ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 707 مشتركاً، محتلاً المرتبة 5 597 في فئة التعليم والمرتبة 11 970 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 707 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 06 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -81، وفي آخر 24 ساعة بمقدار -3، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 9.92‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.17‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 344 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 068 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 07 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 707
المشتركون
-324 ساعات
-477 أيام
-8130 أيام
أرشيف المشاركات
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ६ पदकं जिंकली होती. नीरज चोप्रा - सुवर्णपदक टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. मीराबाई चानू - रौप्यपदक टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताला पदक मिळाले. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने देशाला पहिले पदक मिळून दिले. भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. याआधी सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते. पीव्ही सिंधू - कांस्यपदक टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला. या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. लव्हलिना बोर्गोहेन - कांस्यपदक टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला. उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे. रवी दहिया - रौप्यपदक टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कामगिरी केली आहे. मात्र ५७ किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. फायनलमध्ये रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावूर युगुयेवशीने दहियाचा पराभव केला. युगुयेवने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना ७-४ ने जिंकला. त्यामुळे रवीला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. पुरुष हॉकी संघ - कांस्यपदक तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचत ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. बजरंग पुनिया - कांस्यपदक टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरल .

photo content

सिम्प्लिफाईड प्रकाशनाची वरील सर्व पुस्तके महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहेत आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा आणि आपली प्रत आजच राखून ठेवा. सिम्प्लिफाईड प्रकाशनाचे व इतर परीक्षाभिमुख कोणतेही पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी ONLINE BOOKING साठी आपल्या www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com 👆👆वेबसाईटला अवश्य भेट द्या.

photo content

photo content
+5

photo content
+7

photo content
+9

Congratulations✌️💐✌️👍✌️💐 नीरज चोपडा हे भारतीय भालाफेकपटू आहेत. त्यांनी टोकिओमध्ये झालेल्या आॅलिम्पिक स्पर्धेत ८७.५८मीटर दू
+1
Congratulations✌️💐✌️👍✌️💐 नीरज चोपडा हे भारतीय भालाफेकपटू आहेत. त्यांनी टोकिओमध्ये झालेल्या आॅलिम्पिक स्पर्धेत ८७.५८मीटर दूर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले आहे. वैयक्तिक क्रिडा प्रकारात अभिनव बिंद्रा नंतरचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. ✌️💐✌️💐✌️💐✌️💐✌️💐✌️💐

ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि कझाकिस्तानच्या दाऊलेत नियाझबेकोव यांच्यात
ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि कझाकिस्तानच्या दाऊलेत नियाझबेकोव यांच्यात ब्राँझ पदकासाठी लढत झाली. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत बजरंग पुनियाने ब्राँझ पदकावर नाव कोरले. त्याने 8-0 अशा फरकाने एकतर्फी विजय नोंदवला.  💐💐💐✌️✌️✌️✌️

🟪मेसीचा बार्सिलोनाला अलविदा आघाडीचा फुटबॉलपटू लिओनेल मेसीने शुक्रवारी अखेरीस बार्सिलोना क्लबला अलविदा केला. क्लबच्या आर्थिक नियमांनुसार मेसीसोबत नवा करार करणे अशक्य असल्यामुळे अखेर १७ वर्षांनंतर प्रथमच त्याला अन्य संघाकडून खेळावे लागणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अर्जेंटिनाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ३४ वर्षीय मेसीने २००४मध्ये बार्सिलोनाकडून पदार्पण केले. बार्सिलोनासाठी ७७८ सामन्यांत ६७२ गोल करताना त्याने संघाला ३५ विजेतेपदे मिळवून दिली. यामध्ये चार चॅम्पियन्स लीग आणि १० ला लिगा जेतेपदांचा समावेश आहे. मेसी आता पॅरिस सेंट-जर्मेन संघाशी करारबद्ध होणार असल्याची चर्चा फुटबॉलवर्तुळात रंगत आहे.

🟪 कोण आहेत ? जेफ बेझोस यांना मागे टाकणारे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती लूई विटॉनचे (Louis Vuitton) मालक बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnoult) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांनी अमॅझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क यांना मागे टाकलंय. फोर्ब्सच्या रियल-टाइम बिलिनेयर्स लिस्टमध्ये त्यांचं नाव सर्वात वर आहे. अर्नाल्ट यांची एकूण संपत्ती १९८.९ अब्ज डॉलर आहे. तर जेफ बेझोस १९४.९ अब्ज डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आणि एलन मस्क १८५.५ अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बर्नार्ड अर्नाल्ट हे ७२ वर्षीय फ्रेंच उद्योजक आहेत. ते ब्रांड लूई विटॉन मोएट हेनेसीचे मालक आहेत. अर्नाल्ट यांच्याजवळ एकूण ७० ब्रांड्स आहेत. त्यामध्ये लुई वीटन, मार्क जॅकब्स, केंजो, स्टेला मेकार्टनी फेंडी, क्रिश्चियन डायर, गिवेंची, सेफोरा यांसारख्या फेमस ब्रांडचा समावेश आहे.

