ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

LetsUpp Marathi

LetsUpp Marathi

الذهاب إلى القناة على Telegram

न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup

إظهار المزيد
6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
🗣️ *भीमराव धोंडे ऊसतोड कामगारांसाठी रस्त्यावर* *LetsUp I Beed* 💁‍♂️ पश्चिम भागात ऊसतोडणीसाठी गेलेल्या कामगारांना बीड जिल्ह्यात 19 चेक पोस्टवरून तपासणी करून जिल्ह्यात प्रवेश देण्यात येतोय. आष्टी भागात सर्वाधिक ऊसतोड मजूर आपल्या स्वगृही परतत आहेत. 👉 अशातच या कामगारांना कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे आज रस्त्यावर उतरले. 🧐 यावेळी आष्टीत कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आरोग्य तपासणी यंत्रणा उभारण्यात आली आहे. तर धोंडे यांच्याकडून कामगारांसाठी नाष्टा आणि जेवणाची सोय करण्यात आली. 📍 आपल्या स्वगृही परताना ऊसतोड कामगारांनी शिस्तीचे पालन करावे असे आवाहन देखील धोंडे यांनी केले आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *केंद्रीय पथकाने घेतला आढावा...* *LetsUp | Pune* सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याविषयीचा आढावा घेण्याकरीता केंद्रीय स्तरावरील पथक पुण्यात दाखल झाले आहे. या पथकामार्फत पुणे महानगरपालिकेंतर्गत स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि.च्या कार्यालयामध्ये कोरोना विषयीच्या अद्ययावत माहितीकरीता सुरु करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी वॉर रुमची यावेळी पाहणी केली. यावेळी पथकामधील राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे सह सल्लागार डॉ.पवनकुमार सिंग,अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे संचालक करमवीर सिंग, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय मल्होत्रा, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड, जिल्हाधिकारी नवल किशोर राम,अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल, शांतनू गोयल, राजेंद्र मुठे हे उपस्थित होते. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *तीन नवीन कोरोना रुग्णांची भर...* *LetsUp | Aurangabad* कोरोनाचा संसर्ग झालेल्या तीन नवीन कोरोना रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 35 झाली असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. तर जुन्या दोन रुग्णांची दुसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. मिनी घाटीमध्ये एकूण 47 रुग्णांची आज तपासणी झाली. त्यापैकी 24 जणांना घरीच अलगिकरणात राहण्याचा सल्ला दिला. 36 जणांच्या लाळेचे नमुने घेऊन घाटीतील प्रयोगशाळा येथे पाठवण्यात आले आहे. 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर 7 जणांचे अहवाल येणे बाकी आहे. आताच्या नवीन तीन रुग्णांसाह मिनी घाटीमध्ये सध्या 15 कोरोनाबाधित रुग्णांवर विलगिकरण कक्षात, दोन कोरोना बाधितांवर घाटीमध्ये उपचार सुरू आहेत. तर देखरेखीखाली ठेवण्यात आलेल्या 28 जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, असे डॉ. कुलकर्णी म्हणाले. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *कोरोना; खासगी डॉक्टरांच्या सेवा वर्ग* *LetsUp | Solapur* सोलापूर शहरातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी काही खासगी डॉक्टरांच्या सेवा. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ( सिव्हिल हॉस्पिटल) येथे वर्ग करण्यात आल्या आहेत. सिव्हील हॉस्पिटल का शहरातील विविध क्षेत्रातील 27 वैद्यकीय व्यवसायिकांची सेवा वर्ग करण्यात आल्या आहेत. यामध्ये सात कार्डिओलॉजिस्ट, चार गॅस्ट्रोएंटरलॉजिस्ट, पाच नेफ्रोलॉजिस्ट, सहा न्यूरॉलॉजिस्ट आदींचा समावेश आहे. या डॉक्टर सिव्हिल हॉस्पिटल येथील फिव्हर ओपीडी, मेडिसिन ओपीडी आणि मेल-फिमेल मेडिकल वॉर्डमध्ये सेवा बजावायची आहे. या सर्व डॉक्टर वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या सूचनांनुसार काम पाहायचे आहे. मेडिकल असोसिएशनचे सोलापूर अध्यक्ष डॉ. हरिश रायचूर यांना याबाबत समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, असे याबाबत जारी केलेल्या आदेशात श्री. शंभरकर यांनी नमूद केले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सांगितले. याबाबत त्यांनी आज आदेश जारी केले आहेत. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *प्रेम संबंधात अडथळा; सख्ख्या भावाची हत्या* *LetsUp | Aurangabad* 💫 प्रेम संबंधामध्ये अडसर ठरल्यामुळे सख्या भावानेच भावाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना पैठण येथे घडली आहे. ⚡ शिवाजी लोखंडे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याचा भाऊ गोरख लोखंडे यास अटक केली आहे. 💁‍♂️ *जाणून घ्या घटना :* ▪️ मयत शिवाजी लोखंडे हा स्कूल बसचा चालक असून पत्नी व दोन मुलांसोबत पाचपिंपळ भागात भाड्याच्या इमारतीत राहत होता. ▪️ त्याची पत्नी घटनेच्या आठ दिवसांपूर्वी गावी गेल्याने तो घरात एकटाच होता. रविवारी दुपारी तो राहत असलेल्या इमारतीतुन दुर्गंध येत आसल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांनी कळविले. ▪️ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन इमारतीची पाहणी केली. इमारतीच्या दूसऱ्या मजल्यावर शिवाजी लोखंडे हा रक्ताच्या थारोळयात पडलेला आढळला. ▪️ ग्रामीण गुन्हे विभागाच्या पोलिसांनी विश्लेषणाच्या अधारे माहिती मिळविली असता गोरख लोखंडे हा १७ एप्रिल रोजी सायंकाळी पाणी भरायला जातो असे सांगुन घराबाहेर गेला होता. ▪️ तो १८ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता परत घरी आला. त्यामुळे गोरख लोखंडे याच्याकडे उलट तपासणी करुन विचारपुस केली. ▪️ त्याने मयत शिवाजी लोखंडे याचे पत्नी सोबत त्याचे प्रेमसंबध होते. मयत शिवाजी लोखंडे हा त्यांचे प्रेम संबधामध्ये अडथळा ठरत असल्याने त्याने त्याचा खुन केल्याची कबुली दिली आहे. 🎯 आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप : http://bit.ly/Letsupapp

