ar
Feedback
MPSC SIMPLIFIED(official)

MPSC SIMPLIFIED(official)

الذهاب إلى القناة على Telegram

simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام MPSC SIMPLIFIED(official)

تُعد قناة MPSC SIMPLIFIED(official) (@mpscsimplified) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 33 728 مشتركاً، محتلاً المرتبة 5 613 في فئة التعليم والمرتبة 12 022 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 33 728 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 03 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -53، وفي آخر 24 ساعة بمقدار -2، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 15.97‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.82‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 5 387 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 1 289 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
simplified चा टेलिग्राम ग्रुप (आपल्या मित्रांना जॉईन करा) + सिम्प्लिफाइड स्टडी +newspaper सिम्प्लिफाइड +job सिम्प्लिफाइड +daily चालू घडामोडी टेस्ट +अभ्यास आधारित टेस्ट https://telegram.me/mpscsimplified

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

33 728
المشتركون
-224 ساعات
-277 أيام
-5330 أيام
أرشيف المشاركات
🟪टपाल विभागाने 11 ऑक्टोबर 2021 रोजी ‘बँकिंग दिवस’ पाळला. भारताच्या टपाल विभागाने 11 ऑक्टोबर 2021 रोजी ‘बँकिंग दिवस’ साजरा केला. यावर्षी बँकिंग दिनाची मुख्य संकल्पना सुकन्या समृद्धी योजनेची जाहिरात करणे ही आहे. दरवर्षी 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या काळात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय टपाल सप्ताह’ याच्या एका भागाच्या स्वरूपात ‘आजादी का अमृत महोत्सव’ सहीत हा दिवस पाळण्यात आला. यावर्षी, टपाल विभाग आर्थिक बाबींविषयी जनजागृती करण्यासाठी आणि वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ‘वित्तीय समावेशन (FI) मेळावे आयोजित करून ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत आहे. तसेच, विविध IPPB सेवांना या मेळाव्याद्वारे प्रोत्साहन दिले जाईल. ▪️भारतीय टपाल विभाग. ‘इंडिया पोस्ट’ या नावाखाली व्यवहार करणारे टपाल विभाग, ही भारत सरकारची टपाल प्रणाली आहे जी दळणवळण मंत्रालयाची उपसंस्था आहे. ही जगातली सर्वाधिक प्रमाणात विस्तारलेली टपाल प्रणाली आहे. 01 ऑक्टोबर 1854 रोजी लॉर्ड डलहौजी यांनी संस्थेची स्थापना केली. त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. टपाल विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या योजना खालीलप्रमाणे आहेत - बचत बँक खाते (बचत खाता / आवर्ती ठेव / मुदत ठेव / मासिक उत्पन्न योजना (MIS) किंवा राष्ट्रीय बचत योजना (NSC) / कृषी विकास पत्र) सुकन्या समृद्धि खाते / PPF खाते वित्त पोषित पोस्ट ऑफिस बचत खात्याशी संलग्न केलेले IPPB खाते टपाल जीवन विमा / ग्रामीण टपाल जीवन विमा योजना पंतप्रधान सुरक्षा विमा योजना / पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना

🟪भारताला मिळणार आणखी एक विमान सेवा; राकेश झुनझुनवालांच्या ‘आकासा एअरलाईन्स’ला सरकारची NOC शेअर बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांच्या आकासा एअरलाइन्सला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळाले आहे. एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड ‘आकासा’ एअर या ब्रँड नावाने काम करेल. जर सर्व प्रक्रिया योग्यवेळी पार पडल्या तर पुढच्या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये आकासा एअरलाईन्सची स्वस्त दरातील विमान सेवा सुरु करण्यात येईल असे कंपनीने म्हटले आहे. अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. आता एसएनव्ही एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या आकासा एअर या ब्रँड नावाने उड्डाण करणार आहे.. त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे असतील, ज्यांनी यापूर्वी जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे. इंडिगोचे माजी अध्यक्ष आदित्य घोष, राकेश झुनझुनवाला आणि जेट एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे हे आकासाचे सह-संस्थापक असतील.

