LetsUpp Marathi
الذهاب إلى القناة على Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
إظهار المزيد6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगाना लवकरच घरबसल्या बँकिंगसेवा उपलब्ध होणार, या आदेशाची अंमलबजावणी 31 डिसेंबरपर्यंत सुरू करण्याची आरबीआयची सूचना
2. नवी दिल्ली - भविष्य निर्वाह निधीधारकांना या वर्षी रिटायरमेंट कॉर्पसवर कमी व्याजदर मिळण्याची शक्यता
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - आशियान शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री मोदी फिलिपिन्सला रवाना; सोमवारी ट्रंप यांच्याशी होऊ शकते बैठक
4. नवी दिल्ली - अमेरिकेकडून पाकिस्तानला ‘फंडिंग’ सुरूच, 70 कोटी डॉलरचा प्रस्ताव मंजूर, अमेरिका आघाडी सहायता निधीकडून (सीएसएफ) ही रक्कम पाकिस्तानला देण्यात येणार
5. इस्लामाबाद - मुंबई 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदच्या खात्म्यासाठी परदेशी यंत्रणांनी आठ कोटीची सुपारी दिली, पाकिस्तान दहशतवाद विरोधी पथकाचा दावा
6. बांगलादेश - भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे बांगलादेशाचे पहिले हिंदू सरन्यायाधीश सिन्हांचा राजीनामा, ऑस्ट्रेलियातून त्यांनी राष्ट्रपती अब्दुल हामिद यांच्याकडे राजीनामा पाठवला
7. बनासकांठा - आम्ही भाजप आणि मोदींच्या चुकांकडे बोट दाखवतो. मात्र आम्ही पंतप्रधानपदाचा अपमान करत नाही : राहुल गांधी
8. बेंगळुरू - मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करीत नाही किंवा अभिनेत्याने राजकारणात जावे मला पटत नाही : प्रकाश राज
9. चित्रकूट - मध्य प्रदेशमधील चित्रकूट विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला दणका, काँग्रेसच्या उमेदवाराने भाजप उमेदवाराचा तब्बल 15 हजारापेक्षा जास्त मतांनी केला पराभव
10. मुंबई - गेल्या चार दिवसात वेगवेगळ्या प्रकरणात तब्बल 18 पोलिसांवर गुन्हे दाखल, पोलिसांच्या या कारनाम्यांमुळे पोलिस दलाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह
11. कोल्हापूर - अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी कोणाचीही गय करणार नाही : विश्वास नांगरे पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक
12. वर्धा - राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नोकरभरतीत होणारी थेट मुलाखत पद्धत बंद, आता लेखी परीक्षा घेऊनच ज्यांची पात्रता असेल त्यांनाच नोकरी मिळेल : दिवाकर रावते, परिवहन मंत्री
13. नाशिक - सामनामधून रोज मी नवनवीन वाचतो. पण शिवसेनेची भूमिका अजून मला समजलेली नाही. त्यामुळे भाजपचं सरकार पुढची दोन वर्ष आरामात काढेल : शरद पवार
14. विविध प्रकारच्या फाईल्सच्या सुलभ देवाण-घेवाणीसाठी गुगल फाईल्स गो अॅप हे प्रयोगात्मक अवस्थेत सादर, यात ब्ल्युटुथ तंत्रज्ञानाच्या मदतीने अतिशय वेगाने विविध प्रकारच्या फाईल्स शेअर करता येणार
15. दुबई - आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा आपआपला दृष्टीकोन असतो. त्या विचारांचा सन्मान करणे गरजेचे, टीकाकारांना एमएस धोनीचे खास शैलीत प्रत्युत्तर
16. मुंबई - ‘देवा’ या बहुचर्चित सिनेमाचे ‘रोज रोज नव्याने’ हे गाणे लाँच, या गाण्यांमार्फत सोनू, श्रेया आणि अमितराज ही जोडी प्रथमच एकत्र
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - दिल्लीत सोमवारपासून ऑड-ईव्हन लागू होणार नाही, दिल्ली सरकारचा वायू प्रदुषणावरुन घेतलेल्या निर्णयावरुन यू-टर्न, सोमवारी पुन्हा हरित लवादाकडे जाणार
2. श्रीनगर - पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे आणि तो पाकिस्तानकडून कोणी हिसकावून घेऊ शकत नाही : जेष्ठ नेते फारुख अब्दुल्ला
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. गांधीनगर - काँग्रेस आणि देशातील जनतेच्या दबावामुळेच भाजप सरकारला ‘जीएसटी’त भरघोस कपात करावी लागली : राहुल गांधी
4. नागपूर - सरकारचे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष, कृषी उत्पन्नाचे बाजार मूल्य शास्त्रीय पद्धतीने ठरवणे ही काळाची गरज असून त्या दृष्टीने सरकारने प्रयत्न करावे : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
5. ढाका - बांग्लादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू समाजाच्या वस्तीवर जमावाने केला हल्ला, 30 घरे जाळली
6. मुंबई - टाटा मोटर्स कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्ष 2017-18च्या सप्टेंबर तिमाहीत कंपनीला 2,502 कोटी रुपयांचा नफा
7. मुंबई - गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ‘इफ्फी’मधून दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘न्यूड’ हा चित्रपट वगळण्यात आला
8. सांगली - अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरणी आणखी 7 पोलीस कर्मचारी निलंबित, ठाणे अंमलदारासह मदतनीसाचंही निलंबन
9. पुणे - मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर कारची टँकरला धडक, तीन ठार, किवळे पुलावर भरधाव कारने अज्ञात वाहनाला धडक दिली
10. ट्विटरने आपल्या युजर्सला आता 20 शब्दांऐवजी 50 शब्दांचे डिस्प्ले नेम वापरण्याची सुविधा प्रदान करण्याची केली घोषणा
11. मुंबई - मधली फळी भक्कम करण्यासाठी सुरेश रैना किंवा युवराज सिंग दोघांपैकी एका कुणालातरी संधी द्यायला हवी : सुनील गावसकर
12. नवी दिल्ली - श्रीलंका कसोटी मालिकेदरम्यान म्हणजेच 23 नोव्हेंबरला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार त्याची प्रेयसी नुपूरसोबत लग्न बंधनात अडकणार
13. मुंबई - परश्या अर्थातच अभिनेता आकाश ठोसर बॉलिवूडमध्ये अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटातून पदार्पण करणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - 177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर, तर 50 वस्तूंवरील 28 टक्के जीएसटी कायम, जीएसटी परिषदेच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
2. नवी दिल्ली - केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता नवे घर बांधण्यासाठी अथवा खरेदी करण्यासाठी 8.50 टक्के व्याज दराने 25 लाख रूपये कर्ज मिळणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - एकटे 'तेजस' भारताचे संरक्षण करण्यास असमर्थ, टेक्नॉलॉजीमध्ये ग्रिपेन, एफ-16 तेजसपेक्षा सरस : इंडियन एअर फोर्स
4. नवी दिल्ली - लोकनीती-सीएसडीएस सर्वेक्षणानुसार गुजरात जनमत चाचणी, भाजपला 113-121 जागा, पाटीदार फॅक्टर ठरणार निर्णायक
5. नवी दिल्ली - कुमार विश्वास यांच्यासह ‘आप’च्या आठ नेत्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, निवडणूक आयोगापासून संपत्तीची माहिती लपवली
6. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 33314.56, निफ्टी : 10321.80, सोने भाव : 29,610 (प्रतितोळा), चांदी : 39,735 (प्रतिकिलो)
7. मुंबई - मुंबई शहरातील शाळांमधील 10 ते 19 वयोगटातील प्रत्येक चार मुलांमधील एकजण (25 टक्के) धूम्रपान तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी, सर्वेक्षणातून माहिती उघड
8. मुंबई - येत्या 18 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी राज्य सरकार पुरस्कृत अघोषित लोडशेडिंग केले जाणार, राज ठाकरे यांच्या फेसबुक पेजवरून आवाहन
