ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 766 مشتركاً، محتلاً المرتبة 5 593 في فئة التعليم والمرتبة 11 939 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 766 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 13 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -26، وفي آخر 24 ساعة بمقدار 19، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 12.63‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 8.01‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 4 266 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 704 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 14 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 766
المشتركون
+1924 ساعات
+537 أيام
-2630 أيام
أرشيف المشاركات
▪️राज्यसेवा मुख्य परीक्षा सुधारित अभ्यासक्रम २०२०. ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬● 👉 प्रत्येक नवीन घटक Highlight करुन दिलेला आहे. 👉 Syllabus ची एक प्रत कायम आपल्या सोबत ठेवा. 👉 Syllabus तोंड पाठ असावा. ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬● 👉 एक वेळ आवश्य भेट द्या www.simplifiedcart.com ●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●

🟧कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाची ‘महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन’ योजना ‘महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन’ योजनेच्या अंतर्गत विद्यावेतन मिळविण्यासाठी भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने 27 मार्च 2021 पर्यंत अर्ज मागवले आहेत. ▪️ठळक बाबी. हे विद्यावेतन दोन वर्षांचा संमिश्र कार्यक्रम असून यात देशातील भारतीय व्यवस्थापन संस्थांमधील (IIM) वर्ग-सत्र आणि जिल्हा पातळीवरच्या अर्थव्यवस्थेमध्ये कौशल्य नियोजन आणि विकासास प्रोत्साहन देण्यासाठी काम करण्याची अनोखी संधी या विद्यार्थ्यांना उपलब्ध असते. यासंदर्भातील पथदर्शी प्रकल्पाच्या यशानंतर, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) अहमदाबाद, IIM बंगळुरु, IIM-जम्मू, IIM कोझिकोड, IIM लखनऊ, IIM नागपूर, IIM रांची, IIM उदयपूर आणि IIM विशाखापट्टणम यांच्या सहकार्याने 'महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन 2021-23’ याची घोषणा केली. तरुण तसेच प्रतिभावान, कृतीशील व्यक्तींना IIMच्या वर्ग-सत्रांमधे एकत्र येत अभ्यास करण्याची आणि जिल्हा पातळीवरच्या अर्थव्यवस्थेत कौशल्य विकास आणि कौशल्य नियोजनाला प्रोत्साहन देण्यासाठी सहभागी होण्याची ही एक अनोखी संधी आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय विद्यावेतन 2021-23, संपूर्ण भारतातील 660 हून अधिक जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. अर्जदारांसाठी पात्रता निकष: देशभरातील 21-30 वर्ष वयोगटातील भारतीय विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ते मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवीधर असावे. 🟧Buy Online Simplified Publication Book www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

🟧तेजस्विनी-संजीव यांना सुवर्णपदक महाराष्ट्राची तेजस्विनी सावंत आणि संजीव राजपूत या अनुभवी नेमबाजांनी अप्रतिम कामगिरी करत भारताला आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात भारताने सुवर्णपदकाची भर घातल्यानंतर विजयवीर सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली. यासह भारताने १२ सुवर्ण, ८ रौप्य आणि ७ कांस्यपदकांसह एकूण २७ पदकांनिशी अग्रस्थानी मजल मारली आहे. सुवर्णपदकासाठी रंगलेल्या अंतिम लढतीत भारताच्या या जोडीने युक्रेनच्या सेरहिय कुलिश आणि अ‍ॅना इलिना यांच्यावर ३१-२९ असा थरारक विजय मिळवला. तेजस्विनी-संजीव यांनी आपला अनेक वर्षांचा अनुभव पणाला लावत हे सुवर्णपदक खेचून आणले. यासह भारताची सुवर्णपदकांची संख्या ११वर पोहोचली आहे. भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर आणि सुनिधी चौहान यांनी अमेरिकेच्या टिमोथी शेरी आणि विर्जिनिया थ्रॅशर यांच्यावर ३१-१५ अशी सहज मात करत कांस्यपदक पटकावले. अंतिम लढतीत तेजस्विनी-संजीव यांची सुरुवात निराशाजनक झाली होती. मात्र १-३ असे पिछाडीवर पडल्यानंतरही त्यांनी ५-३ अशी आघाडी घेतली. त्यानंतर भारताने ही आघाडी कायम टिकवत जेतेपद पटकावले. युक्रेनच्या जोडीने बरोबरी साधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण भारताच्या अनुभवी जोडीसमोर त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. पात्रता फेरीत भारताच्या जोडीने सर्वाधिक ५८८ गुण मिळवले होते. तर कुलिश आणि इलिनाने ५८३ आणि तोमर-चोहान यांनी ५८० गुण पटकावले होते.

