LetsUpp Marathi
الذهاب إلى القناة على Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
إظهار المزيد6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
6 624
वादग्रस्त विधानामुळे अडचणीत, पंजाबच्या लुधियानातील स्थानिक न्यायालयाने राखीच्या विरोधात अटक वॉरंट केले जारी
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Lets Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 श्रीनगर- येथील पंथा चौकात संशयित दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केला अंदाधुंद गोळीबार, यात सीआरपीएफचे 6 जवान जखमी
👉 नवी दिल्ली - अनुदानित गॅस सिलेंडरच्या (एलपीजी) दरामध्ये पुन्हा वाढ, गॅस सिलेंडरच्या दरात 5.57 रुपये वाढ तर विनाअनुदानित गॅस सिलेंडर (एलपीजी) 14.50 रुपयांनी स्वस्त
👉 नवी दिल्ली - केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांनी जाहीर केले देशातील विद्यापीठ व शिक्षण संस्थांचे रँकिंग, विद्यापीठांच्या यादीत बंगळुरुच्या इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स अव्वल तर महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशात दहाव्या नंबरवर
👉 नवी दिल्ली - अमेरिकेनंतर आता सिंगापूरमध्ये काम करु इच्छिणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीयांच्या अडचणींमध्ये वाढ, सिंगापूरकडून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीयांना व्हिसा न देण्याचा घेतला निर्णय
👉 नवी दिल्ली - अमेरिकेच्या पासपोर्टवर भारतात येत असलेल्या आयसिसच्या दहशतवाद्याला नेपाळच्या काठमांडू विमानतळावरून अटक, या दहशतवाद्याची अमेरिकन सुरक्षा संस्थांकडून चौकशी सुरू
👉 नवी दिल्ली - सक्तवसुली संचलनयालयाने (ईडी) सोमवारी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या दिल्लीतील फार्महाऊसवर (27 कोटी रूपये) केली जप्तीची कारवाई
👉 नवी दिल्ली - एसबीआय आणि तिच्या सहयोगी बँका तसेच महिला बँक यांचे विलिनीकरण हे जगातले सर्वात मोठे विलिनीकरण - अरुंधती भट्टाचार्य
👉 नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील गोवंश हत्याबंदीबाबतची सुनावणी 10 दिवसांसाठी पुढे ढकलली
👉 चंदीगड - सुप्रीम कोर्टाने हायवेवरील दारू दुकानांवर घातलेल्या बंदीविरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकाचे आंदोलन
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 फ्लोरिडा - 'डेडमॅन द अंडरटेकर'ने 27 वर्षांनंतर डब्ल्यूडब्ल्यूईला केले अलविदा, रेसलमेनिया 33 मधील रोमन रेन्ससोबत झालेल्या सामन्यात हार पत्कारावी लागल्यानंतर अंडरटेकरने घेतली निवृत्ती
-----------------------------------------------------------
जिओ समर सरप्राइजसाठी 'हा' रिचार्ज करा तर होईल जास्त फायदा... सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/jiorecharge499
-----------------------------------------------------------
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 नवी मुंबई - राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक भाजपात आले तर मी त्यांचं स्वागतच करेन : मंदा म्हात्रे, भाजप आमदार
👉 औरंगाबाद - उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत काँग्रेस प्रणीत लोकनेते चंद्रशेखर भोसले शेतकरी विकास पॅनलचे 18 पैकी 17 उमेदवार विक्रमी मतांनी विजयी, एका जागेवर भाजपचा उमेदवार विजयी
👉 परभणी - महापालिका निवडणुकीआधी तिकीट वाटपावरुन एका शिवसैनिकाचा (सुरेश भिसे) जोरदार गोंधळ, उमेदवारी डावलल्याने शिवसैनिकाने आत्महत्या करण्याची दिली धमकी
👉 लातूर - उदगीर बाजार समिती निवडणुकीत 18 पैकी 10 जागांवर काँग्रेसचा विजय
👉 पुणे - जिल्हा परिषदेच्या सभापतीपदांची निवड जाहीर, प्रवीण माने (बांधकाम व आरोग्य), सुजाता पवार (कृषी), राणी शेळके (महिला व बाल कल्याण), सुरेखा चौरे (समाज कल्याण)
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - विमानतळावर महिलेकडून 2.85 किलो कोकेन जप्त, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई
👉 स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्यास येत्या 28 एप्रिलपासून आंदोलन करण्याचा दिला इशारा
👉 पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवडमध्ये एका विद्यार्थ्याने भाजप आमदाराच्या मुलीवर केला प्राणघातक हल्ला, या हल्ल्यात अश्विनी संजीवरेड्डी बोदकुरवारच्या हाताची बोटं कापली, तिच्यावर उपचार सुरु
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 29910.22, निफ्टी : 9237.85, सोने भाव : 28,540 (प्रतितोळा), चांदी : 42,225 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियावर रिलायन्स जिओ IPTV सेट टॉप बॉक्सचे फोटो लीक, मोठमोठ्या टेलीकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले, इतर कंपन्यांच्या डीटीएच सेवांवर याचा मोठा परिणाम होण्याची कंपन्यांना भिती
👉 मुंबई - शाओमी येत्या बुधवारी 6 एप्रिलला भारतात Mi Fan Festival आयोजित करणार, हा सेल बुधवारी स. 10 ते दु. 2 वाजेपर्यंत असणार
🎯 खेळ घडामोडी :
👉 रोहतक - कुस्तीमध्ये भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारी पैलवान साक्षी मलिक अडकली लग्नाच्या बेडीत, साक्षीने मित्र आणि कुस्तीपटू सत्यव्रत कादियानसोबत संसार थाटला
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 लुधियाना - अभिनेत्री राखी सावंत महर्षी वाल्मीकी यांच्यावर केलेल्या
6 624
👉 खास उन्हाळा मेकअप टिप्स
Lets Up Tips & Tricks
एप्रिल महिना सुरू झालाय. ऊन आणि घामाच्या धारांनी बाहेर पडणं अवघड होऊन बसलंय. अशात मेकअप करून कुठे बाहेर पडणार असा साधा प्रश्न पडतो. कारण मेकअप केला तर सगळा निघून जाईलच. पण आता पार्टी, लग्नसराई किंवा इव्हेंटचा मौसम सुरु आहे. त्यामुळे मेकअप तर करावाच लागणार. अशा वेळी साधा आणि प्रेझेंटेबल मेकअप कसा करता येईल यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊयात...
उन्हाळ्यात आपल्या त्वचेला सतत उष्णता जाणवत राहते आणि त्वचा चिकटही बनते. आपल्याला सतत चेहरा पुसावासा किंवा थंड पाण्यानं धुवावासा वाटतो. त्यामुळे चेह-यावरचा मेकअप निघून जातो. तुम्हालाही अशी सवय असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात गडद मेकअप करणं टाळा. कारण चेहरा सतत पुसत राहिलात की मेकअप तर पूर्णपणे जात नाहीत पण त्या मेकअपचे पॅच चेह-यावर राहतात. दिसायला ते फारच वाईट दिसतं.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 मेकअप करण्यापूर्वी चेह-याला लाईट मॉईश्चरायझर लावावे. उन्हाळ्यामध्ये फाऊण्डेशन लावल्याने थोडं जड वाटू शकते. अशावेळी टिण्टेड मॉईश्चरायझर लावावे. हे दोन प्रकारे काम करते. यामुळे त्वचेला आद्र्रता मिळते आणि चेह-यावर समान टोन येतो.
👉 लिपस्टिक/लिप बाम किंवा आय शॅडो लावताना त्वचेला शोभून दिसतील अशा लाईट पेस्टल शेड्स निवडा. सध्या पेस्टल शेडचा ट्रेंड आहे. थोडी चमक असलेले सॉफ्ट रंग तुम्हाला उत्तम समर लूक मिळवून देतील आणि त्याचबरोबर तुमचा चेहराही उजळवतील. याचा आणखी एक फायदा म्हणजे मेकअप उतरू लागला तो पटकन लक्षात येणार नाही.