9. मुंबई - 2022 साली प्रत्येकाला घर ही कल्पना प्रत्यक्षात येईल आणि त्यासाठी एमएमआरडीए परिसरात 50 हजार स्वस्त घर उपलब्ध करुन दिली जातील : विनोद तावडे, शिक्षणमंत्री
10. पुणे - मुंबई हायकोर्टाकडून पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना एक आठवड्यासाठी अंतरिम जामीन मंजूर
11. सांगली - अनिकेत कोथळे मृत्यू प्रकरण, अवैध धंद्यांची कुणकुण लागल्याने अनिकेतची हत्या, कुटुंबीयांचा धक्कादायक आरोप
12. फ्लिपकार्ट 'बिलीयन कॅप्चर प्लस' नावाचा स्मार्टफोन बाजारात लाँच करण्याच्या तयारीत, येत्या 15 नोव्हेंबरपासून फ्लिपकार्टवर या फोनची विक्री सुरु होणार
13. कोलकाता - धोनीवरील टिकेला आम्ही फार महत्व देत नाही, धोनी काय आहे हे आम्हाला माहित आहे, धोनी आपल्या संघासाठी एक समर्पित खेळाडू आहे : रवी शास्त्री
14. नवी दिल्ली - 'पद्मावती'वर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, सेन्सॉर बोर्डाने सिनेमाला अद्याप सर्टिफिकेट दिलेले नाही, त्यामुळे आम्ही दखल देऊ शकत नाही, कोर्टाचे स्पष्टीकरण
15. मुंबई - अभिनेता सलमान खानचा 'रेस 3' तर ऐश्वर्या रायचा 'फॅनी खान' ईदला एकाच दिवशी प्रदर्शित होणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - मोबाईल क्रमांक आधारशी न जोडल्यास बंद होणार नाही, दूरसंचार विभागाने दिले स्पष्टीकरण
2. नवी दिल्ली - टेरर फंडिंग प्रकरणी अटक करण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक भगवान सिंग यांना दिल्ली पोलिसांनी केले निलंबित
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना आम आदमी पक्षातर्फे राज्यसभेत जाण्याची संधी मिळण्याची शक्यता
4. गुरुग्राम - परीक्षा आणि पालक-शिक्षक मीटिंग टाळण्यासाठी अकरावीच्या विद्यार्थ्याने प्रद्युम्न ठाकूरची हत्या केली, सीबीआयची खळबळजनक माहिती
5. आग्रा - यमुना एक्सप्रेस-वेवर धुक्यामुळे भीषण अपघात, तब्बल 50 गाड्या एकमेकांवर येऊन धडकल्या, यात अनेक जण गंभीर जखमी
6. चंद्रपूर - 27 हजार रूपयाचे ब्राउन शुगर जप्त, 2 लाख 5 हजार 380 रुपये रोख व दोन मोबाईलही जप्त, रामनगर पोलिसांची करवाई दोघांना अटक, 6 जण ड्रग्सचे सेवन करत होते
7. सोल - उत्तर कोरियाच्या वाढत्या अण्वस्त्र सज्जतेला आवर घालण्यासाठी चीनची मदत मोलाची आहे : डोनाल्ड ट्रम्प
8. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 33218.81, निफ्टी : 10303.20, सोने भाव : 29,478 (प्रतितोळा), चांदी : 39,827 (प्रतिकिलो)
9. मुंबई - महाराष्ट्रातील 27 आरटीओमध्ये वाहन फिटनेस चाचणी बंद, 250 मीटरचे टेस्ट ट्रँक उपलब्ध नसल्याने आरटीओने घेतला निर्णय
10. ठाणे - ठाणे जिल्हा परिषदेच्या तसेच जिह्यातील पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकींचे बिगुल वाजले, 13 डिसेंबर रोजी होणार मतदान
11. कर्जत - आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसून, तो विचार कार्यकर्त्यांनी मनातून काढून टाकावा : शरद पवार
12. सांगली - सांगली पोलिसांच्या थर्ड डिग्रीमुळे तरुणाचा (अनिकेत कोथळे) मृत्यू, याप्रकरणी पोलीस निरीक्षकासह पाच जणांना अटक
13. पुणे - गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी सत्र न्यायालयाने डी. एस. कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला, अटक होण्याची शक्यता
14. हॉटस्टार या आघाडीच्या व्हिडीओ ऑन डिमांड सेवेतर्फे आता टिव्हीसाठी स्वतंत्र अॅप सादर
15. आशियाई महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या मेरी कोमला सुवर्णपदक, उत्तर कोरियाच्या किम ह्यांग मीचा केला पराभव
16. मुंबई - संजय लीला भन्साळी यांच्या बहुचर्चित 'पद्मावती' चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित, हा चित्रपट आता 30 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारची तयारी, नोटाबंदी आणि जीएसटीनंतर आता बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यासंबंधी निर्णय घेतला जाऊ शकतो
2. नवी दिल्ली - रेल्वेला एक तासाहून अधिक उशिर झाला तर प्रवाशांना एसएमएस पाठवून माहिती देण्यात येणार : रेल्वे मंत्रालय
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - एचडीएफसी बँकेने ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचे चार्ज हटवले, ग्राहकांना आता NEFT आणि RTGS सेवा वापरताना कोणताही चार्ज लागणार नाही
4. नवी दिल्ली - 2जी स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणी विशेष सीबीएय न्यायालयाची सुनावणी स्थगित, 5 डिसेंबरला न्यायालय देणार निकालाची तारीख
5. नवी दिल्ली - प्रदूषित हवेमुळे 19 नोव्हेंबरला होणारी एअरटेल दिल्ली हाफ मॅरेथॉन रद्द करण्याची इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
6. श्रीनगर - जैशचा प्रमुख मसूद अजहरचा पुतण्या तल्हा राशिद काश्मीरमध्ये सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत ठार
7. अहमदाबाद - नोटाबंदी ही मोठी चूक, काळा पैसेवाल्यांना पकडलंच नाही, जीएसटीमुळे छोटे व्यापारी उद्ध्वस्थ, सामान्य नागरिकांनाही त्रास : मनमोहन सिंह
8. वॉशिंग्टन - अमेरिकेत दहशतवादाप्रकरणी भारतीय तरुणाला (याहा फारुख मोहम्मद ) 27 वर्षे आणि 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
9. कॅनबेरा - ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यासह सर्वच 226 खासदारांना आपल्या नागरिकत्वाचा पुरावा द्यावा लागणार, ऑस्ट्रेलियात संवैधानिक संकट
10. चेन्नई - साऊथचे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी आपण तामिळनाडूचा मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास केला व्यक्त
11. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 33370.76, निफ्टी : 10350.20, सोने भाव : 29,415 (प्रतितोळा), चांदी : 39,784 (प्रतिकिलो)
12. मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट, दोघांच्या भेटीमुळे राजकीय भूंकप होणार का?, चर्चा सुरू
13. गुगल सर्चवर आता दोन वा त्यापेक्षा जास्त उपकरणांची तुलना करण्याची सुविधा, याच्या अंतर्गत आता युजर कोणत्याही दोन प्रॉडक्टमधील तुलना करू शकतो
14. सिडनी - देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळताना ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कची एकाच सामन्यात दोनवेळा हॅट्ट्रीक, 1979 नंतर एकाच सामन्यात दोनवेळा हॅट्ट्रीक घेणारा पहिला गोलंदाज ठरला
15. नवी दिल्ली - भारतीय संघाला सध्या धोनीची गरज आहे. धोनी युवा खेळाडूंचा संघात येण्याचा मार्ग कधीही बंद होऊ देणार नाही. योग्य वेळी तो निर्णय घेईल : वीरेंद्र सेहवाग
16. मुंबई - बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खानच्या ‘टायगर जिंदा है’ चा ट्रेलर रिलीज, येत्या 22 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होईल
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - जीएसटी परिषदेच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याचा विचार होणार
2. नवी दिल्ली - भारत पुढील 30 वर्षात उच्च-मध्यमवर्गीयांची अर्थव्यवस्था होईल, तसेच भारतातील गरीबी कमी होणार : जागतिक बँक
