ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 745 مشتركاً، محتلاً المرتبة 5 597 في فئة التعليم والمرتبة 11 988 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 745 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 11 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -76، وفي آخر 24 ساعة بمقدار 9، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 10.19‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.78‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 438 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 275 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 12 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 745
المشتركون
+924 ساعات
+27 أيام
-7630 أيام
أرشيف المشاركات
🟪भारतीय हवाई दल कमांडर परिषद 2021 ‘भारतीय हवाई दल कमांडर परिषद 2021’ या कार्यक्रमाचा 16 एप्रिल 2021 रोजी नवी दिल्लीतील भारतीय हवाई दलाच्या मुख्यालयात समारोप झाला. 🔲ठळक बाबी. यंदाच्या या परिषदेची ‘भविष्यासाठी पुनर्रचना’ ही संकल्पना होती. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत भारतीय हवाई दलाच्या कार्यक्षमता वाढविण्याच्या मार्गांवर सविस्तर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी संयुक्त नियोजन आणि सेवा क्षमतांच्या एकीकरणाद्वारे भविष्यातील युद्ध या विषयांवर दलाच्या कमांडरांशी संवाद साधला. महत्त्वाच्या विषयांमध्ये सर्व क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय हवाई दलाची पुनर्रचना आणि भविष्यामध्ये मालमत्तेच्या प्रभावी वापरासाठी मार्गदर्शक योजना तयार करणे आदी विषय समाविष्ट होते. 🔲भारतीय हवाई दल.. . भारतीय लष्कराची ही एक महत्त्वाची शाखा आहे. पहिल्या महायुद्धापासून युद्धशास्त्राचे एक नवे अंग निर्माण झाले, ते म्हणजे हवाई युद्ध. या युद्धाचा उपयोग जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन,रशिया व अमेरिका ह्या राष्ट्रांनी अनुक्रमे युद्धात करण्यास सुरुवात केली. 1918-38 या एकवीस वर्षांच्या – दोन जागतिक युद्धांच्या – संधिकाळात ब्रिटिशांनी भारतात ‘रॉयल एअर फोर्स’ याची (शाही हवाई दल) स्थापना केली. सर ॲण्ड्र्यू स्कीन कमिटीच्या शिफारशीनुसार 1928 साली क्रॅनवेलच्या वैमानिक शाळेत सहा भारतीय सैनिकांनी दरवर्षी प्रशिक्षण घ्यावयाचे, असे ठरले व भारतीय हवाई दलाची स्थापना झाली मात्र भारतीय वैमानिकांची पहिली प्रशिक्षित तुकडी 1933 साली बाहेर पडली.

🟪ज्येष्ठ सनदी अधिकारी अच्युत गोखले यांचे निधन ज्येष्ठ सनदी अधिकारी, नागालँडचे माजी मुख्य सचिव आणि केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत माधव गोखले (वय ७५) यांचे करोना संसर्गामुळे निधन झाले. व्हिलेज डेव्हलपमेंट बोर्ड आणि जवाहर रोजगार योजना क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १९९० मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. गोखले यांचा जन्म ३ जानेवारी १९४६ रोजी झाला. १९६५ मध्ये मुंबई विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयामध्ये पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ नौदलामध्ये काम केले. त्यानंतर ते नागालँड केडरमधून भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाले. विविध पदांवर काम करताना गोखले यांनी नागालँड येथे ग्रामीण विकासामध्ये त्यांनी भरीव योगदान दिले. ‘नागालँड एम्पॉवरमेंट ऑफ पीपल थ्रू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट’ (एनईपीईडी) योजनेच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यामध्ये गोखले यांना यश आले. १९८७ ते १९९२ या कालावधीमध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामध्ये सहसचिव म्हणून काम करताना त्यांनी जवाहर रोजगार योजना यशस्वीपणे राबविली होती. १९९२ मध्ये ते पुन्हा नागालँडमध्ये परतले. कृषी आयुक्त आणि राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले. केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे सचिव या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. नागालँडमध्ये असताना गोखले यांनी वनस्पतिशास्त्राचा अभ्यास केला होता. तेथील वनस्पतींची छायाचित्रे त्यांनी टिपली होती. या छायाचित्रांचा समावेश असलेल्या पुस्तकांमध्ये पुस्तकांचा जगभरामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून वापर केला जातो.