🟧केंद्रीय जल शक्ती मंत्र्यांद्वारे जल जीवन अभियानांतर्गत 7 राज्यांसाठी कामगिरी प्रोत्साहन निधी म्हणून 465 कोटी रुपये मंजूर   ग्रामीण भागातील प्रत्येक घरात सन 2024 पर्यंत नळाद्वारे खात्रीशीर पाणीपुरवठा करण्यासाठी अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोरम, सिक्कीम, गुजरात आणि हिमाचल प्रदेश ही सात राज्ये जल जीवन अभियान- हर घर जल अंतर्गत कामगिरी प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरली आहेत. जल जीवन अभियानांतर्गत कामगिरी प्रोत्साहन अनुदानासाठी निकषांमध्ये प्रत्यक्ष आणि आर्थिक प्रगती, नळाद्वारे पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता आणि निधी वापरण्याची क्षमता यांचा समावेश आहे. आज केंद्रीय जल शक्ती मंत्री, गजेंद्रसिंग शेखावत यांनी या राज्यांना कामगिरी प्रोत्साहन निधी म्हणून 465 कोटी रुपये मंजूर केले. 15 ऑगस्ट, 2019 रोजी जल जीवन अभियान जाहीर केल्यापासून आतापर्यंत चार कोटी कुटुंबांना पाण्याची नळ जोडणी देण्यात आली आहे, ज्यायोगे देशातील ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात 3.23 कोटी (17%) वरून 7.20 कोटी (37.6%) पर्यंत वाढ झाली आहे. प्रत्येक घराला नळाद्वारे पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जल जीवन अभियान राबविण्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यात गुजरातचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये, जल जीवन अभियानासाठी (जेजेएम) 11,000 कोटी रुपयांचे वाटप केले गेले. 

🟧ग्रँडमास्टर लेऑन मेंडोसाला जेतेपद भारताचा युवा ग्रँडमास्टर लेऑन ल्युक मेंडोसा याने हंगेरी येथे झालेल्या दुसऱ्या कुमानिया बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद पटकावले. गोव्याच्या १५ वर्षीय मेंडोसाने या स्पर्धेत अपराजित राहताना चार विजय आणि पाच डाव बरोबरीत सोडवले. त्याने नऊ फेऱ्यांमध्ये ६.५ गुणांची कमाई केली. मेंडोसा आणि स्लोव्हाकियाचा मिलान पॅचर यांचे समान गुण झाले, पण सरस टाय-ब्रेकच्या आधारे मेंडोसाने जेतेपद प्राप्त केले. पहिला डाव बरोबरीत सोडवल्यानंतर मेंडोसाने सलग चार विजय प्राप्त केले. त्यानंतरचे चार डाव बरोबरीत सोडवत त्याने ६.५ गुण मिळवले.

🟧राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी राज्यात करोना संसर्ग अतिशय झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार येत्या रविवापासून राज्यात रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (२८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन, जिल्हा तसेच राज्य टास्क फोर्स चे सदस्य,वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद साधून कोविड स्थिती, करण्यात येत असलेल्या उपाययोजना जाणुन घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, माजी मंत्री डॉ दीपक सावंत, मुख्य सचिव सीताराम कुंटे मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी वर्षा निवासस्थानी बैठकीस उपस्थित होते.

🟧सर्व भारतीय बांगलादेशच्या निर्मितीच्या बाजूने होते तर मोदींना सत्याग्रह कशासाठी केला?; शिवसेना खासदाराचा प्रश्न दोन दिवसाच्या बांगलादेश दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन चांगलाच वाद निर्माण झालाय. बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले. ढाक्यापासून ३५ कि.मी. अंतरावर असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर दिलेल्या भाषणात मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केल्याचं म्हटलं आहे. मात्र आता मोदींच्या या दाव्यावरुन भाजपा समर्थक आणि विरोधक अशी टीका टीप्पणी सुरु झालीय. याचसंदर्भात शिवसेनेच्या राज्यसभेतील खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही मोदींच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जर संपूर्ण भारत बांगलादेशची निर्मिती व्हावी या बाजूने होता तर आंदोलनाची गरज काय होती?, असा प्रश्न चतुर्वेदी यांनी उपस्थित केलाय.