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या तब्बल 2 लाख 24 हजार कंपन्यांना केंद्र सरकारने ठोकले टाळे, सरकारच्या कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाकडून कारवाई
4. नवी दिल्ली - मारुती सुझुकीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, भारतात प्रत्येकी चारपैकी एक कारचालक सीटबेल्ट वापरतो, 81 टक्के महिला सीटबेल्ट वापरतात, पुरुषांमध्ये हे प्रमाण 68 टक्के आहे
5. नवी दिल्ली - काँग्रेसने विकासाची थट्टा करत विचित्र अभियान सुरू केले असून जातीयवादाचे विष त्यांच्याकडून पसरवले जात आहे : अरूण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री
6. जम्मू-काश्मीर - जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा, उरी सेक्टर येथे घुसखोरीचा प्रयत्न सुरू होता
7. शिमला - हिमाचल निवडणुकीत मजा राहिलेली नाही. कारण, काँग्रेसने निवडणुकीचे मैदान सोडून पळ काढला आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
8. नागपूर - सोलापूर विद्यापीठाला अखेर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्यात आले, मुख्यमंत्र्यांची नागपुरात घोषणा
9. मुंबई - मुंबईतून आयसिसच्या संशयित दहशतवाद्याला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई, अबू जाहिद असे या संशयित दहशतवाद्याचे नाव
10. सिंधुदुर्ग - मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण येथे लक्झरी बसला अपघात, 27 जण जखमी, जखमींवर उपचार सुरु
11. नंदुरबार - साखर कारखान्याने निर्मित केलेल्या दारुच्या ब्रँडला महिलेचे नाव दिल्यास अधिक खप होईल, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले वादग्रस्त विधान
12. कोल्हापूर - उसाला एफआरपी अधिक 200 रुपये देण्यावर साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यात एकमत, ऊसदराचे आंदोलन घेणार मागे, स्वाभिमानी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टींची माहिती
13. पुणे - ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे आणि ज्येष्ठ नेपथ्यकार बाबा पार्सेकर यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर
14. सध्या फेसबुकचे 207 कोटी यूजर्स असण्याची शक्यता, त्यातील जवळपास 27 कोटी बनावट असण्याची शक्यता
15. महिलांच्या आशिया कप हॉकी स्पर्धेत भारताने केला चीनचा पराभव, शूटआउटमध्ये भारताची चीनवर 5 विरुद्ध 4 गोलने मात, भारताने दुसऱ्यांदा जिंकली स्पर्धा
16. मुंबई - सोशल मीडियावर अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ढिंच्यॅक पूजा 'बिग बॉस' मधून बाहेर
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - ग्लाइड बॉम्बची ओदिशाच्या चांदीपूर तळावर यशस्वी चाचणी, या अस्त्रामुळे भारताची चीन-पाकिस्तानविरोधात क्षमता अधिक वाढणार
2. नवी दिल्ली - डिजिटल व्यवहारांमध्ये 80 टक्क्यांची वाढ अपेक्षित, 1800 कोटीपर्यंत पोहोचणार, जीएसटीअंतर्गत 72 लाख व्यापाऱ्यांनी केले ऑनलाईन फायलिंग
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - कॅरेटच्या माहितीसह दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक करण्याच्या शक्यतेवर सरकारचा विचार सुरु, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांची माहिती
4. नवी दिल्ली - अमेरिकेमध्ये एका भारतीय वंशाच्या शिख मुलाला मारहाण, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी तेथील भारतीय दूतावासाकडे मागितला अहवाल
5. नवी दिल्ली - इंडिया गेटजवळ आंतरराष्ट्रीय फुड फेस्टिव्हल दरम्यान 1100 किलोची विक्रमी खिचडी बनवण्यात आली
6. नवी दिल्ली - ब्रोकिंग्स इंडियाच्या वरिष्ठ शमिका रवी यांची आर्थिक सल्लागार परिषदेच्या अर्धवेळ सदस्य म्हणून नियुक्ती
7. बेगुसराय - कार्तिक पौर्णिमेनिमित्त बिहारमधील बेगुसराय इथल्या घाटावर गंगास्नान करताना चेंगराचेंगरी, यात तीन भाविकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी
8. ठाणे - दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणातील आरोपी अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करा, ठाणे न्यायालयाने दिले आदेश
9. मुंबई - ब्लू व्हेल नंतर आता 'डार्क नेट' गेमची धास्ती, मुंबई जवळच्या गोवंडी परिसरातील दहावीत शिकणारा 15 वर्षाचा मुलगा गेला घर सोडून, पालकांकडून गोवंडी पोलिसात तक्रार
10. मुंबई - मी भाजपचा प्रवक्ता नाही, पण देवेंद्र फडणवीस कमालीचा माणूस आहे, असा मुख्यमंत्री आपल्याला हवा आहे : अभिनेते नाना पाटेकर
11. पुणे - गुंतवणूकदारांचे पैसे थकवल्याप्रकरणी डी. एस. कुलकर्णींना अटकपूर्व जामीन मंजूर, या प्रकरणी सत्र न्यायालयात मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार
12. अहमदनगर - देशातील पहिला पथदर्शी सौरउर्जा प्रकल्पही राळेगणसिद्धीतून सुरू होत आहे. सौरउर्जा प्रकल्पामुळे शेतक-यांना मुबलक वीज मिळेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13. अहमदनगर - एका मूक-बधीर तरुणाने (प्रशांत महादेव कानडे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने पाण्याची बाटली भिरकावली, राळेगणसिद्धी येथील सभेत घडला प्रकार
14. औरंगाबाद - सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना ग्राहक मंचाचा झटका, सहारा सिटीत बूक केलेले घर न दिल्याने अटक वॉरंट जारी
15. भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आज ट्विटरवर इंडिगो एयरलाईन कंपनीवर वाईट आणि उद्धट वागणूक मिळाल्याची केली टीका
16. मुंबई - आपल्या उत्साहाने बॉलिवूडचा पडदा गाजवणारे महानायक अमिताभ बच्चन प्रभू देवाच्या एका गाण्यावर नाचताना दिसणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनाग येथे सीआरपीएफच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी केला हल्ला, गोळीबारात जवान जखमी
2. नवी दिल्ली - ‘नासा’ने ब्रम्हांडात पृथ्वीसारखे राहण्यायोग्य तब्बल 20 ग्रह असल्याचा लावला शोध, नासाच्या केपलर दुर्बिनीद्वारे या ग्रहांचा शोध घेण्यात आला
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. बीजिंग - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 8 ते 10 नोव्हेंबरदरम्यान चीनच्या दौऱ्यावर, त्यांना चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी दिले आमंत्रण
4. उत्तर प्रदेशमधल्या एनटीपीसी प्लांटमध्ये झालेल्या स्फोटातील मृतांचा आकडा वाढत आहे, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू, दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केल्याची केंद्रीय मंत्र्यांची माहिती
5. केरळ - कन्नूरमधील 6 तरुणांनी सीरियात जाऊन आयसिसमध्ये केला प्रवेश, सहा जणं पीएफआय या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते; केरळ पोलिसांची माहिती
6. हिमाचल प्रदेश - काँग्रेस पक्ष हास्य क्लब झाला आहे. जामिनावर सुटलेले मुख्यमंत्री जाहीरनाम्यात भ्रष्टाचारमुक्त राज्य करण्याचे आश्वासन देतात : पंतप्रधान नरेंद्र मोदी
7. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 33573.22, निफ्टी : 10423.80, सोने भाव : 29,247 (प्रतितोळा), चांदी : 39,662 (प्रतिकिलो)
8. मुंबई - ऊसदराबाबतची सहकारमंत्री-शेतकरी संघटनांमधील बैठक निष्फळ, आंदोलन सुरू ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