👉 उन्हाळ्यासाठी वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्टसचा वापर करा.
👉 तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचे असेल आणि गडद मेकअप करणे आवश्यक असेल तर ब्लॉटिंग पेपरचा वापर वाईप म्हणून चांगल्या प्रकारे करता येईल. हा कागद चेह-यावर हलकेच दाबून ठेवा आणि अतिरिक्त चमक काढून टाका.
👉 मेकअप पूर्ण करण्यासाठी अखेरीस चेह-याला ट्रान्सल्युसण्ट पावडर लावायला विसरू नका. ही पावडर चेह-यावरची जास्त चमक कमी करते आणि चेह-याला एक मॅट लूक देते.
👉 हेअर स्टायलिंगबद्दल बोलायचं झालं तर सध्या छोटया पिक्सी हेअरकट्सची चलती आहे. साधारण मुलांचा हेअरकट कसा असतो तशा प्रकारचा हा हेअरकट आहे. तुम्हाला स्वत:च्या लूकमध्ये काही वेगळे प्रयोग करायचे असल्यास तुम्ही हा हेअरकट ट्राय करू शकता.
👉 केस खांद्यापर्यंत लांब असतील तर थोडे केस सरळ आणि केसांची टोकं कर्ल करा. त्यामुळे केसांना एक वेगळाच बाऊन्स येतो.
👉 केस लांबसडक असल्यास हाय-रेझ बन किंवा पोनी टेल छान दिसेल. लांब केसांच्या फिश टेलसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्याही बांधता येतील.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 ...म्हणून तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या
Lets Up Health Katta
भारतात प्राचीन काळापासून तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये पाणी साठवण्याची परंपरा चालत आलेली आहे. तांब्या-पितळ्याच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी हे त्या धातूंच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे निर्जंतुक तर होतातच पण आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात असतात.
आयुर्वेदानुसार तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक ( कफ , पित्त, वात) असते. त्यामुळे किमान 8 तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तसेच कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत.
-----------------------------------------------------------
आयपीएल 2017: ‘हे’ टॉप खेळाडू बाहेर… सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/iplout
-----------------------------------------------------------
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
अजून काय फायदे आहेत ते पाहुयात
👉 तांबे शरीरात मेलॅनीन तयार करण्यास मदत करतात म्हणून रोज सकाळी तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे. यामुळे त्वचेचा पोत व आरोग्य सुधारण्यास मदत होते.
👉 हाडं मजबुतीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तांब्यात ठेवलेले पाणी प्यावे कारण तांब्यात दाह दूर करण्याची क्षमता असते.
👉 तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि नवीन पेशी निर्माण करण्याची क्षमता असल्याने चेहर्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
👉 तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी अॅन्टीबॅक्टेरीयल तसेच अॅन्टीवायरल असल्याने शरीराच्या आतील जखमा विशेषतः पोटातील जखमा लवकर भरण्यास मदत होते.
👉 तांब्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे, पोटातील जिवाणूंचा नाश होतो, जळजळ होण्याची समस्या कमी होते. तसेच तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रियेचा मार्ग स्वच्छ होतो.
👉 पचनसंस्थेला चालना देण्याबरोबरच हे पाणी शरीरातील अतिरिक्त मेद कमी करते. यामुळे तुमचे वजन कंट्रोल मध्ये राहते.
👉 तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील थायरॉक्सिन हार्मोन संतुलित राहतात व थायरॉईड्च्या आजारापासून आराम मिळतो.
👉 अॅनिमियाशी सामना करणार्यांनी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे कारण तांबे रक्तातील लोह वाढवतात तसेच रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते.
👉 विविध अभ्यासांनुसार तांब्यातील काही घटकांमध्ये कर्करोगाशी सामना करण्याची ताकत असते. म्हणून रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषित
Let's Up Entertainment Katta
54 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील प्राथमिक फेरीच्या तीन-तीन नामांकनांची शिफारस तसेच 7 तांत्रिक पुरस्कार व बालकलाकाराचे एक अशी आठ पारितोषिके घोषित करण्यात आली आहेत. 51 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका 54 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत दाखल झाल्या होत्या. त्या सर्व चित्रपटांचे प्राथमिक फेरीच्या 14 तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून परीक्षण करण्यात आले.
घोषित पुरस्कारांव्यतिरिक्त नामांकन लाभलेल्या पुरस्कारासाठी अंतिम फेरीच्या तज्ज्ञ परीक्षक मंडळाकडून संबधित चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून हे पुरस्कार दि.30 एप्रिल 2017 रोजी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतील.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 अंतिम घोषित पारितोषिके; तांत्रिक विभाग व बालकलाकार
👉 उत्कृष्ट कला दिग्दर्शन - बबन अडागळे (एक अलबेला), अमन विधाते (डॉ.रखमाबाई राऊत)
👉 उत्कृष्ट छायालेखन - अमलेंदू चौधरी (सायकल)
👉 उत्कृष्ट संकलन - महंतेश्वर भोसगे (फुंतरु), अनिल गांधी (माचीवरला बुधा)
👉 उत्कृष्ट ध्वनीमुद्रण - महावीर साबण्णावर (दशक्रिया)
👉 उत्कृष्ट ध्वनीसंयोजन - सुभाष साहू (डॉ.रखमाबाई राऊत)
👉 उत्कृष्ट वेशभूषा - पोर्णिमा ओक (डॉ.रखमाबाई राऊत)
👉 उत्कृष्ट रंगभूषा - विद्याधर भट्टे (एक अलबेला)
👉 उत्कृष्ट बालकलाकार - आर्य आढाव (दशक्रिया), ओंकार घाडी (कासव)
🎯 प्रथम पदार्पण चित्रपट निर्मितीसाठी नामांकन -
👉 घुमा
👉 सायकल
👉 कर्मवीरायण
🎯 प्रथम पदार्पण दिग्दर्शनासाठी नामांकन -
👉 ओली की सुकी
👉 टेक केअर गुड नाईट
👉 दशक्रिया
🎯 उत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकांसाठी नामांकन -
👉 एक अलबेला
👉 सायकल, बंदूक्या
👉 कासव
👉 डॉ.रमाबाई राऊत
👉 दशक्रिया
👉 टेक केअर गुड नाईट
👉 व्हेन्टीलेटर
👉 ओली की सुकी
👉 कर्मवीरायण
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 श्रीनगर - येथील नोहटा पोलीस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ग्रेनेड हल्ला, 1 पोलीस शहीद
👉 श्रीनगर - राष्ट्रीय महागार्ग 44 वरील उधमपूर ते रामबन या 10.89 कि.मी.अंतराच्या आशिया खंडातील सर्वात मोठया बोगद्याचे पंतप्रधान मोदींनी केले लोकार्पण
👉 अलाहाबाद - 2022 पर्यंत आपण ज्या क्षेत्रात असू, त्या क्षेत्रातून देशासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करूया, संकल्प करूया - पंतप्रधान नरेंद्र मोदी
👉 नवी दिल्ली - मद्यप्राशन करुन वाहन चालवणाऱ्या चालकांकडून पाचपट दंड वसूल केला जाणार, नवीन कायदा केंद्र सरकारने केला मंजूर
👉 नवी दिल्ली - शिक्षण,आरोग्य सेवा आणि धार्मिक यात्रांवर जीएसटीच्या नव्या व्यवस्थेत कर लावला जाणार नाही - महसूल सचिव हसमुख अढिया
👉 केरळ - सीआरपीएफच्या 400 जवानांना जेवणातून विषबाधा, पोटदुखी आणि उलटी झाल्याने त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 लाहोर - पाकिस्तानमध्ये मानसिक रुग्ण असलेल्या एका व्यक्तीने 20 लोकांची केली हत्या, एकाच घरातील 6 जणांचा समावेश
👉 कोलंबिया - लॅटिन अमेरिकी देश कोलंबियात मुसळधार पाऊस व भूस्खलनाच्या घटनेत 250 जणांचा मृत्यू तर 220 जण बेपत्ता
🎯 राजकीय घडामोडी :
