ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

الذهاب إلى القناة على Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

إظهار المزيد
6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
⚡ येडियुरप्पा कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री LetsUp I Breaking ▫ सुप्रीम कोर्टात पहाटेपर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा भाजप नेते येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ ▫ राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची दिली शपथ ▫ येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी झाले विराजमान ▫ आता येडियुरप्पा यांना 15 दिवसात बहुमत सिद्ध करायचे आहे For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तातडीने अटक नाही, अॅट्रॉसिटी निर्णयावर सुप्रीम कोर्ट ठाम ● नवी दिल्ली - जम्मू- काश्मीरमध्ये रमजानच्या काळात केंद्र सरकारने शस्त्रसंधीचा घेतला निर्णय ● बंगळुरू - कर्नाटकात सत्तास्थापनेस राज्यपालांचे भाजपला पाचारण, येदियुरप्पांचा आज शपथविधी, निर्णयाविरुद्ध काँग्रेसचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा ● मुंबई - देशभरात अनेक ठिकाणी चंद्रदर्शन झाल्यामुळे आजपासून 'रमजान' हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना सुरू ● मुंबई - महावितरण कंपनीने एक हजार मेगावॅट सौरऊर्जेसाठी काढलेल्या निविदेला चालू वर्षातील सर्वात कमी प्रतियुनिट दर 2 रुपये 71 पैसे मिळाला ● पंढरपूर - अधिक मासानिमित्त 16 जूनपासून महिनाभर श्रीक्षेत्र पंढरपुरातील विठ्ठलाचे ऑनलाईन तसेच व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय ● पॅरिस - फेसबुकने बंद केली 58.3 कोटी बनावट खाती, 83.7 कोटी स्पॅम पोस्ट टाकल्या काढून ● शाओमी कंपनीने भारतीय बाजारपेठेतील आपला पहिला क्रमांक राखला कायम, ताज्या आकडेवारीतून पुन्हा एकदा अधोरेखीत ● मुंबई - अटीतटीच्या सामन्यात मुंबईने आपल्या घरच्या मैदानावर किंग्ज इलेव्हन पंजाबवर केली मात, जसप्रीत बुमराह ठरला सामनावीर ● मुंबई - अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू पुन्हा एकदा 'बदला' मध्ये एकत्र दिसणार, हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट असणार आहे For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👌 शासनाच्या विविध विभागात 36 हजार पदे भरणार Letsup I Update राज्य शासनाच्या विविध विभागांत रिक्त पदांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनाच्या विविध विभागांतील 36 हजार पदांची भरती करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या 36 हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील 11 हजार 05 पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील 10 हजार 568 पदे, गृह विभागातील 7 हजार 111 पदे, कृषी विभागातील 2 हजार 572 पदे, पशुसंवर्धन विभागातील 1 हजार 47 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील 837 पदे, जलसंपदा विभागातील 827 पदे, जलसंधारण विभागातील 423 पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील 90 या पदांसह नगरविकास विभागातील 1 हजार 664 पदांचा समावेश आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ आता टीईटीची परीक्षा 15 जुलैला! Letsup I Update राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राध्यापकांसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी-नेट) एकाच दिवशी आल्याने, आता 'टीईटी'च्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार टीईटी 8 जुलैऐवजी 15 जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