9. मुंबई - यवतमाळमधील औषध फवारणी करताना शेतकऱ्यांच्या मृत्यूचे प्रकरण; सीबीआय चौकशी करण्यासाठी राज्य सरकारचे केंद्र सरकारला पत्र
10. मुंबई - गरिबनगरच्या रहिवाशांना दिलासा, हायकोर्टाकडून आठवडाभर कारवाईला स्थगिती, अतिक्रमणविरोधी कारवाई थांबविण्याचे आदेश
11. मुंबई - राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, यावेळी ठाकरेंनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची केली मागणी
12. मुंबई - जाहिरताबाजीने काही होणार नाही. कामाला लागा आणि जाहिरातीचा पैसा गरीब माणसांना द्या, दोन आशीर्वाद मिळतील : खा. सुप्रिया सुळे
13. पुणे - डी.एस.कुलकर्णी यांच्या घर-कार्यालयांवर पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेचा छापा, पुण्यातील चार व मुंबईतील एक ठिकाणाचा समावेश
14. देशातील भारती एअरटेल ही नामांकित टेलिकॉम कंपनी आपली 3 जी सुविधा बंद कऱण्याच्या विचारात, मात्र 2 जी सुविधा कायम ठेवणार
15. नवी दिल्ली - रोहित शर्मा टीम इंडियाकडून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सिक्सर लगावणारा खेळाडू ठरला, त्याच्या नावावर 268 सिक्सर
16. महानायक रजनीकांत यांचा जावई धनुषच्या ‘द एक्स्ट्रा ऑर्डिनरी जर्नी ऑफ द फकीर’ या हॉलिवूड चित्रपटाचा फर्स्ट लूक आऊट
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - भारतीय नौदलासाठी 111 हेलिकॉप्टर्सची खरेदी करण्यास संरक्षण मंत्रालयाने दाखवला हिरवा कंदील, हा प्रस्ताव 21 हजार 738 कोटी रुपयांचा
2. नवी दिल्ली - कोणत्याही गुन्ह्यात दोषी ठरलेल्यांना कायमची निवडणूक बंदी करण्याबाबत सरकारचा गांभीर्याने विचार, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - भारतातील क्षयरोगग्रस्तांची संख्या तब्बल 27 लाख 90 हजार, 2016 मध्ये 4 लाख 23 हजार जणांना क्षयरोगामुळे प्राण गमवावा लागला : जागतिक आरोग्य संघटना
4. नवी दिल्ली - न्यायाधीशांचा पगार वाढवायला विसरलात काय? सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा
5. न्यूयॉर्क - “आता बस झालं, आखाती देश आणि इतरत्र आयसिसला नामोहरम केल्यानंतर त्यांना अमेरिकेत घुसू देणार नाही,” डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं ट्वीट
6. अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी या नावाचे तब्बल 154 मतदार, निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत नोंद
7. ठाणे - जुन्या नोटा बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्य़ा चार जणांच्या टोळीस ठाणे गुन्हे शाखेने केले अटक, एकूण 1 कोटी 98 लाख 25 हजार रूपयांच्या जुन्या नोटा जप्त
8. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 33600.27, निफ्टी : 10440.50, सोने भाव : 29,281 (प्रतितोळा), चांदी : 39,352 (प्रतिकिलो)
9. मुंबई - राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना थकित वीज बिल भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला निर्णय
10. मुंबई - रेल्वे स्टेशनपासून 150 मीटरपर्यंतच्या परिसरात आणि पादचारी पुलांवर फेरीवाल्यांना थांबता येणार नाही, मुंबई हायकोर्टाचा निर्णय
11. नांदेड - महापालिकेच्या महापौरपदी काँगेसच्या शीला भवरे आणि उपमहापौरपदी विनय गिरडे, दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 74 मतं, शिवसेनेची तटस्थ भूमिका
12. पुणे - प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक डी. एस. कुलकर्णींविरोधात तक्रार करण्यासाठी हजारो गुंतवणूकदार एकवटले, पोलिसात तक्रार
13. पुणे - खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्ड्यांसोबत सेल्फी काढून वेगळ्या पद्धतीने केला सरकारचा निषेध
14. नवी दिल्ली - जिओ इफेक्ट, देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलचा नफा 76 टक्क्यांनी घटला
15. मुंबई - राष्ट्रीय अंध टी-20 स्पर्धेत व्यंकटेश राव याने अवघ्या 82 चेंडूंमध्ये तब्बल 279 धावा कुटून मुंबईच्या गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली
16. मुंबई - राजकला मूवीज व बाबा मोशन पिक्चर्सच्या बॅनर खाली निर्मित मराठी चित्रपट ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. श्रीनगर - बांदीपोऱ्यातील हाजिन येथे दहशतवादी व जवानांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा मृत्यू, गोळीबार थांबला, मोठ्या प्रमाणात दगडफेक
2. नवी दिल्ली - आता पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत येत्या काही दिवसात वाढ होण्याची शक्यता
3. नवी दिल्ली - अनेक वर्षे जून्या असलेल्या शस्त्रांना बदलून त्याजागी अद्ययावत शस्त्रे खरेदी करण्यासाठी भारताने 40,000 कोटी रूपयांच्या बजेटला दिली मान्यता
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
4. नवी दिल्ली - 'मन की बात'मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला 'खादी फॉर ट्रान्सफॉरमेशन'चा नारा
5. बंगळुरू - मला हे सांगा एक रूपये झिजवणारा पंजा कुणाचा आहे? एक रूपयाचे 15 पैसे करणारा पंजा कुणाचा आहे?, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या कारभाराचे काढले वाभाडे
6. मोगादिशू - सोमालियात हॉटेलच्या बाहेर आत्मघातकी हल्ला, 25 ठार, अनेक जखमी, अल शबाब या दहशतवादी संघटनेने घेतली हल्ल्याची जबाबदारी
7. मुंबई - कागद उत्पादनाचे उद्योग असलेल्या भागात वेळोवेळी होत असलेल्या पाण्याच्या टंचाईमुळे भारतातील कागद उत्पादनावर परिणाम, आयात धोरणात बऱ्याच विसंगती
8. मुंबई - मालाड रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या मारहाणीत जखमी झालेले मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांची राज ठाकरे यांनी घेतली भेट
9. मुंबई - एका मराठी माणसाला एका अनधिकृत फेरीवाल्याने मारणं, हे कधीच सहन करणार नाही. मग तो कुठल्याही पक्षाचा असेल, असे म्हणत आ. नितेश राणेंचा मनसेला पाठिंबा
10. मुंबई - चिथावणीखोर भाषण देत फेरीवाल्यांना भडकावल्याप्रकरणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्यावर मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
11. नेरळ - ‘माथेरानची राणी’ मिनी ट्रेन लवकरच सुरु होण्याची शक्यता, कारण मिनी ट्रेनची चाचणी झाली यशस्वी
12. अहमदनगर - जिल्ह्यासह शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी साडेआठ हजार कोटी रूपयांची तरतूद, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची माहिती
13. गुगल सर्चमध्ये झाला बदल, आता कुणीही युजर ज्या देशात असेल त्याच देशातील गुगलच्या डोमेनवरून त्याला सर्च रिझल्ट दिसणार
14. भारत वि. न्यूझीलंड वन डे, भारताच्या 5 बाद 337 धावा, रोहित शर्मा (147) आणि कोहलीची (113) शानदार शतके
15. मुंबई - अक्षय कुमारच्या आगामी 'पॅडमॅन' या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, 2018 च्या प्रजासत्ताक दिनादिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - यावर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत देशात एकूण 358 एटीएम झाले बंद, गेल्या चार वर्षांत पहिल्यांदाच एटीएमची संख्या घटली, बँकांना खर्च परवडेना!