👉 औसा - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ही संघर्ष यात्रा काढलेली आहे आणि कर्जमाफी होईपर्यंत ही संघर्षयात्रा सुरूच राहणार - विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे
👉 सिंधुदुर्ग - मी भाजपात जाणार नाही, जयकुमार रावळ माझ्या घरी येत असतात, 4 एप्रिलला संघर्ष यात्रेत सहभागी होणार - नारायण राणे
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - परेल स्टेशन उडवून देण्याची निनावी फोनद्वारे मिळाली धमकी, धमकीनंतर परेल स्टेशनवर कडक पोलीस बंदोबस्त
👉 नवी मुंबई - एपीएमसी मसाला मॉर्केट बी 33/34 येथे लागलेली आग विझवायला जात असताना अग्निशमन दलाची गाडी पालटली, 2 कर्मचारी जखमी
👉 पुणे - 'काही लोक केवळ ओठातून नारे देऊन देशप्रेम दाखवतात' केवळ घोषणांनी देश सुधारणार नाही -अण्णा हजारे
👉 पुणे - ग्रामीण विकास फेलोशिप उपक्रमाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ, अण्णा हजारे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते
👉 पुणे - ऑन ड्युटी रात्री डुलकी काढणा-या पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना तुकाराम मुंढे यांचा दणका, 9 कर्मचा-यांना केलं निलंबित
👉 धुळे - नटराज टॉकिज परिसरात पोलिसांनी 49 लाख 78 हजार 500 रुपयांची रक्कम पकडली, याप्रकरणी शहाद्याचे तीन जण ताब्यात
👉 हिंगोली - कळमनुरीजवळ 10 किमीवर खुराणा-शाब्रिजची खासगी बस-ट्रक अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू, 12 जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर
👉 सोलापूर - बक्षीहिप्परगा येथील दारू अड्डावर धाड, 30 हजार लीटरची दारू तयार करण्याचे रसायन केले नष्ट, दोघे जण ताब्यात
🎯 खेळ घडामोडी :
👉 नवी दिल्ली - ऑलिम्पिक विजेत्या स्पेनच्या कॅरोलिना मरिनचा कडवा संघर्ष मोडित काढून भारताच्या पी. व्ही. सिंधूने इंडिया ओपन वर्ल्ड सुपर सीरिजचे विजेतेपद पटकावले
👉 मुंबई - भारताच्या लिअँडर पेसने कॅनडाच्या आदिल शमसुद्दिनच्या साथीने लिऑन चॅलेंजर टुर्नामेंट जिंकून यंदाच्या मोसमात पुरुष दुहेरीचे पहिले विजेतेपद पटकावलं
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 पुणे - 'सरकारनामा' चित्रपटाचे निर्माते, कथा व पटकथा लेखक अजय झणकर यांचे निधन, खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
👉 मुंबई - 'द कपिल शर्मा शो’च्या दुसऱ्या सीझनची मूदत या महिन्यात संपत असून ‘शो’ ठिकठाक करण्यासाठी ‘सोनी’ने कपिलला दिली 1 महिन्याची नोटिस
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 श्रीनगर - काश्मीरमध्ये बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी होणार
👉 नवी दिल्ली - सोमवारपासून RBIचा वेगळा अंमलबजावणी विभाग, हा केंद्रीय विभाग फक्त बँकांशी संबंधित नियमांविरुद्ध काम करणाऱ्या लोकांबद्दल आलेल्या तक्रारींचा पुराव्यांच्या आधारे निपटारा करेल
👉 नवी दिल्ली - शनिवारी सोने 190 रुपयांची वाढ होऊन 29,250 प्रति दहा ग्रॅम तर, चांदीचा भाव 500 रुपयांनी वाढून प्रति किलो 42,650 रुपये झाला
👉 नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने 2017-18 या मूल्यांकन वर्षासाठी 2 प्राप्तिक परतावा फॉर्मची (आयटीआर) ई- फायलिंग केली सुरू
👉 नवी दिल्ली - भारत आपल्या प्रत्येक नागरिकाच्या आरोग्यावर एका वर्षात केवळ 23 डॉलर म्हणजेच सुमारे 1497.52 रुपये खर्च करते, तर अमेरिकेत हाच खर्च 4,541 डॉलर म्हणजेच सुमारे लाख 94 हजार 510 रुपये
👉 नवी दिल्ली - कोरडा दुष्काळ व चक्रीवादळाचा फटका, केंद्र सरकारकडून तामिळनाडूला एनडीआरएफ फंडातून 1,712 कोटींचे पॅकेज
👉 नवी दिल्ली - चाणक्यपुरी भागात केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी यांनी 4 मुलांविरोधात केली तक्रार दाखल, त्यांच्यावर स्मृती ईराणी यांच्या गाडीचा पाठलाग करण्याचा आरोप
👉 लखनऊ - सूत्रांच्या माहितीनुसार योगी सरकार आता लँड माफिया स्क्वॉड बनवणार, लवकरच कॅबिनेटमध्ये यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती
👉 कोलकाता - चक्क प्लास्टिकची अंडी बाजारात, कोलकाता पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 1 लाख किंमतीची प्लास्टिकची अंडी केली जप्त
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 लंडनहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एअर हॉस्टेसशी गैरवर्तणूक करणाऱ्या मद्यधुंद ब्रिटीश नागरिकांना अटक : पीटीआय
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढली नाराज आमदारांची समजूत, महिन्याभरात प्रश्नमार्गी लावण्याचे दिले आश्वासन, सुत्रांची माहिती
👉 औरंगाबाद - सरकारने 9 आमदारांचे निलंबन मागे घेऊन आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केलाय : अजित पवार
👉 औरंगाबाद - शेतकरी कर्जमाफीसाठी पंचांग बघून मुहूर्त काढणार काय? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - राज्य सरकारने रेडी रेकनरच्या दरात सरासरी 5.86 टक्क्यांची केली वाढ, ग्रामीण भागासाठी 7.13 टक्के, तर नगरपालिका क्षेत्रासाठी 5.56 टक्के, महालिकेसाठी 4.47 टक्के वाढ
👉 मुंबई - अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारं विधेयक पास, 31 डिसेंबर 2015 पूर्वीच्या बांधकामांना संरक्षण, दंड भरुन बांधकामं नियमित होणार
👉 मुंबई - बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी बेस्टच्या भाडेवाढीची सूचना, पालिका गटनेत्यांच्या बैठकीत बेस्टच्या कृती आराखड्यावर चर्चा
👉 मुंबई - गेल्या 2 दिवसात राज्यभरात मोठ्या प्रमाणात गाड्यांची खरेदी, ऑटोमोबाईल कंपन्यांच्या या बंपर सवलतीमुळे राज्याच्या तिजोरीत 2 दिवसात 100 कोटीहून जास्त महसूल गोळा होणार
👉 मुंबई - पुढील शैक्षणिक वर्षी राज्यभरातील शाळा 15 जूनला सुरू होणार, तीव्र उन्हाळ्यामुळे विदर्भातील शाळा 27 जूनपर्यंत राहणार बंद
👉 मुंबई - पत्रकार हल्ला विरोधी कायद्य़ाचा मसुदा तयार, सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक मांडू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 टेलिग्राम या मॅसेंजरने आपल्या युजर्ससाठी व्हाईस कॉलिंगची सुविधा केली प्रदान, अपडेटच्या स्वरूपात हे फिचर देण्यात येणार
🎯 खेळ घडामोडी :
👉 मियामी - सानिया मिर्झा आणि तिची पार्टनर बार्बोरा स्ट्रीकोव्हा जोडीने 6-7, 6-1, 10-4 ने सेमी फायनलची लढत जिंकत मियामी ओपनची फायनल गाठली
👉 नवी दिल्ली - भारताची अव्वल शटलर पी.व्ही सिंधूने इंडियन ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये दिमाखात केला प्रवेश, सिंधूने 21-18, 14-21, 21-14 ने मारली बाजी
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - 'सैराट' सिनेमाचा कन्नडमधील रिमेक म्हणजे रिलीज, एका वेबसाईटच्या माहितीनुसार, या सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 3.60 कोटी रुपयांची केली कमाई
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 यशाचा मार्ग 'प्रेझेन्टेशन'
Lets Up Edu Katta
आजकाल प्रत्येक क्षेत्रात प्रेझेन्टेशन मॅटर करतं. कारण प्रेझेन्टेशन तुमच्या यशाचा आलेख उंचावण्यात मुख्य भूमिका पार पाडते. तुमचं वैयक्तिक आणि प्रोफेशनल यश तुम्ही समोरच्याशी कसं बोलता यावर अवलंबून असतं, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. कारण समोरच्यावर तुमचा प्रभाव कसा पडतो हे महत्त्वाचं असतं. उत्तम प्रेझेन्टेशन कौशल्याद्वारे तुम्ही करिअरमध्ये नक्कीच पुढे जाऊ शकतात. मात्र हे कौशल्य अंगिकारण्यासाठी तुम्ही खालील गोष्टी लक्षात ठेवा...