_*LetsUp News Updates*_ ● नवी दिल्ली - जानेवारी-मार्चमध्ये पीएनबीला 13,417 कोटी रुपयांचा तोटा, देशातील बँकिंग इतिहासात एका तिमाहीतील हा सर्वात मोठा तोटा ● नवी दिल्ली - मुस्लिम धर्मीयांच्या पवित्र रमझानच्या महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये घातपाताची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली ● नवी दिल्ली - रोड रेज प्रकरण, मारहाण प्रकरणी नवज्योतसिंह सिद्धू दोषी, तर सदोष मनुष्यवध प्रकरणात निर्दोष, सुप्रीम कोर्टाचा निर्णय ● तेल अवीव - वारंवार होणाऱ्या विरोधानंतर अमेरिकेने इस्त्रायलमधील आपले दुतावास तेल अवीवहून जेरुसलेमला स्थलांतरीत करण्यास केली सुरुवात ● बेंगळुरू - कर्नाटकात भाजप व काँग्रेस- 'जेडीएस'ने केला सत्तास्थापनेचा दावा, राज्यपालांच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष ● उत्तर प्रदेश - वाराणसीच्या कॅन्ट रेल्वे स्टेशनजवळ बांधकाम सुरू असलेला उड्डाणपूल कोसळला, अनेक लोक ढिगाऱ्याखाली, 18 ठार ● सातारा - ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांचे निधन, वयाच्या 95 व्या वर्षी झाले निधन ● मुंबई - आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक सेवा देण्यासाठी सज्ज असणाऱ्या व्होल्वो कारने गुगलबरोबर केली भागीदारी ● राजस्थानचा विजय रथ कोलकाताने रोखला, 6 गडी राखून मिळवला विजय, कुलदीप यादव ठरला सामनावीर ● मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या 'पर्पल पेबल पिक्चर्स'चा मराठी चित्रपट 'पाणी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

👪 आज 'जागतिक कुटुंब दिवस'; एकत्र कुटुंबासाठी 'हे' आवश्यक! Letsup I Special Update हल्ली विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जागतिक कुटुंब दिनाला विशेष महत्त्व आले आहे. 15 मे 1994 रोजी युनायटेड नेशन्समध्ये सर्वप्रथम जागतिक कुटुंब दिन साजरा करण्यात आला होता. मागच्या काही काळात विभक्त कुटुंबाची समस्या भारतात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. चला तर आज जागतिक कुटुंबदिनाच्या निमित्ताने आपल्या कुटुंबाशी कनेक्ट राहण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी जाणून घेऊयात… 1) सध्या मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यांसारख्या उपकरणांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग व्यापून टाकला आहे. एकतर आपण फार कमी वेळ घरात असतो. त्यात या उपकरणांमुळे आपण घरातील व्यक्तींना वेळ देत नाही. त्यामुळे घरात आल्यावर मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही ही उपकरणे बंद ठेवण्याचा प्रयत्न करा. 2) तुम्हाला आपले कुटुंब एकत्रित हवे असेल तर सर्वांना आवडेल, रुचेल असा एखादा छंद जोपासण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्ही एकत्रितपणे सायकलिंग करु शकता, एकत्रितपणे एखादे पुस्तक वाचू शकता, सगळ्यांना आवडतील अशी गाणी एकत्रितपणे ऐकू शकता. 3) घरातील सर्वांनी किमान सकाळचा नाष्ता किंवा रात्रीचे जेवण एकत्रितपणे करण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे दिवसभरातील सर्वांच्या आयुष्यातील घडामोडींबद्दल माहिती होते. 4) महिन्यातील एक दिवस सर्वांच्या वेळा बघून अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवसाच्या आऊटींगला जाण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा एकमेकांमधील संवाद वाढण्यास मदत होईल. 5) मोकळ्या वेळात तुमच्या मुलांशी गप्पा मारा. त्यांना त्यांच्या शाळेतील, कॉलेजमधील गोष्टी, मित्रमैत्रीणींविषयीच्या गोष्टी विचारा. त्यानंतर तुमच्या लहानपणीच्या गोष्टीही शेअर करा. त्यामुळे मुलांना वेगळ्या गोष्टींची माहिती होईल. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ पेटीएम अॅपमधील नवीन फिचर प्रदान Letsup I Techno Update देशातील सर्वात मोठी डिजीटल पेमेंट प्रणाली पेटीएमने आपल्या अॅपवर नवीन फिचर प्रदान केले आहे. या अनुषंगाने आता कुणीही पेटीएम अॅपला आपले बँक खाते जोडून याच्या माध्यमातून बँक-टू-बँक या प्रकारात पैशांची देवाण-घेवाण करू शकणार आहेत. यासाठी माय पेमेंट हे नवीन फिचर देण्यात आले आहे. याच्या माध्यमातून युजर कोणत्याही बँकेच्या अकाऊंटमध्ये पैशांची ट्रान्सफर करू शकतो. विशेष बाब म्हणजे यासाठी कोणत्याही अतिरिक्त पैशांची आकारणी करण्यात येणार नाही. अर्थात यासाठी झीरो चार्ज लागणार आहे. अगदी नॉन-केवायसी पेटीएम ग्राहकदेखील या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहे. याच्या माध्यमातून रिकरींग (आवर्ती) तसेच मोठ्या रकमांचे व्यवहार अगदी सुलभ पध्दतीने करता येतील. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - अरूण जेटली आजारी असल्याने पियुष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार, राज्यवर्धन राठोड नवे माहिती आणि प्रसारण मंत्री ● नवी दिल्ली - राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलली, निवडणूक आयोग लवकरच तारीख जाहीर करणार ● नवी दिल्ली - 2020 पर्यंत देशात 5जी लागू करण्यासाठी सरकारने ठेवले लक्ष्य, यासाठी जूनमध्ये 5जी धोरण जाहीर करण्यात येणार ● नवी दिल्ली - मोदी सरकारने गेल्या 46 महिन्यात सर्वप्रकारच्या जाहिरातीबाजीवर 4343.26 कोटी खर्च केल्याची माहिती समोर ● नवी दिल्ली - सुनंदा पुष्कर प्रकरणी काँग्रेस नेते आणि पती शशी थरूर यांच्यावर आरोपपत्र; आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप ● बंगळुरू - कर्नाटकात आज मतमोजणी; दुपारपर्यंत येतील कल हाती, त्रिशंकू अवस्था निर्माण झाली तर जनता दल किंगमेकर ● नवी दिल्ली - इलेक्ट्रिक आणि हायब्रिड गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 9 हजार 400 कोटी रुपयांची मदत करण्याचा आखला प्रस्ताव ● न्यूयॉर्क - जगात दरवर्षी वायू प्रदूषणामुळे 70 लाख नागरिकांचा मृत्यू होतो, जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल ● बेंगळुरूचा पंजाबवर 10 गडी राखून दणदणीत विजय, उमेश यादव ठरला सामनावीर ● मुंबई - दिग्दर्शक मधुर भांडारकर आपल्या राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट 'चांदनी बार'चा दुसरा भाग म्हणजेच सिक्वेल बनविण्याच्या तयारीत For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🎬 थक्क करणारा 'ब्ल्यू प्लॅनेट' चा ट्रेलर प्रदर्शित Letsup I Video सोनी बीबीसी अर्थने 'ब्लू प्लानेट II: वन ओशन अँड द डीप' या आगामी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या ट्रेलरमध्ये महासागरात राहणाऱ्या महाकाय जीवांपासून ते जीव- जंतूपर्यंत आजवर न पाहिलेल्या गोष्टींचे चित्रण करण्यात आले आहे. भारतात पहिल्यांदाच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 22 शहरांमध्ये फक्त पीव्हीआरमध्ये हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. समुद्राच्या तळाशी आठ किलोमीटर आत जाऊन सहा हजार तासांहून अधिकचे चित्रण यात करण्यात आले आहे. या सिनेमात सर डेविड एटनबरो यांचा आवाज आणि प्रसिद्ध संगीतकार हँस जिमर यांचे संगीत आहे. हा ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा : https://goo.gl/SrsePH For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💥 अनिकेत विश्वासराव, प्रार्थना बेहेरेचा अपघात Letsup I Breaking सिनेमाच्या प्रमोशनसाठी कोल्हापूरकडे जात असताना अभिनेता अनिकेत विश्वासराव आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांच्या गाडीला लोणावळ्याजवळ अपघात झाला आहे. या अपघातात अनिकेत विश्वासरावला दुखापत झाली नाही. मात्र प्रार्थना बेहेरेच्या हाताला दुखापत झाली. तिला उपचारासाठी लोणावळा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या गाडीत अनिकेत, प्रार्थनासह ड्रायव्हर आणि प्रार्थनाची सहाय्यक होती. लोणावळ्याजवळ घाटात एक टेम्पो बंद पडला होता. त्या टेम्पोचा अंदाज न आल्याने, तो चुकवण्याच्या नादात अनिकेत-प्रार्थनाच्या गाडीला अपघात झाला. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - राजधानी दिल्ली परिसरात 109 किमी वेगाने वारे, पावसाचा हलकासा शिडकावा, विमान वाहतूक, रेल्वे मेट्रोलाही फटका, झाडे उन्मळून पडली, भिंती कोसळण्याच्या घटना ● नवी दिल्ली - आयआरसीटीसीने जाहीर केलेल्या नव्या सुविधेनुसार देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकिटांचे आरक्षण केवळ 59 रुपयांत करता येणार ● नवी दिल्ली - आणखी दोन बँका या रिझर्व्ह बँकेच्या रडारवर असून त्यांच्यावरही लवकरच निर्बंध येण्याची शक्यता ● नवी दिल्ली - अवघ्या 48 महिन्यांत 38 योजना सुरू करणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान बनले ● स्योल - उत्तर कोरियाने आपले अणुचाचणी केंद्र येत्या दोन आठवड्यांत कायमचे बंद करण्याची केली घोषणा ● मुंबई - पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या संशयिताला (फैजल मिर्झा बेग) अटक, एटीएसची मोठी कारवाई ● मुंबई - 1 जूनपासून बदलणार बर्फाचा रंग, व्यावसायिक वापरासाठी देण्यात येणार निळा रंग ● मुंबई - आयसीएसईतर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, सोमवारी दु. 3 वाजता जाहीर केला जाणार ● होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया लिमिटेड या कंपनीने डिओ डिलक्स ही नवीन स्कूटर भारतीय बाजारपेठेत उतारण्याची केली घोषणा ● चेन्नई सुपर किंग्जचा सनरायझर्स हैदराबादवर 8 गडी राखून दणदणीत विजय, राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 7 गडी राखून दणदणीत विजय ● मुंबई - अभिनेत्री ऐश्वर्या रायला दिलासा, इंस्टाग्रामवर ऐश्वर्याच्या फॉलोअर्सची संख्या 4 लाखावर For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🌧 मान्सून 28 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार Letsup I Update केरळमध्ये मान्सून साधारणत: एक जूनला दाखल होतो. मात्र यंदा तो चार दिवस आधीच म्हणजे 28 मे रोजीच केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. या अंदाजानुसार 28 मे रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन अपेक्षित असून त्यात दोन दिवस पुढे–मागे होण्याची शक्यता आहे. मान्सून 20 मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटावर पोहोचेल. यानंतर तो 24 मे रोजी श्रीलंकेत दाखल होईल आणि त्यानंतर बंगालच्या उपसागरावरुन मान्सूनचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

📣 अपघाती मृत्यू; कुटुंबियांना मिळणार 10 पट अधिक नुकसान भरपाई Letsup I Update रस्ते अपघातात बळी पडलेल्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईत दहा पटीने वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय लवकरच लागू करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजार तर कायमस्वरुपी अपंगत्वासाठी 25 हजार इतकी नुकसान भरपाई मिळते. या नवीन नियमानुसार, रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये, अपघातात विकलांग झालेल्यांना 50 हजार ते 5 लाख इतकी रक्कम नुकसान भरपाई म्हणून निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय रस्तेवाहतूक विभागाने 24 वर्षांनी या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही रक्कम मिळण्यासाठी अपघात ग्रस्तांनी आपली प्रकरणे मोटर अॅक्सिडेंट