2. नवी दिल्ली - गत सहा महिन्यात एकूण म्युच्यूअल फंड खातेधारकांत लक्षणीय वाढ, 42 फंड घराण्यांकडील म्युच्यूअल फंड खात्यांची संख्या सप्टेंबर महिन्यात 62,04,189 वर पोहोचली
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - अमेरिकेत भारतातून दत्तक घेतलेल्या मुलीची हत्या, परराष्ट्र मंत्रालयाने दिले कसून चौकशीचे आदेश
4. नवी दिल्ली - अर्थव्यवस्था सुदृढ असेल तर सरकारला नव्याने भांडवल ओतण्याची गरज का वाटते?, पी. चिदंबरम यांनी उपस्थित केला सवाल
5. नवी दिल्ली - स्वच्छ भारत अभियानात माध्यमांनी खूप महत्वाची भूमिका बजावली : पंतप्रधान नरेंद्र मोदी
6. पणजी - गोव्याहून थायलंड, फिलिपाईन्स, व्हिएतनाम आदी ठिकाणी माशांची जी निर्यात केली जाते, त्यावर बंदी लागू करण्याचा गोवा सरकारचा विचार
7. गांधीनगर - 31 नोव्हेंबरपर्यंत पाटीदार समाजाच्या आरक्षणाविषयी भूमिका स्पष्ट करा; हार्दिक पटेलचे काँग्रेसला अल्टिमेटम
8. मुंबई - राज्यातील कर्जमाफीच्या घोळाची पंतप्रधान कार्यालयाकडून गंभीर दखल, दोन दिवसात या सर्व घोळाबाबत सविस्तर माहिती देण्याचे दिले आदेश
9. मुंबई - मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना मनसेचे गटनेतेपद देण्यात यावे, राज ठाकरेंकडून मुंबई महापालिका प्रशासनाला पत्र
10. अकोला - राहुल गांधीनी दलित मुलीशी विवाह करावा, दलित समाजात आता त्यांच्या योग्य मुली आहेत; दलितांच्या घरात जाऊन जेवण करण्याची नौटंकी बंद करावी : रामदास आठवले
11. सोनी कंपनीने भारतात आपले एक्सपेरिया आर 1 आणि आर 1 प्लस हे दोन स्मार्टफोन लाँच करण्याची केली घोषणा, याची अगावू नोंदणी सुरू
12. मुंबई - सध्या सुरु असलेल्या रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे काही सामने खेळणार
13. मुंबई - एमटीव्ही बीट्सवरील ‘फिट स्टॉप’ या आगामी टीव्ही शोमधून अभिनेत्री सनी लिओनी आता ‘फिटनेस गुरु’च्या भूमिकेत दिसणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. श्रीनगर - येथे संप वा आंदोलनाच्या काळात दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास आंदोलकांना थेट 5 वर्षाचा कारावास होणार
2. नवी दिल्ली - लाभार्थीकडे ‘आधार’ क्रमांक नाही किंवा त्याने तो रेशनकार्डाशी जोडून घेतला नाही या कारणावरून कोणालाही रेशनवरील धान्य व अन्य वस्तू देणे बंद केले जाऊ नये : केंद्र सरकार
3. नवी दिल्ली - अमेरिकेला मागे टाकत भारत बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाची स्मार्टफोन बाजारपेठ, सध्या या बाजारपेठेत चीन अव्वल स्थानी
4. नवी दिल्ली - आत्महत्येस प्रवृत्त करणारा ब्लू व्हेल गेम राष्ट्रीय समस्या, दूरदर्शनवरुन जनजागृती करा : सर्वोच्च न्यायालय
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
5. नवी दिल्ली - चाईल्ड पॉर्नोग्राफी व्हिडीओ व्हायरल होण्यापासून रोखता यावे यासाठी हॉटलाईन नंबर जारी करा : सर्वोच्च न्यायालय
6. नवी दिल्ली - माझा नियतीवर विश्वास आहे. लग्न व्हायचं तेव्हा होईलच. योग्य मुलगी मिळताच लग्न करेन : राहुल गांधी
7. नवी दिल्ली - काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आतापर्यंत पप्पू म्हणून हिणवलं जायचं, पण आता ते पप्पू राहिले नाहीत. आज त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक थांबातात : खा. संजय राऊत
8. लखनऊ - उत्तर प्रदेशातील संभलमध्ये कल्की उत्सवात राधे माँ ने भक्ती गीतावर लगावले ठुमके, यावेळी भक्तांनी राधे माँवर पुष्पवृष्टी केलीच, शिवाय नोटांचाही पाऊस पाडला
9. रियाध - सोफिया या रोबोला सौदीमध्ये नागरिकत्व बहाल, रोबोला सिटीझनशीप देणारा सौदी हा जगातला एकमेव देश ठरला
10. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 33157.22, निफ्टी : 10323.00, सोने भाव : 29,236 (प्रतितोळा), चांदी : 38,975 (प्रतिकिलो)
11. मुंबई - हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, यामध्ये काही अकार्यक्षमंत्र्यांना मिळणार नारळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संकेत
12. मुंबई - दुबईत सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश म्हणून भारत पहिल्या क्रमांकावर, भारतातील मुंबई, नवी मुंबई, पुणे या शहरांतील नागरिकांनी गुंतवणुकीसाठी दिली दुबईला पसंती
13. मुंबई - टीव्ही क्षेत्रातील दिग्गज नाव आणि ‘अधिकारी ब्रदर्स’चे श्री गौतम अधिकारी यांचे निधन, ते 67 वर्षांचे होते
14. मुंबई - व्होडाफोनचा सुपरवीक प्लॅन, 69 रूपयांत अनलिमिटेड कॉल आणि डेटा, वैधता असेल 7 दिवस
15. नवी दिल्ली - प्रशासकीय समिती बीसीसीयमध्ये सुधारणेचा अतिरेक करत असून त्यामुळे किकेटचा नाश होईल, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली भीती
16. मुंबई - सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही असू देत पण मला असं वाटतं की, आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहिलेच पाहिजे : सनी लिओनी
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने जाहीर केले की, ‘चांद्रयान-2’ हे मानवरहीत यान मार्च 2018 मध्ये पाठवण्यात येईल
2. नवी दिल्ली - जगातील वेगाने वाढणाऱ्या 100 शहरांमध्ये प्रचंड स्थलांतर, पहिल्या दहा शहरांमध्ये मुंबई, दिल्ली आणि कोलकाताचा समावेश : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - नजरचुकीने पाकिस्तानात गेलेला भारतीय जवान चंदू चव्हाण यांना भारताच्या लष्करी न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली, भारताची सीमा ओलांडल्याप्रकरणी दोषी धरले
4. नवी दिल्ली - एसबीआयने फंड ट्रान्सफरसाठी आयएमपीएस(IMPS) चा वापर करणाऱ्यांना दिले गिफ्ट, या सुविधेसाठी लागणाऱ्या चार्जेसवर तब्बल 80 टक्क्यांपर्यंत केली कपात
5. नवी दिल्ली - जीएसटीमुळे कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढेल. यामुळे वस्तूंचे भाव कमी होऊन गरीब व मध्यमवर्गाला फायदा होईल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
6. इस्लामाबाद - बहुचर्चित पनामागेटप्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरिफ यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, कधीही होऊ शकते अटक
