ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Vibha Academy 🚔🚔

Vibha Academy 🚔🚔

الذهاب إلى القناة على Telegram

📚 विभा अकॅडमी | Vibha Academy 🎯 ध्येय निश्चित, यश निश्चित! join us on YouTube : https://youtube.com/@vibha_academy?si=T_YPYZEL4tptqaQi स्पर्धा परीक्षांची दर्जेदार व विश्वासार्ह तयारी करण्यासाठी तुमचे स्वागत आहे.

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدالفئة غير محددة
290
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
-130 أيام
أرشيف المشاركات
♦️ देशातील पहिल्या डेंगू लसीला केंद्राची मंजुरी..
♦️ देशातील पहिल्या डेंगू लसीला केंद्राची मंजुरी..

*ज्यांना तलाठी साठी अभ्यास करायचा आहे. त्यांनी कोणती बुक वापरावी, कोणती टेस्ट सिरीज लावावी, आयोगाचे प्रश्नाचा सराव कसा करावा , टेस्ट सिरीज लावावी का नाही , करंट कोणते करावे, गणित आणि बुद्धिमत्ता ची तयारी कशी करावी. तुमचा स्वतःचा study प्लॅन असेल तोही तुमि माझाशी चर्चा करून आपल्या तयारीला दिशा आणि स्पष्टता आणू शकता.* *#Vibha_Academy* *8378951284*

COMBINE PRELIMS QUESTION ANALYSIS 2021-2025.pdf8.32 MB

♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏 इतिहास : 10 भूगोल : 10 राज्यव्यवस्था :
♦️ गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम.. साधारपणे प्रत्येक विषयावर १० ते १५ प्रश्न असतात..🙏 इतिहास : 10 भूगोल : 10 राज्यव्यवस्था : 15 अर्थशास्त्र : 15 विज्ञान : 15 चालू घडामोडी :15 Maths and reasoning : 20

तलाठी भरती येणाऱ्या गट क मध्ये सामाविष्ट... एकूण तलाठी ...1539 2619+3088 = 5707

*22 जुलै 1947....🇮🇳 भारतीय तिरंग्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता...*

📚 20 जुलै 2026 चालू घडामोडी 💡 आजचा सुविचार: "अशक्य वाटणारे काम पूर्ण करण्याचा एकच मार्ग आहे – कठोर परिश्रम." 1. 'मिशन आगमन' अंतर्गत विक्रम-1 रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून भारताने खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता प्राप्त करणारा जगातील तिसरा देश होण्याचा मान मिळवला. 2. 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'Article 370' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म पुरस्कार मिळाला. 3. ममूटी (Bramayugam) आणि कार्तिक आर्यन (Chandu Champion) यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार प्रदान करण्यात आला. 4. बी. एस. रथनवेल यांनी 2500 ELO रेटिंग पार करत भारताचे 99 वे ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळवला. 5. नीती आयोगाच्या Investment Friendliness Index 2026 मध्ये मोठ्या राज्यांच्या श्रेणीत गुजरात प्रथम क्रमांकावर राहिले. 6. मीराबाई चानू आणि लव्हलिना बोरगोहेन यांची 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 7. यामी गौतम हिला 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) पुरस्कार मिळाला. 8. राजकुमार पेरियासामी यांना 'Amaran' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. 9. रणदीप हुड्डा यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. 10. 'भंगार' या चित्रपटाला 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट गैर-फीचर (Non-Feature) चित्रपट पुरस्कार मिळाला. 11. Semicon 2.0 योजनेसाठी ₹1,27,500 कोटींच्या एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीस मंजुरी देण्यात आली. 12. Investment Friendliness Index 2026 मध्ये डोंगराळ व ईशान्येकडील राज्यांच्या श्रेणीत उत्तराखंड प्रथम क्रमांकावर राहिले. 13. 2026 FIFA विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूयॉर्क–न्यू जर्सी स्टेडियम (अमेरिका) येथे खेळविण्यात आला. 14. रायमोना राष्ट्रीय उद्यान, जे अलीकडे फुलपाखरांच्या गणनेमुळे चर्चेत होते, ते आसाम राज्यात आहे. 15. स्पेनने अर्जेंटिनाचा पराभव करून 2026 FIFA विश्वचषक जिंकला. https://t.me/vibha_academy