क्लेम ट्रिब्युनलसमोर घेऊन यावीत असे आवाहनही करण्यात आले आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🎬 Letsup I Bollywood Update ▫ आशूतोश गोवारीकर यांच्या बहूचर्चित आणि बहू प्रतिक्षीत ‘पानिपत’ चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय-अतुल गोगावले यांच्याकडे ▫ दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्या आगामी "इंडियाज मोस्ट वाँटेड' या चित्रपटात अर्जुन कपूर मुख्य भूमिका साकारणार ▫ प्रसिध्द टीव्ही मालिका 'ये है मोहब्बते' चा रमन भल्ला अर्थात करण पटेल लवकरच होणार बाबा ▫ अभिनेत्री सागरीका घाटगे फुटबॉल खेळाशी संबंधित 'मान्सून फुटबॉल' चित्रपटात झळकणार, यात ती गृहिणीची भूमिका साकाणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - सरकारी बँक कर्मचारी 30 मे रोजी स. 6 वाजेपासून 1 जून स. 6 पर्यंत 48 तासांच्या संपावर जाणार ● नवी दिल्ली - अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली ● नवी दिल्ली - भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचा म्यानमार दौरा; भारत-म्यानमारमध्ये 7 करारांवर स्वाक्षऱ्या ● बंगळुरू - कर्नाटक विधानसभेत 224 मतदारंसघांपैकी 222 जागांवर आज शनिवारी मतदान, मंगळवारी मतमोजणी, निकाल ● रांची - चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा भोगत असलेले लालु प्रसाद यादव यांना झारखंडच्या उच्च न्यायालयाने वैदयकीय कारणासाठी 6 आठवड्यांचा जामिन केला मंजूर ● मुंबई - राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि एटीएसचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांच्यावर गिरगावच्या चंदनवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ● औरंगाबाद - दोन समाजातील भांडणातून औरंगाबाद शहरात मध्यरात्रीनंतर दंगल , जाळपोळ आणि दगडफेकीत किमान 30 जण तर 10 पोलिस जखमी ● गुगलने आपल्या गुगल ड्राईव्ह सेवेचे नवीन डिझाईन केले सादर, या माध्यमातून या सेवेचा कायापालट करण्यात आला आहे ● जयपूर - राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सचा एक चेंडू आणि चार विकेट्सनी केला पराभव, जोस बटलर ठरला सामनावीर ● प्रसिद्ध गायक आणि संगितकार हिमेश रेशमिया याने अभिनेत्री सोनिया कपूर सोबत केले गुपचूप लग्न, हिमेशचे हे दुसरे लग्न आहे For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

💐 माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांची आत्महत्या Letsup I Update राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (आस्थापना) हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली. रॉय यांच्या आत्महत्येने पोलिस क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रॉय हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्याच आजाराला कंटाळून हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. चार वर्ष मुंबई क्राईम ब्रान्चमध्ये काम केले. एटीएएस प्रमुख म्हणून ते अधिक चर्चेत आले. हिमांशू रॉय यांनी अनेक हायप्रोफाईल प्रकरणे हाताळली. यात जे. डे. हत्याप्रकरण, आयपीएल सट्टेबाजी प्रकरणांचा समावेश आहे. एकदा हॉर्स रायडिंग करताना ते पडले, त्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली. दुखापत बरी होत नसल्याने त्यांनी अधिक तपासण्या केल्या. त्यावेळी डॉक्टरांना संशय आला. त्यांनी कॅन्सरसंबंधित तपासणी केली असता, त्यांना बोन मॅरो कॅन्सर असल्याचे उघड झाले. मग त्यांनी मुंबई तसेच परदेशात त्यांनी कॅन्सरचे उपचार केले. त्यांच्या अखेरचे उपचार पुण्यात सुरु होते. उपचारानंतर फिट झाल्याचे वाटल्याने त्यांनी पुन्हा जीम जॉईन केली. परंतु कॅन्सरने पुन्हा डोकेवर काढले होते. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

