LetsUpp Marathi
الذهاب إلى القناة على Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
إظهار المزيد6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
6 624
🏅 राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा
LetsUp I Updates
65 व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून रवी जाधव दिग्दर्शित 'कच्चा लिंबू' हा सर्वोत्तम मराठी चित्रपट ठरला आहे, तर, 'सैराट'चा दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना 'पावसाचा निबंध' या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले आहे. तर मराठमोळा निर्माता अमित मसुरकर यांचा ‘न्यूटन’ हा हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
मराठी चित्रपट :
* सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - कच्चा लिंबू
* सर्वोत्कृष्ट लघुपट - मय्यत
* सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - नागराज मंजुळे (लघुपट - पावसाचा निबंध)
* विशेष उल्लेखनीय चित्रपट - म्होरक्या
* सर्वोत्कृष्ट बालचित्रपट - म्होरक्या
* सर्वोत्कृष्ट संकलन - मृत्युभोग
* सर्वोत्कृष्ट प्रमोशनल चित्रपट - चंदेरीनामा
बॉलिवूडमधील पुरस्कार :
* सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - न्यूटन
* सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - श्रीदेवी
* सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - बाहुबली 2
* सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - ए. आर. रेहमान (मॉम)
* सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन - गणेश आचार्य (गोरी तू लठ मार)
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡
6 624
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणी भाजपा आमदार कुलदीप सेंगर याला सीबीआयने घेतले ताब्यात
🔅 नवी दिल्ली - राहुल गांधींचा हजारो कार्यकर्त्यांसह इंडिया गेटवर कँडल मार्च; कठुआ-उन्नाव बलात्कार घटनेचा निषेध
🔅 नवी दिल्ली - लढाऊ विमानांची निर्मिती करणारी 'बोइंग' ही कंपनी भारतात लढाऊ विमानांची निर्मिती करणार
🔅 नवी दिल्ली - ‘हाताचा पंजा’ या काँग्रेसच्या चिन्हावर गदा येणार?, 18 एप्रिलला निवडणूक आयोगासमोर सुनावणी
🔅 नवी दिल्ली - देशाचे सामाजिक सौहार्द बिघडले, आपला आदेश मागे घ्या, अॅट्रॉसिटीबाबत केंद्राची कोर्टाला विनंती
🔅 नवी दिल्ली - गृह मंत्रालयातील अधिकारी कार्यालयातच पॉर्न पाहत, माजी गृह सचिवांचा खळबळजनक खुलासा
🔅 मुंबई - प्लास्टिक बंदीविरोधातील याचिकेची सुनावणी पूर्ण, मुंबई हायकोर्ट आज निकाल सुनावणार
🔅 मुंबई - भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले
🔅 हैदराबाद - राजीव गांधी स्टेडियमवर रोमहर्षक सामन्यात हैदराबादने मुंबईवर 1 गडी राखून विजय मिळवला
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🤔 मानवी देह हा निम्म्यापेक्षाही अधिक ‘मानवी’ नाही!
Letsup I Update
आता संशोधकांनी म्हटले आहे की, मानवी देह हा निम्म्यापेक्षाही अधिक ‘मानवी’ नाही. माणसाच्या शरीरातील एकूण पेशींपैकी केवळ 43 टक्के पेशीच मानवी आहेत. अन्य पेशी म्हणजे निव्वळ सुक्ष्म जीवांच्या वसाहती आहेत.
मानवी शरीरातील या सुक्ष्म जीवांचे, जीवाणूंचे अध्ययन अॅलर्जीपासून पार्किन्सनपर्यंतच्या अनेक आजारांच्या संशोधनाचे मूळ आहे. या सुक्ष्म जीवांचा शरीरात इतका भडीमार आहे कि, हा देह खरोखरच माणसाचाच आहे का, याबाबत विचार करावा लागेल, असेही संशोधकांचे म्हणणे आहे. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटमधील मायक्रोबीओम सायन्स विभागाच्या रुथ ले यांनी याबाबतची माहिती दिली.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🏏 चेन्नईतले सामने आता पुण्यात होणार
Letsup I Update
कावेरी पाणी वाटप प्रकरणाचा फटका चेन्नई सुपर किंग्ज संघाला बसला आहे. यामुळे चेन्नई सुपर किंग्सला आपले होमग्राऊंड हलवावे लागले आहे. आता चेन्नईचे नवीन घरचे मैदान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल.
