ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 713 مشتركاً، محتلاً المرتبة 5 603 في فئة التعليم والمرتبة 11 963 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 713 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 09 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -73، وفي آخر 24 ساعة بمقدار -1، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.76‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.78‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 289 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 275 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 10 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 713
المشتركون
-124 ساعات
-197 أيام
-7330 أيام
أرشيف المشاركات
photo content

photo content
+9

photo content
+9

esakal | आरक्षणामुळे "एमपीएससी'च्या 24 परीक्षांचा तिढा ! संयुक्‍त पूर्वपरीक्षा लांबणार https://www.esakal.com/maharashtra/the-reservation-has-raised-questions-about-the-24-mpsc-exams

Anup Chandra Pandey assumes charge as Election Commissioner. https://youtu.be/ZjTOiRQboO4
Anup Chandra Pandey assumes charge as Election Commissioner. https://youtu.be/ZjTOiRQboO4

💉Covishield base price 600 plus GST 5% i.e 30 plus service charge 150 equals 780 💉Covaxin base price 1200 plus GST 5% i.e. 60 plus service charge 150 equals 1410 💉Sputnik v base price 948 plus GST 5% i.e. 47 plus service charge 150 equals 1145 https://youtu.be/ZjTOiRQboO4

photo content
+5

photo content
+9

🟪अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस २० जुलैला अंतराळात जाणार. अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस जुलै महिन्यात अंतराळ प्रवास करणार आहेत. जेफ बेजोस यांनी ब्ल्यू ओरिजिन नावाची स्पेस कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून जेफ बेजोस यांनी अंतराळ पर्यटनाची घोषणा केली होती. या कंपनीच्या स्पेसक्राफ्टमधून अंतराळ दर्शन घडवण्यात येणार आहे. कंपनीकडून पाठवण्यात येणाऱ्या पहिल्या मानवसहित स्पेसक्राप्टमध्ये ते असणार आहेत. जेफ बेजोसने आपल्या स्पेसक्राफ्टला एनएस-१४ नाव दिलं आहे. या स्पेस क्राफ्टचं चाचणी यशस्वी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जेफ बेजोस अंतराळात जाणारे पहिले श्रीमंत व्यक्ती असतील. अ‌ॅमेझॉनचे कार्यकारी अधिकारी पद सोडल्यानंतर १५ दिवसांनी ते अंतराळात जाणार आहेत. जेफ बेजोस ५ जुलैला आपलं कार्यकारी अधिकारी पद सोडणार आहेत. कंपनीने लाँच चाचणीदरम्यान नव्या बूस्टर आणि अपग्रेड केलेल्या कॅप्सूलचं परीक्षण केलं होतं. या अपग्रेडेड वर्जनमध्ये प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा तपासल्या गेल्या. या स्पेसक्राफ्टमध्ये पुश-टू-टॉक सिस्टम, प्रत्येक सीटवर नवीन क्रू अलर्ट सिस्टम, कॅप्सुलमध्ये आवाज कमी करण्यासाठी कुशन लाइनिंग, थंडावा आणि आर्द्रता नियंत्रण करण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आली आहे. न्यू शेपर्ड पूर्णत: ऑटोनॉमस सिस्टम आहे. या प्रवासात जेफ बेजोस आपल्या भावासह अंतराळात जाणार आहेत. “मी पाच वर्षांचा असल्यापासून अंतराळात प्रवास करण्याचं स्वप्न पाहत होतो. आता २० जुलैला मी माझ्या भावासह हा प्रवास करणार आहे. माझ्या सर्वात चांगल्या मित्रासोबत रोमांचकारी प्रवास असणार आहे” अंस त्यांनी इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहीलं आहे. या स्पेसक्राफ्टमधून प्रवास ११ मिनिटांचा असणार आहे. या दरम्यान स्पेसक्राफ्ट १०० किलोमीटर उंचीवर असणार आहे.

🟪NTPC लिमिटेड: ‘यूनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट याचे CEO वॉटर मॅन्डेट’ याचा नवा भागीदार. भारताच्या NTPC लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने प्रतिष्ठित ‘यूनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट याचे CEO वॉटर मॅन्डेट’ या दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. ‘यूनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट याचे CEO वॉटर मॅन्डेट’ हा दीर्घकालीन शाश्वत विकास लक्ष्ये (SDGs) यांचा एक भाग म्हणून सहभागी संस्था/कंपनीची पाणी व स्वच्छताविषयक कार्यसूची सुधारण्यासाठी कंपन्यांची बांधिलकी व प्रयत्न करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा एक पुढाकार आहे. ▪️यूनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट विषयी.. शाश्वत व सामाजिक जबाबदारीच्या संदर्भात धोरणे अवलंबण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्यांच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी जगभरातील व्यवसाय आणि कंपन्यांना प्रोत्साहन देण्याकरिता संयुक्त राष्ट्रसंघाने तयार केलेला बंधनकारक नसलेला करार आहे. हा करार व्यवसायांसाठी एक तत्त्वमूल्ये आधारित कार्यचौकट असून मानवी हक्क, कामगार, पर्यावरण आणि भ्रष्टाचारविरोधी या क्षेत्रासंबंधी दहा तत्त्वे सांगत आहेत. त्याची स्थापना 26 जुलै 2000 रोजी झाली. हा जगातील सर्वात मोठा कॉर्पोरेट / कंपनी शाश्वतपणा यासंबंधी पुढाकार आहे, ज्यात 170 देशांमधील 13 हजार कॉर्पोरेट कंपन्या आणि इतर भागधारकांचा सहभाग आहे.

🟪जागतिक महासागर दिवस: 8 जून. दरवर्षी 8 जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक महासागर दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरातील सरकारांना समुदायावरील आर्थिक क्रियांचा आणि मानवी क्रियांचा महासागरांवर होणाऱ्या परिणामाबद्दल लोकांना माहिती देण्याची संधी देतो. 2021 साली जागतिक महासागर दिवस "द ओशन: लाइफ अँड लाईव्हलीहुड" या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला. ▪️पार्श्वभूमी 2008 सालापासून संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. हा दिवस 2002 सालापासून संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था (UNESCO) याच्या इंटरगवर्नमेंटल ओशनोग्राफीक कमिशन (IOC) यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात येतो. जगभरातल्या महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महासागरांचे जतन आणि नैसर्गिकदृष्ट्या त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृती करणे यामागे हेतू आहे.जागतिक महासागर दिवस: 8 जून दरवर्षी 8 जून हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात जगभरात ‘जागतिक महासागर दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरातील सरकारांना समुदायावरील आर्थिक क्रियांचा आणि मानवी क्रियांचा महासागरांवर होणाऱ्या परिणामाबद्दल लोकांना माहिती देण्याची संधी देतो. 2021 साली जागतिक महासागर दिवस "द ओशन: लाइफ अँड लाईव्हलीहुड" या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला. ▪️पार्श्वभूमी 2008 सालापासून संयुक्त राष्ट्रसंघाने (UN) हा दिवस अधिकृतरीत्या पाळण्याचे ठरविले. हा दिवस 2002 सालापासून संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था (UNESCO) याच्या इंटरगवर्नमेंटल ओशनोग्राफीक कमिशन (IOC) यांच्या नेतृत्वात साजरा करण्यात येतो. जगभरातल्या महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वार्षिक स्वरूपात साजरा केला जातो. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे महासागरांचे जतन आणि नैसर्गिकदृष्ट्या त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी जनजागृती करणे यामागे हेतू आहे.

🟪राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांसाठी कामगिरी श्रेणी निर्देशांक(PGI) 2019-20 च्या प्रकाशनाला केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दिली मंजूरी. राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांसाठी कामगिरी श्रेणी निर्देशांक (PGI) 2019-20 च्या प्रकाशनाला केन्द्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज मंजूरी दिली. शालेय शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी 70 संचाच्या मापदंडांचे कामगिरी श्रेणी निर्देशांक सरकारने आणले आहे. राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांसाठी 2017-18 वर्षासाठीचे पीजीआय पहिल्यांदा 2019 मधे प्रकाशित झाले. 2019-20 साठीचे पीजीआय, या मालिकेतील तिसरे प्रकाशन आहे. या निर्देशांकामुळे बहुविध सुधारणांसाठी राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना चालना मिळेल. परिणामी दर्जेदार शिक्षणाबाबत अपेक्षित परिणाम दिसू शकतील. शालेय शिक्षणाची व्यवस्था प्रत्येक पातळीवर बळकट व्हावी याकरता प्राधान्यक्रम आणि इतर बाबीतली तफावत तज्ञ सहभागातून नेमकी शोधण्यासाठी या निर्देशांकामुळे राज्ये आणि केन्द्र शासित प्रदेशांना मदत होईल.  पंजाब, चंदिगड, तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार बेटे, आणि केरळ यांनी वर्ष 2019-20 साठी सर्वोत्तम श्रेणी (श्रेणी A++) प्राप्त केली आहे. 

