्सल्स क्षमतांचे आहेत. तर यातील बॅटरी 2650 मिलीअँपिअर क्षमतेची आहे.
नोकिया 6 व नोकिया 5 हे मॉडेल अँड्रॉईडच्या 7.1 तर नोकिया 3 हे मॉडेल 7 नोगट आवृत्तीवर चालणारे आहे. या तिन्ही मॉडेल्समध्ये गुगलचा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. नोकिया 3, 5 आणि 6 या मॉडेल्सचे मूल्य अनुक्रमे 139 युरो (सुमारे 9800 रूपये), 189 युरो (सुमारे 13,500 रूपये) व 229 युरो (सुमारे 16,000 रूपये) इतके ठेवण्यात आले आहे.
👉 व्हॉटस्अॅप देणार ‘डिजीटल पेमेंट’ ची सुविधा
व्हॉटस्अॅपचे मॅसेंजरचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्शन यांनी दिल्लीत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांची भेट घेत ‘डिजीटल इंडिया’ या मोहिमेत सक्रीय सहभागी होण्याची इच्छा प्रकट केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी व्हाटसअॅप लवकरच आपल्या भारतीय युजर्ससाठी ‘डिजीटल पेमेंट’ची सुविधा देणार असल्याचे जाहीर केले.
व्हॉटस्अॅपच्या 120 कोटींपैकी 20 कोटींपेक्षा जास्त युजर्स हे भारतीय आहेत. यामुळे या मॅसेंजरने भारतावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. यावर लवकरच व्यावसायिक पध्दतीच्या संदेशांची सेवा येणार असून या माध्यमातून भारतातून बिझनेसची मोठी संधी आहे. या पार्श्वभूमीवर व्हॉटस्अॅपनेही यासाठी हालचाली सुरू केल्याचे संकेत ब्रायन अॅक्शन यांनी दिले आहेत.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 Oscar 2017: 'मूनलाइट'ला बेस्ट फिल्म अवॉर्ड
Let's Up Entertainment Katta
अवघ्या जगाताचे लक्ष लागून राहिलेल्या ऑस्करची उत्सुकता संपली असून, ऑस्कर मिळालेल्या चित्रपटांची आणि अनेक मान्यवरांची नावे जाहीर झाली आहेत. ऑस्कर हा जगातील सर्वात जुना आणि मानाचा समजला जाणार सोहळा आहे. यंदाचे ऑस्करचे 89 वे वर्ष आहे. कॅलीफॉर्नियातील हॉलीवुडच्या डॉल्बी थिएटरमध्ये हा सोहळा पार पडत आहे.
👉 मूनलाइट ठरला सर्वोत्कृष्ठ सिनेमा.
👉 ला ला लँडला 6 ऑस्कर.
👉 सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार : केसी अॅफ्लेक ('मँचेस्टर बाय द सी' चिपत्रपटासाठी)
👉 सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार : एम्मा स्टोन्स (‘ला ला’ लँड चिपत्रपटासाठी)
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनचा पुरस्कार : डेमियन शेझल ('ला ला लँड' चिपत्रपटासाठी)
👉 सर्वोत्कृष्ट गीत पुरस्कार : 'सिटी ऑफ स्टार' ('ला ला लँड' चिपत्रपटामधील)
👉 सर्वोत्कृष्ट लघू माहितीपट : 'व्हाइट हेल्मेट्स'
👉 सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म : 'सिंग'
👉 सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार : 'ला ला लँड'
👉 सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन : ‘ला ला लॅण्ड’
👉 सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म : ‘पायपर’
👉 सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्म : ‘झुटोपिया’
👉 विदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट : 'द सेल्समन' (इराण)
👉 सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग : ‘हॅक्सॉ रिज’
👉 सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग : ‘अरायव्हल’साठी सलवेन बेलमेरला ऑस्कर
👉 मेकअप आणि केशरचना : ‘सुसाईड स्क्वॉड’च्या टीमला ऑस्कर
👉 वेशभूषा : ‘फॅण्टॅस्टिक बीट्स अॅण्ड व्हेअर टू फाईंड देम’साठी कॉलिन एटवूडला ऑस्कर
👉 सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर : ‘ओ.जे.: मेड इन अमेरिका’
👉 बेस्ट फिल्म नॉमिनेशन
'ला ला लँड', 'मूनलाइट', 'मँचेस्टर बाय द सी', 'अरायव्हल', 'फेंसेस', 'लायन', 'हिडन फिगर्स', 'हॅकसॉ रिज' आणि 'हेल ऑर हाय वॉटर'.
👉 बेस्ट डायरेक्टर- नॉमिनेशन
डेमियन चॅजेज : ला ला लँड । बॅरी जँकिंस : मूनलाइट । डेनिस विलेनिअवे : अरायव्हल । केनेथ लोनर्गन : मँचेस्टर बाय द सी । मेल गिब्सन : हॅक्सॉ रिज
👉 बेस्ट अॅक्ट्रेस इन लीडिंग रोल
नतालिया पोर्टमॅन : जॅकी । एम्मा स्टोन : ला ला लँड । ईसाबेल हम्पर्ट : एली । मेरिल स्ट्रिप : फ्लोरेंस फोस्टर जँकिंस । रूथ नेगा : लव्हिंग
👉 बेस्ट अॅक्टर इन लीडिंग रोल
रायन गॉसलिंग : ला ला लँड । कॅसी अफ्लेक : मँचेस्टर बाय द सी । डेंजल वॉशिंग्टन : फेंसेस । एंड्रयू गारफील्ड : हॅक्सॉ रिज । विगो मॉर्टेन्सन : कॅप्टन फँटास्टिक
👉 बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर
महेर्शला अली : मूनलाइट । जॅफ ब्रिजेस : हेल ऑर हाय वॉटर । लुकास हेजेस : मँचेस्टर बाय द सी । देव पटेल : लॉयन । माइकल शेनॉन : नॉक्टर्नल अॅनिमल्स
👉 बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस
विओला डेविस : फेंसेस । मिशेल विलियम्स : मँचेस्टर बाय द सी । ऑक्टेविया स्पेंसर : हिडन फिगर्स । नाओमी हैरिस : मूनलाइट । निकोल किडमैन : लायन
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - चालू वर्षात डाळींचे उत्पादन 22.14 दशलक्ष टनांपर्यंत पोहचण्याची शक्यता, हे यावर्षीच्या 21.25 दशलक्ष टनाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक आहे
👉 नवी दिल्ली - राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी 28 फेब्रुवारी रोजी पुकारला देशव्यापी संप, स्टेट बँकेबरोबरच इतर राष्ट्रीयकृत बँकाही या बंदमध्ये सहभागी होणार
👉 नवी दिल्ली - रेल्वेतील जेवणाची जबाबदारी पुन्हा एकदा आयआरसीटीसीकडे सोपवली जाऊ शकते
👉 अहमदाबाद - गुजरात एटीएसने आयएसआयएसशी संबंधित 2 संशयित दहशतवाद्यांना केली अटक, देशात घातपात करण्याचा कट रचण्याच्या संशयावरून त्यांना केली अटक
👉 तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी दिल्लीकडे रवाना, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन नीटच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता
👉 तामिळनाडू - बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील 11 जणांना वाचण्यात यश, या दुर्घटनेत 11 जणांचा झाला मृत्यू
👉 लखनऊ - उत्तरप्रदेशमध्ये आज सोमवारी पाचव्या टप्प्याचे मतदान, या टप्प्यात 11 जिल्ह्यांतील 51 जागांवर मतदान
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 व्हाईट हाऊसच्या वार्तांकनासाठी सीएनएन आणि न्यूयॉर्क टाईम्ससहित अनेक प्रसिद्ध माध्यमांना बंदी, व्हाईट हाऊस प्रेस सेक्रेटरी सीन स्पाईसर यांची माहिती
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई - राजकीय गोटात सुरू असलेल्या चर्चेनुसार विरोधक मुख्यमंत्री फडणवीस सरकारवर अविश्वास प्रस्ताव आणण्याची दाट शक्यता
👉 नांदेड - राज्यातील सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेससोबत राष्ट्रवादी आघाडी करु : शरद पवार
