ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

الذهاب إلى القناة على Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

إظهار المزيد
6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
🧐 उद्याच्या मतमोजणी निकालाचे कल कधी कळतील? LetsUp | Politics 📍 विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुकीचा निकाल उद्या (दि. 24) लागणार आहे. 😇 यंदा महाराष्ट्रात पुन्हा महायुती सत्तेत येणार का आघाडी? हे पाहणे उद्या औत्सुक्याचे ठरणार आहे. ❓ कल कधी कळतील? : ● विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला उद्या सकाळी 8 वाजता सुरुवात होणार आहे. ● मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांत पहिला कल हाती येईल. ● त्यानंतर कोणत्या जागेवर कोणत्या पक्षाचा उमेदवार आघाडीवर आणि कोणता उमेदवार पिछाडीवर आहे, हे कळेल. ● मतमोजणी सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर दुपारी 1 च्या आसपास मतदारसंघाचा निकाल येण्याची शक्यता आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🎯 वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये होणार बदल LetsUp | National ⚡ वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी सरकार नव्या नियमांनुसार आता गाड्यांच्या नंबर प्लेटवर रेट्रो टेप म्हणजेच चमकदार पट्टी लावणे बंधनकारक करणार आहे. 💁‍♂ जर कोणत्याही गाडीच्या नंबर प्लेटवर रेट्रो टेप लावली नाही तर वाहन चालकांकडून दंड आकारला जाणार आहे. 📍 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय याच आठवड्यात याबाबत पत्रक काढण्याची शक्यता आहे. वाहन चालकांची सुरक्षा लक्षात घेऊनच हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🏏 गांंगुलीने स्वीकारला पदभार LetsUp | Sports 📍 भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आज (दि. 23)बुधवारी BCCI चे अध्यक्षपद स्वीकारले. 📣 प्रशासकीय समितीचा कार्यकाळ आजच संपल्यामुळे सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली. ✔ त्यामुळे निवडून आलेले प्रतिनिधी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा कारभार सांभाळणार आहे. 🇮🇳 बीसीसीआयची नवी टीम : ● सौरव गांगुली बीसीसीआयचा 39वा अध्यक्ष ठरला आहे. ● केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह बीसीसीआयचे सचिव म्हणून काम पाहणार आहे. ● उत्तराखंडचे महिम वर्मा नवे उपाध्यक्ष, केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे धाकटे बंधू अरुण धूमल खजिनदार आणि केरळचे जयेश जॉर्ज यांनी संयुक्त सचिव म्हणून पदभार स्वीकारला. 💫 गांगुलीला अवघ्या 10 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार असला तरी त्याला प्रशासकीय कामकाजाचा उत्तम अनुभव असल्यामुळे तो क्रिकेटची विस्कटलेली घडी पुन्हा बसवतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💥 जैशच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान LetsUp | National ⚡ जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीमध्ये सुरक्षा दलांला मिळाले मोठे यश 👉 या कारवाईमध्ये एकूण 3 दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते 🧐 त्यात 'अल कायदा'चा म्होरक्या गजवत- उल- हिंदचा म्होरक्या हमीद ललहारीचा खात्मा 💫 काही महिन्यांपूर्वीच जाकिर मूसाचा खात्मा झाल्यानंतर कमांडर म्हणून ललहारीला नेमण्यात आले होते न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