👉 ठोस पण मुद्देसुद बोला - प्रेझेन्टेशनमध्ये बोलण्याला खूप महत्त्व आहे. पण काहीही बोलून आपण आपलं बोलणं दुस-याला समजावू शकत नाही. म्हणूनच तुमचं बोलणं सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे तसा ठोस पुरावा असणं आवश्यक आहे. जे तुमच्या मुदय़ांचं समर्थन करणारे असतील. अशा रितीने तुम्ही समोरच्या व्यक्तिचा विश्वास संपादन करू शकाल.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 लिखाण आणि वक्तृत्व - उत्तम प्रेझेन्टेशनसाठी तुमच्याकडे दोन महत्त्वाची अंग असणं आवश्यक आहे. एक म्हणजे उत्तम लिखाण आणि दुसरं म्हणजे प्रभावशाली वक्तृत्व.
👉 ग्राफिक्सचा वापर करा - तुम्हाला कमीत कमी वेळात तुमचं म्हणणं समोरच्याला सांगायचं असेल तर तुम्ही ग्राफिक्सचा वापर करा. ग्राफिक्ससारखा उत्तम मार्ग दुसरा कोणताही नसेल. ‘जो दिखता है वही बिकता है’ अशी एक म्हण आहे. म्हणूनच ग्राफिक्सच्या माध्यमातून मुद्दे पटकन समजावता येतात.
👉 शब्दांचा योग्य वापर करा - प्रेझेन्टेशन देताना मुळात तो विषय तुम्हाला समजणं आवश्यक आहे. एकदा का तुम्हाला समजलं की, तुम्ही काही अलंकारीक शब्दांचा वापर करून समोरच्यावर आपली छाप पाडू शकता. प्लीज किंवा सॉरी सारखे शब्द वापरू नका. असे शब्द जेणेकरून समोरच्या व्यक्तिला भुरळ घालतील. कारण तुम्ही काय बोलता हेच प्रेझेन्टेशनमध्ये महत्त्वाचं असतं. म्हणूनच अलंकारीक शब्दांनी तुमची बोलण्याची शैली विकसित करा. याचा अर्थ बोजड शब्दांचा वापर करा असा होत नाही. एखादा हलका-फुलका विनोदही समोरच्यावर तुमची छाप पाडू शकतो.
👉 प्रभावी बॉडी लँग्वेज ठेवा - प्रेझेन्टेशनच्या दरम्यान तुम्ही चिंताग्रस्त असाल तर त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या शरीरावर जाणवणार. परिणामी बॉडी लँग्वेज बदलणार. मग एकदा का तुमची बोलण्याची लय तुटली तर मग तुम्ही विषयापासून भरकटलाच म्हणून समजा. म्हणूनच विषयातील बारकावे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात तर तुमचाच आत्मविश्वास वाढेल.
वरील सगळ्या कमतरतेवर मात केलीत तर तुमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही यशस्वी झालाच म्हणून समजा...
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
🎯 विधानसभेतील 9 आमदारांचे निलंबन मागे
Lets Up Political Update
अर्थसंकल्पादरम्यान शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात गदारोळ घालणाऱ्या विधानसभेतील 19 पैकी 9 आमदारांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. संसदीय कामकाज मंत्री गिरिश बापट यांनी ही माहिती दिली. 10 आमदारांचे निलंबन तसेच कायम ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या 10 आमदारांचे निलंबन अधिवेशन संपण्याआधीच मागे घेण्याची शक्यता आहे.
खालील आमदारांचे निलंबन मागे...
👉 संग्राम थोपटे (काँग्रेस, भोर, पुणे)
👉 दीपक चव्हाण (राष्ट्रवादी, फलटण - सातारा)
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे)
👉 अवधूत तटकरे (राष्ट्रवादी, श्रीवर्धन, रायगड)
👉 अमित झनक (काँग्रेस, रिसोड, वाशिम)
👉 वैभव पिचड (राष्ट्रवादी, अकोले - अहमदनगर)
👉 डी.पी सावंत (काँग्रेस, नांदेड उत्तर)
👉 नरहरी जिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी, नाशिक)
👉 अब्दुल सत्तार (काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद)
🎯 जो स्वत: च्या बापाचा झाला नाही, तो इतरांचा काय होणार?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदा मुलायमसिंह यादव यांनी मौन सोडले आहे. एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या मुलावर जोरदार हल्ला चढवला. अखिलेशवर टीका करताना मुलायम सिंह यादव यांनी, जो स्वत: च्या बापाचा झाला नाही, तो इतरांचा काय होणार? असा जहरी सवाल उपस्थित करुन जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.
मुलायम सिंह यादव यांनी यावेळी इतर नेत्यांचेही दाखले दिले. अनेक नेते आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवत नाहीत. पण मी या परंपरेला छेद देत, अखिलेशला मुख्यमंत्री केले. अखिलेशसाठी मी इतका त्याग करुनही त्याने मला काय दिलं? इतका अपमान आजपर्यंत माझा कुणीही केला नाही. त्यामुळे जो स्वत: च्या बापाचा होऊ शकला नाही, तो इतरांचा काय होणार? अशी टीका त्यांनी केली आहे.
अखिलेशने शिवपाल यादव यांना पदावरुन हटवून योग्य केले नाही. कोणी आपल्या काकाशी असे वागू शकते का? असे विचारत, अखिलेशने हे योग्य केले नाही असेही त्यांनी यावेळी म्हटले.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 रिलायन्स जिओची नवी घोषणा
Let's Up Current Affair
रिलायन्स प्राईम जिओमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओ प्राईम मेंबरशिपची मुदत आणखी 15 दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. आता जिओच्या ग्राहकांना 15 एप्रिलपर्यंत जिओच्या प्राईम मेंबरशिपसाठी नोंदणी करता येणार आहे.
जिओ मोबाईल धारकांसाठी कंपनीने प्राईम मेंबर्ससाठी ही जिओ समर सरप्राईज ऑफर आणली आहे. यामध्ये 15 एप्रिलपूर्वी 303 रुपयांचा प्लान घेणा-या ग्राहकांना 3 महिने मोफत सेवा मिळणार आहे. 31 मार्च ही जिओ प्राईम मेंमबरशीप घेण्यासाठी शेवटची तारीख होती. मात्र आता ही तारीख वाढवण्यात आली आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतीलिटर 3.77 रुपये तर डिझेल प्रतीलिटर 2.91 रुपयांनी स्वस्त झालं आहे. गेल्या काही महिन्यांत सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती. मात्र, आता एकदम दरात मोठी कपात झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या पाक्षिक आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घट झाल्याच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता पेट्रोल प्रतीलिटर 3.77 रुपये तर डिझेल प्रतीलिटर 2.91 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत.