🟪आयपीएल गाजवलेल्या ‘त्या’ तिघांसाठी टीम इंडियाची दारं होणार खुली. आयपीएल २०२१च्या अंतिम फेरीनंतर दोन दिवसांनी टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होईल. या स्पर्धेत विराट कोहली शेवटचे भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व करेल. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकलेली नाही. अशा परिस्थितीत, विराटसह, बीसीसीआयची देखील इच्छा आहे, की त्याने कर्णधार म्हणून आपली आंतरराष्ट्रीय टी-२० कारकीर्द विश्वचषक ट्रॉफीसह संपवावी. यासाठी बीसीसीआय आयपीएल २०२१ मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या काही स्टार खेळाडूंना टीम इंडियासोबत जोडू शकते. या खेळाडूंमुळे संघाच्या प्रशिक्षण आणि कंडीशनिंग सत्रांमध्ये संघाला मदत होऊ शकते. क्रिकबझच्या अहवालानुसार, निवड समितीने आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेल, केकेआरचा फलंदाज व्यंकटेश अय्यर आणि गोलंदाज शिवम मावी, या सर्व खेळाडूंची निवड केली आहे. त्यांच्यामुळे टीम इंडियाच्या प्रशिक्षणामध्ये आवश्यक मदत देईल. यापैकी किमान दोन खेळाडूंना दुबईमध्ये राहण्यास सांगितले जाऊ शकते, जिथे सध्या भारतीय खेळाडू क्वारंटाइन आहेत.

🟪स्पुटनिक लाइट लशीच्या निर्यातीस भारताची मान्यता भारत सरकारने एका मात्रेच्या स्पुटनिक लाइट या कोविड १९ प्रतिबंधक लशीच्या निर्यातीस मान्यता दिली आहे. ही लस रशियाच्या सहकार्याने भारतात तयार करण्यात आली असून आपल्या देशात या लशीला अजून मान्यता देण्यात आलेली नाही असे सूत्रांनी रविवारी सांगितले. भारताच्या हेटरो बायोफार्मा लि. या कंपनीने या लशीचे उत्पादन केले असून स्पुटनिक लाइट लशीच्या ४० लाख मात्रांची निर्यात रशियाला करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. स्पुटनिक लाइट ही रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीसारखीच असून भारतातील लसीकरण कार्यक्रमात वापर करण्यासाठी अजून या लशीला मंजुरी देण्यात आलेली नाही. भारताच्या औषध महानियंत्रकांनी स्पुटनिक व्ही लशीला एप्रिलमध्ये मंजुरी दिली होती पण स्पुटनिक लाइट लशीला अजून मंजुरी मिळालेली नाही. रशियाच्या राजदूतांनी भारत सरकारला अशी विनंती केली होती की, हेटरो बायोफार्माने तयार केलेल्या स्पुटनिक लाइट या लशीच्या निर्यातीला परवानगी देण्यात यावी. रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड या आस्थापनेशी या कंपनीचा करार असून त्यांनी लशीचे उत्पादन केले आहे. भारतात अजून स्पुटनिक लाइट या लशीला मान्यता मिळालेली नाही तोपर्यंत ही लस निर्यात करण्यास परवानगी द्यावी असे राजदूतांनी म्हटले होते.

🟪भारनियमनाचे सावट! राज्यात कोळशाअभावी १३ वीजनिर्मिती संच बंद; तूट भरून काढण्याचे आव्हान देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडले आहेत. यात महानिर्मितीचे चंद्रपूर, भुसावळ व नाशिक हे प्रत्येकी २१० मेगावॉटचे तसेच पारस- २५० मेगावॉट आणि भुसावळ व चंद्रपूर येथील ५०० मेगावॉटचा प्रत्येकी एक संच बंद झाला आहे. यासोबतच कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेडचे (गुजरात) ६४० मेगावॉटचे चार संच आणि रतन इंडिया पॉवर लिमिटेडचे (अमरावती) ८१० मेगावॉटचे तीन संच बंद आहेत. यामुळे महावितरणला औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमधून कराराप्रमाणे मिळणाऱ्या विजेमध्ये घट होत आहे. विजेची मागणी व उपलब्धता यामधील सध्या ३३३० मेगावॉटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून (पॉवर एक्सचेंज) वीज खरेदी सुरू आहे. देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज दर महाग होत आहे. खुल्या बाजारातून ७०० मेगावॉट विजेची खरेदी १३ रुपये ६० पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. रविवारी सकाळी ९०० मेगावॅट विजेची ६ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्र आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे.