👌 पीएमसी बँक खातेदारांना मोठा दिलासा LetsUp | National 📍 अखेर भारतीय रिझर्व्ह बँकेने आज (दि. 23) पीएमसी खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. 💁‍♂ RBIने पीएमसी बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेत केली वाढ, आता आणखी 50 हजार रुपये काढण्यात येणार 👍 वैद्यकीय, शिक्षण यासारख्या अत्यावश्यक गरजेसाठी खातेदार त्यांच्या खात्यातून 50 हजार रुपये काढू शकणार 🏦 यासाठी बँकेमध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रे दिल्यास हे पैसे मिळू शकणार आहेत न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🚀 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी LetsUp | National 📍 भारतीय वायुसेनेने ऑपरेशनल ट्रेनिंगमध्ये 2 ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केली. 👍 माहितीनुसार, 300 किमी दूरवर असलेल्या लक्ष्यवर क्षेपणास्त्राने यशस्वीपूर्व निशाणा साधला. ✔ विशेष म्हणजे यावेळी वायुसेनेने जमिनीवरून येणाऱ्या क्षेपणास्त्राचे परिक्षण केले. 👉 याबाबत भारतीय हवाईदलाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून माहिती देण्यात आली आहे. 🎯 'ब्रह्मोस' ची खासियत : ● हे आवाजापेक्षा अधिक वेगाने मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. ● हे भारताने रशियासोबत मिळून तयार केलेले क्षेपणास्त्र आहे. ● हे भारतीय वायुसेना, नौसेना आणि लष्कर सेना यांच्यात वापरले जाणार क्षेपणास्त्र आहे. ● हे क्षेपणास्त्र युद्धभूमीवर निर्णायक भूमिका बजावण्याची क्षमता ठेवते. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🧐 जाणून घ्या गुन्हेगारीत महाराष्ट्र कितवा? LetsUp I Update ⚡ देशात महिलांवरील अत्याचारामध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद उत्तर प्रदेशात, महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा 📣 नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) अहवाल केला जाहीर 📝 यामध्ये 2015, 2016 आणि 2017 या तीन वर्षातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची माहिती देण्यात आली ● देश : 2015 मध्ये 2949400 गुन्ह्यांची नोंद I 2016 मध्ये 2975711 I 2017 ला 3062579 गुन्हे ● उत्तरप्रदेश : 2015 मध्ये 241920 गुन्ह्यांची नोंद I 2016 मध्ये 282171 गुन्हे I 2017 ला 310084 गुन्हे ● महाराष्ट्र : 2015 मध्ये 275414 गुन्ह्यांची नोंद I 2016 मध्ये 261714 I 2017 ला 288879 गुन्हे ● मध्यप्रदेश : 2015 मध्ये 268714 गुन्हे I 2016 मध्ये 264412 I 2017 ला 269512 गुन्हे ● केरळ : 2017 मध्ये 235846 गुन्हे I सर्वाधिक गुन्ह्यांच्या यादीत चौथा क्रमांक ● दिल्ली : 232066 गुन्ह्यांची नोंद I सर्वाधिक गुन्हेगारीत पाचवा क्रमांक ● बिहार : 2017 मध्ये 180573 गुन्ह्यांची नोंद I सर्वाधिक गुन्ह्यांच्या यादीत सहावा क्रमांक ● हुंडाबळीचे गुन्हे : उत्तरप्रदेश - 2524 I बिहार 1081 I मध्यप्रदेश - 632 I पश्चिम बंगाल - 499 I राजस्थान - 457 ● आत्महत्येस प्रवृत्त करणे : महाराष्ट्र - 951 I मध्यप्रदेश 707 I आंध्रप्रदेश - 597 I तेलंगणा - 509 I पश्चिम बंगाल - 443 ● महिलांचे अपहरण : उत्तरप्रदेश - 14993 I महाराष्ट्र - 6248 I बिहार - 6182 I आसाम - 5554 I मध्यप्रदेश - 5200 ● जबरदस्तीने लग्नासाठी अपहरण : उत्तरप्रदेश - 12382 I बिहार - 4777 I आसाम - 3138 I मध्यप्रदेश - 1203 I पंजाब - 795 I गुजरात - 701 ● महिलांची तस्करी : महाराष्ट्र -127 I आसाम - 107 I तेलंगणा - 77 I मध्यप्रदेश - 42 ● बलात्कार : मध्यप्रदेश - 5562 I उत्तरप्रदेश - 4246 I राजस्थान - 3305 I ओडिशा - 2070 I केरळ - 2003 ● बालिकांवरील अत्याचार : महाराष्ट्र - 2385 I उत्तरप्रदेश - 1580 I कर्नाटक - 1305 I गुजरात - 1233 I पश्चिम बंगाल - 1188 ● महिला अत्याचार : 2016मध्ये 338954 गुन्हे I 2017मध्ये यात 359849पर्यंत वाढ उत्तर प्रदेश पहिल्या, तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पश्चिम बंगाल तिसऱ्या क्रमांकावर असून महिलांसाठी सर्वांत सुरक्षित राज्य लक्षद्वीप आहे न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Update ● भारतीय हवाईदलाकडून आकाशातून आकाशात मारा करणाऱ्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ● काश्‍मीरातील विद्यार्थ्यांचा परीक्षा देण्यास विरोध; अभ्यासक्रम पूर्ण व्हायच्या आतच वार्षिक परीक्षांचा कार्यक्रम जाहीर ● बँकांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाविरोधात अधिकारी व कर्मचारी संघटनांचा देशात संमिश्र प्रतिसाद ● ‘इन्फोसिस’विरुद्ध विदेशी भागीदारांचा नुकसान भरपाईचा दावा; भागीदारांनी कायदेशीर लढण्याचा केला निर्धार ● कमलेश तिवारी हत्याकांड : दोन आरोपींना गुजरात-राजस्थान सीमेवरून गुजरात एटीएसने केली अटक ● विधानसभेच्या 288 जागांसाठी महाराष्ट्रात 61.13 टक्के मतदान, गत वेळेपेक्षा यंदा 2.25 टक्क्यांनी झाली घट ● पीएमसी बँकेतील खातेदारांचे पैसे सुरक्षित असून केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरचे त्यावर लक्ष : आरबीआय ● आज (दि. 23) माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली बीसीसीआयचे 39 वे अध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारणार ● जगज्जेतेपदानंतर सुमार कामगिरी करणाऱ्या पी. व्ही. सिंधूची फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी ● आलिया भट्ट-रणबीर कपूरची लग्नपत्रिका झाली व्हायरल, जोधपूरमधील उम्मेद भवन पॅलेसमध्ये होणार लग्न न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💥 ब्रेकिंग! भारताचा आफ्रिकेला व्हाईटवॉश! LetsUp I Sports ⚡ तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा एक डाव व 202 धावांनी मोठा पराभव 💪 या विजयासह भारतीय संघाने तब्बल 84 वर्षांपूर्वीचा एक विक्रम काढला मोडीत 📍 सामन्यातील घडामोडी : ● भारताने प्रथम फलंदाजी करताना 497 धावा केल्या. ● याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर आटोपला. ● फॉलो-ऑन नंतरचा दुसरा डाव देखील अवघा 133 धावांवर आटोपला. ● त्यामुळे एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवत भारताने मालिका 3-0 ने जिंकली ● मोहम्मद शमी व उमेश यादवचे सामन्यात 5 - 5 बळी 🇮🇳 घरच्या मैदानावर टीम इंडियाची मागील 11 टेस्ट सिरीजमधील जबरदस्त कामगिरी..! 4-0 Vs ऑस्ट्रेलिया. 2-0 Vs वेस्ट इंडिज. 3-0 Vs दक्षिण आफ्रिका. 3-0 Vs न्यूझीलंड. 4-0 Vs इंग्लंड. 1-0 Vs बांगलादेश. 2-1 Vs ऑस्ट्रेलिया. 1-0 Vs श्रीलंका. 1-0 Vs अफगाणिस्तान. 2-0 Vs वेस्ट इंडिज. 3-0 Vs दक्षिण आफ्रिका. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

मतटक्का घसरला; आता निकालाचे वेध LetsUp I Update 📍 राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांमध्ये सरासरी 60.46 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज 👉 यंदा शहरी भागात कमी आणि ग्रामीण भागात जास्त मतदान झाल्याचे आले दिसून 💁‍♂ 2014 विधानसभा निवडणुकीत 63.13 टक्के मतदान झाले होते. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचे चित्र 💫 मतदान प्रक्रिया पार पडल्याने आता सर्वांनाच निकालाचे वेध, गुरुवारी (दि. 