🟪IPL २०२१चं वेळापत्रक झालं जाहीर..! ‘या’ खास दिवशी होणार अंतिम सामना. करोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल २०२१चे १४वे सत्र आता यूईमध्ये पूर्ण होईल. बायो बबलमध्ये करोनाच्या प्रवेशानंतर २९ सामन्यांनंतर लीग पुढे ढकलण्यात आली. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली. आता या लीगच्या आयोजनाची तारीखही समोर आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशा कालावधीत आयपीएल २०२१चा उर्वरित टप्पा खेळवण्यात येणार आहे. लीगचा अंतिम सामना १५ तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी होणार आहे. आयपीएल २०२० प्रमाणे आयपीएल २०२१चे उर्वरित सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये होणार आहेत. यासंदर्भात दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी त्यांची संमती दर्शविली आहे.

🎾🎾IPL २०२१चं वेळापत्रक झालं जाहीर..! ‘या’ खास दिवशी होणार अंतिम सामना.🎾🎾 🔗करोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल २०२१चे १४वे सत्र आता यूईमध्ये पूर्ण होईल. बायो बबलमध्ये करोनाच्या प्रवेशानंतर २९ सामन्यांनंतर लीग पुढे ढकलण्यात आली. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली. आता या लीगच्या आयोजनाची तारीखही समोर आली आहे. 🔗एएनआयच्या वृत्तानुसार, १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशा कालावधीत आयपीएल २०२१चा उर्वरित टप्पा खेळवण्यात येणार आहे. लीगचा अंतिम सामना १५ तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी होणार आहे. 🔗आयपीएल २०२० प्रमाणे आयपीएल २०२१चे उर्वरित सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये होणार आहेत. यासंदर्भात दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी त्यांची संमती दर्शविली आहे. करोना व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल २०२१चे १४वे सत्र आता यूईमध्ये पूर्ण होईल. बायो बबलमध्ये करोनाच्या प्रवेशानंतर २९ सामन्यांनंतर लीग पुढे ढकलण्यात आली. बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण सभेत उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळण्याची घोषणा करण्यात आली. आता या लीगच्या आयोजनाची तारीखही समोर आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर अशा कालावधीत आयपीएल २०२१चा उर्वरित टप्पा खेळवण्यात येणार आहे. लीगचा अंतिम सामना १५ तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी होणार आहे. आयपीएल २०२० प्रमाणे आयपीएल २०२१चे उर्वरित सामने दुबई, अबुधाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये होणार आहेत. यासंदर्भात दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी त्यांची संमती दर्शविली आहे.