👉 आज स्टेट बँकांचे विलीनीकरण
स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये (एसबीआय) आजपासून 5 सहयोगी बँकांचे विलीनीकरण होणार आहे. एसबीआयमध्ये विलीन होणाऱ्या बँकांत स्टेट बँक आॅफ हैदराबाद, स्टेट बँक आॅफ त्रावणकोर, स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक आॅफ म्हैसूर आणि स्टेट बँक आॅफ पतियाळा यांचा समावेश आहे. विलीनीकरणात या सर्व बँकांची सर्व प्रकारची मालमत्ता एसबीआयकडे हस्तांतरित होईल. या बँकांचे कर्मचारी आणि ग्राहकही एसबीआयकडे हस्तांतरित होतील.
👉 आलंय 400 पट फास्ट इंटरनेट
भारतातील सर्वात मोठ्या नॉन-टेल्को आणि तिसरा मोठा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर एसीटी फाइबरनेट हैदराबाद शहराला 1 जीबीपीएस (गिगा वेग) वायर्ड ब्रॉडब्रँड इंटरनेट सर्व्हिस पुरवण्याची घोषणा केली आहे. आयटी निगम प्रशासन आणि उद्योग मंत्री के. तारक रामा राव यांच्या उपस्थितीत ही सेवा लॉन्च केली गेली. एसीटी फाइबरनेट, भारतीय इंटरनेट बाजारातील अशी पहिली कंपनी आहे की ज्याच्या माध्यमातून पूर्ण शहराला 'गीगा' वेगाने इंटरनेट पुरवले जाणार आहे.
एसीटी फाइबरनेट यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या जवळ जगातील सर्वोत्कृष्ट अशी फायबर ऑप्टिक टेक्नॉलजी आहे. आणि आता ते भारतीय ग्राहकांना जागतिक दर्जाची सेवा पुरवणार आहेत. हैदराबाद मधील इंटरनेटचा वेग या पुढे 1 Gbps इतके असणार आहे. जी भारतातील इंटरनेट वेगाच्या 400 पट अधिक असणार आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - भारतीय वादविवाद करतात हे मी मान्य करीन, पण भारतीय असहिष्णू आहेत हे मी मान्य करणार नाही - प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती
👉 नवी दिल्ली - पेट्रोल प्रतिलिटर 3 रुपये 77 पैशांनी, तर डिझेल प्रतिलिटर 2 रुपये 91 पैशांनी स्वस्त, मध्यरात्रीपासून लागू झाले नवीन दर
👉 नवी दिल्ली - जिओ प्राइम मेंबरशिपची मुदत आणखी 15 दिवसांसाठी वाढवण्यात आली, आता 15 एप्रिलपर्यंत घेऊ शकता मेंबरशिप
👉 नवी दिल्ली - 52 दिवस आढेवेढे घेतल्यावर कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी. एस. कर्णन अखेर सर्वोच्च न्यायालयात आरोपी म्हणून हजर
👉 नवी दिल्ली - मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी पहिला हप्ता म्हणून जपान आंतरराष्ट्रीय सहकारी संस्था (जायका) आणि एमएमआरडीए यांच्यात 7 हजार 910 कोटींचा करार
👉 छत्तीसगड - 33 नक्षलवाद्यांनी बस्तरच्या आयजींसमोर आत्मसमर्पण केले, यात 29 पुरुष आणि 4 महिलाचा समावेश
👉 केरळ - वायानादमध्ये बलात्कार प्रकरणात न्यायाधीशांनी 25 वर्ष तुरुंगवास आणि 2 लाख दंडाची शिक्षा सुनावताच आरोपीने न्यायाधीशांच्या दिशेने चप्पल फेकली
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पाराचिनारमधील एका मशिदीमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू, स्थानिक सुन्नी पंथातील धार्मिक कट्टरतावाद्यांनी हल्ला केल्याचा आरोप
🎯 राजकीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - आमच्या पक्षात येऊन एखादा वाईट माणूस सुधारत असेल तर ते चांगलचं आहे - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
👉 औरंगाबाद - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूरपासून काढलेली संघर्ष यात्रा आज औरंगाबादमध्ये, जाहीर सभा होणार
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - देवी-देवता, महापुरुष आणि गड किल्ल्यांच्या नावाचा गैरवापर रोखण्यासाठी कायदा करणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानपरिषदेत माहिती
👉 नांदेड - जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे निलंबित, पदाचा दुरुपयोगासह अनेक ठपक्यावरून निलंबन
👉 मुंबई - मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आजपासून द्यावा लागणार वाढीव टोल, कारसाठी मोजावे लागणार 230 रुपये
👉 जळगाव - दाऊदशी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी फोनवरून संभाषण केल्याचा आरोप करणारा हॅकर मनीष भंगाळेला अटक
👉 मुंबई - महावीर जयंतीनिमित्त राज्यभरात मांसविक्रीवर बंदीची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली
👉 सोलापूर - आर्म रेजिमेंटचे कार्यरत असणारे जवान भोजलिंग मोहन काळेल (रा. दंडाचीवाडी, ता. सांगोला) यांना युद्ध सरावा दरम्यान वीरमरण
👉 रत्नागिरी - पोलिसाच्याच घरात साडेआठ लाखांची चोरी, रत्नागिरीतील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या घरी चोरी झाली असून 28 तोळे सोने गेले चोरीला
👉 बीड - गेवराईत नवजात अर्भकाची हत्या करून पिठाच्या डब्यात टाकून जमिनीत पुरला डबा, आरोपी महिला पोलिसांच्या ताब्यात
👉 अहमदनगर - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकरी मराठा महासंघाचे 7 एप्रिल पासून प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन
🎯 खेळ घडामोडी :
👉 इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पीव्ही सिंधूने सायना नेहवालवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 बेळगाव - मराठी चित्रपटसृष्टीत रेकॉर्डब्रेक कमाई केलेला ‘सैराट’ चित्रपट कन्नडमध्ये कर्नाटकात प्रदर्शित झाला असून अपेक्षेएवढी गर्दी कन्नड सैराटने खेचली नाही
👉 लॉस एंजलिस - चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 45 दिवसांनंतर तो चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित करण्याची हॉलीवूडची योजना
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 Let's Up General Knowledge
1. आंतरराष्ट्रीय हवामान संघटनेची स्थापना कधी झाली?
2. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली?
3. बेल्जीयममध्ये कोणती शासनपद्धती अवलंबवली जाते?
4. पेरूमधील टिटिकाका सरोवरचं क्षेत्रफळ किती?
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
5.’द गाईड’ या पुस्तकाचे लेखक कोण?
6. एका मनुष्याच्या शरिरातील रक्त उपकरणाद्वारे दुसर्या मनुष्याच्या शरीरात सोडण्याच्या क्रियेला काय म्हणतात?
7. पोलो या खेळाच्या मैदानाचं माप काय असतं?
8. राष्ट्रकुल सभासद राष्ट्रांमध्ये कोणत्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात?
9. गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक कोण?
10. सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण?
👉 प्रश्न 1 - उत्तर : 1951.
👉 प्रश्न 2 - उत्तर : रमाबाई.
👉 प्रश्न 3 - उत्तर : संसदीय लोकशाही पद्धत.
👉 प्रश्न 4 - उत्तर : 8185 चौ. कि. मी.
👉 प्रश्न 5 - उत्तर : आर. के. नारायण.
👉 प्रश्न 6 - उत्तर : रक्तप्रेषण.