🟪72 वा प्रादेशिक सैन्य दिवस: 9 ऑक्टोबर 2021 भारतीय लष्कराने 9 ऑक्टोबर 2021 रोजी 72 वा प्रादेशिक सैन्य दिवस साजरा केला. प्रादेशिक सैन्याचे महासंचालक लेफ्टनंट जनरल प्रीत मोहिंदेरा सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. या निमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ▪️पार्श्वभूमी 18 ऑगस्ट 1948 रोजी प्रादेशिक सैन्य कायदा लागू करण्यात आला आणि प्रादेशिक सैन्य सध्याच्या स्वरूपात अस्तित्वात आले. सुरुवातीला, प्रादेशिक सैन्यात पायदळ, आर्मर्ड कॉर्प्स, हवाई संरक्षण तोफखाना, सिग्नल, पुरवठा आणि इतर विभागीय युनिट्सचा समावेश होता. 9 ऑक्टोबर 1949 रोजी पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी प्रादेशिक सैन्याची औपचारिकरित्या स्थापना केली, जो तेव्हापासून प्रादेशिक सैन्य दिवस म्हणून साजरा केला जात आहे. प्रादेशिक लष्करामध्ये भूमिपुत्र या संकल्पनेवर आधारित ‘होम’ आणि ‘हर्थ’ बटालियन / तुकड्या व्यतिरिक्त भारतीय लष्कराच्या विविध रेजिमेंटशी संबंधित अनेक एकक आहेत. जम्मू व काश्मीरमधील नियंत्रण रेषेच्या देखरेखीसाठी इंजिनिअर TA बटालियन तैनात आहे. प्रादेशिक सैन्याकडे 10 इकोलॉजिकल TA बटालियन देखील असून, त्यांच्याकडे देशाच्या परिसंस्थेच्या संवर्धनाची जबाबदारी असून त्यादृष्टीने ते खडकाळ भागात आणि खराब हवामान असलेल्या भूभागात वृक्षारोपण करतात, पाणथळ जमिनींचे पुनरुज्जीवन करतात, जलाशये पुनर्संचयित करतात आणि चेक डॅम बांधून जलसंधारण उपाययोजना करतात. या व्यतिरिक्त, काही TA बटालियन भारतीय रेल्वे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात महत्वाच्या जबाबदाऱ्याही कौशल्याने पार पाडतात.

🟪"त्रिशूल" आणि “गरुड”: तीन मालवाहू रेलगाड्यांना जोडून तयार करण्यात आलेल्या रेलगाड्या. प्रथमच, भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे (SCR) विभागाने दोन लांब पल्ल्याच्या मालवाहू रेलगाड्या चालवल्या, ज्यांना प्रत्येकी तीन मालवाहू रेलगाड्यांना जोडून तयार करण्यात आले. या नवीन मालवाहू रेलगाड्यांना "त्रिशूल" आणि “गरुड” असे नाव देण्यात आले आहेत. या गाड्यांना 177 डब्बे जोडले गेले आहेत. "त्रिशूल" गाडीने 7 ऑक्टोबर 2021 रोजी कोंडापल्ली स्थानकापासून ते पूर्व किनारी रेल्वेच्या खुर्दा विभागापर्यंत पहिला प्रवास केला. "गरुड" गाडीने 8 ऑक्टोबर 2021 रोजी गुंटकल विभागातील रायचूर ते सिकंदराबाद विभागातील मनुगुरु पर्यंत पहिला प्रवास केला.याप्रकारे मालाची वाहतूक विक्रमी पद्धतीने होणार असून त्यामागील खर्च देखील कमी येणार आहे. तसेच लागणारे मनुष्यबळ देखील कमी लागणार. ▪️भारतीय रेल्वे विषयी. भारतीय रेल्वे ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतीय रेल्वे जगातल्या सर्वात मोठ्या रेल्वेसेवांपैकी एक आहे. ही जगातली सर्वात मोठी व्यवसायिक संस्था आहे. भारत सरकारचे कें‍द्रीय रेल्वे विभाग भारतातल्या संपूर्ण रेल्वे जाळ्याचे व्यवस्थापन राखतो. भारतातल्या रेल्वेसेवेचा आरंभ 1853 साली झाला. 1947 सालापर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. 1951 साली या सर्व संस्थांचे राष्ट्रीयीकरण करून एक संस्था बनवण्यात आली. भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या व उपनगरीय अशा दोन्ही प्रकारच्या सेवा चालवते.