👉 सोलापूर - एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेखला अटक, निवडणुकीच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी उमेदवाराच्या घरावर दगडफेकीचा आरोप
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - राज्यातील इंजिनिअरिंग आणि मेडीकल अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी परीक्षा 11 मे रोजी होणार
👉 मुंबई - मुंबई देशातील सर्वात श्रीमंत शहर, न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार मुंबईमध्ये 46,000 कोट्यधीश तर 28 अब्जाधीश राहतात, मुंबईची एकूण मालमत्ता 820 अब्ज डॉलरची
👉 मुंबई - आज 27 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणावर हायकोर्टात सुनावणी होणार, या सुनावणीकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे
👉 मुंबई - मुंबईतील 6 मार्चचा नियोजित मराठा क्रांती मूक मोर्चाला तूर्तास स्थगिती, शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने मोर्चा पुढे ढकलण्याचा घेण्यात आला निर्णय
👉 मुंबई - सैन्यभरतीचा पेपर फुटल्यानंतर आता देशभरातील सैन्यभरती परीक्षा रद्द, पोलिसांनी आत्तापर्यंत 18 आरोपींसह 350 विद्यार्थ्यांना केली अटक, आरोपींमध्ये सैन्याशी निगडीत काही जणांचा समावेश
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 नवी दिल्ली - बार्सिलोनामध्ये नोकिया कंपनीने 3 अँड्रॉईड स्मार्टफोन केले लॉन्च, नोकिया 3, नोकिया 5 आणि नोकिया 6 अशी तिन्ही स्मार्टफोनची नावे, हे स्मार्टफोन लवकरच भारतीय स्मार्टफोनप्रेमींसाठी दाखल होणार
🎯 खेळ घडामोडी :
👉 महेंद्रसिंग धोनीने साकारलेल्या शतकाच्या बळावर विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत झारखंडने छत्तीसगडवर 78 धावांनी शानदार विजय मिळवला
👉 हैदराबाद - सायना नेहवाल वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे प्रतिनिधित्व करेल
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - बॉलिवूड अभिनेता राहुल खन्नाने नुकतंच ट्विटरवरुन एक गुपित केले उघड, 20 वर्षांच्या रिलेशनशीपनंतर ब्रेकअप झाल्याची खंत त्याने केली व्यक्त
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नेत्यांनी चिथावणीखोर भाषणे करु नये : निवडणूक आयोग
👉 नवी दिल्ली - ऑनलाइन रेल्वे तिकिटावरील अधिभार काढून घेण्याच्या निर्णयावर एप्रिलनंतर रेल्वे बोर्ड पुनर्विचार करू शकते, त्यामुळे ई- तिकिटांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात
👉 नवी दिल्ली - रेल्वे सुधारणांवर सूचना करा, रेल्वेला सूचना आवडल्यातर रोख बक्षिस दिले जाईल, रेल्वेच्या वेबसाइटवर 20 मे 2017 पर्यंत लोकांना सूचना पाठवता येतील
👉 नवी दिल्ली - 21 वर्षीय कॉलेज विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, 5 आरोपींना पोलिसांनी केली अटक, 1 फरार
👉 नवी दिल्ली - वॉशिंग मशिनमध्ये पडल्याने दोन जुळ्या भावांचा मृत्यू, रोहिनी अवंतिका परिसरातील घटना
👉 चेन्नई - आगामी काळात इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम आधार कार्डावर चालतील, ईव्हीएम हॅक प्रूफ करण्यावरही काम सुरू
👉 गुजरात - पोलिसांनी 4 शार्प शूटरला केली अटक, 1 पिस्तूल, 6 काडतुसं, 2 चाकू आणि मोबाईल फोन केले जप्त
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 अमेरिका - डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांसोबतच्या डिनर पार्टीला दिला नकार
👉 अटलांटा - डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या अध्यक्षपदी टॉम पेरेझ यांनी निवड
👉 जर्मनी - हेडल्बर्ग येथील एका व्यक्तीने बेदरकारपणे कार चालवून फूटपाथवर असलेल्या तिघांना उडलिले, तिघेही गंभीर जखमी
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई - भाजपा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसशी हातमिळवणी करणार नाही, ज्याला त्यांच्यासोबत जायचं आहे ते जाऊ शकतात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
👉 मुंबई - मतदार यादीतील घोळाप्रकरणी शिवसेना न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार, अनिल देसाईंची माहिती, मुंबईतल्या मतदार यादांमधून 11 लाख नावं गायब
👉 कोल्हापूर - राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांच्यातील वादाला चंद्रकांत पाटील जबाबदार : सतेज पाटील
👉 सोलापूर - महानगरपालिका महापौरांची निवड 6 मार्चला, विभागीय आयुक्तांकडे गेला प्रस्ताव, आयुक्तांची माहिती
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 नागपूर - काँग्रेस नेते अशोक चव्हाण शाईफेक प्रकरणी काँग्रेस शहराध्यक्षांसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल
👉 यवतमाळ : येथे 24 तासांत तीन हत्या, हत्येमागे कोणतंही राजकीय कारण नाही : डीएसपी राज कुमार
👉 औरंगाबाद - येथे विद्यापीठाच्या गेटबाहेर एसएफआयच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, अभाविप, विनोद तावडेंचा पुतळा जाळून निषेध
👉 धुळे : दोंडाईचा नगर पालिकेचा 1 अब्ज 87 कोटी 64 लाखांचा अर्थसंकल्प सादर
👉 पुणे - पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा आज रविवारी राज्यभरात, पाचवीचे 5 लाख 50 हजार विद्यार्थी तर आठवीचे 4 लाख 50 हजार विद्यार्थी देणार परीक्षा
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 नवी दिल्ली - लवकरच डिजीटल पेमेंट क्षेत्रात लोकप्रिय मेसेंजर अॅप ‘व्हॉटसअॅप’ उतरण्याची शक्यता, व्हॉटसअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टॉन यांची माहिती
🎯 खेळ घडामोडी :
👉 पुणे - महाराष्ट्राने मोक्याच्या वेळी टिच्चून मारा करून हिमाचल प्रदेशाचा 25 धावांनी पराभव करून विजय हजारे स्पर्धेत विजयी सलामी दिली
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - अभिनेत्री प्रार्थना बेहेरे लवकरच एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार, ती आता लवकरच एका सामाजिक चित्रपटात कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसणार, चित्रपटाचे नाव अद्याप गुलदस्त्यात
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 आता ईपीएफओ सदस्यांसाठी आवास योजना
Let's Up Current Affair
कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या 4 कोटी सदस्यांसाठी पुढील महिन्यात आवास योजना सुरू करणार आहे. या योजनेंतर्गत ईपीएफओ सदस्य घराची खरेदी करण्यासाठी ईपीएफ खात्यातून भरणा किंवा ईएमआय देऊ शकणार आहेत. 8 मार्चनंतर केव्हाही या योजनेची घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे.