👉 प्रश्न 7 - उत्तर : 300 बाय 200 यार्डस्.
👉 प्रश्न 8 - उत्तर : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा.
👉 प्रश्न 9 - उत्तर : बाळ गंगाधर टिळक
👉 प्रश्न 10 - उत्तर : न्या. बी. एन. श्रीकृष्णन.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - सरकारने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)सह छोट्या बचत फंडांवरील व्याजदरात 0.1 टक्का केली कपात, 1 एप्रिलपासून होणार अंमलबजावणी
👉 नवी दिल्ली - राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा म्हणजेच ‘नीट’ (NEET) परीक्षेसाठी 25 वर्षाची वयोमर्यादा सुप्रीम कोर्टाने हटवली
👉 नवी दिल्ली - अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या खटल्याची दररोज सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार, रोज सुनावणी घेण्यास वेळ नसल्याचा कोर्टाचा निर्वाळा
👉 नवी दिल्ली - बेहिशेबी मालमत्ता प्रकरण, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग, त्यांची पत्नी आणि अन्य आरोपींविरोधात सीबीआय कोर्टाचे आरोपपत्र दाखल
👉 अहमदाबाद – गुजरातमध्ये आता गोहत्या प्रकरणात दोषी आढळणा-यांना आजीवन कारावासाची शिक्षा भोगावी लागणार
👉 अहमदाबाद - येथील गिनी मनी चेंजर्स कंपनीला 1 कोटी 27 लाखांच्या बेकायदा विदेशी चलनविक्रीप्रकरणी सक्तवसुली संचालनालायची कारणे दाखवा नोटीस
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 इस्लामाबाद - पाकिस्तानमधील पराचिनार येथे बॉम्बस्फोट, या घटनेत 22 ठार तर 50 जण जखमी
-----------------------------------------------------------
'स्टंप उचलून कोहलीला मारणार होतो'… सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/kohalicowan
-----------------------------------------------------------
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 जर भाजप सरकार हिंदीला प्राधान्य देऊन तमिळ भाषेला कमी महत्त्व देण्याचा प्रयत्न करणार असेल तर हिंदीविरोधात नवी चळवळ सुरू होईल : एम. के. स्टॅलिन, द्रमुक
👉 मुंबई - विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत शनिवारी निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे दाऊदशी संबंध आहेत, असा आरोप करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळेला बेड्या, मुंबई गुन्हे शाखेने केले अटक
👉 मुंबई - डॉ. तात्याराव लहाने यांच्या अडचणीत पुन्हा वाढ, छगन भुजबळ यांना मदत केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस
👉 नवी मुंबई - पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्यावर खारघर येथे प्राणघातक हल्ला, जखमी सूर्यवंशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू
👉 औरंगाबाद - मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट, 12 वर्षीय मुलगा गंभीर जखमी, पडेगाव येथील मदरशातील घटना, घाटी रुग्णालयात उपचार सुरु
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 29620.50, निफ्टी : 9173.75, सोने भाव : 28,458 (प्रतितोळा), चांदी : 42,008 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 फेसबुकने आता युजर्सला त्यांच्या पेजवरून निधी संकलीत करण्याची दिली सुविधा, प्रारंभी अमेरिकेतील युजर्सला हे फिचर देण्यात येणार असून ते क्रमाक्रमाने अन्य युजर्सला प्रदान करण्यात येणार
🎯 खेळ घडामोडी :
👉 मुंबई - विराट कोहलीची एका दिवसाची कमाई आता 5 कोटी रुपये, कोणत्याही सेलिब्रिटीला एका दिवसाला मिळणाऱ्या फीमध्ये ही सर्वाधिक
👉 मुंबई - आरसीबीचा कर्णधार विराट कोहली पहिल्या काही सामन्यांत खेळू शकला नाही तर एबी डिव्हिलियर्स संघाचे नेतृत्त्व करेल : डॅनियल व्हेटोरी, आरसीबी हेड कोच
👉 मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सलामीवीर-विकेटकीपर के एल राहुलही दुखापतीमुळे आयपीएलमधूनच बाहेर, राहुल आता उपचारासाठी लंडनला जाणार, तिथे त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया होणार
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - मराठी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकर समीर वानखेडेसोबत विवाहबद्ध, हा विवाहसोहळा जवळचा मित्रपरिवार आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 मुलांच्या डोळ्यांची विशेष काळजी घ्या!
Let's Up Parenting Katta
हल्ली विविध कारणांमुळे लहान मुलांमध्ये दृष्टीदोषाच्या अनेक समस्या उद्भवताना दिसतात. यावर उपाय म्हणजे मुलांना पुरेपूर पोषणतत्त्वयुक्त आहार मिळायलाच हवा. शिवाय मुलांच्या दृष्टीची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते...
👉 मुलांना शाळेत पाठवण्याआधीच त्यांच्या डोळ्यांची तपासणी सक्तीने केली पाहिजे. दर 6 महिन्यातून एकदा मुलांना नेत्रतज्ञांकडे नेले पाहिजे. तसेच, त्यांच्या डोळ्यावर अतिरिक्त ताण येऊ नये आणि त्यांना झोपही शांत लागेल, यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 शाळेतून घरी परतल्यावर मुलांना पाण्याने डोळे स्वच्छ करण्याची सवय लावा. मुलांचे डोळे लाल होत असतील आणि ते सतत डोळे चोळत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
👉 डोळ्यांच्या समस्यांबाबत घरगुती उपचार करणे टाळा. चष्मा वापरत असताना तो बदलण्याच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास विसरू नका.
👉 चष्म्यावर ओरखडे असल्यास किंवा डाग असले तरी काही मुले तो तसाच वापरतात. तेव्हा या गोष्टींवर लक्ष ठेवा आणि मुलांना चष्मा नेहमी स्वच्छ ठेवण्यास सांगा.
👉 मुले टीव्ही बघत असताना किंवा वाचत असताना प्रकाश खूप जवळ नसेल, याची खात्री करून घ्या.
👉 मंद प्रकाशाचा वापर करू नका. या सर्व काळजीबरोबरच पोषणतत्त्वयुक्त आहार घेण्यालाही आपण तितकेच महत्त्व दिले पाहीजे.
👉 डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए, सी, बीटा केरॉटीन, सेलेनियम आणि इतर पोषणद्रव्यांचा आहारात प्रामुख्याने समावेश असावा. तसेच गाजर, पालेभाज्या, पपई आणि द्राक्षे खाण्यास मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्या.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 धमाकेदार : नाम शबाना
Let's Up Movie Review
निर्मिती : केप ऑफ गुड फिल्म्स, प्लॉन सी स्टुडिओज
दिग्दर्शन : शिवम नायर
कथा, पटकथा, संवाद : नीरज पांडे
कलाकार : तापसी पन्नू, अक्षयकुमार, मनोज वाजपेयी, अनुपम खेर, पृथ्वीराज सुकुमारन
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
भारतात सिक्वेलचा ट्रेंड पाहायला मिळतो. 'नाम शबाना' हा जरी बेबीचा सिक्वेल वाटत असला तरी हा सिक्वेल नसून स्पीन ऑफ आहे. म्हणजेच पूर्वीच्या सिनेमातली एखादी व्यक्तिरेखा घेऊन तिची बॅकस्टोरी सांगायची. कदाचित भारतातील स्पीन ऑफचा हा पहिलाच प्रयत्न असावा. या सिनेमामधून ‘बेबी’मधील शबानाची बॅकस्टोरी सांगितली आहे.