🟧डीडी फ्री डिशने ओलांडला 40 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा: ईवाय फिक्की मीडिया एन्टरटेन्मेंट अहवाल 2021   ईवाय फिक्की मीडिया एन्टरटेन्मेंट अहवाल 2021 नुसार डीडी फ्री डिशने आपला वाढीचा वेग कायम ठेवला आहे आणि त्याने अंदाजे 40 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे. या वाढीचे श्रेय कमी खर्चीक टेलिव्हिजन संच, आर्थिक अडचणी, डीडी रेट्रो चॅनल सुरू करणे आणि विनामूल्य डिश प्लॅटफॉर्मवर मोठे प्रसारक परत येण्याला दिले जाते. काही वेळा दूरचित्रवाणीवर कोणतेही मोठे कार्यक्रम नसताना वापरला जाणारा डीडी फ्री डिश देखील घरातच दुसरा सेट टॉप बॉक्स बनला आहे. चीनमध्ये उत्पादित चिपसेटच्या कमतरतेमुळे मोफत डिश वितरकांनी वर्षाच्या विक्रीतील वाढ तसेच मागणीची पूर्तता करण्यास असमर्थता दर्शविली आहे. कनेक्टिव्ह टीव्हीद्वारे 2025 पर्यंत दूरचित्रवाणीचे ग्राहक 5% हून अधिक वाढ नोंदवत 40 दशलक्ष ग्राहकांचा तर डीडी फ्री डिश 50 दशलक्ष ग्राहकांचा टप्पा ओलांडू शकेल. डीडी फ्री डिश, प्रसार भारतीची मल्टी-चॅनेल फ्री-टू-एअर डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवा आहे. कोणत्याही वर्गणी शुल्काशिवाय लोकांना दर्जेदार करमणूक आणि माहितीसाठी पर्यायी आणि परवडणारे व्यासपीठ उपलब्ध करणे हे डीडी फ्री डिशचे प्राथमिक उद्दीष्ट आहे. सध्या डीडी फ्री डिशमध्ये 161 दूरचित्रवाणी वाहिन्या आहेत ज्यात 91 दूरदर्शन वाहिन्यांसह (ज्यात 51 कोब्रँडेड  शैक्षणिक वाहिन्यांचा समावेश आहे), 70 खासगी वाहिन्या आणि 48 रेडिओ वाहिन्यांचा समावेश आहे. 1.4.2021 पासून डीडी फ्री डिश खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या समूहात 10 हिंदी जीईसी, 15 हिंदी चित्रपट, 6 संगीत, 20 बातम्या, 8 भोजपुरी, 3 भक्तीपर आणि 2 परदेशी वाहिन्यांचा समावेश असेल. डीडी फ्री डिश सध्या श्रेणीसुधारणा प्रक्रियेत आहे आणि मे 2021 पर्यंत त्याच्या समूहात आणखी काही वाहिन्या जोडल्या जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच एक ऑनलाइन वेब अॅप देखील जारी करण्यात आला आहे ज्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या जवळपासचे डीडी फ्री डिश सेट टॉप बॉक्स विक्रेते शोधण्यात मदत होते. भारतीय माध्यम आणि करमणूक क्षेत्रातील फिक्की-ईवाय अहवालाच्या मार्च 2021 मध्ये  प्रसिद्ध झालेल्या अहवालात डिजिटल पायाभूत सुविधांबरोबरच डिजिटल माध्यमांच्या अवलंबामुळे माध्यम आणि करमणूक क्षेत्रातील टीव्ही, रेडिओ, मुद्रित आणि डिजिटल इत्यादी माध्यम विभागातील सद्यस्थितीतले व भविष्यातील वाढीचे वातावरण दर्शविले गेले आहे.

🟧Buy Online Simplified Publication Book www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

Simplified YearBook 2020.pdf264.52 MB

samajsudharak sample copy.pdf11.02 MB

Simplified Yearbook 2021 Sample Copy(1).pdf9.22 MB

Simplified Combine Que. Set Sample Copy.pdf2.85 MB

photo content
+4

🟧२७ मार्च हा दिवस दरवर्षी " जागतिक रंगभूमी दिन " म्हणून साजरा केला जातो (१९६२ पासून) »१९६१ मध्ये 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती »यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते १९६२ साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता २०२० साली पाकिस्तानच्या शाहिद नदीम यांना संदेश देण्याचा मान मिळाला होता २०२१ साली ब्रिटनच्या हेलन मिरेन यांना संदेश देण्याचा मान मिळाला आहे संदेश देण्याचा मान मिळालेले भारतीय ▪️२००२ : गिरीश कर्नाड ▪️२०१८ : राम गोपाल बजाज .