यासाठी ईपीएफओच्या सदस्यांनी कंपनीतील आपल्या इतर सदस्यांसह एक हाऊसिंग सोसायटी स्थापन करावी लागणार आहे. या सोसायटीला बँक आणि बिल्डर अथवा विक्रेत्याकडून घर खरेदी करता येऊ शकेल. या योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये कमीत कमी 20 सदस्य असणे आवश्यक आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओचे सदस्य विविध आवास योजना उदा. पंतप्रधान आवास योजनांतर्गत मिळणारे फायदेही एकसोबत घेऊ शकणार आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 उद्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण...
जगभरातील खगोलप्रेमींसाठी उद्या होणारे सूर्यग्रहण पर्वणी ठरणार असून या सूर्यग्रहणाविषयी सर्व जगभरात चर्चा होत आहे. या महिन्यात होणारे सूर्यग्रहण हे या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ठरणार आहे. चंद्र सुर्यासमोरुन जाणार आहे, तेव्हा हे सूर्यग्रहण होईल. या सूर्यग्रहणाचे वैशिष्ट्य म्हणजे हे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. म्हणजेच सूर्य एखाद्या बांगडीसारखा दिसणार आहे. जगभरातील सर्व खगोलप्रेमी हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
हे सूर्यग्रहण 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सूर्यासमोर चंद्र येईल आणि सूर्याच्या फक्त चमकदार कडा आपल्याला दिसतील. त्यामुळेच या सूर्यग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण हा एक नैसर्गिक योगच असतो. या सूर्यग्रहणाची सुरुवात चिलेमधून होणार आहे आणि दक्षिण अमेरिकेमध्ये सकाळपासून दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर दक्षिण अटलांटिक महासागराच्या भागात हे सूर्यग्रहण दिसेल. नैऋत्य अफ्रिकेमध्ये हे सूर्यग्रहण संपेल.
ग्रहण सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आल्यावर होते. पृथ्वीभोवती फिरताना 26 फेब्रुवारीला चंद्र सूर्या समोरुन जाईल. भारतीय खगोलशास्त्र प्रेमींना हे सूर्यग्रहण पाहता येणार नाही. हे सूर्य ग्रहण केवळ लॅटिन अमेरिका, नैऋत्य अफ्रिका, प्रशांत महासागर, अटलांटिक आणि अंटार्टिका या भागात दिसणार आहे. त्यामुळे भारतीय खगोलशास्त्र प्रेमी या सूर्यग्रहणाला मुकणार आहेत. पुढील सूर्यग्रहण 21 ऑगस्ट रोजी आहेत. हे सूर्यग्रहण अमेरिकेमध्ये दिसणार आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने दरदिवशी 1.3 कोटी लोक प्रवास करत असल्याची माहिती समोर, न्यूझीलंडच्या लोकसंख्येपेक्षा ही संख्या अधिक आहे
👉 नवी दिल्ली - 1 कोटी 70 लाख लोकांनी 'भीम अॅप' डाऊनलोड केले, हा जागतिक विक्रम, निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांची माहिती
👉 पश्चिम बंगाल - रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मालदा टाऊन रेल्वे स्टेशनवरून एका ट्रेनमधून 35 बॅगांमध्ये भरलेली 1500 कासवे जप्त केली, 3 जणांना अटक
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 पेइचिंग - दक्षिणपूर्व चीनमधील नानचांग शहरातील एका अलिशान हॉटेलला लागलेल्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू,14 जण गंभीर जखमी
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 लखनऊ - 'मन की बात' खूप झाली आता पंतप्रधानांनी 'काम की बात' करावी : अखिलेश यादव
👉 मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत तब्बल 87,719 मतदारांना ‘नन ऑफ द अबाव्ह’ अर्थात ‘नोटा’चा (NOTA) केला वापर, राज्य निवडणूक आयोगाने आकडेवारी केली जाहीर
👉 मुंबई - काँग्रेसला राज्यात राजकीय अस्थिरता आणायची आहे, म्हणून मुंबईत सेनेला पाठिंबा द्यायची काही नेते भाषा करत आहेत, सेना-भाजपने एकत्र येणे फायद्याचे : नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
👉 मुंबई - शिवसेनेला दगाफटक्याची चिंता नाही. मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसणार : अनिल परब, शिवसेना आमदार
👉 मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मनसेचे नगरसेवक संजय तुरडे यांची भेट घेऊन विचारपूस केली
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - विमानतळावरून 5 किलो सोन्याची बिस्किटे, दागिने आणि विदेशी चलन असा एकूण 1 कोटी 77 लाखांचा ऐवज जप्त
👉 अलिबाग - शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने आम्हाला राज्यातील निवडणुकांमध्ये चांगला विजय मिळाला असून यापुढे देखील राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवरायांच्या प्रेरणेतून आम्ही काम करीत राहू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
👉 नाशिक - निफाड शहरात 2 युवक विजेचा शॉक लागून मृत्युमुखी तर एक अत्यवस्थ, रंगकाम करीत असताना शिडीचा इलेक्ट्रिक तारांशी संपर्क झाल्याने घडली घटना
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 नवी दिल्ली - जग्वार लँडरोव्हर इंडियाने आपली नवी जग्वार एक्सएफ भारतामध्ये नुकतीच केली लाँच, या कारची किंमत 47.50 लाखांपासून ते 60.5 लाखांपर्यंत (दिल्ली – एक्स शोरुम) एवढी आहे
🎯 खेळ घडामोडी :
👉 मुंबई - डिव्हिलिअर्स एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 9000 धावा पुर्ण करणार फलंदाज ठरला, 9000 धावांचा टप्पा पुर्ण करण्यासाठी डिव्हिलिअर्सला फक्त 205 डाव खेळावे लागले
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 'व्हेंटिलेटर' हा मराठी सिनेमा रविवार 26 फेब्रुवारीला दु. 12.00 वा. आणि सांयकाळी 6.00 वा. झी टॅाकीजवर पहिल्यांद्याच प्रसारित केला जाणार आहे
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 भारताचा दारुण पराभव
Let's Up Sports Katta
ऑस्ट्रेलियाने 4 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात 333 धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टीव्ह ओकेफीच्या जाळ्यात पुन्हा एकदा भारतीय संघ अडकला आणि अखेरपर्यंत काही बाहेर पडू शकला नाही.
