ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 714 مشتركاً، محتلاً المرتبة 5 600 في فئة التعليم والمرتبة 11 993 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 714 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 04 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -63، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 14.95‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.82‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 042 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 289 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 05 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 714
المشتركون
-1024 ساعات
-317 أيام
-6330 أيام
أرشيف المشاركات
photo content
+9

photo content

🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच
+1
🟪 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी अंक 18 व 19 वा ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔹पुस्तकाची वैशिष्ट्ये:- » 1 जानेवारी ते 10 जुलै 2021 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश » केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ » केंद्राचा आर्थिक पाहणी अहवाल » महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२१ » महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल » १५ व्या वित्त आयोगाचा अंतिम अहवाल » भारतातील कोविड -१९ लसीकरण ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ◼️ विविध परीक्षांमध्ये 'चालू घडामोडी डायरी' च्या मागील आवृत्तीमधून आलेले प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • संयुक्त गट ब पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १४ प्रश्न • वनसेवा पूर्व परीक्षा २०१९ - २५ पैकी १८ प्रश्न • संयुक्त गट क पूर्व परीक्षा २०१९ - १५ पैकी १३ प्रश्न • संयुक्त गट ब मुख्य परीक्षा २०१९ - १० पैकी ७ प्रश्न • महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा २०१९ - ७ पैकी ७ प्रश्न • राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१९ - ५० प्रश्न • राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० - १९ + प्रश्न ➖➖➖➖➖➖➖➖ 🔲 मार्गदर्शक डॉ.अजित प्रकाश थोरबोले उपजिल्हाधिकारी ◼️लेखक बालाजी सुरणे सर दिव्या महाले - सुरणे www.simplifiedcart.com महाराष्ट्रात सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध

photo content
+1

photo content
+9

🟪विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 3.0 युरोपच्या डसॉल्ट सिस्टिम्स कंपनीच्या भागीदारीने नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन (AIM) अंतर्गत 17 ऑगस्ट 2021 रोजी “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 3.0” (SEP 3.0) याचा प्रारंभ करण्यात आला आहे. अटल टिंकरिंग लॅबच्या (ATL) तरूण संशोधकांसाठीच्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थी संशोधकांना डसॉल्ट सिस्टिम्स फाऊंडेशन या संस्थेच्या प्रतिनिधींच्या सोबतीने काम करण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शकांचा पाठिंबा मिळणार, नमुना व तपासणीसाठी प्रोत्साहन आणि अंतिम वापरकर्त्याकडून अभिप्राय, बौद्धिक संपदेची नोंदणी आणि कल्पनांचे पेटंट करून घेणे, प्रक्रिया व उत्पादने, उत्पादनासाठी प्रोत्साहन तसेच बाजारपेठेत उत्पादन सादर करताना देखील प्रोत्साहन दिले जाणार आहे. कार्यक्रमाचा भाग म्हणून, प्रत्येक शाळेतील एक संघाला (6 विद्यार्थी आणि एक शिक्षक) स्टार्टअप कंपनी तयार करण्यासाठी, 3D प्रिंटिंग तंत्राचा वापर करून संरचना तयार करण्यासाठी, विपणन मोहिमा आखण्यासाठी, उत्पादनाच्या किंमती निश्चित करण्यासाठी आणि विस्तार धोरण तयार करण्यासाठी बीज भांडवल पुरवीला जाणार आहे. 🔳अटल इनोव्हेशन मिशन विषयी. अटल इनोव्हेशन मिशनचे उद्दिष्ट देशात दहा लक्ष नवनिर्मिती आणि संभाव्य रोजगार निर्मिती करणारे आहे. डेल टेक्नॉलॉजीज बरोबर भागीदारी म्हणजे अटल टिंकरिंग लॅबच्या तरुण संशोधकांच्या, शाळेतील आकांक्षावादी विद्यार्थ्यांच्या उद्योजकता विषयक क्षमतांना विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रमातून उत्तेजन देणे हे देखील उद्दिष्ट आहे, तसेच ही भागीदारी देशभरातल्या नाविन्यपूर्ण प्रतिभेसाठी मूल्यवर्धक ओळख व्यासपीठ तयार करते.