🟪प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं. त्यांनी पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या ७८ वर्षांच्या होत्या. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडीने अनेक प्रतिभावान चित्रपट बनवले. झोपडपट्टीतल्या महिलांचं आयुष्य दाखवणारा, १९८५ सालचा बाई हा सुमित्रा यांचा पहिला लघुपट हा त्यांच्या स्त्रीवाणी या शोधप्रकल्पाचा भाग होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यांचा पुढचा लघुपट पाणी यालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मुक्ती, चाकोरी, लहा, थ्री फेसेस ऑफ टुमारो असे लघुपट बनवले. सुमित्रा यांना त्यांच्या योगदानाबद्दल चित्र रत्न पुरस्कार आणि कामधेनू पुरस्कारही मिळाला. 'दोघी', 'जिंदगी जिंदाबाद', 'दहावी फ', 'वास्तुपुरुष', 'देवराई', 'नितळ', 'एक कप च्या', 'घो मला असला हवा', 'संहिता', 'अस्तू', 'कासव' हे त्यांची काही प्रमुख चित्रपट. या चित्रपटांचं लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. सुमित्रा या दीर्घकाळापासून कॅन्सर या आजाराशी लढा देत होत्या.

🏆 आयसीसी हॉल ऑफ फेम (महिला) 👩‍🦰 २०१० : राचेल फ्लिंट 👩‍🦰 २०११ : बेलिंडा क्लार्क 👩‍🦰 २०१२ : एनिड बेकवेल 👩‍🦰 २०१३ : डेबी हॉकले 👩‍🦰 २०१५ : बेटि विल्सन 👩‍🦰 २०१६ : कॅरेन रोल्टन 👩‍🦰 २०१८ : क्लेअर टेलर 👩‍🦰 २०१९ : कॅथरीन फिट्झपॅट्रिक 👩‍🦰 २०२० : लिसा स्थालेकर . 🇦🇺 ऑस्ट्रेलिया : ०५ महिला 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 इंग्लंड : ०३ महिला 🇳🇿 न्युझीलंड : ०१ महिला

🟪आज १८ एप्रिल : जागतिक वारसा दिन 📌 थीम २०२१ : " Complex Pasts : Diverse Future " ✅ सर्वाधिक वारसास्थळे : चीन व इटली (५५) 🌐 जगातील एकुण वारसास्थळे : ११२१ 🇮🇳 भारतातील वारसास्थळे : एकुण ३८ ___________________________ ⏳ युनेस्कोची स्थापना : १६ नोव्हेंबर , १९४५ 🏢 युनेस्को मुख्यालय : पॅरिस , फ्रान्स 👤 महासंचालक : ऑड्रे अझोले (फ्रान्स) ‌.

सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेव
+1
सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक १८ वा ━━━━━━━༺༻━━━━━━━ 12 मार्च पासून सर्वत्र उपलब्ध ━━━━━━━༺༻━━━━━━━ » कालावधी - १ जानेवारी ते १० मार्च दरम्यानच्या घडामोडी » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________________ What's App वर ऑर्डर स्वीकारली जाईल घरपोच डिलिव्हरी What's App no 09923906500 / 08087722277

