ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 711 مشتركاً، محتلاً المرتبة 5 599 في فئة التعليم والمرتبة 11 969 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 711 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 10 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -87، وفي آخر 24 ساعة بمقدار 0، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.98‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.78‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 364 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 275 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 11 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 711
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-177 أيام
-8730 أيام
أرشيف المشاركات
photo content
+4

*कोरोनाची स्थिती सुधारत असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणारी संयुक्‍त गट-ब पूर्व परीक्षा जुलै 2021 च्या पहिल्या आठवड्यात घेता येईल का, याबाबतही आयोगाने सरकारला विचारणा केली आहे.* https://www.esakal.com/maharashtra/the-mpsc-wrote-a-letter-to-the-government-asking-about-the-stagnant-appointments-and-examinations

photo content
+7

photo content
+9

🟪स्वाती पांडे यांना अ‍ॅसोचॅमचा ‘वूमन इन सायबर’ पुरस्कार उद्योग संघटना ‘असोचॅम’द्वारे दिला जाणारा ‘वूमन इन सायबर’ हा राष्ट्रीय पातळीवरील मानाचा पुरस्कार यंदा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे यांना प्रदान करण्यात आला. सहकारी बँकांना सायबर हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि उपक्रमांसाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. बुधवारी सायंकाळी केंद्रीय माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव ज्योती अरोरा यांच्या प्रमुख उपस्थितीत आभासी पद्धतीने पार पडलेल्या सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्रातील सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या स्वाती पांडे यांनी सहकारी बँकांवर वाढत असलेल्या सायबर हल्ल्यांना रोखणारी सायबर सिक्युरिटी ऑपरेटिंग सेंटर अर्थात सी सॉक या प्रभावी यंत्रणेच्या कार्यान्वयनाची मोलाची कामगिरी बजावली आहे.

🟪PREVIOUS YEAR QUESTION ANALYSIS |MPSC|PSI|STI|ASO| ExciSI |CL-Ty |TaxAsst प्रश्नपत्रिका विश्लेषण https://youtu.be/JxFAT6jvJ3Q

photo content
+2

🟪उत्पादनाधारित प्रोत्साहन योजना असणाऱ्या ‘राष्ट्रीय प्रगत रसायन संचयिका साठवणूक कार्यक्रम’ याला मंत्रिमंडळाची मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने अवजड उद्योग विभागाच्या एका प्रस्तावाला 12 मे 2021 रोजी मान्यता दिली. ACC (अॅडवान्सड केमिस्ट्री सेल) अर्थात प्रगत रसायन संचयिका (बॅटरी) साठवणूक विषयक राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा हा प्रस्ताव होता. ‘राष्ट्रीय प्रगत रसायन संचयिका (बॅटरी) साठवणूक कार्यक्रम’ एक उत्पादनाधारित प्रोत्साहन योजना (PLI) असून, 18100 कोटी रुपये खर्चून ACC साठवणूक क्षमता 50 गिगावॅट अवर (GWh) आणि निश (विशिष्ट) ACC साठवणूक क्षमता 5 गिगावॅट अवर एवढ्या मर्यादेपर्यंत उत्पादनक्षमता वाढविणे हा त्यामागील उद्देश आहे. 💠पार्श्वभूमी. ACC म्हणजे विद्युत-रासायनिक किंवा रासायनिक स्वरूपात विद्युत ऊर्जा साठविण्याचे प्रगत तंत्रज्ञान असून, गरजेप्रमाणे त्या ऊर्जेचे पुन्हा विद्युत ऊर्जेत रूपांतर करणेही शक्य असते. ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू, विद्युतचलित वाहने, प्रगत विद्युत ग्रिड, सौर छत इत्यादी क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात संचयिकांची (बॅटरी) गरज असते. सध्या भारतातील ACCची पूर्ण गरज आयातीतूनच भागविली जाते. कार्यक्रमामुळे आयातीवरील अवलंबिता कमी होऊ शकेल. तसेच आत्मनिर्भर भारत उपक्रमासही यामुळे चालना मिळेल. 💠योजनेविषयी. पारदर्शक स्पर्धात्मक लिलाव पद्धतीद्वारे ACC संचयिकांचे उत्पादक निवडले जातील. येत्या दोन वर्षात कारखाने कार्यरत केले जातील. त्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीत प्रोत्साहनपर भत्ता (इन्सेन्टिव्ह) वितरित करण्यात येईल. अधिक विशिष्ट ऊर्जा घनतेसाठी अधिक प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.