🟪पेगॅससप्रकरणी केंद्राला नोटीस पेगॅससद्वारे विरोधी पक्षांच्या नेत्यांसह अनेक भारतीयांवर पाळत ठेवण्यात आल्याच्या आरोपप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला नोटीस बजावली. राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारी कोणतीही माहिती देऊ नका, पण या प्रकरणात संबंधित सक्षम प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात काय अडचण आहे, असा प्रश्न न्यायालयाने केंद्राला केला. पेगॅसस हेरगिरीप्रकरणी चौकशी करण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली. या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षेचा पैलू अंतर्भूत आहे, या मुद्द्याचा सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी पुनरुच्चार केला. इस्रायलच्या एनएसओ गु्रपच्या पेगॅसस हेरगिरी तंत्रज्ञानाचा वापर केला की नाही, याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे उघड केल्यास राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होतो, असा युक्तिवाद मेहता यांनी केला. त्यावर राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणाशी संबंधित माहिती उघड करण्यास आम्ही सांगत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, पेगॅससद्वारे पाळत ठेवण्यात आल्याचा आरोप याचिकांद्वारे करणाऱ्यांमध्ये अनेक नामांकित भारतीय नागरिकांचा समावेश आहे. हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे पाळत ठेवली असेल, फोन हॅक केला असेल तर सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीनेच तसे करण्यात आले असेल. मग सक्षम प्राधिकरणाने आमच्यापुढे प्रतिज्ञापत्र सादर केले तर अडचण काय, असा सवाल न्यायालयाने केंद्राला केला.

🟪अफगाणी नागरिकांसाठी भारताचा आपत्कालीन इ-व्हिसा. अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता हस्तगत केल्याच्या पार्श्वभूमीवर जे अफगाणी नागरिक भारतात येऊ इच्छित असतील त्यांना आपत्कालीन इ-व्हिसा जारी करण्याचे भारताने मंगळवारी जाहीर केले आहे. अफगाणिस्तानचे कुठल्याही धर्माचे नागरिक इ आपत्कालीन व्हिसासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्या अर्जांवर नवी दिल्ली येथे प्रक्रिया केली जाईल. तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर दोन दिवसांनी भारताने ही घोषणा केली आहे. गृह कामकाज खात्याने अफगाणिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहून इलेक्ट्रॉनिक व्हिसाची सुरुवात केली आहे, त्याला इ इमर्जन्सी व्हिसा असे संबोधण्यात येत आहे. यात जे ऑनलाइन अर्ज येतील त्यावर तातडीने प्रक्रिया करून संबंधित नागरिकांना भारतात येण्यास परवानगी दिली जाईल असे गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास बंद असल्याने ऑनलाइन व्हिसा अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यावर दिल्लीत प्रक्रिया करण्यात येईल. हा व्हिसा सुरुवातीला सहा महिन्यांसाठी असणार आहे. सुरक्षा बाबींचा विचार अर्ज मंजूर करताना केला जाणार आहे, त्यानंतरच अफगाणी नागरिकांना प्रवेश दिला जाईल. सर्व धर्माचे अफगाणी नागरिक या व्हिसासाठी अर्ज करू शकणार आहेत. शेकडो अफगाणी लोक काबूलमध्ये मुख्य विमानतळावर आले होते व त्यांनी लष्कराच्या जेट विमानाला लटकण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सात जणांचा मृत्यू झाला होता.

photo content
+6

photo content
+9

MIDC परीक्षा हॉलतिकीट आले आहेत. परीक्षा हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा. https://midcrecruitment2019.cbtexam.in/