🟪आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे दिन: 18 एप्रिल 🟪लॉकडाउन अशक्य’; न्यायालयाने आदेश देऊनही योगी सरकारचा लॉकडाउनसाठी नकार. अलाहाबाद उच्च न्यायालयाने आदेश दिलेला असतानाही उत्तर प्रदेश सरकारने लॉकडाउन लागू करण्यास नकार दिला आहे. करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे लखनऊ, वाराणसी, कानपूर नगर, गोरखपूर व अलाहाबाद (प्रयागराज) या शहरांमध्ये आठवडाभरासाठी लॉकडाउन लागू करावा, असा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला दिला होता. उत्तर प्रदेश सरकारने सध्या तरी लॉकडाउन अशक्य असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) याच्या नेतृत्वात 18 एप्रिल 2021 रोजी ‘आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे दिन’ किंवा ‘जागतिक वारसा दिन’ साजरा करण्यात आला. यावर्षी “कॉम्प्लेक्स पास्ट्स: डायव्हर्स फ्युचर्स” या संकल्पनेखाली हा दिवस साजरा करण्यात आला आहे. ▪️पार्श्वभूमी 1982 साली आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे परिषद (ICOMOS) या संघटनेनी "जागतिक वारसा दिन" घोषित केला, ज्याला 1983 साली UNESCOच्या महासभेने मनुष्यजातीच्या सांस्कृतिक वारसाच्या महत्त्वाबद्दल जागृती वाढविण्याच्या उद्देशाने मंजुरी दिली. या दिवशी आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या हेतूने आणि या क्षेत्रातील सर्व संबंधित संस्थांच्या प्रयत्नांविषयी जागृती निर्माण केली जाते. ▪️भारतातली जागतिक वारसा स्थळे संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात. आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे. ▪️सांस्कृतिक आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश अजिंठा लेणी, महाराष्ट्रनालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहारबौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र,एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू हंपीमधील मंदिरे, कर्नाटक महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक राजस्थानामधील पर्वतीय किल्ले अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर हुमायूनची कबर, दिल्ली खजुराहो, मध्यप्रदेशमहाबोधी मंदिर, बोध गया, बिहार भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे),कुतुब मिनार, दिल्ली राणी की वाव, पटना, गुजरात लाल किल्ला, दिल्ली,दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश ले कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड जंतर मंतर, जयपूरमुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल हीइमारतजयपूरनैसर्गिक. ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम केवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा) मिश्र ▪️खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम UNESCO बाबत. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

🟪नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया या संस्थेच्या तीन नव्या उपक्रम/सेवांचे उद्घाटन. इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान सचिव आणि नॅशनल इंटरनेट एक्सचेंज ऑफ इंडिया (NIXI) याचे अध्यक्ष अजय प्रकाश साहनी यांच्या हस्ते 15 एप्रिल 2021 रोजी NIXI याच्या तीन अभिनव उपक्रमांचे उद्घाटन झाले. IPv6 तज्ज्ञ मंडळ (IP गुरु)NIXI अ‍ॅकॅडमीNIXI-IP-INDEX IPv6 (इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6) यासाठी जागृती आणि देशात अंमलबजावणी यासाठी दूरसंचार विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्यासह NIXI सहाय्यक भूमिका निभावणार आहे. ▪️‘IPv6 तज्ज्ञ मंडळ IPv6 याचा स्वीकार ज्या भारतीय आस्थापनांना तांत्रिक दृष्ट्या आव्हान वाटत आहे, अशांना सहाय्य करण्यासाठी IP गुरु हा गट आहे. IPv6 अनुसरण्यासाठी आवश्यक तंत्र सहाय्य करण्यासाठी एजन्सीची सेवा भाड्याने घेण्यासाठीही हा तज्ज्ञ गट मदत करणार आहे. IPv6 सारखे आणि सर्वसाधारणपणे शैक्षणिक संस्थामधून शिकवले जात नाही असे तंत्रज्ञान भारतात शिकण्यासाठी तांत्रिक आणि बिगर तांत्रिक लोकांना शिक्षण देण्यासाठी निकसी अकादमी उभारण्यात आली आहे. वापरण्यासाठी सुलभ असलेला हा मंच, नेटवर्क ऑपरेटर आणि शिक्षकांना उत्तम प्रथा, तत्वे आणि तंत्र, इंटरनेट संसाधनांचे उत्तम व्यवस्थापन आणि योग्य इंटरनेट तंत्राचा अधिक प्रभावी वापर यासाठी मदत करतो. NIXI याने इंटरनेट समुदायासाठी IPv6 निर्देशांक संकेतस्थळ विकसित केले आहे. NIXI-IP-INDEX भारतात आणि जगभरात IPv6 चा स्वीकार करण्याचा दर दर्शवेल.

🟪'खंजर': भारत आणि किर्गिझस्तान यांची आठवी संयुक्त लष्करी कवायत. भारत आणि किर्गिझस्तान यांची 'खंजर' नामक आठवी संयुक्त लष्करी कवायत बिश्केक (किर्गिझस्तान देशाची राजधानी) येथे आयोजित करण्यात आली. दोनही देशांच्या विशेष दलांची ही संयुक्त कवायत आहे. याची 2011 साली सुरुवात झाली, ज्यामध्ये उंचावरील युद्ध, डोंगरामधील युद्ध अश्या कौशल्यावर भर देण्यात येते. किर्गिझस्तान किंवा किर्गिझ प्रजासत्ताक हा मध्य आशियातील एक देश आहे. पूर्वी किर्गिझस्तान हे सोव्हियत संघाचा एक भाग होता. बिश्केक ही किर्गिझस्तानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. त्याचे राष्ट्रीय चलन सोम हे आहे.

