ar
Feedback
LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

الذهاب إلى القناة على Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

إظهار المزيد
6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
जाणून घेऊया, सायकलविषयी सहसा माहित नसलेल्या गोष्टी LetsUpp l Special आज जागतिक सायकल दिवस. 2018 पासून हा दिवस दरवर्षी 3 जूनला साजरा केला जातो. गेल्या दोनशे वर्षांपासून सायकल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. शरीरस्वास्थ्यासह प्रदूषण कमी करण्यासाठीही सायकलिंगचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे जवळपास अंतरावर जाण्यासाठी वाहनांचा वापर न करता सायकलचा वापर करण्याचे आवाहन केले जाते. चला तर मग आज सायकलविषयी शक्यतो माहित नसलेल्या गोष्टी पाहुया... ● फ्रान्समध्ये सर्वांत पहिली सायकल बनवली होती, मात्र सायकलीचे हे मॉडर्न डिझाईन इंग्लडकडून घेतले आहे. ● जगामध्ये सर्वाधिक लांब सायकल 20 मीटरची आहे. या सायकलीवर तब्बल 35 जण बसू शकतात. ● अमेरिकेतील जॉन हॉवर्ड हे सर्वाधिक वेगाने चालवणारे सायकलवीर आहेत. त्यांच्या नावावर अनेक विक्रम असून सायकलस्वारीने ते दर तासाला 133.75 किमी अंतर पार करतात. ● नियमित सायकलिंग केल्यास हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधित आजार जडत नाहीत. सायकलिंगमुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि रक्तातील चरबीची पातळी कमी होते. ● असे म्हटले जाते की, जर जगात तीन टक्क्यांनी सायकलिंगचे प्रमाण वाढले तर, जगात होणारे अपघात 50 टक्क्यांनी कमी होतील. ● एखादी कार मेन्टेन करायला जेवढे पैसे लागतात त्यापैक्षा 20 पटीने कमी पैसा सायकलसाठी लागतो. ● एक गाडी पार्क करायला जितकी जागा लागते त्या जागेत तुम्ही 15 सायकल पार्क करू शकता. ● सायकलमुळे 238 दशलक्ष इंधनाची बचत होते. ● युकेमध्ये 20 लाखांपेक्षा अधिक सायकल्स चालवल्या जातात. ● न्युयॉर्कमध्ये 10 टक्के कामे सायकलवरून केली जातात. ● जगभरामध्ये कारच्या संख्येपेक्षा दुप्पट सायकल वापरल्या जातात. ● नियमित सायकलिंग केल्याने स्नायूंची सहनशक्तीही वाढते. ● मधुमेह प्रकार 1 आणि 2 अशा दोन्ही प्रकारच्या रुग्णांसाठी सायकलिंग वरदान आहे. ● सायकलिंग हे मानवी प्रगती आणि विकासाचे प्रतिक असल्याचे मानले जाते. ● सायकलिंगमुळे माणसाच्या चालण्याचा वेग तीनपटीने वाढतो. ● नेदरलँडमध्ये पंधरा वर्षांवरील आठपैकी सात लोकांकडे सायकल असतेच. ● जगामध्ये वर्षभरात 10 कोटी सायकल बनवल्या जातात. ● सध्या जगभरात 100 कोटी सायकल चालवल्या जातात. सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप https://letsup.app.link/UjAeggq9Lgb

अभिमानास्पद! डिसले गुरुजींची जागतिक बँकेच्या सल्लागारपदी नियुक्ती LetsUpp l Trending ● ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. जागतिक बँकेने त्यांची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ● जागतिक बँकेने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जगभरातील 12 जणांची सल्लागार म्हणून निवड केली आहे. त्यापकी एक डिसले गुरुजी आहेत. कार्यक्रमाची उद्दिष्टे : - जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक पातळीत वाढीसाठी जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात अधिक एकसूत्रता आणणे. - शिक्षकांना कालसुसंगत प्रशिक्षण देणे. - प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांमधील नेतृत्वगुण विकसित करणे आदी. डिसले गुरुजी म्हणाले : या समितीच्या माध्यमातून तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करून 21 व्या शतकातील शिक्षक घडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. ● डिसले गुरुजी यांच्या नावाने इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. To know more click here https://letsup.app.link/SwG98LYjMgb