कथा : ही गोष्ट शबाना आणि शबानाचीच आहे. आपल्या आईबरोबर राहणारी शबाना स्वावलंबी आहे. कॉलेज घर आणि मार्शल आर्टचा क्लास एवढंच तिचं विश्व आहे. ती फारसं कुणाशी बोलत नाही. स्वतः बद्दल कधीच कुणाला सांगत नाही. फार भूतकाळात रमत नाही. अशा शबानाचा एक मित्र आहे जय. त्याला ती आवडते. पण तिला त्याने ते कधी सांगितलेलं नसतं. एक दिवस तो तिला प्रपोज करतो आणि काही दिवसातच तिच्या डोळ्यासमोर त्याची हत्या होते. काही क्षणापूर्वी शबानाला पडलेलं स्वप्न उद्ध्वस्त होतं आणि त्यानंतर मात्र आधीच तटस्थ असणारी शबाना एकलकोंडी होते. घुसमटू लागते. यासर्व घटनेत तिला पोलीस काहीच मदत करत नाहीत. अशावेळी तिच्या मदतीला येतो एक स्पेसिअल फोर्स ऑफिसर आणि त्यानंतर कथानक एका वेगळ्याच वळणावर जातं.
अभिनय : या सिनेमात भाव खाऊन जाते ती तापसी. या सिनेमातील तापसीचे स्टंट आणि अभिनय वाखण्याजोगे आहेत. तापसीने शबानामध्ये अनेक वर्ष दडलेली घुसमट कमालीची व्यक्त केली आहे. या सिनेमात अक्षयकुमार, मनोज वाजपेयी, अनुपम खेर, डॅनी, मुरली शर्मा ही मंडळी नावापुरातीच आहेत. पण त्यांनी त्यांचा अभिनय चोख पार पाडला आहे.
संगीत : या संपूर्ण कथानकांमध्ये व्हायोलीन्सवर वाजणारी बेबीची खास सिग्नेचर ट्युन ऐकताना रोमांच उभे रहातात. यामध्ये श्रेया घोषाल व सुनिधीने गायलेली गाणी फारच श्रवणीय आहेत. त्यात चार चांद लावलेत ते त्या गाण्याच्या पार्श्वसंगीताने. सुधीर पलसाने त्याची छायांकनाची कामगिरी चोखरित्या पार पाडली आहे.
एकूणच काय तर तुम्ही जर बेबी पहिला असेल तर हा सिनेमा नक्की पहा. विशेष म्हणजे तुम्ही तापसीचे फॅन असाल तर या सिनेमात तिचा दमदार अभिनय व स्टंट पाहण्याची पर्वणी असणार आहे. त्यामुळे हा सिनेमा नक्की तुमच्यासाठी आहे…
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - देशातील 7 महत्वाच्या विमानतळांवर विमान प्रवाशांच्या हँड बॅग्सवर शिक्का मारणे 1 एप्रिलपासून होणार बंद : सीआयएसएफ
👉 नवी दिल्ली - आफ्रिकन नागरिकांवर होणारे हल्ले निषेधार्ह, आफ्रिकन नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध : परराष्ट्र सचिव
👉 नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने ट्रिपल तलाक प्रकरण संविधान पीठाकडे सोपवले, 11 मे पासून सुरू होणार सुनावणी
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 युरोपीय संघातून (ईयू) इंग्लंड बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू, ब्रेक्झिट या नावाने ही प्रक्रिया ओळखली जात आहे
-----------------------------------------------------------
अवघ्या अडीच हजारात करा हवाई प्रवास… सविस्तर जाणून घेण्यासाठी क्लिक करा... http://bit.ly/2500udan-
-----------------------------------------------------------
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 राजकीय घडामोडी :
👉 लखनऊ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या विधानसभेला केले संबोधित, ते म्हणाले कि, सत्ताधारी आणि विरोधक सोबत मिळून काम करावं लागेल. आपल्याला जनतेचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे
👉 चेन्नई - आर. के. नगर पोटनिवडणुकीतील उमेदवार ई. मधुसूदन यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मधुसूदन माजी मुख्यमंत्री पन्नीरसेल्वम गटाचे उमेदवार
👉 मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीतून 11 लाख मतदारांची नावं गायब, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही बाब समोर
👉 नाशिक - महापालिकेतील स्थायी समितीत भाजपचे वर्चस्व, 16 पैकी 9 सदस्य भाजपचे, शिवसेना 4, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेच्या प्रत्येकी एका सदस्याची निवड.
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - अंगणवाडी सेविकांचा 1 एप्रिल रोजी होणारा संप मागे, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर घेतला निर्णय
👉 मुंबई - शासकीय कामकाजाचा आठवडा 5 दिवसांचा करण्याबाबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले सकारात्मक संकेत
👉 मुंबई - ऑनलाईन एंटरटेन्मेंट चॅनल टीवीएफ म्हणजे द व्हायरल फिव्हरचे सीईओ आणि संस्थापक अरुणाभ कुमार यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत छेडछाडीचा गुन्हा दाखल
👉 मुंबई - मच्छीमार वसाहती व कोळी वाड्यांना लागणारा सीआरझेड कायदा रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र मच्छीमार संघटनेचे पंतप्रधानांन पत्र
👉 कोल्हापूर - महानगरपालिकेचा आरोग्य, स्वच्छता व पर्यावरणपूरक अर्थसंकल्प स्थायी समितीकडून सभेसमोर सादर
👉 पुणे - महापालिकेचा 5 हजार 600 कोटी रुपयांचा अर्थसंकल्पीय आराखडा पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना केला सादर
👉 पुणे - पीएमपीएमएलमध्ये उशिरा आलेल्या 120 कर्मचाऱ्यांवर तुकाराम मुंढे यांची कारवाई, 1 दिवसाचा पगार कापणार, पीएमपीएमएलच्या 100 बस दुरुस्तीसाठी पाठवल्या असून 1 कोटी निधी मंजूर केला, 15 दिवसात या बस रस्त्यावर धावणार
🎯 व्यापार घडामोडी :
👉 मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 29647.42, निफ्टी : 9173.75, सोने भाव : 28,677 (प्रतितोळा), चांदी : 42,191 (प्रतिकिलो)
🎯 तंत्रज्ञान घडामोडी :
👉 मुंबई - सॅमसंग गॅलक्सी एस-8 आणि एस-8 प्लसचे अमेरिकेत लॉन्चिंग, हे दोन्ही मॉडेल्स 21 एप्रिलपासून ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार, सॅमसंगकडून यांच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा नाही
🎯 खेळ घडामोडी :
👉 नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजने विराट कोहलीची माफी मागितली, विराटच्या खांद्याची दुखापत आणि आयपीएल सहभागावरुन हॉजने विराटला टोमणे मारले होते
👉 मुंबई - मी संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाला नव्हे तर काही खेळाडूंबाबत बोललो होतो. तसंच ज्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी माझी मैत्री आहे, ती कायम असेल : विराट कोहली
👉 मुंबई - प्रो कबड्डी लीगच्या यंदाच्या हंगामात तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरयाणा या 4 संघाचा नव्याने समावेश होणार, या लीगमधील संघांची संख्या आता 12 वर
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 मुंबई - झी मराठीवरील ‘जय मल्हार’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार, या मालिकेच्या जागी आता प्रेक्षकांना नवी मालिका पाहायला मिळणार
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
ब्रेकिंग न्यूज
👉 दुचाकींवर भरघोस सूट ; लाभ घ्या
सुप्रीम कोर्टाने BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या खरेदी-विक्रीला बंदी घातल्याने हिरो मोटोकॉर्प आणि होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडियाने दुचाकींवर भरभरीत 12 हजारांची सूट दिली आहे. हिरो मोटोकॉर्पने बीएस-3 मॉडेल्सवर तब्बल 12 हजार 500 रुपयांची सूट, कंपनी स्कूटरवर 12 हजार 500, बाईक्सवर 7 हजार 500 आणि इतर मोटरसायकलींवर 5 हजारांची सवलत देत आहे.
दुस-या क्रमांकावर असणा-या होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडियानेही सवलत जाहीर केली आहे. सर्व बीएस-3 स्कूटर आणि मोटरसायकलींवर 10 हजारांची थेट सवलत देण्यात येत आहे.