स्टीव्ह ओकेफीने दुसऱ्या डावातही तब्बल 6 बळी मिळवत सामन्यात 12 बळी घेतले. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. भारताचा दुसरा डावही अवघ्या 107 धावांवर संपुष्टात आला आणि तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला. सलग 19 कसोटी सामन्यांमध्ये अपराजित राहणाऱ्या भारतीय संघाचा विजयी रथ ऑस्ट्रेलियाने रोखला.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 अश्विनने तोडला 37 वर्षांपूर्वीचा विक्रम
भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने पुणे येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात दुसर्या दिवशी मायदेशात कसोटीत एका वर्षात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम नोंदविला. अश्विनने मिचेल स्टार्कला बाद करत या सीजनमधील 64वी विकेट घेतली. या विकेटसह त्याने कपिल देव यांना मागे टाकत त्यांचा 37 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
कपील देव याने 1970-80च्या सीजनमध्ये 13 कसोटी सामन्यात 63 विकेट घेतल्या होत्या. तर अश्विनने आतापर्यंत 10 कसोटी सामन्यात 24.39च्या सरासरीने 64 विकेट घेतल्या आहेत. मायदेशी कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट घेणार्या भारतीयांच्या यादीतही अश्विनने तिसरा क्रमांक मिळविला आहे. त्याने 2012-13मध्ये 10 कसोटी सामन्यात 61 विकेट घेतल्या होत्या. चौथ्या क्रमांकावर 9 कसोटी सामन्यात 54 विकेट घेणारा अनिल कुंबळे हा आहे. रवींद्र जडेजा या यादीत पाचव्या क्रमांकावर असून त्याने 10 कसोटी सामन्यात 48 विकेट घेतल्या आहेत. सहाव्या क्रमांकावर बिशन सिंह बेदी असून त्यांनी 8 सामन्यात 47 विकेट घेतल्या आहेत.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी मालिकेच्या समाप्तीपर्यंत अश्विन सर्वाधिक विकेट मिळविण्याचा नवीन विक्रम नोंद करू शकतो. तसेच रवींद्र जडेजाही या यादीत आपले स्थान वरच्या क्रमांकावर नेऊ शकतो. या दोन्ही गोलंदाजांनी या सिजनमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. त्यामुळे भारताने एकही सामना गमाविलेला नाही.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 'ऑस्कर'ला दीपिका राहणार गैरहजर
Let's Up Entertainment Katta
‘xXx: द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये झळकलेली अभिनेत्री दीपिका पदुकोणला 'ऑस्कर'च्या रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळणार होती. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ती मिरवणार का असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.
तेव्हा ती म्हणाली, आपण ऑस्कर पुरस्काराच्यावेळी हजर राहणार नाही. तिच्या चित्रपटांविषयी उठणाऱ्या अफवांविषयीसुद्धा ती स्पष्ट बोलली. ‘मी मिस्टर अॅण्ड मिसेस स्मिथ या चित्रपटात मी काम करत नाहीये. मी जर कोणत्या चित्रपटात काम करत असेन तर मी त्याबद्दल नक्कीच बोलेन’, असेही दीपिका म्हणाली.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 …म्हणून सोशल मीडियावर आयशा चर्चेत
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आयशा टाकियाची भरपूर चर्चा होत आहे. ही चर्चा कोणताही नवा सिनेमा किंवा नव्या गाण्यामुळे नाही तर ही चर्चा होतेय तिच्या प्लास्टिक सर्जरीमुळे. एकदा नाही तर अनेकदा प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे तीचा चेहरा आता ओळखण्याजोगी देखील राहिला नाही. यापुर्वी 2004 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर आयशाने लगेचच ब्रेस्ट इम्प्लान्टची शस्त्रक्रिया केली होती. या शस्त्रक्रियेमुळे ती चर्चेत आली होती. आयशाने स्वत: कधीही ही शस्त्रक्रिया केल्याचे मान्य केले नाही. मात्र तिचे फोटो याबद्दल बरेच काही सांगून गेले होते.
सध्या आयशा ट्विटरवर ट्रेंडिगमध्ये आहे. तिच्या प्लॅस्टिक सर्जरीमुळे तीला ट्रोल केलं जात आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, यावरून आयशाने आपल्या ओठांची सर्जरी केल्याचे स्पष्टपणे जाणवते. या सर्जरीमुळे आयशाची चेहऱ्यापट्टीत बदल जाणवतो. तीचे पाऊट आणि फेसकट पूर्णपणे बदलून गेल्याचेही स्पष्ट दिसून येत आहे. आधी आयशा क्यूट दिसायची. पण या सर्जरीनंतर तिचे ओठ चांगलेच जाड झालेले आहेत. त्यामुळे ती बरीच विचित्र दिसायला लागल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. तुम्ही तिचा आताचा फोटो बघाल तर तिला तुम्हाला ओळखता देखील येणार नाही.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 भेटवस्तू गिफ्ट करताना...
Let's Up Useful Info
भेटवस्तू देण्याचे अनेक औचित्य असतात. त्यावेळी भेटवस्तू देऊन तो क्षण अविस्मरणीय करणे हे प्रत्येकालाच आवडते. आपण ज्याला भेट देतो ती भेट त्या व्यक्तीला आयुष्यभर लक्षात राहणारी आणि आनंद देणारी असावी यासाठी आपले नेहमी प्राधान्य असते. पण काहीजण भेटवस्तू खरेदी करताना कन्फयुज होत असतात त्यांच्यासाठी खास...
👉 भेटवस्तूचे पॅकिंग करताना कल्पनाशक्तीचा आणि कलात्मकतेचा वापर करणे महत्त्वाचे ठरते. काही लोकांना क्लासिक पॅकिंग करणे आवडते तर काही जण पॅकिंगला पर्सनल टच देतात.
👉 सुंदर व आकर्षक पॅकिंग पाहूनच भेटवस्तू बद्दलची उत्सुकता वाढते. त्यामुळे गिफ्ट देताना आकर्षक पॅकिंगमध्ये द्या.
👉 बदलत्या मार्केटनुसार पॅकिंगचे प्रकारही बदलत आहेत. त्यामुळे ज्या पॅकेजींगचा ट्रेंड आहे त्याचा वापर करा. सध्याला एक्स्लुझीव पॅकिंगचा ट्रेंड बराच लोकप्रिय आहे.
👉 सध्या ऑफबीट पॅकिंगचा ट्रेंड प्रचलित आहे. बो, सॅटिन, रिबीन, हॅण्डमेड पेपर, ड्राय फ्लॉवर आणि नानाविध आकाराचे गिफ्टबॉक्स अशा पॅकिंगसाठी लागणाऱ्या वस्तूंना सध्या बरीच मागणी आहे. त्यामुळे याचाही वापर करून बघण्यास हरकत नाही.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 दिवसभर फ्रेश राहण्यासाठी
धकाधकीच्या युगात दिवसभर फ्रेश राहणे म्हणजे कठीण काम. दिवसभराच्या ताण तणावामुळे आपण एवढे थकून जातो कि काही करण्याचा त्राण आपल्यात राहत नाही. त्यामुळे दिवसभर फ्रेश राहण्यासाठी या खास गोष्टी...