7. गडचिरोली - नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाने नुकतेच परिपत्रक काढून 31 कोटी 89 लाख रुपयांच्या निधीला दिली मंजुरी
8. कल्याण - आयसिसमध्ये भरती झालेल्या कल्याणच्या फहाद शेख या तरुणाचा सीरियामध्ये मृत्यू, फहादच्या परिवाराने एनआयएला दिली माहिती
9. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 33147.13, निफ्टी : 10343.80, सोने भाव : 29,378 (प्रतितोळा), चांदी : 39,560 (प्रतिकिलो)
10. मुंबई - राज ठाकरेंचा दणका, मनसेतून फुटून शिवसेनेत गेलेल्या 6 नगरसेवकांना आणि मनसेत राहिलेल्या एका नगरसेवकाला पक्षाकडून व्हीप जारी
11. मुंबई - एसटी महामंडळातील अतांत्रिक पर्यवेक्षकीय पदाची परीक्षा 28 आणि 29 ऑक्टोबरला, परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी www.msrtcexam.in या संकेतस्थळास भेट द्या
12. कोल्हापूर - महालक्ष्मी एक्स्प्रेसवर दरोडा; पैसे, सोनं, मोबाईल लुटले; सातारा, कराड, मिरज, कोल्हापूर रेल्वे पोलिसात तक्रारी दाखल, पोलिस तपास सुरु
13. फेसबुकवर आता कुणीही युएचडी म्हणजेच फोर-के क्षमतेचे व्हिडीओ अपलोड करून पाहू/शेअर करू शकणार
14. पॅरिस - फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधू आणि के. श्रीकांत यांनी दुसऱ्या फेरीत केला प्रवेश
15. मुंबई - झी मराठीवरील ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, या मालिकेच्या जागी 8 नोव्हेंबरपासून ‘हम तो तेरे आशिक है’ मालिका सुरु होणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - सरकारी योजनांसाठी आधार कार्ड लिंक करण्यास 31 मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती
2. नवी दिल्ली - सिम कार्ड आधार नंबरशी व्हेरिफाईड करण्याची प्रक्रिया सोपी होणार : पीटीआय
3. नवी दिल्ली - भारतीय रेल्वेची नवी वेबसाईट आणि मोबाईल ॲप लवकरच होणार लॉन्च, या माध्यमातून प्रवाशांना लवकर आणि सहजरित्या तिकीट बुक करता येणार
4. नवी दिल्ली - भारतमाला योजनेअंतर्गत देशात 44 आर्थिक कॉरिडोर उभारण्यात येणार असून त्यातील 12 कॉरिडोर महाराष्ट्रातून जाणार आहेत, नितीन गडकरी यांची घोषणा
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
5. नवी दिल्ली - फीचर फोनमध्ये तिसरी भारतीय भाषा देण्यासाठी सरकारने मोबाईल कंपन्यांना 1 फेब्रुवारीपर्यंत दिली मुदतवाढ
6. नवी दिल्ली - रेनबेक्सीचे माजी संचालक मनजित सिंह यांना अटक, 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी
7. नवी दिल्ली - 8 नोव्हेंबर हा दिवस भाजपच्या वतीने देशभरात ‘काळेधन विरोधी दिन’ म्हणून साजरा केला जाणार
8. सुरत - गुजरात एटीएसने निवडणुकीच्या काळात होणारा एक मोठा कट उधळला, दोन जणांना घेतले ताब्यात
9. बंगळुरू - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटक विधानसभेत टिपू सुलतान यांचा केला गौरव, भाजपची झाली कोंडी
10. गांधीनगर - भाजपकडून माझे वडील जरी निवडणुकीला उभे राहिले, तरी मी भाजपचे समर्थन करणार नाही : हार्दिक पटेल
11. मुंबई - राज्य सरकार रोजगार आणि गुंतवणूक आणण्यात अपयशी, RTI मधून माहिती समोर
12. मुंबई - राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी केली शोध समितीची स्थापना, इस्त्रोचे माजी प्रमख डॉ. के. कस्तुरीरंगन शोध समितीचे अध्यक्ष
13. पेटीएमने दिवाळीच्या कालखंडात आपल्या मंचावरून एकंदरीत 1.6 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी रकमेचे व्यवहार झाल्याचे केले जाहीर
14. पुणे - दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि दिनेश कार्तिक यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने किवींचा सहा विकेटने केला पराभव, मालिकेत बरोबरी
15. मुंबई - करिना कपूर आणि सोनम कपूरच्या 'वीरे दी वेडिंग' चित्रपटाचे दुसरे पोस्टर रिलीज, हा चित्रपट पुढच्या वर्षी 18 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - 'मेक इन इंडिया'ला धक्का, टेस्लाचे प्रमुख अॅलन मस्क यांनी आपल्या कंपनीचा अमेरिके बाहेरील पहिला कारखाना चीनमध्ये सुरू करण्याचा घेतला निर्णय
2. नवी दिल्ली - दुसऱ्या तिमाहीत इन्फोसीस कंपन्यांच्या नफ्यात 3.3 टक्के वाढ, 3726 कोटी रुपये झाला नफा
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, 9 डिसेंबर आणि 14 डिसेंबर रोजी होणार मतदान, निकाल 18 डिसेंबर रोजी
4. नवी दिल्ली - आरुषी-हेमराज हत्या प्रकरण, हेमराजची पत्नी आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार, सूत्रांची माहिती
5. कन्नूर - आयसिसशी संबंधीत तीन संशयीत तरुणांना केरळमधून अटक, चौकशी सुरू असल्याने अद्याप ओळख उघड नाही
6. कोलकाता - मी फोनला माझं आधार लिंक करणार नाही, माझा फोन डिस्कनेक्ट केला तरी चालेल : ममता बॅनर्जी
7. अहमदाबाद - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना झटका; गुजरात न्यायालयाने अजामीन पात्र वॉरंट केले जारी
8. मुंबई शेअर बाजार : सेन्सेक्स : 33042.50, निफ्टी : 10295.40, सोने भाव : 29,358 (प्रतितोळा), चांदी : 39,445 (प्रतिकिलो)
9. मुंबई - कर्जमाफीत मोठा घोळ; एकाच आधार कार्डवर 100 शेतकऱ्यांची नावे, सरकारच्या धोरणांचा पुरता बोजवारा, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली
10. मुंबई - यादीतील बिनचूक माहिती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्यापासून रक्कम जमा करण्यास सुरूवात करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले निर्देश
11. मुंबई - मनसे सोडून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांपैकी 4 नगरसेवकांची घरवापसी होण्याची शक्यता, नगरसेवक राज ठाकरेंच्या संपर्कात, मनसेचा दावा
12. मुंबई - मनसेतून आलेले सर्व सहा नगरसेवक शिवसेनेसोबतच आहेत, शिवसेना यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक काढणार
13. मुंबई - 3 नोव्हेंबर रोजी 'आयफोन एक्स' भारतात लॉन्च होणार, येत्या 27 ऑक्टोबरपासून ‘आयफोन एक्स’ची प्रि-ऑर्डर सुरु होणार
14. मुंबई - भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याआधी स्टिंग ऑपरेशन समोर, पिच क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांचे निलंबन