24) कोणता पक्ष वरचढ ठरतो याची सगळ्यांना प्रतिक्षा न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Update ● केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय होणार 60 वर्षे, भविष्य निर्वाह निधी संघटनेशी संबंधित नियमांत होणार बदल ● सियाचीन पर्यटकांसाठी खुले, राजनाथ सिंह यांनी लडाखमध्ये एका पुलाच्या लोकार्पणावेळी केली घोषणा ● अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांना आपल्या पाच मोठ्या विक्रेत्यांची माहिती उघड करण्याचे केंद्र सरकारचे आदेश ● हरियाणातील 90 विधानसभा मतदारसंघात सरासरी 65.66 टक्के मतदानाची झाली नोंद ● महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांत सरासरी 60.46 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज ● महाराष्ट्र विधानसभा : महायुतीला सरासरी 214 जागा मिळणार, प्रमुख वृत्तवाहिन्यांच्या पोलचा अंदाज ● विवोने व्ही 15 प्रो या मॉडेलच्या (8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोअरेज) मूल्यात तीन हजार रूपयांची केली कपात ● पाकिस्तानचे माजी लेग स्पिनर अब्दुल कादिर (63) यांचे लाहोरमध्ये हृदयगती बंद पडल्याने झाले निधन ● नोव्हेंबरमधील भारतीय संघाच्या दौऱ्यापूर्वी बांगलादेशचे क्रिकेटपटू वेतनवाढीसाठी गेले संपावर ● 'तानाजी'चं फर्स्ट पोस्टर नुकतंच रिलीज, अजय देवगण आणि सैफ अली खान यांचा फर्स्ट लुक आला समोर न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🔎 गुन्हेगारांना शोधणे सोपे होणार LetsUp | National 📍 केंद्र सरकार 'चेहरा ओळख प्रणाली' (फेशियल रिकग्नायझेशन सिस्टीम) विकसित करणार ✔ ही जगातील सर्वात मोठी यंत्रणा असून याद्वारे अट्टल गुन्हेगाराची ओळख पटवणे सहज शक्य होणार 💁‍♂ याच्या सहाय्याने CCTV कॅमेऱ्याच्या नेटवर्कवरून मिळणारे आरोपीचे फोटो क्रिमिनल रेकॉर्डस्शी लिंक केले जाणार 📝 नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्युरोने या तंत्रज्ञानासंदर्भातील माहिती केली जाहीर 💫 हे तंत्रज्ञान काळ्या यादीत असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी फायदेशीर ठरणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

📣 आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर LetsUp | Sports ⚡ आशियाई क्रिकेट असोसिएशनने आशियाई चषक वन डे स्पर्धेसाठीचे वेळापत्रक केले जाहीर 👉 ही स्पर्धा महिला संघांसाठीची असून 'Women's Emerging Asia Cup' असे या स्पर्धेचे नाव आहे 🗓 22 ते 27 ऑक्टोबर 2019 या कालावधीत ही स्पर्धा श्रीलंकेत खेळवण्यात येणार 🎯 यात भारत व पाकिस्तान यांच्यासह श्रीलंका व बांगलादेश या संघांचाही समावेश आहे ✔ या स्पर्धेत प्रत्येक संघ एकमेकांशी भिडेल आणि अव्वल दोन संघांमध्ये जेतेपदाचा सामना होणार 📍 असे असेल वेळापत्रक : ● 22 ऑक्टोबर : भारत विरुद्ध बांगलादेश ● 22 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका ● 23 ऑक्टोबर : भारत विरुद्ध श्रीलंका ● 23 ऑक्टोबर : पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश ● 24 ऑक्टोबर : भारत विरुद्ध पाकिस्तान ● 24 ऑक्टोबर : श्रीलंका विरुद्ध बांगलादेश ● 27 ऑक्टोबर : अंतिम सामना 🇮🇳 भारतीय संघ : देविका वैद्य (कर्णधार), एस मेघना, यस्तिका भाटीया, तेजल हसब्नीस, तनुश्री सरकार, सिमरन दिल बहादूर, नुझात परवीन, आर कल्पना, मनाली दक्षिणी, क्षमा सिंग, अंजली सारवानी, मिनू मणी, सुश्री दिब्यादर्शीनी, टीपी कनवार, राशी कनोजिया. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🧐 मतदान सुरु; पावसाचे सावट कायम LetsUp I Update ⚡ महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज (दि. 