🟪केंद्रीय सरकारने OCI कार्ड पुन्हा प्रदान करण्याची प्रक्रिया केली सुलभ. विदेशी भारतीय नागरिक (OCI) कार्ड पुन्हा प्रदान करण्याची प्रक्रिया सुकर करण्याचा निर्णय अपेक्षित असतानाच केंद्रीय सरकारने ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. OCI कार्ड भारतीय वंशाच्या परदेशी लोकांमध्ये आणि भारतीय नागरिकांच्या किंवा OCI कार्डधारकांच्या परदेशी वंशाच्या जोडीदारांमध्ये खूप लोकप्रिय आहे; कारण या कार्डमुळे सदर व्यक्तींना भारतात मुक्त प्रवेश आणि अमर्यादित दिवस राहण्याची परवानगी प्राप्त होते.Y भारत सरकारने आतापर्यंत सुमारे 37.72 लाख OCI कार्ड प्रदान केली आहेत. ▪️ठळक बाबी विद्यमान कायद्यानुसार, भारतीय वंशाची परदेशी व्यक्ती किंवा भारतीय नागरिकाचा परदेशी जोडीदार किंवा OCI कार्ड धारकाचा परदेशी जोडीदार OCI कार्डधारक म्हणून नोंदणी करू शकतो. OCI कार्ड हे भारतात प्रवेश करण्यासाठी आणि राहण्यासाठी एक आजीवन व्हिसा आहे, ज्यामध्ये इतर अनेक फायदे आहेत जे इतर परदेशी लोकांना उपलब्ध नाहीत. अर्जदाराच्या चेहऱ्यात होणाऱ्या बदलांमुळे सध्या, OCI कार्ड हे 20 वर्षापर्यंत प्रत्येकवेळी नवीन पारपत्र प्रदान करताना आणि त्यानंतर वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा प्रदान करणे आवश्यक आहे. OCI कार्डधारकांना सुविधा देण्याच्या उद्देशाने आता भारत सरकारने यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बदलानुसार, ज्या व्यक्तीने वयाच्या 20 व्या वर्षाच्या आधी OCI कार्डधारक म्हणून नोंदणी केली आहे, त्याला 20 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवीन पारपत्र प्रदान केल्यावर केवळ एकदाच OCI कार्ड पुन्हा प्रदान करावे लागेल. जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 20 वर्षानंतर OCI कार्डधारक म्हणून नोंदणी केली असेल तर त्या व्यक्तीला OCI कार्ड पुन्हा प्रदान करण्याची आवश्यकता नाही. OCI कार्डधारकाद्वारे नवीन पारपत्रासंदर्भातील माहिती अद्ययावत करण्याच्या दृष्टीकोनातून, त्याचे/तिचे छायाचित्र असलेल्या नवीन पारपत्राची एक प्रत आणि नवीन छायाचित्र OCI पोर्टलवर अपलोड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, प्रत्येक वेळी वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत आणि वयाची 50 वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवीन पारपत्र प्रदान केले जाते. नवीन पारपत्र मिळाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत हे कागदपत्र OCI कार्डधारकांद्वारे अपलोड केले जाऊ शकतात. तथापी, भारतीय नागरिक किंवा OCI कार्ड धारकाचे परदेशी वंशाचे जोडीदार जे OCI कार्डधारक म्हणून नोंदणीकृत आहेत अशा व्यक्तींसाठी संबंधित व्यक्तीची माहिती देखील प्रणालीवर अपलोड असणे आवश्यक आहे, पारपत्र धारकाचे छायाचित्र असलेल्या नवीन पारपत्राची एक प्रत आणि प्रत्येकवेळी नवीन पारपत्र दिल्यावर त्यांचे लग्न अजूनही कायम आहे अशा प्रतिज्ञापत्रासह नवीन छायाचित्र प्रणालीवर अपलोड करणे अपेक्षित आहे. हे कागदपत्र OCI कार्डधारक त्याचे/ तिचे नवीन पारपत्र मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत अपलोड करू शकतात. तपशील सिस्टमवर अपडेट केला जाईल आणि OCI कार्डधारकास ई-मेलद्वारे एक पोहोचपावती पाठविली जाईल. OCI कार्डधारकास नवीन पारपत्र प्रदान करण्याच्या तारखेपासून वेब-आधारित प्रणालीमध्ये त्याच्या / तिच्या कागदपत्रांची अंतिम पोचपावती प्राप्त होण्याच्या तारखेपर्यंत भारतात / किंवा भारता बाहेर प्रवास करण्यास कोणतेही बंधन नाही.कागदपत्रे अपलोड करण्याच्या वरील सर्व सेवा OCI कार्डधारकांना नि: शुल्क पुरविल्या जातील.