कोविडच्या विविध व्हेरियंटचे WHO ने केले नामकरण LetsUpp | Trending ● कोविडच्या विविध प्रकारांना (व्हेरियंट) जागतिक आरोग्य संघट
कोविडच्या विविध व्हेरियंटचे WHO ने केले नामकरण LetsUpp | Trending ● कोविडच्या विविध प्रकारांना (व्हेरियंट) जागतिक आरोग्य संघटनेनं नावं दिली आहेत. ● भारत, युके आणि दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळलेल्या कोविडच्या विविध व्हेरियंटना ही नावं देण्यात आली आहेत. ● याच नावांनी यापुढे जागतिक आरोग्य संघटना संबंधित व्हेरियंटला संबोधणार आहे. ● दरम्यान देण्यात आलेली ही नावं ग्रीक भाषेतील आहेत. ● भारतातील व्हेरियंटला 'डेल्टा' आणि 'कॅपा', युकेतील व्हेरियंटला 'अल्फा', तर दक्षिण आफ्रिकेतील व्हेरियंटला 'बीटा' असं संबोधलं जाईल. नामकरणाचे कारण? एखादा व्हेरियंट सापडल्यास त्या देशाच्या नावाशी जोडू नये आणि तशी ओळख व्हायला नको, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या तांत्रिक विभागाच्या प्रमुख मारिया व्हान केरखोव्ह यांनी ट्विटद्वारे सांगितलं. To know more click here https://letsup.app.link/1wQ0u9XlJgb

photo content

राज्यभर सरासरीपेक्षा अधिक पूर्वमोसमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ LetsUpp l Trending ● राज्यात सर्वांना मोसमी पावसाची राज्याला प्रतीक्षा आहे. मात्र, यंदा राज्याच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अनेक पटीने पूर्वमोसमी पावसाची नोंद झाली आहे. ● कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. ● पूर्वमोसमी पावसामुळे राज्याच्या सर्वच विभागांतील धरणांमध्ये यंदा मागील वर्षापेक्षा अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. ● मार्च ते मे या कालावधीत पडणारा पाऊस पूर्वमोसमी म्हणून गणला जातो. मार्चच्या पूर्वीचा पाऊस अवकाळी म्हणून ओळखला जातो. ● राज्यात यंदा पूर्वमोसमी पावसात मुंबई आणि पालघर जिल्ह्य़ाची आघाडी आहे. या दोन्ही भागांत सरासरीपेक्षा तब्बल 20 पट पाऊस झाला आहे. ● पालघरमध्ये पूर्वमोसमीची टक्केवारी 1920 असून, मुंबईत ती 1376 इतकी आहे. ● ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी भागांत सरासरीच्या तुलनेत 10 ते 15 पटीने अधिक पाऊस पडला. ● मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, जळगाव आदी ठिकाणी दुप्पट ते चारपट पाऊस झाल्याचे दिसून आले. To know more click here https://letsup.app.link/VbzKVtHZIgb

या आर्थिक वर्षात विकासदर घटला LetsUpp | Trending ● या संपूर्ण आर्थिक वर्षासाठी जीडीपी 7.6% ने घटला आहे. तसंच देशाची वित्तीय तूट 2020-21 आर्थिक वर्षासाठी 9.3% राहीली आहे. जी 9.5% राहण्याचा सरकारचा अंदाज होता. ● केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. दरम्यान जानेवारी - मार्च 2021 च्या चौथ्या तिमाहीत मात्र जीडीपी 1.6% ने वाढला आहे. हा कालावधी पहिल्या लाटेनंतर लॉकडाऊन हटवून हळूहळू अर्थव्यवस्था पुन्हा निर्बंध मुक्त होतानाचा आहे. ● त्यामुळे जीडीपी पॉझिटिव्ह असेल असाच अंदाज होता. साधारण आताचे आकडे वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणेच आहेत. एप्रिल महिन्यातील वित्तीय तूट 78,700 कोटी होती. गेल्यावर्षी हीच तूट 2.79 लाख कोटी होती. ● कोरोना व्हायरसमुळे देशपातळरील लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेला गेल्या वर्षी फटका बसला होता. त्यानंतर ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये देशाच्या जीडीपीत 0.4 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली होती. एप्रिल-जूनच्या तिमाहीत मात्र जीडीपीत 23.9 टक्के इतकी घट पाहायला मिळाली होती. To know more click here https://letsup.app.link/X34Id0M1Hgb