15. मुंबई - अभिनेत्री असिनने दिला मुलीला जन्म, असिनचा पती राहुल शर्माने बाळाच्या आगमनाची गोड बातमी केली शेअर
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
👉 एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
लेट्स अप ब्रेकिंग न्यूज
चार दिवसांच्या खंडानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आज सकाळपासून एसटी बस रस्त्यावर धावतील. संप बेकायदेशीर असल्याचे मत नोंदवत कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर एसटी कर्मचारी संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे भाऊबिजेदिवशी राज्यातील सर्वसामान्य प्रवाशी आणि जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर संपाची पुढची दिशा ठरविण्यासंदर्भात एसटी संघटनेची शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत बैठक सुरू होती. या बैठकीत कोर्टाच्या आदेशाचे पालन करून संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. संप मागे घेत असल्याचे पत्रकच संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी. या समितीने कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढ किती द्यायची, याबाबत तीन आठवड्यांत निर्णय घ्यावा, असे निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत.
उच्चस्तरीय समितीमध्ये अर्थ सचिव, परिवहन सचिव (गृह), परिवहन आयुक्त, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक या चार जणांसह एकूण पाच जणांचा समावेश असेल, अशी माहिती यावेळी सरकारच्यावतीने हायकोर्टात देण्यात आली. पाच सदस्यीय उच्चस्तरीय समिती आपला प्राथमिक अहवाल 15 नाेव्हेंबरपर्यंत तर अंतिम अहवाल 21 डिसेंबर 2017 पर्यंत सादर करावा, असे सूचवले आहे.
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. श्रीनगर - तीन फुटी दहशतवाद्याने काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा दलांचा त्रास वाढवला, काश्मीरमध्ये शोध सुरू, अनेक हल्ल्यांशी संबंध
2. जम्मू काश्मीर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरेज सेक्टर सीमारेषेजवळ 15 कॉर्प्सच्या जवानांबरोबर दिवाळी केली साजरा, यावेळी त्यांनी लष्करी गणवेष परिधान केला होता
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - वैद्यकीय उपकरणांवरील नफ्यावर मर्यादा आणणार, प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन
4. नवी दिल्ली - रेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर सक्तीचे, आजारी प्रवाशांची सोय हवी : सर्वोच्च न्यायालय
5. पाकिस्तान - मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या नजरकैदेत 30 दिवसांची वाढ
6. पॅरिस - फ्रेंच चित्रपटातील दंतकथा ठरलेली अभिनेत्री डॅनिएल डेरीएक्स यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन
7. मुंबई - राज्य सरकार, एसटी प्रशासन आणि कामगार संघटना यांच्यात गुरुवारी चर्चाच न झाल्याने एसटी कामगारांच्या संपाचा तिढा कायम
8. मुंबई - सर्व निकाल जाहीर केल्याचा मुंबई विद्यापीठाचा दावा फेल ठरण्याची शक्यता, निकाल मिळाली नसल्याची काही विद्यार्थ्यांची तक्रार
9. मुंबई - मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डेचं लाचलुचपत विभागाला पत्र, शिवसेनेत जाण्यासाठी पैसे देऊ केल्याची तक्रार
10. सोलापूर - दीड लाखावरील कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 10 वर्षांची मुदत द्या : शरद पवार
11. धुळे - धुळ्यात दोन फटाक्यांचा दुकानाला भीषण आग, दोन अनधिकृत दुकाने जळून खाक, एकजण गंभीर जखमी
12. सॅमसंग कंपनीने आपल्या बिक्सबी या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटची 2.0 ही नवीन आवृत्ती सादर करण्याची केली घोषणा
13. डेन्मार्क ओपन, भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू पहिल्याच फेरीत बाद, चीनच्या चेन यूफेईकडून पराभूत
14. पार्ल - एबी डिव्हिलियर्सची धडाकेबाज फलंदाजी आणि अँडिल फेलुकवायोची सर्वोत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला 104 धावांनी केले पराभूत, मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली
15. मुंबई - मराठी अभिनेता सुबोध भावेने नुकताच फेसबुकवर एक फोटो केला शेअर, यात त्याने प्राजक्ता माळीसोबत प्रथमच स्क्रिन शेअर करणार असल्याचे सांगितले
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - जवानांना दिवाळी भेट, बीएसएनएल डिजिटल फोन सेवेचे 500 रुपये मासिक शुल्क संपुष्टात आणून कॉल दर 5 ऐवजी 1 रुपया केले
2. नवी दिल्ली - प्राप्तिकरविभाग ऑनलाइन चॅटद्वारे तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल, होम पेजवर चॅट रूम सुरू
3. नवी दिल्ली - जैशच्या 10 दहशतवाद्यांनी काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधून भारतात केला प्रवेश, या पार्श्वभूमीवर सुरक्षादलांना सतर्कतेचा इशारा
4. नवी दिल्ली - रेल्वे बोर्डाने निवृत्त कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्याचे अधिकार डीआरएमला दिले
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
5. चेन्नई - नोटांबदीच्या निर्णयामुळं काळ्या पैशाला चाप बसेल. त्यामुळं लोकांनी थोडी कळ सोसावी, असं मला वाटलं होतं. पण, मी चुकलो. खूप घाईनं निष्कर्ष काढला : कमल हसन
6. नवी दिल्ली - 'दिवाळीला फटाक्यांमुळे होणा-या ध्वनी प्रदूषणावरुन युद्ध सुरु होतं, पण पहाटे साडे चार वाजता सुरु होणाऱ्या अजानावर कोणी बोलत नाही', फटाकेबंदीवरुन संतापले त्रिपुराचे राज्यपाल
7. अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे, काँग्रेसने सत्ताधाऱ्यांविरोधात बिहारच्या धर्तीवर महाआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली केल्या सुरु
8. लखनऊ - ताजमहालमध्ये पाणी गळते तिथे शिवलिंग होते, मंदिर तोडून मुगलांनी ताजमहाल बांधला : विनय कटियार
9. इस्लामाबाद - पाकिस्तानात पोलिसांच्या ट्रकखाली बॉम्बस्फोट, सात पोलिसांचा मृत्यू, तर 22 जखमी
10. वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे पहिल्यांदाच दिवाळी केली साजरी, भारतीयांच्या योगदानाचे केले कौतुक
11. मुंबई - साडेआठ लाख शेतकरी कर्जमुक्त, मुख्यमंत्र्यांनी दिली प्रमाणपत्रे, निकषात बसणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी
12. मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा नाहीच, सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार संप
13. मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांचा नियोजित संप अखेर मागे, बेस्टच्या कर्मचाऱ्यांना 5 हजार 500 रुपयांचा बोनस, महापौरांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय
14. एचटीसी कंपनीने आपल्या एचटीसी यू अल्ट्रा या फ्लॅगशीप श्रेणीतल्या मॉडेलच्या मूल्यात खास दिवाळीनिमित्त तब्बल 22,991 रूपयांची केली कपात
15. सर्वात कमी डावात 25 शतके करण्याचा विक्रम करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता एबी डिव्हिलिअर्स तिसऱ्या स्थानावर, यापूर्वी सचिन या स्थानावर होता
16. बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या लोकप्रियतेची आणि कामगिरीची दखल देत हाँगकाँगच्या विख्यात मादाम तुसाँ संग्रहालयात त्याचा मेणाचा पुतळा स्थापन करण्यात येणार
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. श्रीनगर - पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, गोळीबारात 4 नागरिक जखमी, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
2. नवी दिल्ली - सध्या एसी हॉटेलमधील जेवणावर 18 टक्के जीएसटी आकारला जातो ही टक्केवारी कमी करून 12 टक्के होण्याची शक्यता
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
3. नवी दिल्ली - डीटीआयडीसने दिलेल्या आदेशानुसार, बस स्थानकावर हॉर्न वाजवल्यास 500 रुपये तर कंडक्टरने प्रवाशांना बोलावण्यासाठी जोरजोराने आवाज दिला तर 100 रुपये दंड भरावा लागेल
4. वॉशिंग्टन - संयुक्त राष्ट्र संघातील अमेरिकेच्या दूत निक्की हेली यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानवर लक्ष ठेवून भारत आमची एक प्रकारे मदत करू शकतो
5. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जप्त मालमत्तांपैकी 3 प्रॉपर्टीचा होणार लिलाव, 4 नोव्हेंबरला होणाऱ्या लिलावासाठी जाहिरात
6. कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हत्या करण्यासाठी 65 लाखांची सुपारी, एका 19 वर्षीय विद्यार्थ्याने केला खुलासा, सीआयडीकडून तपासाला सुरुवात
7. मुंबई - निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत ही योजना सुरूच राहील : मुख्यमंत्री
8. मुंबई - मुख्यमंत्र्यांनी दिलेले संकेत खरेच ठरतात मात्र मुख्यमंत्री नेमके काय बोलले ते पाहावे लागेल : नारायण राणे
9. मुंबई - व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी आणलं नवं फीचर, यानुसार आता युजर्स त्याचे लाईव्ह लोकेशन शेअर करू शकतात
10. गुरुग्राम - धडाकेबाज फलंदाज युवराज सिंह याच्यासह त्याची आई शबनम सिंह व भाऊ जोरावर सिंह याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल
11. नवी दिल्ली - क्रिकेटचा देव सचिन 'कॉमिक बुक हिरो'च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसमोर येणार, कॉमिक बुकचे पब्लिशर्स हेचेते इंडियाने यांनी दिली पुष्टी
12. मुंबई - सलमानचे चाहत्यांना दिवाळी स्पेशल गिफ्ट, ‘टायगर जिंदा है’ चा फर्स्ट लूक केला रिलीज
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
6 624
Lets Up News Updates
1. नवी दिल्ली - देशातील अर्ध्याहून अधिक लोकांना देशात लष्करी राजवट असायला हवीय, प्यू (Pew) च्या सर्वेक्षणातून माहिती समोर
2. नवी दिल्ली - पाकिस्तानला चालू खात्याच्या नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी सुमारे 1 लाख 10 हजार 300 कोटी रूपयांची गरज : जागतिक बँक
3. नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 90 टक्के आयएएस अधिकारी कामचुकार असल्याचा केला आरोप
4. नवी दिल्ली - ताज महलप्रमाणेच दिल्लीतील राष्ट्रपती भवनाची वास्तू देखील गुलामीचे प्रतीक आहे. त्यामुळे ही वास्तूही जमीनदोस्त करा : आझम खान
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
5. इंदोर - भारतीय बँक खातेधारकांची माहिती विकण्याच्या आरोपाखाली दोन हस्तकांना अटक, आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश
6. पंचकुला - डेरा सच्चा सौदामधून हरियाणा पोलिसांनी जप्त केलेल्या बॅगेतून गुरमीत राम रहीमचा एक बनावट पासपोर्ट मिळाला
7. लखनऊ - गैरव्यवहार आणि बोगस कारभाराला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील 2632 मदरशांविरोधात कडक कारवाईचे दिले आदेश
8. लुधियाना - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यकर्ता रवींद्र गोसाई यांची गोळ्या घालून हत्या, पोलिसांचा तपास सुरु
9. नागपूर - मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी सरपंचपदासाठीच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत ज्योती राऊत यांचा पराभव
10. मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांचा संप, बस स्थानकात स्मशान शांतता; राज्यभरात प्रवाशांचे हाल, या संपामुळे महामंडळाला दिवसाला 20 कोटींचे नुकसान
11. मुंबई - पुढची 25 वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही : दिवाकर रावते, परिवहन मंत्री
12. मुंबई - संपकरी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर रूजू व्हावे; कामावर रूजू न झाल्यास कारवाई, एसटी महामंडळाचे संपकरी कर्मचाऱ्यांना आदेश
13. रत्नागिरी - तेजस एक्स्प्रेसमध्ये झालेल्या विषबाधाप्रकरणी चिपळूण पोलिसांनी मडगाव येथील खानपान व्यवस्थापक जे. जे. घोष यांच्या विरोधात केला गुन्हा दाखल
14. व्हॉटस्अॅपच्या आगामी आवृत्तीत कोणत्याही युजरने आपल्या खात्याचा मोबाईल क्रमांक बदलल्यास याची माहिती त्याच्या संपर्कातील अन्य युजर्सला मिळणार
15. नवी दिल्ली - आता पॉवरलिफ्टर चॅम्पियन कविता देवी डब्ल्यूडब्ल्यूईच्या रिंगणात उतरणार, असे करणारी कविता पहिली भारतीय महिला खेळाडू ठरणार
16. मुंबई - सनी लिओनी आणि अरबाज खान यांच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमाचा ऑफिशियल टीझर रिलीज, हा सिनेमा 24 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर... जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