🟪भारतीय हवाई दल कमांडर परिषद 2021 ‘भारतीय हवाई दल कमांडर परिषद 2021’ या कार्यक्रमाचा 16 एप्रिल 2021 रोजी नवी दिल्लीतील भारतीय हवाई दलाच्या मुख्यालयात समारोप झाला. 🔲ठळक बाबी. यंदाच्या या परिषदेची ‘भविष्यासाठी पुनर्रचना’ ही संकल्पना होती. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत भारतीय हवाई दलाच्या कार्यक्षमता वाढविण्याच्या मार्गांवर सविस्तर चर्चा झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी संयुक्त नियोजन आणि सेवा क्षमतांच्या एकीकरणाद्वारे भविष्यातील युद्ध या विषयांवर दलाच्या कमांडरांशी संवाद साधला. महत्त्वाच्या विषयांमध्ये सर्व क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय हवाई दलाची पुनर्रचना आणि भविष्यामध्ये मालमत्तेच्या प्रभावी वापरासाठी मार्गदर्शक योजना तयार करणे आदी विषय समाविष्ट होते. 🔲भारतीय हवाई दल.. . भारतीय लष्कराची ही एक महत्त्वाची शाखा आहे. पहिल्या महायुद्धापासून युद्धशास्त्राचे एक नवे अंग निर्माण झाले, ते म्हणजे हवाई युद्ध. या युद्धाचा उपयोग जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन,रशिया व अमेरिका ह्या राष्ट्रांनी अनुक्रमे युद्धात करण्यास सुरुवात केली. 1918-38 या एकवीस वर्षांच्या – दोन जागतिक युद्धांच्या – संधिकाळात ब्रिटिशांनी भारतात ‘रॉयल एअर फोर्स’ याची (शाही हवाई दल) स्थापना केली. सर ॲण्ड्र्यू स्कीन कमिटीच्या शिफारशीनुसार 1928 साली क्रॅनवेलच्या वैमानिक शाळेत सहा भारतीय सैनिकांनी दरवर्षी प्रशिक्षण घ्यावयाचे, असे ठरले व भारतीय हवाई दलाची स्थापना झाली मात्र भारतीय वैमानिकांची पहिली प्रशिक्षित तुकडी 1933 साली बाहेर पडली.

🟪ज्येष्ठ सनदी अधिकारी अच्युत गोखले यांचे निधन ज्येष्ठ सनदी अधिकारी, नागालँडचे माजी मुख्य सचिव आणि केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत माधव गोखले (वय ७५) यांचे करोना संसर्गामुळे निधन झाले. व्हिलेज डेव्हलपमेंट बोर्ड आणि जवाहर रोजगार योजना क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल १९९० मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताबाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. गोखले यांचा जन्म ३ जानेवारी १९४६ रोजी झाला. १९६५ मध्ये मुंबई विद्यापीठातून पदार्थविज्ञान विषयामध्ये पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी काही काळ नौदलामध्ये काम केले. त्यानंतर ते नागालँड केडरमधून भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये रुजू झाले. विविध पदांवर काम करताना गोखले यांनी नागालँड येथे ग्रामीण विकासामध्ये त्यांनी भरीव योगदान दिले. ‘नागालँड एम्पॉवरमेंट ऑफ पीपल थ्रू इकॉनॉमिक डेव्हलपमेंट’ (एनईपीईडी) योजनेच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यामध्ये गोखले यांना यश आले. १९८७ ते १९९२ या कालावधीमध्ये केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयामध्ये सहसचिव म्हणून काम करताना त्यांनी जवाहर रोजगार योजना यशस्वीपणे राबविली होती. १९९२ मध्ये ते पुन्हा नागालँडमध्ये परतले. कृषी आयुक्त आणि राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी काम केले. केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे सचिव या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. नागालँडमध्ये असताना गोखले यांनी वनस्पतिशास्त्राचा अभ्यास केला होता. तेथील वनस्पतींची छायाचित्रे त्यांनी टिपली होती. या छायाचित्रांचा समावेश असलेल्या पुस्तकांमध्ये पुस्तकांचा जगभरामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून वापर केला जातो.