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟪‘TAPAS’ (ट्रेनिंग फॉर ऑगमेंटींग प्रॉडक्टिविटी अँड सर्व्हिसेस) ऑनलाइन मंच केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने ‘TAPAS’ (ट्रेनिंग फॉर ऑगमेंटींग प्रॉडक्टिविटी अँड सर्व्हिसेस) नामक एक ऑनलाइन संकेतस्थळ / मंच / पोर्टल कार्यरत केले आहे. हा विषय तज्ञांची भाषणे, अभ्यास साहित्य आणि संबंधित इतर बाबी यासंबंधी व्याख्यानांमध्ये प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्थेचा (NISD) पुढाकार आहे. प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणात सहभागी करून घेऊन त्यांचे ज्ञान आणि क्षमता वर्धनाच्या दृष्टीने कौशल्य विकसित करणे हा अशा प्रकारे प्रशिक्षण स्वाध्याय पोचवण्याचा मुख्य उद्देश आहे. ▪️ठळक बाबी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संस्था (NISD) आणि मंत्रालय यांच्या सहयोगाने हा मंच विकसित केला गेला आहे. ज्या कोणाला एखाद्या विषयातील आपले ज्ञान वाढवण्याची इच्छा असेल त्यांना याचा वापर करता येईल. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. व्यसनाधीनांकडून होणारा छळ, वयोवृद्धांची काळजी घेणे, डिमेन्शिया ग्रस्तांची काळजी आणि व्यवस्थापन, तृतीयपंथी व्यक्तींचे प्रश्न आणि सामाजिक संरक्षण बाबींसंबंधी सर्वंकष अभ्यास हे यातील 5 मूलभूत अभ्यासक्रम आहेत. त्यामध्ये ध्वनिचीत्रीत केलेले व्याख्यान आणि ई-अभ्यासक्रम आहेत. प्रशिक्षणार्थी आणि अभ्यासक्रमातील सहभागी व्यक्तींना एकमेकांशी संवाद साधण्याला प्रोत्साहन मिळावे मदत करण्यासाठी चर्चांसाठीचे फोरम यात समाविष्ट आहेत.

🟪जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा : कोमलिका बारी अंतिम फेरीत भारताची कौशल्यवान तिरंदाज कोमलिका बारीने गुरुवारी जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेतील (२१ वर्षांखालील) रीकव्‍‌र्ह प्रकाराची अंतिम फेरी गाठली. कोमलिकाने भारतासाठी पदकनिश्चिती केली असून रविवारी तिला सलग दुसरे जागतिक जेतेपद मिळवण्याची संधी आहे. जमशेदपूरच्या १९ वर्षीय कोमलिकाने यापूर्वी १८ वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक कमावले होते. गुरुवारी तिने उपांत्य फेरीत अमेरिकेच्या कॅसी कौफहोल्डला ६-४ (२८-२७, २५-२८, २८-२६, २५-३०, २९-२५) असे पराभूत केले. आता रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत तिच्यासमोर स्पेनच्या एलिआ कॅनल्सचे कडवे आव्हान असेल. कोमलिकाने ही लढत जिंकल्यास दीपिका कुमारीनंतर अशी कामगिरी करणारी ती भारताची दुसरी तिरंदाज ठरेल. दीपिकाने २००९ आणि २०११मध्ये अनुक्रमे कॅडेट आणि कनिष्ठ गटात सुवर्णपदक पटकावले होते.