🧐 *चीनमध्ये 24 तासांत 'एवढ्या' लोकांचा मृत्यू!* *LetsUp l Trending* ⚡ कोरोनामुळे जगभरात मृत्यू झालेल्यांची संख्या 1.5 लाख पार गेली असून आतापर्यंत जगभरात दीड लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 22 लाखांहुन अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 💁‍♂️ *सर्वाधिक अमेरिकेत* : कोरोना बाधितांचा जगभरातील आकडा 22 लाख 48 हजार 330 आहे. अमेरिकेमध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्यू तांडव सुरू आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सर्वाधिक अमेरिकेमध्ये आहे. 👀 कोरोनाने चीनमध्ये पुन्हा हैदोस घातला असून तेथील मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमध्ये गेल्या 24 तासांत 50 टक्यांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे पाहायला मिळाले. 👉 24 तासांत चीनमध्ये 1290 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांचा आकडा 4 हजार 632 वर पोहोचला आहे. संसर्ग झालेल्यांचा आकड्यामध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाली. 🛏️ चीनमध्ये गेल्या 24 तासांत 325 नवे रूग्ण आढळून आले. त्यामुळे चीनमधील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 82,692 वर पोहोचली आहे. 📌 जगभरातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनमध्ये मंदीचं सावट दिसून येत आहे. 👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

😎 *RUMMY खेळा आणि पैसे जिंका* 💰 *Rummy Circle अ‍ॅपवर* ऑनलाईन Rummy खेळा आणि जिंका रोख रक्कम 💷 *डाउनलोड करा Rummy Circle App आणि जिंका ₹2,000 बोनस* 🤪 तुम्ही जितके जास्त खेळणार तेवढी जास्त रक्कम कमावणार... 💯 100% कायदेशीर: Rummy ला 1968 मध्येच माननीय सुप्रीम कोर्टाद्वारे एक कौशल्यपूर्ण खेळ म्हणून घोषित करण्यात आले असून हा खेळ मुफ्त किंवा रोख रकमेने खेळण्यासाठी पूर्णतः कायदेशीर आहे 🤩 *अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा* : http://bit.ly/35pHUho (ADVT)