🟪सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे उद्घाटन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या चिपी विमानतळावरुन, सिंधुदुर्ग-मुंबई दरम्यानच्या पहिल्या विमानाचे उड्डाण आणि चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते आभासी पद्धतीने सिंधुदुर्ग विमानतळावरुन, अलायन्स एअर विमानाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग विमानतळावरुन विमानाला रवाना केले. ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणजे, टाकावू समजल्या गेलेल्या गोष्टी, साहित्यापासून तयार करण्यात आलेले नवीन, पर्यावरणपूरक विमानतळ होय. ▪️सिंधुदुर्ग विमानतळाविषयी. सिंधुदुर्ग विमानतळ हे एक ग्रीनफिल्ड विमानतळ आहे. सिंधुदुर्ग हे केंद्रीय सरकारने मंजूर केलेल्या देशातल्या 21 ग्रीनफिल्ड विमानतळांपैकी एक विमानतळ आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात चिपी-परुळे इथे एकूण 271 हेक्टर्स भूमीवर हे विमानतळ बांधण्यात आले आहे. केंद्रीय सरकारच्या 'उडान' योजनेच्या अंतर्गत सिंधुदुर्ग विमानतळाला प्रादेशिक दळणवळण योजनेनुसार अधिसूचित केले आहे.

🟪नोबेल शांती पारितोषिक 2021. मारिया रेसा (फिलिपिन्स) आणि दिमित्री मुराटोव्ह (रशिया) हे दोन पत्रकार '2021 नोबेल शांती पारितोषिक'चे विजेते ठरले आहेत. ▪️इतर क्षेत्रातील विजेते - साहित्यातील ‘2021 नोबेल पारितोषिक’ विजेता - अब्दुलरजाक गुरनाह (टांझानियाचे कादंबरीकार). रसायनशास्त्रातील ‘2021 नोबेल पारितोषिक’ विजेता - जर्मनीचे बेंजामिन लिस्ट आणि ब्रिटनचे डेव्हिड मॅकमिलन. भौतिकशास्त्रातील ‘2021 नोबेल पारितोषिक’चे विजेते - सौकुरो मानेबे (जपान), क्लाऊस हॅसलमन (जर्मनी) आणि जॉर्जियो पॅरीसी (इटली). 'वैद्यकशास्त्र किंवा शरीरशास्त्र’ क्षेत्रातील ‘2021 नोबेल पारितोषिक' विजेते - डेव्हिड ज्युलियस आणि आर्डेम पॅतापौटियन (अमेरिका). ▪️नोबेल पारितोषिकाविषयी नोबेल पारितोषिक हे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मानवी प्रगतीला वरदान ठरलेल्या वैज्ञानिक संशोधनामध्ये योगदान दिलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी स्वीडिश आणि नॉर्वेजियन संस्थांकडून विविध श्रेणीमध्ये देण्यात येणारा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. हा सन्मान स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या इच्छेच्या सन्मानार्थ सन 1895 पासून दिला जात आहे. पारितोषिकाचे वितरण विविध संस्थांकडून केले जाते. याचा तपशील खालीलप्रमाणे आहे: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र: रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेस.शरीरशास्त्र आणि वैद्यकशास्त्र: करोलीन्स्का इंस्टीट्यूट येथील नोबेल असेंब्लीसाहित्य: स्वीडिश अकादमी शांती: हे पारितोषिक स्वीडिश संस्थेच्यावतीने नॉर्वेजियन नोबेल समितीकडून दिले जाते.

