ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 713 مشتركاً، محتلاً المرتبة 5 607 في فئة التعليم والمرتبة 11 981 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 713 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 07 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -75، وفي آخر 24 ساعة بمقدار 2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.26‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.17‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 2 111 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 068 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 08 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 713
المشتركون
+224 ساعات
-477 أيام
-7530 أيام
أرشيف المشاركات
🟪न्याय विभागाचा ‘टेली-लॉ’ कार्यक्रम. भारत सरकारच्या न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘टेली-लॉ’.कार्यक्रमाच्या अंतर्गत 9 लक्ष लाभार्थ्यांचा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. हे यश साजरे करण्यासाठी आणि “आझादी का अमृत महोत्सव”चा प्रारंभ करण्यासाठी न्याय विभागाने 6 जुलै 2021 रोजी नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित केला होता. 🅾ठळक बाबी सामान्य नागरिकांच्या दैनंदिन सामाजिक समस्या / संघर्षाचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यात नागरिकांना मदत करण्यासाठी VLE, PLV, राज्य समन्वयक आणि पॅनेल वकिलांची मदत होते. टेली-लॉ उपक्रमाने 2017 साली 1800 CSC केंद्रांच्या माध्यमातून 11 राज्यातील 170 जिल्ह्यांमधून प्रवास सुरु केला. 2019 साली CSC केंद्रांची संख्या 29,860 पर्यंत नेताना 115 महत्वाकांक्षी जिल्हे जोडले गेले. आज 50,000 CSC व्यापलेल्या 34 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील 633 जिल्ह्यात टेली-लॉ कार्यरत आहे. गेल्या एका वर्षात टेली-लॉ उपक्रमाने लाभार्थींच्या संख्येत 369 टक्के वाढ नोंदवली. जून 2021 महिन्यात टेली-लॉ उपक्रमाद्वारे 9.5 लक्षाहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला आहे.

✨⚡️मोदी सरकारने स्थापन केले नवीन मंत्रालय; मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी घेतला निर्णय.⚡️✨ 🌵राजधानी दिल्लीत सध्या मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिमंडळातील फेरबदलांमुळे वेगवान हालचाली सुरू आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्तही ठरला असून, नव्या मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 🌵देशातील सहकार चळवळीला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने ‘मिनिस्ट्री ऑफ को-ऑपरेशन’ अर्थात ‘सहकार मंत्रालय’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी स्वतंत्र प्रशासन, कायदेशीर आणि धोरणात्मक आराखडा तयार करण्याचं काम हे मंत्रालय करणार आहे. 🌵केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना या मंत्रालयाची घोषणा केली होती. केंद्र सरकारने प्रसिद्धी पत्रकातून या मंत्रालयाबाबतची माहिती दिली आहे. या मंत्रालयामुळे देशातील सहकार चळवळीला बळ मिळेल. 🌵या मंत्रालयाच्या माध्यमातून प्रशासकीय, कायद्यांचा आणि धोरणात्मक कार्यप्रणाली उपलब्ध करून दिली जाईल. तसेच सहाकरी संस्थांना स्थानिक पातळीवर मदत करण्यासाठी कामी येईल. याद्वारे सहकारी संस्थांबद्दल नागरिकांमधील विश्वास वाढून त्यांचं नातं अधिक घट्ट होऊ शकेल, असा विश्वास केंद्राने व्यक्त केला आहे.

🟪आठ राज्यांत नवे राज्यपाल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्ताराआधी, मंगळवारी केंद्र सरकारने आठ राज्यांच्या राज्यपाल पदांवर नव्या नियुक्त्यांसह फेरबदल केले आहेत. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले असून त्यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी वर्णी लावण्यात आली आहे. नव्या राज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये अनुसूचित जाती व जमातींना प्राधान्य देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातून गेहलोत यांच्यासह दोन-तीन मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आधापासून चर्चेत होती. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाआधीच गेहलोत यांची गच्छंती झाली आहे. गेहलोत राज्यसभेचे खासदार असून वरिष्ठ सभागृहातील गटनेतेही आहेत. आता त्यांना मंत्रिपद, संसद सदस्यत्व व गटनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागेल. संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होत असून सत्ताधारी भाजपला राज्यसभेत नव्या गटनेत्याची नियुक्ती करावी लागेल. केंद्रीय मंत्री पियुष गोयल सभागृहाचे उपनेते आहेत. आपण तीनही पदांचा बुधवारी राजीनामा देत असून संविधानाच्या चौकटीत नवी जबाबदारी पार पाडू, अशी प्रतिक्रिया गेहलोत यांनी व्यक्त केली. ७४ वर्षांच्या गेहलोत यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळल्याने मोदी सरकारमध्ये मोठा फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट झाले.