😱 *धक्कादायक; सोलापुरात कोरोनाचे 10 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले* *Letsup | Solapur* सोलापुरातील कोरोनाचे आणखी दहा रुग्ण आढळून आले आहेत. यात तेलंगी पाच्छा पेठेतील महिलेच्या संपर्कातील नऊ जणांचा समावेश आहे. एक व्यक्ती किराणा दुकानदाराच्या संपर्कातील आहे. हे सर्वजण सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल आहेत. या महिलेच्या घराजवळचा एक किलोमीटरचा परिसर यापूर्वीच सील करण्यात आला आहे. तेलगू पाच्छा पेठेतील एका किराणा दुकानदार कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या दुकानाच्या संपर्कातील १४८ लोकांचे स्वब घेण्यात आले. यात एका महिलेला कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेच्या संपर्कातील २२ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्याचे रिपोर्ट गुरुवारी सकाळी प्राप्त झाले आहेत. यात नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला पूर्व भागातील एका हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, ब्रदर यांच्या स्वब चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. किराणा दुकानदाराच्या संपर्कातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सोलापुरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

😱 *धक्कादायक; सोलापुरात कोरोनाचे 10 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले* *Letsup | Solapur* सोलापुरातील कोरोनाचे आणखी दहा रुग्ण आढळून आले आहेत. यात तेलंगी पाच्छा पेठेतील महिलेच्या संपर्कातील नऊ जणांचा समावेश आहे. एक व्यक्ती किराणा दुकानदाराच्या संपर्कातील आहे. हे सर्वजण सिव्हील हॉस्पिटलच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल आहेत. या महिलेच्या घराजवळचा एक किलोमीटरचा परिसर यापूर्वीच सील करण्यात आला आहे. तेलगू पाच्छा पेठेतील एका किराणा दुकानदार कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या दुकानाच्या संपर्कातील १४८ लोकांचे स्वब घेण्यात आले. यात एका महिलेला कोरोनाची लागण असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेच्या संपर्कातील २२ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्याचे रिपोर्ट गुरुवारी सकाळी प्राप्त झाले आहेत. यात नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला पूर्व भागातील एका हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. या हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स, ब्रदर यांच्या स्वब चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. किराणा दुकानदाराच्या संपर्कातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सोलापुरातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता १२ झाली आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂️ *'हे' भारताने वापरलेले सर्वात प्रभावी अस्त्र!* *LetsUp l Update* ⚡ लॉकडाउन हे भारताने वापरलेले सर्वात प्रभावी अस्त्र असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटले आहे. 🗣️ एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना डॉ. रमण गंगाखेडकर यांनी कोरोना विषाणूवर औषध, लस शोधण्यासाठी वेळ लागणार असून त्यात यश मिळेल. मात्र भारताने लॉकडाउन सर्वात प्रभावी अस्त्र वापरले असल्याचे सांगितले आहे. 🧐 सर्वांनी सध्या सोशल डिस्टन्सिंग पाळणे, घरीच राहणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले आहेत. कोरोनाच्या विषाणूला वाढू दिले नाही तर नव्याने लागण होण्याची संख्या कमी होईल, त्यासाठी लॉकडाऊन काटेकोर पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 📌 “नवीन औषध निघेल का? लस निघेल का? असे प्रत्येकाला वाटत आहे. आपल्याकडे विषाणू उशिरा आला आणि आपण आयसोलेट केल्यानंतर जो वेळ गेला आहे, त्यामुळे पण लस शोधण्यामध्ये आपण एक दीड महिना मागे असल्याचेही डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

😷 *मास्क न लावणाऱ्यांना पालिकेचा दणका* *LetsUp I Beed* 💁‍♂️ कोरोना विषाणूचा फैलाव रोखता यावा. यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने कडक नियम बनवलेत. परंतु या नियमांना थांब्यावर बसवणाऱ्या नागरिकांना नगरपालिकेने चांगलाच दणका दिलाय. 👉 मास्क न लावल्यानं शहरात 82 नागरिकांवर कारवाई करण्यात आलीय. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न लावणे, विनाकारण मोटरसायकल वर फिरणे अशांवर कारवाईचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिलेत. 🧐 परंतु या नियमांना हरताळ फासल्याचे अनेक ठिकाणी दिसून आलं. यावर कडक कारवाई करत आज पर्यंत नगरपालिका प्रशासनाने मास्क न लावलेल्या नागरिकांवर कारवाईला सुरुवात केलीय. तर त्यांच्याकडून 53 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

😷 *कोरोना हॉटस्पॉटच्या यादीत नगर जिल्हा* *LetsUp I Ahmednagar* 💁‍♂️ देशात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्णांची संख्या महाराष्ट्रात आहे. राज्यातील एकूण रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण मुंबईत आहेत. 👉 करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मुंबईत सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ पुण्याचा क्रमांक आहे. मुंबई पुण्याबरोबरच केंद्र सरकारने राज्यातील ११ जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत केला आहे. 🧐 मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, सांगली, अहमदनगर, यवतमाळ, औरंगाबाद, बुलडाणा, मुंबई उपनगर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश हॉटस्पॉटच्या यादीत करण्यात आलेला आहे. ⚡ महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी १६५ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून आता महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३ हजारांच्या पुढे गेली आहे. 📍 दरम्यान, दुपारी दीड वाजेपर्यंत महाराष्ट्रातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३०८१ झाली आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