याबद्दल आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, "चेन्नईतील सामने हलवावे लागले आहेत. कारण पोलिसांनी आम्हाला सांगितले की ते अशा गोंधळाच्या परिस्थितीत सुरक्षा पुरवू शकत नाहीत. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचे चेन्नईतील सामने पुण्याला हलवण्यात आले आहेत,"
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
🕌 ताजमहलला वादळाचा तडाखा
Letsup I Update
आग्रा येथे आलेल्या वादळामुळे जगातील आश्चर्य असलेल्या ताजमहलला प्रचंड तडाखा बसला आहे. ताजमहलच्या दोन दगडी मिनार कोसळल्या असून घुमट जमीनदोस्त झाला आहे.
आग्रामध्ये ताशी 130 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे ताजमहलच्या दक्षिण गेट आणि रॉयल गेट्सच्या दगडी मिनार कोसळल्या. तसेच ताजमहलचा पांढऱ्या रंगाचा छोटा घुमटही पडल्याने तुटून गेला आहे. ताजमहलचा मुख्य दरवाजा आणि दरवाजा-ए- रौजावरील 12 फूटाची मिनारही वादळामुळे कोलमडली आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💐 पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद
Letsup I Update
जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटीमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातल्या फकिराबादवाडीचा जवान (किरण थोरात) शहीद झाला आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूंछ जिल्ह्यातल्या कृष्णा घाटीमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार सुरू केला. यावेळी या भागात गस्त घालणाऱ्या भारतीय जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले. यामध्ये थोरात गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना वीरमरण आले.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp News Updates
● नवी दिल्ली - देशातील आर्थिक वृद्धी दर 2018-19 मध्ये 7.3% राहिल, पुढील वर्षी यात वाढ होऊन हा आकडा 7.6% पोहोचेल
● नवी दिल्ली - केंद्रशासित प्रदेशांच्या उपराज्यपालांच्या वेतनात वाढ करण्यास कॅबिनेटची मंजुरी, ही वाढ 1 जानेवारी 2016 च्या वेतनापासून लागू असेल
● नवी दिल्ली - विरोधक सतत संसदेची कोंडी करत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते आज गुरूवारी उपवास करणार
● नवी दिल्ली - आपचा कुमार विश्वास यांना दणका, राजस्थानच्या प्रभारी पदावरून हटवले, दीपक वाजपेयी आपचे राजस्थानमधील नवे प्रभारी
● वॉशिंग्टन - यंदा भारत, पाकिस्तान, हंगेरी, ब्राझील आणि अमेरिकेच्या निवडणुकांत फेसबुकचा दुरुपयोग हाेऊ देणार नाही : मार्क झुकेरबर्ग
● मुंबई - नाणार प्रकल्प होणारच, सौदी अरेबियातील अरामको कंपनीशी सामंजस्य करार, रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला केंद्राचा हिरवा कंदिल
● मुंबई - पर्यावरणाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने घेतलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय योग्यच, सरकारकडून हायकोर्टात निर्णयाचे समर्थन
● मुंबई - शीना बोरा हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या इंद्राणी मुखर्जीला जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज
● इन्स्टाग्राम अॅपवर लवकरच स्नॅपचॅट या लोकप्रिय अॅपच्या स्नॅपकोड या फिचरची नक्कल करण्यात येणार असल्याची माहिती समोर
● जयपूर - राजस्थान रॉयल्स संघाने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर 10 धावांनी मात करत विजयाचा केला श्रीगणेशा
● मुंबई - बॉलिवुड अभिनेता रणवीर सिंगला 'दादासाहेब फाळके एक्सलन्स अवॉर्ड'ने गौरवण्यात येणार
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
💥 मोहम्मद शमीच्या पत्नीने मागितली दरमहा 10 लाखांची पोटगी!
Letsup I Update
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर विविध आरोप करणाऱ्या पत्नी हसीन जहाँने अलीपूरमधील न्यायालयात दावा दाखल करून दरमहा 10 लाख रुपये एवढी पोटगी मिळण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, शमीविरोधात दाखल करण्यात आलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या खटल्यात अलीपूरच्या तिसऱ्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी शमी आणि अन्य आरोपींना समन्स मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📣 जिओची जबरदस्त ऑफर…!
Letsup I Update
आता पुन्हा एकदा जिओने आपल्या ग्राहकांसाठी एकाहून एक चांगल्या ऑफर्स आणल्या आहे. यानुसार ग्राहकांना 248 रुपयांच्या रिचार्जवर 10 जीबी डेटाचे 10 व्हाऊचर तसेच 2500 रुपयांचे गिफ्ट देणार असल्याचे जिओने जाहीर केले आहे.