🟪शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचा “निपुण भारत” उपक्रम.. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने 5 जुलै 2021 रोजी “निपुण भारत (समजून घेत वाचनातील प्राविण्य मिळवणे आणि संख्यावाचन यासाठी राष्ट्रीय उपक्रम - NIPUN)” उपक्रमाचा प्रारंभ केला. या उपक्रमाचे पायाभूत साक्षरता आणि अंक साक्षरतेचे सार्वभौम अधिग्रहण सुनिश्चित करण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे हे लक्ष्य आहे, जेणेकरुन प्रत्येक मुलाला वर्ष 2026-27 पर्यंत त्याच्या तिसऱ्या इयत्तेपर्यंत वाचन, लेखन आणि अंकलेखन या विषयात आवश्यक शैक्षणिक क्षमता प्राप्त होईल. हा उपक्रम शालेय शिक्षण व साक्षरता विभाग राबविणार असून “समग्र शिक्षा” या नावाने या केंद्र-पुरस्कृत योजनेच्या अंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय-राज्य-जिल्हा-गट-शाळा पातळीवर योजनेची पाच स्तरीय अंमलबजावणी करणारी यंत्रणा कार्यरत करण्यात येईल.

🟪भारत सरकारचे नवीन 'सहकार मंत्रालय' 'सहकारातून समृद्धी' हा विकासात्मक दृष्टिकोन वास्तवात उतरवण्यासाठी, भारत सरकारने पूर्णपणे वेगळ्या 'सहकार मंत्रालयाची' स्थापना करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. सहकारी संस्थांसाठी 'व्यवसाय सुलभीकरण' प्रक्रिया सुरळीत करण्याचे आणि बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम, सहकार मंत्रालयाद्वारे होऊ शकेल. देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी हे मंत्रालय एक प्रशासकीय, वैधानिक आणि धोरणात्मक चौकट नव्याने निर्माण करू शकेल. त्यामुळे सहकारी संस्थांची मुळे घट्ट रुजून सहकार चळवळीला खऱ्या अर्थाने जनाधार मिळू शकेल. ▪️‘सहकार’ या संज्ञेची व्याख्या.... मानवप्राणी जातीतील समूहजीवन जगण्याची उपजत असणारी सहजप्रवृत्ती तसेच पारस्परिक सहकार्य करण्याची पद्धत म्हणजे सहकार होय. तांत्रिकदृष्टया सहकार म्हणजे विशेष पद्धतीने व्यवसाय करण्याचा प्रकार होय. सहकार हा को-ऑपरेशन या इंग्रजी शब्दाचा मराठी पारिभाषिक शब्द आहे. रॉबर्ट ओएन हे आधुनिक सहकारी चळवळीचे जनक होय. वयाच्या एकविसाव्या वर्षी स्कॉटलंडमधील गिरणीत ते भागीदार बनले. अमेरिकेतील इंडियाना येथे त्याने ‘ न्यू हार्मनी कॉलनी’ ही सहकारी वसाहत स्थापन केली. ग्रेट ब्रिटनमधील रॉचडेल या सुती कापड गिरण्यांच्या छोटया गावातील 28 कामगारांनी 21 डिसेंबर 1844 रोजी इक्विटेबल पायोनिअर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी नावाच्या सहकारी भांडाराची स्थापना केली. त्यांनी स्वीकारलेली तत्त्वे सहकार चळवळीला मार्गदर्शक ठरली. सहकारी चळवळीतील उपक्रम सहकारी पद्धतीने, स्वेच्छेने व लोकशाही पद्धतीने चालविले जातात.