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
आज आणि उद्यापर्यंतच गाड्या बूक करणाऱ्यांना ही सूट मिळणार आहे. या गाड्या खरेदी केल्यानंतर उद्यापर्यंतच नोंदणी करायची आहे. त्यानंतर या गाड्यांची नोंदणी होणार नाही. कारण 1 एप्रिलपासून BS-III इंजिन असलेल्या गाड्यांच्या नोंदणीला मनाई करण्यात आली आहे.
BS-III इंजिन असलेल्या जवळपास 6 लाख दुचाकींसह एकूण 8 लाखापेंक्षा अधिक नवी वाहनं शोरुममध्ये उभी आहेत. ही वाहने खपवण्यासाठी वाहन कंपन्यांनी हि मोठी आणि भरघोस सूट दिली आहे.
गाडी आणि मिळणारा डिस्काऊंट असा :
👉 ड्युएट, मेस्ट्रो एज, प्लेजर - 12 हजार 500 रु. सूट
👉 HFडिलस्क सिरीज - 5 हजार रुपये सूट
👉 स्प्लेंडर प्लस - 5 हजार सूट
👉 ग्लॅमर, एक्स्प्रो, आयस्मार्ट 100 - 7 हजार 500 सूट
कंपनी किंवा थेट डिलरशी थेट संपर्क साधून याबाबत अधिक माहिती जाणून घेता येईल...
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
Let's Up News Updates
🎯 राष्ट्रीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - जीएसटी विधेयक मंजूर झाल्याबद्दल देशवासीयांचं अभिनंदन, नव्या वर्षात, नवा कायदा, न्यू इंडिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी
👉 नवी दिल्ली - लोकसभेत 8 तास चाललेल्या मॅरेथॉन चर्चेनंतर अखेर वस्तू आणि सेवा कराबाबतची (जीएसटी) चारही विधेयकं मंजूर
👉 नवी दिल्ली - देशातील 13000 हून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा (आयटीआय) स्वतंत्र बोर्ड स्थापन करण्याचा केंद्राचा प्रस्ताव
👉 नवी दिल्ली - एसबीआयने कमीत कमी रक्कम बचत खात्यात ठेवणे केले बंधनकारक अन्यथा दंड भरावा लागणार
👉 छत्तीसगड - मुख्यमंत्री रमण सिंग यांनी राज्य सरकारी कर्मचा-यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्याची केली घोषणा
👉 मुंबई - मुंबईवर हवाई हल्ला होण्याचा धोका असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असल्याने 29 एप्रिलपर्यंत मुंबईत ड्रोन्सवर बंदी घालण्यात आली
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
🎯 आंतरराष्ट्रीय घडामोडी :
👉 दक्षिण कॅरोलिनाचे माजी गव्हर्नर डेव्हिड बिसले यांची जागतिक अन्न कार्यक्रमाचे (डब्ल्यूएफपी) नवे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती
🎯 राजकीय घडामोडी :
👉 नवी दिल्ली - 'आप'कडून जाहिरातीचे 97 कोटी वसूल करण्याचे उपराज्यपालांचे मुख्य सचिवांना आदेश
👉 19 आमदारांचे निलंबन मागे घेण्याबद्दल विचार सुरू; विरोधकांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेऊ - गिरीश बापट, संसदीय कार्यमंत्री
👉 राज्यात आपले सरकार येऊन अडीच वर्षे होत आली तरी निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली जात नसल्याचा एकनाथ खडसे यांचा सरकारला घरचा आहेर
🎯 प्रादेशिक घडामोडी :
👉 मुंबई - मुंबईसह कोकणात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 14 हजार 440 घरांची निर्मिती करण्याचा संकल्प म्हाडाच्या अर्थसंकल्पात जाहीर
👉 भिवंडी - काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी प्रशांत भास्करसह 4 जणांना पाचगणीतून अटक; आतापर्यंत 13 जणांना अटक
👉 मुंबई - पार्टी ड्रग्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलएसडी डॉट्सची विक्री करणारे 5 हायप्रोफाइल तरुण 70 लाख किमतीच्या एलएसडी सह ताब्यात
👉 नाशिक - इगतपुरी बॅचलर पार्टी प्रकरणातील आरोपींवर मद्य आणि अंमली पदार्थ सेवन केल्याचा गुन्हा दाखल
👉 नागपूर - 53 लाखांच्या जुन्या नोटा जप्त, तीन जण पोलिसांच्या ताब्यात, जप्त करण्यात आलेल्या सर्व नोटा 500 आणि एक हजाराच्या
👉 जळगाव - बारा चाकी ट्रक उलटून 50 गुरांचा मृत्यू झाल्याची घटना पाल येथील बाजार समितीच्या वसुली नाक्याजवळ घडली, यानंतर संतप्त ग्रामस्थांनी ट्रक पेटवून दिला
👉 जळगाव - नवापूर येथील भारत फर्निचर मार्टमध्ये लागलेल्या भीषण आगीत सागवान लाकडासह लाखो रूपयांचे नुकसान
🎯 खेळ घडामोडी :
👉 मालिका संपल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाशी हात मिळविणे टाळल्याप्रकरणी भारतीय कर्णधार विराट कोहली याला आॅस्ट्रेलियन मीडियाने बालिश आणि गर्विष्ठ संबोधले
👉 नवी दिल्ली - ‘अजिंक्य रहाणेसारखा संयमी वृत्तीचा कर्णधार उपलब्ध असणे हे टीम इंडियाचे नशीब, रहाणे स्वत:च्या स्टाईलने संघाचे नेतृत्व करतो - इयान चॅपेल
🎯 मनोरंजन घडामोडी :
👉 रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट ‘गोलमाल अगेन’मध्ये परिणीती चोप्रा दिसणार असून या चित्रपटातील सहभाग अभिमानास्पद असल्याचे तिने म्हटले
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ऑन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
6 624
👉 हिंदुस्थान एरोनोटिक्स लिमिटेडमध्ये भरती
Let's Up Job Updates
पोस्ट : मशिनिस्ट - जागा : 16 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI + NAC / ITI + NCTVT
पोस्ट : टर्नर - जागा : 21 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI + NAC / ITI + NCTVT
पोस्ट : ग्राइंडर - जागा : 11 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI + NAC / ITI + NCTVT
पोस्ट : फिटर - जागा : 95 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI + NAC / ITI + NCTVT
पोस्ट : इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक - जागा : 19 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI + NAC / ITI + NCTVT
पोस्ट : इलेक्ट्रिशियन - जागा : 03 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI + NAC / ITI + NCTVT
पोस्ट : इंस्ट्रूमेंटेशन मेकॅनिक - जागा : 08 - पात्रता : 10 वी उत्तीर्ण, ITI + NAC / ITI + NCTVT
वय : दि. 01 फेब्रुवारी 2017 रोजी 28 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 15 एप्रिल 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/0K88if
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/RrRcq8
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
👉 नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये भरती
पोस्ट : प्रशासकीय अधिकारी (Administrative Officers Scale I) - जागा : 205 - पात्रता : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
वय: दि. 01 मार्च 2017 रोजी 21 ते 30 वर्षे
फी : 600 रुपये (100 रुपये)
परीक्षा : Phase 1 - दि. 03 /04 जून 2017 I Phase 2 - दि. 02 जुलै 2017
ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 20 एप्रिल 2017
अधिक माहितीसाठी : https://goo.gl/vmsXny
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : https://goo.gl/WdZ3gF
(जॉईन लेट्स अप टेलिग्राम चॅनल, क्लिक https://t.me/letsup जॉईन लेट्स अप ओंन व्हाट्स अॅप : https://goo.gl/W5AHJW । Lets Up Magazine विषयी आपला अभिप्राय कळवा feedback@myletsup.com या मेलआयडीवर)