🟪इस्रो’कडून तीन प्रकारची श्वसनयंत्रे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या वैज्ञानिकांनी तीन प्रकारची श्वसनयंत्रे तयार केली असून त्याचे तंत्रज्ञान हस्तांतर लवकरच उद्योगांना केले जाणार आहे. करोना १९ साथीच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना श्वसनयंत्रे लावण्याची वेळ आली होती. इस्रोने तयार केलेली श्वसन यंत्रे आपत्कालीन परिस्थितीत वापरली जाऊ शकतात. त्यातील एकाचे नामकरण ‘प्राण’ (प्रोग्रॅमेबल रेस्पिरेटरी असिस्टन्स फॉर दी नीडी एड) असे करण्यात आले आहे. दुसऱ्या यंत्राचे नाव ‘अंबू’ म्हणजे (आर्टिफिशियल मॅन्युअर ब्रीदिंग) असे करण्यात आले आहे. दोन्ही यंत्रे अत्याधुनिक असून त्यात दाब संवेदक, प्रवाह संवेदक व प्राणवायू संवेदक आहेत. पीप - म्हणजे पॉझिटिव्ह एंड एक्सपिरेटरी प्रेशरचाही यात वापर करण्यात आला असून त्यात नियंत्रण झम्डपांचाही समावेश आहे. श्वसनयंत्राच्या मदतीने रुग्णाला आवश्यक तेवढाच प्राणवायू पुरवला जातो. प्राणवायूमिश्रित हवा रुग्णाच्या फुप्फुसात सोडली जाते. पण हे प्रमाण योग्य असावे लागते. इस्रोने म्हटले आहे, की श्वसन यंत्राने दोन पद्धतींनी प्राणवायू देता येतो. त्यात सातत्यपूर्ण श्वसनाची व्यवस्थाही नियंत्रित पद्धतीने केली आहे. त्यासाठी अलगॉरिदमचा वापर केला असून जर काही धोका निर्माण झाला तर आपोआप सुरक्षा झडपा उघडून बॅरोट्रॉमा, अ‍ॅसफिक्सिया व अ‍ॅपनिया हे प्रकार टाळले जातात. दोन्ही प्राणवायू यंत्रे ही अतिदक्षता विभागात सुरक्षित पद्धतीने वापरली जाऊ शकतात. त्यात जीवाणू व विषाणू यांना दूर करणारी हवेची गाळणी किंवा फिल्टर्स बसवलेले आहेत.

🟪मे 2021 मधील  जीएसटी महसूल संकलन.. मे महिन्यात 1,02,709 कोटी रुपये जीएसटी महसूल संकलित. मे 2021 या महिन्यात  एकूण 1,02,709 कोटी रुपये जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महसूल संकलित करण्यात आला  आहे. त्यापैकी सीजीएसटी 17,592 कोटी रुपये , एसजीएसटी 22,653 कोटी रुपये,  आयजीएसटी 53,199 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा 26,002 कोटी रुपयांच्या समावेशासह ) आणि अधिभार 9,265 कोटी  रुपये (वस्तूंच्या आयातीवर संकलित  868   कोटी रुपये संकलनासह ) आहे. कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर  मे 21 मध्ये विवरणपत्र दाखल करण्यासाठी 15 दिवस विलंबित विवरणपत्र दाखल करण्यावर व्याजात कपात/सवलत या स्वरूपात करदात्यांसाठी  विविध दिलासादायक उपाय योजल्याने  आकडेवारीत 4 जूनपर्यंत देशांतर्गत व्यवहारातून झालेल्या  जीएसटी संकलनाचा समावेश आहे. या महिन्यात सरकारने नियमित तडजोड म्हणून आयजीएसटीमधून 15,014 कोटी रुपये सीजीएसटीला आणि   11,653 कोटी रुपये एसजीएसटीला दिले आहेत. मागील वर्षी याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा  मे 2021 मधील  महसूल 65% अधिक आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीमधून मिळणारा महसूल  56% अधिक राहिला  आणि देशांतर्गत व्यवहार (सेवांच्या आयातीसह) पासून मिळणारा महसूल मागील वर्षाच्या याच महिन्याच्या  या स्रोतातील महसुलापेक्षा  69% अधिक राहिला. सलग आठव्या महिन्यात 1 लाख कोटी रुपयांहून जास्त जीएसटी महसूल संकलित झाला आहे. महामारीमुळे अनेक राज्यांमध्ये कडक टाळेबंदी असतानाही हे शक्य झाले आहे.   याव्यतिरिक्त, 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या करदात्यांनी 4 जूनपर्यंत आपले विवरण सादर करणे आवश्यक होते, अन्यथा 20 मेपर्यंत ही मुदत होती.   5 कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या लहान करदात्यांना विनाविलंब आणि व्याजाशिवाय विवरणपत्र दाखल करण्यासाठी  अद्याप जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत आहे. तोपर्यंत या करदात्यांकडून मिळणारा महसूल स्थगित करण्यात आला आहे.  अशा प्रकारे मे 2021,या  महिन्यातील वास्तविक महसूल अधिक  असेल आणि जेव्हा सर्व वाढीव तारखांची मुदत संपेल तेव्हा तो समजू शकेल.