🟪बी.१.६१७ विषाणूचा ४४ देशात फैलाव. भारतात फैलाव झालेला बी.१.६१७ हा करोना विषाणूचा प्रकार ४४ देशात पसरला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. दरम्यान ही जागतिक पातळीवर चिंतेची बाब असल्याचे संघटनेने मंगळवारीच जाहीर करताना या विषाणूला ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ या गटात टाकले आहे. संयुक्त राष्ट्रांची संस्था असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की दोन उत्परिवर्तनांमुळे या विषाणूची संसर्गजन्यता जास्त आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचा समावेश या गटात करण्यात आला आहे. ११ मे पर्यंत जनुकीय क्रमवारीचे ४५०० नमुने ‘गिसएड’ या जागतिक माहिती संचात टाकण्यात आले असून त्यात ४४ देशांमध्ये व सहा विभागात हा विषाणू पसरल्याचे दिसून आले आहे. ‘गिसएड’ हा जागतिक वैज्ञानिक उपक्रम असून त्यात विषाणूच्या जनुकीय क्रमवारीची माहिती जमा करण्यात येत असते. जागतिक आरोग्य संघटनेने बी.१.६१७ हा जागतिक चिंता निर्माण करणारा विषाणू असल्याचे जाहीर केल्यानंतर तो धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनमध्येमध्ये सापडलेल्या मूळ विषाणूपेक्षा हा विषाणू पूर्णपणे वेगळा असून त्यात दोन उत्परिवर्तने झाली असून त्याची संसर्गजन्यता, घातकता, लशींचा प्रतिरोध जास्त आहे. सुरुवातीला या विषाणूत दोन उत्परिवर्तने दिसली असली तरी आता ती तीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विषाणू ऑक्टोबर २०२० मध्ये प्रथम भारतात सापडला होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यात पुन्हा बदल झाले.

🟪मेफ्लॉवर 400”: जगातील पहिली मानवरहित स्वयंचलित नौका. “मेफ्लॉवर 400” नामक जगातील पहिल्या मानवरहित स्वयंचलित नौकेने प्रथमच अटलांटिक महासागरातून प्रवास पूर्ण केला. ☑️ठळक बाबी. यासह अटलांटिक महासागर पार करणारी ही जगातील पहिली मानवरहित नौका ठरली.ही नौका IBM कंपनीच्या सहकार्याने प्रोमॅरे या सागरी संशोधन संस्थेने तयार केली आहे. समुद्रात जलचरांचा मागोवा घेणे, पाण्यातील प्लास्टिकचे विश्लेषण करणे आणि सागरी प्रदूषणाचा अभ्यास करणे अश्यासारखी विविध संशोधनात्मक उपक्रमे राबविणे हा ही नौका तयार करण्यामागे हेतु आहे. “मेफ्लॉवर 400” नौकेची वैशिष्ट्ये ही एक मानवरहित स्वयंचलित नौका आहे.नौकेची लांबी 15 मीटर आहे. त्याचे वजन 9 टन आहे. नौकेच्या संचालनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. तसेच ते सौर पटलांनी सुसज्ज आहे. नौका स्मार्ट कॅप्टनसह सहा कॅमेरे आणि रडार अश्या अत्याधुनिक सामुग्रीने सुसज्ज आहे. ही नौका धडक टाळू शकते, त्याचा मार्ग बदलू शकते, सागरी प्राण्यांचा शोध घेऊ शकते तसेच जलचर प्राण्यांच्या संख्येविषयीची माहिती गोळा करू शकते.

🟪किमान सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाउन हवा,” ICMR च्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसला असून अनेक राज्यांनी लॉकडाउन जाहीर केलं आहे. काही राज्यांमध्ये जिल्हास्तरावर लॉकडाउनचा निर्णय घेतला जात असून नागरिकांवर निर्बंध आणले जात आहे. दुसरीकडे देशातही लॉकडाउन लावला जावा अशी मागणी काही राजकीय नेत्यांकडून केली जात आहे. दरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचं विधान केलं आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. करोना रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये फैलाव रोखण्यासाठी किमान पुढील सहा ते आठ आठवडे लॉकडाउन ठेवला पाहिजे असं मत बलराम भार्गव यांनी व्यक्त केलं आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये चाचणीमध्ये संसर्ग दर १० टक्क्यांच्या पुढे आहे तिथे लॉकडाउन लावण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. सध्या भारतातील ७१८ जिल्ह्यांपैकी भारताच्या तीन चतुर्थांश भागात टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या पुढे आहे. यामध्ये नवी दिल्ली, मुंबई तसंच बंगळुरुचा समावेश आहे. बलराम भार्गव यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने करोनाला रोखण्यासाठी आधीच अनेक ठिकाणी लागू करण्यात आलेला लॉकडाउन किती काळ असला पाहिजे यावर भाष्य केलं आहे.

🟪इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल - मँचेस्टर सिटीचे चार वर्षांत तिसऱ्यांदा जेतेपद. दुसऱ्या क्रमांकावरील मँचेस्टर युनायटेडला मंगळवारी लिस्टर सिटीकडून १-२ अशा पराभवाला सामोरे जावे लागल्याने मँचेस्टर सिटीच्या इंग्लिश प्रीमियर लीगच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. मँचेस्टर सिटीचे हे गेल्या चार वर्षांतील तिसरे जेतपद ठरले. मँचेस्टर सिटीने आता तीन सामने शिल्लक राखून १० गुणांची निर्णायक आघाडी घेतली आहे. मँचेस्टर युनायटेडचे वर्चस्व मोडीत काढत सिटीने आता गेल्या १० मोसमात पाच जेतेपदांची कमाई केली आहे. मँचेस्टर युनायटेडचा पराभव झाल्यानंतर सिटीच्या चाहत्यांनी विजयाचा जल्लोष केला. आता २३ मे रोजी एव्हर्टनविरुद्ध होणाऱ्या मोसमातील अखेरच्या सामन्यानंतर मँचेस्टर सिटीला जेतेपदाचा चषक उंचावताना पाहण्याची संधी १० हजार चाहत्यांना मिळेल. सिटीने या मोसमात चौथ्यांदा लीग चषकाचे जेतेपद मिळवले. त्याचबरोबर चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदाची संधीही त्यांना मिळणार आहे.