👉 फळं, दूध, दही, ताक व तूपाचा समावेश आपल्या रोजच्या आहारात असू द्या. यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी मिळते.
👉 दिवसाची सुरुवात हि 20 मिनिटांच्या एक्सरसाईजने करा.
👉 अतीझोपेमुळे सुजलेल्या डोळ्यांची समस्या दूर करण्यासाठी एक मिनिट गार चमचा डोळ्यांवर ठेवा.
👉 चेहरा स्वच्छ करण्यासाठी असा फेस वॉशचा वापर करा ज्यामध्ये स्क्रब असेल यामुळे तुमचा चेहरा क्लिन व फ्रेश दिसेल.
👉 चेहऱ्यावर नेहमी मॉइश्चराईजर लावा. त्यामुळे तुमचा चेहरा डल दिसणार नाही.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
तुमच्या डोळ्यातील काजळ पसरतंय...
Let's Up Tips & Tricks
सौंदर्यामध्ये भर घालणारं सौंदर्यसाधन म्हणजे काजळ. डोळ्यांना काजळ लावले की, तरूणींचे सौंदर्य अधिक खुलते. पण बऱ्याच जणी काजळ लावणं टाळतात कारण सकाळी लावलेले काजळ संध्याकाळपर्यंत पसरलेले असते व त्यामुळे चेहरा अधिक काळवंडतो. काजळ न लावणं हा यावर एकमात्र पर्याय नाही. त्यामुळेच या खास टिप्स तुमच्यासाठी...
👉 चांगली क्वालिटी निवडा : जर तुम्ही काजळ वापरत असाल तर चांगल्या क्वालिटीचे व ब्रॅंडेड काजळ वापरा. बाजारात अनेक स्वस्त पर्याय उपलब्ध असले तरी उत्तम क्वालिटीचे काजळ निवडा. इतर काजळ लवकर पसरतात त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे काजळ निवडा.
👉 चेहरा धुऊन घ्या : तुमचा चेहरा जर तेलकट असेल तर काजळ लवकर पसरते. त्यामुळे काजळ लावण्यापुर्वी चेहरा व्यवस्थीत स्वच्छ पुसून घ्या व चेहऱ्यावर तेलकटपणा राहणार नाही याची काळजी घ्या.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 आयशॅडोचा वापर करा : आयशॅडो वापरा यामुळे काजळ उठून दिसते. ब्लॅक किंवा ग्रे कलरचे आयशॅडो वापरल्यामुळे काजळ लाइट होऊन दिवसभर टिकून राहण्यास मदत होते तसेच चेहऱ्यावरील तेलाचे प्रमाण देखील कमी होते.
👉 पावडर लावा : काजळ लावल्यानंतर डोळ्याखाली थोडी पावडर लावा. यामुळे स्किन ऑईली होण्यापासून वाचेल व काजळ पसरणार नाही.
👉 ब्लॉटिंग पेपर : तुमच्या पापण्या अधिक ऑईली असल्यास सोबत ब्लॉटिंग पेपर ठेवा. जेव्हा चेहऱ्यावर ऑईल येण्यास सुरूवात होईल तेव्हा ब्लॉटिंग पेपरच्या मदतीने ते पुसून घ्या.
👉 जेल लाईनर : लावलेले काजळ टिकत नसेल तर जेल लाईनर वापरा. जेल लाईनर घट्ट असल्याने ते पसरत नाही. पेन्सिल काजळच्या तुलनेत हे महाग असले तरी दिवसभर टिकून राहतात.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - भाजपच्या विजयामुळे नोटाबंदीला देशातल्या जनतेचा पाठिंबा आहे हा संदेश देण्यासाठी भाजपातर्फे आज देशभर विजय दिवस साजरा केला जाणार
👉 नवी दिल्ली - भारत सरकारने इस्रायलबरोबर झालेल्या 17 हजार कोटींच्या क्षेपणास्र कराराला दाखवला हरिवा कंदील, दोन्ही देश एकत्रतिपणे 'बराक' हे क्षेपणास्त्र तयार करणार
👉 कोइम्बतूर - महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 112 फुटी शिवप्रतिमेचं अनावरण केले, 'आदियोगी' असं या शिवप्रतिमेचं नाव
👉 नवी दिल्ली - अवघ्या 251 रुपयांमध्ये फ्रीडम 251 हा मोबाईल देण्याचा दावा करणाऱ्या रिंगिग बेल्स या कंपनीचे संचालक मोहित गोएल यांना फसवणुकीप्रकरणी अटक
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 ह्यूस्टन - कॅनसस शहरात एका अमेरिकी नागरिकाने भारतीय इंजिनीअरची गोळ्या घालून हत्या केली, आरोपीला पोलिसांनी केली अटक
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई - मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक असावा, यावर भाजप ठाम आहे, त्यामुळे काँग्रेससारख्या पक्षाशी युती करण्याचा प्रश्नच नाही - आशिष शेलार
👉 मुंबई - जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने आघाडीसाठी दिलेले प्रस्ताव काँग्रेसने स्वीकारला, सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी होणार
👉 मुंबई - शिवसेना सत्तेत असेपर्यंत पाठिंब्याचा विचार नाही, शिवसेनेने भाजपाशी ब्रेकअप केला तरचं विचार करु - अशोक चव्हाण
👉 मुंबई - मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपा यांनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
👉 उल्हासनगरमध्ये साईपक्ष भाजपला पाठिंबा देणार असल्याने भाजपचा महापौर होणार, आमदार रवींद्र चव्हाण यांची माहिती
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 महाड - महाराष्ट्रातील जिल्हा परिषद तसेच महापालिका निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज किल्ले रायगडावर
👉 मुंबई - विले पार्ले फॉरेन पोस्टात दुबईहून आयात पार्सलमध्ये 1.12 कोटींचे सोने, 1.94 कोटींचे रुचे केशर, सिगारेटची 237 खोकी व रसायनांच्या 265 बाटल्या सापडल्या
👉 पुणे - पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परीषद आणि स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडीयाच्या कार्यकर्त्यांमध्ये संघटनांचे पोस्टर लावण्याहून हाणामारी
👉 मुंबई - लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या कथा संग्रहासाठी 2016 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान
🎯 खेळ घडामोडी :
👉 नवी दिल्ली - चीनचा प्रतिस्पर्धी बॉक्सर जुल्फिकार मेमेतियाली याने कुठलेही कारण न देता भारताचा स्टार बॉक्सर विजेंदरसिंग याच्याविरुद्ध लढण्यास नकार दिला
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट ‘आँखे’ या चित्रपटाचा सिक्वल येणार, अमिताभ बच्चन यांच्या लूकचा मेकओव्हर करण्यात येणार
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 खुद की सुनो...