राज्यसेवा पूर्व परीक्षा cut ऑफ काय राहू शकतो 210+ ऑल कॅटगोरी जनरल 195+ ऑल कॅटगोरी female आणि जर पोस्ट वाढल्या तर 200+ ऑल कॅटगोरी जनरल 185+ ऑल कॅटगोरी female

राज्यसेवा पूर्व परीक्षा cut ऑफ काय राहू शकतो 210+ ऑल कॅटगोरी जनरल 195+ ऑल कॅटगोरी female आणि जर पोस्ट वाढल्या तर 200+ ऑल कॅटगोरी जनरल 185+ ऑल कॅटगोरी female

👤 सर्वोच्च न्यायालयाचे (४८वे) सरन्यायाधीश वरिष्ठ न्यायमूर्ती एन. व्ही. रमण्णा होणार आहेत ✔️ सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे या
👤 सर्वोच्च न्यायालयाचे (४८वे) सरन्यायाधीश वरिष्ठ न्यायमूर्ती एन. व्ही. रमण्णा होणार आहेत ✔️ सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी रमन यांच्या नावाची केंद्राकडे शिफारस केली आहे 👤 कोण आहेत एन. व्ही. रमण्णा ? 🤱 जन्म : २७ आॅगस्ट , १९५७ ⚖️ न्यायाधीश : आंध्रप्रदेश हायकोर्ट ⏳ कार्यकाळ : २००० ते २०१३ ⚖️ मुख्य न्यायाधीश : आंध्र प्रदेश हायकोर्ट ⏳ कार्यकाळ : १० मार्च ते २० मे , २०१३ ⚖️ मुख्य न्यायाधीश : दिल्ली हायकोर्ट ⏳ कार्यकाळ : २०१३ ते २०१४ ⚖️ न्यायाधीश : सुप्रीम कोर्ट ⏳ कधीपासून : २०१४ ⚖️ भारताचे सरन्यायाधीश ⏳ कार्यकाळ : २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत ⚖️ अध्यक्ष : आंध्र प्रदेश न्यायिक अकादमी .

🟧पॅरा नेमबाजी विश्वचषक: मनीष नरवालला विक्रमी सुवर्णपदक यूएईच्या अल एन येथे सुरू असलेल्या पॅरा नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या मनीष नरवालने विश्वविक्रम रचला आहे. पी 4 मिक्सड 50 मीटर पिस्टल एसएच 1 या प्रकारात मनीषने सुवर्णपदकाची कमाई करत नव्या विक्रमाला गवसणी घातली. या स्पर्धेतील हे भारताचे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी सिंगराजने 10 मीटर एअर पिस्टल एसएच 1 प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. 2019 सिडनी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता मनीषने 229.1 गुण नोंदवत जुना विक्रम मोडला. त्याच्या आधी सर्बियाच्या रास्तको जोकिकने 2019मध्ये ओसीजेक येथे 228.6 गुण मिळवत विक्रम रचला होता. भारत तिसऱ्या स्थानी - नरवालशिवाय इराणच्या सारेह जवानमार्डीने 223.4 गुण मिळवले. तर, सिंगराजने 201.7 गुणांसह कांस्यपदक जिंकले. स्पर्धेच्या सहा दिवसानंतर युक्रेनने चार सुवर्ण, चार रौप्य व एक कांस्यपदकांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. तर, यजमान संयुक्त अरब अमिरातीने (युएई) तीन सुवर्ण व एक रौप्यपदकासह दुसरे स्थान राखले आहे. भारत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदकांसह पदकांच्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे.

🟧मराठी चित्रपट आनंदी गोपाळला सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2019.   दिग्दर्शक समीर विद्वंस यांच्या आनंदी गोपाळ या चरित्रात्मक चित्रपटाने सामाजिक विषयावरचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान पटकावला आहे.  या चित्रपटाची कथा ही आनंदी गोपाळ आणि त्यांचे पती गोपाळराव जोशी यांच्याभोवती फिरते ज्यांनी तिला वैद्यकीय अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात पेनसिल्व्हेनियाच्या महिला वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी गेल्या 1886 मध्ये त्यांनी एमडी पदवी प्राप्त केली. भाग्यश्री मिलिंद हिने आनंदी गोपाळ यांची तर ललित प्रभाकर याने तिच्या पतीची भूमिका साकारली आहे.