18 जुलै 2026 चालू घडामोडी | 💡 आजचा सुविचार शिक्षकांना प्रश्न विचारणे ही चांगली गोष्ट आहे, कारण ते तुम्हाला ज्ञानाच्या मार्गाकडे घेऊन जाते. ➼ डॉ. श्रीनिवास कुमार तुम्मला यांची पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे (Ministry of Earth Sciences) नवे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ➼ सर्गी कोरेत्स्की यांची जुलै 2026 मध्ये युक्रेनचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. ➼ रबाब फातिमा यांची अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्र सहाय्यता अभियान (UNAMA) च्या नव्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ➼ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील जींद रेल्वे स्थानकावरून भारतातील पहिल्या स्वदेशी हायड्रोजन इंधन-सेल रेल्वी (NaMo Green Rail) ला हिरवा झेंडा दाखवला. ➼ भारतातील पहिली हायड्रोजन-चालित प्रवासी रेल्वे जींद–सोनीपत मार्गावर (हरियाणा) सुरू करण्यात आली. ➼ हरियाणातील कुरुक्षेत्र येथे अत्याधुनिक शीख संग्रहालयाचा (Sikh Museum) पायाभरणी समारंभ पार पडला. ➼ छत्तीसगड विधानसभेने Ease of Doing Business Bill, 2026 मंजूर केला, ज्यामुळे MSME उद्योगांसाठी मंजुरी प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. ➼ मध्य प्रदेशातील बरगी डायव्हर्जन प्रकल्पांतर्गत भारतातील सर्वात लांब भूमिगत नैसर्गिक प्रवाहाची जलसुरंग बांधली जात आहे. ➼ BIMSTEC सदस्य देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (NSA) पाचवी बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. ➼ लडाखमधील चोगलामसर येथे भारतातील सर्वात मोठे उच्च-उंचीवरील संघटित पुष्पशेती उद्यान (High-Altitude Organised Floriculture Park) विकसित केले जात आहे. ➼ 2026 FIFA विश्वचषकाचा अंतिम सामना स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात खेळवला जाणार आहे. ➼ सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने Gates Medical Research Institute (Gates MRI) सोबत M72 क्षयरोग (TB) लसीच्या निर्मितीसाठी भागीदारी केली. ➼ उत्तर प्रदेश सरकारने कौशल्य विकास आणि रोजगाराला चालना देण्यासाठी 'कौशल सेतू' आणि 'कौशल सारथी' ही पोर्टल्स सुरू केली. ➼ भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 'ऑल इंडिया मीडिया कॉन्फरन्स-2026' चे आयोजन नवी दिल्ली येथे केले. ➼ ऑस्ट्रेलिया 'Pitch Black-2026' या बहुराष्ट्रीय हवाई युद्ध सरावाचे यजमानपद भूषवत आहे. https://t.me/vibha_academy