Let's Up Think Katta
आपल्या अवतीभोवती अनेकजण असे पाहतो ते यश मिळविण्यासाठी गर्दीच्या मागे धावणारी असतात. गर्दीच्या मागे धावत असताना आपण आपल्यातल्या क्षमता, कौशल्य विसरून जात असतो. पण हीच क्षमता तुमची ताकद असते. कारण जीवनात यशासाठी कौशल्य व क्षमता जास्त गरजेच्या असतात. म्हणूनच तुमच्याकडं ज्या प्रकारची कौशल्यं असतील, त्यानुसारच तुमचं कार्यक्षेत्र निवडा.
👉 मन की बात सुनो : करिअरबाबत आपण एखादा चुकीचा निर्णय घेतला असेल तर आपल्याला आयुष्यभर पश्चात्ताप करत बसावं लागेल. त्यामुळे दुसऱ्याचं पाहून निर्णय घेऊ नका. करिअरमध्ये यश मिळवायचं असेल, तर आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. तुम्ही जे करू शकता, जिथे तुम्ही यशस्वी होऊ शकता, त्याच क्षेत्राला आपलं करिअर म्हणून निवडा.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 तुमच्या ताकदीला ओळखा : प्रत्येकात काही ना काही वेगळं स्किल असतं. यासाठी आपण आपल्या स्किलनुसार त्या क्षेत्रात प्रगती केली पाहिजे. जे दुसऱ्याकडं आहे, ते तुमच्याकडं असेलच असं नाही. म्हणून दुसऱ्यांशी तुलना करू नका. तुमच्या कौशल्याला चालना द्या. यश मिळवण्यासाठी गर्दीच्या मागे पळण्याऐवजी आपल्या कौशल्यांच्या मागे धावावं आणि त्यानुसारच करिअर निवडावं.
👉 वेगळी वाट निवडा : जास्त गर्दी झाली की, चेंगराचेंगरी होतेच. त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना गर्दीच्या मागे पळू नका स्वतःची वेगळी वाट निवडा. तुमच्याकडं जी कौशल्य असतील त्याआधारे लढायला शिका.
👉 ऐकावे जणांचे करावे मनाचे : दुसऱ्यांचा सल्ला नक्की घ्या पण करिअरमध्ये दुसऱ्यांपेक्षा वेगळे चालण्यासाठी त्यांच्यामागं धावणं थांबवा. यशासाठी स्वत:वर आणि स्वत:च्या कौशल्यांवर विश्वास ठेवा. तुम्ही जे करू इच्छित आहात, तसंच करा. दुसऱ्यांचेही मत लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला त्या क्षेत्रातील आव्हाने आणि शक्यतांची माहिती होते.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 जम्मू - आंतरराष्ट्रीय सीमेवरुन घुसखोरी करताना महिला घुसखोर ठार, अखनूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ जवानांनी केली कारवाई
👉 नवी दिल्ली - महापौरपदावरचा दावा सोडू नका, कुठल्याही परिस्थितीत मुंबईमध्ये आपला महापौर बसला पाहिजे, भाजपच्या दिल्ली मुख्यालयातून राज्यात स्पष्ट सूचना
👉 आंध्र प्रदेश - विशाखापट्टणम येथील अण्णावरम येथे पोलिसांसोबतच्या चकमकित 2 माओवादी ठार
👉 गोंदिया - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या शासकीय वाहनाला अपघात, 1 ठार, 1 जखमी
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 लंडनच्या नव्या मेट्रोपोलिटिन कमिशनर म्हणून क्रेडिसा डिक यांची नियुक्ती, लंडन पेालिसांचे नेतृत्त्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी ठरल्या
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई - सत्तास्थापनेसाठी चाललेल्या हालचालीत शिवसेनेला यश,तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेसोबत, संख्याबळ 87
👉 मुंबई - महापालिकेत सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेना भवनात उद्या महत्त्वाची बैठक, उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आणि नवनिर्वाचित नगरसेवक रहाणार उपस्थित
👉 नागपूर - मुंबईत शिवसेना-भाजपला एकत्र येण्यावाचून सध्यातरी पर्याय दिसत नाही : नितीन गडकरी
👉 पुणे - सभेला गर्दी नाही म्हणाऱ्यांनी आता पालिकेतली गर्दी बघावी, भाजप नेते व पालकमंत्री गिरिश बापट यांचा
विरोधकांना टोला
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - मुंब्रा, दिवा व उल्हास नदीलगतच्या भागांतील तिवरांच्या झाडांचे नुकसान करून होत असलेल्या बेकायदा बांधकामांबाबत काय कारवाई केली? मुंबई हायकोर्टाने विचारला जाब
👉 मुंबई - मनसेचे कालिनाचे विजयी उमेदवार संजय तरडे हल्लाप्रकरणी भाजप उमेदवार सुधीर खातूसह चौघांना अटक, विनोबा भावे नगर पोलिसांची कारवाई
👉 नाशिक - राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या आजी चंद्रकुंवरजी रावल उर्फ बहीणसाहेब यांचे वृद्धापकाळाने निधन
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 28892.97, निफ्टी : 8939.50, सोने भाव : 29,451 (प्रतितोळा), चांदी : 42,856 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 टीव्हीएसने लाँच केली बीएस-IV इंजिनची वेगो 2017, विशेष फिचर्स असे : सिंगल सिलिंडर एअर कुल्ड इंजिन, 8 बीएचपीची पॉवर आणि 8 एनएमचा टार्क जनरेट करण्याची क्षमता, सिंक ब्रेक सिस्टिम, टेलिस्कोपिक प्रंट शॉकऑब्जर, फुल डिजिटल स्पीडोमीटर, युएसबी चार्जिंग पोर्ट आणि डय़ुअल टोन सीट कव्हर, या स्कुटरची किंमत 50 हजार 434 रुपये (दिल्ली एक्स-शोरुम) ऐवढी आहे
🎯 खेळ घडामोडी :
👉 पुणे - पहिल्या कसोटीच्या दुस-या दिवसाचा खेळ संपला, ऑस्ट्रेलिया 4 बाद 143, भारतावर 298 धावांची आघाडी
👉 आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत (आयएसएसएफ) भारतीय नेमबाज पूजा घाटकरला 10 मीटर एअर रायफल नेमबाजीत कांस्य पदक
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर ‘बाहुबली 2’ या सिनेमाचं नवं पोस्टर रिलीज, अभिनेता प्रभास म्हणजेच बाहुबली हत्तीच्या सोंडेवर आरुढ झालेला या पोस्टरमध्ये दिसत आहे
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 फेसबुकचे ‘प्रोफाईल फ्रेम’ फिचर अपडेट
Let's Up Techno Katta
फेसबुकने 2015 साली ‘प्रोफाईल फ्रेम’ हे फिचर प्रदान केले आहे. यानुसार एखादा क्रीडा संघ अथवा एखाद्या महोत्सवानिमित्त प्रोफाईल प्रतिमेवर स्टीकर्स लावता येतात. 2 महिन्यांपूर्वीच स्वत:च्या फ्रेम तयार करण्याची सुविधाही प्रदान करण्यात आली आहे. आता या फिचरला अपडेट करून जगभरातील तब्बल 200 देशांच्या राष्ट्रध्वजाला प्रोफाईल फोटोवर लावण्याचे फिचर देण्यात आले आहे.