🟪प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं. त्यांनी पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या ७८ वर्षांच्या होत्या. सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या जोडीने अनेक प्रतिभावान चित्रपट बनवले. झोपडपट्टीतल्या महिलांचं आयुष्य दाखवणारा, १९८५ सालचा बाई हा सुमित्रा यांचा पहिला लघुपट हा त्यांच्या स्त्रीवाणी या शोधप्रकल्पाचा भाग होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. त्यांचा पुढचा लघुपट पाणी यालाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मुक्ती, चाकोरी, लहा, थ्री फेसेस ऑफ टुमारो असे लघुपट बनवले. सुमित्रा यांना त्यांच्या योगदानाबद्दल चित्र रत्न पुरस्कार आणि कामधेनू पुरस्कारही मिळाला. 'दोघी', 'जिंदगी जिंदाबाद', 'दहावी फ', 'वास्तुपुरुष', 'देवराई', 'नितळ', 'एक कप च्या', 'घो मला असला हवा', 'संहिता', 'अस्तू', 'कासव' हे त्यांची काही प्रमुख चित्रपट. या चित्रपटांचं लेखन आणि दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. सुमित्रा या दीर्घकाळापासून कॅन्सर या आजाराशी लढा देत होत्या.

🏆 आयसीसी हॉल ऑफ फेम (महिला) 👩‍🦰 २०१० : राचेल फ्लिंट 👩‍🦰 २०११ : बेलिंडा क्लार्क 👩‍🦰 २०१२ : एनिड बेकवेल 👩‍🦰 २०१३ : डेबी हॉकले 👩‍🦰 २०१५ : बेटि विल्सन 👩‍🦰 २०१६ : कॅरेन रोल्टन 👩‍🦰 २०१८ : क्लेअर टेलर 👩‍🦰 २०१९ : कॅथरीन फिट्झपॅट्रिक 👩‍🦰 २०२० : लिसा स्थालेकर . 🇦🇺 ऑस्ट्रेलिया : ०५ महिला 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿 इंग्लंड : ०३ महिला 🇳🇿 न्युझीलंड : ०१ महिला

🟪आज १८ एप्रिल : जागतिक वारसा दिन 📌 थीम २०२१ : " Complex Pasts : Diverse Future " ✅ सर्वाधिक वारसास्थळे : चीन व इटली (५५) 🌐 जगातील एकुण वारसास्थळे : ११२१ 🇮🇳 भारतातील वारसास्थळे : एकुण ३८ ___________________________ ⏳ युनेस्कोची स्थापना : १६ नोव्हेंबर , १९४५ 🏢 युनेस्को मुख्यालय : पॅरिस , फ्रान्स 👤 महासंचालक : ऑड्रे अझोले (फ्रान्स) ‌.

चतुरस्त्र नट हरपला! अभिनेते किशोर नांदलस्कर काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टीवर शोककळा http://dhunt.in/eeCSX?s=a&uu=0x63031c35561013bd&ss=pd Source : "दैनिक बोंबाबोंब "

वरील निवेदनाची महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग यांनी घेतली दखल..... लवकरच मराठी भाषेत एकूण वर्ण किती आहेत? याच्या निश्चिती बरोबरच सुधारित वर्णमाला मराठी भाषा अभ्यासक व अध्यापक यांच्यापर्यंत येईल. सुधारित वर्णमाला कशी असावी यासाठी pdf च्या शेवटच्या पानावर माहिती दिलेले आहे.

━━━━━━━༺━━━━━━━ ▪️स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके आता एकाच Platform वर उपलब्ध… 👉त्वरा करा आजच आपली प्रत घरपोच मिळवा ▪️Buy Online 👇आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com _____________________