17 जुलै 2026 चालू घडामोडी | 💡 आजचा सुविचार जर माणसाला काही शिकायचे असेल, तर त्याची प्रत्येक चूक त्याला काही ना काही शिकवून जाते. ➼ भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची HDFC बँकेचे अंशकालीन (Part-Time) अध्यक्ष म्हणून 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली. ➼ केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतातील सेमीकंडक्टर डिझाइन व उत्पादनाला चालना देण्यासाठी ₹1.27 लाख कोटींच्या Semicon 2.0 योजनेला मंजुरी दिली. ➼ केंद्रीय मंत्रिमंडळाने वाराणसीतील वरुणा कॉरिडॉर, गंगा कॉरिडॉर आणि 910 मीटर लांबीच्या केबल-स्टेड पुलाच्या उभारणीस मंजुरी दिली. ➼ राजौरी (जम्मू-काश्मीर) जिल्ह्यातील ऐतिहासिक भैरव झांकीचा राष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसा (National Intangible Cultural Heritage) यादीत समावेश करण्यात आला. ➼ स्पेनने फ्रान्सचा 2–0 असा पराभव करून 2010 नंतर प्रथमच FIFA विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ➼ फ्रान्सच्या संसदेने गंभीर आजारी प्रौढांना Assisted Dying (सहाय्यित मृत्यू) चा कायदेशीर अधिकार देणारे ऐतिहासिक विधेयक मंजूर केले. ➼ भारतात नवीन गॅस-आधारित युरिया प्रकल्प उभारण्यासाठी National Investment Policy for Urea 2026 (NIPU-2026) ला मंजुरी देण्यात आली. ➼ देवजित सैकिया यांची ICC Governance Review Committee च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ➼ तमीम इक्बाल यांची ICC Franchise Leagues Committee च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ➼ मॉरिशस हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (ICC) 111 वा सदस्य देश बनला. ➼ HCL-SRFI PSA Challenger Squash Tournament 2026 चे आयोजन इंडियन स्क्वॉश अकादमी, चेन्नई येथे करण्यात आले. ➼ Indian Wildlife Ecology Conference (IWEC 2026) ची दुसरी आवृत्ती सोनीपत, हरियाणा येथे आयोजित करण्यात आली. ➼ Mobile Phone Manufacturing Scheme (MPMS) साठी ₹62,500 कोटींच्या निधीस मंजुरी देण्यात आली. ➼ भारतीय नौदल Operation Southern Readiness 26-2 हे दक्षिण नौदल कमांड, कोची (केरळ) येथे आयोजित करत आहे. ➼ कोरकू जमात, जी अलीकडे वनजमिनीवरील अतिक्रमणामुळे चर्चेत होती, ती मुख्यतः मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात आढळते. https://t.me/vibha_academy

♦️ हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा..
♦️ हायड्रोजन रेल्वेला हिरवा झेंडा..

photo content

अखेर ऑफलाईन चे नोटिफिकेशन आले..🔥 ♦️ गट क पूर्व फॉर्म भरले त्याच्यासाठी.. परीक्षा केंद्र निवड कशी करावी. पूर्व परीक्षा सुधारित तारीख - 25 ऑक्टोबर मुख्य परीक्षा सुधारित तारीख - 27 डिसेंबर फॉर्म भरण्यासाठी 31 जुलै शेवटची तारीख..

♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे. [जागा : 2619] 👉 ऑनलाईन अर्ज करण्
♦️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झालेली आहे. [जागा : 2619] 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2026 👉 पूर्व परीक्षा (CBT) : 27 सप्टेंबर 2026 पासून 📎Apply Link : https://mpsconline.gov.in/candidate/main# https://t.me/vibha_academy

जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जॅनिक सिनरने १२ जुलै, २०२६ रोजी अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ६-७ (७
जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जॅनिक सिनरने १२ जुलै, २०२६ रोजी अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हचा ६-७ (७-९), ७-६ (७-२), ६-३, ६-४ असा पराभव करून आपल्या विम्बल्डन पुरुष एकेरीच्या विजेतेपद जिंकले. जॅनिक सिनर या इटालियन खेळाडूचे सलग दुसरे विम्बल्डन विजेतेपद आणि त्याच्या कारकिर्दीतील पाचवे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. https://t.me/vibha_academy

♦️भारताचे ऑपरेशन 'अमिस्ताद' 👉 भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला मदत करण्यासाठी भारताने सुरू केलेल्या मानवतावादी मोहिमेला 'ऑपरेशन अमिस्ताद' (Operation Amistad) असे नाव देण्यात आले आहे.. https://t.me/vibha_academy