LetsUp News Updates ● नवी दिल्ली - देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 10 मे 2018 रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये दोन टक्क्याने घट ● नवी दिल्ली - अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदी कायम ठेवण्यासाठी केंद्र सरकार आठवडाभरात अध्यादेश जारी करण्याच्या तयारीत ● ऐतिहासिक भेटीचा मुहूर्त ठरला, 12 जूनला डोनाल्ड ट्रम्प घेणार किम जोंग उन यांची भेट, या भेटीकडे जगभराचे लक्ष लागले ● क्वालालंपूर - मलेशियात माजी हुकूमशहा महाथिर महंमद 92 व्या वर्षी पुन्हा पंतप्रधान, महंमद हे आता जगातील सर्वांत वयोवृद्ध राष्ट्रप्रमुख ठरले ● छत्तीसगड - सुरक्षा दलाच्या कारवाईत एका नक्षलवाद्याला कंठस्नान, स्फोटकांसह इतर साहित्य जप्त ● मुंबई - रेल्वेत चढता-उतरताना अपघात झाला तर मिळणार नुकसान भरपाई, सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय ● मुंबई - राज्यात वर्षभरात 13 हजारांवर बालमृत्यू; महिन्याच्या आतील बालके दगावण्याचे प्रमाण 65 टक्के ● एचएमडी ग्लोबल कंपनीने आपल्या नोकिया 6 (2018) या स्मार्टफोनची नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांना केली सादर, हे मॉडेल अमेझॉन इंडियावरून खरेदी करता येणार ● विलियम्सन-धवनच्या भागीदारीने हैदराबादची दिल्लीवर 9 गड्यांनी मात, शिखर धवन ठरला सामनावीर ● मुंबई - अभिनेत्री ऐश्वर्या राय लवकरच इन्स्टाग्रामवर येणार For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🤔 विराट एकाच दिवशी दोन देशांमध्ये खेळणार? LetsUp I Update बीसीसीआयच्या निवड समितीने आगामी अफगाणिस्तान, आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र निवड समितीने संघाची निवड करताना, विराट कोहलीच्या काउंटी क्रिकेटचे वेळापत्रक लक्षात घेतलेले नाही. या घोळामुळे विराट कोहलीला सरे क्रिकेट क्लबकडून काउंटी क्रिकेट खेळायचे की आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाचं नेतृत्व करायचे हा यक्षप्रश्न पडला आहे. याबाबत टीम इंडियाचे मुख्य प्रवक्ता एमएसके प्रसाद यांनी उत्तर दिले की, कृपया याबाबत तुम्ही बीसीसीआयचे सचिव यांच्याशी बोला. त्यामुळे हे नजरचुकीने झाले आहे की, खरंच कोहलीला एकाच दिवशी दोन देशात खेळावे लागणार आहे. याबाबत मात्र अद्याप कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

🏏 'आयपीएल'च्या वेळापत्रकात बदल LetsUp I Sports Update 'आयपीएल'चा अकरावा हंगाम मध्यावर आलेला असताना वेळापत्रकामध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. प्ले-ऑफ व फायनलचा सामना रात्री 8 ऐवजी 7 वाजता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबत माहिती दिली. प्रेक्षकांच्या मागणीमुळेच प्ले-ऑफ आणि अंतिम सामना एक तास लवकर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 22, 23 आणि 25 मे रोजी होणारे प्ले-ऑफचे सामने तसेच 27 मे रोजी मुंबईत होणारा अंतिम सामना आता रात्री 7 वाजता सुरू होणार आहे. For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup

⚡ गूगल न्यूजमध्ये होणार मोठा बदल! LetsUp I Techno Update ▫ 'गूगल न्यूज'ने आपल्या नव्या फिचर्समध्ये केले बदल, गूगलच्या वार्षिक सुधारणा कॉन्फरन्स I/O 2018 च्या दरम्यान याबाबत घोषणा ▫ बदललेले गूगल न्यूज वेब, अॅन्ड्रॉईड आणि आयओएसमध्ये पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल ▫ मोबाईलमध्ये दिसणाऱ्या गूगल न्यूजवर मोबाईलसाठी कस्टमाईज केलेल्या बातम्या असतील. त्यामुळे तुम्ही या बातम्या सहजगत्या उघडू शकाल ▫ आता गूगल न्यूज अपडेट 127 देशांत दिले जाईल For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup