LetsUpp Marathi
الذهاب إلى القناة على Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
إظهار المزيد6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
6 624
चंद्रपुरात बार मालकाच्या आनंदाला उधाण; मंत्री वडेट्टीवारांच्या फोटोचं केलं औक्षण!
Letsupp | Trending
● चंद्रपूर जिल्ह्यात ६ वर्षांनी दारुविक्रीवरील बंदी हटली आहे. त्यामुळे बारमालक आणि मद्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांचा हा आनंद आता एका व्हिडीओतून समोर आला आहे. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
● या व्हिडिओत एक बारमालक चक्क चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा करताना दिसत आहे. चंद्रपुरात दारुबंदी उठवल्यामुळे मद्यप्रेमींच्या आनंदाला उधाण आलं आहे. या आनंदात एक बारमालक तर थेट वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा करत आहे.
● हा व्हिडिओ चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमधाला असल्याचं उघड झालं आहे. त्याने आपल्या बारमध्ये वडेट्टीवार यांचा फोटो लावला आहे. त्या फोटोची बारमालक आरती करत असल्याचा व्हिडीओही समोर आला आहे.
● यावेळी फोटोची पूजा करणारे बारमालक गणेश गोरडवार यांनी “शहरात पुन्हा आनंद आला आहे. विजय भाऊंनी खूप चांगलं काम केलं आहे. आम्हाला त्यांच्या कामाबद्दल इतका आनंद झाला की आम्ही थेट त्यांच्या फोटोची आरती केली. कारण ते आजच्या परिस्थितीत आमच्यासाठी देवच ठरले आहेत. जो आमचं पोट भरतो तोच आमचा देव. जे मद्यविक्रेते आहेत त्यांच्या सगळ्यांची एकच भावना होती. आम्ही सगळे विजय वडेट्टीवार यांची भेट घेणार होतो. त्यांची खूप मेहरबानी आहे. त्यांच्यामुळे चंद्रपुरात खुशीयाली आली”, अशी प्रतिक्रिया दिली.
To know more click here
https://letsup.app.link/4YAqUSrSLhb
6 624
36 महापालिका क्षेत्रात एकही कोरोनाचा मृत्यू नाही
LetsUpp | Trending
● राज्यात काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. आज 8,992 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 10 हजार 458 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.
● राज्यात आतापर्यंत 59 लाख 440 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.08 टक्के आहे.
● राज्यात आज 200 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.03 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.
● राज्यात सध्या 1 लाख 12 हजार 231 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यवतमाळ (23), हिंगोली (86), गोंदिया (80) या तीन जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16,636 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
● मालेगाव, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 1170 रुग्णांची नोंद झाली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/iTISfnuTKhb
6 624
इंधन दरवाढीचा भडका; मुंबईत आज पेट्रोल ३४ पैशांनी तर डिझेल २८ पैशांनी महागलं
LetsUpp | Trending
⚡ गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत असून आज पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे.
⛽ मुंबईत आज पेट्रोल ३४ पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी १०६.९३ रुपये मोजावे लागतील. तर डिझेलच्या दरात वाढ २८ पैशांची वाढ झाली. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर ९७.४६ रुपये आहे.
👉 सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला असून अनेक राज्यात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तर डिझेलच्या किमतीत देखील वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
📍 दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोलचे दर ३५ पैशांनी वधारले आहेत. तर डिझेल २६ पैशांनी महागले आहे. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे १००.९१ रुपये आणि ८९.८८ रुपये मोजावे लागतील.
'या' राज्यात पेट्रोलच्या दराची शंभरी पार : दिल्ली, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, जम्मू-कश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, लद्दाख आणि सिक्किममध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे.
To know more click here
https://letsup.app.link/2Z2Iea8GLhb
6 624
मोठी बातमी! जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकीबाबत मोठी घोषणा
LetsUpp | Trending
● कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरलेली नसतांनाच तिसऱ्या लाटेची आणि ‘डेल्टा प्लस’चा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू आहेत.
● राज्यातील 5 जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी येथे केली.
● मदान यांनी सांगितले की, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै रोजी मतदान होणार होते; परंतु 7 जुलै रोजी राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.
● सर्वोच्च न्यायालयाचे 6 जुलै रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविड-19 बाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आज आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या.
● त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असे मदान यांनी सांगितले.
To know more click here
https://letsup.app.link/lphcRp2JKhb
6 624
प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांच्या रजेवर
LetsUpp | Trending
✨ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीन महिन्यांच्या रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
💫 वैयक्तिक कारणासाठी ते तीन महिन्यांच्या रजेवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.
✨ पक्षाचे आंदोलन आणि निवडणुकीचा कार्यक्रम सुरळीत सुरू राहण्यासाठी रेखा ठाकूर यांच्याकडे पक्षाच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
👉 प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः सोशल मीडियातून ही घोषणा केली. मात्र, सुट्टीचे कारण स्पष्ट न केल्याने विविध तर्क लढविले जात आहेत.
💫 त्यांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत असून आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून, शुक्रवारी हेल्थ बुलेटीन देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
📍 आंबेडकर यांनी व्हिडिओद्वारे आपल्या सुट्टीची घोषणा केली होती. ५ जिल्ह्यांत निवडणूका आहेत. ठिकठिकाणी आंदोलनेही सुरू आहेत.
📌 दरम्यान, रेखा ठाकूर यांच्याकडे प्रभारी पद देण्यात आले असून, अरुण सावंत आणि जिल्हा कमिटी त्यांना सहकार्य करतील, असे आंबेडकरांनी स्पष्ट केलं आहे.
To know more click here
https://letsup.app.link/OJfudXn6Jhb
6 624
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत जमावबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
LetsUpp | Trending
📝 संपूर्ण जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मनाई आदेश जारी केले आहेत.
👉 जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले की, कलम 37 (1) नुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगण्यास मनाई असणार आहे.
👮 तसेच कलम 37 (3) नुसार जिल्ह्यात ५ अगर त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे व सभा घेणे या कृत्यास मनाई असणार आहे.
📍 हा आदेश ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीच्या संदर्भात आवश्यक वस्तू हाताळाव्या लागतात.
⚡ तसेच ज्या व्यक्तींनी परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही.
📌 दरम्यान, आदेशाचे उल्लंघन केल्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहणार असल्याचं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.
To know more click here
https://letsup.app.link/NIChZpY1Jhb
6 624
बाजार समित्यांमधून शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख कोटी रुपये
LetsUpp | Trending
▪️ आता बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपये दिले जाणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
▪️ केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसर्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली.
▪️ या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच जगभरात नारळ व्यवसाय वाढवण्यावर भर दिला जाईल.
▪️ यासह नारळ मंडळामध्ये सीईओची नेमणूक केली जाईल. त्याचप्रमाणे एपीएमसी मंडई आणखी मजबूत करण्यात येतील.
▪️ कृषी बाजारपेठेस अधिक संसाधने दिली जातील. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार असल्याचे कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी स्पष्ट केलं आहे.
To know more click here
https://letsup.app.link/gJWqGzbbJhb
6 624
२० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण; मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा शुभारंभ
LetsUpp | Trending
● कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यांत २० हजार युवकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.
● कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्राला भरीव मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. या योजनेतून आरोग्य क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
● मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमास उद्योजकता मंत्री नवाब मलिक, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षणार्थी उमेदवार दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण
● महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यातील ३४८ वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये तसेच उत्कृष्ट खाजगी रुग्णालये यांना प्रशिक्षण केंद्र म्हणून नोंदीत करण्यात आले आहे. प्रशिक्षणासह ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
● राज्यात ५०० प्रशिक्षण केंद्रे कार्यन्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांमधून २० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे उद्धिष्ट आहे. यातील ५ हजार उमेदवारांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता राज्यातील युवक, युवतींनी कौशल्य विकास विभागाच्या https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे.
To know more click here
https://letsup.app.link/0xj8V4I8Ihb
6 624
सौरभ गांगुली भारतीय क्रिकेटमधील दादा
LetsUpp | Special
🏆 सौरभ गांगुली क्रिकेटमधील दादा फलंदाज मानला जातो. भारताचा तो सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. २००३ च्या विश्वकरंडकात त्याच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने उपविजेतेपदापर्यंत मजल मारली होती. त्याने 'टीम इंडिया'ला अनेक देदीप्यमान विजय मिळवून दिले आहेत.
🔥 आक्रमक फलंदाजी हे त्याच्या फलंदाजीचे वैशिष्ट्य आहे. बेंगॉल टायगर, प्रिन्स ऑफ कोलकता, महाराजा व दादा या नावानेही त्याला संबोधले जाते.
🙏 १९९६ मध्ये इंग्लंडमध्ये क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्या लॉर्डसवर त्याने पदार्पणातल्या कसोटी शतक ठोकले होते. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेट विश्वातला तो केवळ तिसरा खेळाडू आहे. भारताकडून १०० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेला हा सातवा खेळाडू आहे.
💁♂️ भारताकडून ३००पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे. त्याच्या नावे १५ कसोटी शतके आणि २२ एकदिवसीय सामन्यांत शतके आहेत. एकदिवसीय सामन्यांत १०,००० पेक्षा जास्त धावा आहेत. ऑफ साइडचा बादशहा म्हणून तो ओळखला जातो.
👉 १९९९ च्या विश्वकरंडकात श्रीलंकेविरूध्द त्याने १८३ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर एकाच वर्षांत तो कर्णधार बनला. सौरभ कर्णधार असताना भारताने विक्रमी २१ कसोटी सामने जिंकले आहेत. ४९ कसोटी सामन्यात त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळले.
🤦♀️ कर्णधार म्हणून आक्रमक कामगिरी करत असताना त्याच्या स्वतःच्या खेळावर मात्र विपरीत परिणाम झाला. त्यातच ग्रेग चॅपेल प्रशिक्षकपदी आल्यानंतर त्यांच्याशीही त्याचे वाद झाले. यातून त्याला संघातील स्थानही गमवावे लागले.
🏏 त्यानंतर तो पुन्हा संघात परतणार की नाही अशी स्थिती असताना त्याने यशस्वी पुनरागमन केले. आपला जुना फॉर्म कायम असल्याचे त्याने त्यानंतरच्या फलंदाजीत दाखवून दिले होते.
6 624
तब्बल 85 दिवस लढले; मृत्यूवर केली मात!
LetsUpp l Positive News
💁♂️ देशात कोरोना आणि ब्लॅक फंगसने थैमान घातले आहे. यामध्ये अनेकांना आपल्या जवळची माणसं गमवावी लागली आहेत. उपचारादरम्यान काही जणांचा मृत्यू झाला आहे. असं असताना एक सकारात्मक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने कोरोना, ब्लॅक फंगस, ऑर्गन फेलसह इतर आजारांविरोधातील लढाई ते यशस्वीरित्या जिंकली आहे.
💁♀️ तब्बल 85 दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी गंभीर आजारावर मात केली आहे. भरत पांचाळ असं या 54 वर्षीय व्यक्तीचं नाव असून ते मुंबईचे रहिवासी आहेत. तीन महिन्यांनंतर त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पांचाळ यांनी कोरोना, ब्लॅक फंगसची लागण झाली होता. तसेच त्याचे ऑर्गन देखील फेल झाले होते. कोरोना संक्रमणामुळे त्यांची किडनी, लिव्हर आणि फुफ्फुस काम करायचं बंद झाले होते.
🤒 मल्टी ऑर्गन फेल्यूअर आणि ब्लॅक फंगसचा देखील त्यांना सामना करावा लागला. जवळपास 70 दिवस ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. मात्र त्यांनी जगण्याची जिद्द सोडली नाही. डॉक्टरांनी गेल्या 15 दिवसांत इतक्या गंभीर समस्या असलेला पहिला रुग्णा पाहिल्याचं म्हटलं आहे.
💉 डॉक्टरांनी त्यांच्यावर रेमडेसिवीरपासून प्लाझ्मा थेरपी आणि इतरही उपचार केला मात्र त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. डॉक्टरांची चिंता वाढली होती. मात्र त्यानंतर भरत पांचाळ हे बरे झाले आहेत. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे आणि तब्बल 85 दिवसांनी त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची पॉझिटिव्ह बातमी वाचा एका क्लिकवर
https://letsup.app.link/2SkZcXxGIhb
6 624
ब्रेकिंग! दिल्लीतील CBI मुख्यालयाला भीषण आग; ५ बंब दाखल
LetsUpp | Trending
● नवी दिल्लीतील केंद्रीय तपास संस्था सीबीआय (CBI) च्या मुख्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. अचानक आग लागल्याने सीबीआयचे सारे अधिकारी इमारती बाहेर आले आहेत. इमारतीमध्ये धुराचे लोट असून अग्निशामन दल पोहोचले आहे.
● फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. सीबीआयचे हे कार्यालय दिल्लीच्या लोधी रोडवर आहे. आग कशी लागली, कोणत्या फ्लोअरवर लागली याची माहिती अद्याप मिळाली नाही.
● सीबीआयच्या या मुख्यालयामध्ये महत्वाचे अनेक कागदपत्र असतात. यामुळे या आगीतून काय नुकसान झाले, त्याच्या मागचे कारण काय आदी गोष्टी देखील समोर येणे गरजेचे आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
● इमारतीच्या पार्किंगसाईटमध्ये ही आग लागल्याचे समजते आहे. यामुळे इमारतीमध्ये देखील धूर पसरला आहे. यामुळे अधिकाऱ्यांनी धूर पाहून इमारतीबाहेर बचावासाठी धाव घेतली.
To know more click here
https://letsup.app.link/qAs4w50EIhb
6 624
महाराष्ट्रातील २ मंत्र्यांसह १२ मंत्र्यांकडून घेतला राजीनामा!
LetsUpp | Trending
● केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात ४३ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. १२ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातीन दोन मंत्र्यांचा समावेश आहे.
● केंद्रीय मंत्रिपदावरून राजीनामा दिलेल्या १२ जणांची यादी
१. डी.व्ही.सदानंद गौडा
२. रवीशंकर प्रसाद
३. थवारचंद गेहलोत
४. रमेश पोखरियाल निशंक
५. डॉ. हर्षवर्धन
६. प्रकाश जावडेकर
७. संतोश कुमार गंगवार
८. बाबुल सुप्रियो
९. संजय शामराव धोत्रे
१०. रतनलाल कटारिया
११. प्रताप सारंगी
१२. देबश्री चौधरी
To know more click here
https://letsup.app.link/duRvJdJuHhb