एमपीएससी परीक्षेला 94 टक्के उमेदवारांची हजेरी https://t.me/vibha_academy
एमपीएससी परीक्षेला 94 टक्के उमेदवारांची हजेरी https://t.me/vibha_academy

एल निनो च्या प्रभावात वाढ? मराठवाडा, विदर्भात परिस्थिती गंभीर... https://t.me/vibha_academy
एल निनो च्या प्रभावात वाढ? मराठवाडा, विदर्भात परिस्थिती गंभीर... https://t.me/vibha_academy

13 जुलै 2026 चालू घडामोडी आजचा सुविचार: "स्वतःला प्रेरित करा, कारण तुमच्यासाठी ते दुसरे कोणीही करणार नाही."🥸🥸 1. भारताची पहिली हायड्रोजनवर चालणारी प्रवासी रेल्वे हरियाणातील जिंद–सोनीपत मार्गावर सुरू करण्यात येणार आहे. 2. केंद्र सरकारने 'आस्था वन संरक्षण योजना' ₹3,000 कोटींच्या प्रारंभिक निधीसह मंजूर केली. 3. सौरव गांगुली आणि अंजुम चोप्रा यांचा ICC Hall of Fame मध्ये समावेश करण्यात आला. 4. लिंडा नोस्कोव्हा हिने विंबल्डन 2026 महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. 5. नीरू धांडा हिने ISSF शॉटगन विश्वचषक 2026 मध्ये महिला ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकले. 6. क्रांती गौड ही लॉर्ड्स मैदानावर कसोटी सामन्यात पाच बळी घेणारी सर्वात युवा भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. 7. BITS पिलानी हे Quantum Advantage Tracker द्वारे क्वांटम अल्गोरिदमची पडताळणी होणारे भारतातील पहिले संस्थान बनले. 8. भारत आणि न्यूझीलंड यांनी 2030 पर्यंत ₹35,000 कोटींच्या द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य निश्चित केले. 9. भारतीय ग्रँडमास्टर पी. इनियन यांनी फ्रान्समध्ये आयोजित 6 वी ला प्लान्ये ओपन 2026 बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. 10. National CAMPA ने रिव्हर डॉल्फिन, प्रोजेक्ट स्नो लेपर्ड (Phase-II), भारतीय गेंडा आणि वन्य पाणम्हैस संवर्धन प्रकल्पांना मंजुरी दिली. 11. नेपाळमधील 'जेष्ठ वर्ण महाविहार' ला भारताच्या सहकार्याने पुनर्स्थापना केल्यानंतर UNESCO Asia-Pacific Heritage Award मिळाला. 12. दिलीप अस्बे यांची SWIFT Global Supervisory Board वर नियुक्ती करण्यात आली. 13. मिझोराममधील खावथलांगतुईपुई नदी बांग्लादेशात कर्णफुली नदी या नावाने ओळखली जाते. 14. फू क्वोक (Phu Quoc) बेट व्हिएतनाम देशात आहे. 15. पश्चिम बंगालने 2030 पर्यंत लिम्फॅटिक फायलॅरियासिस (हत्तीरोग) निर्मूलनासाठी Mass Drug Administration (MDA) मोहीम सुरू केली. 📌📌 MPSC परीक्षेसाठी महत्त्वाचे तथ्य पहिली हायड्रोजन प्रवासी रेल्वे – जिंद–सोनीपत (हरियाणा) आस्था वन संरक्षण योजना – ₹3,000 कोटी ICC Hall of Fame – सौरव गांगुली, अंजुम चोप्रा विंबल्डन महिला विजेती – लिंडा नोस्कोव्हा SWIFT बोर्ड – दिलीप अस्बे खावथलांगतुईपुई = कर्णफुली नदी (बांग्लादेश) फू क्वोक बेट – व्हिएतनाम MDA अभियान – लिम्फॅटिक फायलॅरियासिस निर्मूलन (पश्चिम बंगाल) ही यादी MPSC पूर्व, मुख्य परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. https://t.me/vibha_academy