फेसबुकच्या या फिचरचा उपयोग करून कुणीही आपल्या प्रोफाईलवर तिरंगा लाऊ शकतो. यासाठी https://www.facebook.com/profilepicframes या लिंकवर जाऊन वरील डाव्या बाजूला ‘India’ सर्च करून नंतर आवश्यक त्या स्टेप्सचा वापर करावा.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 टाटाची ‘सी-क्युब’ कन्सेप्ट कार प्रदर्शित
टाटा मोटर्सने नुकतीच ‘सी-क्युब’ ही कन्सेप्ट कार प्रदर्शीत केली आहे. ‘सी क्युब’ या मॉडेलमध्ये मायक्रोसॉफ्टच्या अझुरे या क्लाऊड सेवेवर आधारित विविध फिचर्स असतील. यात ‘आर्टीफिशियल इंटिलेजियन्स’ म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्ता (एआय) आणि ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ म्हणजेच ‘आयओटी’ या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
यात मायक्रोसॉफ्टच्या कोर्टाना या व्हर्च्युअल असिस्टंटच्या मदतीने कारची विविध फंक्शन्स कार्यान्वित करणे शक्य होणार आहे. याच्या जोडीला स्काईपसह मायक्रोसॉफ्टची विविध टुल्स प्रदान करण्यात आलेली आहेत. परिणामी ही कार स्मार्टफोनसह अन्य उपकरणांशी कनेक्ट करत अगदी अभिनव पध्दतीने वापरता येणार आहे.
‘सी क्युब’मध्ये नेमके कोणते फिचर्स असतील तसेच याचे मूल्य काय असेल? याबाबत टाटा मोर्टर्सने माहिती दिलेली नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये ‘जिनेव्हा मोटार शो’मध्ये याची संपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यांमध्ये टाटाची ‘सी क्युब’ ही कार भारतीय बाजारपेठेत उतारण्यात येईल असे मानले जात आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 तोंड आलंय? तर मग हे करा...
Let's Up Health Katta
आपल्यापैकी जवळपास प्रत्येकालाच तोंड येणे या प्रकाराचा अनुभव आलेला असतो. तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काहीही खाताना जिभेची, हिरड्यांची आग होणे, तिखट, खारट, आंबट या चवी जराही सहन न होणे अशा तक्रारी यात जाणवतात. हे दुखणे फार मोठे नसलं तरी त्याचा त्रास खूप होतो. वारंवार तोंड येण्याचा त्रास होणे हा प्रकृतीच्या दृष्टीने धोक्याचा इशारा असू शकतो. त्यामुळे वेळीच त्यावर योग्य ते उपचार घेणे महत्त्वाचे आहे. या आजाराचे मूळ कशात आहे आणि त्यावर उपाय कोणते आहेत, त्याबद्दल जाणून घेऊयात...
👉 तोंड येणे म्हणजे नेमके काय?
तोंड येणे या विकाराला माऊथ अल्सर किंवा स्टोमोटायटिस असेही म्हटले जाते. हा आजार म्हणजे तोंडाच्या आतल्या भागाला सूज येणे होय. यात ओठ, जीभ, पडजीभ, घसा, टाळा यांना सूज येते. त्यामुळे आपल्याला काहीही खाता येत नाही आणि नीट गिळताही येत नाही. यात फंगल इन्फेक्शन झाले, तर तोंडाला आतून बुरशी येते, प्रतिकारशक्ती कमी होते. काही वेळा तोंडाच्या आतली त्वचा सोलवटल्यासारखी होते. जीभ आणि संपूर्ण तोंड आतून घशापर्यंत लाल होते.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
तोंड आल्यावर बर्याचदा आपण फक्त घरगुती उपचारांवर विसंबून राहतो. बर्याचदा त्याचा फायदाही होतो. परंतु वारंवार तोंड येण्याची समस्या सतावत असेल, तर त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक ठरते.
👉 तोंड येण्याची कारणे काय?
👉 शरीरात अतिरिक्त उष्णता वाढणे. एखाद्या आजारावर दीर्घकाळ औषधे घेत असल्यास त्या औषधांचे साईड इफेक्ट होऊन तोंड येते. अति प्रमाणात चहा, कॉफी किंवा तंबाखूचे सेवन, अति धूम्रपान, अति प्रमाणात तिखट, तेलकट खाणे.
👉 पचनाच्या तक्रारी, विशेषत: पोट साफ नसल्यासदातांचे विकार असल्यास किंवा दात झिजून टोकदार झाले असल्यास ते वारंवार लागूनही तोंडात व्रण होता आणि तोंड येण्याचा त्रास होतो.
👉 कुपोषण किंवा ब 12 या जीवनसत्त्वाचा आणि अन्य पोषक द्रव्यांचा अभाव. तोंडाच्या अस्वच्छतेमुळे होणारे इन्फेक्शन. अशा प्रकारे तोंड येण्याची कारणे वेगवेगळी असतात. त्यामुळे या त्रासाचे नेमके कारण शोधून त्यावर उपाययोजना केली जाणे महत्त्वाचे असते.
👉 तोंड येणे यावर उपाय काय?
👉 तोंड आल्यानंतरच्या वेदना कमी करून तात्पुरते बधीरत्व आणणारी मलमे सध्या उपलब्ध आहेत. त्यांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केला, तर वेदना कमी होऊन रुग्ण व्यवस्थित जेवण करू शकतो. त्यामुळे आहार कमी होऊन त्रास वाढण्याचे टळते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मल्टी व्हिटॅमिन आणि बी कॉम्प्लेक्सच्या सप्लीमेंट्स घ्याव्यात.
👉 उष्णतेने तोंड आले असल्यास अतिरिक्त उष्णता कमी करणारी औषधे घ्यावीत. नारळपाणी, सौम्य चवीचे सूप, थंड दूध असे घटक आहारात घ्यावेत.
👉 जीवाणू आणि विषाणू संसर्ग किंवा बुरशीच्या संसर्गाने तोंड आल्यास झाल्यावर अॅन्टीबायोटिक्स, अॅन्टी फंगल औषधे डॉक्टरांकडून घ्यावीत. कोमट दुधात हळद घालून प्यावे. शुद्ध गेरूची पूड, हळद आणि मध यांचे मिश्रण तोंडातील जखमा आणि व्रणांवर लावावे.
👉 पोटाच्या तक्रारींमुळे तोंड येत असल्यास पचन सुधारणारी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत पोट साफ राहावे यासाठी तंतुमय पदार्थांचा समावेश आहारात आवर्जून करावा. पोटाची संपूर्ण तपासणी करून घ्यावी. काही वेळा आतड्यांना होणार्या अल्सरचे सुरुवातीचे लक्षण म्हणून सतत तोंड येण्याची तक्रार उद्भवू शकते. अशी शंका असेल, तर गरम दुधात गाईचे तूप मिसळून नियमित प्यावे.
👉 आहार चौरस आणि सर्व पोषक द्रव्यांचा पुरवठा होईल असा असावा. अति तिखट, तेलकट जेवण टाळावे. तोंडाची नियमित व योग्य प्रकारे स्वच्छता करावी. पानतंबाखूचे अतिसेवन आणि धूम्रपान टाळावे.