माय जिओ अॅपमध्ये 10 जीबीचे 10 व्हाऊचर मिळणार आहेत. म्हणजेच अॅपच्या माध्यमातून ग्राहकांना 100 जीबी डेटा मिळेल. हे व्हाऊचर ग्राहकांना एक वर्षांच्या आत रिडिम करता येतील. ही ऑफर 10 एप्रिलपासून सुरु झाली असून नव्याने जिओचे ग्राहक होणाऱ्यांनाच ही ऑफर मिळू शकेल.
आणखी एक आकर्षक ऑफर म्हणजे 248 रुपयांत 2500 रुपयांची भेटवस्तू मिळणार आहे. यामध्ये ग्राहकांना कमीत-कमी 149 रुपयांचा पहिला रिचार्ज करणे आणि 99 रुपयांत जिओची प्राईम मेंबरशीप घेणे आवश्यक आहे. त्यावर 999 रुपयांपर्यंतचे मोफत जिओ फाय डिव्हाईस आणि 1500 रुपयांच्या किंमतीचा 100 जीबी अतिरिक्त 4 जी डेटा मिळेल.
ही ऑफर गूगल होम किंवा क्रोमकास्ट डिव्हाईस (फक्त भारतीय) च्या खरेदीवर उपलब्ध असेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना रिलायन्स डिजिटल, रिलायन्स डीएक्स मिनी, जिओ स्टोअर डिव्हाईस खरेदी करता येईल. जिओ प्रीपेड ग्राहकही या ऑफरचा फायदा घेऊ शकतात.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💥 फेअरनेस क्रीम्ससाठी लागणार प्रिस्क्रिप्शन!
LetsUp I Updates
चेहरा गोरा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेअरनेस क्रीम्स आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय विकत घेता येणार नसल्याचे राज्य सरकारने फर्मान काढले आहे. जर फेअरनेस क्रीम तयार करणाऱ्या कंपन्यांनी या नियमांचे उल्लंघन केले तर कंपनीला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
डेसोनाईड, बेक्लोमेथासोनसह अन्य 14 घटकांचा समावेश असेलेली क्रीम्स डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय चेहऱ्याला लावणे धोकादायक आहे. त्यामुळे राज्य सरकारने स्टेरॉईड आणि अँटीबायोटीकचा समावेश असेलेल्या फेअरनेस क्रीमच्या सरसरकट विक्रीवर बंदी घातली आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
⚡
6 624
⚡ झुकेरबर्गचा पुन्हा माफीनामा; पंतप्रधान मोदींना डेटाची चिंता
LetsUp I Updates
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग याने चोरी झालेल्या 8.7 कोटी वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही पुरेशी पावले उचलली नाहीत, अशी कबुली अमेरिकी काँग्रेससमोर दिली. झुकेरबर्गने सुनावणीआधीच जाहीर केलेल्या निवेदनात माफी मागितली होती.
भारतातील निवडणुकांवर प्रभाव नाही
भारतात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये फेसबुककडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही, अशी ग्वाही झुकरबर्गने दिली. "भारतातील निवडणुकांमध्ये फेसबुकचा प्रभाव नसेल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत", असं झुकरबर्ग म्हणाला.
डेटा लीक प्रकरणानंतर मोदींनी चिंता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेटा लीक तसेच युजर्सची परवानगी न घेता त्यांचा डेटा वापरल्याप्रकरणी चिंता व्यक्त केल्याचे कळत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेटा शेअरिंग नियमन केले जावे तसेच सर्व्हर देशांतर्गंत असावेत असा आदेश दिला आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
💥
6 624
💥 धक्कादायक; कर्जमाफीच्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे नाही?
LetsUp I Updates
राज्य सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या लाभार्थींची जिल्हानिहाय यादीच राज्य शासनाकडे उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने दिलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.
आतापर्यंत राज्यातील एकूण 46 लाख 52 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 14 हजार 388 कोटींची रक्कम जमा केल्याची माहिती शासनाकडून प्राप्त झाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाकडे राज्यातील शेतकऱ्यांचे माफ केलेल्या कर्जाची माहिती मागितली होती.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - 2 एप्रिलला भारत बंदमुळे घेण्यात न आलेली सीबीएसईची परीक्षा आता 27 एप्रिलला घेण्यात येणार
🔅 नवी दिल्ली - सत्ता आल्यावर भाजपला अच्छे दिन, उत्पन्नात 80 टक्क्यांनी वाढ, तर काँग्रेसच्या उत्पन्नात घट
🔅 नवी दिल्ली - चालू आर्थिक वर्षात खासगी क्षेत्रातील नोकरदारांना सरासरी 9.6 टक्के पगारवाढ मिळण्याचे संकेत
🔅 नवी दिल्ली - संसदेतील गदारोळाविरोधात पंतप्रधान मोदीसह भाजप खासदार एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार
🔅 नवी दिल्ली - मी राजीनामा देणार नाही, डेटा लीकप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गचे स्पष्टीकरण
🔅 मुंबई - शेतकरी कर्जवाटपाची जिल्हानिहाय माहिती आमच्याकडे नाही, सरकारच्या पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह
🔅 यवतमाळ - सुसाइड नोटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत शंकर चायरे या शेतकऱ्याची आत्महत्या
🔅 मुंबई - दहावीच्या पाठ्यपुस्तकाला राजकारणाची वाळवी, राज्यशास्त्राच्या पुस्तकात सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे गोडवे
🔅 मुंबई - राज्य मंत्रिमंडळाचा एप्रिलअखेर विस्तार होण्याचे संकेत, चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार
🔅 मुंबई - अभिनेत्री तमन्ना भाटीया 'अ.ब.क' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती
🔅 मुंबई - चेन्नई आणि कोलकातामध्ये रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात चेन्नईने कोलकातावर 5 गडी राखून विजय मिळवला
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
🎬 वतन के आगे कुछ नहीं..खुद भी नहीं; 'राझी'चा ट्रेलर रिलीज
Letsup I Update
दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या 'राझी' या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात आलिया भट्टने गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. आलियाचा अफलातून अभिनय ट्रेलरमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतो.
गुप्तहेराच्या (स्पाय) आयुष्यावर आधारित हा सिनेमा असल्याचे ट्रेलर पाहून लक्षात येते. जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. पुढील महिन्यात 11 मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
ट्रेलर पाहण्यासाठी क्लिक करा https://goo.gl/eViJRS
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💥 एअरटेलची आकर्षक ऑफर; दररोज 2 GB डेटा मिळणार
LetsUp I Updates
आयपीएलच्या निम्मिताने टेलिकॉम कंपन्यांमध्ये सध्या 'प्राईस वॉर' चालू आहे. यामध्ये एअरटेलनेही उडी घेतली असून एक नवा पॅक आपल्या ग्राहकांसाठी आणला आहे. या नवीन पॅकनुसार 499 रुपयांच्या रिचार्जमध्ये रोज 2GB इंटरनेट डेटा वापरायला मिळणार आहे. हा रिचार्ज पॅक 82 दिवसांसाठी असेल.
एअरटेलच्या ग्राहकांनी 499 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर त्यांना लोकल आणि एसटीडी कॉल, मोफत रोमिंग, दररोज 100 एसएमएस, दररोज 2GB इंटरनेट डेटा मिळेल. म्हणजेच संपूर्ण प्लॅनचा विचार करता 82 दिवसात तुम्हाला 164GB डेटा (4G/3G) मिळणार आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
📣 खंडणीच्या बदल्यात मागितली गर्लफ्रेंड; हैदराबादमधील 'सैराट' प्रकरण
LetsUp I Updates
एका अपहरणकर्त्याने अपहृत मुलाच्या कुटुंबाकडून चक्क आपल्या प्रेयसीची मागणी केली. हा अजब प्रकार हैदराबादमध्ये घडला आहे. मात्र पोलिसांनी अपहरणकर्त्याचा हा कट हाणून पाडला.
काय आहे प्रकार?
तेलंगणाच्या वानपर्ती जिल्ह्याच्या कोथाकोटा येथील भारतीय विद्या मंदिर स्कूलमधून एका आठ वर्षीय मुलाचे अपहरण झाले होते. 23 वर्षीय वामसी कृष्ण हा यामागील सूत्रधार होता.
आरोपीचे मुलाच्या आत्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत तिच्या कुटुंबीयांना समजले, त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी वामसी कृष्णला मारहाण केली होती. तसेच इथे कधीही दिसायचे नाही, अशी धमकीही दिली होती.
अपमान झाल्यामुळे व आपल्या प्रेयसीला मिळवण्यासाठी वामसी कृष्णने मुलाचे अपहरण केले व मुलाच्या मोबदल्यात प्रेयसीची मागणी केली.