दिलासादायक! 'पीएफ'संदर्भात केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय Letsupp | Trending ● केंद्र सरकारने नोकरदारांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सभासदांना दुसऱ्यांदा भविष्य निर्वाह निधीतील शिल्लक रकमेतून आगाऊ रक्कम काढायला परवानगी दिली आहे. ● कोरोनाच्या काळात सदस्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत मार्च २०२० मध्ये ही आगाऊ रक्कम काढण्याची विशेष तरतूद केली होती. यामुळे सहा कोटी नोकरदारांना फायदा होणार आहे. ● श्रम आणि रोजगार मंत्रालयाने, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना, १९५२ मध्ये उप-परिच्छेद (३) ची, परिच्छेद ६८Lअंतर्गत भर घालत सुधारणा केली आहे. तशी अधिकृत गॅझेटमधे अधिसूचनाही दिली आहे. ● या तरतुदीनुसार, ३ महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्त्याइतकी किंवा तुमच्या इपीएफ खात्यात असलेल्या रकमेपैकी ७५ टक्के रक्कम, यापैकी कमी असेल इतकी बिगर परतावा रक्कम उपलब्ध केली जाईल. ● दरम्यान, सदस्य यापेक्षा कमी रकमेसाठीही अर्ज करु शकतात. कोविड -१९ काळात आगाऊ रक्कम काढण्याची सुविधा ईपीएफ सदस्यांना फायदेशीर ठरली आहे. To know more click here https://letsup.app.link/y9MjYVz0Hgb

ब्रेकिंग! मराठा समाजासाठी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मार्ग मोकळा, सरकारने काढला जीआर LetsUpp | Breaking ▪️ महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना 10 टक्के ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. ▪️ तसेच शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10% आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ▪️ त्याबरोबर सरळ सेवा भरतीतही मराठा उमेदवार आरक्षणाचा 10% लाभ घेऊ शकणार आहेत. ▪️ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. . ▪️ दरम्यान, मराठा आरक्षण रद्द झाल्यावर मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षण लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून तसा अध्यादेश राज्य सरकारने जारी केला आहे. To know more click here https://letsup.app.link/Sla9pXvHHgb

राज्यातील नवे निर्बंध; तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे To know more click here https://letsup.app.link/FsDCpVDyHgb

उद्धव ठाकरेंनी ज्यांचे कौतुक केले त्या 21 वर्षांच्या महिला सरपंचाविषयी जाणून घ्या To know more click here https://letsup.app.link/P9OOirixHgb

ब्रेकिंग! मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा निनावी फोन, तपास सुरु LetsUpp | Breaking ▪️ मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे. ▪️ मंत्रालयातील कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे. ▪️ निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून कथित बॉम्बचा तपास सुरु आहे. ▪️ साधारण एक तासाभरापूर्वी धमकीचा निनावी फोन मंत्रालयाला आला होता. ▪️ एक संशयित वस्तू मंत्रालय परिसरात ठेवण्यात आल्याचं फोनवरुन सांगण्यात आलं असल्याची माहिती मिळत आहे. ▪️ त्यानुसार बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलीसांचं पथक याठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. ▪️ तसेच मोठा फौजफाटाही मंत्रालय परिसरात तैनात करण्यात आला आहे. ▪️ दरम्यान, मंत्रालयाच्या आतल्या बाजूला पोलिसांसोबतच बॉम्बशोधक पथक कोणती संशयास्पद वस्तू आहे का याचा शोध घेत आहे. To know more click here https://letsup.app.link/Ftyixnc2Fgb

लष्करात सामील होत शहीद पतीला तिची श्रद्धांजली LetsUpp | Trending ● जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची पत्नी निकिता कौल भारतीय सैन्यात दाखल झाल्या आहे. ● एका विशेष समारंभात कौल यांनी लष्करी सेवेत प्रवेश केला. ● लष्कराचे उत्तर कमांडचे लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी यांनी त्यांना लष्करी गणवेशाची मानचिन्हे प्रदान केली. ● सैन्यात भरती झाल्यानंतर त्या आता 'लेफ्टनंट निकिता धौंडियाल' बनल्या आहे. *वर्षाच्या आतच पतीचे छत्र हरपले* ● विवाहाला वर्षही झाले नाही तोच दहशतवाद्यांच्या हल्ल्यात निकिता यांच्या पतीचे निधन झाले. ● निकिता यांनी बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून पतीच्या स्मृतीसाठी लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. ● 29 वर्षीय निकिता यांनी तमिळनाडूत 01 वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून लष्करात प्रवेश केला आहे. *To know more click here* https://letsup.app.link/VEaYmLiTFgb

*अभिनय ते राजकारण असा प्रवास करणारे परेश रावल* LetsUpp | Special ◆ अभिनय ते राजकारण असा प्रवास करणारे परेश रावल यांचा जन्म ३० मे १९५० रोजी झाला. २०० पेक्षा अधिक चित्रपट आणि विनोदी ते खलनायक अशा वेगवेगळ्या भूमिका परेश यांना साकारल्या आहेत. जाणून घेऊया त्यांच्या विषयी सविस्तर ... ◆ अक्षय कुमार व परेश रावल यांची जोडी कमालीची गाजली. या जोडीने जवळपास २३ सिनेमे एकत्र केले आहेत. ◆ हेराफेरी (२०००) आणि फिर फेराफेरी (२००७) या चित्रपटांनी सगळ्या देशाला ऑल टाईम फेव्हरेट असलेला बाबुराव गणपतराव आपटे दिला. ◆ अंदाज अपना अपना, दिलवाले, तमन्ना, सरदार, मालामाल विकली, भागम भाग, गोलमाल, छुपछुपके, वेलकम, ओ मायगॉड, ◆ त्यांचा विवाह मिस इंडिया राहिलेल्या स्वरूप संपत यांच्यासोबत झाला आहे. १९७९ मध्ये स्वरूप संपत यांनी मिस इंडिया किताब जिंकला होता. ◆ परेश आणि स्वरूप पहिल्यांदा १९७५ मध्ये एकमेकांना भेटले होते. दोघेही तेव्हा कॉलेजात शिकत होते. स्वरूप यांना पहिल्यांदा पाहताच परेश त्यांच्या प्रेमात पडले होते. ◆ २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्कार, १९९४ मध्ये सहाय्यक भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, बेस्ट कॉमेडियनचा फिल्मफेअर अवॉर्ड. ◆ भारतीय जनता पक्षाकडून अहमदाबाद पूर्व लोकसभा मतदार संघाचे खासदार होते. ◆ NSD (National School of Drama) चेअरमन आहेत. *सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* https://letsup.app.link/McpxVxJHFgb

*बारावीची परीक्षा रद्द करण्याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका* *LetsUpp | Trending* ● सीबीएसई 12 वीची बोर्ड परीक्षा रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ● यावर्षी बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल............. *To know more click here* https://letsup.app.link/lRyur4CRfgb

IMG-20210514-WA0000.jpg0.33 KB

⚡ ताज्या बातम्या 👨🏻‍💼 EXCLUSIVE मुलाखती 👸🏻 मसालेदार मनोरंजन 👩🏻‍⚕️ आरोग्य सल्ले 👨🏻‍🌾 शेती विषयक माहिती 👮🏻‍♂️ भरती विषयक माहिती 👩‍💻 नोकरी विषयक माहिती 🤩 आणि बरंच काही फक्त LetsUpp App वर! 📲 लेट्सअप ॲप डाऊनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा 👇 https://letsupapp.page.link/apps

*देशातील पहिल्या साखर कारखान्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ* *To know more click here* https://letsup.app.link/t6dvcweIfgb

*परिवहन मंडळाच्या नव्या आदेशानुसार 'त्यांचा' मोफत प्रवास बंद* *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* https://letsup.app.link/89ES99Ju5cb

*विद्या बालनचा 'नटखट' ऑस्करच्या शर्यतीत* *To know more click here* https://letsup.app.link/ubNvlCWs5cb

*🤓 नवीन वर्षात करूया एकच संकल्प 'निरोगी राहण्याचा'!* 💁‍♂️ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय निरोगी राहण्याचे मार्ग. 📍 थर्मामीटर,
*🤓 नवीन वर्षात करूया एकच संकल्प 'निरोगी राहण्याचा'!* 💁‍♂️ आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय निरोगी राहण्याचे मार्ग. 📍 थर्मामीटर, हीटिंग बॅग, फेस मास्क, वजनकाटा आणि ब्लड प्रेशर मॉनिटर आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. 👍 आपला व आपल्या कुटुंबाचा विचार करता खालील गोष्टी आपल्या घरात असणे गरजेचे आहे. ● हीटिंग बॅग : https://amzn.to/3pmy7T2 ● थर्मामीटर : https://amzn.to/3aBFu4R ● कॉटन 3 लेयर पुन्हा वापरण्यायोग्य फेस मास्क : https://amzn.to/38BBSNo ● डिजिटल इलेक्ट्रॉनिक वजनकाटा : https://amzn.to/3rnRpch ● डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर : https://amzn.to/2WOCd9X 🎯 एक क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता व आपल्या कुटुंबाला सुरक्षित करू शकता. (ADVT) *To know more click here* https://letsup.app.link/YPEFU31Ftcb