👉 दंतवैद्याकडून दातांची तपासणी करून घ्यावी दात झिजून टोकदार झाले असतील, किंवा दातांचे तुकडे पडत असतील, तर त्यांची झीज थांबवण्यासाठी योग्य उपचार घ्यावेत. तुटलेल्या दातांवरही उपचार करून घ्यावे.
👉 विशिष्ट औषधांमुळे हा त्रास होत असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे बदलून घ्यावी किंवा त्यांच्यापासून होणारा त्रास कमी करण्यासाठी काय करता येईल, ते त्यांना विचारावे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 नवीन 7 ग्रहांचा शोध
Let's Up General Knowledge
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने सौरमंडळाच्या बाहेरील ब्रह्मांडाशी संबंधित रहस्यांचा उलगडा करण्याचे संकेत दिले आहेत. नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी पृथ्वीसदृश 7 नव्या ग्रहांचा शोध लावला आहे. हे सर्व ग्रह 39 प्रकाशवर्ष म्हणजे सुमारे 378 लाख कोटी किलोमीटर अंतरावरील एका तार्याभोवती प्रदक्षिणा घालत आहेत.
या सर्व ग्रहांवर जीवसृष्टीची शक्यता असू शकते हे विशेष. हे सर्व ग्रह ‘ट्रॅपिस्ट-1’ नावाच्या छोट्या तार्याभोवती प्रदक्षिणा घालतात. हा तारा आपल्या ग्रहमालिकेतील गुरूपेक्षा थोड्याच मोठ्या आकाराचा आहे. त्याचा प्रकाश सूर्यापेक्षा दोनशे पटीने कमी आहे. डॉ. ख्रिस कोपरवीट यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने याबाबतचे संशोधन केले आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
डॉ. कोपरवीट यांनी म्हटले आहे की, या ग्रहांवर काही प्रमाणात द्रवरूप पाणी आणि पर्यायाने जीवांचे अस्तित्व असू शकते. पृथ्वीच्या आकाराचे, खडकाळ-कठीण पृष्ठभाग असलेले आणि आपल्या तार्यापासून जीवसृष्टीला अनुकूल इतक्या अंतरावर असलेले हे ग्रह आहेत. हे संशोधन यामुळेच मोलाचे मानले जात आहे. अर्थातच त्यांच्याबाबत अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. या ग्रहांवर वाहते पाणी असावे, असे संशोधकांना वाटते. या सातपैकी तीन ग्रहांवर समुद्रही आहेत. मात्र, तेथे जीवसृष्टीचे अस्तित्व आहे की नाही हे पाहण्यासाठी संशोधकांना आणखी दहा वर्षे लागू शकतात. तरीही हा शोध या शतकातील सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक ठरू शकतो.
👉 सर्वात लहान बेडकाचा शोध
भारतीय शास्त्रज्ञांनी 5 वर्षांच्या अथक शोधानंतर छोट्या बेडकाच्या 7 नव्या प्रजातींचा शोध लावला आहे. हे बेडूक आकाराने एवढे छोटे आहेत की, लहान मुलाच्या अंगठ्याच्या नखावरही मावू शकतात. गुप्त अधिवास आणि किड्यांसारखा आवाज यामुळे त्यांच्याकडे यापूर्वी दुर्लक्ष झाले होते, असे दिल्ली विद्यापीठातील दोन संशोधकांनी केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. या बेडकांची लांबी अवघी 12.3 मिलीमीटर इतकी आहे. या बेडकाला ‘सबरीमला नाईट फ्रॉग’ असे नाव आहे.
पश्चिम घाटातील जंगलांमध्ये करण्यात आलेल्या संशोधनात या बेडकाचा शोध लावण्यात आला आहे. हा परिसर जैवविवधतेने संपन्न आहे. या पश्चिम घाटाची तुलना अॅमेझॉनच्या वनक्षेत्राशीही केली जाते. तिथे 2006 पासून आतापर्यंत उभयचर जीवांच्या शंभरपेक्षाही अधिक प्रजाती सापडल्या आहेत. तिथे रॉबिनमूर आणि विजयन नावाच्याही छोट्या आकाराच्या बेडकांच्या प्रजाती आहेत. बेडकांच्या सर्व प्रकारच्या प्रजातींमध्ये येथील चार प्रजाती सर्वात छोट्या आकाराच्या आहेत. सध्या पापुआ न्यू गिनीमधील जगातील सर्वात छोट्या आकाराची बेडूक प्रजाती आहे. तिची लांबी केवळ 8 मिलीमीटर इतकी आहे.
या अभ्यासाचे नेतृत्व करणारे प्रोफेसर एस. डी. बिजू यांनी सांगितले की, हे बेडूक छोट्या भौगोलिक प्रदेशातील असल्यामुळे संशोधनाचे निष्कर्ष अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - जम्मू-काश्मिरातील पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी येत्या पाच वर्षांत 2,400 कोटी रुपये गुंतविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला
👉 नवी दिल्ली - तीन सरकारी तेल कंपन्या मिळून उभारणार असलेल्या जगातील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील बाभुळवाडी गावाची निवड
👉 नवी दिल्ली - भारताचे परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना भारत-बांगलादेश यांच्यातील विकासाबात दिली माहिती
👉 नवी दिल्ली - राजघाटजवळ असलेल्या जंगल परिसरात आग लागली असून आग विझविण्यासाठी 10 अग्नीशमन दलाच्या गाड्या दाखल
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 लाहोर - पाकिस्तानच्या लाहोरमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची माहिती, लाहोरच्या संरक्षण क्षेत्रातील परिसरात हा स्फोट झाला असून यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई आणि राज्यात भाजला चांगले यश मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे ट्विटद्वारे केले अभिनंदन
👉 मुंबई - मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच असेल असे सांगत, युतीच्या निर्णयाबाबत घाई नाही, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले
👉 मुंबई - वॉर्ड क्रमांक 166 मधील मनसेचे विजयी उमेदवार संजय तुरडे यांच्यावर हल्ला, भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा तुरडेंचा आरोप
👉 मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून सुरू झालेली कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पराभवाची मालिका कायम
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - राज्यातील पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक, राज्य राखीव पोलीस बल गट आणि कारागृह पोलीस यामध्ये होणार्या पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया आजपासून सुरु
👉 भिवंडी - भिवंडी तालुक्यात माणकोली-दापोडा परिसरांतील इंडियन कॉर्पोरेशनमधील कपड्याच्या गोदामास आग लागून लाखो रूपयांचे कापड भस्मसात
🎯 खेळ घडामोडी :
👉 नवी दिल्ली - भारतात प्रथमच होणाऱ्या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेस आजपासून सुरुवात, भारतीय नेमबाजांकडून घरच्या मैदानावर पदकांची अपेक्षा
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 'सैराट' या चित्रपटाचा कन्नड रिमेक ‘मनसू मल्लिगे’ या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली, दहावीच्या परीक्षेच्या अभ्यासात रिंकू व्यस्त असल्याने निर्मात्यांनी घेतला निर्णय
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