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content
+9

photo content
+1

photo content
+9

🟪डॉ. जया द्वादशीवार वाङ्मयीन पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ लेखिका तथा समिक्षक डॉ. जया द्वादशीवार यांच्या जन्मदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या वाङ्मयीन पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यामध्ये साहित्यिक शर्वरी पेठकर यांना कादंबरीसाठी तर नाट्य लेखनासाठी माधवी भट, कवितांसाठी डॉ.पद्मरेखा धनकर यांना तर वैचारिक लेखनासाठी ज्येष्ठ लेखिका अरूणा सबाने यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ लेखिका, इंग्रजीच्या प्राध्यापिका तथा समिक्षक डॉ. जया व्दादशीवार यांच्या निधनानंतर दरवर्षी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करून पुरस्कार वितरीत केले जातात. यावर्षी डॉ. जया व्दादशीवार यांचे निवासस्थान असलेल्या भिवापूर वार्ड, चंद्रपूर येथे २३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता या पुरस्कारांचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला नागपूरच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व वनराई संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. त्यांच्याच हस्ते वाड्.मय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीचे डॉ. कन्ना मडावी, डॉ. सविता भट, शैला धनकर, वसू देशपांडे, पुष्पा नागरकर यांनी केले आहे.

🟪दिल्लीच्या ‘हिटमॅन’ची दमदार कामगिरी, टी-२० क्रिकेटमध्ये ठोकली ‘डबल सेंच्युरी’. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते असे म्हणतात, मग ते सहा चेंडूत सहा षटकार असो, किंवा एका षटकात चार बळी असो. भारताचा हिटमॅन रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये २६४ धावा ठोकत सर्वांना स्तब्ध केले होते. आता असाच काहीसा पराक्रम दिल्लीचा क्रिकेटपटू सुबोध भाटीने केला आहे. सुबोधने टी-२० क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकत सर्वांचा लक्ष आपल्याकडे खेचून घेतले आहे. सुबोधने २०५ धावांची नाबाद खेळी केली. एका क्लब टी-२० सामन्यात खेळत सुबोधने द्विशतक ठोकले. त्याच्या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने १०२ धावा १७ चेंडूत केल्या. म्हणजे त्याने १७ षटकार ठोकले. याशिवाय त्याने आपल्या खेळीत १७ चौकार लगावले. सुबोध सलामीला गेला आणि ७९ चेंडू खेळून नाबाद परतला. रणजी क्रिकेटर सुबोधच्या संघाने एकूण २५६ धावा केल्या. त्याने २५०च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. सुबोधच्या संघाने २० षटकांत एक गडी गमावत २५६ धावा केल्या. यापूर्वी सुबोधने दिल्ली संघासाठी देशांतर्गत स्पर्धेत महत्त्वपूर्ण खेळी खेळत अनेक सामने जिंकले आहेत.