😷 *सोसायट्यांमध्ये औषध फवारणी* *LetsUp I Pimpri Chinchwad* 💁‍♂️ दिवसेंदिवस शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मोशीतील हौसिंग सोसायट्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून औषध फवारणी करण्यात येत आहे. 👉 अचानक वाढ झालेल्या कोरोनामुळे सर्वांनी घरात सुरक्षित रहा, अशा सूचना दिल्या जात आहेत. मात्र, घर व परिसरामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 🧐 घरातील एखादी व्यक्ती तरी अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जात आहे. तसेच मुलांच्या शाळेला सुटी असल्याने मुले देखील सोसायटीच्या परिसरात खेळाताना दिसतात. 📍 त्यामुळे सोसायट्यांतील नागरिक व मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने औषध फवारणी केली जात आहे. मास्क न लावता बाहेर न जाणे, बाहेरून आल्यानंतर साबणाने हातपाय धुणे ही सर्व काळजी नागरिकांकडून घेतली जात आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💥 *मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेल्या आमदाराला कोरोना लागण!* *LetsUp l Update* ⚡ गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी व इतर दोन मंत्र्यांची भेट घेऊन निघालेल्या काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा रिपोर्ट येण्याच्या काही तासांपूर्वीच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. 💁‍♂️ *मिळालेली माहितीनुसार* : काँग्रेस आमदार इम्रान खेडावाला यांना काही दिवसांपासून ताप होता. चाचणीसाठी त्याचे नमुने घेण्यात आले होते. मात्र अहवाल येण्यापूर्वीच ते बाहेर फिरत होते. 👉 उपचारासाठी त्यांना गांधीनगरमधील एसव्हीपी रुग्णालयात दाखल केले आहे. या रुग्णालयात कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. 👀 मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीत नियमांचे योग्य पालन केल्याचे दिसत आहे. सर्वांनी मास्क घातले होते, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत एकमेकांमध्ये अंतर ठेवून बसले होते. मुख्यमंत्र्यांसोबतच्या या बैठकीत इतर काही मंत्रीही उपस्थित होते. 📌 गुजरातमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 617 रुग्ण सापडले असून 55 जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडले आहे. यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. 📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

😎 *RUMMY खेळा आणि पैसे जिंका* 💰 *Rummy Circle अ‍ॅपवर* ऑनलाईन Rummy खेळा आणि जिंका रोख रक्कम 💷 *डाउनलोड करा Rummy Circle App आणि जिंका ₹2,000 बोनस* 🤪 तुम्ही जितके जास्त खेळणार तेवढी जास्त रक्कम कमावणार... 💯 100% कायदेशीर: Rummy ला 1968 मध्येच माननीय सुप्रीम कोर्टाद्वारे एक कौशल्यपूर्ण खेळ म्हणून घोषित करण्यात आले असून हा खेळ मुफ्त किंवा रोख रकमेने खेळण्यासाठी पूर्णतः कायदेशीर आहे 🤩 *अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा* : http://bit.ly/35pHUho (ADVT)