🟪दूरदर्शन वाहिनीचा "रग रग में गंगा" हा प्रवासवर्णन कार्यक्रम केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते 16 ऑगस्‍ट 2021 रोजी "रग रग में गंगा" या यशस्वी प्रवासवर्णनाच्या दुसऱ्या पर्वाचे अनावरण करण्यात आले. गंगा नदीची भव्यता आणि तिच्या संवर्धनाची गरज याकडे लक्ष वेधण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. 💢कार्यक्रमाविषयी कार्यक्रमाचे पहिले पर्व 1.75 कोटी प्रेक्षकांनी पाहिले होते. हा केवळ एक कार्यक्रम नाही तर जन भागीदारीतून जन आंदोलनाचा प्रयत्न आहे. 'रग रग में गंगा' प्रवासवर्णनाच्या दुसऱ्या पर्वात गंगा नदीच्या सांस्कृतिक, पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक-आर्थिक बाबींचा समावेश असेल आणि निर्मलता आणि अविरलता या संकल्पनेवर केंद्रित असेल. गंगा नदीचे संवर्धन करण्यासाठी आणि तिला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) याद्वारे केले जाणारे कार्य या प्रवासवर्णातून सर्वांसमोर येईल तसेच NMCG याच्या सहकार्याने दूरदर्शनवर याचे दुसरे पर्व सादर केले जाणार आहे. काव्यात्मकरीत्या चित्रित केलेली ही मालिका नदी आणि तिचा परिसर, गंगा नदीचा आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक-आर्थिक वारसा आणि तिची सध्याची पर्यावरणीय स्थिती सर्वांसमोर सादर करेल. 26 भागांच्या या प्रवासवर्णनाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते राजीव खंडेलवाल यांनी केले आहे आणि 21 ऑगस्ट 2021 पासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8:30 वाजता ‘डीडी नॅशनल’ वाहिनीवर प्रसारित केले जाईल. ही मालिका जल-संरक्षणाचा आणि आणि जल-स्वच्छतेचा म्हणजेच अविरलता आणि निर्मळता यांचा संदेश देईल. 💢गंगा नदी गंगा नदी ही दक्षिण आशियातली भारत व बांग्लादेश या दोन देशातून वाहणारी एक प्रमुख नदी आहे. ब्रह्मपुत्रा नदीनंतर ही भारतातली सर्वात मोठी नदी आहे. गंगा नदीची लांबी 2,525 किलोमीटर आहे आणि तिचा उगम भारतातील उत्तराखंड राज्यात हिमालय पर्वतातल्या गंगोत्री येथे होतो. तेथून ती आग्नेय दिशेला वाहत येते व उत्तर भारतातल्या गंगेच्या खोऱ्यातून वाहत बांग्लादेशात प्रवेश करते. बांग्लादेशात ती बंगालच्या उपसागराला मिळते. 💢पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) आणि दूरदर्शन हे गंगा नदीच्या सध्याच्या स्थितीबद्दल व्यापक प्रमाणावर जागृती निर्माण करण्यासाठी आणि गंगा नदीला तिच्या भूतकाळातील वलय मिळवून देण्याच्या उद्देशाने एकत्र आले आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये भारताच्या सर्वाधिक पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीवरील ट्रॅव्हलॉग म्हणून 'रग रग मे गंगा' हा महत्वाचा कार्यक्रम राष्ट्रीय प्रसारण सेवेच्या दूरदर्शन राष्ट्रीय चॅनल वरून प्रसारित होण्यास सुरुवात झाली. या कार्यक्रमात गंगेचे उगमस्थान म्हणजे गोमुख हिमशिखरापासून ते गंगा बंगालच्या उपसागराला जिथे मिळते, तेथे गंगासागर स्थानापर्यंतचा 2525 किलोमीटर अंतराचा प्रवास चित्रित करण्यात आला आहे. प्रसिद्ध अभिनेता राजीव खंडेलवाल याने संचालित केलेल्या या ट्रॅव्हलॉग मध्ये गंगेच्या काठावरील सांस्कृतिक आणि सामाजिक आर्थिक महत्त्वाच्या वीस शहरांमधील प्रवासाचे चित्रीकरण आणि माहिती दाखवली आहे. गंगेची सांस्कृतिक, पौराणिक आणि ऐतिहासिक माहिती तसेच तिच्या काठावर बसलेले लोकजीवन यांची माहिती देतानाच, गंगा स्वच्छ करण्याचा संदेश, नदी स्वच्छ ठेवण्यात महत्वाची असलेली जनभागीदारी आणि गंगा नदीला स्वच्छ करून तिला पूर्वीचे रूप प्राप्त करून देण्यात राष्ट्रीय स्वच्छ गंगा योजनेचा सहभाग या सर्व बाबींचा या ट्रॅव्हलॉगमध्ये वेध घेतलेला आहे.

🟪पुण्याच्या बापलेकीनं सर केलं आफ्रिकेमधील सर्वात मोठं शिखर; २० दिवसांमधील दुसरी मोठी मोहीम यशस्वी रशियामधील माउंट एलब्रुस शिखर सर करणाऱ्या मराठमोळ्या धनाजी लांडगे आणि गिरीजा लांडगे या बाप लेकीच्या जोडीने आणखी एक शिखर सर करण्याचा पराक्रम केलाय. आफ्रिका खंडातील एकमेव शिखर असलेल्या माउंट किलीमांजारोची उंची ६ हजार ८९५ मीटर ऐवढी आहे. बारा वर्षीय गिरीजा आणि तिचे वडील धनाजी यांनी या शिखरावर यशस्वीरित्या चढाई केलीय. या कामगिरीसाठी पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आफ्रिका खंडातील पर्वतरांगांचा भाग नसलेला माउंट किलीमांजारो हे आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे. नुकतेच या दोघांनी रशियातील माउंट एलब्रूस शिखर सर केलं होतं. या मोहिमेनंतर नवीन आव्हान स्वीकारत धनाजी आणि गिरीजाने अथक परिश्रम घेत हे शिखर सर करण्याचा किर्तीमान स्थापीत केला आहे. “या मोहिमेची सुरुवात ११ ऑगस्टपासून केली होती. मोहिमेदरम्यान १७०० मीटर, २७०० मीटर, ३७२० मीटर, ४७०० मीटर अशी टप्प्याटप्प्याने ४ दिवसात उंची गाठण्यात आली,” असं धनाजी यांनी सांगितलं आहे. या चढाईदरम्यान रोज नवीन प्रदेश व नवीन वातावरणाचा सामना करावा लागत होता. पहिल्या दिवशी पावसाळी जंगल आणि पाऊस, दुसऱ्या दिवशी मुरलॅण्ड म्हणजेच खडकाळ असा भूभाग व दमट हवामानाचा सामना करावा लागला. तर तिसऱ्या दिवशी वाळवंट सदृश प्रदेश अन् ऊन्हाळी वातावरणाचा सामना करावा लागला. या सर्व परिस्थितींशी दोन हात करत १५ ऑगस्टच्या पहाटे १ वाजता शिखर माथ्याच्या मुख्य चढाईला म्हणजेच ४७०० मीटर वरून ५८९५ मीटरच्या चढाईला सुरुवात करण्यात आल्याचं धनाजी म्हणाले.

🟪प्रोफाईल अद्ययावत करणे आयोगाने अनिवार्य केले असल्याने काही उमेदवारांची जुने प्रोफाईल असल्याने मोबाईल नंबर व इमेल आयडी हरवले
🟪प्रोफाईल अद्ययावत करणे आयोगाने अनिवार्य केले असल्याने काही उमेदवारांची जुने प्रोफाईल असल्याने मोबाईल नंबर व इमेल आयडी हरवले आहे किंवा बंद झालेला आहे. यासाठी उमेदवाराने आयोगाच्या कॉल सेंटर फोन करून आपली माहिती दिल्या नंतर तुम्हाला एक OTP पाठविला जाईल, त्यानंतरच उमेदवारास आपली प्रोफाईल अद्ययावत करता येईल,याची नोंद घ्यावी.

▪️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 नव्याने पात्र 104 उमेदवारांच्या मुलाखत - 25,26 ऑगस्ट रोजी
▪️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 नव्याने पात्र 104 उमेदवारांच्या मुलाखत - 25,26 ऑगस्ट रोजी

🟪MPSC फॉर्म भरताना कागदपत्रे सादर करणे अनिवार्य झाले आहे.