🥉🥉 भारतीय पुरुष हॉकी संघाने पटकावले कांस्य पदक. ✌️कांस्यपदकाच्या सामन्यात जर्मनीचा 5-4 ने केला पराभव 🥉41 वर्षांनंतर भारतीय हॉकी टीमने मिळवले ऑलिम्पिक मध्ये पदक. 🥇याआधी 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.

💎💎४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं घडवला इतिहास, कांस्यपदकावर कोरलं नाव.💎💎 🌠भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे. 🌠अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे. 🌠उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय़ जर्मनीला पराभूत केलं. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले.

🟪जर्मनी: सुधारित आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश. 5 ऑगस्ट 2021 रोजी, जर्मनी हा आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर युती करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश ठरला आहे. ▪️आंतरराष्ट्रीय सौर युती विषयी. 2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे. गुडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) हा सुरुवातीला केवळ 121 सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम होता. आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यापासून, आता आंतरराष्ट्रीय सौर युतीचा भाग बनण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्य देशांसाठी हा करार खुला करण्यात आला आहे.

🟪समग्र शिक्षण योजना” याचा कालावधी 31 मार्च 2026 पर्यंत वाढविण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक संसदीय समितीने सुधारित ‘समग्र शिक्षण’ योजनेची अंमलबजावणी पुढील पाच वर्षांसाठी सुरु ठेवण्यास मंजुरी दिली आहे. ठळक बाबी. निर्णयानुसार, ही योजना 2021-22 या वर्षापासून 2025-26 या वर्षापर्यंत अंमलात आणली जाणार आहे. मंजूर केलेल्या कालावधीत योजनेसाठी 2,94,283 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. त्यापैकी 1,85,398 कोटी रुपयांचा खर्च केंद्रीय सरकार उचलणार आहे. सरकारी आणि अनुदानित शाळांतील (पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक पातळीच्या) 57 लक्ष शिक्षकांसह 11 लक्ष 60 हजार शाळांतील 15 कोटी 60 लक्ष विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. योजनेचा तपशील शाळापूर्व पातळीपासून इयत्ता 12 वी पर्यंतच्या संपूर्ण विद्यार्थी समुदायाच्या शालेय शिक्षणासाठी केंद्रीय सरकारने ‘समग्र शिक्षण’ ही एकात्मिक योजना सादर केली आहे. वंचित गट आणि दुर्बल घटकांच्या समावेशाद्वारे समानतेला प्रोत्साहन देण्याच्या आणि शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरांवर शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने शालेय शिक्षणाच्या प्रवेशाचे सार्वत्रिकीकरण करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

🔵 👆सिम्प्लिफाईड COMBINE            सराव प्रश्नसंच👆 🎯या पुस्तकाच्या प्रथम आवृतीमधून कोणत्या परीक्षेत किती प्रश्न आले. ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ◼️21 मार्च 2021 रोजी झालेल्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 पेपर-1या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 20+ प्रश्नांचा समावेश. ◼️15 सप्टेंबर 2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-1 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 54 प्रश्नांचा समावेश. ◼️24 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या राज्य कर निरीक्षक (STI) मुख्य परीक्षा पेपर-2 परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 46 प्रश्नांचा समावेश. ◼️25 आॅगस्ट 2019 रोजी झालेल्या सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO)Asst) मुख्य परीक्षा पेपर- 2. या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 57 प्रश्नांचा समावेश. ◼️महाराष्ट्र दुय्यम सेवा गट क पूर्व परीक्षा 2019 मध्ये 51 प्रश्नांचा समावेश ◼️ महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये 14 प्रश्नांचा समावेश ◼️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये 153 प्रश्नांचा समावेश ◼️पो.उप.नि.(PSI) मुख्य परीक्षा 2019 मध्ये 24 प्रश्नांचा समावेश ◼️13 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर- 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 21 प्रश्नांचा समावेश. ◼️20 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या  Excise Inspector Mains Exam Paper 2  या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 19 प्रश्नांचा समावेश. ◼️03 नोव्हेंबर 2019 रोजी झालेल्या Tax Assistant Mains Exam Paper 2 या परीक्षेत आपल्या पुस्तकातून तब्बल 43 प्रश्नांचा समावेश. ━━━━━━━༺༻━━━━━━━ ▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले 📱 9423333181 | 8788639688 ●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬● ▪️Buy Online 👇एक वेळ आवश्य भेट द्या -👇 www.simplifiedcart.com https://www.myownshop.in/simplifiedbooks

photo content

photo content

photo content
+9