🟪चीनच्या अंतराळवीरांचं स्पेसस्टेशनवर पहिलं ‘स्पेसवॉक’ चीनच्या दोन अंतराळवीरांनी अंतराळात स्पेसवॉक करत नवा इतिहास रचला आहे. लियु बोमिंक आणि तांग होंग्बो या दोघांनी एअरलॉकमधून बाहेर पडत स्पेसस्टेशनवर काम केलं. रोबोटिक आर्मची सेटिंग करण्यासाठी ते बाहेर आले होते. या दोघांनी १५ मीटर लांब रोबोटिक आर्म इन्स्टॉल केला. तर तिसरे क्रू मेंबर कमांडर निए हॅशेंग आतच होते. यावेळी टिपलेल्या दृश्यांमधून अंतराळातून पृथ्वी दिसत आहे. चीनच्या सरकारी टिव्हीने हे फुटेज दाखवले आहेत. चीनचे तीन अंतराळवीर १७ जूनला तिसऱ्या ऑर्बिटल स्टेशनवरील कामासाठी तीन महिन्यांच्या मिशनवर आहेत. हा चीनचा सर्वात मोठा महत्त्वाकांक्षी स्पेस प्रोजेक्ट आहे. त्याचबरोबर मे महिन्यात मंगळावर रोबोट पोहोचवण्यास या प्रोजेक्टची मदत घेतली जाणार आहे. चीननं स्पेस स्टेशनसाठी पहिलं मॉडेल तियानहे हे २९ एप्रिलला लॉन्च केलं होतं. त्यानंतर ऑटोमेटेड स्पेसक्राफ्ट खाणं आणि इंधनासाठी लॉन्च केलं गेलं. त्यानंतर १७ जूनला तीन अंतराळवीरांसह शेनजोउ-१२ कॅप्सूल अंतराळात पाठवण्यात आलं. यात रोबोटिक आर्म इन्स्टॉल करण्याची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यात अंतराळवीरांना यश मिळालं आहे. या कामगिरीसाठी अंतराळवीरांना खास स्पेस सूट डिझाइन करण्यात आला आहे. गरजेच्या वेळी सहा तास रिकाम्या जागेवर यामुळे काम करता येतं. या रोबोटिक आर्ममुळे इतर स्पेसस्टेशन निर्मितीसाठी मदत होणार आहे.

🟪भारतात तिसरी लाट तुलनेत सौम्य. देशात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर दरम्यान करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून त्यात दुसऱ्या लाटेपेक्षा बाधितांची दैनंदिन संख्या निम्मी असेल, शिवाय कोविड प्रतिबंधक वर्तनाने प्रसंगी ही लाट टाळलीही जाऊ शकते, असे मत सरकारी गटातील वैज्ञानिकांनी प्रारूपाच्या आधारे म्हटले आहे. कोविड संसर्ग तिसऱ्या लाटेत वेगाने पसरू शकतो कारण सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणूचा अधिक प्रसार करणारा विषाणू येऊ शकतो, असे मत सूत्र प्रारूपाचे मुख्य गणिती मणिंद्र अग्रवाल यांनी म्हटले आहेत. त्यांनी गणितीय प्रारूपाच्या आधारे आतापर्यंत करोना लाटांच्या स्वरूपाची मांडणी केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने करोनाच्या वाढत्या रुग्णांचा वेध घेण्यासाठी गणितीय प्रारूप तयार करण्यासाठी एक पथक स्थापन केले होते. अग्रवाल यांच्याशिवाय या गटात हैदराबाद आयआयटीचे एम. विद्यासागर, संरक्षण विभागाच्या वैद्यकीय उपसंचालक (वैद्यकीय) माधुरी कानिटकर यांचा समावेश आहे. या गटाने कोविड १९ विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा अंदाज योग्य प्रकारे सांगितला नाही, त्याबाबत अलिकडेच टीका झाली होती.

🟪 ‘अ’ , ‘ब’ श्रेणीतील अपंगांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा सरकारी नोकऱ्यांतील शारीरिकदृष्ट्या अपंग कर्मचाऱ्यांना ‘अ’ व ‘ब’ गटात पदोन्नतीत आरक्षण देण्याबाबत महिनाभरात धोरण निश्चिात करण्याची हमी राज्य सरकारने नुकतीच उच्च न्यायालयात दिली. धोरण निश्चिात झाल्यानंतर आठवड्याभरात ३१ पैकी ३० विभागांतील या कर्मचाऱ्यांकरिता निश्चिात करण्यात आलेल्या पदांची पदोन्नती प्रक्रिया सुरू करण्यात येण्याचेही महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. आतापर्यंत याप्रकरणी राज्य सरकार तर्फे चालढकल करण्यात येत होती. परंतु पहिल्यांदाच सरकारने उपरोक्त हमी दिल्याने ‘अ’ व ‘ब’ गटातील अपंग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. या दोन श्रेणीत अपंग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतरही केंद्र सरकारने अद्याप धोरण आखलेले नाही असे सांगत राज्य सरकारकडून आदेशाच्या अंमलबजावणीस चालढकल झाल्याची तक्रार होती.

photo content

photo content

photo content
+3

photo content
+9

photo content
+9