💥 *राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2800 वर* *LetsUp | Update* 💫 देशात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनला २१ दिवस होऊनही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबत नसून महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या आतापर्यंत २८०१ वर पोहोचली आहे. ✨ आज ११७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून मुंबईतील ६६ रुग्णांचा समावेश आहे. तर, पुण्यातही आकडा वाढत असून आज आणखी ४४ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. 👉 तसेच, ठाणे ३, मीरा-भाईंदरमधील २, वसई-विरार व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे. 🔎 *सर्व वर्तमान घडामोडी, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यशोगाथा, ऐतिहासिक बाबी तसेच इतर महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂️ *51 ठिकाणी बीड पोलीसांचे छापे* *Letsup | Beed* बीड पोलीस दलाने दि.13 आणि 14 या दोन दिवसात गावठी दारूच्या 51 आड्ड्यावर छापे मारून 51 आरोपींवर गुन्हे दाखल करून त्यांच्या ताब्यातील 3 लाख 17 हजार 80 रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली. या कारवाईने जिल्ह्यातील अवैध दारू विक्रेत्यांमध्ये पोलीसांचा धाक निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन सुरू असतानाही सर्वत्र अवैध दारू विक्री सुरू असल्याचे चित्र असून, याप्रकरणी काही ठिकाणी कारवाईही करण्यात आली. दि.14 मंगळवार रोजी भारतरत्न डॉ. बाबासहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दारूच्या नशेत काही अनुचित प्रकार करू नये, आणि कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून जिल्ह्याती विविध पोलीस ठाणे हद्दीत गावठी दारू आड्ड्यांवर छापे मारण्यात आले. दि.13 राजी 11 ठिकाणी छापे मारून 60 हजार 798 ची दारू जप्त करण्यात आली. तद दि.14 रोजी 40 ठिकाणी छापे मारून 2 लाख 56 हजार 282 ची दारू जप्त करण्यात आली. असे एकूण 51 छापे मारून 3 लाख 17 हजार 80 रुपयांची गावठी दारू जप्त करून 51 आरोपींच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात मुंबई दारू बंदी कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,अप्पर पो.अधीक्षक स्वाती भोर,विजय कबाडे, सर्व उपविभागीय पो.अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

💁‍♂️ *'त्या' पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात 22 जण* *Letsup | Solapur* सोलापुरातील पाच्छा पेठेतील 56 वर्षीय किराणा दुकानदाराचा मृत्यू झाल्यानंतर तो कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते. या दुकानदाराच्या संपर्कात 148 जण आले असून या सर्वांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. त्यापैकी 124 जन निगेटिव्ह तर एक महिला पॉझिटिव्ह आढळली आहे. 'त्या' महिलेच्या संपर्कात 22 जण आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. मयत किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या 148 जणांपैकी 125 जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 23 जणांचे रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेले नाहीत. कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या 22 जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. या 22 जणांचाही अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली आहे. मयत किराणा दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या व अद्याप रिपोर्ट आलेल्या 23, महिलेच्या संपर्कात आलेल्या 22 अशा एकूण 45 जणांचे कोरोनाचा चाचणी अहवाल आज रात्रीपर्यंत प्राप्त होतील अशी अपेक्षा आहे. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

🧐 *आरोग्य सेतूचा विक्रम!* *LetsUp l Trending* ⚡ केंद्र सरकारने कोरोनाग्रस्तांना ट्रॅक करण्यासाठी आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅप काही दिवसांपुर्वी लाँच केले होते. या अ‍ॅपने एक नवीन विक्रम केला आहे. 💁‍♂️ *विक्रम* : फक्त 13 दिवसांमध्ये या अ‍ॅपला 5 कोटींपेक्षा अधिक जणांनी डाऊनलोड केले आहे. सोबतच हे अ‍ॅप जगातील सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत आले आहे. या बाबतची माहिती नीति आयोगाच्या रिपोर्टमधून समोर आली आहे. 👉 *रिपोर्टनुसार* : आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅपला 13 दिवसांमध्ये 5 कोटी लोकांनी डाऊनलोड केले आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधन केले त्याच्या 24 तासांच्या आत 11 मिलियन युजर्सनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले. 👀 पंतप्रधान मोदींनी आपल्या संबोधनात हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले होते. आरोग्य सेतू मोबाईल अ‍ॅपने पोकेमॉन गो गेमिंग अ‍ॅपचा विक्रमदेखील मोडला आहे. 📌 आरोग्य सेतू अ‍ॅप युजर्स कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आला आहे की नाही याची माहिती देते. हे अ‍ॅप हिंदी, इंग्रजी आणि मराठीसह 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. 🔎 *माहितीचा सार, ज्ञानाचा भांडार एका क्लिकवर, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp

*औरंगाबादेत 58 वर्षीय महिला कोरोनामुक्त* *LetsUp | Auranagbad* शहरातील सिडको भागात राहणारी एक 58 वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली आहे. या महिलेला आज रुग्णालयातून सुट्टी दिली जाणार असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. यापूर्वी शहरातील एक महिला कोरोनामुक्त झाली असून तीला रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनामुक्त महिलेला 15 दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्या लाळेची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 14 दिवसाच्या उपचारानंतर पुन्हा चाचणीसाठी स्कॅब नमुने घेण्यात आले. त्यात त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. खात्रीसाठी चोवीस तासानंतर पुन्हा चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता त्या कोरोनामुक्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 🎯 *आपल्या जिल्ह्यातील सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप अ‍ॅप* : http://bit.ly/Letsupapp