21) सकाळीच उत्साहात मतदान झाले सुरु 🌧 मात्र मतदानावर ठिकठिकाणी पावसाचे सावट असल्याचे चित्र कायम आहे 💁‍♂ कोल्हापूर, सातारा सांगली, पुण्यासह कोकण आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये सुरु असलेल्या पाऊसामुळे मतदानाच्या पूर्वतयारीला बसला फटका 💫 पावसाच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या टक्का वाढवण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Update ● देशभरात करण्यात आलेल्या कारवाईत 3 कोटी 11 लाख रुपयांचे सोने जप्त, एकूण 7 जणांना अटक ● रेल्वे 'तेजस' विलंबाने धावल्यामुळे या रेल्वेतील प्रवाशांना प्रत्येकी 250 रुपये भरपाई दिली जाणार ● पीओकेत लष्कराच्या हल्ल्यात पाकिस्तानचे 5 सैनिक ठार, तसेच 10 हून अधिक दहशतवादी ठार ● पाकिस्तानच्या बहुचर्चित कर्तारपूर मार्गिकेचे उद्घाटन येत्या 9 नोव्हेंबरला होणार : पंतप्रधान इम्रान खान ● फिलिपिन्स दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे केले उद्घाटन ● कमलेश तिवारी हत्या प्रकरण : 3 आरोपींना अहमदाबादेतील न्यायालयाने दिला 72 तासांचा ट्रान्झिट रिमांड ● महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी होणाऱ्या मतदानाकरिता निवडणूक आयोग झाला सज्ज ● हरियाणात विधानसभेच्या 90 जागांसाठी आज (दि. 21) सोमवारी मतदान; 19,578 मतदान केंद्रे तयार ● वनप्लस कंपनीने वनप्लस 7 टी प्रो मॅकलॉरेन एडिशन स्मार्टफोन लाँच, तब्बल 12 जीबी रॅम प्रदान ● बॉक्स ऑफिसवरच्या युद्धात 'वॉर'ने मारली बाजी, आत्तापर्यंत 291.05 कोटींचे कलेक्शन जमवले न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🤔 इस्त्री तापली की, चुरगळलेले कपडे पुर्ववत कसे होतात? LetsUp | Special एका चुटकीसरशी छान कडक इस्त्री केली की, आपले चुरघळलेले कपडे पुर्ववत होतात. मात्र तुम्ही न तापवता जर चुरघळलेल्या कपडयांवर इस्त्री करण्याचा प्रयत्न केलात, तर मात्र तुमच्या कपडयावरच्या चुण्या तशाच राहतील. पण असा प्रश्‍न पडतो ना, की इस्त्री गरम करून कपडयावरच्या चुन्या कशा नाहीशा होत असतील? त्याचं उत्तर आहे. कपडयाचे धागे रसायनांनी एकमेकांशी बांधलेले असतात. कपडयाची जेव्हा घडी होते किंवा आपण कसेतरी चुरघळून ते टाकून देतो तेव्हा कपडयातील धागे एकमेकांभोवती गुंडाळले जातात आणि कपडयावर चुण्या पडतात. जेव्हा गरम इस्त्री चुरघळलेल्या कपडयावर फिरवली जाते तेव्हा गुंतलेले धागे उष्णतेने क्षीण होतात आणि इस्त्रीचे वजन त्यांना सपाट आकारात यायला मदत करतात. आणि आपल्याला कडक इस्त्रीचे कपडे मिळतात. न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🧐 एबीपी माझा-सी वोटर सर्व्हेचा अंदाज LetsUp | Politics एबीपी माझा आणि सी वोटर यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलनुसार यंदा पुन्हा भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहे. ● महायुती 194 जागा (भाजप 134 + शिवसेना 60) ● महाआघाडीला 86 जागा (काँग्रेस 44 + राष्ट्रवादी 42) ● इतर : 8 जागा 🤔 विभागानुसार कोणाला किती जागा? : 📍 मुंबई (एकूण जागा 36) महायुती : 32 I महाआघाडी : 04 I इतर : 00 📍 ठाणे-कोकण (एकूण जागा 39) महायुती : 34 I महाआघाडी : 04 I इतर : 01 📍 मराठवाडा (एकूण जागा 46) महायुती : 24 I महाआघाडी : 20 I इतर : 02 📍 उत्तर महाराष्ट्र (एकूण जागा 35) महायुती : 21 I महाआघाडी : 13 I इतर : 01 📍 विदर्भ (एकूण जागा 62) महायुती : 40 I महाआघाडी : 19 I इतर : 03 📍 पश्चिम महाराष्ट्र (एकूण जागा 70) महायुती : 43 I महाआघाडी : 26 I इतर : 01 न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