वामसीच्या फोन कॉलनंतर मुलाच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. यानंतर तेलंगणा पोलिसांनी 24 तासातच पुणे रेल्वे स्टेशनवर मुलाची सुखरुप सुटका केली व वामसी कृष्णला ताब्यात घेतले.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
💥 खंडाळा घाटात भीषण अपघात; 18 जण ठार
ब्रेकिंग
साताऱ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोला पुणे-बंगळुरु महामार्गावर खंडाळा घाटात भीषण अपघात झाला. यामध्ये तब्बल 18 मजुरांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत. चुकीच्या पद्धतीने वळण असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे कळते. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
29 चिमुकल्यांवर काळाचा घाला
हिमाचल प्रदेशातील कांगाडा जिल्ह्यात गुरुचाल गावानजीक सोमवारी सायंकाळी शालेय बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 29 चिमुकल्यांसह 32 जणांचा मृत्यू झाला. चालकाचा ताबा सुटल्याने बस 200 फूट दरीत कोसळली. बसमध्ये एकूण 40 ते 45 जण होते. यापैकी 13 जण गंभीर जखमी आहेत.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
6 624
LetsUp I News Updates
🔅 नवी दिल्ली - एक दिवसाचे उपोषण करणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी उपोषणापूर्वी मारला छोले-भटुऱ्यांवर ताव, फोटो व्हायरल
🔅 नवी दिल्ली - आज पुन्हा एकदा भारत बंदची हाक, गृहमंत्रालयाकडून राज्यांना सतर्क राहण्याचा आदेश
🔅 नवी दिल्ली - चीनने भारताला लागून असणाऱ्या सीमेवर टेहळणी क्षमता वाढवली, अत्याधुनिक गस्ती नौका तैनात
🔅 हिमाचल प्रदेश - कांगडा जिल्ह्यात नुरपूर परिसरात स्कूल बस 100 मीटर खोल दरीत कोसळली, 29 विद्यार्थी ठार
🔅 छत्तीसगड - पंतप्रधान मोदींच्या छत्तीसगड दौऱ्यापूर्वीच जवानांच्या बसवर नक्षलवाद्यांचा हल्ला, दोघे जण शहीद
🔅 मध्य प्रदेश - पाच संतांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिल्याबद्दल मध्य प्रदेश सरकारला हायकोर्टाची कारणे द्या नोटीस
🔅 मोरोक्को - ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ प्रेषित मोहंमद पैगंबरांची थेट वंशज, एका इतिहासकारांचा दावा
🔅 मुंबई - रायगडाच्या संवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र, पंतप्रधान कार्यालयात महत्वपूर्ण बैठक पार
🔅 मुंबई - मलाही कॉम्प्रमाईजच्या ऑफर आल्या होत्या, ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांचा धक्कादायक खुलासा
🔅 मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट, पाचव्या दिवशी भारताची पदक संख्या 19 वर गेली
🔅 मुंबई - हैदराबादचा राजस्थानवर 9 गडी राखून दणदणीत विजय; केदार जाधव आयपीएलमधून बाहेर, चेन्नईला झटका
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
6 624
⚡ RBI ची नजर घोटाळेबाज सीएंवर!
Letsup I Update
लिस्टेड कंपन्यांचे व्यवहार आणि बँकांच्या कर्जात हेराफेरी करणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरींवर आरबीआयची करडी नजर असणार आहे. पीएनबी महाघोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेने हे धोरण अवलंबले आहे.
एका वृत्तानुसार, विविध प्रकरणांमध्ये हेराफेरी करणाऱ्या जवळपास 36 सीएंवर आरबीआयचा संशय आहे. या सीएंवर प्रमोटर्ससोबत हातमिळवणी करून बँकांच्या कर्जातील रकमेत फसवणूक तसेच हेराफेरी केल्याचा आरोप आहे. या अंतर्गत पंजाब नॅशनल बँकेच्या ऑडिटर्सनाही केंद्रीय दक्षता आयोगाने चौकशीसाठी बोलावले आहे. त्या सगळ्यांकडे या व्यवहारांविषयीचे खुलासे मागण्यात येणार आहेत. फक्त पीएनबीच नाही, तर अन्य अनेक कंपन्यांच्या सीएंवर आरबीआयची नजर राहणार आहे.
For Breaking News on Telegram Join LetsUp Channel, To Join Click : t.me/letsup
👆