🟪भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत. वर्ष २०२१ मधील तिसरी तिमाही व चौथ्या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न हे करोनापूर्व पातळीच्या वर गेले असून भारतीय अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक मजबूत झाले आहेत, असे मत निती आयोगाचे माजी अध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी रविवारी व्यक्त केले. त्यांनी सांगितले, की अर्थव्यवस्था पुन्हा मजबूत होण्याकडे वाटचाल करीत असली तरी कोविड १९ साथ संपुष्टात आणण्यासाठी देशात वेगाने व निर्णायक प्रयत्न झाले पाहिजेत. लसीकरणाच्या पातळीवर चांगल्या बातम्या येत आहेत. तिसरी व चौथी तिमाही पाहिली तर वास्तव सकल राष्ट्रीय उत्पन्न हे कोविड १९ पूर्वीच्या पातळीपेक्षा वर गेले आहे. याचा अर्थ भारतीय अर्थव्यवस्थेचे पायाभूत घटक मजबूत आहेत. दरम्यान एप्रिल-जून या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ झाली असून गेल्या वर्षांत ती फारच कमकुवत होती. उत्पादन व सेवा क्षेत्रात भारताने चांगली कामगिरी केली असून कोविड १९ ची दुसरी लाट जास्त घातक होती. आता भारताची गाडी रूळावर येत असून यावर्षी जास्त विकास दर गाठण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने चालू आर्थिक वर्षांत विकास दराचा अंदाज पूर्वीच्या १०.५ टक्क्य़ांवरून ९.५ टक्के केला असून जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था २०२१ मध्ये ८.३ टक्क्य़ांनी वाढेल असा अंदाज दिला आहे.

🟪झायकोव्ह-डी’ लशीसाठी १९०० रुपये किंमत प्रस्तावित ‘झायकोव्ह-डी’ या करोना प्रतिबंधक लशीच्या किमतीबाबत केंद्र सरकार व झायडस कॅडिला कंपनी यांची चर्चा सुरू असतानाच, तीन मात्रांच्या या लशीसाठी १९०० रुपये अशी किंमत या कंपनीने सुचवली असल्याचे कळते. तथापि, ही किंमत कमी करण्याबाबत सरकार वाटाघाटी करत असून, याबाबत अंतिम निर्णय या आठवडय़ात घेतला जाण्याची शक्यता असल्याचे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. झायडस कॅडिलाच्या पहिल्या डीएनएवर आधारित सुईविरहित करोना प्रतिबंधक लशीचा लवकरच देशव्यापी लसीकरण मोहिमेत समावेश केला जाईल, असे सरकारने गुरुवारी सांगितले होते. ‘तीन मात्रांच्या या लशीसाठी कंपनीने सर्व करांसह १९०० रुपयांची किंमत प्रस्तावित केली आहे. लशीच्या किमतीबाबत सर्व पैलूंचा फेरविचार करण्यास कंपनीला सांगण्यात आले असून, त्याबाबत अंतिम निर्णय या आठवडय़ात होईल’, असे एका सूत्राने सांगितले.

🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महारा
+4
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. 👉 आजच आपली प्रत राखून ठेवा. 👇Online Booking Available👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

photo content
+2

photo content
+9

photo content
+9

🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महारा
+4
🟪 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 सह आगामी होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या सिम्प्लिफाईड प्रकाशनाची सर्व पुस्तके महाराष्ट्रातील सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. 👉 आजच आपली प्रत राखून ठेवा. 👇Online Booking Available👇 www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com www.simplifiedcart.com

4_5991113463886250697.pdf

photo content
+1

photo content
+9