💁‍♂ रिलायन्सने रचला इतिहास LetsUp | Update 🎯 उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने उद्योग क्षेत्रात रचला नवा इतिहास 💰 कंपनीचे बाजार भांडवल तब्बल 9 लाख कोटींवर पोहचले आहे 🔝 असा पल्ला गाठणारी रिलायन्स इंडस्ट्रीज ही भारतातील पहिली कंपनी ठरली 👉 रिलायन्सला जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत तब्बल 11262 कोटी रुपयांचा विक्रमी नफा झाला तर जिओला 990 कोटींचा झाला फायदा ✔ टॉप 5 कंपन्या (बाजार भांडवल कोटींमध्ये) 1. रिलायन्स इंडस्ट्रीज : 9,01,490.09 2. टीसीएस : 7,71,996.87 3. एचडीएफसी बँक : 6,72,466.30 4. हिंदुस्थान युनिलिव्हर : 4,55,952.72 5. एचडीएफसी : 3,61,801.97 न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Update ● पीएमसी बँकेच्या खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे आदेश ● रेल्वेने 26 स्थानकांवर 100-100 फुटांच्या खांबावर तिरंगा ध्वज फडकवण्याचा घेतला निर्णय ● अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतात एका मशिदीत बॉम्बस्फोट, 62 जणांचा मृत्यू तर अन्य 60 जण जखमी ● चीनच्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी विकास दर अंदाजापेक्षाही कमी होऊन 6% झाला, दर 30 वर्षांत सर्वात कमी ● एबीपी माझा सी वोटरचा ओपिनियन पोल; भाजप-सेना महायुती 194, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 86 तर इतर 8 ● भर पावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची बॅटिंग, उदनयराजेंच्या होम ग्राउंडवरील सभेची जोरदार चर्चा ● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी, मंत्रालयात आले पत्र, मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ● आता मोटोरोलाचाही फोल्डेबल फोन होतोय लाँच, हा फोन कंपनी Razr 2019 या नावाने लाँच करू शकते ● भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना आजपासून, भारत विजयी हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज ● अमिताभ बच्चन यांची प्रकृती उत्तम; ते पुढच्या आठवड्यात 'KBC 11' च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

🗞 LetsUp News Update ● पीएमसी बँकेच्या खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा नाहीच, मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्याचे आदेश ● रेल्वेने 26 स्थानकांवर 100-100 फुटांच्या खांबावर तिरंगा ध्वज फडकवण्याचा घेतला निर्णय ● अफगाणिस्तानातील नांगरहार प्रांतात एका मशिदीत बॉम्बस्फोट, 62 जणांचा मृत्यू तर अन्य 60 जण जखमी ● चीनच्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी विकास दर अंदाजापेक्षाही कमी होऊन 6% झाला, दर 30 वर्षांत सर्वात कमी ● एबीपी माझा सी वोटरचा ओपिनियन पोल; भाजप-सेना महायुती 194, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी 86 तर इतर 8 ● भर पावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची बॅटिंग, उदनयराजेंच्या होम ग्राउंडवरील सभेची जोरदार चर्चा ● मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी, मंत्रालयात आले पत्र, मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ● आता मोटोरोलाचाही फोल्डेबल फोन होतोय लाँच, हा फोन कंपनी Razr 2019 या नावाने लाँच करू शकते ● भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना आजपासून, भारत विजयी हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज ● अमिताभ बच्चन यांची प्रकृती उत्तम; ते पुढच्या आठवड्यात 'KBC 11' च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup